बिग बॉस १२ : After padosis, it's time for jodis vs single

Submitted by अविका on 19 September, 2018 - 04:15

बिग बॉस १२ सुरु झाले आहे
मराठी बिग बॉसचे ईथे खुप चाहते होते
तसेच हिंदी बिग बॉस, खासकरुन सलमानच्या हॉस्टींगचे चाहते पण खुप आहेत
तर त्यावर चर्चा करायला हा धागा

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आज इंटरेस्टींग नॉमिनेशन्स ची बातमी आली आहे !
सोमी - रोमिल - केव्ही - श्री नॉमिनेटेड , याचाच अर्थ सुरभि इन फिनाले वीक Happy
फायनल कॅप्टनशिपसाठी दीपिका - दीपक - सुरभि !
यावेळी डबल एव्हिक्शन असु शकतं, मज्जा येईल जर रोमिल आणि सोमी उडले तर , अर्थात धोका जास्तं केव्ही सोमि या दोघांना आहे.
जर मॉल टास्क केले तर , मराठी जनता हरियाणवी छोर्याला बाहेर काढु शकते !

त्या पकाऊ झीरोचं प्रमोशन आणि शाहरुखचं दर्शन नको म्हणून कालचा वीकेन्डचा वारही पळवला !
तरी शनिवार रविवार सलमानने केव्हीला (बिबॉच्या हिस्टरीतला डंब स्ट्रॅटेजीज करणारा/काहीही परपझ नसणारा) आणि रोमिलला (सतत झोपण्याबद्दल तेही स्ट्रेचरवर पडल्यासारखा ) ही लेबल्स देऊन जे शालजोडीतले मारले बघून संतुष्ट झाले !

As I mentioned before, Deepak looks like a potential winner for channel.
Rest all are shown in negative shade while Deepak is praised !
I'm ok witb Surbhi reaching in finale; just don't want Romil in top 5 !

Deepak looks like a potential winner for channel. >>> अय्यो नको. जाऊदे मी काही फिनाले वगैरे बघणार नाही. तसंही मेघा असती तर इंटरेस्ट होता.

मला वाटतं सोमी रोमिलला काढतील डबल eviction असेल तर. तो रोमिल झोपा काढतो ना. रेशमला काढलेलं आळशीपणामुळे तसं. ती आळशी नसती एवढी तर स्मिताला थोडंच पुढे जाऊ दिलं असते तसं रोमिलबाबत होऊ शकतं पण रोमिलला votes मिळतील. अर्थात bb ठरवतात ते होतं.

केवीला बायको open letter लिहिते ह्या कारणास्तव काढू शकतात, सांगता येत नाही.

अन्जु,
श्रीसन्त अस्स्णारच आहे गं, त्या शिवाय सिझन नाही , नॉमिनेट झाल्याने काय फरक पडतो त्याला !
बाकी असही कानावर येतय कि आठवड्यात मॉल व्होटींग टास्क आहे म्हणे, यात बिबॉनी मॅनिप्युलेट करायला पूर्ण स्कोप होता !
ज्याला बघायला गर्दी खेचणार नाव एकच ते म्हणजे श्री , त्यामुळे त्याने नॉमिनेट होणं गरजेचं होतं, याविरुध्द दीपक नॉमिनेशन मधे त्यांना नको होता कारण महारष्ट्रातल्या मॉल व्होटींगमधे बिहारी स्पर्धक नक्की बाहेर गेला असता!
अर्थत या लोकांची सिक्युरिटी टाईट पाहिजे, श्री ला पहायला फक्त बिबॉ ऑडीयन्स नाही तर सामान्य जनताही येईल, पब्लिकची धक्काबुक्की-गर्दी कशी आवरणार काय माहित !
मागच्या सिझनला कोणी यु.पी. चा लव्ह त्यागी होता ज्याला मॉलच्या वोटींगने बाहेर काढलं म्हणे !
बाकी लेटेस्ट न्युज : जे मी म्हंटलं तेच झालं, टिकिट टु फिनाले रेस मधे दीपिका दीपक सुरभि यांचं टास्क झालं ते नॉमिनेट नसल्यामुळे आणि....... पहिली टॉप ५ काँटेस्टन्ट सुरभि Proud

पहिली टॉप ५ काँटेस्टन्ट सुरभि >>> हम्म. मगाशी बघितलं hungry spirit वर. पुष्कर पहिला गेला होता ना फिनालेला मराठीत.

इथे पण सहा असतील फिनालेत तर आता एक फक्त बाहेर जाईल.

I think Hindi BB is different!
Top 5 in finale week , then 1 midnight eviction on Wednesday and then top 4 on grand finale weekend.

कुणीच बघत नाहीये का सध्या?
सुरभी गेली म्हणे!
करणवीरचा फुकटात नंबर लागला म्हणायचा.
अर्थात आता भांडणारे मेंम्बर्स जास्त नसल्यामुळे श्रीशांतची निगेटिव्ह बाजूच दिसत जाईल असे वाटते.
दिपीका जिंकेल.

मी फॉरवर्ड करत बघते , पण इंटरेस्ट गेलाय, कोणीच डिझर्विंग नाहीये, सारखं तेच तेच उगाळतात !
गेले,३-४ एपिसोड्स नाही पाहिले, सुरभि गेली मिड्विक एव्हिक्शन मधे.
आता अशा बातम्या समोर येतायेत कि कसल्या व्होटींगला कशालाच काही अर्थ नाही दिसतय !
सुरभिचं कॉन्ट्रॅक्ट होतं म्हणे फिनालेविक पर्यन्त जाण्याचं त्यामुळे तिला वाचवल गेलं नॉमिनेशन्स पासून.
दीपिकाला चॅनलकि बहु असल्याने फिक्स्ड विनर म्हणतायेत आणि बरच काही.. बघु कोण जिंकतय !
केव्ही सारख्या मठ्ठ डंब माणसाला ठेवतात फिनालेत जो अतिशय चिप डेस्परेट वागतो बायका गेस्ट म्हणून आल्यावर !
त्याच्यापेक्षा मग सुरभि खूप चांगली होती, मेघाचा तर क्लासच वेगळा पण अशी हुशार , स्मार्ट प्लेयर नकोच आहे बिबॉला.

काही का असेना, श्रीपेक्षा दिपीका बरी वाटते. श्री अहंकारी फार आहे. केव्ही अतिशयच गयागुजरा आहे. रोमिल जिंकणार नाही हे जवळजवळ फिक्स आहे असे फेबुवरच्या प्रतिक्रियांवरून वाटतेय.
असो.
बिबॉ मराठी कधी येतेय?

सगळ्या बिबॉ पेक्षा हा हिंदी बिबॉ बकवास होता.. मी कधीहि न बघायचा सोडणारी.. आताशी पहातच नाहि मनापासुन अन काहि पहायच राहिल तरी काहि फरक पडत नाहि.. दिपीकाच जिंकेल असं वाटतय पण..

https://www.youtube.com/watch?v=r7fcYvsSGl4

ह्यावरून पण श्री पहिला आणि रोमिल शेवटी आहे.

श्रीपेक्षा दिपीका बरी वाटते. श्री अहंकारी फार आहे. >>> हम्म्म. मलापण दीपिका जिंकली तर आवडेल. फार बघितलं नाहीये, त्यामुळे टास्क्स करत असेल नसेल माहिती नाही पण वावर अतिशय ग्रेसफुल वाटला. डिग्निटी वाटली. अतिशय निगेटिव्ह वातावरणात स्वतःला असं ठेवणं अतिशय कठीण. मेघा विनर असून करू शकली नाही.

बिबॉ मराठी कधी येतेय? >>> मागच्यावर्षी एप्रिल ते जुलै होतं, यावर्षी काय माहिती कधी ते.

श्रीसंत दीपिका केव्ही हे फायनलला असतील हे channel ने ठरवलेलंच बहुतेक. मेघा असायला हवी होती फिनाले विक पर्यंत तरी, तिने टास्क्स चांगले केले असते. पण बहुतेक तिला मराठी लोकांनी trp द्यावा म्हणून आणली पण channel ला अपेक्षित trp मिळाला नसावा म्हणून काढायचं पण ठरवलं असेल. तिच्यापेक्षा ते अतिराडा करणारे ठेवले channelने.

बीबॉ बघायचं विसरून जाते आजकाल इतकं बोरिंग झालंय. एकावेळेस ३ ४ जण एकदम बोलत / भांडत असतात. काही पत्ता लागत नई काय चाललंय ते. सुरभी असतानाचा एक एपिसोड पहिला, तिची बॉडी language काय बदलली होती, अगदी गरीब गाय झालेली. अगदी गरीब तोंड करून फिरत होती घरभर. बाकी श्रीशांत जिंकणार नक्की, त्याचे अंध भक्त ढिगाने आहेत. आता डायरेक्ट विंनिंग मोमेन्ट बघेन जमलं तर.

विकास गुप्ता आला होता पुन्हा कालच्या एपिसोड मधे, मला तो एक जबरदस्तं ओपिनियन असणारा बुध्दीमान माणुस वाटतो.
शिल्पा शिन्दे बरोबर आला होता तेंव्हाही ती बिनडोक आणि विकास खूप स्मार्ट वाटला, मी तो सिझन पाहिला नाही पण बहुदा तो शिल्पा फॅन्सना व्हिलन वाटतो.
इथले त्याचे अपिअपरन्स पाहून मला चांगला वाटला, विशेषतः सध्याच्या स्पर्धकांपुढे मागच्या सिझनचे हिना खान, विकास , गौतम गुलाटी , कामया , गौहर सगळेच आले होते ते किती उठून दिसत होते !
बर्याच दिवसांनी कालचा पूर्ण एपिसोड पाहिला आणि बरा वाटला.
श्री ने उत्तरं चांगली दिली आणि रोमिलनी थ्रुआउट सगळ्यांवरच इल्झाम लावणे जॉब एकदम परफेक्ट केला, वकिलाला शोभेल असा !
सर्वात अ‍ॅक्टिव्ह तर विकास होता , दीपकला त्यानी सपोर्ट केलं असलं तरी मेघा - जस्लीनशी केलेल्या गैर वर्तनाबद्दल सुनावलं हे चांगलं वाटलं !

शिल्पा शिन्दे बरोबर आला होता तेंव्हाही ती बिनडोक आणि विकास खूप स्मार्ट वाटला >>> अच्छा ओके. त्यांच्यातली दुश्मनी बहुतेक भाभीजी घरपे है या सिरीयलपासूनची आहे. त्या दुष्मनीमुळेच दोघांना एका सीझनला आणलं गेलं. बाकी मीपण सीझन बघितला नव्हता तो, त्यामुळे फार माहीती नाही. हे काही शॉटस टीव्हीवर बघून समजलं होतं की त्यांच्यात वाद, भांडण आधीपासून आहे ते.

Final results are coming out, Romil and KV are evicted!
So BB12 top 3 finalists are as expected, Shree Dipika and Deepak.

अच्छा, मला वाटलं, उद्याच काढणार एकेकाला. दिपक का तिघांत.

श्री जिंकेल बहुतेक.

दिपक नको पहील्या दोनांत.

Winner will be announced live in India tomorrow .
Really hope Deepak doesn't win !

My wife is saying that Deepak should win as he’s the one who needs the winning amount... Deepika and Shreeshant are wealthy and things are lined up for them already once they get out of the house Lol Although we both didn’t like Deepak throughout the season...

Submitted by हर्षल_चव्हाण on 30 December, 2018 - 08:16">>>> <हो, आजवरची हिस्टरी पाहता असे होऊ शकते. मी आधीही लिहिले होते की अश्या गरजूंना जिंकवतात हे लोक, राहुल म्हाजणीच्या सिझनला सुद्धा तोच जिंकला असता पण त्या दुसऱ्या ला जिंकविण्यासाठी तो बाहेर पडला असता.

विकास, शिल्पा अन हिना वाला बिबॉ माझा आजवरचा सगळ्यात जास्त आवडता. त्यात तिघेही खूप छान वाटायचे, हिना टास्क खूप छान करायची, विकाससुद्धा पण शिल्पा नाही, तरी ती चांगली वाटायची, गौतम वाला पण छान होता.

जुने बिबॉ पाहता, मेघा आधी बाहेर पडली त्याचे नवल नाही वाटत, मराठी मध्ये ती वासरात लंगडी गाय होती, म्हणून जिंकली

आत्ताच आलेल्या माहितीनुसार श्रीला सगळ्यात जास्त मतं मिळून तो विजेता ठरलाय>>> असे खरेच व्हायला हवे, श्रीच डिजरविंग आहे , या सिझन मध्ये

इथेही स्ट्रॉंगच होती मेघा, तिचे सीन्स एडीट केले गेले , तिचं नॉमिनेशन आणि एलिमिनेशन किती ऑबव्हियस प्लॅन्ड होतं ते जनतेला माहितेय , मेघाच्या बाबतीत बिग बॉस खेल गये , जाउद्या झालं !
चूका केल्या असतील तिनी पण इतर बर्याच सदस्यांपेक्षा खूप स्मार्ट , टास्क क्वीन, किचन क्वीन, सतत अ‍ॅक्टिव्ह होती.

Pages