खेळ शब्दांचा - ३ - मराठी लेखक/कवी किंवा कादंबरी/काव्यसंग्रह

Submitted by संयोजक on 16 September, 2018 - 23:11

आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा , कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या गणेशोत्सवात आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.
काही नियम :
१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.
२) त्या विषयावर आधारित पहिला क्लू देतील.
३) तो क्लू वापरून त्या विषयावर आधारित शब्द लिहायचा.
४) जो सगळ्यांत आधी बरोबर शब्द लिहील तो पुढचा क्लू देणार.
हे उदाहरण पहा:
दोन्ही हात कलेत/ युद्धात सारख्याच कौशल्याने वापरू शकणारा
- - सा -
उत्तर: सव्यसाची
चला मग व्हा तयार आणि लावा डोके कामाला !
विषय क्र ३ :- मराठी लेखक/कवी किंवा कादंबरी/काव्यसंग्रह
यांना भाई या नावानेही ओळखतात
_ ल _ _ _ डे

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या लेखिकेचे (वेगळे) पुस्तक *
शास्त्रीय संगीतातला एक राग

तीन अक्षरी

* हे पुस्तक कादंबरी नाहीये तर कथासंग्रह आहे (पहिल्यांदा मला कादंबरी वाटल्याने तसा उल्लेख केला होता)

पुरस्कार विजेता एक कवितासंग्रह ज्याची पुपुवर नेहमी चर्चा होते (एका विशिष्ट आय्डी बद्दल) Lol
__ज_ व_

ही वही कोरडी नकोस ठेवू
माझी वही भिजो
शाई फोटो
ही अक्षरें विरघळोत
माझ्या कवितांचा लगदा होवो
या नदीकाठचं गवत खाणार्‍या म्हशींच्या दुधात माझ्या कवितांचा अंश सापडो

अशी 'कातील' आळवणी या संग्रहाच्या मलपॄष्ठावर आहे.

अंताजीची बखर.
बरोबर असेल, तर पुढचा प्रश्न साद यांनी द्यावा.

माणसं?

नाही.

नाही.
इतिहासप्रसिद्ध पुस्तक आहे.

Pages