Submitted by वेडोबा on 24 November, 2018 - 03:48
तुला पाहते रे पहिल्या धाग्याच्या 2000 पोस्ट्स पूर्ण झाल्या, पुढची चर्चा इथे करूया.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
"तुमच्या योग्यतेइतका गरीब
"तुमच्या योग्यतेइतका गरीब चाळकरी होउन दाखवेन, तेव्हाच परत येइन ईशाचा हात मागायला"

#######
खूपच विनोदी होतंय सगळं.
खूपच विनोदी होतंय सगळं. कणेकरांच्या भाषेत, "वाड्यावर नेऊन झोडा रे ह्यांना".
विक्रांत निमकरांना बाबा कधीपासून म्हणायला लागला? आधी इशाचे बाबा म्हणायचा.
आज पहिल्यादा इशानं लवकर जाण्यासाठी ऑफिशिअली परवानगी मागितली. आजवर, उठायच अन् पर्स घेऊन निघून जायचे अशी सुट्टी घेण्याची पद्धत होती असं वाटलं होतं.
परवा म्हटली ना मला बाबांना
परवा म्हटली ना मला बाबांना भेटायचंच.. मी जातेय.
अगदी शाळेतल्या मुलीने म्हणावं तसं
आजवर, उठायच अन् पर्स घेऊन
आजवर, उठायच अन् पर्स घेऊन निघून जायचे अशी सुट्टी घेण्याची पद्धत होती असं वाटलं होतं. >>>
मैत्रिणी बघतात म्हणून एक
मैत्रिणी बघतात म्हणून एक एपिसोड बघितला. अशक्य टुकार आहे.
फार फार वर्षांपूर्वी एक कसौटी झिंदगी कि नामक एकता कपूरची मालिका होती त्यात salt-n-pepper लूक असलेला रिशभ बजाज होता जो आपल्यापेक्षा 10 वर्षांनी लहान असलेल्या प्रेरणाशी लग्न करतो. रोनीत रॉय हँडसम दिसायचा आणि मस्त काम करायचा. प्रेरणा झालेली श्वेता तिवारी पण दिसणं आणि अभिनयाच्या बाबतीत तोडीस तोड होती.
हे तुपारे जोडपं म्हणजे त्याची अत्यन्त भयाण सॅड गरीब कॉपी वाटली. एकवेळ सुबोध म्हणजे रोनीत हे ठीक पण श्वेताच्या जागी ती मुलगी म्हणजे अप्सरेच्या शेजारी हबशीण.
एवढा विक्रांत आपल्यासाठी
एवढा विक्रांत आपल्यासाठी रात्रभर घराबाहेर थांबलाय पण या बाईच्या चेहरा तसाच ढिम्म. काही जीवाची घालमेल नाही की वाईट वाटणं नाही. इतका ताकदीचा कलाकार समोर असताना त्याचकडून काही शिकली कशी नाही ही पोरगी. छ्या त्या सुभा चे सगळे अभिनयकौशल्य वाया जातंय.
वाया कुठे जातंय. तो आहे
वाया कुठे जातंय. तो आहे म्हणून टीआरपीला दोन नंबरला तरी आहे. हाॅटेलच्या बाहेर वेटिंग असतं म्हटल्यावर मला दादरचं तृप्ती हाॅटेल आठवलं आणि बाहेर वाट बघत बसलेलं निमकर कुटुंबं डोळ्यासमोर आलं. आजचा भाग बघितल्यावर माहिमकर कोण ते कळलं. मागे एकदा निमकरांकडे एकच पोळी होती खायला तिघात मिळून, मग दरवर्षी वाढदिवसाला हाॅटेलमध्ये कसे जातात.
सनव अगदी अगदी मलाही मिस्टर
सनव अगदी अगदी मलाही मिस्टर बजाज ची सिरियल आठवली, श्वेता तिवारीला भरपुर लोकप्रियता मिळाली त्या सिरियलने , रोनित रॉय तरुणच होता त्यामूले जोडि छान वाटत होती, निहिराने गायलेल टायटल सॉन्ग असलेली अजुन एक सेम होती ज्यात राम कपुर होता त्यात मात्र राम कपुर त्या हिरॉइन पेक्षा व्यवस्थित मोठाच दिसत होता,
मराठितच म्रुणमयी देशपान्डेची पण कोणीतरी होती सुनिल बर्वे हिरो होता पण तिही जोडि छान वाटली ( सिरियल मि बघितली नाही ) ... यात सुजलेला सुभा आणी रडकी इशा फार भन्गार कॉम्बो वाटतोय.
शनायाच्या जागी इशाला आणल तस इशाच्या जागी शनाया म्हणजे रसिकाला आणा, रसिकाची अॅक्तिन्ग इशा निमकर पेक्षा बरिच बरी आहे.
मराठितच म्रुणमयी देशपान्डेची
मराठितच म्रुणमयी देशपान्डेची पण कोणीतरी होती सुनिल बर्वे हिरो होता पण तिही जोडि छान वाटली ( >>>>>> हॅ..हॅ...हॅ.... माझं कुंकु
हो कुंकू जोडी छान वाटायची
हो कुंकू जोडी छान वाटायची, सुनील बर्वे आणि मृण्मयी देशपांडे.
निमकर फॅमिली अरुणचा वाढदिवस
निमकर फॅमिली अरुणचा वाढदिवस साजरा करायला "हाॅटेलमधे" जेवायला जाणार आहे. "हाॅटेल" हेच त्याचं विषेशनाम असावं, कारण हाॅटेल असं म्हटल्यावर, कोणतं, कुठलं, पत्ता वगैरे प्रश्न उपस्थित न होताच आपण सोडून तिकडच्या सगळ्यांना सगळं कळलं.
हा अरूण कोण? ईबाबा तर नाहीत?
हा अरूण कोण? ईबाबा तर नाहीत?
"हाॅटेल" हेच त्याचं विषेशनाम असावं, >>
हो तसेच असते. हे लोक "एक पिक्चर" पाहतात. लग्न पुढच्या आठवड्यात करतात.
अजून तुम्ही एक नोटिस केले का?
अजून तुम्ही एक नोटिस केले का? या सिरीज मधे "दुसरा दिवस उजाडला" दाखवायला क्षितिज दाखवून सूर्य उगवलेला दाखवतात तेव्हा तो चांगला उगवून एक दीड तास झाल्यासारखा वर आलेला असतो. पुलंचे सूर्योदय वाले चित्र आठवले. "मी सकाळी उठल्यावर तो जितका वर आलेला असतो तसाच मी काढला आहे"
खतरनाक प्रतिसाद आहेत..हाहाहा.
खतरनाक प्रतिसाद आहेत..हाहाहा...! तुपारेवाल्यांनी खरंच वाचायला हव्यात. सर्वसामान्य लोकांना लक्षात येणाऱ्या गोष्टी त्यांना कळत नसतील का.? केडी तर गंडलाच आहे पण संवादलेखिकाही झोपा काढतात की काय देव जाणे. भयाण संवाद असतात खरंच..
काय जबरी सुरूवात एपिसोडची.
काय जबरी सुरूवात एपिसोडची. बुके घेउन आलेला मुलगा ब्रिलियंट आहे. "अरूण निमकर सर कोण आहेत?". समोर फ्रेम मधे हे तिघे. हा प्रसंग पुण्यात घडता, तर निमकर किंवा ईशाच्या आईने उलट विचारले असते "आमच्या तिघांपैकी कोण अरूण निमकर आहेत असे वाटते तुला?"
अरूण निमकर ला कधी सरंजामेंच्या श्रीमंतीचा राग येतोय, तर कधी वयातील फरकाचा. एक पे रहना असे विक्याने सांगायला हवे. बर्यापैकी जमलेले कॅरेक्टर फालतू संवाद देउन वाया घालवू नका लेको.
निमकर ऑफिसला निघाले, तर "हळू जा" म्हणे! या सिरीयलमधल्या कोणालाही हे सांगायची गरज आहे का?
१३ पैकी ५-६ कंपन्यांचेतरी अॅक्विझिशन झेंडेने त्या कंपन्यांच्या मालकांना उचलून आणल्याने घाबरून झाले असावे.
आधी जाउन नंबर लावायला सौ निमकर नाही जाउ शकत? हिला कशाला ऑफिसमधून लौकर जायला हवे? आणि ऑफिसची वेळ पाचपर्यंत धरली तर त्याच्या आधी कशाला जायला हवे? त्यात विक्रांतने ठरवले तर झेंडेपासून मायरापर्यंत कोणीही जाउन नंबर लावतील. नाहीतरी ऑफिस मधे नक्की काय काम करतात याबाबतीत सगळे एकदम फ्लेक्झिबल आहेत. झेंडे एकतर हॉटेलमालकाला उचलून आणेल किंवा पिस्तुल दाखवून टेबल पटकावेल.
सुभा टिपिकल मराठी हिरो आहे हे
सुभा टिपिकल मराठी हिरो आहे हे मान्य.. शरीराची काळजी घेऊन मेंटेनड राहणे हे काही आपले हिरोज करत नाहीत .. त्यात त्याच्या चेहऱ्याची ठेवण पण अशी आहे की सुजलेला वाटतो.. अभिनया बाबतीत मात्र उत्तम आहे..
Unhealthy वाटत आहे तो . खूप साऱ्या मुव्हीज वर सिरिअलच शेड्युल त्यामुळे याच सिरीलच्या पहिल्या भागाच्या तुलनेत आत्ता तो थकलेला वाटतो..
फारएन्ड पूर्ण प्रतिसादच +
फारएन्ड पूर्ण प्रतिसादच + 1000
फारेंड, लोल्स....
फारेंड, लोल्स....
अरे, बास रे .. किती सुड घ्याल
अरे, बास रे .. किती सुड घ्याल? हसुन पुरेवाट प्रतिक्रिया वाचुन
ह्य धाग्याचा टीआरपी मालिकेपेक्श जास्त वर जाइल
कधी आहे हा जरठ बाल विवाह?
कधी आहे हा जरठ बाल विवाह? मध्ये मटा मध्ये आलेले.
फार एंड..
फार एंड..

आणि काल हॅपी बर्थ डे टू यू.. .... "निमकर"...!! असं इशाची आई मागून हळूच म्हणत होती!!
कैच्या कैच..एव्हढं डिस्टर्ब्ड असताना कोण वाढदिवस साजरा करेल? तेही त्या "हॉटेल" नावाच्या हॉटेल मधे जाऊन वगैरे.....!!!
मी नवीन वर्षी नाव जॉब बघणार
मी नवीन वर्षी नवा जॉब बघणार आहे
ऑफिस: सरंजामे इंडस्ट्री सारखे (मज्जानी लाईफ)


जॉब प्रोफाईल: इशा सारखे
बॉस: सुभा सारखा (इश्य .....)
पगार: पाणीपुरी खायला पुरेल इतका
सहकारी: मायरा आणि झेंडे सारखे
मिळाला कि "हैदोस डान्स" करणार
हा अरूण कोण? ईबाबा तर नाहीत?>
हा अरूण कोण? ईबाबा तर नाहीत?>> हा प्रश्न त्या बुके घेऊन येणार्यासारखा झाला का जरा ?
आणि काल हॅपी बर्थ डे टू यू..
आणि काल हॅपी बर्थ डे टू यू.. .... "निमकर"...!! असं इशाची आई मागून हळूच म्हणत होती!! >>> पण ते फार क्युट वाटलं.
फारएण्ड......कसल ऑब्सरवेशन
फारएण्ड......कसल ऑब्सरवेशन आहे.मस्त.प्रतिसाद भारी.
जरठ बाल विवाह......हाहा
पण नशिब आपल की केड्याने सुभाला शेफ दाखवल आहे,वेटर नाही.
सुभा कितीही आवडत असला तरी शेफ आणि या बाळासाठी निमकरांना पटवण्यासाठी शेफ.केड्या ,मार मार मारावस वाटत आहे.
त्या ईआईने काल ते गिफ्ट माहीमकरांना उघडायला सांगितल निमकरांनी नाही सांगितल असतानाही,मग हिला नक्की बावळट दाखवायच आहे की हावरट?
ही एकीकडे बाळाला सांगते की बाबांची साथ देणार ,तुझी नाही आणि दुसरीकडे बाबांनी नाही सांगूनही हिला गिफ्ट उघडून बघायच आहे.
आणि ही सगळी विसंगती एकाच भागात.
हे गंडले आहेत की आपल्याला गंडवत आहेत
त्यात विक्रांतने ठरवले तर
त्यात विक्रांतने ठरवले तर झेंडेपासून मायरापर्यंत कोणीही जाउन नंबर लावतील. नाहीतरी ऑफिस मधे नक्की काय काम करतात याबाबतीत सगळे एकदम फ्लेक्झिबल आहेत... फारेंड --- झेंडे नीच बहुतेक केले पूर्ण हॉटेल बुक! त्यांना काय कठीण! लाखभर रुपयांचा गल्ला असेल मॅक्स! तो भरुन टाकला....
कस्टमर्स फक्त तीन-- अरुण मामा , पुष्पामामी व ईशा !
निमकर बाबांचं नाव अरुण आहे हे
निमकर बाबांचं नाव अरुण आहे हे आजच कळलं.

सिरीयल पकाव वरुन बाष्कळपणाकडे चाललीये.
सुभाला काय हे जमत नाहीये. एखाद्या २४-२५ वर्षाच्या तरुणासारखं भावी सासर्याला इंप्रेस करायला शेफ वैगेरे होणं.
आधी ती बटुकनाथ तरी इंप्रेस झाल्यासारखी दिसतेय का? निर्विकार चेहरा नाहीतर रडवा चेहरा
तिच्यापेक्षा पुष्पाच इंप्रेस होतेय जास्त
पुष्पाच पण जरा अवघडच आहे.. हो
पुष्पाच पण जरा अवघडच आहे.. हो आहे की नाही विसला? .. की बाबा म्हणतील ती पूर्व दिशा
>>तिच्यापेक्षा पुष्पाच
>>तिच्यापेक्षा पुष्पाच इंप्रेस होतेय जास्त >>

हा हा.... खरंय... विकू आणि पुष्पा... विकू ला तसाही लहान मुली सोबतच जोडायचा आहे ना केड्याला मग ही पुष्पा तसंही लहान मुली सारखीच आहे की... मस्त जोडी जमेल यांची...आणि पुष्पा एक्सप्रेशन पण देईल सगळे लहान मुलीचे... जोड्या जमवा....
विकू आणि पुष्पा (ऐषारामी जीवन आणि सोबत पोळीचा लाडू आणि इतर शिळे पदार्थचं रिनोवेशन).
इ बाळ आणि जयदीप(हे जीवन कथाकथन..),
मायरा आणि झेंडे(जीवन स्केडुलिंग),
निमकर आणि त्या ऑफिस मधल्या सिनियर बाई आहेत ना त्या सूट होतील बरोबर किंवा सुभा ची संत्रे सोलू आई.. (उंची ला बरोबर आहेत)
ऑफिसची इ बाळाची निरागस मैत्रीण जी निमकर ना म्हणाली होती इशा स्पेशल आहे वाली आणि टिल्लू बाळ... ( एक निरागस जीवन)
रुपाली आणि ऑफिस मधला मी मुलगी असतो तर वाला(अर्थपूर्ण जीवन) ..
मग जयदीपची बायको सोन्या आणि सिनिअर टिल्लू.(धांगडधिंगा जीवन)...
टिल्लू ची आई आणि सोन्याचा नोकर किंवा जालिंदर काका(ह्यांच काय ते सुचत नाही) ....
जरठ विवाह..
जरठ विवाह..
<<<विकू आणि पुष्पा (ऐषारामी जीवन आणि सोबत पोळीचा लाडू आणि इतर शिळे पदार्थचं रिनोवेशन).
इ बाळ आणि जयदीप(हे जीवन कथाकथन..),
मायरा आणि झेंडे(जीवन स्केडुलिंग),.. <<
अगागा... महान आहे हे!

नाहीतरी सॉन्या आणि जयदीपला पुष्पा एकटीच पुरुन उरेल.
Pages