राफेल बद्दल बरेच काही - भाग २

Submitted by रणजित चितळे on 16 October, 2018 - 23:50

ह्या आधीचे

https://www.maayboli.com/node/67787

भाग २ – वारंवार पडणारे प्रश्न व अंततः

प्रश्न १ – मोदी सरकारने वाटाघाटी केल्या नंतरची रफालची किंमत यूपीए सरकारने ठरवल्या पेक्षा जास्त आहे का.

उ१- यूपीए सरकारच्या वेळेस सुरू झालेल्या वाटाघाटी पूर्णत्वास गेल्या नव्हत्या त्यामुळे अपूर्ण राहिलेल्या वाटाघाटीतून उद्भवणारी किंमत व पूर्णत्वाला पोहोचलेल्या वाटाघाटींच्या किमतीची आपण तुलना करू शकत नाही. वाटाघाटी ‘किमतीच्या अंदाजे आकड्यावर’ आधारलेल्या असतात. हा ‘किमतीचा अंदाजे आकडा’ नवीन नवीन मिळणाऱ्या माहिती नुसार बदलत राहतो. कोठल्याही वाटाघाटी करायच्या आधी एक कार्य समिती ‘किमतीचा अंदाजे आकडा’ म्हणजेच ‘बॉलपार्क प्राइस’ किंवा ‘बेंचमार्क प्राइस’ तयार करते. असल्या अत्यंत प्रगत तंत्रज्ञानावर आधारित वस्तूंची किंमत बाजारात उपलब्ध नसते त्यामुळे वेगवेगळ्या माहितीवर व समितीच्या अनुभवावर एक किमतीचा अंदाजे आकडा बॉलपार्क प्राइस ठरवला जातो व त्याला मध्य मानून वाटाघाटींना सुरवात करतात. जेव्हा केव्हा वाटाघाटी पूर्णत्वाला पोहोचतात तेव्हा अशा ठरलेल्या किमतीच्या वैधतेचा काल करारात नमूद करतात. आता युपिएच्या सरकारात २०१४ पर्यंत रफाल बाबत करारच झाला नसल्या कारणाने अर्धवट वाटाघाटींची अर्धवट किंमत व अशा वैधता नसलेल्या अर्धवट किमतीला काही अर्थ नाही, ना त्याचा काही उपयोग.

पण तरी सुद्धा वाटाघाटी पूर्णत्वाला पोहोचलेल्या ३६ रफाल ची किंमत अर्धवट वाटाघाटीच्या यूपीए पेक्षा कमीच आहे परत त्यात ५० टक्के ऑफसेटचे (व्यापारातला भारतीय भाग) नवीन कलम आहेच (ऑफसेट काय असते ते भाग ३ परिच्छेद ६ (ग) मध्ये वाचायला मिळेल) (पण येथे थोडक्यात देतो – ऑफसेट (व्यापारातला भारतीय भाग) असणे भारतीय कंपन्यांसाठी अत्यंत फायदेशीर असते. त्यात जर ५० टक्के ऑफसेट असेल तर सौद्याच्या ५० टक्के किमतीचा व्यापार व व्यवसाय भारतीय कंपन्यांना परदेशातील करार झालेल्या कंपनीला द्यायला लागतो. एका अर्थाने ५० टक्के पैसा परत भारतात येतो. चीन मध्ये हा १०० टक्क्यावर जाऊ शकतो).

परत नियंत्रक महालेखा परीक्षक – कंपट्रोलर ऑडिटर जनरल (CAG) किमतीची बारकाईने चौकशी करून निवाडा देतीलच. तो पर्यंत अर्धवट वाटाघाटीतून निघणारी किंमत व पूर्णत्वाला पोहोचलेल्या व करार झालेल्या किमतीची तुलना करणे म्हणजे पेरू बरोबर आंब्याच्या किमतीची तुलना करण्या जोगे चुकीचे ठरेल.

प्रश्न २ – जर वाटाघाटी करून किंमत यूपीए पेक्षा कमी असेल तर मग ३६ रफाल विमानेच का १२६ रफाल विमाने का नाही घेतली.

उ २- ३६ ऱफाल चे वितरण सप्टेंबर २०१९ पासून सुरू होऊन ते दोन तीन वर्षात भारतात येतील. पाहिल्या वर्षी ०६ दुसऱ्या वर्षी १२ व तिसऱ्या वर्षी १८ असे काहीसे वितरण असेल. त्या काळात हिंदुस्तान एरोनॉटीक्स एलसीए तेजस ह्या लढाऊ विमानाचे उत्पादन वाढवून भारतीय वायुसेनेला त्याचे वितरण करायला लागले असेल व ह्यामुळे सार्वजनिक क्षेत्रातल्या कंपनीला डिफेन्स पिएसयू (DPSU) व्यवसाय उपलब्ध होऊन फायदा होईल. नाहीतर युपिएच्या काळात ३ वर्ष झाली तरी वाटाघाटी संपत नव्हत्या. ह्याचे कारण असे की दासू (रफालची कंपनी) ह्या कंपनीला भारतातील हिंदुस्तान एरोनॉटीक्स ला ToT देण्यात गुणवत्ते विषयक शंका असल्या कारणाने अजून ५ ते ७ वर्षात तरी वाटाघाटी पूर्णत्वाला येतील असे वाटत नव्हते एवढेच काय अशा रखडलेल्या वाटाघाटींमुळे कधी कधी पूर्णं प्रकल्पच गुंडाळून ठेवला जातो व असे झाले असते (त्याची शक्यता दाट होती) तर भारतीय वायुसेनेला विमानांपासून वंचित राहायला लागले असते व त्याच बरोबर हिंदुस्तान एरोनॉटीक्सचे सुद्धा हातचे काम गेले असते (१०८ विमाने बांधण्याचे).

आता ३६ विमानांचा करार झाला आहे. त्याच बरोबर पुढे वाटले तर त्या वेळेच्या सरकारला जास्तीची ऱफाल विमाने घेण्यास कोणी थांबवले नाही व एकदा वाटाघाटी होऊन करार झाला की पुढच्या वाटाघाटींसाठी अनायासे किमतीचा अंदाजे आकडा बॉलपार्क प्राइस रक्षा समितीकडे आपोआप मिळालेला असेल त्यामुळे पुढच्या वाटाघाटी सुकर व पटकन संपू शकतात.

पण ह्या पेक्षा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न उद्भवतो. व तो म्हणजे आपल्या देशाला खरोखरच १२६ ऱफालची गरज आहे का – हा प्रश्न.

प्रश्न ३ – आपल्या देशाला १२६ ऱफालची गरज आहे का.

उ ३ – ह्या उत्तरासाठी आपण सापेक्ष व प्रामाणिकपणे विचार करायला हवा. मी ऑक्टोबर २०१५ मध्ये मनोहर पारिकरांना एक पत्र लिहिले होते. अंग्रेजी मध्ये होते पण त्या पत्राचा ह्या विषयास अनुशंघून असलेला भाग, मराठीत देत आहे. त्या पत्रात रफालची विमाने १२६ पेक्षा कमी का घ्यावीत ह्याचा तर्क दिलेला आहे तो वाचावा –

मूळ पत्र इंग्रजीत होते व त्यातला जो विषयास अनुशंघून भाग आहे तो मराठीत देत आहे

“………………………… Along with technology the combat scene has under gone a change and military aviation has grown into a superior tactical and strategic arm. Present day fighter aircrafts carryout tasks of several aircrafts in one single modern fighter aircraft. With the fantastic capabilities, the emphasis is not on numbers but it is on ‘smart’ capability. This can be seen from the fact that the Royal Air Force and the French Air Force, undertake world-wide commitments with just 225 aircraft of two types each, the French Air Force with the Rafale and Mirage-2000 and the Royal Air Force with Tornadoes and Typhoons.
Now we are going for a smart plane in Rafale. I heard CHIEF OF AIR STAFF saying they require more Rafales. It is natural to ask for moon as a head of organisation. No head of an organisation would sincerely trim the organisation except for private entrepreneurs. For public funded organisations we see that they get inflated over a period of time. There are 42 squadrons of MIG now slowly getting depleted. No Chief of Air Staff would say that with smart fighter planes we don’t require so many squadrons. Every organisation on public money tends to grow and never try to scale down the force. As a head of the three services I urge to look into this aspect - do we really need all 42 squadrons. 42 Squadrons were when MIG of low technology fighter was available. I know that cutting down number of squadrons is not easy and opposition may make mountain out of a mole. At the same time there is no need to equip all squadrons with costly smart planes. That way we can have a healthy mix of smart and not so smart planes. ………………………………………………………..”

पत्र पुढे दुसऱ्या विषयावर जाते. येथे त्याचा संबंध नाही म्हणून उद्धृत करत नाही.

प्रश्न ४ – ऱफालवर बसवण्यात येणारी शस्त्रप्रणाली मोदी सरकारने बदलली आहे का. यूपीए सरकारच्या वेळेला जी शस्त्रसामुग्री ठरवली होती तीच आहे का.

उ ४ – यूपीए सरकारच्या वेळेला, भारतीय वायुदलाने ज्या शस्त्रप्रणालीची चाचणी केली होती व हिरवा कंदील दाखवला होता तीच शस्त्रप्रणाली ह्या करारात कायम ठेवलेली आहे. ह्या बरोबर दासू कडून केल्या जाण्याचा विमानाचा रखरखावं व विमानाची देखरेखीचा काळ दासू कडून वाढवून घेतला आहे व ५० टक्के ऑफसेट पण लागू केले गेले आहे. हे सगळे आपल्या देशाच्या दृष्टीने हितकारकच आहे.

प्रश्न ५ – बोफर्स हा अंतर सरकारी गोव्हर्नमेट टू गोर्व्हनमेट G2G करार होता का.

उ ५- नाही. बोफर्स हा करार भारत सरकार (रक्षा मंत्रालय) व स्वीडनची बोफर्स तोफा बनवणारी कंपनी ह्या मध्ये झाला होता. त्या वेळेला क्वात्रोची (इटालियन व्यापारी व गांधी घराण्याचा जवळचा स्नेही) ह्यांनी हा करार घडवण्यात मदत केली होती.

प्रश्न ६ – बोफर्स करार संरक्षण खरेदी प्रक्रिया डिफेन्स प्रोक्यूरमेंट प्रोसीजर (DPP) प्रमाणे झाली होती का.

उ ६ – नाही. त्या वेळेला (१९८७ च्या सुमारास) डिपिपि अस्तित्वात नव्हती. पाहिली जलद खरेदी प्रक्रिया किंवा फास्ट ट्रॅक प्रोसीजरचे धोरण वर्ष २००१ (वाजपेयी सरकार) च्या वेळेस तयार झाले. वाजपेयी सरकारला त्या वेळेस वाटले रक्षा खरेदीसाठी एक पारदर्शी प्रक्रिया असली पाहिजे म्हणजे भ्रष्टाचार व पैसा चारू लोकं (मिडलमेन) कमी होतील. त्यासाठी धोरण ठरवायचे ठरले. व लागलीच वाजपेयी सरकारा असताना डीपिपि बनवण्यासाठी सल्लामसलती सुरू होऊन पाहिले डिपिपि २००५ साली प्रसिद्ध झाले. त्या वेळच्या संरक्षण मंत्र्यांनी श्री प्रणव मुखर्जी ह्यांनी ह्या धोरणावर सही करून डिपिपि २००५ मध्ये प्रसिद्ध केले. तो पर्यंत रक्षा खरेदी कोठल्याही ठोस धोरणां अभावी मनमानेल तशी केली जायची व म्हणूनच त्यावळचे रक्ष करार भष्टाचारा पासून अलिप्त राहू शकत नव्हते. पण DPP आल्या पासून (२००५) हे चित्र बदलायला सुरवात झाली.

प्रश्न ७ – ऱफाल डिफेन्स प्रोक्यूरमेंट प्रोसीजर डिपिपि वर आधारीत आहे का (भाग ३ परिच्छेद १ ते ८ वाचावे).

उ ७ – जेव्हा अंतर सरकारी समन्वय किंवा गोव्हर्नमेंट टू गोव्हर्नमेंट करार होणार असतो तेव्हा दोन्ही सरकाराला करार कसा करावा ह्या बद्दल बरेच स्वातंत्र्य असते. सरकारावर डिपिपि धोरणानेच जायचे असे बंधन नसते. खरे तर मोदी सरकारला मध्यम वजनाची युद्ध विमाने मीडियम मल्टी रोल कॉम्बॅट एअरक्राफ्ट्स (MMRCA) बनवणाऱ्या लॉकहिड मार्टीनची एफ् १६, बोईंगची एफ्/ए १८, युरोफायटर टायफून, रशियन मिग ३५, स्वीडनची साब ग्रिपेन व फ्रांसची रफाल ह्या सारख्या कोणत्याही देशाच्या सरकारांबरोबर बोलणी व वाटाघाटी करण्याचे स्वातंत्र्य अंतर सरकारी करारात होते. जर अशा कोणत्याही देशा पासून मीडियम मल्टी रोल कॉम्बॅट एअरक्राफ्ट्स खरेदी केले गेले असते तरी ते गैर ठरू शकले नसते.

पण महत्त्वाचा भाग हा आहे की हे स्वातंत्र्य असताना देखील मोदी सरकारने तेच विमान व तीच कंपनी निवडली जी अगोदर आपल्या देशाने २०११ मध्ये डिपिपि प्रक्रिये मार्गे निवडली होती. त्यामुळे मोदी सरकारला एक भरभक्कम नैतिक बळ प्राप्त झाले कारण तांत्रिकी चाचणी व उड्डाण चाचणीतून निवडून येऊन परत दासूची बोली पण सगळ्या विमानात कमी होती. त्यामुळे ह्या प्रश्नाचे उत्तर म्हणजे जरी डिपिपि ने न जाण्याचे स्वातंत्र्या मोदी सरकारला होते तरी सुद्धा हा अंतर सरकारी करार डिपिपि वर आधारीतच केला गेला आहे.

प्रश्न ८ – साठी दासूला रिलायन्स सारख्या भारतीय कंपन्यांबरोबर व्यवसाय करायला मोदी सरकारने सुचवले का.

उ ८ – नाही. मूळ उपकरण निर्माता - ओरिजनल इक्विपमेंट मॅन्यूफॅक्टरर (OEM) इथे दासू कंपनीला पूर्ण स्वातंत्र्य आहे. ते कोणत्याही भारतीय कंपनी बरोबर बोलणी करून करार करू शकतात. फक्त त्या कंपन्यांना डिपार्टमेंट ऑफ इनडस्ट्रीयल पॉलिसी आणि प्रमोशन (DIPP) कडून परवाना उपलब्ध असला पाहिजे. त्याच बरोबर असे करार अपेंडीक्स अ अध्याय ३ डिपिपि मध्ये दिल्या प्रमाणे झाले पाहिजेत. परत एक अट अशी आहे की जो मूळ निर्माता आहे त्याने त्याच्या इतर छोट्या कंपन्या जर मध्ये भाग घेऊ शकल्या नाहीत तर त्यांचा ही वाटा स्वीकारून त्यांची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेऊन पूर्ण केला पाहिजे. एवढे केले तर भारतीय कोणती कंपनी निवडायची ह्याचे स्वातंत्र्य दासू कंपनीला आहे.
२०११ मध्ये हिंदुस्तान एरोनॉटीक्स बरोबर ToT साठी बोलणी सुरू होती (इथे ToT चा अर्थ विमानाचे भाग जुळवणे व विमान तयार करणे असे घ्यावे लागेल. मी मागे दिल्या प्रमाणे ToT मध्ये वेगवेगळे स्थर आहेत, त्या मुळे कोणी ToT म्हटल्यावर पूर्णं राफेल विमानाचे निर्माण ToT मुळे हिंदुस्तान एरोनॉटीक्स करायला लागले असते असे उगाच वाटून हुरळून जाऊ नये).

पण राफेलच्या जुळवणी करण्याच्या ToT ला सुद्धा दासूला वावगे होते व ते २०१२ ते २०१५ च्या निष्फळ वाटाघाटींतून दिसून येते. जर त्या वाटाघाटी तशाच चालू ठेवल्या गेल्या असत्या तर अजून काही वर्ष रखडून शेवटी रफाल करार कधी न होणारा होऊन रफा दफा झाला असता. २००१ मध्ये वायुसेनेने त्यांच्या १५ वर्षाच्या लॉग टर्म पर्स्पेक्टीव्ह प्लॅन प्रमाणे MMRCA ची गरज प्रदर्शित केली होती. ह्या गोष्टीला १५ वर्ष होऊन त्यांच्या हाती काही लागले नव्हते. अजून विलंब झाला असता तर त्यांच्या लॉग टर्म पर्स्पेक्टीव्ह प्लॅन वर परिणाम झाला असता व आपल्या वायुसेनेचे मनोबळ खचले असते.

प्रश्न ९ – फ्रान्सच्या पूर्व प्रधानमंत्र्यानी एका मुलाखतीत असे म्हटले की मोदी सरकारने रिलायन्सचे नाव घेऊन दासूला सांगितले की रिलायन्स बरोबरच व्यापार करा व म्हणून तहत दासूला हिंदुस्तान एरोनॉटीक्स एचएएल सोडून रिलायन्स बरोबर व्यापार करावा लागला.

उ ९ – ह्या मुलाखती नंतर ह्याच पंतप्रधानांनी आपले वक्तव्य मागे घेतले होते. त्यामुळे भारतीय लोकांमध्ये गोंधळ उडवण्यासाठीच असले वक्तव्य दिले होते की काय ह्याची शंका येते. परत असले वक्तव्य त्यांच्या भारतीय मित्रासाठी समन्वय साधून केले की काय ह्याची पण शंका येते कारण असे वक्तव्य येण्या अगोदरच्या आठवड्यात एका विरोधी पक्षाच्या नेत्याने ट्विट करून भाकीत केले होते की एक हादरून टाकणारे वक्तव्य पुढच्या आठवड्यात येणार आहे त्यामुळे ही शंका!!!! राजकारण वेगळे सोडले तर, ज्यांना डिफेन्स परवाने मिळालेले आहेत अशा सगळ्या कंपन्यांची यादी DIPP कडे असते व त्यांना माहीत असते कोणती भारतीय कंपनी कोणत्या क्षेत्रात व्यापार करतात. व एखाद्या करारात जर करार करणाऱ्या देशाने विचारले तर कंपन्यांची नावे सांगायचे पूर्ण स्वातंत्र्य DIPP ला आहे. अशी नावे उपलब्ध करून द्यायची हे DIPP चे एक काम आहे. नाहीतर परदेशी कंपनीला त्यांचा वेळ घालवून कंपन्या शोधत हिंडावे लागेल. काही कंपन्या त्यांना कधीच मिळणार नाहीत व त्यामुळे अजाणतेपणे त्यांच्या बरोबर व्यापार केला जाऊ शकणार नाही त्यामुळेच DIPP कडे आपल्या भारतीय कंपन्यांची जाहिरात करण्याचे मोठे काम आहे. तेव्हा जर कोणी सुचवू पाहतं असेल की मोदी सरकारने भारतात व्यवसाय करण्याकरता कंपन्यांची नावे जाहीर केली तर त्याला भारतीय उद्योगां बद्दल माहिती कशी दिली जाते व त्याची प्रक्रिया काय व त्याचे धोरण काय ह्या कशाची माहिती नाही हेच जाहीर होते. उगाच उचलली जीभ व लावली ताळ्याला असे झाले म्हणायचे.

प्रश्न १० – ह्या करारा अंतर्गत रफाल बरोबर उद्योग करणाऱ्या कोणकोणत्या कंपन्या आहेत.

उ १० – (भाग ३ परिच्छेद ६ (ग) वाचावा). ७० पेक्षा जास्त भारतीय कंपन्या ज्यात डीआरडीओ व प्रायव्हेट कंपन्या पण शामील आहेत. ह्या कंपन्या रफाल बरोबर व्यवसाय करायला सज्ज आहेत. (गुगल वरून डाऊनलोड - अजून कंपन्या पण आहेत त्यात पण हे फक्त दर्शवण्यासाठी देत आहे - रीलायन्स कडे साधारण ३ टक्के ऑफसेट).

OFFSETRA.jpg

प्रश्न ११ – ToT तंत्रज्ञानाचे हस्तांतरण रफाल करारातून का वगळले गेले.

उ ११ – ToT वगळल्या शिवाय वाटाघाटी पुढे सरकत नव्हत्या. जर पुढे सरकणाऱ्या असत्या तर २०१२ मध्येच यूपीए सरकार असताना तो करार झाला असता. २०११ साली सगळ्यात कमी बोलीवर व बाकीच्या निकषांवर रफालची निवड होऊन सुद्धा २०१५ पर्यंत ToT मुळे वाटाघाटी पूर्णत्वाला पोहोचू शकल्या नाहीत ह्याचाच अर्थ हे कलम जर असच कायम ठेवले असते तर अजून पर्यंत वाटाघाटी पूर्ण झाल्या नसत्या व करार झाला नसता. ह्या कराराचे प्राथमिक उद्दिष्ट वायुसेनेच्या लॉंगटर्म पर्स्पेक्टीव्ह प्लॅन प्रमाणे त्यांना MMRCA विमाने उपलब्ध करून देणे होते, ToT हे जाता जाता जमले तर चांगलेच असे दुय्यम उद्दिष्ट. प्राथमिक उद्दिष्टच जेथे रखडले व पुरे होत नाही असे दिसत असेल तर दुय्यम उद्दिष्टावर नजर लावून बसण्यात काय अर्थ आहे. आणि जर दुय्यम उद्दिष्ट साध्य करायच्या नादात प्राथमिक उद्दिष्ट संपुष्टात येत आहे असे दिसत असेल तर दुय्यम उद्दिष्ट प्राप्त होण्यात काही अर्थ नाही. ह्याच दृष्टिकोनातून ते वगळले गेले. नाही तर विमाने आली नसती व ती येत नाहीत म्हणून ToT पण झाले नसते.

प्रश्न १२ – रफाल ची किंमत सार्वजनिक का करत नाहीत. किमतीची चर्चा का होऊ देत नाही. करारात सुरक्षे संबंधीत कोणते कलम आहे की जेणे करून त्याची किंमत सार्वजनिक होऊ शकत नाही.

उ १२ – प्रत्यक रक्षा करारात कोणत्या गोष्टी सार्वजनिक करण्यास मोकळ्या व कोणत्या गोष्टी गुप्त ठेवायच्या ह्याची कलमे असतात. जर त्याची किंमत सार्वजनिक केली गेली तर आपल्या शत्रू राष्ट्रांना आयतेच किमतीच्या अंदाजाचे आकडे उपलब्ध होतील. त्यावरून त्यांना कोणती शस्त्र आपण विकत घेत आहोत ह्याचा अंदाज लावता आला असता. शत्रू राष्ट्राला एकदा अंदाज लागला की त्या शस्त्राला तोड म्हणून त्याला मारक अशी शस्त्रप्रणाली विकत घेऊन तो आपल्याला शह देऊ शकतो. युद्धाचा हाच खेळ असतो. शस्त्र – त्याला तोड. त्या तोडाला तोड. हे सगळे जे कमी वेळात करू शकतात ते जिंकतात. सगळ्या गोष्टी सार्वजनिक करून आपण आपल्या शत्रू राष्ट्रांना एक प्रकारे मदतच करतो.

प्रश्न १३ – अंबानींना विमान बनवण्यात अनुभव आहे का.

उ १३ – त्यानी पिपावाव कंपनी विकत घेतली जी बरीच वर्ष डिफेन्स प्रॉडक्शन मध्ये होती. बाकी कंपनी कशी आहे ते दासू ने जाणून घ्यायचे त्यांचा निकष महत्त्वाचा ऑफसेट त्यांनी फेडायचे आहे.

अंततः - मी हा लेख लिहिण्या मागचे उद्दिष्ट असे की वर्ष २००१ पासून रक्षा संपादन हे मन मानेल तसे कसे ही होत नाही तर त्या संपादना मागे एक कायदेशीर प्रक्रिया उभारली गेली आहे. ती प्रक्रिया पारदर्शक बनवण्याच्या धोरणातून निर्माण झाली आहे. आता ती पूर्वी सारखी भ्रष्टाचाराला चारा घालणारी राहिली नसून त्याला आळा घालणारी झाली आहे. अंतर सरकारी करार अशा प्रक्रियेला अजून मजबुती देतो, जिथे भ्रष्टाचारी लोक नाही तर थेट आपले सरकार दसर्‍या सरकारशी बोलून काय पाहिजे ते विकत घेते.
हा लेख विशेष करून तरुणांना व नवीन पिढीला वाचून दाखवायला हवा. त्यामुळे त्यांच्यात अपप्रचाराने निर्माण झालेला संदेह जाऊन आपल्या धोरणांवर व रक्षा संपादन प्रक्रियेवर विश्वास बसू शकेल. प्रत्येक रक्षा खरेदी भष्टाचारातून निर्माण झालेली नसते हे त्यांना समजले पाहिजे. जे काही नेते व काही पक्ष अपप्रचार करून विश्वास तोडण्याचे काम करत आहेत ते त्यांच्या स्वत:च्या भवितव्याच्या व पक्षाच्या अस्तित्वाच्या संभ्रमातून उद्भवलेली त्यांची गरज आहे व त्यामुळे वास्तव बिघडवण्याचा प्रयत्न आहे.

मला खात्री आहे जो पक्षाध्यक्ष भ्रष्टाचाराचा आरोप करत आहे त्याला डिपिपिचा लवलेशही माहीत नसणार ना जाणून घ्यायची त्याच्या कडे कुवत आहे ना इच्छा आहे. त्याला फक्त लोकांना गोंधळात टाकून संभ्रम उत्पन्न करायचा आहे. तो फक्त शिकवलेली पोपटपंची करून स्वतःचा टीआरपी रेटिंग वाढवण्याच्या नादात वावरत आहे.

तिसरा भाग लवकरच –

http://rashtravrat.blogspot.com/2018/10/all-you-want-to-know-about-rafal...

(क्रमशः)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मेघपाल - लेख अभ्यासून प्रतिक्रीया दिलीत बरे वाटले. असे चोखंदळ वाचक असल्यावर लिहिणा-यांना सुद्धा धन्य झालो असे वाटते व मायबोलीला सुद्धा. आपले मनापासून आभार - कर्नल रणजित चितळे.

कर्नल साहेब, धन्यवाद हि माहिती मायबोलीवर आणल्याबद्दल. तुमचे प्रतिसादहि अतिशय अभ्यासपुर्ण आहेत. इंग्रजीतला लेख वाचला; तुमची हरकत नसेल तर शेअर करावा म्हणतो...

पल्लवी ताई जोशींनी किती अभ्यासपूर्ण पद्धतीने शिकवले आहे.
https://www.youtube.com/watch?v=TqCjQuKXD5k

केरला वाले भाईसाब वर त्या एका सुंदर स्त्री चा व्हिडीओ होता तो सापडत नाही आता.

प्रत्यक रक्षा करारात कोणत्या गोष्टी सार्वजनिक करण्यास मोकळ्या व कोणत्या गोष्टी गुप्त ठेवायच्या ह्याची कलमे असतात. जर त्याची किंमत सार्वजनिक केली गेली तर आपल्या शत्रू राष्ट्रांना आयतेच किमतीच्या अंदाजाचे आकडे उपलब्ध होतील. त्यावरून त्यांना कोणती शस्त्र आपण विकत घेत आहोत ह्याचा अंदाज लावता आला असता. शत्रू राष्ट्राला एकदा अंदाज लागला की त्या शस्त्राला तोड म्हणून त्याला मारक अशी शस्त्रप्रणाली विकत घेऊन तो आपल्याला शह देऊ शकतो. युद्धाचा हाच खेळ असतो. शस्त्र – त्याला तोड. त्या तोडाला तोड. हे सगळे जे कमी वेळात करू शकतात ते जिंकतात. सगळ्या गोष्टी सार्वजनिक करून आपण आपल्या शत्रू राष्ट्रांना एक प्रकारे मदतच करतो.

^^^ हे इतकं बाळबोध 'कर्नल' पदावरचा माणूस लिहू शकतो ह्यावर विश्वासच बसत नाही. हां, संघी भामटे असले प्रताप करण्यात मात्र अतिशय प्रविण असतात बरे.

देशाची वर्दी अंगावर चढवून, त्याचा हवाला देऊन भाजप आणि संघाची भलामण करणारे रणजित चितळे वर्दीतले संघी आहेत...
असले बायस्ड आणि विखारी विचार असणारे अनेक कर्नल टिव्हीवर येऊन लोकमानस भडकवण्याचे काम करत असतात ही जगजाहीर गोष्ट आहे.

धन्यवाद इथे मराठीत माहिती दिल्याबद्दल. तिसऱ्या भागाच्या प्रतीक्षेत.

आज शेखर गुप्तांचा हा राजकीय अंगाने या प्रश्नाकडे बघणारा लेख वाचला. Rafale isn't Modi's Bofors moment, here's why http://www.rediff.com/news/column/rafale-isnt-modis-bofors-moment-heres-...

१. <२०१४ पर्यंत रफाल बाबत करारच झाला नसल्या कारणाने अर्धवट वाटाघाटींची अर्धवट किंमत व अशा वैधता नसलेल्या अर्धवट किमतीला काही अर्थ नाही, ना त्याचा काही उपयोग.

पण तरी सुद्धा वाटाघाटी पूर्णत्वाला पोहोचलेल्या ३६ रफाल ची किंमत अर्धवट वाटाघाटीच्या यूपीए पेक्षा कमीच आहे>

ही दोन्ही वाक्य सलग वाचून गंमत वाटली.

२. २०१५ मध्ये ही हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेड HAL आणि Dassault यांच्यात बोलणी , वाटाघाटी चालू असल्याच्या अनेक बातम्या आहेत.

यातल्या काही दोन सरकारांमधल्या बोलण्या/घोषणांनंतरच्याही आहेत.
११ मार्च २०१५ च्या बातमीत म्हटले आहेDassault and HAL will both take responsibility for the part they will each build on the Rafale aircraft made in India," he continued, asserting the commitment is in line with the Indian government’s initial request for proposals under the Medium Multi-Role Combat Aircraft (MMRCA) tender.

Trappier’s comments track with those of French defense procurement chief Laurent Collet-Billon in February: "Dassault will not be responsible for the whole contract," Collet-Billon said. "It is a co-management setup," meaning France will not assume full liability for the HAL-produced aircraft, and therefore HAL will not be a subcontractor to Dassault.
म्हणजे HAL साठी या काँट्रॅक्टमध्ये खुप महत्त्वाची भूमिका होती. मग एन डीएचे मंत्री HAL युपीएच्या काळातच बाजूला झाली होती, HAL कडे ती क्षमता नाही (आणि त्याला काँग्रेस जबाबदार आहे) अशी विधाने का करत होते? HAL च्या माजी प्रमुखांनीही या विमानांच्या निर्मितीची क्षमता HAL कडे असल्याचे म्हटले आहे. मग माशी नक्की कुठे शिंकली?

या पार्श्वभूमीवर फ्रान्सच्या माजी राष्ट्राध्यक्षांचं विधान महत्त्वाचं आहे. ते त्यांनी मागे घेतल्याचं तुम्ही म्हणताय, पण तसं माझ्या कानावर आलेलं नाही.

तुमच्या १३ क्रमांकाच्या मुद्द्याबद्दल - रिलायन्स नेव्हल & एंजिनीयरिंग या कंपनीविरुद्ध IDBI Bank आणि Markss Infotech या दोन कंपन्यांनी त्यांची कर्जे बुडवल्याचे दावे ठोकले आहेत, हे लक्षणीय आहे.
https://economictimes.indiatimes.com/news/defence/markss-infotech-files-...
https://economictimes.indiatimes.com/news/defence/idbi-bank-moves-nclt-a...

प्रश्न १२ चं उत्तर फारच बाळबोध आहे आणि प्रश्न ८ चं उत्तर देताना माहितीपेक्षा मत, अंदाज आणि शंका यांवर भर दिला आहे. माजी फ्रेंच राष्ट्राध्यक्षांच्या दाव्याला फ्रान्सच्या एका वृत्तपत्राकडूनही दुजोरा मिळाला आहे.

आता सर्वोच्च न्यायालयच ही प्रक्रिया तपासून पाहणार आहे, तेव्हा चित्र आणखी स्पष्ट होईल अशी आशा बाळगायला हवी.

राफेल किमतीवरून विरोधी पक्ष बिनबुडाचे आरोप करत असतील तर चितळे साहेब HAL मध्ये कामाला आहेत म्हणून त्यांनी पुरावे न देता केलेले दावे खरे कसे काय मानायचे?
https://www.misalpav.com/comment/1012874#comment-1012874

मुद्दा क्रमांक ९ वरची कोलांटीउडी फारच मनोवेधक आहे, तसाच रिलायन्सचा केलेला बचावही.
रिलायन्स किती गुणाची आहे असे विचारले की म्हणायचे की ते सगळे दासूने जाणून घ्यावे, मग दासूला हा एकच पर्याय का दिला असा प्रश्न आला की म्हणायचे तसे सांगावेच लागते नाहीतर बिचार्‍यांना 'शोधत फिरावे लागेल', अरे डिफेन्स डील आहे की मुंजीसाठी केटरर शोधत आहेत?
साहेब, बचाव करायचाच असेल तर तो नीट तरी करा. तुम्हालाच आवडलेल्या शेखर गुप्तांच्या लेखातच तुम्हाला भरपूर मुद्दे मिळतील. पण मी तुमची अडचण समजू शकतो कारण तो लेख या सरकारला आणि त्याच्या अवतारी नेत्याला उद्धट आणि मूर्ख ठरवतो.
डीलच्या फक्त काहीच दिवस आधी एक कंपनी जन्माला कशी आली, फ्रान्सच्या (खोटारड्या, पलटीमारु, कारस्थानी इ इ) माजी पंतप्रधानांच्या 'पार्ट्नर' बरोबर रिलायन्स एंटरटेनमेंटचेच फिल्म डील कसे झाले वगैरे प्रश्नांची उत्तरे तिसर्‍या भागात नसतीलच अशी अपेक्षा.

लष्करातच नाही संरक्षण मंत्रालयातील मुलकी अधिका-यांनाही गुप्ततेच्या शपथा घ्याव्या लागतात. संरक्षण मंत्रालयात दोन प्रकारच्या सेवा शर्ती पाळाव्या लागतात.
१. केंद्रीय कर्मचा-यांसाठीच्या सेवा शर्ती
२. संरक्षण मंत्रालयाच्या अधीन असणा-या गुप्त प्रकल्पांसाठीच्या सेवा शर्ती

या अधिका-यांना माध्यमाकडे स्वतःहून जाता येत नाही. सोशल मीडीयावर प्रोफाईल ठेवता येत नाही (अनेकांना हा नियम ठाऊक नाही). कामासंबंधीचे फोटो, माहिती वरीष्ठांच्या परवानगिशिवाय प्रकाशित करायला अथवा समाज माध्यमे, मुद्रीत माध्यमे अथवा इलेक्ट्रॉनिक माध्यमात देता येत नाही.

अशा प्रकारे माहिती दिली असल्यास आणि परवानगी घेतलेली नसल्यास आयबी, सीबीआय चौकशी करू शकते. तसेच खात्यांतर्गत चौकशी होऊ शकते.

लेखकाने या परवानग्या नक्कीच घेतल्या असतील असे वाटते. मात्र एका अधिका-याने नोकरीत असताना अशी माहिती माध्यमात स्वतःहून का प्रकाशित करावी हा प्रश्न उपस्थित होतो. सरकारची बाजू मांडणे हे शासनाच्या सक्षम अधिका-याचे काम आहे. लेखकास असा काही पोर्टफोलिओ दिलेला आहे किंवा कसे याचे स्पष्टीकरण मिळू शकेल का ?

लेखक सक्षम अधिकारी आहेत असे गृहीत धरून चालूयात, तसेच त्यांनी दिलेली माहिती अधिकृत धरूयात.

वर लेखकाने कोटेशनची व्हॅलिडिटी संपुष्टात आली असे म्हटलेले आहे. त्यामुळे दोन प्रश्न उपस्थित होतात.

जर कोटेशन मधे दिलेल्या किंमतीची मुदत संपुष्टात आली असेल तर नवीन किंमतीत वाढ झाली आहे का ? नवीन किंमत कशी काय गृहीत धरली ?
जर सर्वात कमी असलेल्या व्हेंडरची किंमत आता लागू नसेल तर नवीन वाढीव किंमत ही दुस-या क्रमांकाच्या पुरवठादारापेक्षा जास्त आहे का ? असल्यास पुन्हा निगोसेशन्स केले का ? किंवा नव्याने टेण्डर का फ्लोट केले नाहीत ? (त्यात तांत्रिक माहितीच्या बीडची आवश्यकता नाही).

नसेल केले तर एकाच कंपनीला तिच्या कोटेशनची व्हॅलिडिटी संपलेली असतानाही किंमत वाढवून दिली आहे का ?

या प्रश्नांचा अर्थबोध सदर लेखात होत नाही.

किरणुद्दीन - 1 या लेखात काहीही गोपनीय माहिती उघड केलेली नाही. मला सगळे नियम माहित आहेत. आपण दिलेली माहिती (सिक्रेट एक्ट संबंधी) पण माझ्यासाठी खूपच शिळी. मी निवृत आहे. 2 किमतीवर जो प्रतिसाद दिला आहे त्याला उत्तर आधीच दिले आहे परत तो आपण आणला आहे त्या मुळे माझे आधीचे प्रतीसाद वाचावे. हे सरकार ते सरकार g2g करार आहे त्याला पहील्या अर्धवट भिजत घोगडे जे युपिए ने घातले होते त्याचा काही संबंध नाही तरी सुद्धा त्यात दिलेली बोली अ पेक्षा g2g मध्ये मिळालेली किंमत ब हि अ पेक्षा ब कमीच आहे.
मार्मित गोडसे - मी लेख लिहिला आहे त्यात जे उधृत केले आहे ते किती समजून घ्यायचे व किती टाकून द्यायचे हा वाचणा-याचा प्रश्न आहे. त्यामुळे नो कॉमेन्ट्स.
भरत - वेळापत्रका प्रमाणे दोन्ही पंतप्रधानांनी एप्रील 2015 मध्ये घोषणा केली तो पर्यंत वाटाघाटी चालल्या होत्या मी दिलेलच आहे. Dassualt will not be responsible for the part of HAL हाच तर रखडण्याचा भाग होता. 2011 पासून राफेल करार होण्यास 3 वर्ष होती होऊ शकला नाही त्याला हेच कारण होते. खरे तर मी माझा लेखातला भाग परत येथे देत आहे त्या मुळे येथे थांबवतो आपल्याला वाटले तर लेख परत वाचावा.
आगाऊ - रिलायनस् हा एकच पर्याय नाही ऑफसेट साधारण 120 जणांबरोबर केले आहे. बाकी मुजीचे उदाहरण हे -हेटॉरीक आहे वस्तूस्थीती अशी आहे की बाहेरच्या देशालाच काय पण आपल्या देशीतील खूप जणांना माहित नसते कोणती कंपनी काय करते.

तुमच्याच लेखात (प्रश्न १ चे उ१), दोन परस्पर विरोधी विधाने आढळत आहेत. मी सम्भ्रमात पडलो, तुलना करु शकत नाही असे म्हणत पुढे तुलना केलेली आहे.

<< यूपीए सरकारच्या वेळेस सुरू झालेल्या वाटाघाटी पूर्णत्वास गेल्या नव्हत्या त्यामुळे अपूर्ण राहिलेल्या वाटाघाटीतून उद्भवणारी किंमत व पूर्णत्वाला पोहोचलेल्या वाटाघाटींच्या किमतीची आपण तुलना करू शकत नाही. >>

<<पण तरी सुद्धा वाटाघाटी पूर्णत्वाला पोहोचलेल्या ३६ रफाल ची किंमत अर्धवट वाटाघाटीच्या यूपीए पेक्षा कमीच आहे परत त्यात ५० टक्के ऑफसेटचे (व्यापारातला भारतीय भाग) नवीन कलम आहेच >>

करार एप्रिल - २०१५ मधे झाला. तुम्ही रक्षा मन्त्री यान्ना पत्र ऑक्टोबर - २०१५ मधे लिहीले आहे. करार झाल्यावर ३६ च का याचे स्पष्टीकरण रक्षा मन्त्र्यान्ना ऑक्टोबर मधे... कशासाठी.

रिलायन्सच का ? हा माझा प्रश्न अनुत्तरित आहे, त्याचे समर्थन करता येत नाही. ५० % पैसा (देशातच) परत येत असेल तर चान्गली गोष्ट आहे, तो कुणाकडे जातो हे पहाणे पण महत्वाचे आहे.

विमानाच्या तसेच त्याच्या कुठल्याही भागाच्या किमती किती आहेत हे सामान्यान्ना माहित होणार नाही पण पाक किव्वा चीनला माहितच नसेल हे अमान्य आहे. एव्हाना त्यान्च्याकडे रफालबद्दल खडान-खडा (नकाशा, designs आकृती ) माहिती असेल.

रणजित चितळे सर
तुम्ही निवृत्त आहात ही बातमी माझ्यासाठी शिळी नाही. अगदी ताजी आहे. तुमची जी माहिती लेखाखाली दिसते त्यात सैन्यात अधिकारी असे म्हटलेले आहे. त्यात निवृत्त असा शब्द आढळला नाही.

तुम्ही म्हणता किंमत कमी आहे. पण किंमत तर गुप्त आहे. त्यामुळे ती स्वस्त की महाग हे तुम्हाला कसे कळाले ? हा प्रश्न नाही का ?
तुम्ही सैन्यात असता तरीही गुप्ततेचा भंग करता येत नाही. त्यामुळे धोका तुम्हालाही होता. आणि सैन्यात नसाल तर गुप्त माहिती तुमच्याकडे कशी काय आली हा ही प्रश्न उपस्थित होतो. तुम्ही म्हणता गोपनीय माहितीचा भंग करता येत नाही.

पण संसदेत विद्यमान संरक्षणमंत्र्यांनी ही माहिती गुप्त आहे असे सांगितले होते.

त्या आधी संरक्षण राज्यमंत्र्यांनी १६०० कोटी ही किंमत स्वतः जाहीर केली होती. तर मग सहाशे किंवा सातशे कोटीवरून १६०० कोटी रूपये अशी किंमत का वाढली हा प्रश्न उपस्थित होतो.
तुमच्या दोन्ही लेखात याचे समाधानकारक स्पष्टीकरण नाही.
उपकरणे घेतली असतील तर त्यांची किंमत किती हे तुम्हालाही सांगता येणार नाही.
तसेच जर ही उपकरणे पूर्वीच्या निविदेत असतील तर मग गंभीर प्रश्न उपस्थित होतो.

जर नसतील तर हा संपूर्ण नवा खरेदी करार झाला. तर मग स्पर्धा हवी. त्यामुळे देशाचा फायदा होता. करदात्यांचा पैसा वाचतो. खरेदी मधे हे सूत्र पाळलेच पाहीजे. प्रधानमंत्र्यांना कॅबिनेटच्या शिफारशी मंजूर करता येतात. मात्र कॅबिनेट शिफारशी करताना देशाचे नुकसान झाले आहे का हे पाहतेच.

त्यांनी काय फक्त अर्जंसी वर भर दिलेला आहे का ? असे असेल तर आज ना उद्या ऑडीटर जनरल त्याला आव्हान देणार.
अर्जंसीच्या नावाखाली अनेक गैरव्यवहार चालतात.

या अशा शंका उपस्थित होतात.
तुमचा लेख त्या दृष्टीने अर्थहीन आहे. फक्त क्रमांक ३ पहा, सात पहा असे करून चालणार नाही.
एकतर माहिती पूर्ण द्या अथवा तुम्ही ही माहिती देण्यास सक्षम नाही आहात हे सांगायला हरकत काय आहे ?

जेव्हां राफेल विमानांचा पूर्ण ताफा भारतात दाखल होईल तेव्हां त्यांच्या देखभालीसाठी वर्षाला एक लाख कोटी रूपये द्यायचे आहेत असे बोलले जाते. यात जर तथ्य असेल तर मग ही प्रचंड रक्कम आणायची कोठून ? तसेच एव्हढी मोठी रक्कम दरवर्षी लागणार असेल तर नव्याने निविदा काढणे केव्हांही उपयुक्त ठरले असते. केवळ दोन देशातला करार करून एव्हढा मोठा खर्च झेपणारा नाही.

<<अंतर सरकारी करार अशा प्रक्रियेला अजून मजबुती देतो, जिथे भ्रष्टाचारी लोक नाही तर थेट आपले सरकार दसर्‍या सरकारशी बोलून काय पाहिजे ते विकत घेते.>>
------- थेट सरकार व्यावहार करत असले म्हणजे भ्रष्टाचार होणार नाही याची १०० % खात्री नसते. सरकार सरकार म्हणजे त्यात काम करणारे लोक/ मानव आहेत. गरजवन्त लोक मार्ग काढणारच. आपण शन्का घ्यावीच. भ्रष्टाचार होत नसेल तर चन्गलीच गोष्ट आहे.

<< प्रत्येक रक्षा खरेदी भष्टाचारातून निर्माण झालेली नसते हे त्यांना समजले पाहिजे. >>
------- म्हणुनच लोकान्ना खुशाल शन्का विचारु द्या.... शन्का घेणे चान्गली गोष्ट आहे.

<<मला खात्री आहे जो पक्षाध्यक्ष भ्रष्टाचाराचा आरोप करत आहे त्याला डिपिपिचा लवलेशही माहीत नसणार ना जाणून घ्यायची त्याच्या कडे कुवत आहे ना इच्छा आहे.>>
-------- ते विरोधी पक्ष नेते आहेत, त्यान्चे काम ते करत आहेत. भाजपा व्रिरोधी पक्षात होता तेव्हा अगदी असाच वागत होता. (मनमोहन सिह यान्नी पुढाकार घेत अमेरिके सोबत अण्वस्त्र करार केला होता त्यास केलेला कडाडुन विरोध... अगदी डाव्यान्ना सोबत घेत... स्वत: सरकरारात आल्यावर काडीचाही मोठा बदल न करता तोच करार स्विकारला).
लोकशाही मधे विरोधी पक्ष नेत्याला डिपिपिचा किव्वा सत्तेत असणार्‍या प्रमुखाला STRENGTH चा लवलेशही माहीत नसला तरी चालतो. प्रामाणिक पणा, सचोटी, देशाप्रती आणि लोकशाही मुल्यानबद्दल आदर असणे महत्वाचे आहे.

<<त्याला फक्त लोकांना गोंधळात टाकून संभ्रम उत्पन्न करायचा आहे. तो फक्त शिकवलेली पोपटपंची करून स्वतःचा टीआरपी रेटिंग वाढवण्याच्या नादात वावरत आहे. >>
-------- विरोधी पक्ष नेत्याना एकेरीने का लिहावेसे वाटले ? Sad

चितळे सर

आपण प्रिंटर घेताना त्याच्या रिफीलचा विचार करतो कि नाही ? अलिकडे स्वस्तातले म्हणजे अगदी १५०० रू पासूनचे प्रिंटर्स उपलब्ध आहेत. पण त्यांचे रिफील कार्ट्रीजेस अत्यंत महाग असतात. म्हणजे प्रिंटर तोट्यात विकून कार्ट्रीजेस मधे कंपनी कमावते. प्रिंटर घेतल्याने हेच कार्ट्रीजेस घ्यावे लागतात. पंधरा सोळा हजारांच्या प्रिंटरच्या कार्ट्रीजेसची किंमत अगदी कमी असते.

राफेल घेताना विमान घेतले. आणि मेंटेनन्ससाठी वरीलप्रमाणे सौदा होणार असेल तर पुन्हा निविदा मागवून विमान , क्षेपणास्त्रे आणि मेंटेनन्स व स्पेअर्स अशी किंमत विचारात घेतली पाहीजे. नव्याने निविदा काढली तर कदाचित महागातले विमान प्रत्यक्षात स्वस्त पडेल. दुस-या कंपनीचे तुलनात्मक कोटेशन तुमच्याकडे असेल तर मग तुम्ही हा मुद्दा खोडून काढू शकता.

किरणुद्दीन- जर नसतील तर हा संपूर्ण नवा खरेदी करार झाला. तर मग स्पर्धा हवी. त्यामुळे देशाचा फायदा होता. करदात्यांचा पैसा वाचतो. खरेदी मधे हे सूत्र पाळलेच पाहीजे. प्रधानमंत्र्यांना कॅबिनेटच्या शिफारशी मंजूर करता येतात. मात्र कॅबिनेट शिफारशी करताना देशाचे नुकसान झाले आहे का हे पाहतेच.

त्यांनी काय फक्त अर्जंसी वर भर दिलेला आहे का ? असे असेल तर आज ना उद्या ऑडीटर जनरल त्याला आव्हान देणार.
अर्जंसीच्या नावाखाली अनेक गैरव्यवहार चालतात. ।।।।
अशा स्पर्धेतूनच रफाल आले आहे व म्हणूनच जेव्हा सरकार ते सरकार करार करायचा ठरवला डिपिपि व चाचण्यांवर आधारीत विमान घेतले. परत जर का RFP मागवायच्या ठरल्या असत्या तर 10 वर्ष लोटली असती. मध्ये एखादे युद्ध झाले असते म्हणजे अर्जन्सीचा अर्थ समजला असता. ---- ह्याच प्रमाणे का - 226 हेलिकॉप्टर पण पूर्वी डिपिपि वर होती ती आता सरकार ते सरकार ने रशियाकडून घेऊन त्यात एच ए एल बरोबर निर्माण करायचे ठरले आहे. तेव्हा जे शक्य होते ते ते तेव्हा तेव्हा केले.

बाकी कोण सक्षम आहे व कोण नाही हे आपले प्रश्न वाचल्यावर ह्या भानगडीत न पडलेलेच बरे, कारण त्याला काही अंत नाही. आपण खुशाल माझ्या सक्षमतेवर टिपणी करू शकता कारण एक तर ते आपले मत आहे व आपल्या देशात काहीही बोलायला स्वातंत्र्य आहे.
तसेच सरंक्षण खरेदी ही कीती वेगळी आहे व भल्या भल्यांना समजत नाही ह्याचे परत एकदा प्रत्यंतर आले.

तसेच सरंक्षण खरेदी ही कीती वेगळी आहे व भल्या भल्यांना समजत नाही ह्याचे परत एकदा प्रत्यंतर आले.
Submitted by रणजित चितळे on 20 October, 2018 - 13:05
<<

भल्या भल्यांना एक वेळ समजेल हा विषय. मात्र पप्पू गांधीला जितकी बुद्धी आहे, तेवढ्याच बुद्धीच्या त्याच्या चेल्याचपेट्यांना हा असला सरंक्षण खरेदी व्यवहार समजावणे कठीणच नाही तर अशक्य गोष्ट आहे.

त्यांना 'आलू की फॅक्टरी', 'नारियल का ज्युस' किंव्हा 'एक साईडसे आलू डालो और दुसरी साईड से सोना निकालो' असल्या गोष्टी पटकन समजतात. तेंव्हा चितळे साहेब ह्या असल्या ट्रोल्सना समजवण्याच्या भानगडीत अजिबात पडू नका. अशी विनंती आहे तुम्हाला.

शिवाय बोफोर्स व ऑगस्टा वेस्टलॅंड प्रकरणात दलाली खाऊन, जी लोक आज भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यात कोर्टाकडून जामीन घेऊन बाहेर फिरतायत तीच लोक आज राफेल विमान खरेदी प्रकरणात भ्रष्टाचार झालय म्हणून स्वच्छ चारित्र्याच्या पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्यावर आरोप करत आहेत.

अहो , रणजित दादा,
सक्षम वर एव्हढे चिडता कशाला ? मराठीत त्याला कॉम्पिटन्ट ऑथॉरिटी म्हणतात इतकेच. तुमचे आताचे स्पष्टीकरणही तोकडे आहे.
संपूर्ण करार नव्याने झाला. तेव्हां सिलेक्शनला जुने निकष कसे लावले हे अत्यंत गोलमोल उत्तर देत आहात. असो. अशीच उत्तरे मिळणार असतील तर मला इथल्या चर्चेत काहीही रस नाही. कळावे , लोभ असावा.

जाऊ द्या भांडू नका. लहानपणीचे दिवस आठवा जेव्हा आपण कागदाची विमानं उडवायचो. ती विमानं उडवल्याचा आनंद या खऱ्या विमानांची चर्चा करण्यात कसा मिळेल?

Pages