व्यक्तिचित्रणः कॅटफिश - स्वाती_आंबोळे

Submitted by स्वाती_आंबोळे on 22 September, 2018 - 22:03

टीप : प्रस्तुत ललितातील सर्व पात्रे खरी आहेत. कोणत्याही काल्पनिक व्यक्तीशी त्यांचा संबंध आढळल्यास तो योगायोग समजावा.
---

"So you all got catfished?! And I thought you were a bunch of smarties!" - लेक डोळे फिरवत उद्गारला आणि पुन्हा टीव्हीकडे वळला.

मी हळूच टेबलाखाली फोन धरून आम्ही Catfished म्हणजे काय झालो ते गूगल केलं. अर्बन डिक्शनरीने तत्परतेने सांगितलं: 'Catfish : Someone who pretends to be someone else, especially on the internet.'
---

तिची माझी ओळख जवळपास एका तपापूर्वीपासूनची. इन्टरनेटला घरीदारी सहज अ‍ॅक्सेस उपलब्ध झाला आणि जगभरातील मराठी पाउलखुणा जपणार्‍या संकेतस्थळांवर संचार करता येऊ लागला त्या काळातली. आता मुलांना आंतरजालाचं नागरिकशास्त्र शाळेपासून शिकवतात. आम्ही शिकलो अनुभवांतून. आपल्या फावल्या वेळेत, आपल्या मातृभाषेत ज्यांच्याशी संवाद साधता येतो अशी मंडळी भेटणं याचं अप्रूप परदेशात अजूनही वाटतं, तेव्हा तर तो जवळपास चमत्कार वाटायचा! मग त्यातही समानधर्मीयांबरोबर विशेष सख्य जमणं ओघाने आणि सहज झालं. पुढे यातली बरीच मंडळी प्रत्यक्षातही भेटली आणि आतातर आयुष्याचा अविभाज्य भाग झाली आहेत.

ती फारशी कोणाला प्रत्यक्ष भेटल्याचा इतिहास नाही. पण ऑनलाइन गप्पा मारायला कधीतरी यायची. अतिशय सुंदर, तरल ललित लेखन करायची. मला तिचं लिखाण आणि तिला माझ्या कविता आवडत असल्यामुळे मग कधीतरी व्यक्तिगत निरोप - ईमेल्सही सुरू झाल्या आणि मैत्री दृढ होऊ लागली. जुजबीच पण खाजगी माहितीही एकमेकींना सांगितली गेली.

माझ्यापेक्षा वयाने लहान होती ती. जाहिरातविश्वात काम करायची. पार्ल्यात तिच्या वडिलांचं घर होतं. डॉक्टर होते ते. भाऊ अमेरिकेत होता, आई पूर्वी विल्सन कॉलेजला मराठीची प्राध्यापिका होती. तिने लहानपणापासून हट्टाने मराठी वाचनाची सवय लावल्यामुळेच ही इंग्रजी माध्यमात शिकलेली असून इतकं उत्तम मराठी लिहायची.

कामाच्या निमित्ताने जगभरात भटकंती करायची ती आणि भेटली की नेहमी काहीतरी सुरस आणि चमत्कारीक असायचं तिच्या पोतडीत सांगण्यासारखं. बहुश्रुतता होती, तल्लख विनोदबुद्धी होती आणि एक तरुण सळसळता उत्साह होता - आमच्या नाठाळ ग्रूपमध्ये किती सहज मिसळून गेली होती ती.

पुढे एका बंगाली मुलाच्या प्रेमात पडली. त्यांचा शेजारीच होता. सुंदरबनाच्या पर्यावरण संवर्धन-संरक्षणाचं काम करणार्‍या टीमचा भाग होता. ही महागड्या उंची वस्तूंची शौकीन, जगभर फिरणारी, एलीट अर्बन उत्साही मुलगी आणि तो अबोल, विरक्त, ध्येयासक्त मुलगा. मजेशीर जोडा होता. पण ती आनंदात होती. त्याच्याबद्दल बोलायला, त्याच्यावरून चिडवून घ्यायला किती आवडायचं तिला! तिचा साखरपुडा झाल्याचं कळलं तेव्हा मी कधी नव्हे ते तिला फोटो पाठवायला सांगितलं. तोवर तितपत हक्क वाटायला लागला होता. तिच्या लिहिण्यावरून माझ्या डोळ्यांसमोर जशी छबी निर्माण झाली होती, तशीच होती फोटोतली ती. छान होता जोडा. खूप मनापासून शुभेच्छा दिल्या होत्या तिला.

त्याच काळात कधीतरी वडील गेले तिचे. त्यांच्याशी ती खूप - आईपेक्षाही अधिक अटॅच्ड होती. वडिलांचं जाणं खूप खोल परिणाम करून गेलं तिच्यावर. त्यात 'लॉन्ग डिस्टन्स रिलेशनशिप'चे तोटे दिसायला लागले होते. भावी नवरा मुळात अबोल, आणि त्यात चॅट-ईमेलवर फार मोकळेपणी बोलणारा नव्हता. तिच्या बोलण्यात कधीतरी डिप्रेशन डोकावायला लागलं. काळजी वाटायची, पण वडिलांबद्दल सांत्वनपर ईमेल पाठवण्यापलीकडे आणि नंतर भेटेल तेव्हा थोडं खेळीमेळीचं बोलण्यापलीकडे काय करता येणार होतं आम्हाला?

खूप पॅशनेट माणसांचा उत्साह जसा झगमगीत असतो तितकंच त्यांचं नैराश्यही खोल काळोखं असणार हे बहुधा आपण गृहित धरलेलं असतं.
तशाही तिच्या भेटी, तिचं ऑनलाइन येणं किंवा ईमेल्स वगैरेंना उत्तर देणंही फार नियमीत नसायचं, पण फिरती-प्रवासांच्या गडबडीत नसेल जमत असं समजायचो आम्ही. आता ते आणखीनच अनियमित झालं होतं.

मग एकदा आली ती आनंदाची बातमी घेऊन. ती लग्न करणार होती. दोघंही आपापल्या फिरतीवर युरोपात असणार होते, तिथेच भेटून गाठ बांधणार होते. तिच्या एकाकीपणावर, नैराश्यावर आता इलाज होईल अशा कल्पनेने खूप आनंद वाटला. ती मुळातच रोमॅन्टिक, तेव्हा जवळपास इंद्रधनुष्यावरच पोचली होती! खूप थट्टामस्करी, कौतुकं करून घेऊन लग्नासाठी म्हणून गेली ती मात्र बराच काळ गायब झाली.

जगरहाटी सुरू राहातेच, पण मध्येच कधीतरी आठवण निघायची मात्र तिची. आता कुठे असेल, लग्न मानवलं असेल का असं मनात यायचं. एखादी चौकशीची ईमेल 'हवाओं पे लिख दो हवाओं के नाम' म्हणून पाठवली जायची.

मग अशीच एकदा धूमकेतूसारखी तिची ईमेल उगवली. खूप आनंदाने उघडली, पण बातमी चांगली नव्हती. प्रेग्नन्ट असताना, नवरा आणि इतर कुटुंबीय नको म्हणत असताना, कामाच्या निमित्ताने कुठे आडगावात जाऊन राहिली होती, तिथेच तिचा गर्भपात झाला होता. ते झालं तेव्हा अगदी एकटी होती, आणि नंतर एकाकी झाली होती. नवरा, आई, सासूसासरे जपत होते पण त्यांच्या डोळ्यांत कायम तिला 'तरी मी म्हटलं होतं' ही फिर्याद दिसायची! त्यात ती पूर्वी कधीतरी स्मोकिंग करायची हे सासूच्या कानावर गेलं होतं. तिचा गर्भपात हा तिचा गुन्हा ठरू पाहात होता. इतकी मोठी वैयक्तिक ईमेल तिने प्रथमच पाठवली असेल - पण वाचवत नव्हती. पूर्णपणे कोलमडून गेली असावी असं जाणवत होतं. त्यात नवरा परदेशात होता आणि ही सासरी राहिली होती रिकव्हरीसाठी.

मी एरवी फार खत्रूड बाई आहे, पण ती ईमेल वाचताना जीव तुटला. तिचं सांत्वन करणारी, धीर देणारी खूप हळुवार ईमेल उत्तरादाखल तिला पाठवली. आता आठवलं की हसू येतं, पण भावनेच्या भरात मी तिला 'बाळा' म्हटलं होतं एका ठिकाणी. तिचंही लगोलग प्रत्युत्तर आलं - ती व्हिएन्नाला तिच्या नवर्‍याकडे चालली होती. माझी ईमेल तिने विमानात पुन:पुन्हा वाचली म्हणे.
धाकट्या बहिणीची वाटेल तशी काळजी वाटत राहिली त्यानंतर तिची!

काळाचं औषध लागू पडलं असावं. नंतर बर्‍याच काळाने पुन्हा ऑनलाइन भेटली तेव्हा बरीच सावरलेली, बर्‍यापैकी नॉर्मल वाटली. खूप बरं वाटलं.
मी तेव्हा दुसऱ्यांदा प्रेग्नन्ट होते. अजून बातमी ऑफिशियल व्हायची होती, पण हा धूमकेतू पुन्हा केव्हा उगवेल काय माहीत, असं वाटून तिला बातमी सांगितली. याही वेळी अगदी लगोलग उत्तर आलं तिचं. माझं अभिनंदन केलं होतं आणि 'आता मलाही पुन्हा चान्स घ्यावासा वाटायला लागला तुझं ऐकल्यावर' असं लिहिलं होतं. खूप भरून आलं वाचून. देवावर माझा विश्वास नाही, पण हिचं इथून पुढे सगळं छान होऊ दे असं एक मनोमन साकडं घातलं गेलं.

पुन्हा चान्स नाही, पण दुसरी एक बेबी मात्र तिने त्यानंतर जन्माला घातली - कादंबरी. तोवर छोटे छोटे ललित लेख लिहीत होती, ते जोडून एक कादंबरी रचली होती तिने. मला पहिला मसुदा अभिप्रायासाठी पाठवला होता.
अभिप्रायाची तशी आवश्यकताच नव्हती, ती उत्तम लेखिका होतीच. कादंबरीची भट्टी जमून आली होती. विचारलं तर छापायची का, कधी छापायची असं काही ठरवलेलं नाही म्हणाली.

पुढे आणखी काही काळ लोटला. मध्यंतरीच्या काळात माझ्याबरोबर एका ऑनलाइन उपक्रमाच्या संयोजनातही तिने सहभाग घेतला.

तीनेक वर्षांपूर्वी मी व्हॉट्सअ‍ॅप वापरायला लागले. त्यात कॉन्टेक्ट्स पाहताना सहज लक्षात आलं की उपक्रमासाठी घेतलेल्या तिच्या फोन नंबरवर प्रोफाइलमध्ये निराळ्याच व्यक्तीचा फोटो आहे! मजा म्हणजे या व्यक्तिशीही माझी त्याच संकेतस्थळामुळे जुजबी ओळख होती. एवढंच नव्हे, तर त्या व्यक्तीला मी एका स्नेहसंमेलनात प्रत्यक्ष भेटलेही होते! ही व्यक्ती मध्यमवयीन आणि व्यवसायाने पत्रकार होती. मी गोंधळले. खरंतर अर्थ उघड होता, पण माझं मन मान्य करायला तयार नव्हतं. त्या दोघींत नामसाधर्म्य होतं, आपणच कदाचित नंबर सेव्ह करताना घोळ केला असेल अशी मी मनाची समजूत घातली.

मग काही दिवसांपूर्वी ती माझी ऑनलाइन आभासी सखी ही या व्हॉट्सअ‍ॅपवर दिसणार्‍या व्यक्तीचाच एक अवतार असल्याची कुणकूण दुसऱ्य एका मैत्रिणीकडून मला लागली. या वेळीमात्र मी त्या नंबरवर मेसेज पाठवला - ओळख दोन्हीकडे होतीच, विचारलं - मी नंबर चुकीच्या नावाने सेव्ह केला आहे का?

उत्तर आलं नाही.
म्हणजे, थेट उत्तर आलं नाही. फक्त त्या व्यक्तीने तिचा प्रोफाइल फोटो तत्परतेने काढून टाकला.

एक गुपित फुटलं, एका विश्वासाला तडा गेला.

खूप वाईट वाटलं. आता इतकी वर्षं आंतरजालावर संचार केल्यावर आभासी अवतार / डुप्लिकेट आयडीज ही काही नवलाईची बाब राहिलेली नाही. त्याचं दु:ख वा राग वाटण्याऐवजी उलट 'आयडी ओळखा' खेळ खेळण्यापर्यंत मजल गेली आहे.
पण हे प्रकरण त्यातलं नव्हतं. इथे जीव गुंतला होता.

तिने मला काही harm पोचवला का? नाही. माझी दुरुपयोग करता येण्यासारखी काहीही माहिती ना त्या व्यक्तीने कधी मागितली, ना मी कधी दिली. तिने कुठला शब्द देऊन मोडला का? माझं काही नुकसान झालं का? नाही, अजिबातच नाही.
पण तिने एक इतकं elaborate आभासी विश्व विश्वामित्राच्या प्रतिसृष्टीसारखं इतकी वर्षं maintain केलं? का? काय मिळालं असेल त्यातून?!
लिहिण्यासाठी टोपणनाव घेणं निराळं आणि न घडलेल्या अपघात-दुर्घटनांबद्दल हाडामांसाच्या माणसांकडून सांत्वनं करून घेणं निराळं! कोणाचेतरी साखरपुड्याचे फोटो आपले म्हणून पाठवणं निराळं!

यथावकाश त्या व्यक्तीने स्वत: वस्तुस्थिती मान्य केली असं कळलं. फोटो कोणाचे होते वगैरे तपशिलांत तसा अर्थ राहिला नव्हता, पण तेही समजलं. जे घडलं त्यात तिला फारसं काही गैर वाटलेलंच नाही असंही कानावर आलं. तिच्या लेखी हा सगळाच एक साहित्यिक प्रयोग होता.
मला एेकताना वाटलं की माझ्यासारखी मंडळी या प्रयोगाचं साहित्य ठरली.

इतका काळ इतक्या लोकांना एका काल्पनिक व्यक्तीवर विश्वास ठेवायला लावणं हा तिच्यातल्या लेखकाचा विजय म्हणायचा की हे इतकं बेधडक बेमालूम करावंसं वाटणं हा माणूसकीचा पराभव?
कोण जाणे!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुमच्या भावनाहि समजल्या आहेत पण या प्रकरणात तुम्ही थोडं ओवरबोर्ड गेला आहात असं वाटतंय...>>
असं नाही वाटत! फोटो मागितल्यावर दुसर्याचा फोटो देणे कितपत एथिकल आहे? कारण फोटो दिल्यावर ती व्यक्ति खरी आहे असा समज होतो आणि भावणिक गुंतवणुक वाढु शकते.

हे प्रकरण भलतंच आहे!
एक कादंबरी लिहीण्यासाठी कोणी या अशा पातळीवर उतरून अनेक वर्षे फसवणूक करू शकतं हे माझ्या कल्पनेपलीकडंचं आहे.
स्वाती तुम्ही हा लेख लिहून अत्यंत उत्तम काम केले आहे. ज्या सोमि वरून या गैरप्रकाराची सुरुवात झाली तिथे हे प्रकरण उघडकीस येणे आवश्यक होते.
बाकी माफी आणि स्क्रीन शॉट मधील पोस्ट विषयी - जो बूँद से गयी.. एवढेच म्हणावेसे वाटते.
There are morals and ethics in every business.

पण फार पूर्वी जुन्या माबोबरही असे भावनांशी खेळणे एकदा झाले होते. फक्त तेव्हा दोन अवतार असे नव्हते. एकच अवतार , माबोवर पोस्ट असे होते. आता निटसे आठवत नाही पण अपंगत्व, आजारपण असलेला तरुण मुलगा असा काहीतरी अवतार होता. त्यामुळे नकळत सॉफ्ट कॉर्नर वाटे मात्र नवे माध्यम आणि भिडस्त स्वभावामुळे कधी वैयक्तिक संपर्क, विपू वगैरे नव्हता. आतासारखे २४ तास नेट , वायफाय, सेलफोन भानगडही नव्हती. नंतर त्याच्या निधनाची बातमी, हळहळणे , श्रद्धांजली, वगैरे झाले होते. नंतर असे काही नव्हतेच हे कळले. हे अगदी सुरवातीच्या काळात झाले >> हे आठवतेय. त्या (वैयक्तिक नसलेल्या) अनुभवानंतर ताक ही फुंकर मारून पिणे जरुरी आहे हे लक्षात आले.

प्रयोग म्हणून हे सुरू झाले असेल हे सहज मान्य करता येण्यासारखे आहे. तेच बेरींग एका दीर्घ कालावधी मधे धरून ठेवणे सहज शक्य आहे हे ही बघितले आहे. स्वाती ने लिहिल्याप्रमाणे कुठले डीटेल्स देणे-न देणे हा त्या दोन आयडीज च्या एकमेकांपरी असणार्‍या comfort level चा भाग आहे. त्यामूळे स्वातीला कुठेतरी त्याची खिन्नता वाटणे किंवा hurt होण्याची भावना होणेही सहज समजता येण्यासारखे आहे. तरीही लेख संयतपणे (प्रभावीपणे लिहिणे expected आहे) आहे नि आपण catsfish झालो हे मान्य करणे नक्कीच कौतुकास्पद आहे. शर्मिला फडके नी boundary cross केली की नाही हे मात्र कोण ठरवणार ? ह्या प्रकारात गुंतलेले दोन आयडी कि इथे वाचणारे ? (माझ्या पुरते हे दोन आयडी पण परत त्यांच्या सीमा वेगवेगळ्या असणे सहज शक्य आहे) जिथे moral, ethical असे काही येते तिथे सगळेच fluid होते नि boundaries पण सतत बदलत्या राहणार आहेत. अगदी मायबोलीवर सुद्धा स्वाती२ ने लिहिलेल्या gulf मधल्या आयडी पासून अंकुर, HH, कु.र्‍हु. ते थेट ह्या प्रकरणापर्यंत सगळेच आयाम सतत बदलेलेले आहेत हे जाणवतेय.

only smarter .. हे जबरदस्त smart आहे हे आता जाणवतेय. Happy

एका कधीही न भेटलेल्या व्यक्तीविषयी निव्वळ तिच्या लिखाणामुळे भावनिक गुंतवणुक निर्माण होणे आणि ती (आभासी) व्यक्ती प्रत्यक्षात दुसरीच आहे हे समजल्यावर फसवणुक झाल्याची भावना होणे स्वाभाविक आहे. पण ही स्वतःहुन ओढवून घेतलेली फसवणूक वाटते. तसेच, खर्‍या व्यक्तीचे नाव उघड करणे योग्य वाटले नाही. पण असो.

लेख छान जमलाय. म्हटल तर व्यक्तीचित्रण, म्हटल तर अनुभव कथन, म्हटल तर मन मोकळ करणे.

लिहिलेल्या काळात मायबोलीवर नसल्याने एक व्यक्तीचित्रण/ अनुभवकथन म्हणूनच वाचला लेख. अत्यंत संयत शब्दात दुखरी नस उघडी करुन 'मागेवळून बघताना' अशा प्रकारची भावना वाटली. स्वाती मूव्ह ऑन झाली असेलच, आजच्या काळात इंटरनेट मनात आणखी रुजल्याने बहुदा असे अनुभव येऊ नयेत.
रच्याकने: गेल्याच आठवड्यात मुलाला शाळेत कुठली माहिती वैयक्तिक आहे आणि काय सोशल मिडिआ/ ऑनलाईन शेअर केलेली चालते याबद्दल सांगितलं, आणि आम्ही चर्चा करत होतो. वीकेंडला 'सर्चिंग' नावाचा अत्यंत सुंदर चित्रपट बघितला आणि त्याचा मनात खोलवर इंपॅक्ट झाला आणि काल हा लेख वाचला. Sad
जागतिक अनुभव देणार्‍या आंतरजालावर वैयक्तिक अनुभव किती फुंकुन घ्यावे लागतात अर्थाची स्वातीची कमेंट विचारात पाडून गेली.

अंकुर आयडी तर supposedly धडा शिकवायला काढला होता ना, स्वतः गुरुजी असल्याच्या थाटात? दोन-तीन जण चालवत होते.

आताच बघ "नीधपला या सगळ्याची कल्पना पहिल्यापासून होती असं शर्मिला फडकेकडूनच समजलं." या पूर्णपणे खोट्या वाक्यातून ही बाई काय सांगायला बघतेय नक्की? >>>>> नीधप, हे वाक्य खोटं किंवा स्वातीच्या कल्पनेतून आलेलं नक्की नाहीये. "नीधप इथे पार्ल्यातच रहाते आणि तिला आधीपासून सगळच माहित होतं" हे खरोखरच शर्मिलाने सांगितलेलं आहे. शिवाय ट्युलिप ह्या आयडीने मी मायबोलीवरच्या अज्जुकाला आणि एक दोघांना भेटलेली आहे असं त्यावेळी सांगितलं होतं. आता ह्या दोन्ही संभाषणांचे पुरावे उपलब्ध नाहीत त्यामुळे विश्वास ठेवायचा की नाही हे तूच ठरव.

ह्या विश्वाच्या अफाट  पसाऱ्यात जगाच्या कानाकोपऱ्यात विखुरला गेलेला मराठी बांधव मायबोली सारख्या संस्थळांवर

अमरवेलीसारखे हे एकटेपण !
जीवघेणे वाटते अत्यंत आहे

असे म्हणत येतो. का , तर माझिया जातीचे, बोलीचे कोणी भेटावे हि आस असते म्हणून.

मात्र दुर्दैवाने या धाग्यातल्या सारखे कटू अनुभव आले की

येत गेल्या अनुभवांचे दुःख नाही
लोपला साधेपणा ही खंत आहे

 अशी भावना मनात येते.

वरून काही लोक बोलूनही दाखवतात - इथे कोण एवढं संत असतं ? तुम्हीतरी आहात का? कोणाला झाकणार आणि कोणाला काढणार.

फक्त ह्या आयडी मधे हा दाह नाही
गाडला माबोत तंतोतंत आहे

अरे... अरे पण...

ग्राह्य का धरता तिला, की संत आहे ?
सहनशक्तीला तिच्याही अंत आहे

असो. अशा कडवट अनुभवांतूनही फायदाच होतो. आपण त्यातून योग्य तो धडा घेऊन आपलं आंतरजालीयवर्तन शुद्ध करून घ्यावं , बस्स.

दोष रक्तातील करते दूर सारे
कारले कडवट जरी.....गुणवंत आहे

“हा सुर्य आणि हा जयद्रथ “ असा प्रकार आहे चाललाय ... Wink

म्हणूनच व्यक्तिचित्रण ह्याला का म्हणायचे?

बाकी, लेखिकेला कोणी जबरदस्ती केली न्हवती सलगी करण्याची. लेखिकेने सुद्धा स्वतःच्या करमणूकीसाठीच दोस्ती केली म्हणून इतका काळ गेला ना? सर्टनली, शी वाज नॉट अ किड अँड एन्नोसंट तर नाहीच की, जीव गुंतला वगैरे लिहून गळे काढायला.
आधीच्या माझ्या पोस्टमध्ये लिहिल्याप्रमाणे, प्रत्येकाच्या चुक आणि बरोबरच्या संज्ञा वेगळ्या असतात.
उदाहरणार्थ, जर दोन चोरांमध्ये , छोटी चोरी करणारा चांगला की मोठी चोरी करणारा चोर चांगला, अशी चर्चा जशी हास्यास्पद असेल तसेच आहे हे.
“कुणा निरागस व्यक्तीला, भावनिक रित्या दुखवणे आणि त्यातून ‘वापर’ करणे ( विकृत गरजेसाठी) वाईटच;
पण इथे काही निरागस व्यक्ती असा प्रकार नाहिये...
ह्या लेखिकेला पाहिलेय की, कायम दुसर्‍यांना टारगेट करून करमणूक करताना. त्यावेळी असेच वाटायचे की, ह्या आंबोळे आयडीला नक्की कसली मजा येतेय दुसर्‍यांना टारगेट बनवोइन मजा घ्यायची? मला ती विकृतीच वाटते.
आज त्या टारगेट झाल्या दुसर्‍या कोणाच्या तरी. हाच फरक.
परत हेच की, हिच जाणीव होतेय , “हॉउ कम समवन वाज स्मार्टर दॅन मी” हेच ज्यास्त बोचलेय म्हणून हा लेख प्रपंच करून अनुकंपा मिळवणं दिसतोय... आणि दिशाभूल करण्याचा प्रकार..बाकी काही नाही.

>>>इतक्या प्रकारे उठसूठ लोकांना दुखावणे, अपमान करणे, ठरवून हल्ला करणे वगैरे केलेल्या व्यक्तीने इतके दुखल्याचे नाटक केले की हास्यास्पद ठरते हे विसरायला झाले असेल तर ते ही लक्षात ठेवावे.<<<
+१
माणुसकीच्या गप्पा अश्या व्यक्तीने करणे हास्यास्पदच आहे.

>>>आपण दुसर्‍याला जसे बरेवाईट अनुभव देतो, तसेच आपल्याला येणार. काही विशेष नाही.<<<
+१

पराग, संभाषणाचे पुरावे उपलब्ध नाहीत याखाली तू काहीही खपवशील. का विश्वास ठेवू मी तुझ्यावर?
आधी म्हणजे नक्की कशाच्या आधी? हो मै ला जेव्हा कळले त्याच्या आधी मला माहिती होते. मग?
मै किंवा तुम्ही लोक कुणी देव आहात का की तुमच्या आधी जगाला कळता कामा नये?
पहिल्यापासून आणि आधीपासून यात फरक आहे. ही तुमची आंबोळे बाई मी पहिल्यापासून यात सामील होते असे शर्मिलाने तिला सांगितले असे सुचवू पाहते आहे. हा शुद्ध खोटारडेपणाच आहे. शर्मिलाने तिला वा तुलाही असे सांगितलेले नाही. मी वरतीही लिहिलेय की पहिला ड्राफ्ट वाचला तेव्हा मला कळले. त्यावेळेला ट्युलिप आयडीने ब्लॉग वा पोस्टस कधीच बंद झालेल्या होत्या.
परत मी शर्मिलाचा घोर निषेध नाही केला म्हणून मी मूळ विषयापासून धागा भरकटवते आहे असाही आंबोळेने आरोप केलाय तर मैत्रेयीचे म्हणणे मी पाठराखण करतेय.

<एक कादंबरी लिहीण्यासाठी कोणी या अशा पातळीवर उतरून अनेक वर्षे फसवणूक करू शकतं हे माझ्या कल्पनेपलीकडंचं आहे.
स्वाती तुम्ही हा लेख लिहून अत्यंत उत्तम काम केले आहे. ज्या सोमि वरून या गैरप्रकाराची सुरुवात झाली तिथे हे प्रकरण उघडकीस येणे आवश्यक होते.> +१

साखरपुडा फोटो, वडील गेले म्हणून सहानभूती, लग्न, गर्भपात, नैराश्य इतके खोटे तपशील देउन कोणाच्याही भावनांशी खेळणे ही मला विकृत मानसिकता वाटते.
anything for a good fiction म्हणजे तर कहरच आहे !

लोक इथे आपल्या खर्‍या ओळखी लपवून उघड उघड इतरांच्या इथल्या व्यक्त होण्यावर विखारी टिका करतात. कितीतरी लोकांना तर पदार्पणातच टोचून टोचून मारतात. खिल्ली उडवतात. तेव्हा त्यांच्या नाजूक भावनांचा विचार केला जातो का? जब अपने पर आती है तो सबको माणुसकी आठवती है... कर्मा इज अ बीच.

ह्या लेखिकेला पाहिलेय की, कायम दुसर्‍यांना टारगेट करून करमणूक करताना. त्यावेळी असेच वाटायचे की, ह्या आंबोळे आयडीला नक्की कसली मजा येतेय दुसर्‍यांना टारगेट बनवोइन मजा घ्यायची? मला ती विकृतीच वाटते.

>>>अहो अ‍ॅडमिन, ह्यासारखे पर्सनल अटॅक्स तुम्हाला चालतात. आणि मी फक्त म्हंटले की झंपी ह्या आयडीने नीधप ह्यांनी तेच परत लिहीले आहे तर ते तुम्हाला तत्क्षणी उडवून टाकण्याइतके आक्षेपार्ह वाटते. हे काय गौडबंगाल आहे?

ती ट्युलीप खोटी होती हे वाचून मनस्वी दु:ख झालं. बाकी कोण चूक कोण बरोबर या वादात पडायची इच्छा नाही. मी तिचे ब्लॉग आवडीने वाचायचे. मला ती माझ्याच वयाची एक मस्त मुलगी वाटायची. तिचं परदेशी राहणं , प्रेमात पडणं फार जवळून पाहिले होते ब्लॉगच्या माध्यमातून!

लेख वाचून 'ठकास महाठक' ही म्हण आठवली. प्रतिक्रिया वाचून 'ठकास ठकी' ही म्हण सुचली. बाकी काही नाही

आरं तिच्या .... ह्या ट्युलिप आय डीचं मी काहीच वाचलेलं नाही. किंबहुना असा काही आयडी माबो वर आहे हे मला पहिल्यांदाच कळतंय . तो टिपापा पुरताच मर्यादित होता का?

असो, दिनेश शिण्दे उर्फ दिनेशदा यांचा बळी कुणी घेतला?

ह्या लेखिकेला पाहिलेय की, कायम दुसर्‍यांना टारगेट करून करमणूक करताना. त्यावेळी असेच वाटायचे की, ह्या आंबोळे आयडीला नक्की कसली मजा येतेय दुसर्‍यांना टारगेट बनवोइन मजा घ्यायची? मला ती विकृतीच वाटते. >>>>>> +११११११

<एक कादंबरी लिहीण्यासाठी कोणी या अशा पातळीवर उतरून अनेक वर्षे फसवणूक करू शकतं हे माझ्या कल्पनेपलीकडंचं आहे.
स्वाती तुम्ही हा लेख लिहून अत्यंत उत्तम काम केले आहे. ज्या सोमि वरून या गैरप्रकाराची सुरुवात झाली तिथे हे प्रकरण उघडकीस येणे आवश्यक होते.> +१

ट्युलिप कुणाचा ड्यु आयडी आहे हे अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या मायबोलीकरांकडून समजलं होतं आणि प्रत्येक वेळी ते तितकंच अविश्वसनीय वाटलं. आज हा लेख वाचल्यावर सुद्धा. फिक्शन प्रकार हाताळण्यासाठी एक वेगळा आयडी काढणं, तिनं केलेलं लेखन याबद्दल काही तक्रारच नाही. त्या आयडीनं वाचकांशी केलेला संपर्क लेखनापुरता ठेवला असता तरी एक वेळ ठीक होतं. पण वेळोवेळी आणि एक नव्हे तर अ-ने-क मायबोलीकरांशी अतिशय मैत्रीचे संबंध ठेवून, स्वतःहून फोन नंबरची देवाण घेवाण करून, कधी त्यांच्या लेखांवर खाजगी संपर्कातून प्रेमळ अभिप्राय देऊन, वर स्वातीनं लिहिले आहेत ते अनुभव, वैयक्तिक आयुष्यात न घडलेल्या मिझरीज सांगून इमोशनल फसवणूक करत तिनं जी युनिकॉर्न सृष्टी निर्माण केली ते अतिशय संतापजनक आहे. गंमत म्हणजे एरवी खर्‍या आयडीनं अतिशय संतुलित, समंजस, संवेदनशील प्रतिमा निर्माण केली गेली. पण आता असं वाटतंय की ती पण फिक्शनलच असावी. आणि या सगळ्याची कड घेणारे प्रतिसाद वाचून तर अती झालं आणि हसू आलं अशी अवस्था झाली.

बाकी, पेशव्यांचा बाणेदार प्रतिसाद वाचून मेरी तो बाबा आंखे भर आयी|

> gulf मधल्या आयडी पासून अंकुर, HH, कु.र्हु. > या सगळ्यांबद्दल कुठे वाचायला मिळेल?

गल्फवाला कोण आयडी आणि अंकुर मला माहीत नाही - फारच जुन्या काळातलं असावं. कुऋ म्हणजे ऋन्मोेष. HH आयडीच्या मागची व्यक्ती unknown आहे - उदा. आ.रा.रां.सारखीच - आणि त्यांच्या केसप्रमाणेच त्यामुळे काही बिघडत नाही.

सिंडरेला, कड घेण्याचा प्रकार विनोदी आहे कारण शर्मिलाने हे केलंच नाही असं तर क्लेम करता येत नाही, केलं ते बरोबर आहे असंही क्लेम करता येत नाही. मग उरतं काय - लिहिणाऱ्याबद्दल वाईट बोलणं! मोठी कुचंबणाच नाही का ही?! Happy

सगळीकडे (फेसबुक, इतर वेबसाईटस) या व्यक्तिचित्रणाबद्दल चर्वितचर्वण झाल्यावर हा लेख वाचते आहे!

ट्युलिप या आय डी मागच्या व्यक्तिचा निव्वळ "कादंबरी लिहीण्यासाठी केलेला प्रयत्न" वाटत नाही... अतिशय करुणास्पद!

स्वाती, माझी ट्युलिपशी तुझ्याइतकी मैत्री नव्हती आणि गेल्या १०-१२ वर्षात काहीच वैयक्तिक संपर्क नव्हता. पण १२-१३ वर्षांपूर्वी एकदा याहू चॅटवर गप्पा मारता मारता आधीच्या वर्षी तिचे वडील गेल्याचं तिने खूप इमोशनल होऊल सांगितलं होतं. लिहीवत नाही म्हणून मध्येच उठून पाणी पिऊन आली होती. तिला एवढं हळवं झालेलं पाहून तिचं सांत्वन करताना मी ही काही वैयक्तिक अनुभव शेअर केले तिच्याशी. पुढे (सुदैवाने म्हणायला हवं आता) फारसा संपर्क राहिला नाही. I can see why you feel emotionally betrayed, स्वाती. What can we do but become wiser? This behavior indicates an extreme lack of empathy on the part of the perpetrator and such people exist. You cannot guard yourself 100% while still staying true to who are. Wish you peace and calm soon.

एक कादंबरी लिहीण्यासाठी कोणी या अशा पातळीवर उतरून अनेक वर्षे फसवणूक करू शकतं हे माझ्या कल्पनेपलीकडंचं आहे.
स्वाती तुम्ही हा लेख लिहून अत्यंत उत्तम काम केले आहे. ज्या सोमि वरून या गैरप्रकाराची सुरुवात झाली तिथे हे प्रकरण उघडकीस येणे आवश्यक होते. >>> +१११

स्वाती आणि इतरही अनेक जण, जे इथे आहेत, इथे नाहीत त्या प्रत्येकाची, माझ्या ब्लॉगच्या प्रत्येक वाचकाची भावनिक फसवणूक केल्याबद्दल मनापासून माफी मागते. ज्या कारणासाठी, ज्या पद्धतीने मी हे केलं ती चूकच होती, त्याचा मला पश्चात्ताप आहे. मायबोली व्यवस्थापनाचीही मी माफी मागते.

गल्फवाला कोण आयडी --- मला पण माहीत नाही.
आणि अंकुर --- Uspj aani pupu kalat hota bahutek 2002ish. तेव्हा बहुतेक तुम्ही वेगळ्या नावाने फक्त कविता लिहायचात ( माझी understanding चूक असू शकते), गप्पा-टप्पा वर bad bandwidth situation च्या वेळी नव्हता. बी आयडीची पाठराखण करायला तो आयडी काढला होता म्हणे टवाळ आयडीज ना धडा शिकवायला. हवाहवाई आयडी एक आयडी होता बऱ्याच आयडी पैकी अंकुर आयडी चालवणारा बहुतेक. सिंगापूर time झोन मध्ये लिहिणे इत्यादी त्या project चे challanges होते असं नंतर गौप्यस्फोट बीबीवर सांगितले होते.

ट्युलिप आणि शर्मिला फडके ! बरं! (ट्युलिपचा अंदाज बरोबर होता, शर्मिलाच्या नावाचा अंदाज मात्र अजिबात आला नसता. असो.)
मलाही ट्युलिपचं लेखन खूप आवडायचं. मागे एकदा तिचा ब्लॉग परत उघडून तिथे काही हालचाल दिसते का पाहिलं होतं. आता तिचं लेखन परत वाचायला मिळणार नाही याचं वाईट वाटतंय.

कादंबरी लिहिण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून व्यक्तिरेखेच्या नावाने ब्लॉग सुरू करणे हा जेन्युइन मास्टरस्ट्रोक होता. मात्र पुढचं सगळं 'गॉट कॅरीड अवे' रकान्यात जातंय.

शर्मिला तुम्ही तुमची येऊ घातलेली कादम्बरी थाम्बवणार आहत का? एखाद्याची/समुहाची फसवणूक स्वताच्या फायद्यासाठी करण हा गुन्हा आहे ज्याला प्रयोगाच गोन्डस नाव देत आहात. विठ्ठल कामत ह्यान्च्या अनेथिकल लैखनिक प्रपोसल सन्दर्भातील तुमची नैतिक पोस्ट ... इतका इलॅबोरट स्कॅम इतके वर्ष ... सिम्पली लाजवाब... मुजरा

शर्मिला तुम्ही तुमची येऊ घातलेली कादम्बरी थाम्बवणार आहत का? एखाद्याची/समुहाची फसवणूक स्वताच्या फायद्यासाठी करण हा गुन्हा आहे ज्याला प्रयोगाच गोन्डस नाव देत आहात. -- perfect right question. मला पण हेच विचारायचं होतं. तुमचे ट्युलिप म्हणून ज्या लोकांना / शी व्यक्तिगत इमेल/ chatting करुन त्यांची व्यक्तिगत माहिती कळली त्या माहितीच काय? Breach ऑफ information किती मोठं! trust तर जाऊच दे. लोकांना /नी ट्युलिप शी गप्पा / संबंध ठेवले होते.

Pages