राफेल बद्दल बरेच काही - भाग २

Submitted by रणजित चितळे on 16 October, 2018 - 23:50

ह्या आधीचे

https://www.maayboli.com/node/67787

भाग २ – वारंवार पडणारे प्रश्न व अंततः

प्रश्न १ – मोदी सरकारने वाटाघाटी केल्या नंतरची रफालची किंमत यूपीए सरकारने ठरवल्या पेक्षा जास्त आहे का.

उ१- यूपीए सरकारच्या वेळेस सुरू झालेल्या वाटाघाटी पूर्णत्वास गेल्या नव्हत्या त्यामुळे अपूर्ण राहिलेल्या वाटाघाटीतून उद्भवणारी किंमत व पूर्णत्वाला पोहोचलेल्या वाटाघाटींच्या किमतीची आपण तुलना करू शकत नाही. वाटाघाटी ‘किमतीच्या अंदाजे आकड्यावर’ आधारलेल्या असतात. हा ‘किमतीचा अंदाजे आकडा’ नवीन नवीन मिळणाऱ्या माहिती नुसार बदलत राहतो. कोठल्याही वाटाघाटी करायच्या आधी एक कार्य समिती ‘किमतीचा अंदाजे आकडा’ म्हणजेच ‘बॉलपार्क प्राइस’ किंवा ‘बेंचमार्क प्राइस’ तयार करते. असल्या अत्यंत प्रगत तंत्रज्ञानावर आधारित वस्तूंची किंमत बाजारात उपलब्ध नसते त्यामुळे वेगवेगळ्या माहितीवर व समितीच्या अनुभवावर एक किमतीचा अंदाजे आकडा बॉलपार्क प्राइस ठरवला जातो व त्याला मध्य मानून वाटाघाटींना सुरवात करतात. जेव्हा केव्हा वाटाघाटी पूर्णत्वाला पोहोचतात तेव्हा अशा ठरलेल्या किमतीच्या वैधतेचा काल करारात नमूद करतात. आता युपिएच्या सरकारात २०१४ पर्यंत रफाल बाबत करारच झाला नसल्या कारणाने अर्धवट वाटाघाटींची अर्धवट किंमत व अशा वैधता नसलेल्या अर्धवट किमतीला काही अर्थ नाही, ना त्याचा काही उपयोग.

पण तरी सुद्धा वाटाघाटी पूर्णत्वाला पोहोचलेल्या ३६ रफाल ची किंमत अर्धवट वाटाघाटीच्या यूपीए पेक्षा कमीच आहे परत त्यात ५० टक्के ऑफसेटचे (व्यापारातला भारतीय भाग) नवीन कलम आहेच (ऑफसेट काय असते ते भाग ३ परिच्छेद ६ (ग) मध्ये वाचायला मिळेल) (पण येथे थोडक्यात देतो – ऑफसेट (व्यापारातला भारतीय भाग) असणे भारतीय कंपन्यांसाठी अत्यंत फायदेशीर असते. त्यात जर ५० टक्के ऑफसेट असेल तर सौद्याच्या ५० टक्के किमतीचा व्यापार व व्यवसाय भारतीय कंपन्यांना परदेशातील करार झालेल्या कंपनीला द्यायला लागतो. एका अर्थाने ५० टक्के पैसा परत भारतात येतो. चीन मध्ये हा १०० टक्क्यावर जाऊ शकतो).

परत नियंत्रक महालेखा परीक्षक – कंपट्रोलर ऑडिटर जनरल (CAG) किमतीची बारकाईने चौकशी करून निवाडा देतीलच. तो पर्यंत अर्धवट वाटाघाटीतून निघणारी किंमत व पूर्णत्वाला पोहोचलेल्या व करार झालेल्या किमतीची तुलना करणे म्हणजे पेरू बरोबर आंब्याच्या किमतीची तुलना करण्या जोगे चुकीचे ठरेल.

प्रश्न २ – जर वाटाघाटी करून किंमत यूपीए पेक्षा कमी असेल तर मग ३६ रफाल विमानेच का १२६ रफाल विमाने का नाही घेतली.

उ २- ३६ ऱफाल चे वितरण सप्टेंबर २०१९ पासून सुरू होऊन ते दोन तीन वर्षात भारतात येतील. पाहिल्या वर्षी ०६ दुसऱ्या वर्षी १२ व तिसऱ्या वर्षी १८ असे काहीसे वितरण असेल. त्या काळात हिंदुस्तान एरोनॉटीक्स एलसीए तेजस ह्या लढाऊ विमानाचे उत्पादन वाढवून भारतीय वायुसेनेला त्याचे वितरण करायला लागले असेल व ह्यामुळे सार्वजनिक क्षेत्रातल्या कंपनीला डिफेन्स पिएसयू (DPSU) व्यवसाय उपलब्ध होऊन फायदा होईल. नाहीतर युपिएच्या काळात ३ वर्ष झाली तरी वाटाघाटी संपत नव्हत्या. ह्याचे कारण असे की दासू (रफालची कंपनी) ह्या कंपनीला भारतातील हिंदुस्तान एरोनॉटीक्स ला ToT देण्यात गुणवत्ते विषयक शंका असल्या कारणाने अजून ५ ते ७ वर्षात तरी वाटाघाटी पूर्णत्वाला येतील असे वाटत नव्हते एवढेच काय अशा रखडलेल्या वाटाघाटींमुळे कधी कधी पूर्णं प्रकल्पच गुंडाळून ठेवला जातो व असे झाले असते (त्याची शक्यता दाट होती) तर भारतीय वायुसेनेला विमानांपासून वंचित राहायला लागले असते व त्याच बरोबर हिंदुस्तान एरोनॉटीक्सचे सुद्धा हातचे काम गेले असते (१०८ विमाने बांधण्याचे).

आता ३६ विमानांचा करार झाला आहे. त्याच बरोबर पुढे वाटले तर त्या वेळेच्या सरकारला जास्तीची ऱफाल विमाने घेण्यास कोणी थांबवले नाही व एकदा वाटाघाटी होऊन करार झाला की पुढच्या वाटाघाटींसाठी अनायासे किमतीचा अंदाजे आकडा बॉलपार्क प्राइस रक्षा समितीकडे आपोआप मिळालेला असेल त्यामुळे पुढच्या वाटाघाटी सुकर व पटकन संपू शकतात.

पण ह्या पेक्षा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न उद्भवतो. व तो म्हणजे आपल्या देशाला खरोखरच १२६ ऱफालची गरज आहे का – हा प्रश्न.

प्रश्न ३ – आपल्या देशाला १२६ ऱफालची गरज आहे का.

उ ३ – ह्या उत्तरासाठी आपण सापेक्ष व प्रामाणिकपणे विचार करायला हवा. मी ऑक्टोबर २०१५ मध्ये मनोहर पारिकरांना एक पत्र लिहिले होते. अंग्रेजी मध्ये होते पण त्या पत्राचा ह्या विषयास अनुशंघून असलेला भाग, मराठीत देत आहे. त्या पत्रात रफालची विमाने १२६ पेक्षा कमी का घ्यावीत ह्याचा तर्क दिलेला आहे तो वाचावा –

मूळ पत्र इंग्रजीत होते व त्यातला जो विषयास अनुशंघून भाग आहे तो मराठीत देत आहे

“………………………… Along with technology the combat scene has under gone a change and military aviation has grown into a superior tactical and strategic arm. Present day fighter aircrafts carryout tasks of several aircrafts in one single modern fighter aircraft. With the fantastic capabilities, the emphasis is not on numbers but it is on ‘smart’ capability. This can be seen from the fact that the Royal Air Force and the French Air Force, undertake world-wide commitments with just 225 aircraft of two types each, the French Air Force with the Rafale and Mirage-2000 and the Royal Air Force with Tornadoes and Typhoons.
Now we are going for a smart plane in Rafale. I heard CHIEF OF AIR STAFF saying they require more Rafales. It is natural to ask for moon as a head of organisation. No head of an organisation would sincerely trim the organisation except for private entrepreneurs. For public funded organisations we see that they get inflated over a period of time. There are 42 squadrons of MIG now slowly getting depleted. No Chief of Air Staff would say that with smart fighter planes we don’t require so many squadrons. Every organisation on public money tends to grow and never try to scale down the force. As a head of the three services I urge to look into this aspect - do we really need all 42 squadrons. 42 Squadrons were when MIG of low technology fighter was available. I know that cutting down number of squadrons is not easy and opposition may make mountain out of a mole. At the same time there is no need to equip all squadrons with costly smart planes. That way we can have a healthy mix of smart and not so smart planes. ………………………………………………………..”

पत्र पुढे दुसऱ्या विषयावर जाते. येथे त्याचा संबंध नाही म्हणून उद्धृत करत नाही.

प्रश्न ४ – ऱफालवर बसवण्यात येणारी शस्त्रप्रणाली मोदी सरकारने बदलली आहे का. यूपीए सरकारच्या वेळेला जी शस्त्रसामुग्री ठरवली होती तीच आहे का.

उ ४ – यूपीए सरकारच्या वेळेला, भारतीय वायुदलाने ज्या शस्त्रप्रणालीची चाचणी केली होती व हिरवा कंदील दाखवला होता तीच शस्त्रप्रणाली ह्या करारात कायम ठेवलेली आहे. ह्या बरोबर दासू कडून केल्या जाण्याचा विमानाचा रखरखावं व विमानाची देखरेखीचा काळ दासू कडून वाढवून घेतला आहे व ५० टक्के ऑफसेट पण लागू केले गेले आहे. हे सगळे आपल्या देशाच्या दृष्टीने हितकारकच आहे.

प्रश्न ५ – बोफर्स हा अंतर सरकारी गोव्हर्नमेट टू गोर्व्हनमेट G2G करार होता का.

उ ५- नाही. बोफर्स हा करार भारत सरकार (रक्षा मंत्रालय) व स्वीडनची बोफर्स तोफा बनवणारी कंपनी ह्या मध्ये झाला होता. त्या वेळेला क्वात्रोची (इटालियन व्यापारी व गांधी घराण्याचा जवळचा स्नेही) ह्यांनी हा करार घडवण्यात मदत केली होती.

प्रश्न ६ – बोफर्स करार संरक्षण खरेदी प्रक्रिया डिफेन्स प्रोक्यूरमेंट प्रोसीजर (DPP) प्रमाणे झाली होती का.

उ ६ – नाही. त्या वेळेला (१९८७ च्या सुमारास) डिपिपि अस्तित्वात नव्हती. पाहिली जलद खरेदी प्रक्रिया किंवा फास्ट ट्रॅक प्रोसीजरचे धोरण वर्ष २००१ (वाजपेयी सरकार) च्या वेळेस तयार झाले. वाजपेयी सरकारला त्या वेळेस वाटले रक्षा खरेदीसाठी एक पारदर्शी प्रक्रिया असली पाहिजे म्हणजे भ्रष्टाचार व पैसा चारू लोकं (मिडलमेन) कमी होतील. त्यासाठी धोरण ठरवायचे ठरले. व लागलीच वाजपेयी सरकारा असताना डीपिपि बनवण्यासाठी सल्लामसलती सुरू होऊन पाहिले डिपिपि २००५ साली प्रसिद्ध झाले. त्या वेळच्या संरक्षण मंत्र्यांनी श्री प्रणव मुखर्जी ह्यांनी ह्या धोरणावर सही करून डिपिपि २००५ मध्ये प्रसिद्ध केले. तो पर्यंत रक्षा खरेदी कोठल्याही ठोस धोरणां अभावी मनमानेल तशी केली जायची व म्हणूनच त्यावळचे रक्ष करार भष्टाचारा पासून अलिप्त राहू शकत नव्हते. पण DPP आल्या पासून (२००५) हे चित्र बदलायला सुरवात झाली.

प्रश्न ७ – ऱफाल डिफेन्स प्रोक्यूरमेंट प्रोसीजर डिपिपि वर आधारीत आहे का (भाग ३ परिच्छेद १ ते ८ वाचावे).

उ ७ – जेव्हा अंतर सरकारी समन्वय किंवा गोव्हर्नमेंट टू गोव्हर्नमेंट करार होणार असतो तेव्हा दोन्ही सरकाराला करार कसा करावा ह्या बद्दल बरेच स्वातंत्र्य असते. सरकारावर डिपिपि धोरणानेच जायचे असे बंधन नसते. खरे तर मोदी सरकारला मध्यम वजनाची युद्ध विमाने मीडियम मल्टी रोल कॉम्बॅट एअरक्राफ्ट्स (MMRCA) बनवणाऱ्या लॉकहिड मार्टीनची एफ् १६, बोईंगची एफ्/ए १८, युरोफायटर टायफून, रशियन मिग ३५, स्वीडनची साब ग्रिपेन व फ्रांसची रफाल ह्या सारख्या कोणत्याही देशाच्या सरकारांबरोबर बोलणी व वाटाघाटी करण्याचे स्वातंत्र्य अंतर सरकारी करारात होते. जर अशा कोणत्याही देशा पासून मीडियम मल्टी रोल कॉम्बॅट एअरक्राफ्ट्स खरेदी केले गेले असते तरी ते गैर ठरू शकले नसते.

पण महत्त्वाचा भाग हा आहे की हे स्वातंत्र्य असताना देखील मोदी सरकारने तेच विमान व तीच कंपनी निवडली जी अगोदर आपल्या देशाने २०११ मध्ये डिपिपि प्रक्रिये मार्गे निवडली होती. त्यामुळे मोदी सरकारला एक भरभक्कम नैतिक बळ प्राप्त झाले कारण तांत्रिकी चाचणी व उड्डाण चाचणीतून निवडून येऊन परत दासूची बोली पण सगळ्या विमानात कमी होती. त्यामुळे ह्या प्रश्नाचे उत्तर म्हणजे जरी डिपिपि ने न जाण्याचे स्वातंत्र्या मोदी सरकारला होते तरी सुद्धा हा अंतर सरकारी करार डिपिपि वर आधारीतच केला गेला आहे.

प्रश्न ८ – साठी दासूला रिलायन्स सारख्या भारतीय कंपन्यांबरोबर व्यवसाय करायला मोदी सरकारने सुचवले का.

उ ८ – नाही. मूळ उपकरण निर्माता - ओरिजनल इक्विपमेंट मॅन्यूफॅक्टरर (OEM) इथे दासू कंपनीला पूर्ण स्वातंत्र्य आहे. ते कोणत्याही भारतीय कंपनी बरोबर बोलणी करून करार करू शकतात. फक्त त्या कंपन्यांना डिपार्टमेंट ऑफ इनडस्ट्रीयल पॉलिसी आणि प्रमोशन (DIPP) कडून परवाना उपलब्ध असला पाहिजे. त्याच बरोबर असे करार अपेंडीक्स अ अध्याय ३ डिपिपि मध्ये दिल्या प्रमाणे झाले पाहिजेत. परत एक अट अशी आहे की जो मूळ निर्माता आहे त्याने त्याच्या इतर छोट्या कंपन्या जर मध्ये भाग घेऊ शकल्या नाहीत तर त्यांचा ही वाटा स्वीकारून त्यांची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेऊन पूर्ण केला पाहिजे. एवढे केले तर भारतीय कोणती कंपनी निवडायची ह्याचे स्वातंत्र्य दासू कंपनीला आहे.
२०११ मध्ये हिंदुस्तान एरोनॉटीक्स बरोबर ToT साठी बोलणी सुरू होती (इथे ToT चा अर्थ विमानाचे भाग जुळवणे व विमान तयार करणे असे घ्यावे लागेल. मी मागे दिल्या प्रमाणे ToT मध्ये वेगवेगळे स्थर आहेत, त्या मुळे कोणी ToT म्हटल्यावर पूर्णं राफेल विमानाचे निर्माण ToT मुळे हिंदुस्तान एरोनॉटीक्स करायला लागले असते असे उगाच वाटून हुरळून जाऊ नये).

पण राफेलच्या जुळवणी करण्याच्या ToT ला सुद्धा दासूला वावगे होते व ते २०१२ ते २०१५ च्या निष्फळ वाटाघाटींतून दिसून येते. जर त्या वाटाघाटी तशाच चालू ठेवल्या गेल्या असत्या तर अजून काही वर्ष रखडून शेवटी रफाल करार कधी न होणारा होऊन रफा दफा झाला असता. २००१ मध्ये वायुसेनेने त्यांच्या १५ वर्षाच्या लॉग टर्म पर्स्पेक्टीव्ह प्लॅन प्रमाणे MMRCA ची गरज प्रदर्शित केली होती. ह्या गोष्टीला १५ वर्ष होऊन त्यांच्या हाती काही लागले नव्हते. अजून विलंब झाला असता तर त्यांच्या लॉग टर्म पर्स्पेक्टीव्ह प्लॅन वर परिणाम झाला असता व आपल्या वायुसेनेचे मनोबळ खचले असते.

प्रश्न ९ – फ्रान्सच्या पूर्व प्रधानमंत्र्यानी एका मुलाखतीत असे म्हटले की मोदी सरकारने रिलायन्सचे नाव घेऊन दासूला सांगितले की रिलायन्स बरोबरच व्यापार करा व म्हणून तहत दासूला हिंदुस्तान एरोनॉटीक्स एचएएल सोडून रिलायन्स बरोबर व्यापार करावा लागला.

उ ९ – ह्या मुलाखती नंतर ह्याच पंतप्रधानांनी आपले वक्तव्य मागे घेतले होते. त्यामुळे भारतीय लोकांमध्ये गोंधळ उडवण्यासाठीच असले वक्तव्य दिले होते की काय ह्याची शंका येते. परत असले वक्तव्य त्यांच्या भारतीय मित्रासाठी समन्वय साधून केले की काय ह्याची पण शंका येते कारण असे वक्तव्य येण्या अगोदरच्या आठवड्यात एका विरोधी पक्षाच्या नेत्याने ट्विट करून भाकीत केले होते की एक हादरून टाकणारे वक्तव्य पुढच्या आठवड्यात येणार आहे त्यामुळे ही शंका!!!! राजकारण वेगळे सोडले तर, ज्यांना डिफेन्स परवाने मिळालेले आहेत अशा सगळ्या कंपन्यांची यादी DIPP कडे असते व त्यांना माहीत असते कोणती भारतीय कंपनी कोणत्या क्षेत्रात व्यापार करतात. व एखाद्या करारात जर करार करणाऱ्या देशाने विचारले तर कंपन्यांची नावे सांगायचे पूर्ण स्वातंत्र्य DIPP ला आहे. अशी नावे उपलब्ध करून द्यायची हे DIPP चे एक काम आहे. नाहीतर परदेशी कंपनीला त्यांचा वेळ घालवून कंपन्या शोधत हिंडावे लागेल. काही कंपन्या त्यांना कधीच मिळणार नाहीत व त्यामुळे अजाणतेपणे त्यांच्या बरोबर व्यापार केला जाऊ शकणार नाही त्यामुळेच DIPP कडे आपल्या भारतीय कंपन्यांची जाहिरात करण्याचे मोठे काम आहे. तेव्हा जर कोणी सुचवू पाहतं असेल की मोदी सरकारने भारतात व्यवसाय करण्याकरता कंपन्यांची नावे जाहीर केली तर त्याला भारतीय उद्योगां बद्दल माहिती कशी दिली जाते व त्याची प्रक्रिया काय व त्याचे धोरण काय ह्या कशाची माहिती नाही हेच जाहीर होते. उगाच उचलली जीभ व लावली ताळ्याला असे झाले म्हणायचे.

प्रश्न १० – ह्या करारा अंतर्गत रफाल बरोबर उद्योग करणाऱ्या कोणकोणत्या कंपन्या आहेत.

उ १० – (भाग ३ परिच्छेद ६ (ग) वाचावा). ७० पेक्षा जास्त भारतीय कंपन्या ज्यात डीआरडीओ व प्रायव्हेट कंपन्या पण शामील आहेत. ह्या कंपन्या रफाल बरोबर व्यवसाय करायला सज्ज आहेत. (गुगल वरून डाऊनलोड - अजून कंपन्या पण आहेत त्यात पण हे फक्त दर्शवण्यासाठी देत आहे - रीलायन्स कडे साधारण ३ टक्के ऑफसेट).

OFFSETRA.jpg

प्रश्न ११ – ToT तंत्रज्ञानाचे हस्तांतरण रफाल करारातून का वगळले गेले.

उ ११ – ToT वगळल्या शिवाय वाटाघाटी पुढे सरकत नव्हत्या. जर पुढे सरकणाऱ्या असत्या तर २०१२ मध्येच यूपीए सरकार असताना तो करार झाला असता. २०११ साली सगळ्यात कमी बोलीवर व बाकीच्या निकषांवर रफालची निवड होऊन सुद्धा २०१५ पर्यंत ToT मुळे वाटाघाटी पूर्णत्वाला पोहोचू शकल्या नाहीत ह्याचाच अर्थ हे कलम जर असच कायम ठेवले असते तर अजून पर्यंत वाटाघाटी पूर्ण झाल्या नसत्या व करार झाला नसता. ह्या कराराचे प्राथमिक उद्दिष्ट वायुसेनेच्या लॉंगटर्म पर्स्पेक्टीव्ह प्लॅन प्रमाणे त्यांना MMRCA विमाने उपलब्ध करून देणे होते, ToT हे जाता जाता जमले तर चांगलेच असे दुय्यम उद्दिष्ट. प्राथमिक उद्दिष्टच जेथे रखडले व पुरे होत नाही असे दिसत असेल तर दुय्यम उद्दिष्टावर नजर लावून बसण्यात काय अर्थ आहे. आणि जर दुय्यम उद्दिष्ट साध्य करायच्या नादात प्राथमिक उद्दिष्ट संपुष्टात येत आहे असे दिसत असेल तर दुय्यम उद्दिष्ट प्राप्त होण्यात काही अर्थ नाही. ह्याच दृष्टिकोनातून ते वगळले गेले. नाही तर विमाने आली नसती व ती येत नाहीत म्हणून ToT पण झाले नसते.

प्रश्न १२ – रफाल ची किंमत सार्वजनिक का करत नाहीत. किमतीची चर्चा का होऊ देत नाही. करारात सुरक्षे संबंधीत कोणते कलम आहे की जेणे करून त्याची किंमत सार्वजनिक होऊ शकत नाही.

उ १२ – प्रत्यक रक्षा करारात कोणत्या गोष्टी सार्वजनिक करण्यास मोकळ्या व कोणत्या गोष्टी गुप्त ठेवायच्या ह्याची कलमे असतात. जर त्याची किंमत सार्वजनिक केली गेली तर आपल्या शत्रू राष्ट्रांना आयतेच किमतीच्या अंदाजाचे आकडे उपलब्ध होतील. त्यावरून त्यांना कोणती शस्त्र आपण विकत घेत आहोत ह्याचा अंदाज लावता आला असता. शत्रू राष्ट्राला एकदा अंदाज लागला की त्या शस्त्राला तोड म्हणून त्याला मारक अशी शस्त्रप्रणाली विकत घेऊन तो आपल्याला शह देऊ शकतो. युद्धाचा हाच खेळ असतो. शस्त्र – त्याला तोड. त्या तोडाला तोड. हे सगळे जे कमी वेळात करू शकतात ते जिंकतात. सगळ्या गोष्टी सार्वजनिक करून आपण आपल्या शत्रू राष्ट्रांना एक प्रकारे मदतच करतो.

प्रश्न १३ – अंबानींना विमान बनवण्यात अनुभव आहे का.

उ १३ – त्यानी पिपावाव कंपनी विकत घेतली जी बरीच वर्ष डिफेन्स प्रॉडक्शन मध्ये होती. बाकी कंपनी कशी आहे ते दासू ने जाणून घ्यायचे त्यांचा निकष महत्त्वाचा ऑफसेट त्यांनी फेडायचे आहे.

अंततः - मी हा लेख लिहिण्या मागचे उद्दिष्ट असे की वर्ष २००१ पासून रक्षा संपादन हे मन मानेल तसे कसे ही होत नाही तर त्या संपादना मागे एक कायदेशीर प्रक्रिया उभारली गेली आहे. ती प्रक्रिया पारदर्शक बनवण्याच्या धोरणातून निर्माण झाली आहे. आता ती पूर्वी सारखी भ्रष्टाचाराला चारा घालणारी राहिली नसून त्याला आळा घालणारी झाली आहे. अंतर सरकारी करार अशा प्रक्रियेला अजून मजबुती देतो, जिथे भ्रष्टाचारी लोक नाही तर थेट आपले सरकार दसर्‍या सरकारशी बोलून काय पाहिजे ते विकत घेते.
हा लेख विशेष करून तरुणांना व नवीन पिढीला वाचून दाखवायला हवा. त्यामुळे त्यांच्यात अपप्रचाराने निर्माण झालेला संदेह जाऊन आपल्या धोरणांवर व रक्षा संपादन प्रक्रियेवर विश्वास बसू शकेल. प्रत्येक रक्षा खरेदी भष्टाचारातून निर्माण झालेली नसते हे त्यांना समजले पाहिजे. जे काही नेते व काही पक्ष अपप्रचार करून विश्वास तोडण्याचे काम करत आहेत ते त्यांच्या स्वत:च्या भवितव्याच्या व पक्षाच्या अस्तित्वाच्या संभ्रमातून उद्भवलेली त्यांची गरज आहे व त्यामुळे वास्तव बिघडवण्याचा प्रयत्न आहे.

मला खात्री आहे जो पक्षाध्यक्ष भ्रष्टाचाराचा आरोप करत आहे त्याला डिपिपिचा लवलेशही माहीत नसणार ना जाणून घ्यायची त्याच्या कडे कुवत आहे ना इच्छा आहे. त्याला फक्त लोकांना गोंधळात टाकून संभ्रम उत्पन्न करायचा आहे. तो फक्त शिकवलेली पोपटपंची करून स्वतःचा टीआरपी रेटिंग वाढवण्याच्या नादात वावरत आहे.

तिसरा भाग लवकरच –

http://rashtravrat.blogspot.com/2018/10/all-you-want-to-know-about-rafal...

(क्रमशः)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<<तिसरा भाग मुळीच वाचण्याची इच्छा नाही. काय असणार आहे त्यात. ?>>
----- मला तर तिसरा भागच तुलनेने जास्त आवडला. निव्वळ माहिती आहे.

<< ह्या करारा अंतर्गत रफाल बरोबर उद्योग करणाऱ्या कोणकोणत्या कंपन्या आहेत. >>
------- भाग तिन मधे "कोणकोणत्या कंपन्या " आहेत हे आलेले नाही... गुगलकडे माहिती विचारतो.

<< सगळ्या गोष्टी सार्वजनिक करून आपण आपल्या शत्रू राष्ट्रांना एक प्रकारे मदतच करतो. >>
-------- हे तत्व मला समजते पण त्याचा वापर आपण सोईने करतो. सिमापार जात अतिरेक्यान्च्या लॉन्च पॅड वर आपण कारवाई केली... , हे इतिहासात प्रथमच झाले आहे असे वाटत नाही. पण त्याची जाहिरात (व्हिडिओ, फोटो पण) प्रथमच झालेली बघितली... यामुळे अतिरेक्यान्ना काय धडकी भरणार आहे का आपण अजाणतेपणे माहिती पुरवतो आहे ? का आपण, इतरान्ना टाळत, केवळ आपल्या वोट बॅन्के सोबतच बोलत आहोत ?

<< जाउ द्या उदय, बोलून चालून स्पॉन्सर्ड आर्टिकल आहे. जाहिरात विभागात हलवा.... >>
------ कामदेवा- ते भले मोठे (६०,००० का लाख कोटी रु.) आकडे बघुन डोळेच काय मी पण फिरतो आहे. ५० % ऑफसेट समजतो पण २० रुपयान्ची वस्तू आहे, त्याची किम्मत २०० रु ठरल्यावर ५० % ऑफसेट अन्तर्गत देशातच (रिलायन्स आदी... परिवार आणि ७०+ कम्पनी) गुन्तवले हे समजत नाही.

कुठलिही कम्पनी समाज सेवा करत नाही आहे. त्यान्ची पुर्ण रक्कम x (क्ष पट) वसुल झाल्यावरच "ऑफसेट" सुरु होणार.... आपण ५० % रक्कम परत मिळत आहे यावरच समाधान मानायचे ? जर ५० % ऑफसेट (परत मिळणार) असेल तर करार आहे त्यापेक्षाही ५० % कमी किमतीत व्हायला हवा असे माझे बाळबोध विचार आहेत. दोन दिवस मोठा रिकामा वेळ आहे. माहिती शोधतो... Happy

ऑफसेट म्हणजे रक्कम परत मिळत नाही तर रकमेच्या ५०टक्क एवढा व्यापार भारतात येतो.
२० रु चे २०० रु झाले नाहीत.
ओफसेट ही एक प्रक्रिया आहे किकबॅक नाही.
बोफर्स मध्ये पैसे क्वात्रोची मार्फत घेतले दिले हे पहिल्यांदी स्वीस इनव्हेस्टीगेटीव्ह एजन्सीने सांगितले त्या वेळी चित्रा सुब्रमण्यम तेथे होती व तीने भारतात पाठवले. व म्हणून जेपीसी.
स्पॉन्सर केले असे ज्यांना वाटते त्यांना सांगावेसे वाटते की ह्या जगात सचोटीची लोक आहेत व काय झाले ते लिहिण्याची ताकद आहे म्हणून लिहिले. कोणी सांगितले म्हणून नाही. पण कोणाला काही अर्थ काढायचा असेल त्याने काढावा.
ओफसेट मध्ये कोण कोण कंपन्या आहेत ते गुगल वरून काढावे. पण एक गोषवारा भाग २ मध्ये दिलेला आहे. ऑफसेट २००५ पासून आहे (आणि जर ऑफसेट म्हणजे किकबॅक असे जर मत असेल तर २००५ प्रणवदांनी डिपिपित घातले गेले आहे ते ही मग कोग्रेसच्या किकबॅक कलचर मुळेच घातले गेले असे म्हणता आले आसते पण असे मी म्हणत नाही कारण जग भरात ऑफसेट हे कलम लागू आहे. चीन कडे ऑफसेट १३० टक्के आहे म्हणजे जे ५० टक्के ओफसेट आहे त्यामुळे पन्नास टक्के स्वस्त व्हायला पाहिजे म्हणणा-यांच्या तर्कानी मग चीन ने काही आयात केली तर आयात केली त्या देशा कडून ३० टक्के रोख चीनला मिळत असावी.

@रणजित चितळे सर,
कॉंग्रेसी ट्रोल्सना जास्त एंटरटेन करु नका. कारण कॉंग्रेसी भाटांचा मेंदु देखील त्या पप्पू गांधीच्या मेंदू एवढाच असतो. त्यांना कितीही पुराव्यांसकट तुम्ही राफेल करार समजावून सांगायचा प्रयत्न केलात तरी त्यांच्यात समजून घ्यायची कुवतच नाही तेंव्हा त्यांच्याकडे दुर्लक्ष करा ही विनंती.

कारण कॉंग्रेसी भाटांचा मेंदु देखील त्या पप्पू गांधीच्या मेंदू एवढाच असतो. त्यांना कितीही पुराव्यांसकट तुम्ही राफेल करार समजावून सांगायचा प्रयत्न केलात तरी त्यांच्यात समजून घ्यायची कुवतच नाही
>> वा: , लिहिणार्‍याचा आणि वाचाणार्‍याचा एकच विचार , एकच भाषा , नागपूर विद्यापीठाच्या डिग्र्या काय तुमच्या...

<< कॉंग्रेसी ट्रोल्सना जास्त एंटरटेन करु नका. कारण कॉंग्रेसी भाटांचा मेंदु देखील त्या पप्पू गांधीच्या मेंदू एवढाच असतो. त्यांना कितीही पुराव्यांसकट तुम्ही राफेल करार समजावून सांगायचा प्रयत्न केलात तरी त्यांच्यात समजून घ्यायची कुवतच नाही तेंव्हा त्यांच्याकडे दुर्लक्ष करा ही विनंती. >>
------------ आपल्या मनासारखे लिहीले नाही, किव्वा वेगळे विचार व्यक्त होत असतील तर त्याला ट्रोल्स सम्बोधणे गैर आहे. अनेकान्नी राफेलच्या व्यावाहाराबद्दल शन्का उपस्थित केलेल्या आहेत. उत्तर द्यायलाच हवे असे नाही, दिलेले उत्तर पटायलाच हवे असेही नाही. तुमच्या कडे पुर्ण माहिती आहे असेही दिसत नाही. नव्याने पुढे येत असलेल्या माहितीला सामोरे जाण्यासाठीचे मनाचे धारिष्ट्य नाही. चिन्ताजनक परिस्थिती आहे.

चितळेसाहेब यान्च्या कामाबद्दल आदर आहेच. त्यान्नी काय करावे आणि काय करु नये असे त्यान्ना सुचवणे, विनन्तीवजा आग्रह धरणे त्यान्च्यावर अन्यायकारक ठरेल. त्यान्नी काय करावे याचे स्वातन्त्र्य त्यान्ना द्या.

रणजित चितळे यांच्या लिंक्ड-इन पेजवर खालील माहिती मिळाली:
लेखक फ्लाइट टेस्ट इंजिनीअर आहेत. फ्लाइट टेस्ट इंजिनीअर हे प्रोटोटाइप, अर्ली डिझाइन मधली विमाने उडवतात, त्यांचे परिक्षण करतात, त्यांचे सर्टिफिकेशन करतात. प्रस्तुत लेखकाने सैन्यदलातून फ्लाइट टेस्ट इंजिनीअरचा कोर्स केला आहे व त्यामुळे त्यांचा हिंदुस्तान एरोनॉटिकलशी घनिष्ट संबंध असणार. एचएएलने कमिशन केलेल्या सामरिक यंत्रणांवर लेखकाने फ्लाइट टेस्ट इंजिनीअर म्हणून काम केलेले आहे.

केवळ लेखक आपल्या विचारधारेशी सहमत नाही म्हणून त्याच्यावर थेट 'विचारधारेने प्रभावित होउन लिखाण केले आहे, शिक्षण्/अनुभवावरून नाही' असा आरोप करणे ठुबेसाहेब तुम्हाला शोभत नाही. तुमच्यात व अनिरुद्ध टाइप आयडीत काय तो फरक?

- Presently placed in Bangalore, I am a meticulous flight test engineer. I have been effectively involved in the trials of weaponisation of Advance light Helicopter. I have channelized my experience to induct new equipment after rugged user trials, whether it is Advanced Light Helicopter (Dhruv), ALH Weapon System Integration or Cheetah Chetak Replacement trials for Army.

टवणे सर... चितळेंच्या सदर लेखमालिकेतल्या व चर्चेतल्या अभिनिवेश, आवेश, भाषा आणि विचार यावरुन त्यांचे मूल्यमापन केले जात आहे. लिन्कड इन प्रोफाइलवरुन नाही.

बाबा कामदेव, मनीष, अनिरुद्ध.., हेला, उदय व टवणे सर प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

------------ आपल्या मनासारखे लिहीले नाही, किव्वा वेगळे विचार व्यक्त होत असतील तर त्याला ट्रोल्स सम्बोधणे गैर आहे. >>>> अगदी बरोबर तसेच माहित नसताना लेखाला स्पॉन्सर्ड आहे असे सम्बोधणे गैर आहे.

नव्याने पुढे येत असलेल्या माहितीला सामोरे जाण्यासाठीचे मनाचे धारिष्ट्य नाही. चिन्ताजनक परिस्थिती आहे.>>>> नव्याने माहिती येत राहूदे. कराराचा पाया मजबुत असल्यावर (g2g) अशा बातम्यांची काळजी करण्यासारखे काही नाही. कारण डिपिपि मध्ये प्राइस नेगोशिएशन कंपनी बरोबर होते. g2g मध्ये तेच दोन सरकारांमध्ये होते.

हेला ।।।।>>>> मी चांदीपूरला एका मिसाईलच्या टेस्टींगला गेलो होतो तेव्हा राफेल वर लेख लिहिला (३ ऑक्टोबरला) मग तो लिंक्डइनवर टाकला कारण तेथे काही अभ्यासू वाचक आहेत. जेव्हा मी मराठी संस्थळावर आलो तेव्हा मला आश्चर्य वाटले की मराठीत कोणीच कसा रफाल वर लेख लिहिला नाही (एक बिगूलचा माळीह्यांचा लेख सोडला तर). कारण मराठी लोक चोखंदळ तरी सुद्धा लेख नाही म्हणून आश्चर्य. म्हणून मी मग मराठीत लिहिला. मला हिंदी मध्ये पण लिहायचा आहे बघू कधी वेळ मिळतो ते.

लेख लिहिण्या मागे उद्देश हाच की वाचकांना डिपिपि काय, g2g काय, ऑफसेट काय हे एका जागी सांगितले तर रोज येणारी नवी माहिती वाचताना ह्या शब्दांचा नेमका अर्थ समजून यावा.

टण्या,
हा चितळे एक नंबरचा हिंदुत्ववादी भाजपेयी आहे. कस्लं बोडक्याचं प्रोफाईल? त्याने काम केलं ते गेलं भाजपात. त्या कामापाठी जर भगवेपणा असेल तर त्याचा पॉइंट काय?

पहिला लेख आला तेव्हाच अ‍ॅडमिन यांना सांगितलं होतं की राजकारणात हलवा. ते अजूनही हलवतातच आहेत. वाट पहातोय. यांचं हलवून झालं, की मग तिथे बोलू.

जेव्हा मी मराठी संस्थळावर आलो तेव्हा मला आश्चर्य वाटले
<<
तुम्ही मराठी संस्थळावर लय दिवसापासून संस्कारी लेख लिहून र्‍हायलेत हो स्लीपर सेल. फार भगवे भरलेत आर्मीत. खास करून इंजिनियरिंग वगैरे ठिकाणी, अन ऑफिसर लेव्हल. जिथे कुणी मरायला धाडणार नाही तुम्हाला. आशा करतो की खरं युद्ध होणार नाही कुठेच. कारण शेपूट घालून इतरांना मरायला धाडणे/ उचकवणे इतकीच तुमची लेव्हल आहे.

७ वर्षांपासून इथे आहात अन राष्ट्रव्रत वगैरे बुलशिट पुश करता आहात.

राफे डीलमधे खाल्लेल्या पैशांपैकी कुणाला किती गेले, अन व्हाया सायबर सेल मार्गे तुमच्या पर्यंत किती पोहोचले ते सांगता का? की नुस्तंच फुकटात "राष्ट्रकार्य" करून र्‍हायलेत?

द्वेषात आंधळा झाला की माणूस विवेक सोडून मनाला येईल ते बरळू लागतो. दुसरा माणूस माझ्या पंथातला, माझ्यासारखा नाही म्हणून त्याचा द्वेष फारच टोकाचा अन तीव्र असतो. मुख्यत्वे तो धार्मिक उन्मादात व अभिनिवेषात दंग लोकात दिसतो. पण तो वैचारीक उन्माद चढलेल्यात पण दिसतो.

वरच्या दोन पोस्टमध्ये आ.रा.रा.नी किती विविध आरोप केले आहेत ते बघा. इंजिनीअर कॉर्प्स मध्ये भगवे भरलेत, ते तिथे युद्ध झाल्यास mlr वर जाऊ लागू नये म्हणून भरती होतात, भारतीय सैन्यात जणू इंजि कॉर्प्स (सॅपर्स व असाईंड) मध्ये सीमेवर न जाणे अधिकाऱ्याच्या हातात असते. कळस म्हणजे लेखक फ्लाईत टेस्ट इंजिनीअर आहे. ही लोकं सगळ्यात जास्त धोका पत्करतात.
सर्वात वाईट आरोप म्हणजे इंजि कॉर्प्स फ्रंट लाईनवर नसते. हे सर्व धादांत खोटे आहे. इथे आरारा स्वतःच्या वैचारीक अजेंडा पुश करण्यासाठी देशाच्या लष्करातील एका महत्त्वाच्या विभागाला एक प्रकारे भ्याड म्हणत आहेत. इंफांट्री आणि आर्टिलरीच्या लोकांकडूनसुद्धा मी हे ऐकलेले नाही.

माझेच दोन वर्गमित्र - एक 12नंतर सीएमइ मधून व दुसरा बीई नंतर ssb मधून इंजिनीअर कॉर्प्स मध्ये आहेत. फ्रंट, आडबाजूचे डेपो, प्रमुख शहरे अशी सर्व ठिकाणी त्यांच्या ड्युट्या गेल्या 15वर्षात झाल्या आहेत.

लेखक हिंदुत्ववादी आहे वादासाठी समजले तरी त्याने केलेले सैन्यातले काम आरारांच्या लेखी बिनकामाचे वा फोल ठरते कारण पुन्हा विद्वेष.

त्यानंतर राफाल डीलमध्ये पैश्याचा अपव्यवहार झालाच आहे तसेच त्यातले पैसे लेखकाला मिळाले आहेत हा आरोप पण करून झाला.

द्वेषाने माणूस विवेक विसरतो की मुळातच intellectual dishonesty मुळे असे लिहिले जाते माहिती नाही. ते खुंटया हलवताना आरारांचनाच माहिती पडत असावे. ते ज्या वैचारिक धारेच्या जवळ आहेत त्या ठिकाणी हा बौद्धिक अप्रामाणिकपणा शिकवतात की काय असा कामरेखालचा वार करण्याची इचछा होतेय पण मी ओळखणाऱ्या अनेक प्रामाणिक अन सभ्य समाजवाद्यांची तो अपमान ठरेल.

त.टी. मागल्या अनेक पानांवर किरानुदिन व इतर अनेकांनी लेखकाला प्रश्न विचारले, लेखकाची विधाने/मते खोडून काढली, लेखावर मतपप्रदर्शन केले त्ययाबद्दल कोणाचीच ना असण्याची हरकत नाही. लष्कर लष्करी सेवा ही होलिअर दॅन दाऊ आहे असा माझा मुळीच समज नाहीये.

आ. रा. रा - आपल्या सभ्य बोलीला सलाम. आपल्या तर्कशुद्ध व पुरावेबद्ध प्रतिसादाला सलाम. आपल्या थलसेनेच्या माहितीला सलाम.

इंजिनिअर कोर बद्दल असे म्हटले जाते - दे आर द फर्स्ट टू गो एन्ड लास्ट टू कम बॅक इन वॉर. आपल्याला थलसेनेबद्दल जास्त माहिती आहे हे आपल्या प्रतिसादावरून व सोबत दिलेल्या राफेल बद्दलच्या सबळ पुराव्यावरून दिसतेच आहे.

मी इंजिनिअर कोरचा नाही. आर्मी मध्ये आर्मी एविएशन एक कोर आहे असे सांगू इच्छीतो आपल्याला माहिती असेलच म्हणा.

मी कोण आहे, मला पैसे कोठून मिळतात, मी कोणासाठी काम करतो व माझ्या मनात काय आहे हे सांगितल्याबद्दल धन्यवाद.
एकूणच आपला प्रतिसाद साठवून ठेवण्या लायक आहे व जेवढी त्याची वाचने होतील तेवढा मायबोलीबद्दल लोकांचा व सभासदांचा अभिमान वाढेल.

चिडकू, मेरीच गीनो, बोकलत, टवणे सर प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

आ.रा.रा.,
कैच्याकै चुकीची तांत्रिक माहिती पसरवु नये. यापुर्वीही केवळ मोदीविरोध करायचा म्हणून एलईडी बल्ब्सपेक्षा सीएफएल जास्त चांगले असतात असं एक हास्यास्पद विधान तुम्ही मायबोलीवरच लिहिल्याचं लख्ख आठवतंय.

https://ajaishukla.blogspot.com/2018/11/iafs-36-rafales-cost-40-per-cent...
The price per Rafale aircraft that the government agreed in 2016 with French company Dassault for 36 fighters is 40 per cent higher than what Dassault had offered in 2012, in a global tender for 126 medium multi-role combat aircraft (MMRCA).

दासू आणि रिलायन्सचं साटंलोटं असल्याच्या बातम्याही येताहेत.

भरत - अरे वा जे सुप्रिम कोर्टाला देखील माहित नाही ते अजय शुक्लाला माहिती झाले. मजा आहे.
आज मी म्हटले तर - "मला कळले की राफेल ची किंमत २०१२ पेक्षा ५० टक्क्यांनी कमी आहे. अगदी विश्वासातल्या सुत्रानी मला माहिती दिली आहे" - तसेच आहे हे.

तुम्हांलाही माहिती आहे की.
<पण तरी सुद्धा वाटाघाटी पूर्णत्वाला पोहोचलेल्या ३६ रफाल ची किंमत अर्धवट वाटाघाटीच्या यूपीए पेक्षा कमीच आहे > हे तुमचंच वाक्य.
शिआय फ्रान्सच्या माजी राष्ट्राध्यक्षांनी आपल्या कुणा मित्रांना मदत करायला हे विधान केलं, हेही तुम्हांला माहीत आहे.

हे अजय शुक्लासुद्धा निवृत्त लष्करी अधिकारी आहेत.

मी या चर्चेतून अंग काढून घेण्याचे कारण म्हणजे लेखकाचे फक्त पीएम ने कुठला करार केला आणि त्यात त्यांना काय स्वातंत्र्य आहे याबद्दल आग्रही असणे. पीएम च्या अधिकारात होणा-या करारांची मला नीटशी माहिती नाही. कदाचित त्यांना स्वातंत्र्य असेलही. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या भ्रष्टाचार झालेला नाही असे म्हणता येईल.

मात्र ज्या कराराबाबत निविदा निघालेल्या आहेत त्या कराराचे स्वरूप बदलण्याचे कारण काय याला समाधानकारक उत्तर मिळाले नाही.
हवाईदलातर्फे संरक्षण मंत्रालयाने या निविदा काढल्या. त्यात राफेल कंपनीने सहभाग घेतला. आता जर कराराचे स्वरूप बदलून त्यात अन्य काही संरक्षण सामग्री घ्यायच्या असतील तर निविदा रद्द करून पुन्हा निविदा मागवणे गरजेचे असते. आहे त्या निविदा रद्द झालेल्या नाहीत मात्र करार करण्याची पद्धत बदलली गेली आहे. ही गोष्ट ऑडीट मधे येणार हे नक्की.

जर निविदा मागवल्या गेल्या असत्या तर खुल्या स्पर्धेत कदाचित क्रमांक दोनच्या निविदेची
विमानाची किंमत + इतर सामग्रीची किंमत + रखरखाव किंमत ही कमी झाली असती.

अनिल अंबानी काही सरकारी कंपनीचे डायरेक्टर नाहीत. त्यामुळे अंबानींच्या कंपनीला जिला कसलाही अनुभव नाही तिला संधी देताना खुली स्पर्धा घेतली गेलेली नाही. हिंदुस्तान एरोनॉटिक्सला स्पर्धेतून का काढले याचे समाधानकारक स्पष्टीकरण नाही. टीओटी म्हणजे तंत्रज्ञान हस्तांतरणापाशी घोडे अडलेले होते तर नव्या सरकारने तो मुद्दा करारातून काढून टाकून हाल ला कंत्राट द्यायला हवे होते.
आताच्या परिस्थितीत अंबानीकडे सेट अप नाही. अंबानी हे काम हाल कडूनच करून घेणार हे निश्चित आहे. तर मग अंबानीला नेमले कशासाठी ?

या प्रश्नांची छापील उत्तेर वाचून कंटाळा आलेला आहे. त्यामुळे नवीन काही असेल तर सांगा अन्यथा इग्नोर करा.

रणजित चितळे - तुम्हाला माझे प्रश्न समजलेच पाहीजेत असा माझा आग्रह नाही. तुमचे चालू द्या. मी उत्तरे कुणाला विचारली आहेत ते फक्त एकदा वाचा.

<< तर मग अंबानीला नेमले कशासाठी ? >>
----- अम्बानी यान्चा एकेरी उल्लेख... जाणवला.

त्याना तर दासू ने नेमले आहे ना ? त्यान्चे काय निकष आहेत हे आपल्याला कसे समजणार? आपण ऑफसेट मिळतो आहे यात आनन्दाने नाचायचे. Happy

<<प्रत्यक रक्षा करारात कोणत्या गोष्टी सार्वजनिक करण्यास मोकळ्या व कोणत्या गोष्टी गुप्त ठेवायच्या ह्याची कलमे असतात. जर त्याची किंमत सार्वजनिक केली गेली तर आपल्या शत्रू राष्ट्रांना आयतेच किमतीच्या अंदाजाचे आकडे उपलब्ध होतील. त्यावरून त्यांना कोणती शस्त्र आपण विकत घेत आहोत ह्याचा अंदाज लावता आला असता. शत्रू राष्ट्राला एकदा अंदाज लागला की त्या शस्त्राला तोड म्हणून त्याला मारक अशी शस्त्रप्रणाली विकत घेऊन तो आपल्याला शह देऊ शकतो. युद्धाचा हाच खेळ असतो. >>
------- पुन्हा वाचले. असे कोणते शत्रू राष्ट्र कोण आहेत ज्यान्ना याची किम्मत माहित नसेल, माहित नाही ?

किम्मत जाहिर केली काय किव्वा नाही केली काय शत्रू राष्ट्रा पासुन अशी खरेदी तर लपलेली नाही, त्याना तर खुप आधीच कळाले आहे. किम्मत लपवण्याचा अजुन काय उद्देश असणार आहे ?

धागालेखक म्हणतात त्याप्रमाणे विमान चान्गलेच असेल याबद्दल कुठलाच वाद नाही. पण आर्थिक व्यावहारात किती अनावश्यक लोकान्चे हात ओले झाले असतील या बद्दल रास्त शन्का माझ्या मनात आहेत. कितीही पारदर्शकतेचा आव आणला, यन्त्रणा स्वच्छ आहे असे बिम्बवले तरी मनुष्याचा लोभीपणा नव्या क्लुप्त्या शोधतो. "प्रत्येक रक्षा खरेदी भष्टाचारातून निर्माण झालेली नसते हे त्यांना समजले पाहिजे." असे धागालेखकाचे म्हणणे गाफिल रहाण्यासारखे आहे.

असे अजय शुक्ला बिझीनेस स्टॅन्डरर्ड मध्ये लिहितात व भरत येथे देतात. पण काही तसे नाही.
डिपिपि प्रमाणे केलेले व शेवटी g2g ने करार केला. खरे तर डिपिपि प्रमाणे जाण्याची आवश्यकता नव्हती तरी सुद्धा ती केली गेली.

Pages