बिग बॉस १२ : After padosis, it's time for jodis vs single

Submitted by अविका on 19 September, 2018 - 04:15

बिग बॉस १२ सुरु झाले आहे
मराठी बिग बॉसचे ईथे खुप चाहते होते
तसेच हिंदी बिग बॉस, खासकरुन सलमानच्या हॉस्टींगचे चाहते पण खुप आहेत
तर त्यावर चर्चा करायला हा धागा

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मेघा जाणारच होती कधीतरी, पण तरीही दिपक, केव्ही , सोमी, रोहित यांच्या नंतर गेली असती तर मजा आली असती !
न्यूज कळल्यापासून खूप अपसेट वाटत आहे . Sad
कुठेतरी वाटत होतं काहीतरी चमत्कार होईल, एकच एव्हिक्शन होईल जसलीनच आणि दुसरं कचरा क्लब मधलं कोणीतरी मिडविक उडेल त्यांच्या अगोचरपणामुळे !!
alas !!!
आता खूप ठिकाणी आलय ट्विटर वर, त्यामुळे खात्री झाली कि मेघा खरोखरच एव्हिक्ट झालीय .
BB १२ बघण्याचा सगळा उत्साहच संपला .

हो? मग काहि अर्थ नाहि आता बघण्यात शो... सगळे चिंधीचोर आहेत श्री /दिपीका सोडुन.. माझ मत फुकट गेल मग. Happy

अरे मग काय आता दीपक सुरभीच्या शिव्या ऐकायला बीबॉ बघायचं का. कि सोमीचं रडगाणं? एवढ्या उघडपणे बायस होतील असं वाटलं नव्हतं. मी तर सूरही सोमी दीपक रोहित आले कि ढकलायचे पुढे, त्यांना बघण्यात कोणाला इंटरेस्ट आहे

खरंच गेली का मेघा, मला युट्यूबवर जाऊन बघायचं डेरिंग नाहीये. मी बघत नव्हते, चुकीचं वागली तेव्हा टीकाही केली पण वोट मात्र तिला देत होते. आता तिचा वावर positive वाटत होता.

दीपक रोहित आणि सुरभी सोमी यांच्यानंतर मेघा गेली असती तर काही वाटलं नसतं. चांडाळ चौकडीला ठेऊन या दोघींना काढणे चूक आहे. दीपकला आधी काढायला हवं होतं मग जसलीनला जर डबल एविक्शन होतं तर. पण मेघा Sad

मराठी जिंकल्याचा सूड घेतला जणू हिंदीने. तिथे प्रेक्षकांमुळे तिला जिंकवावे लागलंच. इथे तिला जास्तीतजास्त negative दाखवायचा प्रयत्न केला आणि positivity लपवली गेली तिची.

मेघा गेली असेल तर बहिष्कार! बघणारच नाही आता बिबॉ! Angry Angry
कलर्सवाल्यांनो, बसा खेळत तुमची चांडाळ चौकडी आणि तुम्ही!

मी एपिसोडस बघत नव्हतेच, youtube वर दोन दोन min बघायचे पण वीकेंडका वार दोन शनिवार बघितलं होतं.

मी पण बघणं सोडलं मेघा मुळेच तर बघत होते. ती जिकणार नव्हती पण फायनल मज गेली असती रोहित दीपक आणि सोमी पुढे ही गेली नॉट फेअर

सलमान सुरभीला बोलला तर कसला तमाशा केला तिने. रोहित, श्री, सुरभी, केव्ही सर्वांना सुनावलं त्याने. सुरभी सतत तर चुकत असते.

श्या असली काही लोकं असताना मेघाला बाहेर पडायला लागलं आणि ती सुरभी कॅप्टन झाली त्यामुळे परत सेफ पुढच्या विकमध्ये.

मेघा जस्लीन गेल्यावर काहीच इंटरेस्ट नाहीये, सगळेच लोक आता काही प्रमाणात निगेटीवच आहेत, कोणीही जिंकु दे फक्त दीपक नको एवढीच इच्छा आहे आता.
सुरभि-रोहित कंप्लिट व्हिलन
श्री: कन्टेन्ट देण्यात एंटरटेन्मेन्ट मधे नं.१ , स्टार म्हणून नं.१ पण टास्क्स गिव्हप करतो, शिव्या, मारामार्या इ. गोष्टींमुळे निगेटिव जातो, तरी उरलेल्यांमधे हाच जिंकला तर मला आवडेल.
दीपिका : निगेटिव नाही , डिग्निटी सांभाळून ग्रेसफुली वावरणारी अशी ही एकटीच असेल पण फार सावधपणे खेळते , इमेज कॉन्शस, टास्क्स मधे निरुत्साही आणि श्रीच्या काळजीत वेळ घालवते.
सोमि: २ लोकांना खेळवत फेक लव्ह स्टोरीज बनवण्यात आणि अति भयंकर मेकप मधे फक्त इंटरेस्ट आहे, विकेस्ट, वर्थलेस हाउसमेट !
रोमिल : बुध्दीमान , मास्टरमाइंड पण आळशी आणि प्रचंड फेक !
दीपक : हा सर्वात डोक्यात जातो पण श्री नंतर सर्वात जास्त कन्टेन्ट तोच देतो, फुटेज खातो ! टास्क्स मधे नं.१ , स्ट्रॅटेजीज मधे डोकं चालतं , गातो, गाणी लिहितो- कंपोझ करतो, फेक लव्हस्टोरी अँगल देतो, वेळ बघून रडारड करतो, सिंपथी कार्ड खेळतो थोडक्यात क्रिएटिव टिम त्याला या सगळ्या गोष्टी बघता फिनालेला नक्की पोचवणार Sad
त्याच्या सगळ्या जमेच्या बाजुची कसर तो अत्यंत अनॉयिंग इन्स्टीगेशन, टपोरीगिरी, चिन्धीचोर, इव्हटिझिंग इ. करून भरून काढतो म्हणून कोणी जिंको, दीपक नको !

छान लिहिलंस डीजे.

तो दीपक कित्ती निगेटिव्ह कंटेंट देतो, bb ला असंचं हवं असते.

माझ्यामते दीपिका जिंकेल किंवा श्री. ती सुरभी, दीपक, रोहित, सोमी फिनालेला नकोच. अर्थात असणार म्हणा कोणीतरी.

मला अजूनही वाटतं दीपिका जिंकावी आणि क्रम दीपिका, श्रीसंत, रोमिल असा असावा.

पण एरवी बघत नाही पण विकेंड वार बघितला. कालचा तरी चांगला होता. एलिमिनेशन बघावं लागलं नाही. आज असेल त्यामुळे बघेन असं नाही.

चांडाळ चौकडी जाऊन मग मेघा गेली असती तर काही वाटलं नसतं.

श्रीशान्त किवा दिपिकाला जिन्कवतिल कारण कन्टेट देणारे फक्त टिआरपी पुरते हवे असतात चॅनेलला

मेघा जस्लीन दोघींचे इंटरव्ह्युज फार मस्त रोखठोक आहेत सगळे, बिबॉच्या मां कि आंख वर जोरदार थप्पड आहे या दोघींना काढून रोहित सोमि पब्लिकला ठेवलय ही !
जस्लीन ने रिलेशनशिप बाबत आणि जबरदस्तीच्या रिलेशनशिप बद्दल थाप मारली हे सोडता तिची मतं आवडली मला, सोमी-दीपक सगळ्यांची मापं काढलीयेत जस्लीनने बॉलिवुडस्पाय इंटरव्ह्यु मधे.
श्री जिंकलेलाच आवडेल, दीपिकाही चालेल पण ती मला लिडरशिप क्वालिटीत कमी वाटते आणि एन्टरटेन्मेन्ट मधे अगदीच शून्य .
एपिसोड बघणं बन्द केलय मी आता, पण श्री भुवनेश्वरी आणि त्यांची क्युट मुलं पार्ट बघीन फक्त.
भुवनेश्वरी जबरी आहे, जोरदार टाळ्या !
केव्हीची बायको टिजे खूप मॅच्युर्ड आणि एलेगन्ट वाटली , तिच्या ट्विट्स पण मस्तं असतात, प्रसंगी केव्हीच्या वागण्याला क्रिटिसाइझ करते ती.
सुरभिचा भाऊ मात्रं ठार वेडा ! काल कळलं वेड्यांची अख्खी विस्फोटक फॅमिली सुरभि सारखीच आहे.
मला नेहमी आश्चर्य वाटत रहातं सुरभि या सगळ्या स्पर्धकांमधे जास्त एज्युकेटेड (डेंटीस्ट + फार्मास्युटीकल सायंटीस्ट ) , तिचा भाऊही डॉक्टर पण वागायला इतके क्रेझी? या लोकांची डिग्री तपासायला हवी कुठून कशी घेतली !
शिक्षणाचा आणि मॅच्युरिटीचा काहीही संबंध नाही हेच खरं !

सुरभिचा भाऊ मात्रं ठार वेडा ! काल कळलं वेड्यांची अख्खी विस्फोटक फॅमिली सुरभि सारखीच आहे. >>> Lol

सुरभी एवढी शिकलेली आहे, माहिती नव्हतं पण सुसंस्कृत नाही अजिबात.

मला केवीच्या मुली आवडतात बेला विएन्ना. त्यांचे दोन दोन मिनिटांचे व्हिडीओज असतात youtubeवर, ते मी बघते.

सलमान ने मस्त शाळा घेतली सुरभीच्या भावाची.. अजुन मोठा भाऊ आहे हे सांगताना सलमान उडाला हे त्याने मस्त दाखवले.. खरच त्यांच्या घरात एक से एक वेडे भरलेत वाटतं Happy
त्या दोघींचं जाणं बिल्कुल आवडल नाहि.. दोघंचे इटरव्यु बघितले छान बोलल्या दोघी..
श्रीची दोन्ही मुलं क्युट आहेत अन केव्हीच्या दोन्ही मुली Happy

मला केवीच्या मुली आवडतात बेला विएन्ना. त्यांचे दोन दोन मिनिटांचे व्हिडीओज असतात youtubeवर, ते मी बघते.
<<<
किती फॅन्सी नावं आहेत, नाहीतर आम्ही कायम वैशाली दीपाली रुपाली सोनाली मनाली क्राउडमधे Proud
फॉरवर्ड करत पाहिला एपिसोड पण खरच खूप क्युट होत्या केव्हीच्या पोरी आणि श्रीची मुलगी !

सलमान ने मस्त शाळा घेतली सुरभीच्या भावाची.. अजुन मोठा भाऊ आहे हे सांगताना सलमान उडाला हे त्याने मस्त दाखवले.. खरच त्यांच्या घरात एक से एक वेडे भरलेत वाटतं >>> हो मस्त होतं ते Lol , मी बघितलं voot वर.

भुवनेश्वरी जबरी आहे, जोरदार टाळ्या >>> हो मस्त सुनावलं सुरभीला. मी ह्याचा प्रोमो बघितला.

बाहेर आल्यावर मेघा एबीपीला मुलाखत देताना म्हणाली सई पुष्कर आस्ताद रेशम राजेश सुशांत वगैरे तिकडची त्यावेळी वाईट वाटलेली लोकं कितीतरी पटीने चांगली आहेत हिंदीतल्या वाईट लोकांपेक्षा आणि मला कळून चुकलं की माझ्या जिंकण्यात ह्या सर्वांचा खूप वाटा आहे आणि आज मी ते मान्य करते.

तिथल्या वाईट लोकांच्यात पण चांगुलपणा होता आणि इथे ह्यांच्या चांगुलपणात पण वाईटपणा आहे.

झालं स पु हे ऐकून सर्व क्रेडीट स्वत:ला घेतील.

रेशमने बाहेर पडल्याबरोबर मेघाशी चांगले संबंध ठेवले. स्मिता तर आधीपासून मेघाशी bonding ठेऊन होती. राजेश, सुशांत, आस्तादने पण नंतर संबंध चांगले ठेवले.

ठेवले नाहीत आणि जळत राहिले कोण तर स पु. त्यांना अतिशय आनंद झाला असेल ही बाहेर पडली त्याचा.

रेशमचं खरंचं कौतुक वाटतं की तिने मनात द्वेष ठेवला नाही, कारण मेघा तिला फार खालच्या थराला जाऊन बोलली होती. पण जे काय दोघींच्यात होतं ते फक्त bb घरापुरते ठेवलं त्यांनी.

हिंदीमध्ये दीपिका पहिली यावी असं वाटतं मला त्यामुळे दीपिका श्रीसंत आणि रोमिल असे तीन असावेत असं वाटतं.

श्रीसंत पहिला आला तर डीजे खुश होईल, हरकत नाही. तिच्या आनंदात मी सहभागी होईन. पण दीपिका श्रीसंत ह्यापैकीचं पहिले दोन असावेत आणि तिसरा रोमिल यावा अशी माझी इच्छा.

बाकी बघत नाही, मेघा असताना पण बघितलं नाही. वोट मात्र तिलाच दिलं. आता कदाचित दीपिकाला देईन.

नाही अन्जु, खुष वगैरे नाही, आहेत त्यापैकी श्री डिझर्विंग वाटतो इतकच :), दीपिका झाली तरी ओके, पण दीपक जिंकु नये एवढीच इच्छा आहे!
चॅनल किती प्रकारे प्रमोट करतय दीपकला Uhoh

दीपक जिंकु नये एवढीच इच्छा आहे! >>> हाच काय सुरभी, रोहीत, सोमी यांना फायनलमधे बघायची इच्छा नाहीये. रोमिल तिसरा चालेल पण तोही जिंकू नये. केवि चौथा चालेल. जसलीन मेघा शेवटपर्यंत हव्या होत्या. तीनात नसत्या तरी चाललं असतं.

Pages