तुला पाहते रे अर्थात सुबोध भावे

Submitted by वेडोबा on 24 November, 2018 - 03:48

तुला पाहते रे पहिल्या धाग्याच्या 2000 पोस्ट्स पूर्ण झाल्या, पुढची चर्चा इथे करूया.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

रश्मी लिंक आताच पहिली....धन्स ..... तुफान आहे तो सिन जेव्हा तो इ बाळाला भौ करतो आणि ते रडायला लागल्यावर सगळे त्याला किती प्रयत्न करून रडायचं थांबवतात.....
Rofl Biggrin

असं इतकी पूर्ण साडी ड्रेप करुन दाखवतात का दुकानात..? .मी फक्त पदर खांद्यावर टाकून उभे असलेले विक्रेते बघितले आहेत फार तर .. यांनी म्हणजे अगदी गाठ मारुन साडी नेसलेली.. Uhoh

अर्थात झेंडेनी केलं ते अगदीच गर्हणीय होतं यात वादच नाही!! Happy

ईशाच्या बाबांचा अभिनय बेस्ट! एक ही शब्द नव्हता त्यांना ....तरीही फक्त हावभावांतून आणि देहबोलीने जिवंत केला प्रसंग!
सुबोध पण फार जेन्युईन वाटतोय सध्या तरी.. .माहित नाही पुढे व्हिलन झाल्यास कसा वागेल...!!

लग्नानंतर ह्या दोघांचे रोमॅन्टीक किंवा लाडात आलेले सीन्स किती ऑकवर्ड होणारेत》त्यांना किती होत असतील.

त्यांना किती होत असतील.>>>>>>> हो
असं वयामधे अंतर असणे आधी कधी कधी दखवलं आहे मुव्ही सिरियल मधुन पण हे जरा जस्तच ऑकवर्ड वाटत आहे..

त्यांना ऑकवर्ड होतील का नाही माहित नाही कारण ते शूटींग करत असतात. पण आपल्याला/ प्रेक्षकांना मात्र त्या इशाबाळामुळे नक्कीच होतील.

त्या झेंडेला म्हणावं, ईशाच्या बापाला उचलून आणलं म्हणून स्वतःला फार शहाणा समजू नकोस... हिंमत असेल तर ईशाच्या आईला उचलून दाखव...
Whasapp वरून.

इशाचे कपडे नक्कीच बदलायला हवे आहेत..काय ते गुलाबी टॉप, निळ्या बाह्यांचा ऑरेंज ड्रेस, आणि तत्सम सगळे क्विल्ट सारखे ड्रेसेस... ती अधिकच सुमार, मेंगळी दिसते! आणि खरंच तिला तिच्याच बाबांचा झालेला अपमान - त्यामुळे वाटलेल वाईट - नीट दाखविता आलं नाही!

तिला भविष्यात खलनायिकेचा रोल करायचा आहे म्हणे >>> तिच्या अभिनयाच्या लायकीमुळे प्रेक्षकांना ती खलनायिकाच वाटते ... !!
बाकीच्यांचे जाऊ द्या, पण ज्या निर्मात्याने इतके पैसे मोजले असतील, त्याला पण वाटू नये मालिका वाचवायची असेल तर इतका बथ्थड अभिनय करणारी लीड रोल मध्ये कशी काय?

सावलीतली बाई बाहेर कधी येणार? :))

हा झेन्डे विसच्या चाळीत , चाळीचा ' दादा' किव्वा 'भाई' होता वाटत. कुणाला उचलून आणणे, अमक्याच्या डोक्यावर पिस्तूल ठेवणे, मित्राचा जीव वाचवणे (तेही दोन वेळा), त्या बॉडीगार्ड होणे वगैरे , वगैरे. विसने याच पोझिशन साठी त्याला ऑफिसमध्ये ठेवलय वाटत. मायराबरोबर कुचाळक्या करणे, मित्राला सल्ले देणे आणि उरल्या वेळात हि अशी भाईगिरी करणे हिच कामे आहेत झेन्डेन्ची.

ईबाबा आणि सुभाचे काम मस्त. ईआई सुद्दा काल सेन्सिबल वागली.

ईबाबान्तर्फे ईशा आणि विसचा लग्नानन्तरचा प्रसन्ग दाखवला ड्रीम सिक्वेन्समध्ये. Lol त्यात ईशा जरा बरी दिसत होती.

असं इतकी पूर्ण साडी ड्रेप करुन दाखवतात का दुकानात..? >>>>>> मी 'बरेली की बर्फी' बघितला नाहीये. पण त्यात सुद्दा राजकुमार रावला असच साडी नेसताना दाखवल होत ना? ट्रेलरमध्ये बघितल.

तिला बरेच मराठी सिने सृष्टीतले लोक ओळखतात असं वाटत. >>>>>>> लहानपणी ती अशोक शिन्देला भेटली अस ती मुलाखतीत म्हणाली.

ती सुभाला 'सुबोधदादा' म्हणते.

ईशा पायनापल पेस्ट्री घेउन येते आणि वाटेत माहिमकराना देते तेन्व्हा त्याचा चेहरा एक्दम लहान मुलांसारखा खुलला. किती गोड वाटलं >>>>>>> +++++++ ११११११

बाळाची कामे, ईशाताईचा सल्ला >>>>>>> Rofl

त्या कुत्र्यांची नाव माहीत नाहीत,तर त्याच्याशी खेळणे >>>>> आ? विस कुत्रे पण पाळतो? हे कधी दाखवल? Uhoh

13जानेवारीला. >>>>>>>> त्या 'कर्णपिशाच्च' ज्योतिषाचे भविष्य खरे ठरले म्हणायचे. जानेवारीत लग्न, राजयोग. फक्त तो 'ग' नावाचा काय लोच्या आहे तेच कळत नाही.

तुपारेतलं सगळ्यात भारी प्रेमी जोडपं म्हणजे अरुण आणि पुष्पा आहेत. बाकी इशाचं प्रेम खोटं आणि विक्रांतचं कन्फ्युज्ड वाटतं. >>>>>>>>> ++++++११११११११ ईशापेक्षा मायराच प्रेम खर वाटत.

पुष्पा फार गोड आहे. काल पण इशाला म्हणाली, त्या भेंडेंनी बाबांना उचलून नेलं. बाबा जबरदस्त कलाकार आहे...कुठे होता इतके दिवस? सुबोधचा अन् त्याचा सीन खूप चांगला झाला. कथा आणि संवादांवर जरा मेहनत घेतली तर खूप बरं होईल. इशाला तर बदलूनच टाकावं सरळ.
संवाद पण विचित्र आहेत. परवा दोघे जोडीच्या साखळीसारखे हात धरून काॅफी प्यायला येतात. तो सांगतो की तू मायराशी जशास तसे वाग. तेव्हा ती त्याला विचारते, "खर्रच"? तेव्हा तो म्हणतो, मग? इथे ह्या खोलीत आत्ता कोण बसलंय तुझ्याबरोबर? मी अजून त्या दोन वाक्यांची संगती जुळवतीये.

परवा दोघे जोडीच्या साखळीसारखे हात धरून काॅफी प्यायला येतात. तो सांगतो की तू मायराशी जशास तसे वाग. तेव्हा ती त्याला विचारते, "खर्रच"? तेव्हा तो म्हणतो, मग? इथे ह्या खोलीत आत्ता कोण बसलंय तुझ्याबरोबर? मी अजून त्या दोन वाक्यांची संगती जुळवतीये. >>> Lol पर्फेक्ट. मीही त्यावेळेस "गल्ली चुकलं काय हो हे पीएल?" टाइप विचारात पडलो होतो.

ईबाबा कलाकाराने काम खरेच चांगले केले आहे. त्याचे सीन्स आणि लाइन्सही बर्‍यापैकी कन्सिस्ट्ण्ट आहेत. तो रागावल्यावर बोलतो ते सुद्धा "रिअल" वाटते, अशा व्यक्तिमत्त्वाचा माणूस जसा बोलेल तसेच.

 मी अजून त्या दोन वाक्यांची संगती जुळवतीये.>> Lol
अर्रे, नका इतका विचार करु. Wink

हो दुकानात साडी नेसून दाखवतात ते गाठ वगैरे मारुन जरा अतिच दाखवलंय वाटतं. इथेही दुकानात आपल्याला साडी दाखवणारा माणूस साडी नेसून दाखवतो पण तो हातानेच निऱ्या धरून आणि पदर खांद्यावर पसरून फक्त साडीचा लुक कसा येईल ते दाखवतो.
निमकर तर पूर्ण पदर डोक्यावर घेऊन वगैरे साडी नेसतात. Sad

नवीन promo बघीतला का? विक्रांत आता प्रेमाची परीक्षा देणार आहे बाबांसाठी...

निमकर ज्या पद्धतीने साडी नेसून दाखवतात तशी दाखवली तर कितीही भारीतली साडी कोणीही घेणार नाही.
एकंदरीतच ती राजनंदीनी साडी फारच बोअर आहे.

आणि त्या दुकानात ते तरूण मुलगी आणि तिच्या बापासारखा दिसणारा नवरा - हे जोडपे खरेच तसे असते की निमकरांच्या कल्पनेतले? वयातला फरक ही कन्स्पेट जरा जास्तच स्ट्रेच केली होती तेथे Happy

ती मुलगी जबरदस्तीने मराठी बोलायला लावल्यासारखी, आणि पुस्तकी मराठी बोलते. इतके अवघडून मराठी मी इतक्यात बकेट लिस्ट मधे माधुरीकडून ऐकले होते Happy

अहो दाखवतात साडी नेसून पण स्वत: नाही नेसत तर जिला साडी घ्यायची आहे तिला नेसवतात. तेही ती २-३ साड्यांपैकी कोणती घ्यावी या संभ्रमात असेल तर. तसेच गाठ मारुन नाही नेसत, साडीला सुरकुत्या पडू नये म्हणून त्यांच्याकडे इलॅस्टीक बेल्ट असतो तो लावतात.
इथे ईबाबा किती मन लावून काम करतात हे दाखवण्यासाठी त्यांनाच समोर आहे ती साडी नेसून दाखवायला सांगत असतील. पण ऑफिसपर्यंत साडीत दाखविले म्हणजे अतिच झाले.

त्यांना उचलेले कळल्यावर ईआई फक्त फोनवर रडली आणि काही झाले तर तिथे जाऊन गोंधळ घालेन म्हटली. अजुन काय व्हायची वाट पाहते ती?
तिने लगेच जाऊन भेंडेला जाब विचारायला हवा होता.... हिंमत असेल तर ईशाच्या आईला उचलून दाखव... असे शब्द वापरले असते तर अजून मजा आली असती Lol

काल एपिसोड नसल्याने मला गेम ऑफ थ्रोन्स पाहून संपल्यावर आले होते तितके डिप्रेशन आले होते. >>
मला या सिरियलचा एखादा भाग साबांच्या आग्रहाखातर बघावा लागला तर नंतर प्रचंड डिप्रेशन येते. Happy

आज दिवसभर ह्याचा भाग यूट्यूबच्या सुचवणी सूचीमध्ये दिसत होता. फार प्रयासाने तो उघडायचा मोह टाळला. इकडचं वाचूनच समाधान मानून घेतो. >>
मी सुरुवातीला कधीतरी युट्यूबवर सर्च केलेला तर मला अजूनही सुचवतात याचे भाग. मग वैतागून मी not interested करुन टाकते त्याला. तरी परत दुसरा भाग घेऊन हजर होतात.

13 जानेवारीला लग्न असल्यामुळे आता प्रेमाची परीक्षा,ईशाच नाव वधूवर सूचक मंडळात घालणे ,तिचा कांदेपोह्यांचा कार्यक्रम,मग प्यार मे बिछडना ,छुपकेसे मिलना,आणि मग कसतरी काहीतरी दाखवून तो बघायला आलेला मुलगा कसा लब्बाड आणि विस कसा महान हा ईबाबांना होणारा साक्षात्कार हे सगळ आलच ना.30तारखेला लग्नमुहूर्त नाही वाटत तेव्हा दाखवायच ना.किती खेचणार?

बाबा जबरदस्त कलाकार आहे...कुठे होता इतके दिवस? >>>>
मोहिनीराज गटणे उर्फ राजु गटणे - अहमदनगर नाट्यचळवळीतले आहेत.
प्रायोगिक नाटके/ आर्ट फिल्म्स / नाट्य स्पर्धा वगैरे. "कोती" ह्या चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांचा कोल्हापूरच्या चौथ्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात विशेष गौरव करण्यात आला होता . माझ्या गाववाले हो Bw

सुबोध वातावरण अक्षरशः काबीज करतो हे मात्र खरं आहे. परवाच एका कार्यक्रमात शब्दशः अनुभवलं. त्याचा तो सुप्रसिद्ध "सॉल्ट अँड पेपर लूक" ही त्याचा ओरिजनल आहे. तुपारेसाठी बळंच केस पांढरे दाखवले आहेत असं नाहीये. सॉल्लिड किलर दिसतो..

काही झाले तर तिथे जाऊन गोंधळ घालेन म्हटली >>> नुसते तिकडे जाइन म्हण्टली तरी बास आहे. गोंधळ ती जाते तेव्हा आपोआप होतो. भेजा फ्राय मधल्या विनय पाठकच्या व्यक्तिरेखेसारखी आहे ती.

जरा चेन रिअ‍ॅक्शन दाखवायला हवी होती - झेंडे ईबाबांना उचलून आणतो. मग बदला म्हणून ईआई झेंडेलाच उचलून आणते. मग मायरा ईशाला, त्याचा बदला म्हणून बिपिन मायराला. सर्वांनी विक्रांतला सुपरव्हिजन शिवाय सोडल्याने तेवढ्यात जालिंदर कोठूनतरी उगवतो आणि विक्रांतला उचलून नेतो. मग सगळे एकत्र येतात आणि सत्याचा असत्यावर विजय वगैरे.

मी काल विक्रांत निमकरांची ऑफिसमधून पाठवणी करतो तिथपर्यंतच पाहिला आहे. पुढे विक्रांत झापतो का झेंडेला? झेंडे ने "अरे मी ईशाकरता राजनंदिनी साडी उचलली. आत निमकर होते मला काय माहीत" असे उत्तर द्यायला हवे. किंवा मॅनेक्विन समजून उचलले वगैरे.

झेंडे ने "अरे मी ईशाकरता राजनंदिनी साडी उचलली. आत निमकर होते मला काय माहीत" असे उत्तर द्यायला हवे.>> Rofl

Pages