तुला पाहते रे अर्थात सुबोध भावे

Submitted by वेडोबा on 24 November, 2018 - 03:48

तुला पाहते रे पहिल्या धाग्याच्या 2000 पोस्ट्स पूर्ण झाल्या, पुढची चर्चा इथे करूया.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>बाबां म्हणाले सगळ्या वडीलधाऱ्यांच्या पायी पडत जा म्हणून वीस च्या पण रोज पाया पडणार वाटतं
मै ईशा को उसके पिता की कमी मेहसूस नही होने दूंगा :|

काल त्या पिंकी मावशीचा साडी हट्ट या प्रकारात विक्रांत सरंजामे ची एन्ट्री होऊन त्याने ती कंपनी विकत घेतली त्यानंतरचा त्यांचा तो संवाद आहे ना, "मीच चेअरमन आहे, विकत घेतली कंपनी आत्ताच", त्यावेळेला विक्रांत मला चक्क आपल्या कंपूतला वाटला. तोही मजा घेत होता त्या मूर्ख संवादांची असं वाटलं. Happy

ईशाला पण तो मंद समजतो असं वाटत.. त्यामुळे ती काही अतरंगी बोलली तर सुभाची एक्सप्रेशन्स तिची टिंगल करत आहे अशी येतात..
त्याने प्रेमळ भाव ठेवण्याचा आतापर्यंत बराच प्रयत्न केलाय पण फुटकळ संवाद आणि ईशाचा अभिनय दोन्ही साथ देत नाहीत..त्यामुळे आताशा सुभाने पण इंटरेस्ट गमावला आहे character मधला असं वाटतं..

"जिजाजी" फार डोक्यात जातं. त्याकाळी अरुणला "जिजाजी" ऐवजी "अरुणराव" किंवा "निमकर" म्हणत असतील असं वाटतं>>>
मलाही हेच वाटलं आधी. म्हटलं त्या काळात कुठे जिजाजी म्हणत असतील..
मग लक्षात आलं की बेबी विशीतली आहे. हम आपके है कौन नंतरच लग्न झालं असणार हो निमकरांचं..

Feeling Old..

सरंजामेचा आरसा परिकथेतला आहे वाटतं, फक्त प्रेम करणारे एकमेकांना दिसतात! पिंकी आणि इशाई समोरच होत्या!.... हे मस्त... मला हे व्वाटले कि ईआई न पाहिल विकी ला म्ह्नुन जाउ दिलय बेबी ला अस आधि , पण मावशी ला ति सान्गत नाही तसे

विक्या कायतरी जुण्यापण्या आयड्या वापरतोय अजून. गोड पदार्थ तिच्या पानात सरकवणे वगैरे. >>>>>> तो स्वतः जुन्या काळातला आहे ना. म्हणुन तो जुन्या आयडिया वापरतो. आधिच्या लग्नात हिच आयडिया वापरलि असेल.

ईशा,तू अशी बावळटासारखी सतत माझ्या डोळ्यात का बघतेस?
काय हो सर.
अग सांग ना,मग मला पण बघाव लागत ना
अस काय हो सर.बघा की मग
अग पण मला त्रास होतो
सर.....काय हो.मला आपले ते डिरेक्टर काका आहेत ना ,त्यांनी सांगितल
अच्छा,गिरीश ने सांगितल का
अस काय हो सर.त्यांनी आणि चंदू काकांनी दोघांनी सांगितल की ,गायत्री,तुला काही येत नाही ना,काळजी करु नको ,तू फक्त सळरांच्या डोळ्यात बघायच
आणि सर,तुम्हाला माहित आहे,तो मायबोली धागा आहे ना,तिथे सगळ्यांनी माझ ज्जाम कौतुक केल
कौतुक,ते कशासाठी
काय हो सर.मायबोलीवर सगळे म्हणाले की मी एकटीच या मालिकेच नावतुला पाहते रे" सार्थ ठरवत आहे
अग ईशा,बाळ,ते कोतुक नाही ग,त्यांनी तुझ्या अभिनयाचे काढलेलै ते वाभाडे आहेत
जगप्रसिध्द भोकाड पसरत,अस काय हो सर
बर ,मला दाखवशील हा धागा
हो सर,पण का
अग खुळे,जे मलि करण अशक्य आहे ते ही लोक मायबोलीवर सहजपणे करत आहेत ग
सर.....
बर मग मी अस करु का,तू आता माझ्या डोळ्यात पाहिलस की तुझ्या डोळ्यात बोट घालू का,जरा मज्जा
स....र
अग लाजू नको ग टवळे,मी उपरोधिक बोलत आहे
स...र,अस काय हो.जा मला तुमच्याशी लग्नच करायच नाही
खर सांगतेस
काय हो सर.खरच,मी नाही करणार तचमच्याशी लग्न
थँक्कस,मायबोलीकरांनो हा आत्मविश्वास तुमच्यामुळेच मिळाला.
सु ट लो.......

बर मग मी अस करु का,तू आता माझ्या डोळ्यात पाहिलस की तुझ्या डोळ्यात बोट घालू का,जरा मज्जा
स....र
अग लाजू नको ग टवळे,मी उपरोधिक बोलत आहे >>>> सकाळी सकाळी काय जाम हसवलत Lol

जयदीप ने निमकराना किती आग्रहाने आणि प्रेमाने कपडे घ्यायला लावले . आवडलं
पण तो सुट कैच्याकै होता . सर्कशीत नाहीतर जादुच्या प्रयोगात असतो तसा . जरा नीट सोबर द्यायचाकी काहीतरी .
सॉन्याने चांगले कपडे निवडले . घातल्यावर बघुया काय दिसतं ते .
साडीची कंपनी विकत घेणं हा प्रकार अ आणि अ होता.

साडीची कंपनी विकत घेणं हा प्रकार अ आणि अ होता. >>> अम्हाला वडापाव विकत घ्यायला सुद्धा त्यापेक्षा जास्त वेळ लागतो

जयदीप तसा चांगला आहे स्वभावाने....... एकदम उमदा....!
बाकी काय गूढ आहे ते अजून समजेना...कुणी ही विक्रांत च्या पहिल्या लग्नाचा उल्लेख करत नाही!
विक्रांत पण अगदी पहिल्या वराच्या उत्साहाने तिला वेगवेगळे शॉर्टलिस्टेड ड्रेसेस दाखवितो.... आणि ते मिडीया वगैरे अगदीच फालतू...
कुणी कोणाशि का लग्न केलं त्याबद्दल मिडीया ला काय पडलीये.....आय मीन असा जाब विचारायला वगैरे....बातमी द्या तुम्ही!

ईशा विक्रांतच्या लग्नात माझ्याकडुन आहेर इन अ‍ॅडवान्स मध्ये ...money-envelope-500x500 (1).jpg२ रुपये ...

क्योंकी २ रुपये भी बहुत बडी चीज होती है बाबु.

कस्सकाय साभार..

Up ... सही लिहिलंय...हा हा Biggrin
2 रुपये आहेर !!! लईच भारी रश्मी.... Wink

रश्मी Lol

हेच पाकीट कवटाळणार बघा इशाताई, क्योकी दोन रुपये भी बहोत बडी चीज होती है बाबु Wink .

काय हो सर.मायबोलीवर सगळे म्हणाले की मी एकटीच या मालिकेच नावतुला पाहते रे" सार्थ ठरवत आहे
अग ईशा,बाळ,ते कोतुक नाही ग,त्यांनी तुझ्या अभिनयाचे काढलेलै ते वाभाडे आहेत
जगप्रसिध्द भोकाड पसरत,अस काय हो सर >>> Lol हे जाम आवडले.

का? का? का? आज लवकर आले मी घरी Angry

अरे काय हे? लोणचे काय नि लिम्लेट च्या गोळ्या काय, पतंग काय?????

काहीही दाखविताते हे लोक Angry

लग्नानंतर
वि स - अग चल शिळ्या पोळीचा लाडू आणि फोडणीचा भात कर
इ बेबी - स$$$$$र असं काय हो सर...आईलाच येत अहो ते...
वि स - (हताश होऊन) अग ईळू (ईशा बाळू) (कंट्रो$$$ल विक्रांत, कंट्रो$$$ल )तुला इथे ही येत नाही का काही??

ईळू चे जोरजोरात तोंड वेंगाडून भोकाड.....

मोबाइलला वर ई आई ला फोन लावून
आई ,अहो ईळू ला काहीच येत नाही.. घेवून जा हिला..

ईळू (अजून जोरात भोकाड ) - स$$$र ..स$$र ..स$र

ईई(ई आई) फोनवर(प्रसिद्ध चकली विक्रेत्याच्या मोड मध्ये): (गदागदा माना हालवून) एकदा विकलेला माल आम्ही नाही हो परत घेत... (मनात म्हणत या इळू ला कसं खपवलंय आमचं आम्हाला माहीत बॉ)

विस झेंडेला : झेंडे,ईई(ई आई) ला उचलून आणा...मला लाडू खायचाय...

झेंडे (डोक्यावर हात मारून ईई पेलवेल का आता आपल्याला या विचारात)

मायरा (गहन विचार करून): झेंडे, अहो आपण क्रेन बोलवूया ना...

ही शिरेल खरेच बोअर आहे, थोडा वेळ दिसली तरी झेपले नाही

नटूकाकी, वरचा विनोद नाही आवडला, म्हणजे असे विनोद पटतच नाहीत मला. भले शिरेल कितीही वाईट असली तरी मुलीला माल म्हणणे किंवा कुणाच्या जाडपणा विषयी असे खिल्ली उडविणे नाही आवडत. अर्थात हे मा वै म, बरेच जण असले विनोद एन्जॉय करतात

अहो vb,मी ते ई आई एक चकली (फराळ) विक्रेते आहे असं समजून लिहिलंय.. जनरली किरकोळ विक्रेते यांचं एकदा विकलेला माल परत घेतला जाणार नाही हे पेटंट वाक्य आहे म्हणून तसं लिहिलंय... आणि इ आई याच एक विनोदी आहेत म्हणून हे वाक्य सुचलं... यात इळू ला माल म्हणायचा उद्देश न्हवता... तुम्हाला आवडलं नाही याबद्दल सॉरी... (हे माझं वैयक्तिक मत आहे,अजून कुणाला न आवडल्यास आधीच माफी)

Pages