बिग बॉस १२ : After padosis, it's time for jodis vs single

Submitted by अविका on 19 September, 2018 - 04:15

बिग बॉस १२ सुरु झाले आहे
मराठी बिग बॉसचे ईथे खुप चाहते होते
तसेच हिंदी बिग बॉस, खासकरुन सलमानच्या हॉस्टींगचे चाहते पण खुप आहेत
तर त्यावर चर्चा करायला हा धागा

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुरभिने घरात जंगली वातावरण तयार केलं, दंगा केला हे मान्य पण मला तिच्या तिथे असण्याबद्दल /टॉप ७ मधे असल्याबद्दल काहीच खुन्नस नाहीये, दीपक - रोहित-रोमिल या तिघांबद्दल मात्रं आहे !
तिघांनी मिळून मेघाला , कधी जस्लीन दीपिकालाही वाईट लेव्हलचा त्रास दिला, इव्हटिझिंग केलं, असभ्य कॉमेंट्स केल्या.
इन फॅक्ट रोमिल आता नाटक करतोय सभ्यपणाचा पण त्यानेच आधी सुरवात केली मेघाची टिंगल करायला, सर्वात फेक सर्वात दोगला, सर्वात हालकट मेंटॅलिटी माणुस तोच वाटतो.
हरियाणा -बिहार स्टेट्स तसेही बायकांशी असे वागणार्या लोकांनी भरलेला भाग म्हणून कुप्रसिध्द आहेत , दीपक-रोमिल जस्ट प्रुव्हिंग इट राइट !

मेघा - सरड्याची धाव कुंपणापर्यंत >>>> +१११
पण तरिही मराठी असल्याने ती शेवटच्या ५ किंवा विजयी झालेले बघताना आवडले असते. अन त्या सोमी, रोहित पेक्षा नक्कीच डिजर्विग होती हेही खरे.

मराठी बिबॉमध्ये पण ती बिल्कुल आवडली नव्हती . श्री जिंकायला हवा नाहीतर दिपीका. हे दोघे सोडुन ईतरांना बिग नो.
तरी बिबॉचे काही सांगता येत नाही गरजु म्हणुन कदाचित रोमिल किंवा दीपकला देखिल जिंकवतील.

मेघा सुरुवाती पासुन हवी होती.. वाईल्ड कार्ड येणार्या लोकाना पटकन भाव ही मिळत नाही आणि कोणी सामावुन ही घेत नाही.. वर घरातल्या लोकाना वाटत रहातं की ही व्यक्ती बाहेर सगळं बघुन आलिये मग अजुन सगळे लोक लांब राहतात.. तसं पाहता मराठी लोक एका लिमिट पर्यंत खडुस होउ शकतो.. युपी बिहार च्या लोकांसमोर अवघड आहे.. खरतर हा आपला चांगलाच गुण , पण बिबॉ साठी मात्र उलटं हवं असतं

मेघाची तिथली धाव कुंपणापर्यत होती ते ठिकच होतं ...कि, तिने अजुन सुरभी सारखं वागायला हव होतं अन आपलं स्थान टिकवुन ठेवायला हवं होतं का?... लोकं नाव ठेवायची म्हणुन ठेवतात...
खरतर हा आपला चांगलाच गुण , >> अगदि खरं..

<<तसं पाहता मराठी लोक एका लिमिट पर्यंत खडुस होउ शकतो.. युपी बिहार च्या लोकांसमोर अवघड आहे.. खरतर हा आपला चांगलाच गुण , पण बिबॉ साठी मात्र उलटं हवं असतं<< अगदी खरय! ते लोक फार ताणून धरतात.

मेघा सुरुवाती पासुन हवी होती.. वाईल्ड कार्ड येणार्या लोकाना पटकन भाव ही मिळत नाही आणि कोणी सामावुन ही घेत नाही.. वर घरातल्या लोकाना वाटत रहातं की ही व्यक्ती बाहेर सगळं बघुन आलिये मग अजुन सगळे लोक लांब राहतात.. तसं पाहता मराठी लोक एका लिमिट पर्यंत खडुस होउ शकतो.. युपी बिहार च्या लोकांसमोर अवघड आहे.. खरतर हा आपला चांगलाच गुण , पण बिबॉ साठी मात्र उलटं हवं असतं >>> खरं आहे. मेघा होती म्हणून एवढी टक्कर तरी दिली.

दीपिका मात्र ह्या सर्वांच्यात राहूनही आपली डिग्निटी आणि ग्रेसफुलनेस टिकवून आहे. ती बहुतेक शिव्या देत नाही, अपशब्दही नसतात. ह्या घरात असं टिकवून ठेवणं ह्यासाठी तिला hats off.

मेघा आत्ता गेली मधेच हे मलाही आवडलं नाही, पुढच्या सिझनला पहील्यापासून बोलावलं असतं तर ठीक होतं. नवं घर घेतलेलं, मराठी जिंकल्यावरची पहिली दिवाळी कुटुंबाबरोबर साजरी करायला हवी होती. यश एन्जॉय करायचं वर्षभर मग bb सारखे प्रोजेक्ट घ्यायचे.

मेघाची तिथली धाव कुंपणापर्यत होती ते ठिकच होतं ...कि, तिने अजुन सुरभी सारखं वागायला हव होतं अन आपलं स्थान टिकवुन ठेवायला हवं होतं का?... लोकं नाव ठेवायची म्हणुन ठेवतात... >>>>> असे काही नाही, तीथे काही फक्त सुरभी नव्हती, दिपीका पण आहे की. अश्या लोंकासमोर तुम्ही कसे रिअ‍ॅक्ट होता कसे वागता ते जास्त महत्वाचे. याच कारणासाठी मेघा मराठीत सुद्धा आवडली नव्हती. ११ सिझन फॉलो करणार्या मेघाला नक्कीच माहीत होते की तीथे कसले लोक येतात, वाईल्ड कार्ड एन्ट्री आजवर जिंकला नाही. मलातरी मेघा तिच्या ओव्हर कॉन्फिडन्स मुळे गेली असे वाटतेय. तीने स्वत:च तिच्या मराठी विजेतापदाची एकप्रकारे खिल्ली ऊडविली असे ही वाटतेय.

दीपिका मात्र ह्या सर्वांच्यात राहूनही आपली डिग्निटी आणि ग्रेसफुलनेस टिकवून आहे. >> + ११११ अगदी असेच वागणे एका विनर कडुन अपेक्षित होते.

मेघाने डिग्निटी ठेवायला हवी होती हे मलाही मान्य VB, मी हे मागेही लिहिलं होतं. दीपकला sandle दाखवली त्यापेक्षा ती घाणेरड्या शिव्याही देते हे सलमानने सांगितलं तेव्हा मला खरंचं लाज वाटली की तिने ह्या लेवलपर्यंत उतरायला नको होतं.

दीपकला अशी reaction देणं ह्यात त्याची चूक होती पण मला एकंदरीत शिव्या आवडत नाहीत कोणीही दिलेल्या, माझी शिव्यांची धाव अगदी सात्विक आहे Lol

त्या प्रसन्गाच्यावेळी नक्की काय झाल ते खुद्द मेघाच्या तोन्डून वाचा:

"There were so many incidents that happened before this. Romil [Chaudhary] had pushed me during the rangoli task and I hurt my head because of it. Surbhi [Rana] and Dipika [Kakar] also got physical during a task and no actions were taken against any of these contestants. I don’t know what conspiracy this was. Deepak deserved to be punished. No human being will tolerate such things said about them, especially about their character."

"They have shown that he (Deepak) is taking his first interview and I got upset. Before interviewing me, he went to ask the same disgraceful questions about me to a lot of other contestants. I tried to stop him several times and sometimes, even humorously, but none of it was shown in the episode. They just showed the bit where I lost my temper. I tried to stop Deepak from continuing this interview in every calm way possible. When he saw that I didn’t like it, he kept instigating me to the point that I reacted that way. It was not because of that one word but because of the series of things that he was doing and even Rohit [Suchanti] took part in some of it."

Concluding her chat, Megha said that if Deepak had done something like this outside the show, she would have beaten him up black and blue

(साभार: https://www.bollywoodlife.com/bigg-boss-12/bigg-boss-12-deepak-deserved-... )

मला दीपिका अजूनही आवडत नाही. ती अगदी टास्कही करत नाही,तिला तिच्या नवर्यानेही ते विचारले कि. उर्वशी पण अशीच होती कि, अपशब्द नाही, टास्क नाही , जास्त दंगा नाही . दीपिका केवळ सिमर इमेजमुळे टिकून आहे, जबरदस्त फॅन्स आहेत तिचे. तीच श्री ची केस. तो टास्क करण्याचे कष्टही घेत नाही. पण राग माया दुःख सगळे गुण दाखवतो. त्याचे फॅन्स त्याने टास्क नाही केलं तरी त्याची कारणं देत बसतात.
आणि केवी फार भोळा वाटायला लागलाय मला.
बाकी कॉमोनर्स अगदी खालच्या पातळीला जातात. जेवढं जसलीं मेघाला चिडवायचे तेवढं कोणालाही चिडवलं नाही. चालचलन शब्द दीपिका सोमी वर वापरला असता तर त्यांनीही मान्य केला कि थोबाडीत ठेवून दिली असती. मेघाच्या त्याच इंसिडेन्ट ला बीबॉ ने खतपाणी घालून मोठा केला आणि बाहेर काढलं. अर्थात तिला दाखवलं पण नाही, त्यामुळे महाराष्ट्राबाहेरील प्रेक्षकांना ती कशी आहे तेही कळलं नाही.
आणि तिला तुम विनर हो विनर हो असं चिडवायचे, टिंगल करायचे आणि त्यावर तिने उत्तर दिले कि हा मी विनर हू , कि तिचाच शॉट दाखवणार , लोकांना वाटणारच ती घमंडी आहे ते. जसलीं मेघा तसे पण साईड अक्टर्स म्हणून होते, कॉमोनर्स व्हिलन्स आहेत. दीपिका श्री हिरो. त्यांच्यापैकीच जिंकणार हे नक्कीच. एडिटिंग टीम ठरवलं तर काहीही करू शकते.
सगळे इमोशन्स दाखवतो म्हणून श्रीलाच जिंकावतील बहुतेक. पण फक्त सगळे इमोशन्स दाखवले म्हणून कोणी चांगला होत नाही हे माझे मत.

एकदम अनुमोदन ट्युलिप.
दीपिका काहीच फार करत नाही कारण आहे त्या फॅन्डमने तसच वाचवलय कायम तिला आणि बिबॉनेही, त्यामुळे फार भांडणात पडत नाही, फार अ‍ॅग्रेसिव होत नाही, इमेज सांभाळून आहे, डिग्निटी सांभाळून आहे, पण विनर क्वालीटीज दिसत नाही मला तरी, अर्थात फॅन्सच्या जोरावर जिंकु शकेल ती शो ! श्री रोमिल फॅन्स एकमेकांशी भांडत बस्स्तील आणि ट्रॉफी नेईल दीपिका Happy
शोएब आल्यावरचा सीन किती तो मेलोड्रामा, लोकांना मात्रं ह्र्दय पिळवटून टाकणारा वगैरे वाटला तो सीन.
मला शोएब , त्याचे उर्दु उच्चार आणि त्याचा आवाज खूप आवडला पण ड्रामा ओव्हरलोडेड, कदाचित बिबॉने शोएबला सांगून पाठवल असेल, अफ्टरॉल दोघेही अ‍ॅक्टर्स आहेत Happy

शोएब आल्यावरचा सीन किती तो मेलोड्रामा, लोकांना मात्रं ह्र्दय पिळवटून टाकणारा वगैरे वाटला तो सीन. >>> आईग, thank god मी बघितलं नाही ते. भुवनेश्वरी छा गयी मात्र, तो प्रोमो बघितला.

खरं म्हणजे मेघा task करायची तर तिला शेवटी काढायचं ना, जसं शर्मिष्ठाला ठेवलं होतं शेवटपर्यंत तसं. किंवा आधी एक आठवडा काढायचं, इतक्या लवकर पाठवायची गरज नव्हती.

केव्हीला किती पाठींबा आहे, तो ह्या लोकांना सोडून तिथे का गेला आणि तो task करतो का. फार माहिती नाही म्हणून विचारते.

शोएब आल्यावरचा सीन किती तो मेलोड्रामा>> अर्रे आत्ता ते पाहिलं , काय पण फिल्मी होतं , आपने मेरे हात का नाही खाया ये खाओ , वगैरे वगैरे , जाताना जाकीट काय देऊन गेला. कसं काय आवडतं लोकांना हे ?

कसं काय आवडतं लोकांना हे ?
<<<
अशाच लोकांसाठी आहे हा सिझन ज्यांना असे सीन्स बघून टडोपा येतं Proud
मी नाही बघु शकत इतकं फिल्मी वागणं रिअ‍ॅलिटी शो मधे, फॉरवर्ड केला तो सीन, तसही मेघा गेल्यापासून एपिसोड ७-८ मिनिटात होतात बघून फॉरवर्ड करत Happy
हिन्दी बिबॉ ऑडीयन्स मराठी व्ह्युअर्स सारखा नाहीये, काही न करता फक्त टाइमपास करणार्यांना नाही वाचवलं नाही तिथे प्रेक्षकांनी !
रेशम, राजेश, सुशान्त , जुई हे अदरवाइज सोशल मिडीयावर भरपूर फॅन्स असलेले /पॉप्युलर लोक फिनालेला सुध्दा पोचले नाहीत , इथे मात्रं दीपिका डे १ पासून नॉमिनेशन मधे आल्यावर हाय्येस्ट व्होट्स घेतेय फार काही न करता!

उलट राजेश मला आधी आवडायचा तो मनातून उतरला आणि नंतर पुष्करपण.

दीपिका टास्क करत नसेल तर ते पूर्णपणे चूक आहे पण ह्या अशा निगेटिव्ह वातावरणात तिने स्वतः ला निगेटिव्ह होऊ न देता ग्रेस आणि डीग्निटी सांभाळली आहे ते नक्कीच कौतुकास्पद आहे. मेघा बाहेर पडताना तूच जिंकणार, तुला जिंकायचं आहे असं म्हणाली. बाहेर आल्यावर पण श्री किंवा दीपिकाला मत द्या सांगत होती.. जसलीनला श्रीसंत जास्त योग्य वाटतोय.

केवीबद्दल सांगा रे कोणीतरी, कसा वाटतोय. यावेळी वोट देऊ का त्याला म्हणजे सोमी किंवा रोहीत बाहेर जाईल.

केव्ही कनफ्युज्ड आहे, ना धड इथे ना धड तिथे , कपॅसिटी असून फार काही करत नाही आणि सध्या सुरभिच्या कंपनीत निगेटिव दिसतोय पण फॅन फॉलॉइंग भरपूर आहे त्याला , नॉमिनेशन मधले बाकीचे दोघे त्याच्यापुढे अगदीच लिंबुटिंबु आहेत !
अर्थात बिबॉला कॉस्ट कटींग करत सेलेब्ज काढूनच टाकायचे असतील तर काहीही करु शकतात Happy

मराठी पब्लिक शहाणं आहे मग , इमेजला धरून वोट्स नाही दिले कधी. माझाही एपिसोड ५-१० मिनिटात संपतात. कॉमोनर्स ची भांडणं बघण्यात कोणाला इंटरेस्ट आहे, ती तर भारतात गल्ली गल्लीत दिसतील :प
केव्ही खरंच कनफ्युज्ड आहे, त्याला जोपर्यंत गेम समजतो, तो पर्यंत त्याला लोकांनी बाहेर काढलेला असतो. सलमान ने तसाही त्याचा कॉन्फिडन्स कमी केलाय असं मला वाटतं.
बरं , कोणाच्या लक्षात आलं का, सलमान जेवढी आधी केव्ही ची खिल्ली उडवायचा तेवढा उडवत नाही, मजा करतो पण लिमिट मध्ये. ओपन लेटरच्या नावाने किती बोंबा ठोकल्या , पण त्याने काम केलं म्हणायचं .

हो, ओपन लेटर चांगलच लागलं त्याला, परवा टिजे आली होती तेंव्हाही तिची ओळख ओपन लेटर फेम मिसेस केव्ही अशीच करून दिली.
केव्हीला घालवून बाकी २ महामूर्खांना ठेवलं तरी आश्चर्य वाटणार नाही आता !
ऑन अ सिरियस नोट, एका वीकेन्डच्यावाराच्या सलमानच्या फटकारण्यानी रोहित कसा एकदम बटन दाबल्यासारखा लाइनवर आलाय, या आधी जेंव्हा मेघाला इतका त्रास दिला तेंव्हा सलमान असा ओरडला असता तर ?
जौद्या झालं, सध्याचा सीन पहाता केव्ही आणि सोमि पेक्षा रोहित खरच एक प्लेयर म्हणून बरच काही करत आहे घरात !

हो खरय.. गेम जीव लावुन करतो.. पण त्याच्या सुंदर चेहर्‍याबरोबर मग्रुरी अन उन्मत्तपणा वाटतो.. तो अन दिपक बेकार आहेत... यावेळी सोमी जाईल असं वाटत..
ट्यु..मला वाटलं.. टिजे त्या दिवशी हग करायला गेली तर तो सरळ बाजुला निघुन गेला...

गेला रोहित,कालच आउट झाली बातमी.
मेघा जस्लीनला रोहित वाट्टेल टिझ करताना तिथे बसून हस्स्णार्या अनहॅपी क्लबच्या लोकांनाच त्याने तसेच सुनवायला छळायला सुरवात केली ते बघून अगदी असुरी आनंद झाला मला Proud

मी थोडा वेळ बघितलं. रोमिलच्या लोळण्यावरून, आळशीपणावरून सलमान मस्त सुनावत होता त्याला. शेवटी तिघांत, दोघांत आलास तर चालत येणार कि उचलून आणायचं तुला Lol . पहिली दोघं तरी दीपिका श्री दोघं असावीत, उलटसुलट चालेल. बाकी कोणी नको.

ती सोमी नाही गेली? रोहित बरोबर तीला पण हकलवायला पाहिजे. काय डोक्यात हवा गेले, आणि काय हरभऱ्याच्या झाडावर चढते बावळट बाई, आणि आवाज तर असा की चिकन खाताना घशात हाड अडकला आहे.

Pages