काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातल्या एक प्रसिद्ध शहरात आलेला अनुभव लिहित आहे. जसा घडला तसाच लिहित आहे.
लांडगापूरात (शहराचे नाव बदलले आहे) सकाळी आलो. काही कामे होती. काही व्यक्तींच्या भेटी घ्यायच्या होत्या. दिवसभर थांबून संध्याकाळी परतायचे होते. म्हणून लॉज बुक करायचा होता. बसस्थानकाच्या आसपास एक दोन लॉज पाहिले. आधी गुगलवर पण आसपास कुठे लॉज आहेत ते पाहून आलो होतो. त्यावरून जी कल्पना केली होती, प्रत्यक्षात मात्र भलतेच चित्र होते. इतकी शहरे फिरलोय. गुगलबाबत शक्यतो असे होत नाही. पण या शहरात उतरल्यापासूनच बहुतेक धक्कादायक अनुभव यायचे होते. शेवटी गुगलचा नाद सोडून आसपास जो लॉज दिसेल तिथे जाऊन चौकशी करायचे ठरवले. बस स्थानकातून बाहेर आल्यावर डाव्या बाजूला थोड्या दूर अंतरावर असलेल्या चौक आणि रस्त्याला लागून काही लॉज दिसत होते. तिकडे जाऊन एकएक लॉजवर चौकशी सुरु केली. बहुतेक लॉज सुनसान होते. दुरुस्तीची/साफसफाईची कामे काढलेली. कोण इथे येतंय कि नाही असे वाटावे असे गूढ वातावरण. ज्याला रेस्टॉरंट आहे असा लॉज पाहत होतो. काही ठिकाणी रूम्स फारच कोंदट अवस्थेत. तर काही ठिकाणी रूम्स चांगल्या पण रेस्टॉरंट नाही अशी तऱ्हा. मला सगळे बोअर वाटत होते.
एकेक लॉज बघता बघता एक लॉज दिसला ज्याला खाली रेस्टॉरंट होते. गर्दी होती. सर्व माझ्या अपेक्षेप्रमाणे होते. रेस्टॉरंटमधल्या कौंटरवर चौकशी केली. तेंव्हा रूम बुकिंग साठी त्याने आतल्या बाजूला जायचा इशारा केला. आत गेलो तर तिथे थोड्या कोंदट अंधाऱ्या जागेत एक काउंटर दिसला. काउंटरवरचा माणूस तिथेच बाजूला डबा उघडून जेवत बसला होता. मला पाहून त्याने कपाळावर आठ्या घालून "काय पाहिजे" अशा अर्थाने मान उडवली. मी "डबलबेड रूम आहे का? रेट काय आहे?" असे विचारताच त्याने ओरडून वेटरला बोलवून घेतले. त्याला मला रूम दाखवायला सांगितले. वेटर मला लिफ्टमधून वरती घेऊन गेला. वरती गेल्यावर पुन्हा तेच. गूढ वातावरण. कामे काढलेली. वेटरला विचारले, "या रूम्स सगळ्या रिकाम्या आहेत का? कोणी राहते कि नाही इथे?" तर तो म्हणाला "सगळ्या फुल्ल आहेत. एक दोनच रिकाम्या आहेत". त्यातली एक पसंत करून खाली आलो. काउंटरवरच्या व्यक्तीचे जेवण झाले होते. रूम नंबर सांगताच त्याने रजिस्टर उघडून मला तिथे रूम बुक करत असल्याची नोंद करायला सांगितले. तिथे सगळा तपशील लिहिल्यावर त्याने माझे आयडी कार्ड स्कॅन करून मला परत दिले. नंतर काउंटरवरच्या मदतनीसाने रूमचे भाडे भरण्यासाठी म्हणून माझे क्रेडीट कार्ड घेतले.
"तुमच्याबरोबर कोण आहेत? त्यांचे पण आयडी प्रुफ दाखवा" काउंटरवरचा तो मनुष्य मला म्हणाला. मी चक्रावलो. माझे आयडी प्रुफ दाखवल्यावर अजून बरोबरच्या व्यक्तीचे आयडी प्रुफ सुद्धा कशाला हवे? हा आगाऊपणा आहे असे मला वाटले. कारण मागे एकदा मित्राबरोबर याच शहरात थांबलो होतो, तेंव्हा हॉटेलमध्ये आमच्यापैकी एकाचेच आयडी कार्ड बघितले होते.
"नाही. त्यांचे कोणतेही आयडी कार्ड आणलेले नाही" मी निर्विकारपणे सांगितले
"असे कसे? काही न काही आयडी बरोबर आणले असेलच की" तो उद्दामपणे बोलला
"नाही. काहीच आणलेले नाही" मी ठाम
"कोण कोण आणि कितीजण आहात तुम्ही?"
"मी आणि माझी बायको"
"कुठे आहेत त्या?"
"शॉपिंगसाठी गेलीय नातेवाईकांबरोबर. येईलच इतक्यात इथे. कदाचित आम्हाला रूम लागणार पण नाही. लंच साठी रेस्टॉरंट मात्र लागेल. पण जर विश्रांतीसाठी किंवा फ्रेश होण्याची गरज वाटलीच तर असावी म्हणून रूम बुक करून ठेवत आहे"
"ठीक आहे. मग त्या आल्यावर तुमच्या फोनवर त्यांचा फोटो काढून मला पाठवा" असे म्हणून आपल्या मदतनीसाला त्याने माझे क्रेडीट कार्ड स्वाईप करायला सांगितले.
मी पट्कन हो बोलून गेलो. पण पुढच्याच क्षणी मला वाटले हा जरा जास्तीच आगाऊपणा सुरु आहे. तिचा फोटो काढून मी ह्याला कशाला पाठवायचा? भलतेच काहीतरी वाटू लागले.
"एक मिनिट थांबा. मला इथे रूम बुक करायची नाही" मी चढ्या आवाजात बोललो आणि त्या मदतनीसाच्या हातून क्रेडीट कार्ड जवळजवळ हिसकावूनच घेतले. सुदैवाने ते अद्याप त्याने स्वाईप केले नव्हते.
कार्ड घेऊन मी निघून जाऊ लागलो. तसा काउंटरवरचा मनुष्य बाहेर आला.
"ओ साहेब. तुम्ही रूम बुक केली आहे. आता तुम्ही असे जाऊ शकत नाही. कॅन्सल करायचे पाचशे रुपये भरा" असे म्हणून तो मला आडवा आला. त्याने माझा हात पकडायचा प्रयत्न केला. मी अवाक् झालो. कारण काहीही कारण नसताना तो सरळसरळ गुंडगिरीवर उतरला होता.
"हातघाई वर येण्याची काही गरज नाही. मी पैसे दिले नाहीत. मी रूम बुक केलेली नाही. कॅन्सल करायचे पैसे भरण्याचा प्रश्न येत नाही" मी बाहेर येत बोललो.
"अहो तुम्ही रूम बघून आलात. रजिस्टरमध्ये बुक केल्याची नोंद पण केलीय तुम्ही. आता मालक माझ्याकडून पैसे घेतील त्याचे काय?"
"तो तुमचा प्रश्न आहे. मी पैसे दिलेले नाहीत. माझ्या दृष्टीने रूम बुक झालेली नाही. रजिस्टरमधली एन्ट्री खोडून टाका. प्रश्न मिटला" असे बोलून मी बाहेर रेस्टॉरंट जवळच्या काउंटरपाशी आलो. इथे ग्राहकांची बरीच गर्दी होती.
"अहो तुम्ही आधी आत येऊन रजिस्टरमध्ये बुकिंग कॅन्सल करायची सही करा आणि फोनवर मालकांशी बोला. मगच जा" तो गुंड आतून ओरडू लागला.
मला लक्षात आले. हा काहीतरी वेगळा प्रकार आहे. एव्हाना बाहेरच्या काउंटरवरचा मनुष्य (हा सुद्धा पोरसवदाच पण गुंड छापच होता) आतल्या गोंधळाने सावध झाला होता. याच्याबरोबर अजून एकदोघे होते.
"काय झाले?" त्याने विचारले.
"हे बघा मी रूम बुक केलेली नाही. मला करायचीही नाही. तरीही हा तुमचा माणूस जबरदस्तीने पैसे मागत आहे" मी सांगितले.
"अहो ह्यांनी रूम बघितली. रजिस्टरमध्ये एन्ट्री पण केली. बरोबर बायको आहे म्हणून सांगतात. पण त्यांचा आयडी मागितला तर थातूरमातूर कारणे सांगू लागलेत. निदान त्या आल्या कि त्यांचा फोटो तरी काढून पाठवा म्हणून सांगितले तर आता घाबरून पळून जात आहेत. हे लफडी करतात पण नंतर आमच्या डोक्याला त्रास होतो. आता रजिस्टरमध्ये एन्ट्री बघून मालक माझ्याकडून पैसे घेतील त्याचे काय? त्यांना मालकाशी तरी बोलायला सांगा" आतला गुंड आरडाओरडा करत बोलू लागला.
त्यावर चेहऱ्यावर छद्मी हास्य आणून बाहेरच्या काउंटरवरचा गुंड मला 'शहाणपणाचा' सल्ला देऊ लागला, "अहो घाबरू नका. मारणार नाही तुम्हाला तो. त्याच्याकडून मालक पैसे घेतील म्हणून तो बोलत आहे बाकी काही नाही. तुम्ही आत जा आणि मालकांशी फोनवर बोला. नाहीतर सरळ पाचशे रुपये देऊन जा"
"मारायचा काय संबंध? त्याच्या बापाचे खाल्लेले नाही. आणि आत जाण्याची काय गरज आहे? रजिस्टर इथे आणून द्या. मी एन्ट्री खोडून सही करतो. फोन सुद्धा इथे आणून द्या मी मालकांशी बोलतो" मी निग्रहाने पण आवाज चढवूनच बोललो.
"अहो हे हॉटेल आहे. इथे सगळे कस्टमर येत आहेत त्यांच्यासमोर आरडाओरडा कशाला करता? तुम्ही आत जा आणि काय ते सेटल करा. तो काय तुम्हाला मारत नाही. काळजी करू नका" इति बाहेरच्या काउंटरवरचा गुंड.
"हे बघा मी अनेक शहरे फिरलो आहे. पण इतकी अव्यावसायिक वृत्ती बघितली नव्हती. तुमच्या माणसाने माझ्या अंगाला हात लावला आहे मघाशी. तुमचे हॉटेल माझ्या कुटुंबासाठी सुरक्षित असेल असे वाटत नाही म्हणून मी निघून जात आहे" मी म्हणालो
"अहो हे भानगड करणारे वाटत आहेत. तुम्ही सरळ पोलिसांना बोलवा" आतल्या गुंडाने बाहेरच्या गुंडाला इशारा केला. त्याला वाटले पोलिसांना घाबरून मी आत यायला तयार होऊन 'सेटलमेंट' करेन.
"ठीक आहे. बोलवा पोलिसांना. बघूयाच माझा काय गुन्हा आहे" आता मी सुद्धा इरेला पडलो.
मला प्रकार लक्षात आला. मी कोणत्यातरी बाईला लॉजवर बोलवून घेत आहे जिचे माझ्याशी लग्न झालेले नाही, अशी त्या सर्वांनी आपली ठाम समजूत करून घेतली होती. आणि त्यावरून ब्लॅकमेल करून माझ्याकडून पैसे उकळण्यासाठी सगळे नाटक सुरु होते. मी स्थानिक नाही. बाहेरगावाहून आलोय याचा सुद्धा त्यांना अंदाज आला होता. त्यामुळे आत बोलवून मी मुकाट्याने पैसे दिले नसते तर मला पोलिसांची धमकी देऊन वा प्रसंगी मारहाण करण्यापर्यंत सुद्धा यांची मजल गेली असती. अन्यथा मालकाशी फोनवर बोलण्यासाठी मला आत बोलवण्याची काय गरज?
संस्कृती रक्षणचा ठेका घेतलेल्या एखाद्या सेनेचे हे पाळीव गुंड असावेत अशी माझी ठाम समजूत झाली होती. वेळ पडली असती तर फोन करून अजून चार जणांना त्यांनी बोलवून घेतले असते. या शहरात कामधंदे नसलेल्या तरुणांचे प्रमाण लक्षणीय आहे. वयात आलेल्या पोरांना तिकडे हेच उद्योग असतात. कोणाचे अफेअर आहे असा संशय जरी आला तरी यांचे नाक खुपसणे सुरु होते. माझ्या बरोबर येणाऱ्या महिलेच्या (मग ती माझी बायको असो अगर नसो) आयडी प्रुफशी त्यांना काही देणेघेणे असण्याचे नाही कारण नव्हते. माझे आयडी प्रुफ पुरेसे होते. माझा गुन्हा काय तर डबलबेड रूम बुक करू पाहत होतो आणि बरोबर जी स्त्री 'येणार होती' तिचा कोणताही आयडी पुरावा देण्याची माझी तयारी नव्हती. म्हणून त्यांच्यासाठी मी 'सावज' होतो.
मी सुद्धा पोलिसांना बोलवायची भाषा केल्यावर मग मात्र ते थोडे नरमले. मग काही न बोलता थोड्या वेळाने अत्यंत उद्विग्न मनाने मी तिथून बाहेर पडलो. काहीही कारण नसताना अत्यंत मनस्ताप झाला होता. या सगळ्यात माझी काय चूक होती तेच कळत नव्हते. बायकांना हॉटेलमध्ये आणून गुन्हे करण्याचे प्रकार घडतात हे मलाही माहित होते. पण माझे आयडी प्रुफ मी त्यांना दिलेच होते. 'तिच्या' फोटोची काय गरज? आमच्यात काय संबंध आहेत यांना कशाला हवे? आमचा विवाह झाला असेल अगर नसेल. यांना काय करायचे? तसेही विवाहबाह्य संबंध हा आता गुन्हा नाही. त्यामुळे अशा केसमध्ये जरी नंतर काही पोलीस चौकशी वगैरे झालीच तरी यांच्यावर काहीही बालंट येण्याचे कारण नाही. पण या शहरातले लोक अव्यावसायिक वृत्तीकरिता आणि दुसऱ्यांच्या व्यक्तिगत गोष्टीत नाक खूपसण्याकरता पूर्वीपासून प्रसिद्ध आहेत. अन्यथा "आमच्या हॉटेलच्या नियमात तुम्ही बसत नाही. तुम्हाला इथे बुकिंग मिळणार नाही" एवढ्यावरच हा विषय संपला असता.
४९७ वे कलम कोर्टाने रद्द केलेय खरे. पण "विबासं असल्याचा संशयित" सुद्धा काही लोकांच्या दृष्टीने (तिऱ्हाईत असला तरी) गुन्हेगार ठरतो आणि ते त्याला त्रास देतात. या विचाराने दिवसभर डोके भणभणत राहिले.
बाकी, मायबोलीकर आपापली मते मांडायला मुक्त आहेत.
ता.क. : विषयाशी संबंधित जितके घडले आणि जसे घडले तितके सगळे सांगितले आहे. कोणाशीतरी बोलून मन मोकळे करणे हा सुद्धा एक उद्देश यामागे आहे. बाकी "ती स्त्री खरंच तुमची पत्नी होती का? तुम्हाला दुसरीकडे रूम मिळाली का? शहराचे नाव बदलून सांगायची काय गरज होती?" ह्या व अशासारख्या प्रश्नांना मी उत्तरे देणार नाही.
हाब, टू बी ऑन सेफर साईड
हाब, टू बी ऑन सेफर साईड म्हणून कोणी आयडी बघायला मागत असेल, त्याचा नंतर दुरुपयोग करणार नसेल तर कोणालाही आयडी दाखवायला माझी हरकत नाही.
धाग्यात अनेक लोक जे सांगतायत, 'अमुक होईल' म्हणतायत ती भारतातली वस्तुस्थिती आहे.इतर देशांचे माहिती नाही पण बीबीसी वर नातेवाईक आहेत असे दाखवून चाईल्ड ट्रॅफिकिंग करणारे एअरपोर्ट वर कसे ओळखावे याबद्दल बरेच लेख होते.सर्वेलन्स हा कितीही इन्सलटिंग वाटला, त्याने गुन्हे थांबणार नाहीत असे वाटले तरी तो सिस्टम चा भाग आहे.
रिक्षावाले 'यु टर्न लेनेको कंटाळा आया' म्हणून भाडी नाकारतात तिथे त्यांनी आयडी प्रूफ वरून भाडी कधी नाकारली तर तो इतर कारणांच्या मानाने फारच सौम्य आणि डीग्नीटी, रिस्पेक्ट वाला प्रकार ठरेल ☺️☺️☺️
अमेरिकेचा विषय नाही भारतातला
अमेरिकेचा विषय नाही भारतातला चाललाय. >> हो हो! मग अमेरिकेत हॉटेल बुकिंग कसे वेगळे आणि भारतात कसे वेगळे ते ही सांगा पाहू.
नाही बुवा, मी तर हसत होतो.. वरतीच लिहिलं आहे.
ओके, मी मिस केलं मग ते उदाहरण
ओके, मी मिस केलं मग ते उदाहरण.
चर्चाप्रस्तावात तसा कुठला उल्लेख नाही, हॉटेलात राहणार्या सर्वांचे आयडीज 'हल्ली' (म्हणजे कधीपासून ते कळलं नाही) महाराष्ट्रात काही ठिकाणी (बहुधा अजूनही सगळीकडे नाही) लागतात, ते घ्यावेत अशा पोलिसांच्याच सूचना (कायदा केला आहे का हे कळलं नाही) असतात, न पाळल्यास आणि काही दुर्घटना घडल्यास हॉटेलचालक गोत्यात येऊ शकतो - तशी नुकतीच एक बातमीही दिसली - हा गोषवारा बरोबर आहे का?
हाब, टू बी ऑन सेफर साईड
हाब, टू बी ऑन सेफर साईड म्हणून कोणी आयडी बघायला मागत असेल, त्याचा नंतर दुरुपयोग करणार नसेल तर कोणालाही आयडी दाखवायला माझी हरकत नाही. >> आपलं (म्हणजे जनरल पब्लिकचं) हे बोटचेपं (व्यक्तीगत आरोप नाही.. जनरल स्टेटमेंट आहे... कृपया गैरसमज नसवा) धोरणच पोलिसांच्या आणि हक्कांची पायमल्ली करणार्या सगळ्यांच्या पथ्यावर पडतं.
बुकिंग करण्याव्यतिरिक्त ईतरांचा आयडी द्यायला नकार द्या (असा आयडी द्या म्हणून कायदा नसेल आणि ही फक्त पोलिस वा हॉटेलवाल्यांची मनमानी असेल तर)... हॉटेल वाल्यांचा बिझनेस बसू द्या... पोलिस आणि हॉटेलवालं काय क्करायचं ते बघून घेतील.
यस स्वाती.
यस स्वाती.
हा मुख्य मुद्दा आहे.धागाकर्ते यांना पार्टनर चे आयडी प्रूफ न दाखवल्या बद्दल(किंवा ते निमित्त दाखवून) परक्या जागी उगीच अग्रेशन चा अनुभव आला.बहुतांश लोकांनी अनुभव भयंकर असला तरी सर्व व्यक्तींचे आयडी प्रूफ मागणे काही ठिकाणी होते, काही ठिकाणी होत नाही पण आपल्या जवळ असलेली बरी असा सूर लावला.(आता तुम्ही (म्हणजे इथे वाचणारे कोणीही)भारतात बायको आणि मुलगा घेऊन आलात आणि कोणाचेही प्रूफ न दाखवता रूम वर राहिलात तर लगेच 'मी खोटी दहशत पसरवली' म्हणून माझा गळा धरू नका.☺️☺️) डिफर्स फ्रॉम प्लेस टू प्लेस, पर्सन टू पर्सन.
वरच्या चर्चे मधे रजिस्टरमधे
वरच्या चर्चे मधे रजिस्टरमधे माहिती लिहिली गेली म्हण़जे रुम बूक झाली असे धरले जाते नि म्हणून cancellation charges मागणे योग्य आहे असे म्हटलय, त्यावरून एक शंका. रजिस्टरमधे कोण लिहिते नक्की ? ग्राहक कि हॉटेल मालक ?
ग्राहक लिहितो. वर आरारा
ग्राहक लिहितो. वर आरारा म्हणालेत त्यावरुन ते हस्ताक्षर प्रुफ... म्हणजे 'मी इथे रहात होतो' टाईप होतं. आयडी घेतलाच, आता हस्ताक्षर पण हवं.

वर क्राईम पेट्रोल आलंय सो आता त्याच नजरेने बघतोय.
आणि हजर नसलेल्या एका
आणि हजर नसलेल्या एका व्यक्तीचे आयडी प्रूफ/ फोटो दुसर्या व्यक्तीने तिसर्या व्यक्तीला परस्पर देऊन "पहिली व्यक्ती ईथे ऊतरली आहे" असे भासवून कोणता गुन्हा टाळला जातो म्हणे?
रजिस्टरमधे कोण लिहिते नक्की ?
रजिस्टरमधे कोण लिहिते नक्की ?
>>
ग्राहक. इथंही ग्राहकानेच लिहिलंय. तसंच अपेक्षित आहे. आणि जिथं मी बंघितलंय त्यात तरी असंच झालंय.
ग्राहकानेच लिहावं लागतं- प्लीज नोट
मग अमेरिकेत हॉटेल बुकिंग कसे
मग अमेरिकेत हॉटेल बुकिंग कसे वेगळे आणि भारतात कसे वेगळे ते ही सांगा पाहू.>>>
Apple आणि orange कंपरिसन ?
साॅरी अमितने आधीच लिहिलं..
साॅरी अमितने आधीच लिहिलं..
'गुन्हा टाळणे' हे मोटिव नाहीच
'गुन्हा टाळणे' हे मोटिव नाहीच आहे. काही घडले तर कायद्याच्या/ पोलिसांच्या कचाट्यातुन वाचणे हे मोटिव असावं.
वर लोकं लिहिताहेत की पोरं पळवुन आणली असतील, विबासं असेल.. तर हे कोणी केलं तर हॉटेलवाल्यांना काही पडली असेल असं सुतराम वाटत नाही. पण असं काही झालं असेल आणि नंतर आपण गोत्यात यायला नको असं धोरण असावं.
हे गावातल्या यच्चयावत लोकांनी केलं की इक्विलिब्रिअम साधून नॉर्म बनत असेल. यातुन चोर सोडून सन्यासाला त्रासच होणार कारण चोर वे-आउट नक्कीच काढेल. पण चोर पकडणे हा हेतूच ठेवला नाही, आणि प्रोसेस किचकट केली की सगळे सुधारतील, म्हणजे आपण भारी आहोत, मोरली आपण काही करतोय हे वरती व्याज चढलं की मोराल पुलिसिंग ही करता येत असावं. बरं... मग 'लग्न मुल' असे चाकोरी बाहेरचे लोक आले की त्यांना धाक दाखवुन वरकमाईची सोय ही होत असेल.
स्युडो कॅपिटॅलिझम ते हेच.
ग्राहक. इथंही ग्राहकानेच
ग्राहक. इथंही ग्राहकानेच लिहिलंय. तसंच अपेक्षित आहे. आणि जिथं मी बंघितलंय त्यात तरी असंच झालंय.>> ती entry करण्याअगोदर तुमचे आयडी चेक करणे, क्रेडीट कार्ड/पैसे घेणे केले जाते कि आधी entry होते नि मग हे सोपस्कार होतात ?
वर क्राईम पेट्रोल आलंय सो आता
वर क्राईम पेट्रोल आलंय सो आता त्याच नजरेने बघतोय. Happy Proud >> बरोबरच आहे... त्या नजरेनं बघतच पोलिसांनी (असं हॉटेलवाले म्हणतात) सगळ्यांना क्रिमिनल समजत हे 'बर्डन ऑफ प्रूफ' देणं थोपवलेलं आहे ना?
Apple आणि orange कंपरिसन ? >> ते कसं काय? अमेरिकतल्या हॉटेल्समध्ये पोलिसांकडून क्रिमिनल स्क्रीनिंग करूनच रहायला यावे लागते की एक रूम आयडी प्रूफ दिलेल्या फक्त एकानेच वापरायची असा नियम आहे?
मी अनु
मी अनु
लॉजचा जो नियम आहे तोच सोसायट्यांमधे राहणा-या भाडेकरूंनाही लागू आहे. सोसायटीत भाडेकरू ठेवायचा असल्यास चेअरमन व सेक्रेटरीने त्याची माहिती संबंधित पोलीस स्टेशनला कळवावी लागते. भारतात घटनेप्रमाणे काहीही चालत नाही. ती फक्त प्रभावी लोकांसाठी आहे.
पोलिसांनी नियम बनवण्याचे कारण
- मधंतरी दहशतवादाचे वाढलेले प्रस्थ
- गुन्हेगारी टोळ्या इत्यादी लोक सर्रास शहरात येऊन लपू शकत होते.
कळस येथे डीआरडीओच्या लॅबच्या समोरच्या इमारतीत जावेद शेख (इशरत जहा फेम) राहत होता. तो मारला गेल्यानंतर चेअरमन आणि सेक्रेटरी यांना चौकशीसाठी वर्षभर चौकीत हजेरी लावावी लागत होती.
कल्याणी नगर येथे गोळीबाराची घटना झाली. संबंधित इसम दाऊदच्या गँगचा निघाला. सेक्रेटरी आणि चेअरमनला अटक झाली. काही अप्रिय घटना घडल्या तर पोलीस तपासादरम्यान सोपे व्हावे यासाठी पोलिसांनी सूचना केल्या तर न्यायालये त्यांना दुजोरा देतील असे वाटते (सक्ती केली असे सिद्ध करणे अवघड आहे).
जरी हक्कांची पायमल्ली होते असे वाटले तरी हॉटेलची रूम ग्राहकाला नाकारण्याचे हक्क मॅनेजरला आहेत. वर एका प्रतिसादात लिंक दिली आहे त्यात दोन्ही बाजू दिलेल्या आहेत. या नियमाचा फायदा घेऊन पोलीस हॉटेल प्रशासनाला ग्राहकाची माहिती घेण्याचा आग्रह (सक्तीच) करू शकतात. तसे न केल्यास अटक झालेली आहे.
पोलिसांना सुधरवण्यासाठी वेळ आहे का ?
entry करण्याअगोदर तुमचे आयडी
entry करण्याअगोदर तुमचे आयडी चेक करणे, क्रेडीट कार्ड/पैसे घेणे केले जाते कि आधी entry होते नि मग हे सोपस्कार होतात ?
>> हो, अर्थात.
हायझेनबर्ग,
हायझेनबर्ग,
जरा भारतात या.
आमच्याकडे, आपलेच लहान मूल रडते आहे, म्हणून केवळ अफवेवरून जमावाने मारहाण करून मारून टाकल्याच्या घटना फारच रिसेंटली झालेल्या आहेत. हॉटेलातले आयडी प्रूफ अन कायदा वगैरे नंतर बघू. कोल्लापुरातल्या गोटिबंद पैलवानाने हात जऽरा जोरात धरला तर मनगट मोडू शकते रच्याकने. मानगूट धरली नाही हे नशीब समजा.
उग्गं वादासाठी वाद घालायलंय बेणं
हो.. उगाच वाद घालताय एका
हो.. उगाच वाद घालताय एका बाजूने.. कौतुक आहे पण एकटेच सगळ्यांना उत्तरे देताय.
फक्त गोष्ट समान म्हणजे भारत आणि अमेरिकेत सेम कसे असेल. मग ते हॉटेल बुकिंग का असेना.
आता भारतातील निवडणुका आणि अमेरिकेतील निवडणुका कंपरिसन होऊ शकते का?
अमेरिकेत सुद्धा जॉर्ज
अमेरिकेत सुद्धा जॉर्ज फर्नांडीस, अब्दुल कलाम, शाहरूख खान यांना तपासणी साठी कपडे उतरवावे लागले होते. हक्कांची पायमल्ली आणि सुरक्षा यात गल्लत होतेय का ?
>> हो, अर्थात. >> अरे माझ्या
>> हो, अर्थात. >> अरे माझ्या प्रश्नात 'कि' आहे, हो कुठल्या भागाचे उत्तर आहे ?
बाबा कामदेव-..<<<>>>
बाबा कामदेव-..<<<>>>>महाराष्ट्रातले एक समाज सेवक जे की ग्रामीण भागात राहतात (अणा हजारे नव्हेत, भंपक इसम आहे तो. ) --- बाबा तुम्ही आण्णांवर का घसरलात?
दरवर्षी येतो.. तुम्ही
दरवर्षी येतो.. तुम्ही आग्रहानं आमंत्रण देत असाल तर पुन्हा येईन त्यात काय
आमच्याकडे, आपलेच लहान मूल रडते आहे, म्हणून केवळ अफवेवरून जमावाने मारहाण करून मारून टाकल्याच्या घटना फारच रिसेंटली झालेल्या आहेत. >> बरं मग जमावालापण आयडी प्रूफ दाखवायचं म्हणताय का?
तुमच्याएवढे नसले तरी पैलवानपण हुशार असतात हो.. कोणाची मानगूट पकडायची आणि कोणाची नाही ते बरोबर कळते त्यांना
बरं बुवा आम्ही बोललो तर वादासाठी वाद.. तुम्ही बोलता ते आमंत्रण देऊन प्रवचन का .. चांगलंय की.. देत चला वरचेवर?
फक्त गोष्ट समान म्हणजे भारत आणि अमेरिकेत सेम कसे असेल. मग ते हॉटेल बुकिंग का असेना. >>
काय वेगळे आहे ते तर सांगाना राव.
अर्थात पहिल्या भागाचे, अमित.
अर्थात पहिल्या भागाचे, अमित. साॅरी गोंधळ केल्याबद्दल.
पूर्वी क्राइम ही मानसिक विकृती होती आता तो व्यवसाय झाला आहे. जिथे जीवन संघर्ष तीव्र झाला आहे तिथे तर अधिकच. >> यासाठी बाबांना माझ्या भविष्यातल्या हाॅटेलचं बुकिंग आयडीची चवकशी न करता देईन
अर्थात पहिल्या भागाचे, अमित.
अर्थात पहिल्या भागाचे, अमित. साॅरी गोंधळ केल्याबद्दल. >> परत गोंधळ केलास रे. प्रश्न विचारणारा वेगळा आहे
>>> परत गोंधळ केलास रे.
>>> परत गोंधळ केलास रे. प्रश्न विचारणारा वेगळा आहे Happy
असू दे, लुक अॅट द ब्राइट साइड. सॉरी म्हणाला ना? म्हणतात का मायबोलीवर?
आणि सॉरी लगेच म्हणालाय. एक
आणि सॉरी लगेच म्हणालाय. एक दिवसाने नाही.

एक दिवसाने नाही >> ....
एक दिवसाने नाही >>
.... मला नाही म्हणाला रे अमित 
भारतात हॉटेलमध्ये प्रत्येकाचे
भारतात हॉटेलमध्ये प्रत्येकाचे आयडी कार्ड मागतात त्यामुळे सुरक्षा वाढलीय हा भ्रम आहे.
पण हॉटेलमध्ये ते मागतात तेव्हा प्रत्येकाचे आयडी कार्ड जवळ ठेवावे म्हणजे आपल्यालाच उगा त्रास होणार नाही. याविरुद्ध लढा द्यायचा असेल तर न्यायालयाचे अथवा सरकारचे दरवाजे ठोठावे लागतील, हॉटेलमध्ये जाऊन हुज्जत घालत बासण्याने काही साध्य होणार नाही.
सुरक्षेच्या नावाखाली इतर बरेच विनोदी प्रकारही चालतात. पण ते इथे अवंतारातही अवांतर होईल म्हणून थांबतो.
"'गुन्हा टाळणे' हे मोटिव
"'गुन्हा टाळणे' हे मोटिव नाहीच आहे. काही घडले तर कायद्याच्या/ पोलिसांच्या कचाट्यातुन वाचणे हे मोटिव असावं." - यू नेल्ड इट अमित.
"भारतात घटनेप्रमाणे काहीही चालत नाही" -
असामी तुला पण साॅरी.
असामी तुला पण साॅरी.
आता एकुण तीनदा साॅरी झाले. तेही एका दिवसात.
Pages