मोबाईल कुठला घ्यावा ? - २

Submitted by योकु on 23 July, 2018 - 13:53

मोबाईल कुठला घ्यावा ?
याच्या चर्चेकरता हा दुसरा धागा. चलो हो जाओ शुरू... Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

एक विचारतो - call recording.बद्दल
काही फोनमध्ये ( हँडसेट्स) सेटिंग्ज मधून एकदाच रेकॉर्डिंग ओन केले की प्रत्येक कॉल रेकॉर्ड होतो, समोरच्याला न कळता. पण असे रेकॉर्डिंग भारतात बेकायदेशीर असल्याने तसे टाकत नाहीत किंवा जेव्हा फोन app आपण अपडेट करतो तेव्हा ते बंद होते.
इथल्या नियमाप्रमाणे कॉल सुरू झाल्यावर 'रेकॉर्ड' सुरू करायचे मग समोरच्याला ऐकू जाणार की हा कॉल रेकॉर्ड होत आहे . तर हे फीचर नियमाने अधिकृत आहे.
माझ्याकडच्या एका फोनमध्ये moto e5plus (android 8.0 )पहिला प्रकार native in handset होता तो नंतर बंद झाला आणि इन्फोमध्ये call recording only available in android 9 and above असं दिसू लागलं. आणि एका फोनमध्ये मात्र अजूनही बरोबर चालतो. लेनोवो k 6 note.
( कॉल रेकॉर्डिंग apps मात्र दोन्हीकडचे संभाषण रेकॉर्ड करत नाहीत. )

Vivo iQOO 3 बाबत कोणाचे काही बरे वाईट अनुभव ?
सॅमसंगF६२ पेक्षा फीचर्स खुप चांगली दिसतायेत.
Snapdragon 865
Octa core (2.84 GHz, Single Core + 2.42 GHz, Tri core)
8 GB RAM
4440 mAh
55W Super Flash Charging; USB Type-C port
----------------
मेमरी वाढवता येत नाही हा मुद्दा सोडला तर १२८ जी बी पुरेशी वाटत असेल तर घ्यावा का ?
@योकु आणि अन्य
कृपया मार्गदर्शन कराल का ?

Iqoo 3 विषयी काही.
हा फोन लॉन्च होताना ३२,००० रुपयात झाला होता. आता किंमत ३०,००० दाखवत असले तरी मध्यंतरी २६,००० रूपयाना अवेलेबल होता.
Samsung f62 पेक्ष्या iqoo 3 चांगला कुठे?
जर तुम्ही खूप हेवी गेमर असाल तर, तेव्हा snapdragon 865 ची ताकद पणाला लागते.
आणि 30000 रुपयाचं मॉडेल 4g च आहे, 5g नाही. 5g साठी 35000 रुपये जास्त मोजावे लागतात.

F62 चांगला कुठे iqoo 3 पेक्षा
बॅटरी बॅकप 7000 vs 4450
कॅमेरा 64 vs 48
Iqoo चे कॅमेरा रिवयु इतके चांगले नाहीयेत. (युट्युबवर लाइव शॉट्स बघू शकाल.) कॅमेरा सेन्सरही जुना वापरलाय, F62 मध्ये तो नवा आहे.
Os : oneui vs funtouch (जी अजिबात चांगली नाही)
अपडेट्स : regular for 4 years vs अजून अनुभव नाही
Service : सॅमसंग जास्त विश्वासू.
Iqoo आता विवोचा sub brand राहिलेला नसून, स्वतंत्र झाला आहे.

सर्वांना एक विनंती...

नवीन फोन घेताना कधीही 33 watt पेक्ष्या जास्त फास्ट चार्जिंगचा फोन घेऊ नका.
वर्षभरात बॅटरी बदलायला लागण्याची गॅरंटी नक्की...

बजेट फिक्स करा आणि मग त्या रेंजमधले शोधा.
15k च्या आतले फोन नेहमीच्या कामासाठी ठीक असतात.
----------
मग गेमिग,
फोटोग्राफी यासाठी जास्ती पैसे घेतात ते योग्य आहेत का पाहावे. 48/64 मेगापिक्सेल खरोखरच चांगले असते तर गूगलने तेच वापरले नसते का? उगाचच १२ मेगापि का वापरतील?

गुगलचा कोणता फोन १५,००० पर्यंत येतो?
पोस्ट इमेज प्रोसेसिंग, किंवा इमेज ऑप्टिमयजेशन हाही एक स्वतंत्र विभाग आहे, ज्यात गुगल आणि apple ने प्रचंड रिसर्च करून काम केलंय. त्यामुळे त्यांची प्राईजही प्रीमियम असते, आणि घेणाऱ्याला ते पुरेपूर माहिती असतं.
ढोबळ कुणी विचारल, हा चांगला की तो चांगला, तर त्याला त्याच्या रेंजमधल्या ऑप्शन मधूनच चांगलं ऑप्शन द्यावं लागतं, rather than हे बघ,64 मेगापिक्सेल काय घेऊन बसला, काही नसतं कॅमेऱ्यात असं...
३०,००० मध्ये google pixel 4a येतो, Sd 730g वर. छोटी amoled स्क्रीन आणि एक कॅमेरा.
त्यापेक्षा nord कित्येक पटीने बरा...

तुलना सांगितली की ४८/६४ मेपि क्याम्रा मोड्यूल चांगले असते तर 'पिक्सेल' मध्ये वापरले नसते का?
---
बजेट फोनवाल्यांनी सॉफ्टवेर वापरून १२मेपिला ४८/६४ केलंय. सेन्सर साईज वाढवलेली नाही.

बजेट फोनवाल्यांनी सॉफ्टवेर वापरून १२मेपिला ४८/६४ केलंय. सेन्सर साईज वाढवलेली नाही.

नवीन Submitted by Srd on 30 March, 2021 - 11:57
Pages

>>>>
तद्दन चूक माहिती.
मला कुठलाही फोन सांगा, 48 किंवा 64 वाला आणि मी त्याचा सेन्सर सांगतो.
पिक्सेल बायनिंग हा जो प्रकार तुम्ही सांगताय, हा पूर्वी होत होता, आता सगळे फोन प्रॉपर सेन्सर वापरतायेत...
एकतर samsung चे GMT वाले
नाहीतर सोनीचे IMX वाले

नेट माहितीतून वेगवेगळ्या फोनच्या क्याम्रा स्पेसि पाहिल्यास सेन्सरमधले पिक्सेलसाईज चांगल्या नावाजलेल्या
फोनात 1.4 micrometer आहे। इतरांची 0.8micrometer आहे. ही साइज कलर आणि लो लाइट क्षमतेवर प्रभाव टाकते.
आणि काय सांगणार? मी काही मोबाईल उघडून पाहिले नाही.

नेट माहितीतून वेगवेगळ्या फोनच्या क्याम्रा स्पेसि पाहिल्यास सेन्सरमधले पिक्सेलसाईज चांगल्या नावाजलेल्या
फोनात 1.4 micrometer आहे। इतरांची 0.8micrometer आहे. ही साइज कलर आणि लो लाइट क्षमतेवर प्रभाव टाकते.
आणि काय सांगणार? मी काही मोबाईल उघडून पाहिले नाही.

>>>>

मग सॉफ्टवेअर वापरून सेन्सर वाढवतात, हे मोबाईल न उघडता कळलं का? की कोणत्याही कंपनीने असं जाहीर केलंय?
मी सेन्सर कुठला वापरलाय हे सांगू शकतो, कारण specsheet मध्येच ते असतं.
आणि नावाजलेल्या म्हणजे काय? 15,000 रियलमी जर 64 mp सॅमसंग चा सेन्सर देत असेल तर 15000 च्या नोकियाच्या 12 mp पेक्षा तो नक्कीच चांगला असेल. पण तरीही तो गुगल पिक्सेल 4a च्या एका कॅमेऱ्याला टक्कर देऊच शकणार नाही, कारण तो फोनच मुळातच ३०,००० रुपयाला आहे?
मग मी असा सल्ला घ्यावा का, की तो 12 mp चा कॅमेरा उत्तम आहे, म्हणून बजेट वाढवा, पण तोच फोन घ्या.
उत्तराला फाटे फोडून नवीन प्रश्न निर्माण करण्यापेक्षा असलेले उत्तर अंमलात आणणं कधीही चांगलं.

@अनंतनी - iqoo 3 25,000 रुपयांना अवेलेबल झालाय.
आता जरूर घ्यायचा विचार करा.

सॉफ्टवेअर वापरून सेन्सर वाढवतात,
हेसुद्धा वाचलंय.

मग मी असा सल्ला घ्यावा का, की तो 12 mp चा कॅमेरा उत्तम आहे, म्हणून बजेट वाढवा,
कॅमेरा उत्तम आहे किंवा कलर बरोबर येतात किंवा लोलाइटमध्ये बरोबर नसतात हे सुद्धा रिव्यूत लिहितात.

आपण काही प्रत्येक मोबाईल विकत घेऊन फोटो तपासू शकत नाही. काहींमध्ये प्रसेसर चांगला टाकतात पण नोटीफिकेशन्स, जाहिराती वाढवतात. प्रत्येकाचे प्राधान्य वेगळे असते. अर्थात दुकानात बजेटप्रमाणे मॉडेल दाखवतात त्यातूनच घ्यावा लागतो.

F62 काल आला.
स्मार्टस्विच वापरून जुन्या फोनचा डेटा घेऊन सहज सेट अप झाला.
एक दिवस वापरला, चांगला अनुभव आहे. बॅटरी काल रात्री चार्ज केली होती, दिवसभर वापरून आता ७०% वर आलीय,
कॅमेरा पण चांगला आहे, कमी उजेडात पण चांगले, स्पष्ट फोटो येत आहेत. गाणी ऐकायला आवाजही दणकून आहे.
व्हॅल्यू फॉर मनी फोन आहे.

सॅमसंग F62 मध्येही Redmi प्रमाणे जाहिराती येतात स्क्रीन अनलॉक केला की.

रिव्यूच्या bad points मध्ये जाहिरातींंचा उल्लेख आहे.
-------------
Tech Burner. Utube channel review बघायला मजा येते. फास्ट. नवीन पिढी.

As per my view
Below 10k- Realme Narzo 30A, Poco M3@11k
10-15k- Redmi note 10, 10Pro, Poco X3
15-20K- Note 10pro max, Sam M31,
20-25k- Samsung F62, Mi 10i

(As I belongs to Samsung Mobiles earlier from last 5 years, तेवढा अभ्यास तर आहेच।)

@Srd urf Sharad
Kay mhnayche ahe aplyla?

रॉकी तुम्ही सॅमसंग मोबाईल मध्ये नोकरी / डील करता का?
F62 मलाही चांगला वाटतोय.
या आधीचा सॅमसंग next 7 होता, तो बदलण्याचे एकमेव कारण म्हणजे बॅटरी. तीन वर्षात बॅटरी लाईफ चार - पाच तासांवर आले होते, ब्राऊझिंग आणि WA वापराने. गेमिंग / व्हिडिओ वगैरेने तर २ - ३ तास.
ते ही बॅटरी वापर जास्तीत जास्त ऑप्टिमाईज करून.
ही समस्या वगळल्यास तो छान चालायचा. तो मी अजून ठेवला आहे, फोनवरून स्क्रीन कास्ट करून टीव्हीवर बघण्यास.

मी स्टॉक android पसंत करतो. क्याम्रा बेताचाच आणि प्रसेसर जेमतेम चालतो कारण गेमिंग करत नाही.
रूट ट्रेसिंग करायला आवडते. म्हणजे रेंज नसली तरी जिपीएस चालला पाहिजे. पण हल्लीचे फोन GPS and AGPS कमी असतात. With AGPSवाले असतात त्यात satellite locking (नवीन जागेत, ट्रेकिंग ठिकाणी) लवकर होत नाही. नोकिया लुमिया ६३० आहे तो पकडतो लॉक पटकन. आणि ते दहा तास चालू ठेवून फोटोही काढतो तरी ब्याटरी (१८०० एमेएच)दिवसभर चालते. विडिओ नाही. त्यास जास्ती लागते.

एक Moto G 5G माहीत आहे मला.
त्यात Android वर My UX आहे, पण स्टॉक अँड्रॉइडच्या जवळपास आहे.

बाकी मोटोरोला आणि नोकियाचे आहेत याच्या खालचे.

मानव, एसआरडी, धन्यवाद! मी सध्या वन प्लस वापरते आहे आणि आधीच्या सॅमसंग पेक्षा मी खूप खुश आहे. उगीच भारंभार नको असलेली आणि काढून न टाकता येणारी ॲप्स नाहीत हा मोठा फायदा वाटतो मला.

मानवजी,
F62 best च आहे, थोडा जाड आहे coz of 7000MAH battery...
कँमेरा, बँटरी जबरदस्त
Go for it...
On Flipkart u will get as low as
Rs.20500 for 6GB variant,
Now about me,
I was top Mobile Consultant Working at Samsung till Jan 2021 at Kolhapur,
But now startes own small mobile shop and
As a hobby I takes orders of Parties and functions as A Bartender.

Pages