तुला पाहते रे अर्थात सुबोध भावे

Submitted by वेडोबा on 24 November, 2018 - 03:48

तुला पाहते रे पहिल्या धाग्याच्या 2000 पोस्ट्स पूर्ण झाल्या, पुढची चर्चा इथे करूया.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

णी एक नोटिस केलय का, विस हल्ली लग्नाच्या तयारीत इन्ट्रेस्ट घेईनासा झालाय. सध्या त्याला लग्नाबाबत अनइन्ट्ररेस्टेड दाखवतायत. काल आईसाहेब आणि जयदीपला 'तुम्हीच काय ते लग्नाच बघा' म्हणून तडक निघून गेला. पुढच्या भागात तर झेन्डे विसला ' मन्गळसूत्र निवडायला तु ईशाबरोबर असायलाच हव' हयाची आठवण करुन देतोय. म्हणजे विसच खर रुप हळूहळू बाहेर येतय तर.>>>>हाे.. मला पण तेच वाटल...

सुलू करेक्शनसाठी धन्यवाद! मी कधी नाही बघितलं, पण इथे एका धाग्यावर वाचलं. आनंद आणि श्रेयस यांची गल्लत झाली.
त्याने आता सिरियलच नाव 'माझ्या नवऱ्याचा नवरा' करो किंवा 'तुला पाहतो रे' करो, पण आता पुरे कर म्हणावं. सरळ त्या गुरूला राधिकाला डिओस देऊन त्याच्या तोंडी :केड्या मी तुझ्यावरच प्रेम करत होतो रे' असा डायलॉग टाक किंवा शितुला आणून ईबाळाला रहस्य सांगयला लाव की मी मेले नाहीये, मी विकुला टाकलंय. ती म्हणेल 'काय बोलताय राजनंदिनी मा'म तुम्ही' तर कारण दे की तो खोलीत इतके दिवस का राहतो माहितीये, कारण त्या खोलीत तो कुणालातरी पाहतो रे, आणि पुढच्याच भागात केड्या आणि विकू हातात हात घालून बागडत हेलिकॉप्टर मध्ये बसू दे!

कर म्हणावं फँटसी पुरी आणि संपव सिरीयल!

ईशाचा उखाणा

ऑफीसमधे पोहोचवला मी फराळ बाई तुपकट
म्हणूनच विक्रमराव मिळाले मला वयाने दुप्पट

मला तर लग्न ठरल्या पासुन विस वेगळाच वाटत आहे..... Interest कमी झालाय....त्याला फक्त लग्नाला हाेकार मिळवायचा हाेता.... अस वाटत आहे त्याच्या वागण्या वरुन...Aata Tumhee bagha Ha attitude alay

झेंडे बाेलल्या वर त्याचे भाव संशयास्पद वाटले...
आणी. आई मावशी आल्या वर इतक अस्वस्थ व्हायला काय झाल.....सुभाने मस्त दाखवलाय चेंज body language madhala..

त्या बेबीला काय भिकेचे डोहाळे लागले आहेत का? इथे होणारा नवरा पु.ना .गाडगीळांच्या दुकानात मंगळसूत्र घेण्यासाठी आला आहे आणि ही बया फिल्मी डायलॉग म्हणत आहे"सर,तुम्ही माझ्या गळ्यात काळा दोरा बांधलात तरी मला चालेल"
अग बेबी,काळा दोरा आणि मंगळसूत्र यात फरक असतो ग बाई,नसलेली पाझळू नको.अस त्या दुकानातल्याच कोणीतरी सांगून धक्के मारून हकलून द्यायला हव.

लोकहो आपण अतिशयोक्ती म्हणून ज्या कल्पना विकसित करतोय त्याच तो केडी गंभीरपणे घेतोय तुम्हाला कळतंय का?>>>>
कथाकार चोर है ।।

इशाई कमी होती म्हणून का काय पिंकी मावशी आलेली आहे. मायरा मॅडम " सगळंच " बघ णार मंजे काय?!
इशा ला विशीत पदार्पण केल्या केल्य झालेले इन्फॅचुएशन लगेच कन्वर्टेड टु असामान्य प्रेम वगैरे.
आर्थिक परिस्थितीतील व सोशल क्लास मधील प्रचंड तफावत. आणि ही प्रेमात पडूनही त्याला नावाने हाक मारत नाही? अजूनही सर सर सरकी. पण दोघांचे स्वभाव नक्की कसे आहेत. तो तर मला थंड व क्रूर दिसतो आजकाल.
नार्सि स्टिक टाइप व ही अननुभ वी कन्यका. ह्यांचे प्रेम काय अमर वगैरे वाटत नाही.

आर यु शुअर व्हॉट यु आर गेटिंग इन्टू? असे विचा रावे वाट्ते. तिच्या बरोबरीची मुले पीजी काय करावे का जॉब का ग्याप इअर घ्यावे व जीवनाबद्दल विचार करावा अश्या फ्रेम मध्ये आहेत.

श्रीमंत लोकांचे काहीतरी भारी दाखवायचे म्हणजे सिम्पल लॉजिक आहे. "आपण ते इटलीहून आणायचे". डायमण्ड आणायला निघाले आहेत इटलीहून. उद्या हापूस आम्बेही इटलीहून आणतील. हिर्‍यांच्या खाणी आफ्रिकेत. त्याचे कटिंग पॉलिशिंग होते प्रामुख्याने भारतात. इटलीचा काय संबंध.

इटलीचा काय संबंध.>> अगदी अगदी. सुरतेतूनच सर्वत्र जातात हिरे. इटलीत मार्बल मिळते. उगीच काय पण ड्वालाग. की लगेज जयदीप ला ब्रिलिअंट आय्डिया. लगेच ज्वेलरी बनवायची कंपनी काढायची. अनमोल ब्रांडेड हिर्याचे मंसु. वहिनी मॉडेल. अरे आवरा!!

मावशी ची एंट्री एकदम अशी गूढ का केली?
कैच्या कैच आहे ती मावशी! पावापावाची पाकीटं आणलीन फराळाची... लग्नासाठी म्हणे!

विक्रांत ग्रे शेड मधे उतरु लागला आहे का हळूहळू? मायरा छान काम करत्येय. ..
२९० डिझाईन्स......? कुठून काढतो या फिगर्स केड्या?

का तुम्हाला विस ग्रे शेड मध्ये वाटत आहे,तो असेल तसा पण भूतकाळात.वर्तमानात बेबीच्या प्रेमात आकंठ बुडालेला आहे ना.
पिंकी मावशीच अजब रसायन वाटत आहे.
पण मालिका मोठ्या भोवर्यात अडकल्यासारखी गरागरा फीरत आहे.

यांचं प्रेम म्हणजे एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून बघायचं आणि मग तिने बिनडोक हसायचं किंवा मग जोडीची साखळी खेळल्यासारखं त्यानं हात मागायचा तिने तो द्यायचा आणि मग जोडी धरून हिंडायचं. याच्याशिवाय प्रेम दिसतच नाहीये काही.

ईशा लग्न ठरल्यापासून पर्मनंट रजेवर आहे का? काल ऑफिस मधेही दीड दोन महिन्यांच्या रजेवर असणारा माणूस एखाद्या कामाकरता ऑफिसात आलेला असतो तशी आली होती.

ती मावशी जाम ओव्हरअ‍ॅक्टिंग करत आहे. नाटकात करतात तसे हावभाव सिरीज मधे करत आहे.

सगळे आपले मंगळसूत्राच्याच काय मागे?
सॉन्या इटाली हून खास डायंमंड्स मागवतेय, मायरा २९० ऑनलाईन डिझाईन्स फायनल करत्येय, बेबी ती पुन्हा सगळीच्या सगळी पहायचीत म्हणून हट्ट धरुन बसलीय, झेंडे विकीला म्हणतोय की तू स्वतः जा मंगळसूत्र फायनल करायला....व सरते शेवटी विकी व बेबी पु ना गाडगीळांच्या (च!) कडे आले डिझाइन्स पहायला......आई व मावशी ना कसं कटवलं काय माहित! Uhoh
सॉन्याचे प्रयत्न जेन्युईन वाटले मला...तिचे एक्स्पोजरच तसे आहे त्याला ती तरी काय करणार!

माणूस एखाद्या कामाकरता ऑफिसात आलेला असतो तशी आली होती.>>. ऑत्ता कॉय बॉई मॉल कीण झालॅय एक माणूस. फडतुस डिपार्ट मेंट हेड ची मगज मारी कॉण करेल. चॉपर मध्ये फिरणार, हिर्‍याच्या चपला घालून सोन्यच्या पोळपाटावर चांदिच्या लाटण्याने पॉळी लाटणार.

सॉरी टू से पण ईशाताईंचे काही बाईटस टीव्हीवर बघितले, मुलाखतीत पण काही भाव जाणवले नाहीत. एकदा मोठ्यामोठ्याने हसल्या तो वेगळेपणा, बाकी पुस्तकी बोलणंच वाटलं. साधं बोलताना पण सहजता नाही. याउलट गौरी फुले किती एक्स्प्रेसिव्ह आणि सहज उत्तरं देत होत्या.

हो अंजु..... बेबी मे दमच हैं च नही... फुलें मध्येच दम हैं... ह्यांचीच जोडी हवी होती खर तर.... "बाई$$$$....कर्जतला या$$$$$"

मायराने खेळी खेळली काल. तिने मुद्दामहून जाड मण्यान्चे, चाळीतल्या बायका घालतात तश्या डिझाईन्सचे मन्गळसूत्र निवडले. म्हणजे लग्नात हि टोमणे मारायला मो़कळी, ' बघा हयान्ची चॉईस कशी टिप्पीकल मिडलक्लास आहे. ' पण ईशा निघाली चॅप्टर, तिने मायराचा हेतू बरोबर ओळखला. 'मी २९० डिझाईन्स बघणार आणि निवडणार' अशी ऑर्डर सोडली हिने.

सॉन्याचे प्रयत्न जेन्युईन वाटले मला...तिचे एक्स्पोजरच तसे आहे त्याला ती तरी काय करणार! >>>>>>> ++++++++++ ब्रदर्स इन लॉ च्या लग्नासाठी (त्यात तिचा काहीच फायदा नाही हे माहित असून सुद्दा) मदत करते हेही नसे थोडके.

पु ना गाडगीळांच्या (च!) कडे आले डिझाइन्स पहायला.. >>>>>>>> अस कस अस कस, विस तर पु ना गाडगीळान्च्या जाहिरातीत मॉडेल आहे ना. मग कर्तव्य म्हणून जायला नको का ति़कडे?

यांचं प्रेम म्हणजे एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून बघायचं आणि मग तिने बिनडोक हसायचं किंवा मग जोडीची साखळी खेळल्यासारखं त्यानं हात मागायचा तिने तो द्यायचा आणि मग जोडी धरून हिंडायचं. याच्याशिवाय प्रेम दिसतच नाहीये काही. >>>>>> अगदी अगदी पहिल्या रात्री आणि हनीमूनला हेच करणार आहे वाटत.

वर्तमानात बेबीच्या प्रेमात आकंठ बुडालेला आहे ना. >>>>>>> रिअली?

आणि ही प्रेमात पडूनही त्याला नावाने हाक मारत नाही? अजूनही सर सर सरकी. >>>>>>>>>>>> +++++++++१११११११११

तो तर मला थंड व क्रूर दिसतो आजकाल विक्रांत ग्रे शेड मधे उतरु लागला आहे का हळूहळू? >>>>>>>>> हो ना. त्याच खर रुप बाहेर येतय हळू हळू . इथे कोणीतरी म्हटल्याप्रमाणे ' मी नन्दूच्या रुममध्ये, तु तुझ्या रुममध्ये' हे खर ठरणार आहे अस दिसत. असच जर असेल तर मग विसला ईशाशी लग्न का करायच असेल? Uhoh

इशाई कमी होती म्हणून का काय पिंकी मावशी आलेली आहे. >>>>>>>> +++++++++११११११ ती तर ईशाईपेक्षा कहर आहे. बादवे त्या मावशीचे काम करण्यार्या नटीला कुठेतरी पाहिल्यासारखे वाटतेय.

ईबाबा आणि मावशीची नोकझोक मस्तच Happy

पावापावाची पाकीटं आणलीन फराळाची... लग्नासाठी म्हणे! >>>>>>>>>> ती तिने स्वत: बनवलेली म्हणे. मला तर ते पॅकेटसवरुन कुठल्या तरी दुकानातून आणल्यासारखी वाटली.

आई मावशी आल्या वर इतक अस्वस्थ व्हायला काय झाल. >>>>>>>>>> त्याच पण बरोबर आहे ना. ईशाला एकटीला मन्गळसूत्र निवडण्यासाठी बोलावलेल असताना हया दोघीन्ची वरात कशाला पाठीमागून? प्रायव्हसी हवी होती त्याला. बादवे, काल तो 'इन्तेहा हो गयी इन्तजार की, आयी ना कुछ खबर मेरे यार की' मूडमध्ये येरझार्या घालत होत्या. Proud

सुभाने मस्त दाखवलाय चेंज body language madhala.. >>>>>>>>>>> +++++++++++++११११११११११११

सुलू करेक्शनसाठी धन्यवाद! >>>>>>>> तुमचे स्वागत आहे अज्ञातवासी

त्याने आता सिरियलच नाव 'माझ्या नवऱ्याचा नवरा' करो किंवा 'तुला पाहतो रे' करो, पण आता पुरे कर म्हणावं. सरळ त्या गुरूला राधिकाला डिओस देऊन त्याच्या तोंडी :केड्या मी तुझ्यावरच प्रेम करत होतो रे' असा डायलॉग टाक किंवा शितुला आणून ईबाळाला रहस्य सांगयला लाव की मी मेले नाहीये, मी विकुला टाकलंय. ती म्हणेल 'काय बोलताय राजनंदिनी मा'म तुम्ही' तर कारण दे की तो खोलीत इतके दिवस का राहतो माहितीये, कारण त्या खोलीत तो कुणालातरी पाहतो रे, आणि पुढच्याच भागात केड्या आणि विकू हातात हात घालून बागडत हेलिकॉप्टर मध्ये बसू दे! ऑफीसमधे पोहोचवला मी फराळ बाई तुपकट
म्हणूनच विक्रमराव मिळाले मला वयाने दुप्पट >>>>>>>>>> Rofl

दवंडी $$$$
हळदीचे फोटो आले ईशाचे ..
पत्रिका पण आलीये आधी लिहिल्याप्रमाणे..
पाहून घ्या हो सगळ्यांनी

पत्रिका पण आलीये आधी लिहिल्याप्रमाणे..
पाहून घ्या हो सगळ्यांनी>>>
पत्रिका पाहिली.. झी ला ही बेबी ईशा अंबानी वाटतेय की काय..

ईबाबांचे त्या पिंकी मावशीबरोबरचे सीन्स चांगले होते आजच्या भागात. ते बहुधा त्यांचेच अ‍ॅडिशन असावे.

विकिशा म्हणे. मायरा असती तर? विक्माय म्हंटले तर आईसाहेबांचे नाव वाटेल Happy मायक्रांत चालेल. १३ ला मायक्रांत, १४ ला संक्रांत.

Pages