खेळ शब्दांचा -१- शालेय उपयोगी वस्तू

Submitted by संयोजक on 13 September, 2018 - 00:07

खेळ शब्दांचा
आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा , कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या गणेशोत्सवात आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.
काही नियम :
१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.
२) त्या विषयावर आधारित पहिला क्लू देतील.
३) तो क्लू वापरून त्या विषयावर आधारित शब्द लिहायचा.
४) जो सगळ्यांत आधी बरोबर शब्द लिहील तो पुढचा क्लू देणार.
हे उदाहरण पहा:
दोन्ही हात कलेत/ युद्धात सारख्याच कौशल्याने वापरू शकणारा
- - सा -
उत्तर: सव्यसाची
चला मग व्हा तयार आणि लावा डोके कामाला !
विषय क्र १ शालेय उपयोगी वस्तू
याने आपल्या शिक्षणाची सुरवात झाली
पा_

Group content visibility: 
Use group defaults

- - चा -
Submitted by भरत. on 14 September, 2018 - 12:46

थोडा क्लू द्या ना हो Lol

फक्त वस्तू ओळखा आहे
त्यामुळे फार गोची होतेय
मला काय काय आठवतंय शाळेतलं....
संधी समास विभक्ती प्रत्यय.....यमक अनुप्रास ..

फक्त वस्तू ओळखा आहे
त्यामुळे फार गोची होतेय
मला काय काय आठवतंय शाळेतलं....
संधी समास विभक्ती प्रत्यय.....यमक अनुप्रास ..>>> येस अगदि अगदि

मी दोन उत्तरं दिली... मी दोन कोडी घालणार! Proud

१) _ ल _ _
रंग भरतो हा! Happy

२) प_
विद्यार्थ्याच्या जवळ असते, नीटनेटकं ठेवते वही. Happy

१) _ ल _ _
रंग भरतो हा!
जलरंग ??
पटत नाहीये मला खरंतर

द्वा,
1 तेल खडू
2 पट्टी >>अगदी बरोबर! Happy

समास पाडून ??
पण अगं आधीच समास पाडून रेषा आखून दिलेली असते ना वही
Uhoh जाऊदेत

पट्टी ने वही कशी काय नीटनेटकी ठेवतात बॉ >> नीट रेषा ओढल्या, महत्त्वाचे मुद्दे हायलाईट केले, की वही छान नीटनेटकी दिसते ना. Happy

नीट रेषा ओढल्या, महत्त्वाचे मुद्दे हायलाईट केले, की वही छान नीटनेटकी दिसते ना. >> असेल
मी एवढी सजावत केली नाही कधी, लिहित असे हेच खुप Lol
पण, चान्गली सवय

प्रश्नाच्या उत्तराखाली पण आपण रेषा मारायचो ना?
सगळे इंपो पाडण्याचे धंदे. Happy
आणि २०० पानी वहीच्या रुंदीवर नाव लिहायचो पानाच्या कडाना

Pages