ह्या आधीचे
https://www.maayboli.com/node/67787
भाग २ – वारंवार पडणारे प्रश्न व अंततः
प्रश्न १ – मोदी सरकारने वाटाघाटी केल्या नंतरची रफालची किंमत यूपीए सरकारने ठरवल्या पेक्षा जास्त आहे का.
उ१- यूपीए सरकारच्या वेळेस सुरू झालेल्या वाटाघाटी पूर्णत्वास गेल्या नव्हत्या त्यामुळे अपूर्ण राहिलेल्या वाटाघाटीतून उद्भवणारी किंमत व पूर्णत्वाला पोहोचलेल्या वाटाघाटींच्या किमतीची आपण तुलना करू शकत नाही. वाटाघाटी ‘किमतीच्या अंदाजे आकड्यावर’ आधारलेल्या असतात. हा ‘किमतीचा अंदाजे आकडा’ नवीन नवीन मिळणाऱ्या माहिती नुसार बदलत राहतो. कोठल्याही वाटाघाटी करायच्या आधी एक कार्य समिती ‘किमतीचा अंदाजे आकडा’ म्हणजेच ‘बॉलपार्क प्राइस’ किंवा ‘बेंचमार्क प्राइस’ तयार करते. असल्या अत्यंत प्रगत तंत्रज्ञानावर आधारित वस्तूंची किंमत बाजारात उपलब्ध नसते त्यामुळे वेगवेगळ्या माहितीवर व समितीच्या अनुभवावर एक किमतीचा अंदाजे आकडा बॉलपार्क प्राइस ठरवला जातो व त्याला मध्य मानून वाटाघाटींना सुरवात करतात. जेव्हा केव्हा वाटाघाटी पूर्णत्वाला पोहोचतात तेव्हा अशा ठरलेल्या किमतीच्या वैधतेचा काल करारात नमूद करतात. आता युपिएच्या सरकारात २०१४ पर्यंत रफाल बाबत करारच झाला नसल्या कारणाने अर्धवट वाटाघाटींची अर्धवट किंमत व अशा वैधता नसलेल्या अर्धवट किमतीला काही अर्थ नाही, ना त्याचा काही उपयोग.
पण तरी सुद्धा वाटाघाटी पूर्णत्वाला पोहोचलेल्या ३६ रफाल ची किंमत अर्धवट वाटाघाटीच्या यूपीए पेक्षा कमीच आहे परत त्यात ५० टक्के ऑफसेटचे (व्यापारातला भारतीय भाग) नवीन कलम आहेच (ऑफसेट काय असते ते भाग ३ परिच्छेद ६ (ग) मध्ये वाचायला मिळेल) (पण येथे थोडक्यात देतो – ऑफसेट (व्यापारातला भारतीय भाग) असणे भारतीय कंपन्यांसाठी अत्यंत फायदेशीर असते. त्यात जर ५० टक्के ऑफसेट असेल तर सौद्याच्या ५० टक्के किमतीचा व्यापार व व्यवसाय भारतीय कंपन्यांना परदेशातील करार झालेल्या कंपनीला द्यायला लागतो. एका अर्थाने ५० टक्के पैसा परत भारतात येतो. चीन मध्ये हा १०० टक्क्यावर जाऊ शकतो).
परत नियंत्रक महालेखा परीक्षक – कंपट्रोलर ऑडिटर जनरल (CAG) किमतीची बारकाईने चौकशी करून निवाडा देतीलच. तो पर्यंत अर्धवट वाटाघाटीतून निघणारी किंमत व पूर्णत्वाला पोहोचलेल्या व करार झालेल्या किमतीची तुलना करणे म्हणजे पेरू बरोबर आंब्याच्या किमतीची तुलना करण्या जोगे चुकीचे ठरेल.
प्रश्न २ – जर वाटाघाटी करून किंमत यूपीए पेक्षा कमी असेल तर मग ३६ रफाल विमानेच का १२६ रफाल विमाने का नाही घेतली.
उ २- ३६ ऱफाल चे वितरण सप्टेंबर २०१९ पासून सुरू होऊन ते दोन तीन वर्षात भारतात येतील. पाहिल्या वर्षी ०६ दुसऱ्या वर्षी १२ व तिसऱ्या वर्षी १८ असे काहीसे वितरण असेल. त्या काळात हिंदुस्तान एरोनॉटीक्स एलसीए तेजस ह्या लढाऊ विमानाचे उत्पादन वाढवून भारतीय वायुसेनेला त्याचे वितरण करायला लागले असेल व ह्यामुळे सार्वजनिक क्षेत्रातल्या कंपनीला डिफेन्स पिएसयू (DPSU) व्यवसाय उपलब्ध होऊन फायदा होईल. नाहीतर युपिएच्या काळात ३ वर्ष झाली तरी वाटाघाटी संपत नव्हत्या. ह्याचे कारण असे की दासू (रफालची कंपनी) ह्या कंपनीला भारतातील हिंदुस्तान एरोनॉटीक्स ला ToT देण्यात गुणवत्ते विषयक शंका असल्या कारणाने अजून ५ ते ७ वर्षात तरी वाटाघाटी पूर्णत्वाला येतील असे वाटत नव्हते एवढेच काय अशा रखडलेल्या वाटाघाटींमुळे कधी कधी पूर्णं प्रकल्पच गुंडाळून ठेवला जातो व असे झाले असते (त्याची शक्यता दाट होती) तर भारतीय वायुसेनेला विमानांपासून वंचित राहायला लागले असते व त्याच बरोबर हिंदुस्तान एरोनॉटीक्सचे सुद्धा हातचे काम गेले असते (१०८ विमाने बांधण्याचे).
आता ३६ विमानांचा करार झाला आहे. त्याच बरोबर पुढे वाटले तर त्या वेळेच्या सरकारला जास्तीची ऱफाल विमाने घेण्यास कोणी थांबवले नाही व एकदा वाटाघाटी होऊन करार झाला की पुढच्या वाटाघाटींसाठी अनायासे किमतीचा अंदाजे आकडा बॉलपार्क प्राइस रक्षा समितीकडे आपोआप मिळालेला असेल त्यामुळे पुढच्या वाटाघाटी सुकर व पटकन संपू शकतात.
पण ह्या पेक्षा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न उद्भवतो. व तो म्हणजे आपल्या देशाला खरोखरच १२६ ऱफालची गरज आहे का – हा प्रश्न.
प्रश्न ३ – आपल्या देशाला १२६ ऱफालची गरज आहे का.
उ ३ – ह्या उत्तरासाठी आपण सापेक्ष व प्रामाणिकपणे विचार करायला हवा. मी ऑक्टोबर २०१५ मध्ये मनोहर पारिकरांना एक पत्र लिहिले होते. अंग्रेजी मध्ये होते पण त्या पत्राचा ह्या विषयास अनुशंघून असलेला भाग, मराठीत देत आहे. त्या पत्रात रफालची विमाने १२६ पेक्षा कमी का घ्यावीत ह्याचा तर्क दिलेला आहे तो वाचावा –
मूळ पत्र इंग्रजीत होते व त्यातला जो विषयास अनुशंघून भाग आहे तो मराठीत देत आहे
“………………………… Along with technology the combat scene has under gone a change and military aviation has grown into a superior tactical and strategic arm. Present day fighter aircrafts carryout tasks of several aircrafts in one single modern fighter aircraft. With the fantastic capabilities, the emphasis is not on numbers but it is on ‘smart’ capability. This can be seen from the fact that the Royal Air Force and the French Air Force, undertake world-wide commitments with just 225 aircraft of two types each, the French Air Force with the Rafale and Mirage-2000 and the Royal Air Force with Tornadoes and Typhoons.
Now we are going for a smart plane in Rafale. I heard CHIEF OF AIR STAFF saying they require more Rafales. It is natural to ask for moon as a head of organisation. No head of an organisation would sincerely trim the organisation except for private entrepreneurs. For public funded organisations we see that they get inflated over a period of time. There are 42 squadrons of MIG now slowly getting depleted. No Chief of Air Staff would say that with smart fighter planes we don’t require so many squadrons. Every organisation on public money tends to grow and never try to scale down the force. As a head of the three services I urge to look into this aspect - do we really need all 42 squadrons. 42 Squadrons were when MIG of low technology fighter was available. I know that cutting down number of squadrons is not easy and opposition may make mountain out of a mole. At the same time there is no need to equip all squadrons with costly smart planes. That way we can have a healthy mix of smart and not so smart planes. ………………………………………………………..”
पत्र पुढे दुसऱ्या विषयावर जाते. येथे त्याचा संबंध नाही म्हणून उद्धृत करत नाही.
प्रश्न ४ – ऱफालवर बसवण्यात येणारी शस्त्रप्रणाली मोदी सरकारने बदलली आहे का. यूपीए सरकारच्या वेळेला जी शस्त्रसामुग्री ठरवली होती तीच आहे का.
उ ४ – यूपीए सरकारच्या वेळेला, भारतीय वायुदलाने ज्या शस्त्रप्रणालीची चाचणी केली होती व हिरवा कंदील दाखवला होता तीच शस्त्रप्रणाली ह्या करारात कायम ठेवलेली आहे. ह्या बरोबर दासू कडून केल्या जाण्याचा विमानाचा रखरखावं व विमानाची देखरेखीचा काळ दासू कडून वाढवून घेतला आहे व ५० टक्के ऑफसेट पण लागू केले गेले आहे. हे सगळे आपल्या देशाच्या दृष्टीने हितकारकच आहे.
प्रश्न ५ – बोफर्स हा अंतर सरकारी गोव्हर्नमेट टू गोर्व्हनमेट G2G करार होता का.
उ ५- नाही. बोफर्स हा करार भारत सरकार (रक्षा मंत्रालय) व स्वीडनची बोफर्स तोफा बनवणारी कंपनी ह्या मध्ये झाला होता. त्या वेळेला क्वात्रोची (इटालियन व्यापारी व गांधी घराण्याचा जवळचा स्नेही) ह्यांनी हा करार घडवण्यात मदत केली होती.
प्रश्न ६ – बोफर्स करार संरक्षण खरेदी प्रक्रिया डिफेन्स प्रोक्यूरमेंट प्रोसीजर (DPP) प्रमाणे झाली होती का.
उ ६ – नाही. त्या वेळेला (१९८७ च्या सुमारास) डिपिपि अस्तित्वात नव्हती. पाहिली जलद खरेदी प्रक्रिया किंवा फास्ट ट्रॅक प्रोसीजरचे धोरण वर्ष २००१ (वाजपेयी सरकार) च्या वेळेस तयार झाले. वाजपेयी सरकारला त्या वेळेस वाटले रक्षा खरेदीसाठी एक पारदर्शी प्रक्रिया असली पाहिजे म्हणजे भ्रष्टाचार व पैसा चारू लोकं (मिडलमेन) कमी होतील. त्यासाठी धोरण ठरवायचे ठरले. व लागलीच वाजपेयी सरकारा असताना डीपिपि बनवण्यासाठी सल्लामसलती सुरू होऊन पाहिले डिपिपि २००५ साली प्रसिद्ध झाले. त्या वेळच्या संरक्षण मंत्र्यांनी श्री प्रणव मुखर्जी ह्यांनी ह्या धोरणावर सही करून डिपिपि २००५ मध्ये प्रसिद्ध केले. तो पर्यंत रक्षा खरेदी कोठल्याही ठोस धोरणां अभावी मनमानेल तशी केली जायची व म्हणूनच त्यावळचे रक्ष करार भष्टाचारा पासून अलिप्त राहू शकत नव्हते. पण DPP आल्या पासून (२००५) हे चित्र बदलायला सुरवात झाली.
प्रश्न ७ – ऱफाल डिफेन्स प्रोक्यूरमेंट प्रोसीजर डिपिपि वर आधारीत आहे का (भाग ३ परिच्छेद १ ते ८ वाचावे).
उ ७ – जेव्हा अंतर सरकारी समन्वय किंवा गोव्हर्नमेंट टू गोव्हर्नमेंट करार होणार असतो तेव्हा दोन्ही सरकाराला करार कसा करावा ह्या बद्दल बरेच स्वातंत्र्य असते. सरकारावर डिपिपि धोरणानेच जायचे असे बंधन नसते. खरे तर मोदी सरकारला मध्यम वजनाची युद्ध विमाने मीडियम मल्टी रोल कॉम्बॅट एअरक्राफ्ट्स (MMRCA) बनवणाऱ्या लॉकहिड मार्टीनची एफ् १६, बोईंगची एफ्/ए १८, युरोफायटर टायफून, रशियन मिग ३५, स्वीडनची साब ग्रिपेन व फ्रांसची रफाल ह्या सारख्या कोणत्याही देशाच्या सरकारांबरोबर बोलणी व वाटाघाटी करण्याचे स्वातंत्र्य अंतर सरकारी करारात होते. जर अशा कोणत्याही देशा पासून मीडियम मल्टी रोल कॉम्बॅट एअरक्राफ्ट्स खरेदी केले गेले असते तरी ते गैर ठरू शकले नसते.
पण महत्त्वाचा भाग हा आहे की हे स्वातंत्र्य असताना देखील मोदी सरकारने तेच विमान व तीच कंपनी निवडली जी अगोदर आपल्या देशाने २०११ मध्ये डिपिपि प्रक्रिये मार्गे निवडली होती. त्यामुळे मोदी सरकारला एक भरभक्कम नैतिक बळ प्राप्त झाले कारण तांत्रिकी चाचणी व उड्डाण चाचणीतून निवडून येऊन परत दासूची बोली पण सगळ्या विमानात कमी होती. त्यामुळे ह्या प्रश्नाचे उत्तर म्हणजे जरी डिपिपि ने न जाण्याचे स्वातंत्र्या मोदी सरकारला होते तरी सुद्धा हा अंतर सरकारी करार डिपिपि वर आधारीतच केला गेला आहे.
प्रश्न ८ – साठी दासूला रिलायन्स सारख्या भारतीय कंपन्यांबरोबर व्यवसाय करायला मोदी सरकारने सुचवले का.
उ ८ – नाही. मूळ उपकरण निर्माता - ओरिजनल इक्विपमेंट मॅन्यूफॅक्टरर (OEM) इथे दासू कंपनीला पूर्ण स्वातंत्र्य आहे. ते कोणत्याही भारतीय कंपनी बरोबर बोलणी करून करार करू शकतात. फक्त त्या कंपन्यांना डिपार्टमेंट ऑफ इनडस्ट्रीयल पॉलिसी आणि प्रमोशन (DIPP) कडून परवाना उपलब्ध असला पाहिजे. त्याच बरोबर असे करार अपेंडीक्स अ अध्याय ३ डिपिपि मध्ये दिल्या प्रमाणे झाले पाहिजेत. परत एक अट अशी आहे की जो मूळ निर्माता आहे त्याने त्याच्या इतर छोट्या कंपन्या जर मध्ये भाग घेऊ शकल्या नाहीत तर त्यांचा ही वाटा स्वीकारून त्यांची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेऊन पूर्ण केला पाहिजे. एवढे केले तर भारतीय कोणती कंपनी निवडायची ह्याचे स्वातंत्र्य दासू कंपनीला आहे.
२०११ मध्ये हिंदुस्तान एरोनॉटीक्स बरोबर ToT साठी बोलणी सुरू होती (इथे ToT चा अर्थ विमानाचे भाग जुळवणे व विमान तयार करणे असे घ्यावे लागेल. मी मागे दिल्या प्रमाणे ToT मध्ये वेगवेगळे स्थर आहेत, त्या मुळे कोणी ToT म्हटल्यावर पूर्णं राफेल विमानाचे निर्माण ToT मुळे हिंदुस्तान एरोनॉटीक्स करायला लागले असते असे उगाच वाटून हुरळून जाऊ नये).
पण राफेलच्या जुळवणी करण्याच्या ToT ला सुद्धा दासूला वावगे होते व ते २०१२ ते २०१५ च्या निष्फळ वाटाघाटींतून दिसून येते. जर त्या वाटाघाटी तशाच चालू ठेवल्या गेल्या असत्या तर अजून काही वर्ष रखडून शेवटी रफाल करार कधी न होणारा होऊन रफा दफा झाला असता. २००१ मध्ये वायुसेनेने त्यांच्या १५ वर्षाच्या लॉग टर्म पर्स्पेक्टीव्ह प्लॅन प्रमाणे MMRCA ची गरज प्रदर्शित केली होती. ह्या गोष्टीला १५ वर्ष होऊन त्यांच्या हाती काही लागले नव्हते. अजून विलंब झाला असता तर त्यांच्या लॉग टर्म पर्स्पेक्टीव्ह प्लॅन वर परिणाम झाला असता व आपल्या वायुसेनेचे मनोबळ खचले असते.
प्रश्न ९ – फ्रान्सच्या पूर्व प्रधानमंत्र्यानी एका मुलाखतीत असे म्हटले की मोदी सरकारने रिलायन्सचे नाव घेऊन दासूला सांगितले की रिलायन्स बरोबरच व्यापार करा व म्हणून तहत दासूला हिंदुस्तान एरोनॉटीक्स एचएएल सोडून रिलायन्स बरोबर व्यापार करावा लागला.
उ ९ – ह्या मुलाखती नंतर ह्याच पंतप्रधानांनी आपले वक्तव्य मागे घेतले होते. त्यामुळे भारतीय लोकांमध्ये गोंधळ उडवण्यासाठीच असले वक्तव्य दिले होते की काय ह्याची शंका येते. परत असले वक्तव्य त्यांच्या भारतीय मित्रासाठी समन्वय साधून केले की काय ह्याची पण शंका येते कारण असे वक्तव्य येण्या अगोदरच्या आठवड्यात एका विरोधी पक्षाच्या नेत्याने ट्विट करून भाकीत केले होते की एक हादरून टाकणारे वक्तव्य पुढच्या आठवड्यात येणार आहे त्यामुळे ही शंका!!!! राजकारण वेगळे सोडले तर, ज्यांना डिफेन्स परवाने मिळालेले आहेत अशा सगळ्या कंपन्यांची यादी DIPP कडे असते व त्यांना माहीत असते कोणती भारतीय कंपनी कोणत्या क्षेत्रात व्यापार करतात. व एखाद्या करारात जर करार करणाऱ्या देशाने विचारले तर कंपन्यांची नावे सांगायचे पूर्ण स्वातंत्र्य DIPP ला आहे. अशी नावे उपलब्ध करून द्यायची हे DIPP चे एक काम आहे. नाहीतर परदेशी कंपनीला त्यांचा वेळ घालवून कंपन्या शोधत हिंडावे लागेल. काही कंपन्या त्यांना कधीच मिळणार नाहीत व त्यामुळे अजाणतेपणे त्यांच्या बरोबर व्यापार केला जाऊ शकणार नाही त्यामुळेच DIPP कडे आपल्या भारतीय कंपन्यांची जाहिरात करण्याचे मोठे काम आहे. तेव्हा जर कोणी सुचवू पाहतं असेल की मोदी सरकारने भारतात व्यवसाय करण्याकरता कंपन्यांची नावे जाहीर केली तर त्याला भारतीय उद्योगां बद्दल माहिती कशी दिली जाते व त्याची प्रक्रिया काय व त्याचे धोरण काय ह्या कशाची माहिती नाही हेच जाहीर होते. उगाच उचलली जीभ व लावली ताळ्याला असे झाले म्हणायचे.
प्रश्न १० – ह्या करारा अंतर्गत रफाल बरोबर उद्योग करणाऱ्या कोणकोणत्या कंपन्या आहेत.
उ १० – (भाग ३ परिच्छेद ६ (ग) वाचावा). ७० पेक्षा जास्त भारतीय कंपन्या ज्यात डीआरडीओ व प्रायव्हेट कंपन्या पण शामील आहेत. ह्या कंपन्या रफाल बरोबर व्यवसाय करायला सज्ज आहेत. (गुगल वरून डाऊनलोड - अजून कंपन्या पण आहेत त्यात पण हे फक्त दर्शवण्यासाठी देत आहे - रीलायन्स कडे साधारण ३ टक्के ऑफसेट).

प्रश्न ११ – ToT तंत्रज्ञानाचे हस्तांतरण रफाल करारातून का वगळले गेले.
उ ११ – ToT वगळल्या शिवाय वाटाघाटी पुढे सरकत नव्हत्या. जर पुढे सरकणाऱ्या असत्या तर २०१२ मध्येच यूपीए सरकार असताना तो करार झाला असता. २०११ साली सगळ्यात कमी बोलीवर व बाकीच्या निकषांवर रफालची निवड होऊन सुद्धा २०१५ पर्यंत ToT मुळे वाटाघाटी पूर्णत्वाला पोहोचू शकल्या नाहीत ह्याचाच अर्थ हे कलम जर असच कायम ठेवले असते तर अजून पर्यंत वाटाघाटी पूर्ण झाल्या नसत्या व करार झाला नसता. ह्या कराराचे प्राथमिक उद्दिष्ट वायुसेनेच्या लॉंगटर्म पर्स्पेक्टीव्ह प्लॅन प्रमाणे त्यांना MMRCA विमाने उपलब्ध करून देणे होते, ToT हे जाता जाता जमले तर चांगलेच असे दुय्यम उद्दिष्ट. प्राथमिक उद्दिष्टच जेथे रखडले व पुरे होत नाही असे दिसत असेल तर दुय्यम उद्दिष्टावर नजर लावून बसण्यात काय अर्थ आहे. आणि जर दुय्यम उद्दिष्ट साध्य करायच्या नादात प्राथमिक उद्दिष्ट संपुष्टात येत आहे असे दिसत असेल तर दुय्यम उद्दिष्ट प्राप्त होण्यात काही अर्थ नाही. ह्याच दृष्टिकोनातून ते वगळले गेले. नाही तर विमाने आली नसती व ती येत नाहीत म्हणून ToT पण झाले नसते.
प्रश्न १२ – रफाल ची किंमत सार्वजनिक का करत नाहीत. किमतीची चर्चा का होऊ देत नाही. करारात सुरक्षे संबंधीत कोणते कलम आहे की जेणे करून त्याची किंमत सार्वजनिक होऊ शकत नाही.
उ १२ – प्रत्यक रक्षा करारात कोणत्या गोष्टी सार्वजनिक करण्यास मोकळ्या व कोणत्या गोष्टी गुप्त ठेवायच्या ह्याची कलमे असतात. जर त्याची किंमत सार्वजनिक केली गेली तर आपल्या शत्रू राष्ट्रांना आयतेच किमतीच्या अंदाजाचे आकडे उपलब्ध होतील. त्यावरून त्यांना कोणती शस्त्र आपण विकत घेत आहोत ह्याचा अंदाज लावता आला असता. शत्रू राष्ट्राला एकदा अंदाज लागला की त्या शस्त्राला तोड म्हणून त्याला मारक अशी शस्त्रप्रणाली विकत घेऊन तो आपल्याला शह देऊ शकतो. युद्धाचा हाच खेळ असतो. शस्त्र – त्याला तोड. त्या तोडाला तोड. हे सगळे जे कमी वेळात करू शकतात ते जिंकतात. सगळ्या गोष्टी सार्वजनिक करून आपण आपल्या शत्रू राष्ट्रांना एक प्रकारे मदतच करतो.
प्रश्न १३ – अंबानींना विमान बनवण्यात अनुभव आहे का.
उ १३ – त्यानी पिपावाव कंपनी विकत घेतली जी बरीच वर्ष डिफेन्स प्रॉडक्शन मध्ये होती. बाकी कंपनी कशी आहे ते दासू ने जाणून घ्यायचे त्यांचा निकष महत्त्वाचा ऑफसेट त्यांनी फेडायचे आहे.
अंततः - मी हा लेख लिहिण्या मागचे उद्दिष्ट असे की वर्ष २००१ पासून रक्षा संपादन हे मन मानेल तसे कसे ही होत नाही तर त्या संपादना मागे एक कायदेशीर प्रक्रिया उभारली गेली आहे. ती प्रक्रिया पारदर्शक बनवण्याच्या धोरणातून निर्माण झाली आहे. आता ती पूर्वी सारखी भ्रष्टाचाराला चारा घालणारी राहिली नसून त्याला आळा घालणारी झाली आहे. अंतर सरकारी करार अशा प्रक्रियेला अजून मजबुती देतो, जिथे भ्रष्टाचारी लोक नाही तर थेट आपले सरकार दसर्या सरकारशी बोलून काय पाहिजे ते विकत घेते.
हा लेख विशेष करून तरुणांना व नवीन पिढीला वाचून दाखवायला हवा. त्यामुळे त्यांच्यात अपप्रचाराने निर्माण झालेला संदेह जाऊन आपल्या धोरणांवर व रक्षा संपादन प्रक्रियेवर विश्वास बसू शकेल. प्रत्येक रक्षा खरेदी भष्टाचारातून निर्माण झालेली नसते हे त्यांना समजले पाहिजे. जे काही नेते व काही पक्ष अपप्रचार करून विश्वास तोडण्याचे काम करत आहेत ते त्यांच्या स्वत:च्या भवितव्याच्या व पक्षाच्या अस्तित्वाच्या संभ्रमातून उद्भवलेली त्यांची गरज आहे व त्यामुळे वास्तव बिघडवण्याचा प्रयत्न आहे.
मला खात्री आहे जो पक्षाध्यक्ष भ्रष्टाचाराचा आरोप करत आहे त्याला डिपिपिचा लवलेशही माहीत नसणार ना जाणून घ्यायची त्याच्या कडे कुवत आहे ना इच्छा आहे. त्याला फक्त लोकांना गोंधळात टाकून संभ्रम उत्पन्न करायचा आहे. तो फक्त शिकवलेली पोपटपंची करून स्वतःचा टीआरपी रेटिंग वाढवण्याच्या नादात वावरत आहे.
तिसरा भाग लवकरच –
http://rashtravrat.blogspot.com/2018/10/all-you-want-to-know-about-rafal...
(क्रमशः)
रणजित चितळे, तुम्ही तुमचा मूळ
रणजित चितळे, तुम्ही तुमचा मूळ लेख व तुमचे स्वतःचेच प्रतिसाद सलग वाचलेत, तर मनोरंजन होईल.
अर्थात कोलांट्या उड्या, यू टर्न यात ऑलिंपिकमधली तीनही पदखं मिळवण्याची क्षमता आणि कर्तबगारी असल्याने ल्या पक्षाची तुम्ही तळी उचलताय. त्यामुळे त्यात नवल वाटावे असे काही नाही.
सुब्रस्वामीhttps://www
सुब्रस्वामी
https://www.youtube.com/watch?v=l2Ns6vhkAgQ
अजय शुक्लhttps://www.youtube
अजय शुक्ल
https://www.youtube.com/watch?v=_cOPB2Lm9vs
लेखकाने लेखात करारांच्या
लेखकाने लेखात करारांच्या वेगवेगळ्या पद्धतींची माहिती दिली. इथपर्यंत ठीक. पण पुढे अतार्किक युक्तीवाद करत ते सरकारचा बचाव करत आहेत हे अनाकलनीय आहे.
जी टू जी करार करताना देशाचे नुकसान झाले तरी तो योग्यच हा त्यांच्या बचावाचा मुख्य पाया आहे. जी टू जी करार करताना देशाचे हित पाहू नये, करारात देशाचे पैसे वाचतील, पार्टनर्स निवडताना गुणवत्ता ध्यानात घेतली जाऊ नये अशा अटी असतात का ? जी टू जी करार करताना स्वातंत्र्य आहे. प्रश्न आहे त्याचा दुरूपयोग करणार का ? कि अधिक काळजी घेणार ?
या तर्कापासून लेखकाचे प्रतिसाद लांब अंतरावर आहेत.
ही काळजी कशी घेता येईल यासाठी नेहमीच्या करारात काय काय कलमे असतात याची माहिती दिलेली आहे. जी टू जी करार करताना त्याला हरताळ फासला पाहीजे असे लेखकाचे म्हणणे आहे असे वाटू लागले आहे.
हिंदुस्तान एअरोनॉटिक्स या कंपनीकडे असलेला अनुभव पाहता विमानाच्या मुख्य जुळणीचे काम तिच्याकडे जायला हवे होते. शेवटच्या क्षणापर्यंत हिंदुस्तान एअरोनॉटिक्सशी चर्चेच्या फे-या चालू ही होत्या. दहा दिवसांपूर्वी अनिल अंबानींची कंपनी रजिस्टर झाली आणि तिला काम मिळाले हा वादाचा मुद्दा आहे.
करार करताना ऑफसेट पार्टनर्स ची गुणवत्ता तपासण्याचा मुद्दा नेहमीच्या करारात असतो. जी टू जी करार वेगळे आहेत का ? या करारात ही काळजी घेऊ नये असे कुणी सांगितले आहे ? जी टू जी करारात जे स्वातंत्र्य आहे त्याचा गैरफायदा घेऊन ज्या कंपनीला अनुभव नाही तिला काम दिले गेले आणि भारत सरकारला आक्षेप सुद्द्धा घेता आला नाही अशा पद्धतीचे युक्तीवाद केले जात आहेत. हे शक्य नाही. भारतातच पब्लिक सेक्टर मधे अनुभवी कंपनी असताना कर्जबाजारी झालेल्या अनिल अंबानी ग्रुपला काम का दिले गेले ? याच कंपनीने नेव्हीचे काम घेतले होते. त्याबाबत नेव्ही नाखूष आहे आणि संपूर्ण ऑर्डरचा फेरविचार होण्याची शक्यता आहे.
यापूर्वी मुकेश अंबानींची रिलायन्स आणि हाल या कंपन्यांमधे स्पर्धा होती. मात्र २०१३ मधे हाल ही एकमेव कंपनी स्पर्धेत राहिली. मुकेश अंबानी ग्रुपने या डील मधून माघार घेतली. जर पूर्वीच्या सरकारने मुकेश अंबानी ग्रुप साठी आग्रह धरला असता तर तो ही भ्रष्टाचारच ठरला असता. किमान अनियमित किंवा चुकीचा आग्रह ठरला असता. काँग्रेसने केले म्हणून माफ आणि भाजपने केले म्हणून भ्रष्ट हा मुद्दाच नाही इथे.
किंवा जीटूजी करार केला म्हणून काळजीच घेता कामा नये हा ही मुद्दा नाही. उलट स्वातंत्र्य आहे म्हटल्यावर त्यानुसार फायदा कसा होईल हे पहायला हवे होते. हाल ला कंत्राट देऊन अडचणीचा टेक्नॉलॉजी ट्रान्स्फर चा मुद्दा जी टू जी मधे बाजूला टाकला असता तर ते समजू शकले असते. त्यावर आक्षेप आले असते. मात्र ते इतके गंभीत ठरले नसते व करार संशयाच्या भोव-यात अडकला नसता हे नक्की.
जी टू जी करार केला म्हणजे दसॉल्ट एव्हिएशनला भारत सरकार ऑफसेट पार्टनर्स कोण असावे हे सांगू शकत नाही असा समज निर्माण करण्याचा प्रयत्न हास्यास्पद आहे. उदा दसॉल्ट ने दाऊद इब्राहीमच्या कंपनीशी करार केला असता तरी भारत सरकार गप्प बसले असते का ?
किंवा १०० रू ची वस्तू १००० रू ला दिली तरी जी टू जी आहे म्हणून ती घेतली पाहीजे असे म्हणणे आहे का ? केवळ इमर्जनसी म्हणून हे चालते का ?
३६ विमाने भारताला मिळणार आहेत ती चार वर्षांत. तर मग ही तातड गेली कुठे ?
सुब्रमण्यम स्वामी तर आधी म्हणत होते की ही कंपनी डबघाईला आलेली आहे. जगात कुणीही ही विमाने खरेदी करत नाही. त्यासाठी ते कोर्टात जाणार होते. अचानक ही कंपनी गंगेसारखी पवित्र झाली कि काय ?
किरणुद्दीन -
किरणुद्दीन -
लेखकाने लेखात करारांच्या वेगवेगळ्या पद्धतींची माहिती दिली. इथपर्यंत ठीक. पण पुढे अतार्किक युक्तीवाद करत ते सरकारचा बचाव करत आहेत हे अनाकलनीय आहे. - उदाहरण द्या
जी टू जी करार करताना देशाचे नुकसान झाले तरी तो योग्यच हा त्यांच्या बचावाचा मुख्य पाया आहे. - असे मी कधी म्हटले आहे.
हिंदुस्तान एअरोनॉटिक्स या कंपनीकडे असलेला अनुभव पाहता विमानाच्या मुख्य जुळणीचे काम तिच्याकडे जायला हवे होते. - २०११ पासून २०१४ पर्यंत कोणी थांबवले होते. एंटनी ने करायला पाहिजे होते. जे चार वर्षात झाले नाही (कारणे दिली आहेत माझ्या लेखात) ते पुढे पाच वर्ष होईल हे सांगता येत नव्हते.
करार करताना ऑफसेट पार्टनर्स ची गुणवत्ता तपासण्याचा मुद्दा नेहमीच्या करारात असतो. जी टू जी करार वेगळे आहेत का ? या करारात ही काळजी घेऊ नये असे कुणी सांगितले आहे ? जी टू जी करारात जे स्वातंत्र्य आहे त्याचा गैरफायदा घेऊन ज्या कंपनीला अनुभव नाही तिला काम दिले गेले आणि भारत सरकारला आक्षेप सुद्द्धा घेता आला नाही अशा पद्धतीचे युक्तीवाद केले जात आहेत. हे शक्य नाही. भारतातच पब्लिक सेक्टर मधे अनुभवी कंपनी असताना कर्जबाजारी झालेल्या अनिल अंबानी ग्रुपला काम का दिले गेले ? याच कंपनीने नेव्हीचे काम घेतले होते. त्याबाबत नेव्ही नाखूष आहे आणि संपूर्ण ऑर्डरचा फेरविचार होण्याची शक्यता आहे. - ऑफसेट मध्ये स्वातंत्र्य दासूला आहे ते dipp मध्ये असलेल्या कोणत्याही कंपनीशी करू शकतात.
किंवा जीटूजी करार केला म्हणून काळजीच घेता कामा नये हा ही मुद्दा नाही. उलट स्वातंत्र्य आहे म्हटल्यावर त्यानुसार फायदा कसा होईल हे पहायला हवे होते. हाल ला कंत्राट देऊन अडचणीचा टेक्नॉलॉजी ट्रान्स्फर चा मुद्दा जी टू जी मधे बाजूला टाकला असता तर ते समजू शकले असते. त्यावर आक्षेप आले असते. मात्र ते इतके गंभीत ठरले नसते व करार संशयाच्या भोव-यात अडकला नसता हे नक्की. हे चूकीचे आहे
जी टू जी करार केला म्हणजे दसॉल्ट एव्हिएशनला भारत सरकार ऑफसेट पार्टनर्स कोण असावे हे सांगू शकत नाही असा समज निर्माण करण्याचा प्रयत्न हास्यास्पद आहे. उदा दसॉल्ट ने दाऊद इब्राहीमच्या कंपनीशी करार केला असता तरी भारत सरकार गप्प बसले असते का ?
किंवा १०० रू ची वस्तू १००० रू ला दिली तरी जी टू जी आहे म्हणून ती घेतली पाहीजे असे म्हणणे आहे का ? केवळ इमर्जनसी म्हणून हे चालते का ? - असे मी कधी म्हटले नाही दासू फक्त DIPP मध्ये असलेल्या कंपन्यांशीच व्यवहार करू शकते. दाऊद सारखे येउ नयेत म्हणूनच DIPP असते.
३६ विमाने भारताला मिळणार आहेत ती चार वर्षांत. तर मग ही तातड गेली कुठे ? - तातड कोठे गेली? नाहीतर पुढची १५ वर्ष मिळाली नसती - १५ वर्ष व ४ वर्ष ह्यात फरक आहे.
दासू डबघाईला गेलेली कंपनी नाही. त्या बद्दल वाचा.
चितळे, तुमचे प्रतिसाद आता
चितळे, तुमचे प्रतिसाद आता हास्यास्पद होत चाललेले आहेत. मी उदाहरणे देण्यापेक्षा आणि तुम्हाला पटवण्यापेक्षा लोक तुमचे प्रतिसाद आणि लेख वाचू शकतात. मला तुमच्याषी वाद विवाद करण्यात कोणतेही स्वारस्य उरलेले नाही हे नोंदवतो.
दासू डबघाईला गेलेली कंपनी
दासू डबघाईला गेलेली कंपनी नाही. त्या बद्दल वाचा. >>> हे भाजपचे म्हणणे होते. अधांतरी गोळीबार करू नका.
काल मी बिझिनेस स्टँडर्डच्या
काल मी बिझिनेस स्टँडर्डच्या बातमीची लिंक दिली होती. ती नीट दिली नव्हती की उडाली आहे, ते कळत नाही. आज पुन्हा देतो आहे.
https://www.business-standard.com/article/economy-policy/rafale-row-govt...
शत्रूराष्ट्रांनी अत्याधुनिक लढाऊ विमाने मोठ्या संख्येने खरेदी केल्याने, राफेलची खरेदी तातडीने करणे भाग होते, असे सांगणार्या सरकारने १२६ विमानांच्या खरेदीची निविदा प्रक्रिया रद्द केली.
दरम्यान आयडीबीआय बँकेने रिलायन्स डिफेन्सविरोधात कर्जवसुलीसाठी ठोकलेल्या दाव्यावर लवादाने रिलायन्स डिफेन्सला नोटिस बजावलेली आहे.
भरत - शत्रूराष्ट्रांनी
भरत - शत्रूराष्ट्रांनी अत्याधुनिक लढाऊ विमाने मोठ्या संख्येने खरेदी केल्याने, राफेलची खरेदी तातडीने करणे भाग होते, असे सांगणार्या सरकारने १२६ विमानांच्या खरेदीची निविदा प्रक्रिया रद्द केली. ।। कारण २०११ पासून २०१४ पर्यंत (करार अंतिम झाला नाही व पुढेही होणारा नव्हता).
किरणुद्दीन - धन्यवाद. मलाही स्वारस्य नाही आपल्याशी वाद घालण्यात.
शत्रुराष्ट्रांचा ताफा वाढला
शत्रुराष्ट्रांचा ताफा वाढला आणि आधुनिक झाला. मग त्याला उत्तर द्यायला ३६ विमाने पुरेशी आहेत आणखी विमानांची गरजच नाही, म्हणता?
बऽऽऽऽरं.
भरत - शत्रुराष्ट्रांचा ताफा
भरत - शत्रुराष्ट्रांचा ताफा वाढला आणि आधुनिक झाला. मग त्याला उत्तर द्यायला ३६ विमाने पुरेशी आहेत आणखी विमानांची गरजच नाही, म्हणता?
बऽऽऽऽरं. >>>> हे मी लिहिले होते - ३६ ऱफाल चे वितरण सप्टेंबर २०१९ पासून सुरू होऊन ते दोन तीन वर्षात भारतात येतील. पाहिल्या वर्षी ०६ दुसऱ्या वर्षी १२ व तिसऱ्या वर्षी १८ असे काहीसे वितरण असेल. त्या काळात हिंदुस्तान एरोनॉटीक्स एलसीए तेजस ह्या लढाऊ विमानाचे उत्पादन वाढवून भारतीय वायुसेनेला त्याचे वितरण करायला लागले असेल व ह्यामुळे सार्वजनिक क्षेत्रातल्या कंपनीला डिफेन्स पिएसयू (DPSU) व्यवसाय उपलब्ध होऊन फायदा होईल. नाहीतर युपिएच्या काळात ३ वर्ष झाली तरी वाटाघाटी संपत नव्हत्या. ह्याचे कारण असे की दासू (रफालची कंपनी) ह्या कंपनीला भारतातील हिंदुस्तान एरोनॉटीक्स ला ToT देण्यात गुणवत्ते विषयक शंका असल्या कारणाने अजून ५ ते ७ वर्षात तरी वाटाघाटी पूर्णत्वाला येतील असे वाटत नव्हते एवढेच काय अशा रखडलेल्या वाटाघाटींमुळे कधी कधी पूर्णं प्रकल्पच गुंडाळून ठेवला जातो व असे झाले असते (त्याची शक्यता दाट होती) तर भारतीय वायुसेनेला विमानांपासून वंचित राहायला लागले असते व त्याच बरोबर हिंदुस्तान एरोनॉटीक्सचे सुद्धा हातचे काम गेले असते (१०८ विमाने बांधण्याचे).
आता ३६ विमानांचा करार झाला आहे. त्याच बरोबर पुढे वाटले तर त्या वेळेच्या सरकारला जास्तीची ऱफाल विमाने घेण्यास कोणी थांबवले नाही व एकदा वाटाघाटी होऊन करार झाला की पुढच्या वाटाघाटींसाठी अनायासे किमतीचा अंदाजे आकडा बॉलपार्क प्राइस रक्षा समितीकडे आपोआप मिळालेला असेल त्यामुळे पुढच्या वाटाघाटी सुकर व पटकन संपू शकतात.
कोणतीही विमान बनवणारी कंपनी
कोणतीही विमान बनवणारी कंपनी १२६ विमान एका वर्षात देऊ शकत नाही. म्हणूनच आत्ता पासून सुरवात करावी लागते. २०११ मध्येयुपिँए ने कंत्राट दिले असते तर आत्ता पर्यंत ३६ का ५० पण आली असती पण निर्णय प्रक्रियाच पुर्ण होत नव्हती.
हा करार दोन देशांमधील नाही
हा करार दोन देशांमधील नाही असे सर्वोच्च न्यायालयात उघड झाले आहे. तसेच या कराराला फ्रान्स सरकारने कोणतीही हमी दिलेली नाही.
https://maharashtratimes.indiatimes.com/india-news/sc-reserves-order-on-...
नवे सत्य
- राफेल खरेदी व्यवहार भारत-फ्रान्स सरकारांमधील नव्हे.
- करारास फ्रान्स सरकारची सार्वभौम हमीही नाही.
- ऑफसेट भागीदारीच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये बदल
- न्यायालय म्हणाले, हवाई दलाचे म्हणणे ऐकायचेय
गोपनीयतेचे कलम हटवले तर बरेच काही उघड होईल.
जअर पूर्वीचे सरकार भ्रष्ट
जअर पूर्वीचे सरकार भ्रष्ट होते तर ते वेळकाढूपणा का करेल ? या सरकारच्या आणि त्यांच्या भाटाच्या युक्तीवादात एक सूत्र आहे ते म्हणजे करार वेळेत का केला नाही ?
संरक्षण सिद्धतेत टेक्नॉलॉजी ट्रान्स्फर हे नवे सूत्र आपण स्विकारलेले आहे. मिग विमाने, सुखोई विमाने या विमानांचे तंत्रज्ञान भारताला मिळालेले आहे. ब्रह्मोस हे क्षेपणास्त्र डीआरडीओ आणि ब्रह्मोस ही रशिया आणि डीआरडीओने स्थापलेली संयुक्त कंपनी यांच्या माध्यमातून विकसित केले गेलेले आहे.
राफेल विमाने विकत घेताना टेण्डर प्रक्रियेमधे ही अट होती. त्यामुळे लॉकहीड सहीत अनेक कंपन्यांनी कोट केले नाही. फक्त दोन कंपन्यांनी आपल्या निविदा सादर केल्या. त्यातली एक राफेल. मात्र कराराची बोलणी चालू झाल्यानंतर राफेलने तंत्रज्ञान हस्तांतरणाला नकार दिला. यामुळे विलंब होत गेला. जर करारापोटी मिळणारी दलाली महत्वाची ठरली असती तर ही अट तेव्हांच मागे घेऊन करार पार पडला असता. ही अट मागे घेण्यासाठी अर्जन्सी हे आवडते कारण देता आले असते.
मात्र सरकार, तसेच हवाई दलाचे आणि संरक्षण मंत्रालयातील अधिकारी तंत्रज्ञान हस्तांतरणाच्या मुद्द्यावर शेवटपर्यंत ठाम होते. या विमानांचे तंत्रज्ञान जर हिंदुस्तान एयरोनॉटिक्स कडे आले असते तर भविष्यात ते विकसित करण्यासाठी डीआरडीओला मदत झाली असती. भारताला हा टप्पा लवकर गाठता आला असता. त्यामुळे राफेल खरेदी नंतर स्टेट ऑफ द आर्ट टेक्नॉलॉजीशी जुळवून घेणे सोयीचे झाले असते. हे फायदे जास्त महत्वाचे होते.
लेखक यावर बोलायला तयार नाही. फक्त विलंब झाला म्हणजे काहीतरी गुन्हा केला असा धोशा लावलेला आहे आणि दोन सरकारांमधला करार म्हणजे सर्व पवित्र असा कांगावा चालू आहे. अनेक मुद्दे फाट्यांवर मारून तुम्हाला जी टू जी कराराचे ज्ञान नाही असे शेरे मारण्याव्यतिरिक्त यांचे प्रतिसादात काही एक योगदान नाही. त्यांना उद्देशून उत्तरे विचारलेली नसतानाही स्वतःहून हास्यास्पद उत्तरे देण्याचा अट्टाहास पाहता त्यांना उत्तरे नकोत हे स्पष्टपणे सांगणे गरजेचे झाले होते. कारण मागचेच पालुपद आळवणे या व्यतिरिक्त नवा खुलासा करण्याची क्षमता त्यांच्याकडे नाही.
राफेलबाबत सर्वोच्च न्यायालयात
राफेलबाबत सर्वोच्च न्यायालयात गेलेल्यांची नावे - अरुण शौरी, यशवंत सिन्हा, प्रशांत भूषण.
विलंबाचा मुद्दा दळःला जातोय. प्रक्रियेचे बीजारोपण २००१ मध्ये झाले होते. दुसरी स्टेप २००७ मध्ये घेतली गेली. आता एवढा विलंब झाल्यावर त्यात आणखी दोन वर्षांनी नक्की काय फरक पडणार होता देव जाणे?
३६ विमाने आली की आणखी हवी असली तर चुटकीसरशी येतील हा आशावाद आवडला.
२०१४ पूर्वी राफेल विमानांच्या
२०१४ पूर्वी राफेल विमानांच्या खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचे आरोप भारतीय जनता पक्षाकडून केले जात होते. सुब्रमण्यम स्वामींचे म्हणणे वर एका व्हिडीओत दिलेले आहे. फ्रान्सची डसॉल्ट ही कंपनी वाचवण्यासाठी भारत सरकार गरज नसलेली विमाने विकत घेत आहे असे त्यांचे म्हणणे होते. त्या आधी तर सोनिया गांधीच पुन्हा निवडून याव्यात म्हणून युरोपीय देश देव पाण्यात घालून बसले आहेत अशा पोस्टी, व्हॉट्स अॅप मेसेजेस फिरत. त्यांचा युक्तीवाद होता की युरोपीय देश इटली सरकारला सांगून भारत सरकारला खरेदीला भाग पाडतात. इटली सरकार लगेच सोनियांना फोन करते इत्यादी... हा मनोरंजक भाग इथे द्यायचा नव्हता पण जी विमाने तकलादू आणि निरूपयोगी आहेत ती वेळेत का खरेदी केली नाहीत हा आत्ताचा पवित्रा समोरच्याला सुन्न करणारा आणि नंतर आरओएफएल (राफेल नव्हे) करणारा आहे इतकेच.
So earlier BJP was blaming
So earlier BJP was blaming Congress now it is vice versa. Score settled. देश गेला खड्ड्यात....
https://www.business-standard
https://www.business-standard.com/article/economy-policy/sc-reserves-ord...
शेवटच्या भागात प्रशांत भूषण यांचे आंतर सरकारी करार करण्यासाठी डीपीपीत असलेली एकही अट या प्रकरणात पूर्ण होत नव्हती, हे प्रशांत भूषण यांचे म्हणणे मांडले आहे.
मंदार, कालच्या इंडियन एक्स्प्रेसमध्ये प्रताप भानु मेहतांनी गेल्या पाच वर्षांतला फरक भ्रष्टाचार हा न-मुद्दा नॉन-इश्यु झाल्याचं लिहिलं आहे. टुजीप्रकररणी तेव्हाच्या कॅगची भूमिका पोलोटिकली इन्स्पायर्ड होती, असं त्यांना या सरकाराकडून मिळालेल्या बक्षिसीवरून म्हणलं जातंय.
किरणुद्दीन - मी जेव्हा मटा
किरणुद्दीन - मी जेव्हा मटा वाचला तेव्हाच मला तुमची आठवण झाली. - मटा ला समजले नाही तेव्हाच मला कळले आपल्याला पण शंका आली असेल.
बरेच देश सोवरीन गॅरंटी हा शब्द प्रयोग न करता वेगवेगळे शब्द वापरतात - The government told the Supreme Court Wednesday that no "sovereign guarantee" was given by the French government on the deal for procurement of 36 Rafale fighter jets.
The French government has however given a 'letter of comfort' to India which would be good enough 'governmental guarantee', Attorney General K K Venugopal told a bench comprising Chief Justice Ranjan Gogoi and justices S K Kaul and K M Joseph.
"There is no sovereign guarantee but there is a letter of comfort from France dated September 25, 2015 which says that if there is any exigencies, it would be taken care of by them (France)," Venugopal told the bench.
दोन्हीचा अर्थ तोच. हा करार g2g आहे. कोर्टात प्रतिवादी पक्ष दलिली देतात पण शेवटी जे उरते ते कोर्ट घेते.
मात्र सरकार, तसेच हवाई दलाचे आणि संरक्षण मंत्रालयातील अधिकारी तंत्रज्ञान हस्तांतरणाच्या मुद्द्यावर शेवटपर्यंत ठाम होते. या विमानांचे तंत्रज्ञान जर हिंदुस्तान एयरोनॉटिक्स कडे आले असते तर भविष्यात ते विकसित करण्यासाठी डीआरडीओला मदत झाली असती. भारताला हा टप्पा लवकर गाठता आला असता. त्यामुळे राफेल खरेदी नंतर स्टेट ऑफ द आर्ट टेक्नॉलॉजीशी जुळवून घेणे सोयीचे झाले असते. हे फायदे जास्त महत्वाचे होते. >>> जर हे फायदे जास्त महत्वाचे होते तर मग ते प्रथम लक्ष्य असायला पाहिजे होते एक्सेपटन्स ओफ नेसेसीटी टेक्नॉलॉजी ट्रांन्फर हे प्रथम क्रमांकाचे लक्ष्य असायला पाहिजे होते पण एअर फोर्स ला विमान पाहिजे होते. ट्रांन्फर ऑफ टेक्नॉलॉजी दुय्यम किंवा अजून खालच्या स्थानावर त्यांच्या मते गेली तरी चालेल.
हहगलो
On the ‘letter of comfort’ in
On the ‘letter of comfort’ in place of sovereign guarantee in the Rafale deal...
A sovereign guarantee is given by a sovereign government (France) to another sovereign government (India), guaranteeing enforcement of the terms and conditions of the contract signed under their auspices. A ‘letter of comfort’ is definitely not on a par with a sovereign guarantee. Loosely, it can be said to be a ‘letter of intent’, as is often used in international contracts. Maybe, morally binding but not legally binding and enforceable. Somewhat akin to a ‘sagaai’, betrothal. Either party can break the promise and go their different ways - and with impunity, although the moral aspect will doubtless stick. However, in matters of a buying nation’s commitment based on public funds, it can cause harm to the nation. Surely, it does not give the comfort that the successor of the President or the Prime Minister will honour the terms. If there are voices raised over a problem in a contract, . for example, the successor government may or may not honour what has been promised in a letter. On the other hand, the cost of the contract with bank guarantees would be different as the vendor would have to guarantee the deliverables as per the contract till the time it is made available to the buyer and other terms are fulfilled, that could stretch well up to seven years and more.
In an interview with Manu Pubby, ex-head of MoD finance — in charge of all defence finances of the government in May 2016, months before the Rafale deal — says benchmark price change questionable.
https://economictimes.indiatimes.com/news/defence/letter-of-comfort-give...
मला वाटते इथल्या दोन्ही
मला वाटते इथल्या दोन्ही मतगटांनी थोडा धीर धरावा, नोटाबदलीबद्दलही मायबोलीवर असाच तात्कालिक उहापोह झाला, आज त्या धाग्यावर त्याचे समर्थन करणार्यांच्या पोस्ट वाचल्या तर हसूही येत नाही, फक्त वाईट वाटते, इथेही तसेच होईल. अर्थात तिथे भक्तांचा उत्साह पराकोटीचा होता इथे तसे काहीच झाले नाही हा बदल देखील लक्षणीय आहे.
हे वाचून इन्ट्रुजनचं
हे वाचून इन्ट्रुजनचं ट्रान्स्ग्रेशन कसं झालं ते आठवलं (चिनी फौजा)
...
हे आणखी काय?
https://scroll.in/latest/901995/former-civil-servants-write-open-letter-...
दोन्हीतला फरक खाली दिला आहे
दोन्हीतला फरक खाली दिला आहे.
http://www.thelegalstop.co.uk/blog/?p=1829
चितळे साहेब बास करा हो. सांगून देखील तुम्ही वाद घालत आहात. मला चुकीची माहिती नकोय
आगाऊ,
आगाऊ,
२०२४ ची मरती गाय तर वाचवूच,
पण २०१९ ला जो तांडा कत्तलखान्यात नेला जात आहे , त्याला वाचवायला जेमतेम ६ महिनेच राहिलेत
त्यामुळे वाट पाहण्याचा तुमचा सल्ला कितीही लॉजिकल असला तरी व्यवहार्य नाही
अर्थात तिथे भक्तांचा उत्साह
अर्थात तिथे भक्तांचा उत्साह पराकोटीचा होता इथे तसे काहीच झाले नाही हा बदल देखील लक्षणीय आहे.>> हा विषय बहुतेक भक्तांच्या डोक्याबाहेरचा आहे.
आगाऊ , मतभेद असावेत. पण
आगाऊ , मतभेद असावेत. पण मताऐवजी हवे तसे अर्थ काढणे. तुम्हाला समजले नाही, मटाला समजले नाही अशा शेरेबाजीला मत कसे म्हणावे ?
Simba most of the voters are
Simba most of the voters are in confused state now and opposition is not united so I think 2019 BJP may come back to power but not with majority like 2014. Even though MP, Chattisgad and Rajasthan may give some boost to opposition. Most of the opposition don't want Rahul as PM. Mayawati, Akhilesh everyone want to become PM. Anyway let's see and also this is not the subject of this thread.
most of the voters are in
most of the voters are in confused state now and opposition is not united so I think 2019 BJP may come back to power but not with majority like 2014.
बरोबर, सहमत.
राहुल च्या म्हणण्यावर लोकांचा विश्वास बसू नये म्हणूनच तर चितळे सरांनी राहुल ची अक्कल काढणारा परिच्छेद टाकला आहे ना
त्यामुळे सामान्य लोकांनी या नरेतीव्ह मधल्या तृटी लोकांसमोर आणणे भाग आहे, कोर्टच काय ते सांगेल असे म्हणून शांत बसणे चूक ठरेल
Anyway let's see and also this is not the subject of this thread.
सहमत
कोण सत्तेत येईल याचा इथे
कोण सत्तेत येईल याचा इथे संबंध नाही. धागा भरकटेल.
Pages