ह्या आधीचे
https://www.maayboli.com/node/67787
भाग २ – वारंवार पडणारे प्रश्न व अंततः
प्रश्न १ – मोदी सरकारने वाटाघाटी केल्या नंतरची रफालची किंमत यूपीए सरकारने ठरवल्या पेक्षा जास्त आहे का.
उ१- यूपीए सरकारच्या वेळेस सुरू झालेल्या वाटाघाटी पूर्णत्वास गेल्या नव्हत्या त्यामुळे अपूर्ण राहिलेल्या वाटाघाटीतून उद्भवणारी किंमत व पूर्णत्वाला पोहोचलेल्या वाटाघाटींच्या किमतीची आपण तुलना करू शकत नाही. वाटाघाटी ‘किमतीच्या अंदाजे आकड्यावर’ आधारलेल्या असतात. हा ‘किमतीचा अंदाजे आकडा’ नवीन नवीन मिळणाऱ्या माहिती नुसार बदलत राहतो. कोठल्याही वाटाघाटी करायच्या आधी एक कार्य समिती ‘किमतीचा अंदाजे आकडा’ म्हणजेच ‘बॉलपार्क प्राइस’ किंवा ‘बेंचमार्क प्राइस’ तयार करते. असल्या अत्यंत प्रगत तंत्रज्ञानावर आधारित वस्तूंची किंमत बाजारात उपलब्ध नसते त्यामुळे वेगवेगळ्या माहितीवर व समितीच्या अनुभवावर एक किमतीचा अंदाजे आकडा बॉलपार्क प्राइस ठरवला जातो व त्याला मध्य मानून वाटाघाटींना सुरवात करतात. जेव्हा केव्हा वाटाघाटी पूर्णत्वाला पोहोचतात तेव्हा अशा ठरलेल्या किमतीच्या वैधतेचा काल करारात नमूद करतात. आता युपिएच्या सरकारात २०१४ पर्यंत रफाल बाबत करारच झाला नसल्या कारणाने अर्धवट वाटाघाटींची अर्धवट किंमत व अशा वैधता नसलेल्या अर्धवट किमतीला काही अर्थ नाही, ना त्याचा काही उपयोग.
पण तरी सुद्धा वाटाघाटी पूर्णत्वाला पोहोचलेल्या ३६ रफाल ची किंमत अर्धवट वाटाघाटीच्या यूपीए पेक्षा कमीच आहे परत त्यात ५० टक्के ऑफसेटचे (व्यापारातला भारतीय भाग) नवीन कलम आहेच (ऑफसेट काय असते ते भाग ३ परिच्छेद ६ (ग) मध्ये वाचायला मिळेल) (पण येथे थोडक्यात देतो – ऑफसेट (व्यापारातला भारतीय भाग) असणे भारतीय कंपन्यांसाठी अत्यंत फायदेशीर असते. त्यात जर ५० टक्के ऑफसेट असेल तर सौद्याच्या ५० टक्के किमतीचा व्यापार व व्यवसाय भारतीय कंपन्यांना परदेशातील करार झालेल्या कंपनीला द्यायला लागतो. एका अर्थाने ५० टक्के पैसा परत भारतात येतो. चीन मध्ये हा १०० टक्क्यावर जाऊ शकतो).
परत नियंत्रक महालेखा परीक्षक – कंपट्रोलर ऑडिटर जनरल (CAG) किमतीची बारकाईने चौकशी करून निवाडा देतीलच. तो पर्यंत अर्धवट वाटाघाटीतून निघणारी किंमत व पूर्णत्वाला पोहोचलेल्या व करार झालेल्या किमतीची तुलना करणे म्हणजे पेरू बरोबर आंब्याच्या किमतीची तुलना करण्या जोगे चुकीचे ठरेल.
प्रश्न २ – जर वाटाघाटी करून किंमत यूपीए पेक्षा कमी असेल तर मग ३६ रफाल विमानेच का १२६ रफाल विमाने का नाही घेतली.
उ २- ३६ ऱफाल चे वितरण सप्टेंबर २०१९ पासून सुरू होऊन ते दोन तीन वर्षात भारतात येतील. पाहिल्या वर्षी ०६ दुसऱ्या वर्षी १२ व तिसऱ्या वर्षी १८ असे काहीसे वितरण असेल. त्या काळात हिंदुस्तान एरोनॉटीक्स एलसीए तेजस ह्या लढाऊ विमानाचे उत्पादन वाढवून भारतीय वायुसेनेला त्याचे वितरण करायला लागले असेल व ह्यामुळे सार्वजनिक क्षेत्रातल्या कंपनीला डिफेन्स पिएसयू (DPSU) व्यवसाय उपलब्ध होऊन फायदा होईल. नाहीतर युपिएच्या काळात ३ वर्ष झाली तरी वाटाघाटी संपत नव्हत्या. ह्याचे कारण असे की दासू (रफालची कंपनी) ह्या कंपनीला भारतातील हिंदुस्तान एरोनॉटीक्स ला ToT देण्यात गुणवत्ते विषयक शंका असल्या कारणाने अजून ५ ते ७ वर्षात तरी वाटाघाटी पूर्णत्वाला येतील असे वाटत नव्हते एवढेच काय अशा रखडलेल्या वाटाघाटींमुळे कधी कधी पूर्णं प्रकल्पच गुंडाळून ठेवला जातो व असे झाले असते (त्याची शक्यता दाट होती) तर भारतीय वायुसेनेला विमानांपासून वंचित राहायला लागले असते व त्याच बरोबर हिंदुस्तान एरोनॉटीक्सचे सुद्धा हातचे काम गेले असते (१०८ विमाने बांधण्याचे).
आता ३६ विमानांचा करार झाला आहे. त्याच बरोबर पुढे वाटले तर त्या वेळेच्या सरकारला जास्तीची ऱफाल विमाने घेण्यास कोणी थांबवले नाही व एकदा वाटाघाटी होऊन करार झाला की पुढच्या वाटाघाटींसाठी अनायासे किमतीचा अंदाजे आकडा बॉलपार्क प्राइस रक्षा समितीकडे आपोआप मिळालेला असेल त्यामुळे पुढच्या वाटाघाटी सुकर व पटकन संपू शकतात.
पण ह्या पेक्षा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न उद्भवतो. व तो म्हणजे आपल्या देशाला खरोखरच १२६ ऱफालची गरज आहे का – हा प्रश्न.
प्रश्न ३ – आपल्या देशाला १२६ ऱफालची गरज आहे का.
उ ३ – ह्या उत्तरासाठी आपण सापेक्ष व प्रामाणिकपणे विचार करायला हवा. मी ऑक्टोबर २०१५ मध्ये मनोहर पारिकरांना एक पत्र लिहिले होते. अंग्रेजी मध्ये होते पण त्या पत्राचा ह्या विषयास अनुशंघून असलेला भाग, मराठीत देत आहे. त्या पत्रात रफालची विमाने १२६ पेक्षा कमी का घ्यावीत ह्याचा तर्क दिलेला आहे तो वाचावा –
मूळ पत्र इंग्रजीत होते व त्यातला जो विषयास अनुशंघून भाग आहे तो मराठीत देत आहे
“………………………… Along with technology the combat scene has under gone a change and military aviation has grown into a superior tactical and strategic arm. Present day fighter aircrafts carryout tasks of several aircrafts in one single modern fighter aircraft. With the fantastic capabilities, the emphasis is not on numbers but it is on ‘smart’ capability. This can be seen from the fact that the Royal Air Force and the French Air Force, undertake world-wide commitments with just 225 aircraft of two types each, the French Air Force with the Rafale and Mirage-2000 and the Royal Air Force with Tornadoes and Typhoons.
Now we are going for a smart plane in Rafale. I heard CHIEF OF AIR STAFF saying they require more Rafales. It is natural to ask for moon as a head of organisation. No head of an organisation would sincerely trim the organisation except for private entrepreneurs. For public funded organisations we see that they get inflated over a period of time. There are 42 squadrons of MIG now slowly getting depleted. No Chief of Air Staff would say that with smart fighter planes we don’t require so many squadrons. Every organisation on public money tends to grow and never try to scale down the force. As a head of the three services I urge to look into this aspect - do we really need all 42 squadrons. 42 Squadrons were when MIG of low technology fighter was available. I know that cutting down number of squadrons is not easy and opposition may make mountain out of a mole. At the same time there is no need to equip all squadrons with costly smart planes. That way we can have a healthy mix of smart and not so smart planes. ………………………………………………………..”
पत्र पुढे दुसऱ्या विषयावर जाते. येथे त्याचा संबंध नाही म्हणून उद्धृत करत नाही.
प्रश्न ४ – ऱफालवर बसवण्यात येणारी शस्त्रप्रणाली मोदी सरकारने बदलली आहे का. यूपीए सरकारच्या वेळेला जी शस्त्रसामुग्री ठरवली होती तीच आहे का.
उ ४ – यूपीए सरकारच्या वेळेला, भारतीय वायुदलाने ज्या शस्त्रप्रणालीची चाचणी केली होती व हिरवा कंदील दाखवला होता तीच शस्त्रप्रणाली ह्या करारात कायम ठेवलेली आहे. ह्या बरोबर दासू कडून केल्या जाण्याचा विमानाचा रखरखावं व विमानाची देखरेखीचा काळ दासू कडून वाढवून घेतला आहे व ५० टक्के ऑफसेट पण लागू केले गेले आहे. हे सगळे आपल्या देशाच्या दृष्टीने हितकारकच आहे.
प्रश्न ५ – बोफर्स हा अंतर सरकारी गोव्हर्नमेट टू गोर्व्हनमेट G2G करार होता का.
उ ५- नाही. बोफर्स हा करार भारत सरकार (रक्षा मंत्रालय) व स्वीडनची बोफर्स तोफा बनवणारी कंपनी ह्या मध्ये झाला होता. त्या वेळेला क्वात्रोची (इटालियन व्यापारी व गांधी घराण्याचा जवळचा स्नेही) ह्यांनी हा करार घडवण्यात मदत केली होती.
प्रश्न ६ – बोफर्स करार संरक्षण खरेदी प्रक्रिया डिफेन्स प्रोक्यूरमेंट प्रोसीजर (DPP) प्रमाणे झाली होती का.
उ ६ – नाही. त्या वेळेला (१९८७ च्या सुमारास) डिपिपि अस्तित्वात नव्हती. पाहिली जलद खरेदी प्रक्रिया किंवा फास्ट ट्रॅक प्रोसीजरचे धोरण वर्ष २००१ (वाजपेयी सरकार) च्या वेळेस तयार झाले. वाजपेयी सरकारला त्या वेळेस वाटले रक्षा खरेदीसाठी एक पारदर्शी प्रक्रिया असली पाहिजे म्हणजे भ्रष्टाचार व पैसा चारू लोकं (मिडलमेन) कमी होतील. त्यासाठी धोरण ठरवायचे ठरले. व लागलीच वाजपेयी सरकारा असताना डीपिपि बनवण्यासाठी सल्लामसलती सुरू होऊन पाहिले डिपिपि २००५ साली प्रसिद्ध झाले. त्या वेळच्या संरक्षण मंत्र्यांनी श्री प्रणव मुखर्जी ह्यांनी ह्या धोरणावर सही करून डिपिपि २००५ मध्ये प्रसिद्ध केले. तो पर्यंत रक्षा खरेदी कोठल्याही ठोस धोरणां अभावी मनमानेल तशी केली जायची व म्हणूनच त्यावळचे रक्ष करार भष्टाचारा पासून अलिप्त राहू शकत नव्हते. पण DPP आल्या पासून (२००५) हे चित्र बदलायला सुरवात झाली.
प्रश्न ७ – ऱफाल डिफेन्स प्रोक्यूरमेंट प्रोसीजर डिपिपि वर आधारीत आहे का (भाग ३ परिच्छेद १ ते ८ वाचावे).
उ ७ – जेव्हा अंतर सरकारी समन्वय किंवा गोव्हर्नमेंट टू गोव्हर्नमेंट करार होणार असतो तेव्हा दोन्ही सरकाराला करार कसा करावा ह्या बद्दल बरेच स्वातंत्र्य असते. सरकारावर डिपिपि धोरणानेच जायचे असे बंधन नसते. खरे तर मोदी सरकारला मध्यम वजनाची युद्ध विमाने मीडियम मल्टी रोल कॉम्बॅट एअरक्राफ्ट्स (MMRCA) बनवणाऱ्या लॉकहिड मार्टीनची एफ् १६, बोईंगची एफ्/ए १८, युरोफायटर टायफून, रशियन मिग ३५, स्वीडनची साब ग्रिपेन व फ्रांसची रफाल ह्या सारख्या कोणत्याही देशाच्या सरकारांबरोबर बोलणी व वाटाघाटी करण्याचे स्वातंत्र्य अंतर सरकारी करारात होते. जर अशा कोणत्याही देशा पासून मीडियम मल्टी रोल कॉम्बॅट एअरक्राफ्ट्स खरेदी केले गेले असते तरी ते गैर ठरू शकले नसते.
पण महत्त्वाचा भाग हा आहे की हे स्वातंत्र्य असताना देखील मोदी सरकारने तेच विमान व तीच कंपनी निवडली जी अगोदर आपल्या देशाने २०११ मध्ये डिपिपि प्रक्रिये मार्गे निवडली होती. त्यामुळे मोदी सरकारला एक भरभक्कम नैतिक बळ प्राप्त झाले कारण तांत्रिकी चाचणी व उड्डाण चाचणीतून निवडून येऊन परत दासूची बोली पण सगळ्या विमानात कमी होती. त्यामुळे ह्या प्रश्नाचे उत्तर म्हणजे जरी डिपिपि ने न जाण्याचे स्वातंत्र्या मोदी सरकारला होते तरी सुद्धा हा अंतर सरकारी करार डिपिपि वर आधारीतच केला गेला आहे.
प्रश्न ८ – साठी दासूला रिलायन्स सारख्या भारतीय कंपन्यांबरोबर व्यवसाय करायला मोदी सरकारने सुचवले का.
उ ८ – नाही. मूळ उपकरण निर्माता - ओरिजनल इक्विपमेंट मॅन्यूफॅक्टरर (OEM) इथे दासू कंपनीला पूर्ण स्वातंत्र्य आहे. ते कोणत्याही भारतीय कंपनी बरोबर बोलणी करून करार करू शकतात. फक्त त्या कंपन्यांना डिपार्टमेंट ऑफ इनडस्ट्रीयल पॉलिसी आणि प्रमोशन (DIPP) कडून परवाना उपलब्ध असला पाहिजे. त्याच बरोबर असे करार अपेंडीक्स अ अध्याय ३ डिपिपि मध्ये दिल्या प्रमाणे झाले पाहिजेत. परत एक अट अशी आहे की जो मूळ निर्माता आहे त्याने त्याच्या इतर छोट्या कंपन्या जर मध्ये भाग घेऊ शकल्या नाहीत तर त्यांचा ही वाटा स्वीकारून त्यांची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेऊन पूर्ण केला पाहिजे. एवढे केले तर भारतीय कोणती कंपनी निवडायची ह्याचे स्वातंत्र्य दासू कंपनीला आहे.
२०११ मध्ये हिंदुस्तान एरोनॉटीक्स बरोबर ToT साठी बोलणी सुरू होती (इथे ToT चा अर्थ विमानाचे भाग जुळवणे व विमान तयार करणे असे घ्यावे लागेल. मी मागे दिल्या प्रमाणे ToT मध्ये वेगवेगळे स्थर आहेत, त्या मुळे कोणी ToT म्हटल्यावर पूर्णं राफेल विमानाचे निर्माण ToT मुळे हिंदुस्तान एरोनॉटीक्स करायला लागले असते असे उगाच वाटून हुरळून जाऊ नये).
पण राफेलच्या जुळवणी करण्याच्या ToT ला सुद्धा दासूला वावगे होते व ते २०१२ ते २०१५ च्या निष्फळ वाटाघाटींतून दिसून येते. जर त्या वाटाघाटी तशाच चालू ठेवल्या गेल्या असत्या तर अजून काही वर्ष रखडून शेवटी रफाल करार कधी न होणारा होऊन रफा दफा झाला असता. २००१ मध्ये वायुसेनेने त्यांच्या १५ वर्षाच्या लॉग टर्म पर्स्पेक्टीव्ह प्लॅन प्रमाणे MMRCA ची गरज प्रदर्शित केली होती. ह्या गोष्टीला १५ वर्ष होऊन त्यांच्या हाती काही लागले नव्हते. अजून विलंब झाला असता तर त्यांच्या लॉग टर्म पर्स्पेक्टीव्ह प्लॅन वर परिणाम झाला असता व आपल्या वायुसेनेचे मनोबळ खचले असते.
प्रश्न ९ – फ्रान्सच्या पूर्व प्रधानमंत्र्यानी एका मुलाखतीत असे म्हटले की मोदी सरकारने रिलायन्सचे नाव घेऊन दासूला सांगितले की रिलायन्स बरोबरच व्यापार करा व म्हणून तहत दासूला हिंदुस्तान एरोनॉटीक्स एचएएल सोडून रिलायन्स बरोबर व्यापार करावा लागला.
उ ९ – ह्या मुलाखती नंतर ह्याच पंतप्रधानांनी आपले वक्तव्य मागे घेतले होते. त्यामुळे भारतीय लोकांमध्ये गोंधळ उडवण्यासाठीच असले वक्तव्य दिले होते की काय ह्याची शंका येते. परत असले वक्तव्य त्यांच्या भारतीय मित्रासाठी समन्वय साधून केले की काय ह्याची पण शंका येते कारण असे वक्तव्य येण्या अगोदरच्या आठवड्यात एका विरोधी पक्षाच्या नेत्याने ट्विट करून भाकीत केले होते की एक हादरून टाकणारे वक्तव्य पुढच्या आठवड्यात येणार आहे त्यामुळे ही शंका!!!! राजकारण वेगळे सोडले तर, ज्यांना डिफेन्स परवाने मिळालेले आहेत अशा सगळ्या कंपन्यांची यादी DIPP कडे असते व त्यांना माहीत असते कोणती भारतीय कंपनी कोणत्या क्षेत्रात व्यापार करतात. व एखाद्या करारात जर करार करणाऱ्या देशाने विचारले तर कंपन्यांची नावे सांगायचे पूर्ण स्वातंत्र्य DIPP ला आहे. अशी नावे उपलब्ध करून द्यायची हे DIPP चे एक काम आहे. नाहीतर परदेशी कंपनीला त्यांचा वेळ घालवून कंपन्या शोधत हिंडावे लागेल. काही कंपन्या त्यांना कधीच मिळणार नाहीत व त्यामुळे अजाणतेपणे त्यांच्या बरोबर व्यापार केला जाऊ शकणार नाही त्यामुळेच DIPP कडे आपल्या भारतीय कंपन्यांची जाहिरात करण्याचे मोठे काम आहे. तेव्हा जर कोणी सुचवू पाहतं असेल की मोदी सरकारने भारतात व्यवसाय करण्याकरता कंपन्यांची नावे जाहीर केली तर त्याला भारतीय उद्योगां बद्दल माहिती कशी दिली जाते व त्याची प्रक्रिया काय व त्याचे धोरण काय ह्या कशाची माहिती नाही हेच जाहीर होते. उगाच उचलली जीभ व लावली ताळ्याला असे झाले म्हणायचे.
प्रश्न १० – ह्या करारा अंतर्गत रफाल बरोबर उद्योग करणाऱ्या कोणकोणत्या कंपन्या आहेत.
उ १० – (भाग ३ परिच्छेद ६ (ग) वाचावा). ७० पेक्षा जास्त भारतीय कंपन्या ज्यात डीआरडीओ व प्रायव्हेट कंपन्या पण शामील आहेत. ह्या कंपन्या रफाल बरोबर व्यवसाय करायला सज्ज आहेत. (गुगल वरून डाऊनलोड - अजून कंपन्या पण आहेत त्यात पण हे फक्त दर्शवण्यासाठी देत आहे - रीलायन्स कडे साधारण ३ टक्के ऑफसेट).

प्रश्न ११ – ToT तंत्रज्ञानाचे हस्तांतरण रफाल करारातून का वगळले गेले.
उ ११ – ToT वगळल्या शिवाय वाटाघाटी पुढे सरकत नव्हत्या. जर पुढे सरकणाऱ्या असत्या तर २०१२ मध्येच यूपीए सरकार असताना तो करार झाला असता. २०११ साली सगळ्यात कमी बोलीवर व बाकीच्या निकषांवर रफालची निवड होऊन सुद्धा २०१५ पर्यंत ToT मुळे वाटाघाटी पूर्णत्वाला पोहोचू शकल्या नाहीत ह्याचाच अर्थ हे कलम जर असच कायम ठेवले असते तर अजून पर्यंत वाटाघाटी पूर्ण झाल्या नसत्या व करार झाला नसता. ह्या कराराचे प्राथमिक उद्दिष्ट वायुसेनेच्या लॉंगटर्म पर्स्पेक्टीव्ह प्लॅन प्रमाणे त्यांना MMRCA विमाने उपलब्ध करून देणे होते, ToT हे जाता जाता जमले तर चांगलेच असे दुय्यम उद्दिष्ट. प्राथमिक उद्दिष्टच जेथे रखडले व पुरे होत नाही असे दिसत असेल तर दुय्यम उद्दिष्टावर नजर लावून बसण्यात काय अर्थ आहे. आणि जर दुय्यम उद्दिष्ट साध्य करायच्या नादात प्राथमिक उद्दिष्ट संपुष्टात येत आहे असे दिसत असेल तर दुय्यम उद्दिष्ट प्राप्त होण्यात काही अर्थ नाही. ह्याच दृष्टिकोनातून ते वगळले गेले. नाही तर विमाने आली नसती व ती येत नाहीत म्हणून ToT पण झाले नसते.
प्रश्न १२ – रफाल ची किंमत सार्वजनिक का करत नाहीत. किमतीची चर्चा का होऊ देत नाही. करारात सुरक्षे संबंधीत कोणते कलम आहे की जेणे करून त्याची किंमत सार्वजनिक होऊ शकत नाही.
उ १२ – प्रत्यक रक्षा करारात कोणत्या गोष्टी सार्वजनिक करण्यास मोकळ्या व कोणत्या गोष्टी गुप्त ठेवायच्या ह्याची कलमे असतात. जर त्याची किंमत सार्वजनिक केली गेली तर आपल्या शत्रू राष्ट्रांना आयतेच किमतीच्या अंदाजाचे आकडे उपलब्ध होतील. त्यावरून त्यांना कोणती शस्त्र आपण विकत घेत आहोत ह्याचा अंदाज लावता आला असता. शत्रू राष्ट्राला एकदा अंदाज लागला की त्या शस्त्राला तोड म्हणून त्याला मारक अशी शस्त्रप्रणाली विकत घेऊन तो आपल्याला शह देऊ शकतो. युद्धाचा हाच खेळ असतो. शस्त्र – त्याला तोड. त्या तोडाला तोड. हे सगळे जे कमी वेळात करू शकतात ते जिंकतात. सगळ्या गोष्टी सार्वजनिक करून आपण आपल्या शत्रू राष्ट्रांना एक प्रकारे मदतच करतो.
प्रश्न १३ – अंबानींना विमान बनवण्यात अनुभव आहे का.
उ १३ – त्यानी पिपावाव कंपनी विकत घेतली जी बरीच वर्ष डिफेन्स प्रॉडक्शन मध्ये होती. बाकी कंपनी कशी आहे ते दासू ने जाणून घ्यायचे त्यांचा निकष महत्त्वाचा ऑफसेट त्यांनी फेडायचे आहे.
अंततः - मी हा लेख लिहिण्या मागचे उद्दिष्ट असे की वर्ष २००१ पासून रक्षा संपादन हे मन मानेल तसे कसे ही होत नाही तर त्या संपादना मागे एक कायदेशीर प्रक्रिया उभारली गेली आहे. ती प्रक्रिया पारदर्शक बनवण्याच्या धोरणातून निर्माण झाली आहे. आता ती पूर्वी सारखी भ्रष्टाचाराला चारा घालणारी राहिली नसून त्याला आळा घालणारी झाली आहे. अंतर सरकारी करार अशा प्रक्रियेला अजून मजबुती देतो, जिथे भ्रष्टाचारी लोक नाही तर थेट आपले सरकार दसर्या सरकारशी बोलून काय पाहिजे ते विकत घेते.
हा लेख विशेष करून तरुणांना व नवीन पिढीला वाचून दाखवायला हवा. त्यामुळे त्यांच्यात अपप्रचाराने निर्माण झालेला संदेह जाऊन आपल्या धोरणांवर व रक्षा संपादन प्रक्रियेवर विश्वास बसू शकेल. प्रत्येक रक्षा खरेदी भष्टाचारातून निर्माण झालेली नसते हे त्यांना समजले पाहिजे. जे काही नेते व काही पक्ष अपप्रचार करून विश्वास तोडण्याचे काम करत आहेत ते त्यांच्या स्वत:च्या भवितव्याच्या व पक्षाच्या अस्तित्वाच्या संभ्रमातून उद्भवलेली त्यांची गरज आहे व त्यामुळे वास्तव बिघडवण्याचा प्रयत्न आहे.
मला खात्री आहे जो पक्षाध्यक्ष भ्रष्टाचाराचा आरोप करत आहे त्याला डिपिपिचा लवलेशही माहीत नसणार ना जाणून घ्यायची त्याच्या कडे कुवत आहे ना इच्छा आहे. त्याला फक्त लोकांना गोंधळात टाकून संभ्रम उत्पन्न करायचा आहे. तो फक्त शिकवलेली पोपटपंची करून स्वतःचा टीआरपी रेटिंग वाढवण्याच्या नादात वावरत आहे.
तिसरा भाग लवकरच –
http://rashtravrat.blogspot.com/2018/10/all-you-want-to-know-about-rafal...
(क्रमशः)
रणजितजी छान माहिती! पुलेशु.
रणजितजी छान माहिती! पुलेशु.
भरत - त्यांच्या अखत्यारीत
भरत - त्यांच्या अखत्यारीत याबाबतच्या अनेक प्रक्रिया जलदगतीने पार पडल्यात, तेही बोफोर्सचे सावट असताना.
ज्या मुद्द्यावर गाडं अडलं होतं, तो निकालात काढण्यासाठी मोदींनी ऑर्डर कमी केली आणि बदलली. >>>
कोणत्या. उलट फौजेतील लोक हसायची की दहा वर्षात काही पुढे ढकलले गेले नाही. ना तोफा, ना CCR, ना AD Wpns इत्यादी.
सिम्बा - बरोबर आहे, ती माहिती कोण्या कर्नल चितळे किंवा सिम्बा ला सांगायची गरज नाही, पण सुप्रीम कोर्ट विचारेल तेव्हा त्यांनि देणे अपेक्षित आहे, लोकशाही प्रक्रियेला ते धरून असेल, आणि सामान्य माणसाला ही माहिती कोर्टामार्फत विचारायचा अधिकार आहे, लोक तो बजावत आहे, त्याबद्दल विरोधी पक्षाला तुच्छतेने वागवायची गरज नाही.>>>
विचारूदे दिले नाही तर मग बोलूया त्यावर.
इकडे आपण "नॉर्मली" अभ्यास असतो असे म्हणूया, सरकार कडे अभ्यासपूर्ण निर्णय घ्यायची परंपरा असती तर आधार, बँक डिपॉझिट, भूमी अधिग्रहण हे निर्णय फिरवावे लागले नसते, >>> आधारात काय फिरवले, जनधन तर यशस्वी प्रक्रिया आहे. भूमी अधिग्रहण मध्ये राज्य सभेत पाठींबा नव्हता............
साधी नोट बदलताना ATM री कलिब्रेट करावे लागेल इतकी अक्कल नव्हती यांना, तेव्हा यांच्या अभ्यासाच्या गोष्टी सांगू नका.
तेव्हा इतर वेळी अभ्यास होतो, म्हणून या वेळी झाला, आणि मी मागे नमूद केलेले कोणाईही मुद्दे ड्रायव्हर नव्हते असे तुमचे मत असेल, पण माझे मत मी जास्त माहिती मिळाल्यावर बनवेन - मत बनवा ना कोणी थांबवले आहे. नोटबंदीवर सुद्धा आपली मते आहेत तशी माझी आहेतच.
हो असे म्हणाला नाहीत. त्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या विरोधीपक्षीयांची अक्कल काढलीत. >>> मी म्हणालो म्हणून थोपवलेले काढून घेतले ते बरे झाले.
mandard - इथे सिंबा जेवढे लिहितात त्याच्या 5%पण रागाला हा मुद्दा मांडता येत नाही लोकांसमोर आणि हाच मोदींचा सगळ्यात मोठा प्लस पॉईंट आहे. >>>> हेच तर मी म्हणतो - मला खात्री आहे जो पक्षाध्यक्ष भ्रष्टाचाराचा आरोप करत आहे त्याला डिपिपिचा लवलेशही माहीत नसणार ना जाणून घ्यायची त्याच्या कडे कुवत आहे ना इच्छा आहे. त्याला फक्त लोकांना गोंधळात टाकून संभ्रम उत्पन्न करायचा आहे. तो फक्त शिकवलेली पोपटपंची करून स्वतःचा टीआरपी रेटिंग वाढवण्याच्या नादात वावरत आहे.........
उदय - राफेल बद्दल चर्चा होत असताना CBI च्या माजी सन्चालकान्ना (वर्मा) तसेच अजुन एकाला (अस्थाना) रजेवर पाठवले हे मुद्दे का दुर्लक्षले आहेत ? वर्मा यान्नी राफेलची फाइल मागवली होती हे कारण आहे का? CBI च्या अधिकार्यान्वर लक्ष ठेवायला IB, सन्शयास्पद हालचाल करतान्ना पोलिसान्नी पकडलेले अधिकारी पण IBचे. हे काय चालले आहे? ?>>> हे झाले ते दुर्दैवी नक्कीच. पण वर्माने स्वतः सांगितले की रफाल बद्दल ची फाईल वगैरे काही मागितली नव्हती. परत cbi मध्ये जे चालले आहे ते समाजातजी नैतिकता आहे त्याचे प्रतिबिंबच आहे - माझ्या लेखात अशा प्रकारचा उल्लेख आलेलाच आहेि -
डिपिपि जरी खूप प्रभावी खरीद प्रक्रिया असली तरी त्यात सगळ्या खाजगी व सार्वजनिक संस्थानांच्या खरेदी प्रक्रियेमध्ये आढळणारे दोष आढळू शकतात. खरेदीच्या वेळी होणाऱ्या भ्रष्टाचारावर जरी कितीही पायबंद ठेवला तरी भ्रष्टाचार कधीकधी डोके वर काढू शकतो. डोके वर काढण्याचे मूळ कारण प्रक्रियेतील कमी हे नसून आपल्या देशाच्या नैतिक मूल्यांचा एकूणच ऱ्हास हे कारण असू शकते. कोणत्याही संस्थेची नैतिक मूल्ये ती संस्थाघडवणाऱ्या लोकांच्या विवेकी बुद्धीने बनलेली असतात. संस्थेची नैतिक मूल्ये किती चांगली व मजबूत आहेत ती त्यातल्या मनुष्य घटकांच्या मूल्यांवर आधारीत राहतात. त्यामुळे डिपिपि असून सुद्धा खरीद प्रक्रियेत जे दोष आढळतात ते समाजातल्या नैतिक मूल्यांच्या प्रतिबिंबामुळे. कोणतीही प्रक्रिया जर मनुष्य ठीक नसेल तर चालू शकत नाही व जर प्रक्रियाच चुकीची असेल तर मनुष्याला त्याचा काहीच उपयोग नाही.....
डिपिपि मध्ये IGA साठी दोन परिच्छेद आहेत ७१ व ७२. रफाल करार ७२ परिच्छेद खाली येतो. परत वाचा. डिपिपि २०१६ मध्ये १०३ व १०४
मोबाईल , बँक खाती इत्यादी
मोबाईल , बँक खाती इत्यादी ठिकाणी आधार जोडायचा सरकारचा निर्णय सर्वोच्च न्यायालयात टिकलेला नाही.
भूमी अधिग्रहण, FRDI , cattle trade विधेयक्/वटहुकूम मागे घ्यावे लागले.
डीपीपी कडे जाऊया.
पॅरा ७१ मध्ये कोणत्या तीन परिस्थितींत आंतर सरकारी करार करता येतो ते सांगतो. The following cases would fall under the preview of this provision: अशी शब्दयोजना आहे. राफेल तीनपैकी कोणत्याही अटींत बसत नाही.
पॅरा ७२ दीर्घ मुदतीच्या आणि अधिक मूल्याच्या प्रणाली घेताना कोणती अधिक काळजी घ्यावी , ते सांगतो. it may be advisable to enter into a separate Inter Government Agreement (if not already covered under an umbrella agreement covering all cases) अशी शब्दयोजना आहे. म्हणजे खरेदीप्रक्रिया आंतर सरकारी करारात व्हावी असे म्हटलेलं नसून, ती ओग्य पद्धतीने झाल्यावर अधिक खबरदारी म्हणून आंतरसरकारी करार करावा, असे म्हटले आहे.
घरी २०११ मधली बिझिनेस स्टँडर्डची एएरो इंडिया बद्दलची प्रायोजित पुरवणी निघाली. त्यात या खरेदीची प्रक्रिया अपेक्षेपेक्षा वेगात होत असल्याचं निवृत्त हवाईदल अधिकारी जसजित सिंग यांचं मत आहे.
उरलेल्या १०८ विमानांच्या भारतातल्या निर्मितीच्या मुद्द्यावर गाडं अडलं, तो मोदींनी गुंडाळूनच टाकला. यालाच मेक इन इंडिया म्हणत असावेत.
तुम्ही युपीएच्या काळातल्या कारभाराबद्दल लिहिलेत. मोदींच्या काळात माजी सैनिकांना आंदोलन आणि उपोषण करावं लागलं, तक्रार करणार्या सैनिकांचे व्हिडियो आले, सैन्यदलाने डिफेन्स बजेट अपुरे असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.
{मोदींच्या काळात माजी
{मोदींच्या काळात माजी सैनिकांना आंदोलन आणि उपोषण करावं लागलं, तक्रार करणार्या सैनिकांचे व्हिडियो आले, सैन्यदलाने डिफेन्स बजेट अपुरे असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.}
---------त्यांना देशभक्तीचा लवलेशही माहीत नसणार ना जाणून घ्यायची त्याच्या कडे कुवत आहे ना इच्छा आहे. त्यांना फक्त लोकांना गोंधळात टाकून संभ्रम उत्पन्न करायचा आहे. ते फक्त शिकवलेली पोपटपंची करून स्वतःचा टीआरपी रेटिंग वाढवण्याच्या नादात वावरत आहेत.........
भरत - orop जे इंदिरा गांधीने
भरत - IGA ला दोन्ही कलमे आहेत. ७१ व ७२.
orop जे इंदिरा गांधीने १९७२ मध्ये बंद केले होते ते ४० वर्षानी एनडीए ने लागू केले. उलट सैनिकांचे कोडे सोडवले.
http://rashtravrat.blogspot.com/2015/09/orop-issue.html
२०११ पर्यंत करार ठिकच चालला होता पण अडकला TOT मुळेच. बरोबरच आहे कहाणी नंतरच आहे माझ्या लेखात हेच म्हटले आहे.
हेला - ..........pass. नेहमी सारख्या मुद्देसूद, तर्कशुद्ध प्रतिसादा बद्दल धन्यवाद.
{{{ तुम्ही युपीएच्या
{{{ तुम्ही युपीएच्या काळातल्या कारभाराबद्दल लिहिलेत. मोदींच्या काळात माजी सैनिकांना आंदोलन आणि उपोषण करावं लागलं, तक्रार करणार्या सैनिकांचे व्हिडियो आले, सैन्यदलाने डिफेन्स बजेट अपुरे असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.
Submitted by भरत. on 17 November, 2018 - 11:13
असा कुठला कल्याणकारी निर्णय होता की जो मागच्या सरकारने घेतला होता आणि मोदी सरकारने रद्द केला ज्यामुळे माजी सैनिकांना आंदोलन करावे लागले?
orop जे इंदिरा गांधीने १९७२
orop जे इंदिरा गांधीने १९७२ मध्ये बंद केले होते
समस्त भारतीय सैन्याला ज्यांचा अभिमान आहे त्या माजी पंतप्रधानांचा एकेरी उल्लेख, तेही सैन्यातल्या कर्नलकडून...?
{भरत - IGA ला दोन्ही कलमे
{भरत - IGA ला दोन्ही कलमे आहेत. ७१ व ७२.}
हे पोपटपंची वाटतेय आता.
रागा टीआरपी मिळवण्यासाठी करतोय, तर प्रशांत भूषण, शौरी आणि सिन्हा काय करताहेत?
न्यायालयात हेच लोक गेलेत.
मंदार, पब्लिकसमोर बोलताना राहुलने टेक्निकल डिटेल्स दळावेत का?
गटर की वायू से चाय याच लेव्हलचं बोलणार तो.
समजून घ्यायला आणि द्यायला त्याच्याकडॉक्टर लोक आहेच त की.
मोदींना नोटाबंदीबद्दल कोणी समजावलं होतं?
दिवाळीनंतर अख्ख्या भारतातले दुकानदार सुटीवर जातात, होते मुक्ताफळं पचवता की.
आणि राहुल काही कामाचं बोलत नाही, तर मोदी,शहा, त्यांचे मंत्री, ते मालवीय सतत राहुलबद्दल का बोलतात?
नोटाबंदीचा त्रास फक्त एका कुटुंबाला झाला, हे मौक्तिक पचवायला कोणतं कूटजारिष्ट घेता?
पोपटपंची वाटू देत पण INTER
पोपटपंची वाटू देत पण INTER GOVERNMENTAL AGREEMENT च्या खाली असलेले दोन कलमांचे interpretation तेच आहे. त्याला मी आणि तुम्ही काही करू शकत नाही.
बॉरं.
बॉरं.
Bharat I think I am not able
Bharat I think I am not able to write it properly. Congress is not taking this issue to people in an aggressive maaner in the ongoing election.
May be they are hoping to win MP, Rajasthan with anti incrubancy factor against BJP and will take up Rafale in 2019 more aggressively. But sure BJP is now left only with hindutva and Rammandir.
मंदार, बहुतांश पत्रकार,
मंदार, बहुतांश पत्रकार, वर्तमानपत्रे अणि चॅनेल्स भाजपाच्या दहशतीत आहेत. त्यामुळे काँग्रेसचे एकट्याचे एफर्ट्स कमी वाटणारच. २०१४ पुर्वी असे नव्हते. आज मोदी स्वतः चुकले तरी राहुललाच जाब विचारणारे पत्रकार निपजले आहेत.
मित्रानो भांडू नका. मोदी
मित्रानो भांडू नका. मोदी पंतप्रधान बनू दे नायतर रागा, आपल्या नशीबी पायदान आणि फलाटामधील अंतरावर लक्ष देणं वाढून ठेवलंय, ते काही बदलणार नाही.
काँग्रेस चे नेते श्री राहुल
काँग्रेस चे नेते श्री राहुल गांधी यांनि नरेंद्र मोदी यांना, त्यांच्या पसंतीच्या वेळेवर, पसंतीच्या फोरम मधे 15 मिनिटे राफेल विषयावर डिबेट करण्याचे आव्हान दिले आहे,
मोदी हे आव्हान स्वीकारतात की लंगड्या सबबी आणि वैयक्तिक हिणकस शेरे मारून त्या पासून दूर पळतात हे पाहणे इंटरेस्टिंग ठरेल.
शेवटचा प्रतिसाद वाचला होता
शेवटचा प्रतिसाद वाचला होता त्यानंतर चार पाने भरली. सर्वोच्च न्यायालय वाचत असेल का ?
<< काँग्रेस चे नेते श्री
<< काँग्रेस चे नेते श्री राहुल गांधी यांनि नरेंद्र मोदी यांना, त्यांच्या पसंतीच्या वेळेवर, पसंतीच्या फोरम मधे 15 मिनिटे राफेल विषयावर डिबेट करण्याचे आव्हान दिले आहे,
मोदी हे आव्हान स्वीकारतात की लंगड्या सबबी आणि वैयक्तिक हिणकस शेरे मारून त्या पासून दूर पळतात हे पाहणे इंटरेस्टिंग ठरेल.>>
---------- आपला युक्तीवादात कमी पडल्यावर, पडतो आहे असे आपलेच आपल्याला वाटल्यावर हिणकस शेरेबाजी, एकेरी उल्लेख (वर इन्दिराजी, राहुलजी) यान्चा वापर व्हायला सुरुवात होते. चरित्र हनन मग पुढची पायरी असते...
अशा प्रकारचा एकरी उल्लेख जेव्हा अत्यन्त शिक्षित, उच्चविद्या विभूषित, समाजात मानाचे/ आदराचे स्थान असणार्या जाणते पणी करतात तेव्हा त्याला विरोध, निषेध व्हायलाच हवा.
सर्वोच्च न्यायालय वाचत असेल
सर्वोच्च न्यायालय वाचत असेल का ?
नवीन Submitted by मेरीच गिनो on 17 November, 2018 - 23:24>>>>>>>
सर्वोच्च न्यायालयामध्ये जे बोलणे होत आहे तेच लोक इकडे प्रतिसादात मांडत आहेत. मायबोलीवरचे प्रचारकी लेख आणि त्याखालचे प्रतिसाद वाचून निर्णय देण्याची वेळ अजून कोर्टवर आली नसावी
आणि न्यायालयातील युक्तिवाद, इकडे मांडण्याचे कारण लेखकाने लेखतच दिले आहे,
>>>>>>
हा लेख (आणि त्या वरचे प्रतिसाद)विशेष करून तरुणांना व नवीन पिढीला वाचून दाखवायला हवा. त्यामुळे त्यांच्यात अपप्रचाराने (व्हाट्सअप्प फॉरवर्ड आणि वैयक्तिक आवडींमुळे लिहिलेले लेख यामुळे)निर्माण झालेला संदेह जाऊन आपल्या धोरणांवर व रक्षा संपादन प्रक्रियेवर (न्यायसंस्थेवर आणि लोकशाही मूल्यांवर) विश्वास बसू शकेल.
सिम्बा - लेख (आणि त्या वरचे
सिम्बा - लेख (आणि त्या वरचे प्रतिसाद)विशेष करून तरुणांना व नवीन पिढीला वाचून दाखवायला हवा. त्यामुळे त्यांच्यात अपप्रचाराने (व्हाट्सअप्प फॉरवर्ड आणि वैयक्तिक आवडींमुळे लिहिलेले लेख यामुळे)निर्माण झालेला संदेह जाऊन आपल्या धोरणांवर व रक्षा संपादन प्रक्रियेवर (न्यायसंस्थेवर आणि लोकशाही मूल्यांवर) विश्वास बसू शकेल. >>>>>>
माझेही मत तेच आहे.
फ्रेंच विमाने उडोत न उडोत
फ्रेंच विमाने उडोत न उडोत राहुलभक्ती हॅज टेकन ऑफ
<< फ्रेंच विमाने उडोत न उडोत
<< फ्रेंच विमाने उडोत न उडोत राहुलभक्ती हॅज टेकन ऑफ >>
-------- प्रश्न विचारणे, माहिती गोळा करणे, सत्य शोधण्याचा प्रयत्न करणे याला राहुलभक्ती सम्बोधणे हे चर्चा करण्याचे सर्व मुद्दे सम्पल्याची लक्षणे आहेत. अर्थात यामधे आपली चुक नाही.
माझा दोनशेवा प्रतिसाद
उदय आपला गैरसमज होतो आहे. मी
उदय आपला गैरसमज होतो आहे. मी ह्या "चर्चेत" नाही. वरचे प्रतिसाद राहुल संदर्भातले पाहुन गम्मत वाटली. तुमच्या सत्य शोधनास शुभेच्छा!
मनीष सिन्हा कोण आहेत ?
मनीष सिन्हा कोण आहेत ?
काय करणार? मोदींनी पाडलेला
काय करणार? मोदींनी पाडलेला उजेड पाहून राहुलबद्दलच बोलणं भाग आहे. मजबुरी समझो।
देश फक्त मोदी किंवा राहुलचा
देश फक्त मोदी किंवा राहुलचा आहे वाटतं. बाकीचे परदेशी प्रवासी दिसतात. चालू द्या.
बाकी धागाकर्ते बाजी
बाकी धागाकर्ते बाजी प्रभूच्या आवेशात जी खिंड लढवत आहेत त्या मागचा ड्रायव्हिंग फोर्स जबराच असला पाहिजे. राहुल गांधींचे म्हनणे चुकीचे आहे एवढे वाक्यही पुरले असते. आम्हीही रागांचे म्हनणे चुकीचे आहे मान्य केले असते. ते काही आमचे बाप , आजोबा नव्हेत. किण्वा आम्ही त्याम्चे चमचे , भाट नाहीत. पण भाषेच्या सौंदर्याने घात केला आणि सगळे पत्ते उघडे पडले.
जौ द्या, बूंदसे गयी वो हौज से नही आती.
Peshwai jagu dya O babaa nu
Peshwai jagu dya O babaa nu
राहुल गांधींचे म्हनणे चुकीचे
राहुल गांधींचे म्हनणे चुकीचे आहे एवढे वाक्यही पुरले असते. आम्हीही रागांचे म्हनणे चुकीचे आहे मान्य केले असते. ते काही आमचे बाप , आजोबा नव्हेत. किण्वा आम्ही त्याम्चे चमचे , भाट नाहीत.
<<
राफेल घोटाळा : फ्रान्समधे
राफेल घोटाळा : फ्रान्समधे तक्रार दाखल.
http://egnews.in/marathi-news/complain-filed-in-france-about-rafale-in-n...
राफेल घोटाळा : फ्रान्समधे
राफेल घोटाळा : फ्रान्समधे तक्रार दाखल.
http://egnews.in/marathi-news/complain-filed-in-france-about-rafale-in-n...
राफेल घोटाळा : फ्रान्समधे
राफेल घोटाळा : फ्रान्समधे तक्रार दाखल.
http://egnews.in/marathi-news/complain-filed-in-france-about-rafale-in-n...
Pages