Submitted by वेडोबा on 24 November, 2018 - 03:48
तुला पाहते रे पहिल्या धाग्याच्या 2000 पोस्ट्स पूर्ण झाल्या, पुढची चर्चा इथे करूया.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
लोकहो, यूएस मधे "The IT
लोकहो, यूएस मधे "The IT Company" नावाची एक कंपनी आहे असे निष्पन्न झाले आहे. तो पहिला मुलगा गेले चार वर्षे तेथे काम करतोय म्हणजे नक्कीच असणार. आणि चार वर्षात तेथे स्थायिक होणार हे इतक्या ठामपणे म्हणतोय म्हणजे ट्रम्पतात्यांनी त्याच्याकरता एक वेगळी ग्रीनकार्ड कॅटेगरी तयार केली असावी.
७० च्या दशकातील बघण्याचा कार्यक्रम होता बहुधा प्रत्येक. कारण "तुम्ही दोघे गप्पा मारा. आम्ही जरा बाहेर चक्कर मारतो" वगैरे प्रकार नव्हते. एकतर आधी नाव, प्राथमिक माहिती वगैरे काही न देता पोतडीतून काढल्यासारखी एकेक मुले आली. मग एक हुंडा मागतोय, तर दुसरा आईवडलांना वृद्धाश्रमात पाठवतोय, तर तिसरा घरी कामाला बायको आणतोय. आणि पाच फुटांवर बसून हे पुलंच्या रावसाहेबांसारखे "साधी कुजबुज फर्लांगभर ऐकू जाईल" इतक्या आवाजात मुलांवर टिप्पणी करत आहेत. टोटल कॉमेडी शो.
ते परांजपे मधेच एकदम बाप आणि मुलीचे नाते वगैरे म्हणून नुकतीच वाचलेली एखादी व्हॉअॅ पोस्ट म्हणून दाखवातायत की काय शंका आली. पण तेवढयात त्यांनी राज बब्बर मोड मधे जाउन "ना उम्र की सीमा हो, ना जन्म का हो बंधन, जब प्यार करे कोई तो देखे केवल मन" सुरू केले.
एफएमने तीन कॉफी आणू का विचारल्यावर "चार आण" म्हणून त्याला सांगणे, आणि त्याने आणल्यावर "तूही बस" म्हणून त्यालाही घ्यायला लावणे अशी काहीतरी त्या विक्याला "पर्सनॅलिटी" देण्याचा सीन घालू शकले असते. पण ज्या वेगाने रतीब घालावा लागतो त्यात हे सुचत नसेल. त्यामुळेच आयटी कंपनीचे नावही इतर अनेक गोष्टींप्रमाणे ढोबळच राहात असेल.
त्याआधी सीनियर व्हीपी बालवाडी शो झाला. "आम्हाला न बोलावताच मीटिंग ठरवली सरांनी एफएम वगैरे बरोबर" हे सर्व उपस्थित ज्युनियर कर्मचार्यांसमोर व्हीपी लोक ओरडत आहेत. कॉफी विचारायला आत गेलेला एफएम मीटिंग मधे बसलाय हे ही यांना तेथे बाहेर - आणि बहुधा वेगळ्या मजल्यावर- उभे राहून कळाले.
फार एंड...
फार एंड...
......... किती पर्फेक्ट रेफरंसेस आठवतात तुम्हाला!
बळंच त्या मॅडम व परांजपे यांच्या मुलींची लग्नं वगैरे संवाद घातेलेले.
राज बब्बर मोड!!
आणि त्या वधूवर सूचक वालीला माहिती नाही का की ही सुभाच्याच कंपनीत काम करत्येय ते? तेच तर पेप्रात आलेलं म्हणून इतकी 'स्थळं' आली तिला सांगून!
फारएण्ड........राज बब्बर
फारएण्ड........राज बब्बर रेरन्स आवडला.
पण निमकर नी नाव नोंदवताना फॉर्म मध्ये अपेक्क्षा चा कॉलम असतो,वयाचाही ऑप्शन असतो.मी तरी असे फॉर्मस पाहिले आहेत.
मग निमकरांनी नक्कीच मला बाळासाठी 40शीचा खरतर 46चा मुलगा पाहिजे अस लिहिल नसणार
मग ही मंद बाई विसला घेऊन आलीच कशी?आणि हिला विस मुलगा वाटला का?
अरे किती उल्लू बनवणार प्रेक्षकांना.
विक्यानं इशाच्या भवीष्यकालीन
विक्यानं इशाच्या भविष्यकालीन आर्थिक सुरक्षिततेसाठी इन्शुरन्स पाॅलिसी दाखवली.
सुपर बिग लोल.
आणि जराश्शी शुगर म्हणजे काय रे भाऊ?
निमकरांच्या घरात शिरलं की दरवाज्याच्या डाव्या हाताच्या भिंतीला खिडकी आहे तशीच अजून एक खिडकी उजवीकडे बिथरुमच्या बाहेर डाव्या हाताला पण दिसली. ती काही वेळा दिसते तर काही वेळेस ती नसते..
तो ईएमआय भरावे लागतील
तो ईएमआय भरावे लागतील म्हणणारा मुलगा का नाही आवडला, विसंशी लग्न नाही केलं तर विसं काढून टाकणार आणि मग दहा हजाराची नोकरीही कोणी ईला देणार नाही हे ईबाबांना माहित आहे. स्थळं ठीक होती पण ही भाषा कुणी वापरत नाही, वृद्धधाश्रम, हुंडा वगैरे. निमकरांनी फक्त पाणी दिले वाटतं सगळ्या स्थळांना, नाहीतर एका दिवशी चार स्थळं शक्यच नव्हती. चहा पोहे फक्त सुभासाठी, तेही तो नाही म्हणणार याची खात्री. निमकरांना मुलीसाठी सगळं तयार पाहिजे आणि अशी स्थळं वयस्करच मिळणार, काका कॅटॅगरी, असा जोक व्हाॅट्सपवरपण फिरतोय.
यूएस मधे "The IT Company"
यूएस मधे "The IT Company" नावाची एक कंपनी आहे असे निष्पन्न झाले आहे. >> ह्यात विशेष ते काय?
"हाॅटेल" नावाच्या हाॅटेलात जातात, "पिक्चर" नावाचा पिक्चर पहातात तसंच आहे ते.
FM चं लग्न झालंय हे नव्हतं माहीत. वाटलं आता काही वेगळा प्रस्ताव येतोय की काय?
विक्याची कंपनी खरंच मायरा चालवत असावी. बाजीगर स्टाईल काहीतरी उलथापालथ करावी तिनं अन भेंडेनं, मजा येईल.
पण विसने हे सांगितल आहे का
पण विसने हे सांगितल आहे का निमकरांना की तुमची ही ब्याद माझ पहिल प्रेम नाही म्हणून.तुम्ही ज्या साड्या लोकांना नेसवून दाखवता ती राजनंदिनी साडी म्हणजे माझ्या बायकोच नाव आहे.ती माझ पहिल प्रेम आहे.
आता ह्यात सस्पेन्स नको.विसने सांगाव खर.
विसने एफएमला, परान्ज्पेना आणि
विसने एफएमला, परान्ज्पेना आणि वाडकर मॅडमना बोलावल, मला वाटल आता तो त्यान्ना तोतया मुलाचे आई- वडील आणि मुलगा बनून ईशाच्या घरी जायला सान्गतो की काय. पण ईशाचे बाबा त्यान्ना ओऴखतात त्यामुळे ते शक्यच नव्हत म्हणा. हा, वेषान्तर करुन आले असते तर गोष्ट वेगळी होती.
आरशासमोर ईशा 'सगळ सम्पल आता' एक्सप्रेशन्स देत होती 'हेलिकॉप्टर प्रपोझल' आठवून , त्यात तिचे एक्सप्रेशन्स जरा परफेक्ट होते.
ती बघायला आलेली मुले सुद्दा तिच्यापेक्षा मोठीच होती जरा.
तो यू-एस वाला मुलगा ईशाकडे बघून लाजत काय होता, मला त्याच्यात 'गडबड' वाटली.
तो ईएमआय भरावे लागतील म्हणणारा मुलगा का नाही आवडला, >>>>>> हो ना. खर तर त्याच उत्तर पटण्यासारख होत. आजच्या काळात जर नवरा- बायको दोघान्नी नोकरी केली तरच लोन फेडणार ना.
एक मुलगा तर टिल्लूच्या घराण्यातून आलेला, बिझनेससाठी भान्डवल हवय म्हणे.
ईशाच्या बाबान्ना वाटलेल की लवकरात लवकर मुले बघायला घेतली तर ईशाच लग्न लवकर लावून देता येईल, आणि विसचा तिच्यापाठी लागलेला पिच्छाही सुटेल लवकर. म्हणूनच मुद्दामहून एकाच दिवशी पाच मुलान्ना बोलावल. ईशा आपल्याला जास्त विरोध करणार नाही/ करु शकणार नाही, हे त्यान्ना माहीत होत. ईशाचे बाबा योग्य वागतायत.
ईशाच्या आईचा विसला होकारच असेल हे गृहीतच धरलय म्हणा. आयता राजयोग आलाय, तो कोण सोडेल म्हणा.
इन्शुरन्स क्लेम केला तरच
इन्शुरन्स क्लेम केला तरच राजयोग असेल अन्यथा साॅन्या जयदीप वगैरेच्या राज्यात इशाबेबीचं काही खरं नाय.
तो ईएमआय भरावे लागतील
तो ईएमआय भरावे लागतील म्हणणारा मुलगा का नाही आवडला, >>>>>> हो ना. खर तर त्याच उत्तर पटण्यासारख होत. आजच्या काळात जर नवरा- बायको दोघान्नी नोकरी केली तरच लोन फेडणार ना.>>>> हो पण मग इपालकांचे कर्ज कोण फेडणार?
)
दुकान गहाण टाकले आहे, आता मालकाचे नुकसान पण यांनाच भरायचे आहे(त्या मालकाचे पुढे काय झाले काय माहित?), ईमातेला पुढल्या वर्षी लंडलानला पण जायचे आहे, ईबाळासाठी ते ती ५ वर्षाची होती तेव्हापासून रानं साडीसाठी पैसे साठवत आहेत. (५०% सुट होती तेव्हाच घेऊन टाकायला हवी होती
निमकर त्या दुकानाचे परत मालक
निमकर त्या दुकानाचे परत मालक होतात असं दाखवलं होतं ना मध्ये, तो झेंडे त्या मालकाला धमकावतो वगैरे. आजचा भाग तर विसं कसा चांगला आहे हे दाखवायलाच होता, महापकाऊ. ते सगळे लोक मुळात म्हातारे वाटतच नव्हते आणि किती ते ओढून ताणून कृृत्रिम संवाद. ईशा आणि विसं एकाच वयाचे असल्यासारखे चिडवत होती ती बया, म्हणजे असा संशय तरी कसा येऊ शकतो, कुणी मुद्दाम सांगितल्याशिवाय कळेल का की हे एकमेकांना बघताहेत (seeing each other)
साडी मागे घेतली होती ना टिल्लूशी ठरलं तेव्हा.
निमकर त्या दुकानाचे परत मालक
निमकर त्या दुकानाचे परत मालक होतात असं दाखवलं होतं ना मध्ये, >>> हो तसेच काहीतरी होते. लक्षात नाही. बहुधा तेव्हा फक्त ते टिल्लूला विकण्यापासून रोखतो.
तो ईएमआय भरावे लागतील म्हणणारा मुलगा का नाही आवडला >>> हा प्रश्न मलाही पडला होता. त्यात काहीच चूक नव्हते.
पण निमकर नी नाव नोंदवताना फॉर्म मध्ये अपेक्क्षा चा कॉलम असतो,वयाचाही ऑप्शन असतो.मी तरी असे फॉर्मस पाहिले आहेत. >>> लोल हो हा बरोब्बर कॅच आहे. वयाच्या रेंजबद्दल माहिती असतेच.
पण या सिरीज मधे सगळेच पोतडीतून आल्यासारखे येते. साडी विभागाची नवीन हेड बोर्ड मधल्या लोकांना सांगायची असो, नाहीतर लग्नाचे प्रस्ताव असोत.
"हाॅटेल" नावाच्या हाॅटेलात जातात, "पिक्चर" नावाचा पिक्चर पहातात तसंच आहे ते. >>>
टोटली. हेच वाटले होते मला.
FM चं लग्न झालंय हे नव्हतं माहीत. वाटलं आता काही वेगळा प्रस्ताव येतोय की काय? >>> घरौंदा ची स्टोरी रिव्हर्स अर्थाने? वय व श्रीमंती दोन्ही पॅरॅमीटर्स वर?
घरौंदा ची स्टोरी रिव्हर्स
घरौंदा ची स्टोरी रिव्हर्स अर्थाने? वय व श्रीमंती दोन्ही पॅरॅमीटर्स>>बरोब्बर:)
(No subject)
लोल. ते गात नाहीत. नाहीतर
लोल. ते गात नाहीत. नाहीतर "चाळगंधर्व" म्हंटले असते. मेरे लडकी शादी है बाबू असे कोणत्यातरी रागात ताना मारत म्हंटले असते.
चाळगंर्धव...भारीच हा फारएण्ड
चाळगंर्धव...भारीच हा फारएण्ड ....हा.. हा..
ते गात नाहीत. नाहीतर
ते गात नाहीत. नाहीतर "चाळगंधर्व" म्हंटले असते. >> हे भारीये.
बरं, भडाभडा बोलतही नाहीत, नाहीतर वाचाळगंधर्व म्हटले असते
ईपालक तोंड झाकून
वाचाळगंधर्व >>
ईपालक तोंड झाकून वृद्धाश्रमातील ख्रिसमस डोकावून पाहतात तो सीन जाम कॉमेडी होता. रिवाजाप्रमाणे ते कोणालाही दिसत नाहीत. विक्रांत आणि ईशालाही.
बाकी एपिसोड मात्र पाणी घालून दाखवला आज. नुसतेच फिलर सीन्स.
नुसता वीस चा उदो उदो, जाम
नुसता वीस चा उदो उदो, जाम येडेपणा...... निमकरांकडे टॅक्सीने पाठलाग करायला पैसे आहेत वाटतं!!
हो ना....विक्रांत किती
हो ना....विक्रांत किती चांगला ते दाखवायला....आणि त्या वृद्धाश्रमातील बायका अजिबातच दीन, गरीब, थकलेल्या - आजारी - दु:खी वगैरे वाटत नव्हत्या..चांगल्या फ्रेश जणू काही सोसायटीच्या क्लब- गेट टुगेदर मधे आल्या सारख्या!!

आणि शेवटी ईशाला केक भरवितांना किती ते बॅकग्राऊंड म्युझिका आणि किती ते लाजणं..जणू काही लग्नातला घासच भरवतोय...!!
केड्या स्वतःच्याच सीन्स च्या आणि स्टोरीच्या प्रेमात आहे! दुसरं कुणी काहीही म्हणो!
विक्या अन् बेबी एकटे असताना
विक्या अन् बेबी एकटे असताना दोन वेगळ्या प्रतलात असल्यासारखे कोरडेपणानं वागतात आणि लोकांसमोर असताना डोळ्यात डोळे घालून बघणे वगैरे चालतं. काल कारमधून येताना किती लांब लांब बसले होते. पाणीपुरीच्या दिवशी पण पा.पु झाली की लगेच बाय. मलाच बरं नाही वाटलं. हे म्हणजे काचेच्या दाराच्या पिपहोलमधून बघण्यासारखं झालं.
विक्या अन् बेबी एकटे असताना
विक्या अन् बेबी एकटे असताना दोन वेगळ्या प्रतलात असल्यासारखे कोरडेपणानं वागतात आणि लोकांसमोर असताना डोळ्यात डोळे घालून बघणे वगैरे चालतं.>>>>
बेबी......मस्त वाटत.विक्या
बेबी......मस्त वाटत.विक्या आणि बेबी.
कालचा भाग पाहिलाच नाही.पण इथल वाचून आता पाहणारच नाही.
शितुने सायोनारा नाहघ ना केल मालिकेला.
मेधावि....तो कोरडेपणा कदाचित अशामुळे असेल की आधी विक्या लाजराबुजरा होता,बेबीवर(मला जाम आवडला हा शब्द) प्रेम दाखवायच नव्हत,मग व्यक्त करायच नव्हय,पण डोळ्यातून दाखवताना ते वडलांच प्रेम वाटत होत.चालून गेल.
पण आता आली ना पंचाईत,लटकला ना भाऊ.आता खरच प्रेम करायच या निमकरांच्या आगाऊ कार्टीवर,मग विक्याची म्हणजे सुभाची लागली वाट,म्हणून तो कोरडेपणा जाणवत असावा,अहो पण अशा वेळी फारएण्डच्या म्हणण्याप्रमाणे बेबी"हित नको तिथ जाऊ"या मूडमध्ये असते मग तरी कोरडेपणा?
मग लग्नानंतर काय,तू तेरे कमरे मे और मै नंदू के अस सांगणार की काय विक्या.
काल बेबीने केकचा घास भरवताना
काल बेबीने केकचा घास भरवताना छोटा तुकडा घेतला होता आणि हात तोंडपर्यंत गेला आणि पुढच्या सेकंदाला केकचा मोठा तुकडा आला. प्रेक्षकांना येड समजलय ,, काहीही दाखवा बघतात
ईशा आणि विसं एकाच वयाचे
ईशा आणि विसं एकाच वयाचे असल्यासारखे चिडवत होती ती बया, म्हणजे असा संशय तरी कसा येऊ शकतो >>>>>+++++++ अगदी अगदी. आणि ती बाई एवढी धडधाकट, सुशिक्षित, मॉर्डन दिसत होती, तिला साधा 'फिजीओथेरपिस्ट' सारखा शब्द म्हणता येऊ नये?
ते ' तुझे लाजणे अशावेळी बरोबर नाही' कविता आधी कुठेतरी ऐकल्यासारखी वाटते.
निमकरांकडे टॅक्सीने पाठलाग करायला पैसे आहेत वाटतं >>>>>>>> ते रिक्षाने गेले. टॅक्सीने नाही. विसने नेहमीच्या फाईव्ह स्टारकडे कार वळवण्याऐवजी भलतीकडे वळवलेली पाहून निमकरान्ना विस आपली मुलगी पळवून नेतो की काय अस झाल होत.
सुभा मात्र सुमार सीन्समध्ये सुद्दा किलरच वाटतो. आज तो थोडा बारीक वाटला मला.
लग्नानंतर काय,तू तेरे कमरे मे और मै नंदू >>>>>>
ते ' तुझे लाजणे अशावेळी बरोबर
ते ' तुझे लाजणे अशावेळी बरोबर नाही' कविता आधी कुठेतरी ऐकल्यासारखी वाटते. >>> ते बहुतेक मंद मानसीला संकर्षण कर्हाडेनी म्हणले होते.
मालीकेच नाव आठवत नाही. त्यात पण एक विक्रम आणि मायरा होती.
ते बहुतेक मंद मानसीला संकर्षण
ते बहुतेक मंद मानसीला संकर्षण कर्हाडेनी म्हणले होते.
मालीकेच नाव आठवत नाही. त्यात पण एक विक्रम आणि मायरा होती. >>>>>> खुलता कळी खुलेना. विक्रम नाही, विक्रान्त. ती कविता संकर्षण कर्हाडेनी लिहिली आहे का?
ती कविता संकर्षण कर्हाडेनी
ती कविता संकर्षण कर्हाडेनी लिहिली आहे का?>>>
नाही..सुरेश भट.
मंडळी माझं अभिनंदन करा...
मंडळी माझं अभिनंदन करा...
तो ईबाबा वाढदिवसाचा सिन बघून माझ्या मातोश्री इतक्या वैतागल्या की त्यांनी झी मराठीच ड्रॉप केलंय पॅकेज मधून... मी विचारल्यावर रागारागाने संपूर्ण सिन वर्णन केला.
आता साडेसहा ते ९ खूप शांतता असते राव!!!
सुभा मात्र सुमार सीन्समध्ये
सुभा मात्र सुमार सीन्समध्ये सुद्दा किलरच वाटतो. >>>>>>>+++++11111111
Pages