खेळ शब्दांचा - ३ - मराठी लेखक/कवी किंवा कादंबरी/काव्यसंग्रह

Submitted by संयोजक on 16 September, 2018 - 23:11

आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा , कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या गणेशोत्सवात आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.
काही नियम :
१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.
२) त्या विषयावर आधारित पहिला क्लू देतील.
३) तो क्लू वापरून त्या विषयावर आधारित शब्द लिहायचा.
४) जो सगळ्यांत आधी बरोबर शब्द लिहील तो पुढचा क्लू देणार.
हे उदाहरण पहा:
दोन्ही हात कलेत/ युद्धात सारख्याच कौशल्याने वापरू शकणारा
- - सा -
उत्तर: सव्यसाची
चला मग व्हा तयार आणि लावा डोके कामाला !
विषय क्र ३ :- मराठी लेखक/कवी किंवा कादंबरी/काव्यसंग्रह
यांना भाई या नावानेही ओळखतात
_ ल _ _ _ डे

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

पुढचं नाव मी विचारत नाही. मनस्विता यांनी विचारलेलं ओळखा
जुन्या काळातील स्त्री लेखिकेचे आत्मवृत्त
चार अक्षरी

मॅगी जरा डिटेल्स सांगा ना या पुस्तकाचे. मला फक्त नाव आठवतंय.
पुढचं कोडं
-----ट ६ अक्षरी शब्द. कथासंग्रह, पण एका सुप्रसिद्ध कवीचा.

मालती बेडेकर यांनी विभावरी शिरूरकर नाव घेऊन कळ्यांचे निःश्वास हा कथासंग्रह साधारण 1930 च्या सुमारास लिहिला. त्यातील कथांचे विषय विवाहबाह्य/लिव्ह इन संबंध, एकल पालकत्व, बाईने लग्न न करता आपले घर चालवणे इ. त्या काळाच्या खूप पुढचे होते. ज्यामुळे पारंपरिक लोक हादरले.

___ट_ट
चौथं आणि सहावं अक्षर ट.

वि वा शिरवाडकर
अपॉइंटमेंट
( कथासंग्रह गुगल केला हां.)

बरोबर Happy
शिरवाडकर कथालेखक म्हणून फारसे परिचित नसले, तरी त्यांच्या कथा या त्यांच्या कवितांच्या तोडीच्या आहेत.
शांता शेळके यांनी ' शिरवाडकरांच्या निवडक कथा' या नावाने संपादन केलेले एक पुस्तक आहे. त्यांच्या कथांमध्ये भरपूर वैविध्य आहे. आश्चर्य वाटेल, पण विनोदी कथाही आहेत. जरूर वाचा.

बरं केलं सांगितलंत. मभादिनिमित्त त्यांची पुस्तकं शोधलेली तेव्हा हे दिसलं नव्हतं.

ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कवयत्रीचा महत्त्वाचा कवितासंग्रह.
कवितेइतकीच साहित्याच्या अनेक क्षेत्रांत त्यांची मुशाफिरी होती.
तीन अक्षरी. - - ण .
सध्या that thing is fashionable with english name.

गोंदण - शांताबाई
( ईंग्रजी मद्धे टॅटु Happy )

Pages