तुला पाहते रे अर्थात सुबोध भावे

Submitted by वेडोबा on 24 November, 2018 - 03:48

तुला पाहते रे पहिल्या धाग्याच्या 2000 पोस्ट्स पूर्ण झाल्या, पुढची चर्चा इथे करूया.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कालचे विक्याचे ईशाचे कौतुक ती इतक्या लौकर इतक्या पदावर कशी पोहोचली वगैरे ऐकून जाम हसलो. त्यानेच ते पद दिले ना तिला? हे म्हणजे एखाद्या राजाने राजपुत्राला सेनापती करून "हा इतक्या लौकर सेनापती झाला याचा मला अभिमान आहे" म्हंटल्यासारखे आहे.

राजनंदिनी साड्या विकण्याची ईशाची जी कल्पना होती, की असलेल्या साड्यांमधून ड्रेस बनवायची, त्यापेक्षा अचाट कल्पना असू शकत नाही असे मला वाटले होते. पण त्या दुकानमालकाने तीही काढली. सर्व राजनंदिनी साड्या ५०% डिस्काउण्ट मधे विकून टाकायच्या. बास! खरेदीची किंमत, नफा, त्यातून कामगारांचे पगार, खर्च वगैरे क्षुल्लक गोष्टींचा विचार करायची गरजच नाही.

ईशाला सरांशी थोडं बोलायचय यात इतके ड्रॅमॅटिक म्युझिक आणि सर्वांचे अवाक् चेहरे कशाला हवेत? ती ईशा की हैसियत से म्हणत असेल नाहीतर राजनंदिनी हेड की हैसियत से म्हणत असेल. इतरांना त्यात काय इतका इण्टरेस्ट.

आजकाल प्रत्येक सीन ला मागे गाणे लावतात. जरा इथेही लावायचे ना? "हितं नको तिथं जाउ, आडोशाला उभ र्‍हाउ", "का?", "बघत्यात"!

आजच बघण्याचे पाच कार्यक्रम अचानक ठरवले! या ईशाला एक उद्योग नाही. ती बघायला येणारी मुलेही रिकामटेकडी आहेत की काय?

फारएण्ड.....तुम्ही सुचवलेल गाण तर बाळाच्या बाबतीत इतक चपखल आहे कारण तिने विसच्या बाबतीत सुरुवातीपासूनच असा पवित्रा घेतलेला आहे.

अरे ही ईशा राजनंदिनी ची हेड आधीच झाल्ये ना? मग परत नवीन शोध लागलेल्या ७ व्या मजल्यावर मीटिंग घेऊन तिला सगळ्यांनी congrats करण्याच्या scene ची काय गरज होती? आणि सु भा म्हणे तू नवीन कामगिरी सांभाळणार आहेस.

कालचे विक्याचे ईशाचे कौतुक ती इतक्या लौकर इतक्या पदावर कशी पोहोचली वगैरे ऐकून जाम हसलो. त्यानेच ते पद दिले ना तिला? >>
आता विक्या ईबाळाशी लग्न केल्यावर, तो "तू इतक्या लवकर मालकीण झालीस." म्हणून ईबाळाचे कौतुक करणार का??
Uhoh

आजकाल प्रत्येक सीन ला मागे गाणे लावतात. जरा इथेही लावायचे ना? "हितं नको तिथं जाउ, आडोशाला उभ र्‍हाउ", "का?", "बघत्यात"!>> Rofl

ह्यांची चाळ पण बदललीये का? पूर्वी त्याची आलेली कार तिच्या घरासमोरच्या व्हरांड्यातून दिसायची जिथून तो कातील बाय करायचा. आता वेगळीच गल्ली दिसते.

इशाची सद्ध्याची अवस्था म्हणजे दहावीच्या परीक्षेत अभ्यास न करता, पेपर न देताच बोर्डात पहिलं आल्यासारखी आहे आणि तरी बेडरासारखी कौतुकसोहळे पण स्विकारतीये ती.

ह्यांची चाळ पण बदललीये का? >>> ती चाळीच्या जवळची गल्ली आहे बहुदा. मागे एकदा जुनी सायकल विकत मागण्यासाठी ईशा इथे आलेली दाखविली होती.

"हितं नको तिथं जाउ, आडोशाला उभ र्‍हाउ", "का?", "बघत्यात》हे कहर आहे.
असंच "रुपास भाळलो मी, भुललो तुझ्या गुणाला, मज वेड लाविले तू, सांगू नको कुणाला" पण चालेल. गुण आणि रुप कुठले हे गुलदस्त्यात राहू दे. Happy

इशा आठ दिवस सरळ कार्ड पंच करून ऑफिसला गेली, ऑफिस हून आली असे काही झालेले नाही. विक्या इज व्हेरीमच लुकिंग लाइक द ओल्ड फूल. ते सातव्या मजल्यावर मीटिन्ग. व परत आता पार्टी पाहिजे हे म्हणजे नवीन पालकांसारखे झाले. बेबीज फर्स्ट बर्प बेबीज फर्स्ट स्टेप आज आअ म्हटला उद्या हसला प्रत्येक वेळी तोच उत्साह. इश्क ने निकम्मा कर दिया वर ना ये भी था आदमी काम का असे मायरा म्हणत असेल.

त्या एफ एम मॅड्म अगदी दिलसे म्हणतात मी इतकी वर्शे काम केले पण कधी साधे रेकग्निशन पन नाही. तेव्हा मला तूच ग तूच समजू शकतेस.
म्हणा वे वाटले.

इशा ऑफिसात विचित्र कपडे घालून येते इस्त्री न केलेला टॉप. वर पिंक ओढ णी ती ही नीट न ड्रेप केलेली. मग जीन्स!!! ह्या काय. निदान राजनंदिनी साडी ऑफि सातून मागून नेसायची ना? ब्रांड अँबॅसेड र म्हणून? पिट्स आहे सीरीअल.

इ बाबांना पण कसला तरी भणंग व्हायचा काँप्लेक्स आहे. ऐपत काडीची नाही परत आहे ते च हातातून कसे घालय्वायचे ह्याचे प्रय्त्न जोरकस चालू असतात. घर गहाण ठेवायचे कशाला? तर मालकाचे नुकसान वाचवायला. अरे आधी स्वतःला सेक्युअर कर? ते नाही. मुलीचा पगार चालत नाही. रिवर्स स्नॉबरी खूप दाखवतो. किती गरीब असला माणूस परिस्थिती सुधा रायचा प्रयत्न करेल ना? पण ते नाही.
और गढे में गिरनेका शौकिच है इस्को. बच्ची शानां मारते फिर री.

अमा, सहमत. अत्यंत आत्मघातकी व मूर्ख निर्णय घेतो अरुण. स्वतःच्या कुटुंबाला सांभाळू शकत नाही तर मग गप्प तरी रहावे. अरुणमुळेच पुष्पा अशी बुभुक्षित झाली असावी. जरा म्हणून सुख लागू देत नाही. आत्तासुद्धा घर गहाण टाकायचं कारण काही झेप्या नही.
विक्यानं पण पार्शलिटी करून तिला वर चढवलंय तर झाकली मुठ सव्वा लाखाची ठेवावी. तिला महान बनवायला जातो अन् स्वतःची शोभा करून घेतो.

>>>हितं नको तिथं जाउ, आडोशाला उभ र्‍हाउ", "का?", "बघत्यात" >>> Biggrin Rofl Wink
देवा......... भयंकर हसतीये मी...

अमा ++1 . प्रत्येक शब्दाला... +1 आणि >>>बेबीज फर्स्ट बर्प बेबीज फर्स्ट स्टेप आज आअ म्हटला>>> हे पण खरंच...अरे कंपनी आहे का मज्जा चाललीये आणि प्रेक्षक वर्गाला बालवाडी समजतात का...काही दाखवा यांना काय कळणारे... अरे केड्या 'जिंदगी गुलजार हैं' एकदा तरी बघून घे.. नाहीतर याच्या सगळ्या मालिका म्हणजे जुन्या मराठी +हिंदी सिनेमाची कथानकं मिक्स करतो... त्या मानबा मध्ये बिवी नंबर 1, सवत माझी लाडकी, आणि अजून काय काय मिसळलं आहे तोच जाणे... Angry (हे माझे वयक्तिक मत आहे नाहीतर केड्याचे चाहते माझ्यावर नाराज होतील बॉ)

केड्याचे चाहते??? आणि या पृथ्वीतलावर???
ते पण दोन-दोन अतिमूर्ख सिरियल्स बघून सुद्धा?? बापरे...

इशाला 'नविन जबाबदरी' चा भाग, बहुदा टेलेकास्ट करयचा रहुन गेला होता का? मध्येच आल्यासारखा वाटला.

केड्याचे चाहते??? आणि या पृथ्वीतलावर???
ते पण दोन-दोन अतिमूर्ख सिरियल्स बघून सुद्धा?? बापरे...

Submitted by मी चिन्मयी on 23 December, 2018 - 23:18>>>>>> कोण? आहेत कोण त्या दाढी केड्याचे चाहते?

ही सिरियल ज्या स्पीडने जात आहे,ते बघून शितु बहुतेक चँनेलवाल्यांना फोन करून विचारेल अस वाटत आहे की माझ्या बाबतीत"लांडगा आला रे आला ही गोष्ट तर खेळत नाही आहात ना,किती वेळ मी स्वत:ला त्या सावलीत बघायच?

ही सिरियल ज्या स्पीडने जात आहे,ते बघून शितु बहुतेक चँनेलवाल्यांना फोन करून विचारेल अस वाटत आहे की माझ्या बाबतीत"लांडगा आला रे आला ही गोष्ट तर खेळत नाही आहात ना,किती वेळ मी स्वत:ला त्या सावलीत बघायच? >>>>>> हो ना, डिसेम्बरच्या शेवटच्या आठवडयात शितूची एन्ट्री होणारेय अस मागे झी मराठी दिशा मध्ये वाचल होत. इथे तर अख्खा डिसेम्बरच उलटून जायची वेळ आलीये, पण हिचा काहिच पत्ता नाही.

चाहते केड्याचे नसतील कोणी पण त्याची सर्व बोटं तुपात आहेत, trp मिळतोय त्याच्या दोन्ही मालिकांना. लोकं बघतायेत काही दाखवलं तरी. मानबा अजूनही नं एक आणि तुपारे नं दोन वर आहे.

काय एकेक नमुने आणले होते स्थळ म्हणून . आणि काय ते डायलॉग .. एक जण सरळ सरळ म्हणाला मी यु एस ला जाणार आई बाबानी कशाला यायचं लग्न झाल्यावर मुलीकडे,, मी माझ्या आईबाबांना वृद्धाश्रमात ठेवणार आहे..

आता सरंजामे एकमेव बेष्ट वाटण्यासाठी जगातले सगळे नमुने ईशाकडे येतील/आलेत. त्यात काही नवल नाही.

नुसतं घरात बसून .....ह्म्म्म्म्म त्यांच्याकडे सगळी कामे करायला नोकर आहेत म्हणा त्यामुळे नुसतं बसायला काही हरकत नाही Happy

आणि काय त्या एका मुलाच्या बापाने सरळ विचारलं हुंडा किती देणार म्हणून. हुंडा विरोधी कायदा येऊन जमाना झाला, आजकाल कोणीही वरपालक असं डायरेक्ट विचारण्याची शक्यता नाही. प्रेक्षकांना गृहीत धरणं वेगळं न मूर्ख समजणं वेगळं.. तीव्र निषेध...

वरच मुलं पाहन्याच्या भागात, आता तो ‘ शुंभ ‘ ( सुभा) किती चांगलाय त्या बुटुकबैंगणसाठी असे दाखवायला अशीच पात्रं आणणार ना..

आणि सु भा ने 'वय' या मुद्द्यावर तर मौनच बाळगलं....!! Uhoh
ही माझी फाईल म्हणे.... Happy

Pages