मला आवडलेले मायबोलीवरचे धागे ( गद्य )

Submitted by दत्तात्रय साळुंके on 15 December, 2018 - 03:14

मला आवडलेले मायबोलीवरचे धागे (गद्य )

ब-याच मायबोलीकरांनी खूप परिश्रम घेऊन काही अभ्यासपूर्ण धागे लिहिले आहेत. या धाग्यातल्या लिखाणाशी आपण कधी सहमतही नसाल पण त्याची मांडणी, विषय हाताळणे थक्क करणारी वाटते. काही धाग्यावरचे तर प्रतिसादही खूप अभ्यासपूर्ण आणि वाचनीय आहेत. मायबोलीवर मला आवडलेले पुस्तक , मला आवडलेला चित्रपट , मला आवडलेले आयटेम सॉंग, मी काय ऐकतो, मला आवडलेले वाक्य, मला आवडलेले वेबसेरीज, मला भेटलेलीआवडती व्यक्ती, मा. बो. २०१५ स्पोर्टस् धागा , मला आवडलेले नाटक असे धागे आहेत . पण माझ्या पहाण्यात एकही धागा मायबोलीवरच्या आवडलेल्या लिखाणाचे संकलन देणारा दिसला नाही. बऱ्याचदा आपण जुने धागे वाचत असतो पण वाचल्यानंतर प्रतिसाद देऊन सुद्धा ते वरती येतीलच असे नाही. कधी कधी बऱ्याच मायबोलीकरांचे आवडलेले धागे वेळेअभावी वाचणे राहून जाते अशा धाग्यांचे संकलन झाले तर मायबोलीकरांना आवडलेले लिखाण पटकन वाचता येईल. निवडक १० त सुद्धा असे धागे मिळतील. आपणास आवडलेल्या धाग्याची लिंक द्यायची आहे. एखाद्याने तुम्हाला आवडलेला धागा पूर्वीच दिला असेल तर शक्यतो पुनरावृत्ती टाळावी. येथे फक्त ललित, कथा अशा प्रकारचे धागे द्यावेत. कवितेसाठी वेगळा धागा काढत आहे.
आपल्याला आवडलेल्या धागा आणि त्याचा विषय पुढीलप्रमाणे द्यावा.

उदाहरणार्थ :-
असा वसला महाराष्ट्र
https://www.maayboli.com/node/11014

Group content visibility: 
Use group defaults

@ अनया मीच तुमचा ऋणी आहे एवढी धाडसी अनुभुती, खूप सुंदर शब्दात मा.बो. वर लिहिल्याबद्दल...
@ किल्ली - खूप आभार ...

वारी (१-१०) टवणे सर
https://www.maayboli.com/node/15006

दत्तात्रयजी,
तुम्ही तुम्हाला आवडलेल्या धाग्यांचे संकलन ते ईतरांनीसुद्धा वाचावे म्हणून करीत आहात हे अतिशय स्तुत्य आहे.
परंतू तुमच्या वरील लेखनातून
>>>पण माझ्या पहाण्यात एकही धागा मायबोलीवरच्या चांगल्या लिखाणाचे आणि चांगल्या प्रतिक्रियांचे संकलन देणारा दिसला नाही. बऱ्याचदा आपण जुने धागे वाचत असतो पण वाचल्यानंतर प्रतिसाद देऊन सुद्धा ते वरती येतीलच असे नाही. कधी कधी बऱ्याच मायबोलीकरांचे चांगले धागे वेळेअभावी वाचणे राहून जाते अशा धाग्यांचे संकलन झाले तर मायबोलीकरांना चांगले लिखाण पटकन वाचता येईल.<<<
जर तुम्ही तुम्हाला आवडलेले लेख ईतर मायबोलीवरील लेखांपेक्षा चांगले आहेत असे सुचित करू ईछित आहात तर त्यास माझा अक्षेप आहे.
आणि तुम्हाला हेच अभिप्रेत असेल तर कृपया माझ्या कथेची लिंक तुमच्या यादीतून वगळावी ही विनंती.

तुमचा काही तरी गैरसमज होतोय.
हा. ब. तुमची धागा लिंक आता काढू शकत नाही कारण संपादन करु शकत नाही.

तुमचा काही तरी गैरसमज होतोय. >> असे वाटत नाही. तुमच्या तीन ओळीत चार वेळा आलेला 'चांगले' शब्द तुम्हाला अभिप्रेत असलेले सांगण्यास पुरेसा स्पष्ट आहे.
तुमची धागा लिंक आता काढू शकत नाही कारण संपादन करु शकत नाही. >> हरकत नाही. गैरसमज टाळण्यासाठी तुमचे लेखन संपादित करू शकता.

दत्तात्रयजी माफ करा, पण बदल न दिसल्याने नाईलाजाने माझा मुद्दा /विनंती पुन्हा मांडत आहे.
मी माझ्या लेखना संदर्भात 'मायबोली वरील इतर लेखना पेक्षा चांगले' असा क्लेम कधीही करत नाही आणि माझ्या लेखना संदर्भात इतर कोणी तो केलेला ही मला आवडत नाही. प्रशासनाचे धोरण सुद्धा काहीसे असेच आहे... म्हणुनच त्यांनी रेटिंग सिस्टीम ऐवजी 'मला आवडलेले निवडक धागे' सुविधा ऊपलब्ध करून दिली.
तुम्हाला वैयक्तिक पातळीवर लेख आवडले... ठीक आहे.. पण म्हणुन ते इतर लेखांपेक्षा चांगले आहेत असे तुम्ही धागा उघडून सांगावेत हे इतर अनेक लेखकांसाठी अन्याय्य आहे.
गैरसमज टाळण्यासाठी कृपया लेखनात बदल करावा (किंवा माझा लेख वगळावा - आता हे शक्य नाही कल्पना आहे तरी ) अशी पुन्हा विनंती करतो.

किट्टु आभार ... मी कथा वाचली होती पण शीर्षक आणि लेखक न आठवल्याने लिंक देऊ शकलो नाही.
असंच आपलं सटर फटर - भाग आकरा - ह. बा.
https://www.maayboli.com/node/58968
सुपाएवढ्या काळजाची साधी भोळी माणसं भाग -६ ह. बा.
https://www.maayboli.com/node/49384

धुंद रवी
जनगणना - एक अब्ज सतरा कोटी सदुसष्ठ लाख पंच्चाण्णव हजार नऊशे त्रेचाळीस अधिक एक.
https://www.maayboli.com/node/35004

पद्मा आजीच्या गोष्टी
पद्मा आजींच्या गोष्टी १ : आत्या आणि पाऊस
https://www.maayboli.com/node/57445

ही आणि 'गोष्ट अशी घडली आणि म्हणून मी तुम्हाला सांगितली' अशा मल्लीनाथीने सांगीतलेल्या इतरही अनेक गोष्टी

अरे हो
धुंद रवी लुंगी, अध्यात्मिक साक्षात्कार, गाणगापूर चा एस एम एस वगैरे पाहिजेच लिस्ट ला

@ शाली, mi_anu पान १ वर ही लिंक दिलीय ती पुन्हा देतो .
मायबोलीवरचे धम्माल धागे ( स्ट्रेस बस्टर , खजिनाच आहे हा धमाल धाग्यांचा)
https://www.maayboli.com/node/43117

एक 'शेल्ल्फोन' नावाचा सातारी बोलीवर आधारीत धमाल लेख होता. त्यातल 'र्बमगठिव्का..' हे फार फेमस झाल होते तेव्हा.
आता सापडत नाहीये तो धागा. मुळ लेखक कोण होते आता लक्षात नाही. (धुन्द रवी की राफा?)कोणाला लिन्क मिळाली तर जरुर द्या.
नाहीच मिळाला तर माझ्याकडे लेख ईमेल वर सेव्ह आहे. तो देइन. पण लेखक दुर्लक्षित होउ नये यासाठी.

@ मी_आर्या
मलाही सर्च आॅप्शन वापरुन मिळत नाही. मी "शेल्फोन" नाव सदस्य नोंदीत शोधले पण मिळाले नाही.
तुमच्या इमेल मधून पोस्ट करावयाची झाल्यास ती नियमाप्रमाणे असेल का? कोणाला हवी असेल तर ई-मेल करणे सोयीस्कर होईल का? सध्यातरी मला वाचाविशी वाटते. तेव्हा शक्य असल्यास ई-मेल करा?
खूप आभार...

सदस्याचे नाव नाहिये हो ते. लेखाचे नाव होते. किंवा 'र्बमगठिव्का' असे गुगल वर टाकुन बघा. अनेक जणांनी आपापल्या ब्लॉगवर कॉपी पेस्ट केलेला आहे तो. तिथे वाचता येइल . Happy

@ मी_आर्या
आंतरजालावर पुढील लिंक मिळाली.
https://shrirangjoshi.wordpress.com/category/comedy/
या लिंकच्या शेवटी "इंग्रजीच्या नादापाई … (भाग २)" मधे आहे.

नाही, या नावाचे मायबोलीकर नाही. तुम्ही दिलेल्या स्क्रीनशॉटमधे ते दिनेशदांनी तसे म्हटले आहे की ,:मागे गौतमने सातारी बोलीबद्द्ल.. " म्हण्जे गौतम नाव आहे सदस्याचे. पण मायबोली सदस्य नाम दुसरे असावे.

आणि तुम्ही जी लिन्क दिली आहे त्या व्यक्तीने नेटवरुन इकडुन तिकडुन गोळा करुन निवडक लेख टाकलेत. त्यातला एक धुंद रवी यांचा पण आहे बघा.

https://www.maayboli.com/node/34002- मंजुताईंचा 'नर्मदे हर' लेख

https://www.maayboli.com/node/13818- 'उपासना' या धाग्यावर अश्विनी के, हसरी, सावट ... आदींचे प्रतिसाद . त्यामुळेच हा धागा आवडतो.

http://vishesh.maayboli.com/node/1172 - विशेष मायबोलीवरील श्री शशांक पुरंदरे यांचा हा लेख

आधुनिक शस्त्रक्रियेचा जनक- शशांक पुरंदरे
https://vishesh.maayboli.com/index.php?q=diwali-2014/1517
ज्ञानेश्वरी समजावून घेताना- शशांक पुरंदरे
https://www.maayboli.com/node/42360
अवघे सावळ... शशांक पुरंदरे
https://www.maayboli.com/node/59211
अभंगगाथा - परम अर्थाची एक वाक्यता - अर्थात तुकोबा "वन लायनर" (भाग २ व अन्य भाग)
https://www.maayboli.com/node/48421

स्वीट टॉकर यांचा बोटीचा लेख आणि एक बाई त्यांना आणि बायकोला त्यांच्या मुलाचे आणि सुनेचे पुनर्विवाह झालेले पालक समजले तो लेख.
सुरेश शिंदे यांचा मेलामाईन वरचा लेख
बेफिकीर यांचा विद्या सिन्हा समान बाई दोन पुरुषांचे प्रपोज नाकारून नवऱ्याला परत आपलं म्हणतात ती कथा.
झुलेलाल यांची भिकारी मुलांना काकडी आणि पैसे दोन्ही देण्याची कथा
ट्युलिप यांची जुन्या मायबोलीवरची एका सोनेरी संध्याकाळी ही कथा
अमा यांचा व्हेगन धागा
दिनेशदा यांच्या सर्व रेसिपी
संघमित्रा ची ऑनसाईट ला सामान पोहचवणाऱयांची कथा
चंपक यांचा हॉटेल ना ग्रेव्ही पुरवणारा एक लेख आहे तो
किरण भिडे मेतकूट

एक पराग म्हणून आयडी आहेत ते लांब पल्ल्याच्या ट्रेन्सवर खूप चांगले माहितीपूर्ण लेख लिहितात. मी त्यांचा आयडी शोधायचा प्रयत्न केला पण मिळाला नाही. दुसर्‍या काही शब्दखुणा आठवल्यास त्या टाकून इकडे त्या लेखांची लिंक देता येतेय का ते बघते.

हां, लेखक आणि त्यांचं लेखन सापडलं. माबोकरांची सूचीमध्ये आयडी सापडला नाही तेव्हा मायबोली सर्चमध्ये दुरांतो टाकलं तरीही नो लक. मग निझामुद्दिन टाकल्यावर सापडले.

https://www.maayboli.com/user/36009/created

@ mi_anu, धन्यवाद , लिंक देण्याचा प्रयत्न करेल.
@ सायोजी,
खूप धन्यवाद, प्रयत्नपूर्वक लिंक पाठविल्याबद्दल ...
@ शालीजी खूप आभार. email मिळाला. उत्तर देतो.

अशोक पाटील मामांचे सगळेच लेख. त्यातल्या त्यात
https://www.maayboli.com/node/32852 - राधाबाई, गोपिकाबाई, काशीबाई, अन्नपूर्णा, पार्वती, रमा, आनंदी
https://www.maayboli.com/node/45831- अ‍ॅनॅस्थेशिया....
https://www.maayboli.com/node/53339- गुंतवळ.....जी.ए.कुलकर्णी
https://www.maayboli.com/node/54838 - "प्रवासी...." ~ जी.ए.कुलकर्णी-

Pages