तुला पाहते रे अर्थात सुबोध भावे

Submitted by वेडोबा on 24 November, 2018 - 03:48

तुला पाहते रे पहिल्या धाग्याच्या 2000 पोस्ट्स पूर्ण झाल्या, पुढची चर्चा इथे करूया.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ळीतल्या लोकांना दीड दीड लाखाचा चेक दिला असता तर कदाचित जास्त आवडला असता> मला पण नक्की चालेल. आशीर्वाद द्यायला काय जातेय. देअर इज नो फूल लाइक अ‍ॅन ओल्ड फूल.

पण रेडिमेड सूट्स- शर्ट्स कसे काय देणार...साईझेस चे काय? Uhoh
आणि यांनी एकच पत्रिका सर्वत्र फिरविलेली दिसते......

अमा Happy

टोटल फोमो मोड आहे सध्या. इथे बंगलोर मधे जेथे आहे तेथे झी दिसत नाही. पुन्हा मागे पडणार.

इशा ला आता साडी नेसुन यायला हवे. ती एक पर्स खाकोटीला >>> अगोबाई अजूनही तेच क्विल्टवाले ड्रेसेस घालते का बेबी?

बेबीला लग्नाचे गांभिर्य काही कळतयं का? चेहर्यावर लग्न ठरल्याचा ग्लो/आनंद काही नाही . वागण्याबोलण्याराहण्यात काही बदल नाही
नुसत आपलं विसंकडे बघत लाजायची ऐक्टीन्ग करायची .
ऑफिसमध्ये काहीही न करता निभावलं , लग्नानंतर सासरी ही हेच करणार का??
" सर, आत येउ ? " नाहीतर सरळ पर्स काखोटीला मारून बेडेकर चाळीत . आईसाहेबाना वगैरे काही सांगणार नाही .
तिकडे मायरा बुली करायची इथे सॉन्या .

मागे , किराणा सामानाची यादी करतात तशी दागिन्याची यादी करत होती " आई , आणखी काय गं ? "
बाबानी आपल्या लेकीला बरोबर ओळखले आहे . सासरी ही पोरगी काय दिवे लावेल याची चिन्ता आहे त्याना.
हीच्यापेक्शा जास्त तर मला रूपाली एक्सायटेड वाटतेय .

दीड लाखाची पत्रिका ! केड्याला म्हणाव , ही ईशा निमकर आहे , ईशा अम्बानी नाही .
त्यावरून आठवलं , तो अंबानीच्या लग्नात बच्चन चा धागा बघून , सरंजामेच्या लग्नात कोण?? असा प्रश्न डोक्याला चावतोय Uhoh

तेथे झी दिसत नाही. >> आहो असे करू नका झी फाइव्ह झे ड ई ई फायु. हे अ‍ॅप लगेच डाउनलोड करा. रजिस्टर न करता बघता येतील सर्व भाग. धिस पत्रिका थिंग इज टू स्टुपिड फॉर वर्ड्स. मी सकाळी अ‍ॅप वर लावुन ऐकतेच फक्त. मग वेळ होईल तसे बघते. मला काहीच सुभा अ‍ॅट्रेक्षन नाही त्यामुळे ऑब्जेक्टिव्हली ऐकते. मुलगी इशाच्याच वयाची आहे ती व तिचे सहकारी विद्यार्थी आत्ता एक फिल्म फेस्टिव्हल, ग्राजुएशन च्या सर्व असाइनमेंट्स प्लस क्लासेस, फुल्टू पार्टिंग, पुढील वर्शाची चिंता, जास्तीचे हार्ड् वेअर विकून पैसे करणे, व ते एच अँड एम, नायका तत्सम ठिकाणी खर्च करणे, नव्या फिल्म बनवणे ह्या सर्व उपद्व्यापात फारच बिझी असते दे आर नॉट थिंकिंग ऑफ इव्हन कमिटेड रिलेशन शिप्स.
आणि इथे अधेड उम्र के मर्द के साथ शादी!!!!!!!!!!!! त्यामुळे मी कायम अरे देवा मोड मध्ये बघत असते. अरे असं नसतं रे हा ही मोड लेखक दिग्दर्शकां साठी चालू असतो.

कालच्या भागाचा रिपीट पाहिला.
गोल्डन साडीत मायरा कमाल दिसत होती, एवढंच काय ते उल्लेखनीय आणि प्रेक्षणीय
बाकी वडापाव, झुंबर पडलं तर वगैरे बाबी दुर्लक्षणीय ! Wink

मी तर बघतच नाही सिरीयल, उगाच चिडचिड होते असला मूर्खपणा बघून, सुभा चा नवा लुक कसा आहे तेपण माहित नाही> >>>+१

बायकांचा दागिन्यांचा सेटः ह्यात काय काय आहे? >>>>>>>> मोठ्ठासा नेकलेस

पुरुषांचा ड्रेस से ट हा काय आहे? धोतर कोट टोपी? का प्यांट शर्ट? >>>>>>> सूट ट्राउझर्स

सोन्याचा बारका गण पती. मोती >>>>>>> हे आवडले मला.

चांदीचा करंडा >>>>>>> मायराने जेव्हा पहिल्यान्दा तो करंडा दाखवला तेव्हा ईशाई 'कुन्कुवाचा करंडा म्हणजे सौभाग्याच लक्षण' म्हणाली, तेव्हा पाठीमागून कुणीतरी ओरडायला हव होत, ' हे तर सगळयान्नाच माहितीये , त्यात काय नवीन'

सोन्याचं कॅरेक्टर लईच गंडले आहे >>>>>>>> मला वाटल आधी तुम्ही पत्रिकेतल्या बॅगेतल्या सोन्याविषयी बोलता की काय. नन्तर कळल, सॉन्या. Lol

चाळीतल्या लोकांना दीड दीड लाखाचा चेक दिला असता तर कदाचित जास्त आवडला असता. >>>>>>> पिन्की मावशी बाकी कुठेही काहीही बोलत असली तरी एक मात्र खर बोलली की, ' शेजारर्यान्ना सगळ ( पत्रिकेची बॅग आणि इतर सामान) फुकट मिळालय तर ते सोडणार थोडीच.'

ओल्ड फुल >>>>>> Proud

ऑफिसमध्ये काहीही न करता निभावलं , लग्नानंतर सासरी ही हेच करणार का?? >>>>>> अगदी अगदी . तिकडे सॉन्यालाही स्वयमपाक करता येतो हे आज कळल मला. उगाच नाही ईबाबा ईशाला 'स्वयमपाकाच काही तरी शिकून घे' म्हणाले.

अगोबाई अजूनही तेच क्विल्टवाले ड्रेसेस घालते का बेबी? >>>>>> पण काल तिने छान ड्रेस घातला होता. मायरासुद्दा छान दिसत होती. आधी मी तिला ओळखलच नाही.

झुंबर पडलं तर >>>>>> ते झुंबराच आणि नन्दूच्या मृत्यूच काहीतरी कनेक्शन असेल म्हणून पिन्कीमावशी अस म्हणाली असेल. परवा नाही का, जोगतीणीने ' तु सगळयान्ची देणी चुकती करणार. कोणाचही देण बाकी ठेवणार नाही' म्हणत नन्दूच्या पुनर्जन्माची हिन्ट दिली.

ईशाई बन्गल्याकडे बघत 'मुलीने नशीब काढल' ह्या अर्थाने रडली ते टचिन्ग होत.

विस स्वतःच्या ताटातले गोड पदार्थ ईशाच्या ताटात तिच्या नकळत ठेवत होता ते क्यूट होत.

विस स्वतःच्या ताटातले गोड पदार्थ ईशाच्या ताटात तिच्या नकळत ठेवत होता ते क्यूट होत>>>>>>>

डायबेटीस असेल हो त्याला, वय वाढलं की व्याधी
आणि आता तर डोकेदुखीला डायरेकत घरी आणतोय

मज्जा तर लग्नानंतर येणारे
बाबां म्हणाले सगळ्या वडीलधाऱ्यांच्या पायी पडत जा म्हणून वीस च्या पण रोज पाया पडणार वाटतं

झुंबर पडलं तर >>>>>> ते झुंबराच आणि नन्दूच्या मृत्यूच काहीतरी कनेक्शन असेल म्हणून पिन्कीमावशी अस म्हणाली असेल. परवा नाही का, जोगतीणीने ' तु सगळयान्ची देणी चुकती करणार. कोणाचही देण बाकी ठेवणार नाही' म्हणत नन्दूच्या पुनर्जन्माची हिन्ट दिली.>>>> yes I also feel the same

डायबेटीस असेल हो त्याला, वय वाढलं की व्याधी >> नाही ओ , थोडी शुगर आहे त्याला फक्त , बाकी ठणठणीत आहे . मेडिकल सर्टिफिकेट आहे त्याच्याकडे .

झुंबर पडलं का? मागच्या कोणत्यातरी भागात ते आवर्जून दाखवलं होतं ना? नाटकाच्या तंत्राच्या बाबतीत असे वाचले आहे की पहिल्या अंकात भिंतीवर तलवार दिसली तर तिसर्‍या अंकात ती वापरली गेली पाहिजे. तसे n व्या अंकात झुंबर दिसले तर n + 3/4 अंकात ते पडले पाहिजे असे लॉजिक लावलेले दिसते.

बरं निमकरांच्या घरात तो एक फार पूर्वीच्या "कुलाबा" स्टेशनचा आणि तेथून निघणार्‍या स्टीम इंजिन ट्रेनचा फोटो का आहे ते वरच्या लॉजिक ने अजून कळाले नाही. तो एक प्रसिद्ध विंटेज फोटो आहे मुंबईच्या त्या आता ऑपरेशनल नसलेल्या स्टेशनचा. तलवार-झुंबर लॉजिक ने त्याचे स्पष्टीकरण आता मिळायला हवे.

ईशाई बन्गल्याकडे बघत 'मुलीने नशीब काढल' ह्या अर्थाने रडली ते टचिन्ग होत.>>>>> +१११
बाकी बर्‍याचदा ईआई गरज नसताना मोठमोठ्यांदा बोलत अस्ते तेव्हा डोक्यात जाते.

व्याहीभोजनाला मुलीने साडी नेसायची असते ना? का असं काही कंपल्सरी नसतं?

पिंकीमावशी ला पाहिल्यावर पुष्पा खूपच बरी असं वाटलं. पिंकी आणि पुष्पाच्या आई-वडिलांनी दोन झब्बू मस्त खपवले आहेत.

ते "जिजाजी" फार डोक्यात जातं. त्याकाळी अरुणला "जिजाजी" ऐवजी "अरुणराव" किंवा "निमकर" म्हणत असतील असं वाटतं

अरुणच्या गालावरही खळ्या पडतात हे काल समजलं Happy
(देव सुद्धा चुकीच्या ठिकाणी चुकीच्या गोष्टी देऊन ठेवतो कधी कधी)

पुष्पा पिंकी आणि केडी या तिघांमध्ये सगळ्यात जास्त मूर्ख कोण हे ठरवणे दिवसेंदिवस कठीण होत चाललं आहे. आजचा सोनल कंपनी विकत घेण्याचा सीन त्यापैकी एक होता.

जयदीप अचानक शहाण्यासारखा वागायला लागला आहे

होसुमीयाघ मधे पण असा लग्नाच्याच वेळी कारस्थान करणारा मामा टपकला होता ना?

ही सिरीयल आजकाल आम्ही पुन्हा सगळे न चुकता बघायला लागलो आहोत, मस्त स्ट्रेसबस्टर असते.
आज विकीला बघितला, सगळीकडे नाक खुपसत होता, स्वतः अटलिस्ट अंघोळ तरी कर म्हणावं.
जेव्हा तो साड्यांचा सिन होता, तेव्हा पिंकी मावशीला तो विक्रेता अशी साडी नाही बनवता येणार म्हटला, तेव्हाच मनात विचार आला, अरे कंपनी याची.. मग का बनवता येणार नाही? आणि त्यांनंतर कळलं, दुसऱ्या कंपनीचा माणूस आहे. मारा कपाळावर हात! उद्या बाकरवडी खायची झाली, तर चितळे स्वतःची बाकरवडी खातील, की दुसर्याकडून मागवतील? नाहीतर विक्रांतला स्वतःच्या क्वालिटीवर विश्वास नसेल.
मग जेव्हा तो कम्पनी विकत घेण्याचा सिन आला, तेव्हा मला कळलं, याचसाठी केला होता अट्टहास!!!! केड्या, अरे लहान मुलांना यापेक्षा चांगलं लॉजिक लावता येईल!

जयदीप भारिये, जेव्हा तो निमकरांचं माप सांगत होता, तेव्हा वाटलं, निमकरांना लग्नाचा ड्रेस काही मिळणार नाही आता.

सरंजामेचा आरसा परिकथेतला आहे वाटतं, फक्त प्रेम करणारे एकमेकांना दिसतात! पिंकी आणि इशाई समोरच होत्या!

आधी काळा दोरा आणि आज तीच साडी घालेन, याला म्हणतात भिकरणीची झाली पट्टराणी, जुनी सवय मोडेना आणि शिळ्या भाकऱ्या सोडेना!

केड्याच्या फंसटीत आता सेलेब्रिटी लग्न घुसलेत वाटतं, मीडिया, ब्रेकिंग न्यूज, वाटेल ते दाखवतोय...

असो, कॉमेडी म्हणून बघितली तर अशी मालिका गेल्या दहा हजार वर्षात झाली नसेल!!!

आधी काळा दोरा आणि आज तीच साडी घालेन, याला म्हणतात भिकरणीची झाली पट्टराणी, जुनी सवय मोडेना आणि शिळ्या भाकऱ्या सोडेना! >>>>> हे भारी आहे. Truly hilarious Lol

इशा लाजण्याची अ‍ॅक्टिन्ग करते ते भयाण आहे बाकी इन्स्टा वर फोटो पाहिले तर सेलेब्रिटि लग्न पण छाप खडकी-दापोडी अस वाटत होत.
व्याहिभोजनाला मायरा-झेन्डे टेबलापाशी नुसते न्याहाळत उभे होते ते विचित्र वाटत होत, मायरा(च) छान दिसत होती.

व्याहिभोजनाला मायरा-झेन्डे टेबलापाशी नुसते न्याहाळत उभे होते ते विचित्र वाटत होत, मायरा(च) छान दिसत होती. +१
विचित्र आणि चिपही!

एका साडीसाठी कंपनी विकत घेतली तेही एकवेळ चालून जाईल पण असा एक कॉल करून कंपनीचा मालक कसा झाला विबाबू? साडीबरोबर कंपनी सुद्धा विकायला ठेवलेली का? काहीही दाखवतात.

Pages