तुला पाहते रे अर्थात सुबोध भावे

Submitted by वेडोबा on 24 November, 2018 - 03:48

तुला पाहते रे पहिल्या धाग्याच्या 2000 पोस्ट्स पूर्ण झाल्या, पुढची चर्चा इथे करूया.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

"बाळाला अभिनय शिकव, तरच लग्न" इबाबा आव्हान देतात.
सुभा आव्हान स्वीकारतो.
सिरियल अनंतकाळपर्यंत चालू राहते.

अरे खरच,निमकरांनी कुठे आव्हान दिल?त्यांनी त्यांच्या प्रश्नांची उत्तरच तर द्यायला सांगितली.हा काय आव्हान घेऊन गेला.
पण आज सुभा असूनही ती चक्कर येण्याचा अभिनय नाही जम्या.अस वाटल मला.
बाकी फार काही नव्हतच.आणि निमकरांनी तो व्यभिचाराचा काय आरोप केला.अरे काहीही काय.
केड्या पागल आहेच पण शर्वरीला काय झाल आहे?

कालचा तो सगळे ट्रॅजिडी किंग्/क्वीन झालेला एपिसोड ईबाबांचे काम चांगले असूनही खूप लांबवला. केवळ एपिसोडची मिनीटे बाकी आहेत म्हणून लोक वेळ काढत आहेत असे वाटले.

अरे खरच,निमकरांनी कुठे आव्हान दिल?त्यांनी त्यांच्या प्रश्नांची उत्तरच तर द्यायला सांगितली.हा काय आव्हान घेऊन गेला.>>> आता घरी जाऊन गाईड मधे उत्तरे बघून तोंडपाठ करून परत येणार असेल.
ईबाळ तर सूपरफ्लॉप ..आधीच मेंगळी त्यात भ्बॅयॅ रडका चेहरा करून उभी होती.

विसंची बायको जीवंत असेल तर तो व्यभिचारच आणि सुभा विवाहीतच असणार असं निमकरांनी गृहित धरलं असेल. ते काही बोलणं झालंच नाही आणि विसं न दिलेलं आव्हान घेऊन गेला. ईबाळावर प्रेम केल्याचा परिणाम. म्हणे मी ईशाच्या प्रेमात पडलोय, तुमच्या मुलीने मला जबरदस्ती प्रेमात पाडलंय असं म्हणायचं असेल त्याला. निमकरांपेक्षा सुभा थकलेला आणि म्हातारा दिसत होता. ईशाई किती आशेने बघत होती विसंकडे, जसंकाय तो तिलाच मागणी घालायला आलाय. सुभा आता बारिक होऊन येईल का, किती महिने जातील त्यात. असंही त्या मेंगळीला तिच्या वयाचे मित्रमैत्रिणी आहेतच कुठे रूपाली सोडून.

ईशा फारच ढिम्म बाई .. डायलॉग काही असोत कशेही असोत, बाकी लोक ढकलत होते ना .. ईआई ने ते निदान प्रत्येक डायलॉगला वेगवेगळे भाव दाखवले . ईशा डोळ्यातले खोटे आश्रू पटकन संपू नये म्हणून ट्राय करत, ते टिकवून ठेवत असल्यासारखी वाटली.. एक एक्सप्रेशन बदललं नाही.. त्यामुळे सुभाच्या एवढ्या आट्यापिट्या काहीच अर्थ वाटत नाही.. ह्या वेडीसाठी करतोयस सगळं असाच वाटत ..

ईबाबांनी सगळे प्रश्न विचारून टाकले..अगदी मुलाबाळांपर्यंत.. सुभा टाइम्प्लिज करून गेला .. तिथेच काय ते उत्तर दिली असती तर आव्हान तिथेच संपलं असत.. आता लांबड लावली परत..

परवा laundry मध्ये कपडे बांधून मिळेपर्यंत 10 मिनिट्स सिरीयल पहायचं भाग्य मिळालं. सुबोध भावेच्या खरंच प्रेमात आहात का बाया मुलींनो? की सहज आपली फॅशन आहे त्याला आवडून घेण्याची? किती अशक्य सुजकट म्हातारा आणि गबाळा दिसतो तो. आणि इथेच वाचलं की त्याचं वय फक्त 45 वर्षे आहे. माझा घरवाला सिनेमातला हिरो नसताना सुद्धा याच्यापेक्षा फीट, स्मार्ट आणि तरुण दिसतो. Proud

सीन चालू होता इशाचे आईबाबा तिला रूममध्ये झापताहेत आणि सुबोध भावे चाळीमध्ये एन्ट्री घेतो आहे. त्यांना बहुतेक हिंदी सिनेमाच्या हिरोसारखी wow एन्ट्री दाखवायची होती. तो आला पण स्लो मोशन आणि तिथे पॅसेज मध्ये एक काकू बसल्या होत्या त्या हातातली वस्तू ठेवून चेहऱ्यावर wow एक्सप्रेशन घेऊन पाहत राहिल्या. टिपिकल हिंदी मुव्ही एन्ट्री, पण हिरो तसा हवा ना. इतका काहीच दिसला ना की तो सीन फ्लॉपच एकदम. याच्यापेक्षा वयस्कर हँडसम म्हातारे कितीतरी असतात. हॉलिवूड सोडा अगदी बॉलिवूड आणि आपला मराठी मिलिंद सोमण सुद्धा.
ना सुबोधने प्रेमात पडावं असा एकही गुण इशामध्ये दिसतो ना ही इशाने प्रेमात पडावं अस काही सुबोधमध्ये ( except his wealth, पण मराठी आदर्श मुली पैसे पाहून प्रेमात पडत नाहीत ना).
एकुणातच त्यांच्या प्रेमात पडण्याची प्रोसेस फुलवता न आल्यामुळे ही love story ऐवजी lust story च जास्त वाटते. जाऊ दे झालं, मला इथल्या पोस्ट्स आवडतात. मी परत पहायचा गुन्हा करणार नाही, पण इथे मात्र मनोभावे वाचणार Lol

नाही, वय हा मुद्दा होऊच शकत नाही. प्रेमात पडताना ते पाहिलं जातं नाही, पण प्रेमात पडायला दुसरी काही ठोस कारणं हवीत तीच स्टोरीत गायब आहेत.

मीरा, जेव्हा काहींना तो सुजकट गबाळा म्हातारा वाटतोय तेव्हा इथे काही तरुण मुली....अयाई....अगं कसला हाॅट आहे गं हा ....असं म्हणताना ऐकलं. पसंद अपनी अपनी Happy

काल हसू जास्त आले कारण माझे साबा व साबु ही सिरीयल पहाता पहाता ईबाळाला नावे ठेवत होते. आधी साबा ईबाळाच्या प्रेमात होत्या, पण ती याच्या बडेजावाला भुलली आहे असा त्यांना काल साक्षात्कार झाला. Proud

मीरा.. - यातले अनेक कलाकार वेळी-अवेळी स्लोमो मधे एण्ट्र्या मारतात. आपण फार सिरीयसली घ्यायचे नाही. बहुधा २२ मिनीटांइतके फिलर सीन नसले की लोकांना स्लोमोमधे चालवतात. सुभा आधीच्या भागांमधे चांगला दिसायचा. त्याचा ओव्हरऑल प्रेझेन्स चांगला आहे या सिरीज मधे.

आज तिकडे विक्रांत चाळीत माफी मागायला गेला असताना इकडे मायराजी व झेंडे पुन्हा काहीतरी शिजवतायत असे दिसते. मायरा म्हणते "That is good for us", यातले "us" ऐकून झेंडे तिला मारायला धावतोय का असे वाटले. यात "अस" काय आहे झेंडेच्या दृष्टीने? हे जमले तर विक्रांतचे ईशाशी लग्न होईल. नाही जमले तर मायराशी. दोन्हीमधे त्याच्या दृष्टीने काहीच फरक नाही. तो बेगाने शादीमे अब्दुल्ला दीवाना आहे. त्याला मुळात हे उद्योग करायची काय गरज आहे माहीत नाही. एक चांगले डेव्हलप होउ शकणारे कॅरेक्टर बिनडोक करून टाकले आहे.

कसले नकली दाखवले आहेत चाळकरी. आमच्या चाळीत आधी शिव्या घातल्या असत्या, नंतर माणूस चांगला दिसतोय म्हणून मग चहा वगैरेही दिला असता. एक दोन लोकांनी जाउन "गोडीत" वगैरे सांगितले असते विक्रांतला घरी जा म्हणून.

नंतर थकून त्या बेंचवर बसलेला सुभा पाहून "हा सगळा माहीमकरांचा फ्लॅशबॅक असून फ्रेम ब्लर होउन पुन्हा स्पष्ट झाली की तेथे विक्रांतच्या जागी माहीमकर दिसणार आहेत" असे वाटले एक मिनीट.

एकूण विक्रांत व ईशा यांच्याकडे ऑफिस मधल्या काँम्प्लेक्स प्रॉब्लेम्स वर सोपी, आणि घरगुती सोप्या प्रॉब्लेम्स वर उगाच गोंधळ घातलेली अशी दोन्ही प्रकारची न चालणारी सोल्युशन्स आहेत असे दिसते.

शेवटी संवाद गंडले आहेत. विक्रांतच सुरक्षित नाही वगैरे. "माझी मुलगी तुम्हाला नवरा म्हणून तिच्या वयाच्या मुलामुलींमधे घेउन गेली..." या डॉयलॉग ला तो फेमस "थांबा" असा हात करतात हीरो लोक तसे करायला हवे होते विक्रांतने. "तिच्या वयाच्या मुलामुलींमधे?" एक रूपालीला मी ओळखतो. अजून नक्की कोण? असे विचारेल तो Happy

"देवाला सुद्धा लोकापवाद चुकला नाहीये" ऐकल्यावर ईबाबांच्या चेहर्‍यावर "ईशाने यालाही आणखी कोणतीतरी गोष्ट सांगितलेली दिसते" असे भाव होते.

चित्रपटातले हीरो करतात तसे करतोय की काय हा आता, असे वाटले एण्ड बघून. "तुमच्या योग्यतेइतका गरीब चाळकरी होउन दाखवेन, तेव्हाच परत येइन ईशाचा हात मागायला"

काल विक्रांतला चक्कर आली तो सीन खरंच जम्या नही. समोर बाकडं होतं तरी कठड्याला झोकांड्या खात होता.

काही महत्वाचं बोलायचं असेल की ते दार का लावतात ते समजत नाही कारण बोलणे व ऐकणे ह्यासाठीच खरं तर त्यांच्या घराची खिडकी आहे. तिथून दूधही घेता येईल हे त्यांना सांगायला हवं.

दूध नाही घेता येणार..गज आहेत ना....! ते पातेल्यात घेतात दूध !

तर थकून त्या बेंचवर बसलेला सुभा पाहून "हा सगळा माहीमकरांचा फ्लॅशबॅक असून फ्रेम ब्लर होउन पुन्हा स्पष्ट झाली की तेथे विक्रांतच्या जागी माहीमकर दिसणार आहेत" असे वाटले एक मिनीट.-- Happy ... काय इमॅजिनेशन फारेंड!

पण डायलॉग्ज खूपच गंडलेले आहेत....निमकरांचे प्रश्न स्वाभाविक होते पण त्यात कसलंहि चेलेंज नव्हतंच मुळात...सुभाने ते स्वीकारायला...!!
कैच्या कैच दाखवतात........ केड्या ड्वायलॉक्स लिहीतो ना त्याचा परिणाम.......तर्क संगत काही नाही!
परवाही, फारेंड यांनी पॉईंट आऊट केल्या प्रमाणे... ...ते ऑफीस मधे चहा पीत असताना ती विचारते : "खर्रच , सर?" आणि हा म्हणतो.. , "मग, तुझ्या समोर कोण बसलंय? ".......

अर्रे!! काय संबंध या दोन वाक्यांचा?

.निमकरांचे प्रश्न स्वाभाविक होते पण त्यात कसलंहि चेलेंज नव्हतंच मुळात.>>>>> +१
आता हा काय वीस वर्षांनी तरुण होणार आहे का? Happy

.ते ऑफीस मधे चहा पीत असताना ती विचारते : "खर्रच , सर?" आणि हा म्हणतो.. , "मग, तुझ्या समोर कोण बसलंय? ".......

अर्रे!! काय संबंध या दोन वाक्यांचा?>> Lol

मला ते दुकानात साडी नेसवण्यावरून जे दाखवतात त्यासाठी वाईट वाटतं. हे काम काही कोणी हौसेनं करत नाही. त्यांची अवहेलना केल्यासारखं वाटतं.

मीरा - अगदी मनातले बोलली ... लय ऐकले म्हणून मी नादी लागले शिरेलच्या. पण अजून काय मला सुभा अहाहा - असले दिसले नाही
माझा घरवाला सिनेमातला हिरो नसताना सुद्धा याच्यापेक्षा फीट, स्मार्ट आणि तरुण दिसतो >> stay blessed..!!!

इ-बाळ असे पुतळ्या सारखे अवघडून उभे का राहते नेहमी... मुद्राभिनय शून्यच पण निदान देहबोलीतून तरी .. कठीण आहे ....एकूणच कैच्या कै चालूये सिरीयल

काल सुभा आव्हान स्वीकारतो म्हणाला तेव्हा मला उगीचच "उठा उठा लग्नघटिका आली, मोती स्नानाची वेळ झाली" असे सारखे डोक्यात येत होते Happy

जालिंदरला डेंग्यू झालाय का? गायबच आहे.

सिरियल खरच खूप गंडली आहे.काल बाहेर एवढा आरडाओरडा चालू असताना रूपाली,बि प्या कुठे होते का ही पात्र म्हणजे मैंने प्यार किया मधली बडजात्यांची कबूतर आहेत मेसेज पोचवणारी,गिफ्ट्स परत करणारी,रूआई,टिल्लू कुठे होते
हा सारखा ऑफिस सोडून चाळीत येत आहे,मिडिया कुठे आहे.अरे अंबानी जर असा चाळीतच काय पण नुसता सामान्य माणसांच्या घराच्या गल्लीत जरी आला असता ना तरी न्यूज होते,अरे ऐश्वर्या शिंकल्याची पण न्यूज होऊ शकते,इथे तर ३५००००कोटींचा कुबेर रात्रभर उभा आहे याची न्यूज नाही,याला बिझिनेसमध्ये कोणी शत्रु नाहीत ,मग कशाला निमकर उगाच विचारत बसले आहेत की तुम्ही सुरक्षित नाही आहात.
काहीहीही.

https://www.loksatta.com/trending-news/tula-pahate-re-memes-went-viral-1... Proud

या झी मराठीवाल्यांना कॉमन सेन्स असलेले लेखक सापडतच नाहीत. चांगल्या विषयाची माती कशी करावी हे या केड्या कडुनच शिकावे.

वृंदा ,up +++ 1
इ बाळाकडे पाहून हेच वाटते की डायलॉग नसतील,एक्सप्रेशन नसतील तर देहबोलीतून तरी थोडा अभिनय दाखव अग रडे ...खु क खु मधल्या मेंगळ्या मान्शी सारख हिला पण तोंडावर पाणी मारून गदागदा हलवून उठवावसं वाटतं.... हिला पण तिच्यासारखा असा गोड गैरसमज असावा की गालावर खळ्या असल्या की झालं.. अरे पण बाकी सगळ्याच बाबतीत बोंबाबोंब आहे... हे जितक्या लवकर स्वतःला समजेल तितकं बर.... प्रेक्षकांसाठीही आणि तिच्यासाठीही.. Angry

खु क खु मधल्या मेंगळ्या मान्शी सारख हिला पण तोंडावर पाणी मारून गदागदा हलवून उठवावसं वाटतं। >>> ती मानसी तोंड उघडत नव्हती आणि अभिनयाचा प्रयत्न करत नव्हती तोपर्यंत डोळ्यांना तरी चांगली दिसायची. ईशा निमकर तिथे पण नापास. म्हणजे झी मराठी बघा एकेक पायरी उतरत पहिला दगड बरा म्हणावा असा नवीन नमुना आणताहेत.

वृंदा, थँक्स
रश्मी, ती लिंक भारी आहे, एकसे एक मिम्स आहेत Lol

सुभाचे हाल बघवत नाहीत हो.नवीन प्रोमोमध्ये हा ३५००० कोटींचा मालक हॉटेलम्ध्ये चक्क शेफ झाला आहे आणि निमकरांसाठी कोंथिबीरवड्या करणार आहे.
आता काय वडापावाची गाडी पण टाकणार की पाणीपुरीची गाडी लावणार.
अहो निमकर तुमच्या लेकीने विसला देशोधडीला लावल हो
सुभा नको रे नको ,अरे पैसे काय दुसर्या का रे दुरावासारख्या शिरियलीत काम करून पण मिळेल.
पण ही नको रे.

Pages