तुला पाहते रे अर्थात सुबोध भावे

Submitted by वेडोबा on 24 November, 2018 - 03:48

तुला पाहते रे पहिल्या धाग्याच्या 2000 पोस्ट्स पूर्ण झाल्या, पुढची चर्चा इथे करूया.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुबोध वातावरण अक्षरशः काबीज करतो हे मात्र खरं आहे. परवाच एका कार्यक्रमात शब्दशः अनुभवलं. >>>>> हो.... त्याच भाषेवर प्रभुत्व प्रचंड आहे.... भारावुन टाकतो....

बाबांनी काम छान केले पण संवाद फार फुसके वाटले. तेच तेच परत परत रिपीट होत होते. जरा सणसणीत संवाद असायला हवे होते. इशाच्या अभिनयाची तर दयाच येत होती. सुबोध मात्र हिरा आहे. बालगंधर्व म्हणून बाईच्या रुपातही किती सुंदर दिसला अन् आता सरंजामे म्हणूनही कसला देखणा दिसतोय.

बाबांनी काहीतरी आरडाओरडा तरी करायचा... मतीच गुंग झाली होती बहुतेक. केबीनमधे बसल्यावर पण त्यांना साडी काढायचं भान नव्हतं. सुबोधला तेही करावं लागलं बिच्चारा!

तू मायराशी जशास तसे वाग. तेव्हा ती त्याला विचारते, "खर्रच"? तेव्हा तो म्हणतो, मग? इथे ह्या खोलीत आत्ता कोण बसलंय तुझ्याबरोबर?>>>>>>>>>>> Lol मी पण नोटीस केलं ते म्हट्लं इशा तिचा हा डायलॉग विसरली वाटतं 'सर तुम्ही हे सांगताय? पण त्याने त्याचं वाक्य म्हणायचं काम केलं Proud

माझ्या गाववाले हो >>> वृंदा, तुमचे काही कनेकशन असेल तर इथली दाद पोहोचवा त्यांच्यापर्यंत.

अहो काय फारएण्डजी.. >>> जी वगैरे नका म्हणू Happy

जरा सणसणीत संवाद असायला हवे होते.>>> तो माणूस मुळात स्वभावाने गरीब दाखवलाय. त्याची किती तडफड/ संताप झाला तरी तो कितीसा सणसणीत बोलणार! संवादांपेक्षा त्यांच्या चेहऱ्यावरील रेष अन रेष बोलत होती.

फारएण्ड....चेन रिअँक्शन एकदम भारी.
बाकी आज निमकर सुटणार हे माहित होत.निमकर ,सुभा बँटिंग झकास करत आहेत.पण ईआई सुध्दा छान सेट होत आहे.
ईबाळ म्हणजे आफ्रिदी आहे.कधी बँटला बॉल लागतो,बाळाच्या बाबतीत विस समोर लाजताना आणि सारख त्याच्या मागे जाताना बँटला मस्त बॉल लागतो.
मेधावि,हे मात्र खर आहे की संवाद फुसके होते.पण ईबाबांच्या संवादाला बाळाला उत्तर द्यायच होत ,तिने मारलेला बॉल फोर कधी जातच नाही,फिल्डरला धावावच लागत नाही,बॉल स्वत:च थांबतो .म्हणून असे फुसके लिहिले असावेत.निदान काहीतरी तरी रिअँक्ट करेल.

ईबाबा भन्नाट फॉर्मात होते आज. काम चांगलंच करत आहेत ते. मुलीविषयीची काळजी, कळकळ फार छान व्यक्त केली त्यांनी. शंभर भाग होऊन गेले तरी ईबाळ काही सुधारण्याचं नाव घेईना. एकदाही असं झालं नाही की ती सरस ठरली. एकदाही नाही...आपण "सुबोध समोर उभे आहोत" याचं जरा जास्तच प्रेशर तिने घेतलं असावं की ती बाहेरच येत नाहीये त्यातून.

कधीतरी ओव्हर कॉन्फिडेंट वाटते.. काय माहीत जाऊ दे..
ईबाबा आणि सुभा सही.. आज ईबाबा तर ग्रेट .. 3 सिरिअलस मध्ये बघितलं त्यांना .. रुद्रम , तूझ माझं ब्रेक अप आणि ही . तीनही मधे नीट

अजून एक होती ना?? युवा वर??
हिरोहिराॅईन सारखे ब्रेकप करत असतात त्या सिरियलमध्ये हिरोचे बाबा होते ते त्यात.

ईबाबा भन्नाट फॉर्मात होते आज. काम चांगलंच करत आहेत ते.>>+११

एकदाही असं झालं नाही की ती सरस ठरली.>>+११ तिच्या जागी दुसरीला आणायला हवे. अजुनही वेळ गेलेली नाही.

आज पुर्ण एपिसोड इबाबाचा होता आणी चक्क लॉजिकल सवान्द वाटत होते , निमकराच्या पर्सनॅलिटिला सुट होणारे डायलॉग होते. केड्याला कॉर्पोरेट ओफिस जमत नाही मान्बा वरुन सिद्ध झलच आहे, घरगुती बर जमत त्याला.

न्यू प्रोमो पण सही आहे.. सुभा आणि ई बाबा जुगलबंदी.. ईशा तर इनविजिबल आहे.. प्रोमोत सुद्धा .. ,ईआई पण सही आहे.

बाकी जालिंदर काका गेले कुठं.. इशाला भेटून त्यांना वाटलं असेल विस ला हीच शिक्षा योग्य आहे Proud
केवढं सोयीस्कररित्या विसरले हे लोक.. इशाची परीक्षा पण..

जालिंदरकाका येतील ना परत. सरंजामेंची पहिली बायको कशाने गेली हा प्रश्न इबाळाला नाही तरी बाबांना पडेलच की..तेव्हाच परत एन्ट्री होईल काकांची.

सुबोध वातावरण अक्षरशः काबीज करतो हे मात्र खरं आहे. परवाच एका कार्यक्रमात शब्दशः अनुभवलं. >>>कोणता कार्यक्रम ?
आज पुर्ण एपिसोड इबाबाचा होता** ;खरच

एका खासगी कार्यक्रमात आला होता. तिथेच भेट झाली. bdw इंस्टाग्रामवर नवीन प्रोमो फिरत आहेत आणि काही फोटोही...त्यात ईबाळ मंगळसूत्र आणि मोठी टिकली लावलेली अशी आहे. अमित नावाचं कुठलंतरी नवीन पात्र येणार आहे म्हणे..

इशाची परीक्षा Happy
इबाळ आणि मंगळसूत्र Happy - 13 जानपर्यंतचे दिवस भरायला हवेत ना.
इशा व तो एक रात्रभर त्या एका हाटेलात होते हे का नाही सांगितलं मायरानं टिल्लूला? मोठा अॅटमबाॅम्ब सोडून छुटूक लवंगी का लावत बसलेत?

फारच बालिशपणे लिहीलाय परवाचा भाग. असा अपमान आपल्याकडून घडलाय समजल्यावर विक्रांतनं स्वतः घरी घेऊन जायला हवं होतं त्यांना. ड्रायव्हरच्या आणि रिसेप्शनच्या अंगावर पण वसवस केली कारण नसताना.

मी नवीन promo परत बघितला. कसल आव्हान विक्रांतने स्विकारलय? ईबाबांनी फक्त प्रश्न विचारले ना मग त्याची उत्तर द्यायची सोडून आव्हान कसल????

सध्या भारतात असल्याने ही मालिका मधुन मधुन बघितली जाते. एव्हढे दिवस फा आणि इतरांच्या फेसबुकवरील पोस्ट्स वरून मजा कळत होती. Lol
ती ईशा अभिनयातील बाळ आहे, सुबोध भावे हा (अजून) एक सुजलेला टिपिकल मराठी अभिनेता आहे. ईशाचे बाबा अभिनयातील दादा आहेत. आई पण छान आहे. झेंडे की शेंडेची भूमिका करणाऱ्या अभिनेत्याला संवादफेकीवर अजून मेहनत घ्यावी लागेल.

वत्सला, तू का रे दुरावा ह्या मालिकेचे काही एपिसोड बघ. त्यात हा झेंडे ( उमेश जगताप ) आहे. तो काम छान करतो, पण जरा पॉज घेत बोलतो.

मी नवीन promo परत बघितला. कसल आव्हान विक्रांतने स्विकारलय? ईबाबांनी फक्त प्रश्न विचारले ना मग त्याची उत्तर द्यायची सोडून आव्हान कसल????

Pages