मोबाईल कुठला घ्यावा ? - २

Submitted by योकु on 23 July, 2018 - 13:53

मोबाईल कुठला घ्यावा ?
याच्या चर्चेकरता हा दुसरा धागा. चलो हो जाओ शुरू... Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

OnePlus Nord CE 5G 8GB/128GB
ऍमेझॉनवर २४,९९९ ला आहे.

हा फोन कसा आहे? (गेमिंग साठी वापर नाही.)
किंवा याच रेंजमध्ये दुसरा कुठला घ्यावा?

मला चायना मेड मोबाईल नको आहे, सॅमसंग आवडत नाही, नोकिया मध्ये नवीन मॉडेल नाही आहेत, विशेषतः १५ ते २५ हजार मध्ये. कुठला चांगला अँड्रॉइड फोन सुचवाल का?

सर्व फौनस चिनीच असतात असं वाचलं होतं. फोनचे किती भाग चीनी आहे यावरून. आता मेक इन इंडिया धोरणाप्रमाणे काही फोनस चैन्इ,तमिळनाडूत बनतात. ( शाओमी ) मग त्यांना चिनी म्हणायचं का?

१५-२५ हजारात म्हणण्यापेक्षा १५-२० आणि २०-२५ असे दोन गट करावेत.

रेडमी नोट 10 pro max (२२हजारपेक्षा कमी) याच्या क्यम्राची फार वाखाणणी होत आहे. पण जाहिराती येतात.

सर्व फौनस चिनीच असतात असं वाचलं होतं. फोनचे किती भाग चीनी आहे यावरून. >>>>
हो म्हणूनच विचारलं की चिनचा सहभाग नाही असे फोन असतात का?

मोबाईलमधला महत्त्वाचा भाग chip कोण बनवतो?
A bionic ( iphone ) - Taiwan
Kirin ( huawei phones) -china
Exynos (samsung phones) -Korea
Qualcomm ( बरेच फोनस) युएस
Mediatek, (काही बजेट फोनस ) Taiwan
Mediatek, dimensity ( काही नवीन फोनस)Taiwan
Unisoc (काही बजेट फोनस) - china

आता ठरवा कोण किती चाइनिज आहे.

chip strength list

((Net ग्यान))

साधारण तीस हजार चास आसपास बजेट आहे. चांगला फोन सुचवा. कॅमेरा चांगला हवा आणि शक्यतो मेमरी एक्सपांड करता यायला हवे....

मोटोरोला कंपनी घोळ घालून ठेवते आहे आपल्या फोन्समध्ये , कॅमेरा चांगला तर ऑडिओ जॅकच गायब , ऑडिओ जॅक आहे तर एक्सपांडेबल मेमरी नाही , दोन्ही आहेत तर हवा तो प्रोसेसर नाही , प्रोसेसर आणि कॅमेरा चांगला तर बॅटरी कमी ठेवतात .. या स्पर्धेच्या काळात ग्राहक कसे घालवायचे ते यांच्याकडून शिकावं .

30 k पर्यंत बजेट असेल तर आणि कॅमेरा ही प्रायोरिटी असेल तर motorola edge 20 pro 5g आहे , 33 हजारला . एक्सपांडेबल मेमरी नाही , 128 gb इंटर्नल . ऑडिओ जॅक नाही . बॅटरी 4500 आहे .

Asus rog 47 हजारांपर्यंत आहे , बजेट वाढवता आलं तर . उत्तम कॅमेरा , 6000 बॅटरी . एक्सपांडेबल स्टोरेज नाही , usb ऑडिओ जॅक + wire उपलब्ध .

माझं बजेट max 20 हजार आहे , मोटो g82 घेण्याचा विचार आहे , कॅमेरा कमी आहे पण मी फारसा वापरत नाही त्यामुळे ते महत्वाचं नाही .

मी आत्ताच वन प्लस नॉर्ड का काय ते घेतला एकदम भारी आहे. आता त्यातजिओ कारड घालायचे बाकी आहे.

मी पण चांगला फोन शोधतोय २५ च्या आतला

माझी प्रायोरिटी

उत्तम कॅमेरा, डिसेंट बॅटरी, चांगला प्रोसेसर (शक्यतो स्नॅपड्रॅगन)

बाकी गोष्टी मग चालून जातील अशा

२५ च्या खाली चांगला कॅमेरा असलेले कमीच फोन आहेत. पिक्सेल, आयफोन ची आपली ऐपत नाही

मग उरले सॅमसंग, रेडमी, रियलमी आणि वन प्लस

त्यातला रेडमी ६ प्रो वापरत आहे गेली तीन वर्षे, कॅमेरा बाबत बराच समाधानी
त्यामुळे त्यांचा लेटेस्ट नोट ११ प्रो प्लस ५ जी

जो माझी रिक्वारयरमेंट बऱ्याच अंशी पूर्ण करतो

त्याच श्रेणीत रियलमी चा ९ प्लस आणि वन प्लसला नॉर्ड सीई २ आहेत. पण यात परत थोडं याच्यात आहे, थोडं त्याच्यात आहे असे घोळ आहेत.

आधीच्या फोनचे ६ हजार देऊन रेडमीचा ८ जीबी रॅम, १२८ जीबी मेमरी चा फोन १७ हजार ला मिळत आहे.

एकदा वाटतंय घ्यावा, इतकी किंमत परत जुन्या फोनला मिळणार नाही

एकदा वाटतयं आता आहे तो फोन अगदीच टाकावू नाही झाला, मग चालेल तितका अजून चालवावा

बॅटरी स्लो झाली आणि अॅप क्रॅश होत होते म्हणून मध्ये फॅक्टरी रिसेट केला. त्यानंतर आता ठीक आहे, पण अॅप सगळी लोड केलीच नाहीत अगदी बेसीकवर सुरु आहे म्हणून कळत नाहीये.

बॅटरी खाणारे अॅप्स नसल्याने तीही दिवसभर पुरते

काय करू

आईला मोबाईल घ्यायचा आहे. प्लीज सुचवा.
बजेट १० हजार

कॉलिंग व्यतिरीक्त मुख्य वापर सिरीअल बघायला.
फोन दणकट हवा. मुलाच्या हातातही असतो.
सॅमसंग प्रीफरेबल. वा ईतर कुठलाही चालेल म्हणा.

मोटोचे सर्वच फोन चांगले आहेत. एक दोन गोष्टी वगळता. स्क्रीन ब्राईटनेस जेमतेम ४०० निटस असतो. तो सातशेपर्यंत जायला हवा. हाईब्रिड सिम स्लॉट. टच फार फास्ट नाही. क्यम्रा मोड्यूल सर्व फोनात एकच आहे. ठीकठाक फोटो. वाईफाईवर विडिओ बघताना बफरिंग होऊ शकते.

Snapdragon 695 प्रोसेसर गेमींगला चांगला आहे . फार फास्ट नाही पण फोन तापणार नाही.

मोटो चे कॅमेरे सुमार दर्जाचे असतात
पूर्वी नव्हते पण लिनोवो कडे गेल्यापासून जाणवते
ऑन पेपर कितीही मेगापिक दाखवले तरी एन्ड रिझल्ट समाधानकारक नसतो

मोबाईल फोटोग्राफी डोक्यात असेल तर मोटो टाळा
त्यापेक्षा बेटर रिझल्ट रेडमी चे फोन देतात

धन्स.

गुगल Question / Answers मध्ये हे रिव्हयु होते.

>>>
Does Moto G82 have heating issue?
Slow performer

The Moto G82 5G smartphone works very slowly, and the performance has many issues. First of all, gaming is a big problem here, as the smartphone starts to lag and hang the moment you try to play games. Secondly, the smartphone also overheats when you use the device for a long time.

<<<

Redmi
10-11k budget
कोणाला आयड्या असेल तर लवकर सजेस्ट करा प्लीज.
बहुतेक आजच विकत घ्यायचाय किंवा ऑनलाईन ऑर्डर करायचाय.

Dhaga kadha sir

Moto g 32 मागच्या वर्षी आला . August 2022.
4gb+64 gb 12kला होता. आता 4+64gb 10k, 8+128gb 12k ला आहे. Flipkartवर घेतला. चांगला आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी.
(यूट्यूबवर Trankin tech, perfect gadget, Technical guruji video review)

Plus points +++
Software = clean Android 12 +one update
SD 680 reliable fast chip for mid range phones,
full hd plus screen -brightness 600nits,
बॅट्री ५००० एमेच
Sensors = compass, gyroscope. Health apps साठी उपयुक्त.
रेडिओ+ रेकॉर्डींगसह
आवाज दोन डॉल्बी स्पीकर्स जोरदार.
Camera 50 mp main. ,8mp wide.
Card sim1+sim2+memory
Sim 1+2 dual lte

माइनस पॉईंट=
१) sd 680 chip भारी गेमसाठी नाही.
२) Macro lens फक्त 2 mega pixel.
३) कॅरिअर अग्रिगेशन(4g+) नाही
४) Call recording - warning देऊनच होणार. म्हणजे आता सर्वच फोनमधून असंच होणार आहे. भारत सरकारच्या आदेशाप्रमाणे इथले नियम पाळलेली apps असली तरच फोन विकता येतील.

१५-२० हजारांचा फोन सजेस्ट करा
ज्यात कॅमेरा चांगला हवा. छान फोटो येतील आणि ईन्स्टावर रील बनवता येतील.
बाकी गोष्टी कमी जास्त चालतील.
प्लीज लवकर सजेस्ट करा
धन्यवादरा Happy

Pages