Submitted by वेडोबा on 24 November, 2018 - 03:48
तुला पाहते रे पहिल्या धाग्याच्या 2000 पोस्ट्स पूर्ण झाल्या, पुढची चर्चा इथे करूया.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ईआई कधी नाही ते विचार करून
ईआई कधी नाही ते विचार करून गँभिरपणे बोलतेय आज, आवडलं मला.
आज काय झाल?
आज काय झाल?
आज बेबीने विश्वप्रसिद्ध भोकाड
आज बेबीने विश्वप्रसिद्ध भोकाड पसरलं ..... वडील इतके disturbed आहेत.. आणि हि बया पुतळ्यासारखी नुसती जागच्या जागी ... एका वेळी एकच जमते का तिला .. नुसते बोलणे अथवा नुसते चेहऱ्यावर थोडेफार ... अथवा मंद चालणे मग बधिर चेहरा .. आता बस्स .. मध्ये बरेच एपिसोडस पाहिले नाहीत .. हिला बदलल्याखेरीज बघवणार पण नाहीत
(No subject)
पँरेंट्स मिटिंग.......अवधूत
पँरेंट्स मिटिंग.......अवधूत गुप्तेच्या भाषेत एकदम चोळामोळा करून टाकला.
केकचा खोका रिकामाच होता. जड
केकचा खोका रिकामाच होता. जड खोका हातात धरलाय आणि सांभाळून नेतेय असा अभिनय बाळाला जमलाच नाही. विसंने तर पिशवी दिलीच नाही केकसाठी पण ईबाळपण चाळीतले सगळे बघताहेत ना तो मोठा खोका याची खातरजमा करूनच पुढे जात होती. विसंने मुद्दाम पिशवी दिली नसेल नाहीतर ईबाळाला नविन आयडिया सुचायची. ईआई चांगलं बोलली आणि ईबाबांचा अभिनय चांगला होता, पण ते दुकान ईबाळासाठीच गहाण टाकावं लागलं होतं ना, ईबाबांनी काही दारू पिण्यात घालवलं नाही ते. ईआईने दाखवावं की काहीतरी करून, राधिकासारखं. असो. विसंला चांगली संधी होती बाळापासून सुटका करून घ्यायची, पण नाही, विनाशकाले विपरित बुद्धी. गाडीतही कसं खेचलं विसंला तिने, काही खरं नाही विसंचं, हाडं खिळखिळी होतील त्याची ईबाळ अशी खेचत राहिली तर.
ईबाळाला कधी शेजारचे आजोबा
ईबाळाला कधी शेजारचे आजोबा नाही दिसले. त्यांच्याशी कधी गप्पा मारल्यात, वेळ दिलेला नाही दिसला आणि आज त्यांच्या शेजारून केक घेउन गेली पण त्यांना दिला नाही. विस समोर मात्र बाता मारत होती.
आज भोकाड पसरल्यावर वाटले आता परत विसशी सगळे संबंध तोडण्याचा निर्णय घेते कि काय?
आज भोकाड पसरल्यावर वाटले आता
आज भोकाड पसरल्यावर वाटले आता परत विसशी सगळे संबंध तोडण्याचा निर्णय घेते कि काय?>>>>> हो घेते ना... प्रोमो मध्ये दाखवल.... किती चान्स देते आ हे ति विस ला..... पण तो वेडा झालाय....
विसं ने प्लॅस्टीक बंदी
विसं ने प्लॅस्टीक बंदी म्हणून नसेलही दिली पिशवी.... पण बेबीला तो खोका रिकामा असूनही भरलेला दाखविण्याची अॅक्टींग काही जमली नाही .....
"बाबा.....अहो.....!" असं म्हणत फक्त रडत राहिली.
ईशाच्या बाबान्ची अॅक्टिन्ग
ईशाच्या बाबान्ची अॅक्टिन्ग छान झाली. ईशाच्या आईच चुकलच, पण ईशाच्या बाबान्नी 'हे घर माझ आहे' वै वै बोलायला नको होत.
तो खोका जर रिकामा होता तर निमकरान्नी रात्री केकचा तु़कडा खाल्ला तो खोक्यात कसा काय आला?
प्रोमो मध्ये दाखवल.... किती चान्स देते आ हे ति विस ला..... पण तो वेडा झालाय.... >>>>> हो ना. विस तिला हात ओढून नेताना दाखवलाय पुढच्या भागात. विस इतका का डेस्परेट झालाय ईशाची लग्न करण्यासाठी तेच कळत नाही. आधी तो ईशापासून दुर दुर पळत होता. प्रेमापेक्षा त्याग श्रेष्ठ असतो अस तोच म्हणाला होता ना, मग आता काय झाल हयाला? ईशा जेव्हा लन्डनला जायला मिळणार नाही म्हणून हिरमुसली होती, तेव्हा हाच तिला म्हणाला होता का, " बाबान्ना तुझी काळजी वाटते. त्यान्चा नकार योग्यच आहे. त्यान्नी तुला मोठ करायला किती कष्ट घेतले. तेव्हा ते जे सान्गतात ते ऐकायच. " विसरला का सगळ?
ईआईने दाखवावं की काहीतरी करून, राधिकासारखं. >>>>>> तिच्या फराळाच्या बिझनेसच काय झाल? आणि ती कुठल्या तरी खानावळीत कामाला जायची ना?
विसच बेबीसाठी डेस्परेट होण
विसच बेबीसाठी डेस्परेट होण याला प्रेम म्हणायच की म्हातारचळ......
कालचा भाग नाही पाहिला,आजचा केबलवाले बघू देणार नाहीत.
पण आता फार काही फरक पडत नाही.
13 जानेवारीला लनाचा 2 तासाचा भाग दाखवणार आहेत.
बाप रे, कस वाटेल ते ,निमकर कन्यादान करताना बघायला किंवा कदाचित तेव्हा सुभाच केस काळे करेल,दाढी करेल,एकदम कडक दिसेल.म्हणजे मग वय पण 42 वरून 38वर येईल.
तिच्या फराळाच्या बिझनेसच काय
तिच्या फराळाच्या बिझनेसच काय झाल? आणि ती कुठल्या तरी खानावळीत कामाला जायची ना?>> ते दिवाळी पुरतेच. ते खानावळीचे काम ईबाळ नोकरी करते कि नाही त्यानुसार करते.
गाडीतही कसं खेचलं विसंला तिने
गाडीतही कसं खेचलं विसंला तिने, >>>खरंच खेचलं का???
हो घेते ना... प्रोमो मध्ये
हो घेते ना... प्रोमो मध्ये दाखवल.>>>> तेच तेच सुरु आहे. आता कंटाळा आला. शि तु आली कि इथे कळवा. मग बघेन.
तिच्या फराळाच्या बिझनेसच काय
तिच्या फराळाच्या बिझनेसच काय झाल? आणि ती कुठल्या तरी खानावळीत कामाला जायची ना? >>>>>>>>>>> हो पोळ्या लाटायला जात होती ना. परत काही दाखवलं नाही.
-आज विक्या असा फराफरा आला आणि
-आज विक्या असा फराफरा आला आणि तिला हाताला धरून घेऊन गेला....मला तर वाटलं चुकून रुपालीलाच नेतो की काय...अर्थात नेलं असतं तरी गाडीतून उतरल्यावरच समजलं असतं.
- ते देवीआईची वटी भर फारच काहीच्या काही दाखवतात.
- शुगरचा त्रास आहे तर सारखा वडापाव का देतात त्याला?
कारण त्याला फक्त थोडी साखर
कारण त्याला फक्त थोडी साखर आहे
विस ने तिला ओढत नेऊन काय केलं
विस ने तिला ओढत नेऊन काय केलं? तो टिपिकल हिंदी मुव्ही सिन होता .. ज्यात हिरो असा हात धरून कुठेतरी नेतो आणि काहीतरी दाखवतो.. ये देखो टाईप मध्ये.. इथे हा तिला कुठे लांब घेऊन गेला आणि नॉर्मल बोलला .. तिथेच बोलू शकत होता
विस ने तिला ओढत नेऊन काय केलं
Dpo
सुभा तो विस आहे हे बहुदा
सुभा तो विस आहे हे बहुदा विसरतो कारण दर दोन तीन भाग झाले की झेंडे त्याला म्हणतो, तो विक्रांत सरंजामे आहेस
नताशा : हाहा:
नताशा
प्रोमोमध्ये बेबीची आई विसला
प्रोमोमध्ये बेबीची आई विसला येउन सांगते की तुम्ही बेबीला घेऊन जा आणि लग्न करा.त्यावर विस म्हणतो की बाबांची परवानगी घेऊनच मी लग्न करणार.ही तर सरळ ddlj ची नक्कल आहे.
म्हणजे आता निमकर लग्नाचा मुहूर्त अगदी जवळ आलेला असताना बेबीचा हात पकडणार आणि काही सेकंद राहिले असताना म्हणणार"जा बाबू जा" आणि मग बेबी टणाटण उड्या मारत जाणार.
पण सध्या विस जे काही बेबी ,बेबी करत वागत आहे ते बघून अस वाटत की याला वाटत असेल की ती राजनंदिनी मेली ते बरच झाल.
U P लोल.
UP लोल.
तरी सरंजाम्यानं, त्याचा पुनर्विवाह आहे हे फादरला नाही सांगितलं अजून. ते समजल्यावर काय करतील?
1. जुनी दुष्मनी आहे. जालिंदर जिवावर उठलाय
2. शुगर आहे
3. दुसरं लग्न आहे
4. पहिल्या लग्नाचं काहीतरी गोलमाल आहे
5. वय जास्त आहे
कशी द्यावी मुलगी?
>>"जा बाबू जा" आणि मग बेबी
>>"जा बाबू जा" आणि मग बेबी टणाटण उड्या मारत जाणार>> हा हा
असो ... बेबीच्या भावनाशून्य अतिमंद खरखऱ्या अभिनयदारिद्र्यतेमुळे मालिका केव्हाच सोडलीये...
खरंय... तसही केड्याची इकडून तिकडून ढापाढापी चालूच असते... आणि ddlj तर केव्हा पासून त्याच्या डोक्यात घुसलाय...
सुभा तो विस आहे हे बहुदा
सुभा तो विस आहे हे बहुदा विसरतो>>> असंख्य movies करत असल्याचा परिणाम
>>>बेबीच्या भावनाशून्य अतिमंद
>>>बेबीच्या भावनाशून्य अतिमंद खरखऱ्या अभिनयदारिद्र्यतेमुळे मालिका केव्हाच सोडलीये...<<<
तिचे खरोखर डोळे खुपच भावनाशुन्य वाटतात.
तिचे खरोखर डोळे खुपच
तिचे खरोखर डोळे खुपच भावनाशुन्य वाटतात.>>.
हो, आणि ती नाकपुड्या फुगवून स्मितहास्य (?!) देण्याचा प्रयत्न करते तेव्हा अगदी 'उसका पती सिर्फ मेरा है' ची मेन व्हॅम्प वाटते..
ती इशा आणि कादिपची गौरी
ती इशा आणि कादिपची गौरी जवळजवळ सारख्याच आहेत अभिनयात.. आणि दिसण्यात. बुटक्या आणि चेहरा थंड.
नाही .... गौरी निदान दिसायला
नाही .... गौरी निदान दिसायला सुंदर होती!
त्या चाळीच्या खालचा रस्ता
त्या चाळीच्या खालचा रस्ता ईतका स्वच्छ आहे हे काही पटत नाही. विसं बिचारा सारखा गाडीचं दार उघडून देतो बेबीला. बेबी नुसती बसून राहते गाडीत, लहान मुलांना कसं सीटबेल्ट लावून ठेवतात आणि आईवडिलच तो सीटबेल्ट सोडवू शकतात. ईबाळ काय पत्र पाठवते आणि कसं पाठवते ते नाही बघितलं. आॅफिसची तर काही पडलेलीच नसते दोघांना, विसं फक्त गोळ्या घ्यायला आॅफिसात जातो. काल झेंडेने गोळ्या दि ल्या आणि जादूकी झप्पीपण दिली.
Pages