Submitted by योकु on 23 July, 2018 - 13:53
मोबाईल कुठला घ्यावा ?
याच्या चर्चेकरता हा दुसरा धागा. चलो हो जाओ शुरू... 
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मोबाईल कुठला घ्यावा ?
याच्या चर्चेकरता हा दुसरा धागा. चलो हो जाओ शुरू... 
बजेट २५-३०़हजार प्रामाणिकपणे
बजेट २५-३०़हजार प्रामाणिकपणे सांगायचे तर २५च.
सॅमसंग विनाकारण आवडत नाही.पहिल्यापासून नोकिया आणि मोटोच वापरले आहेत. आताचा बंद पडलेला मोटोला बरोब्बर ७वर्षे झाली आहेत.पहिला मोटो ३ वर्षात आटपल्यामुळे नंतरचा बराच स्वस्तातला घेतला..जास्त वापर बॅंकेचे व्यवहार आणि शेयर्ससाठी होतो. बाकी टिवल्याबावल्या असतातच.तेव्हा मोबाईल कोणता घेऊ ते सुचवा.
नुकताच लेकासाठी nothing 3a
नुकताच लेकासाठी nothing 3a light फोन घेतला आहे. त्याला खूप आवडला आहे फोन. Nothing 3a घ्यायचा होता त्याला पण तो फोन बाजारात मिळत नाहीये.
Nothing चे फोन्स भारी आहेत.
Nothing चे फोन्स भारी आहेत. लेकीला घ्यायचा होता म्हणून विजय सेल्स मधे पाहिले होते. पण तिने वन प्लस घेतला
१.मोबाईल मार्केट बदलत आहे आणि
१.मोबाईल मार्केट बदलत आहे आणि महाग होत आहे.
२.शाओमी चांगली समजणारी कंपनी घसरली आहे. हायपर ओएस आणली आणि फसले.
३.वनप्लसने ओक्सीजन ओएस सोडल्यावर भागीदारांत भांडणे होऊन एकाने नथिंग फोन काढले. आता आहे ओरीजिन ओएस. वनप्लसमध्ये टायपिंग टच भारी आहे.
४. आमच्याकडे मोटोरोलाचेच फोन्स आहेत.
५. सध्या सामसंगची वन यूआइ ८ सर्वात भारी ओएस आहे. त्याखाली कलर ओएस.नंतर मोटोरोलाची ओएस गूगल नेक्सससारखीच प्युअर आहे.
६. कलर ओएस ओप्पो आणि रिअलमीने सुरू केली आणि आता वनप्लसही कलर ओएसवरच जाणार आहे.
७.मागच्या वर्षी मोटो एज ५० निओ घेतला होता एकवीस हजाराला. टेलिफोटो लेन्स आहे ७०गुणिले तीन एमएएम. त्यात गूगल ड्राइववर ५ टेराबाईट स्टोरेज मिळाले. कसे काय माहीत नाही. आता हे फोन बाजारातून गायब आहेत.
८. दहा जूनला सगळ्या डिजिटल डिवाईस कंपन्यांनी फोन लॅपटॉपच्या किंमती वाढवल्या आणि आता फ्रीडम सेलमध्ये एक दोन हजार कमी केल्याचे भासवत आहेत.
९. गणपती..दसरा..दिवाळी झाल्यावर ( अमेझोन फ्लिपकार्ट सेल)किंमती खाली येतील. क्रिसमसचे आपल्याकडे किती महत्त्व आहे माहीत नाही.
फक्त सामसंग त्यांच्या जवळपास
फक्त सामसंग त्यांच्या जवळपास सर्व फोन्सवर सहा वर्षांचे ओएस अपडेट देते पण इतर कंपन्या फारतर दोन वर्षांचेच देतात. याबाबतीत सांमसग उत्तम कारण बँकिंग ॲप्स चालू राहतात. सांमसंग त्यांचा प्रसेसर एक्सिनॉस असलेले फोन्स फार काढते पण क्वालकॉम किंवा मिडियाटेकचे प्रसेसरवाले फोन घेणे बरे ते अधिक विश्वसनीय असतात. गूगल नेक्सस क्वालकॉम प्रसेसर वापरत होते पण नंतर वेगळ्या पिक्सेल फोनमध्ये सांमसंगची एक्सिनॉस चिपवरचे टेन्सॉर नावाने वापरते हीच गोची आहे.
Nothing चे फोन्स भारी आहेत.>>
Nothing चे फोन्स भारी आहेत.>>> लेकाला त्याचा मामा वाढदिवसाचे गिफ्ट म्हणून 3a देणार होता. पण भारतात कुठेच ऑनलाईन उपलब्ध नव्हता. आम्ही छ. संभाजी नगर, दिल्ली आणि बंगलोर या तिन्ही ठिकाणी दुकानांमध्ये पण शोधलं. हे मॉडेल कुठेच उपलब्ध नाही म्हणून कळलं. एका ठिकाणी हा 3a lite मिळाला. 4a उपलब्ध आहे बाजारात पण तेवढा महागडा फोन मुलासाठी घ्यायचा नव्हता आम्हाला.
यूट्यूबवर फोनचे रिव्ह्यू
यूट्यूबवर फोनचे रिव्ह्यू करणारे हेच नथिंग फोन घ्या सांगतात पण ते स्टॉकमध्ये नसतातच. एक वर्षांत चायना त्यांचे प्रसेसर चिप्स बाजारात आणणार आहे आणि मग डिवायसेसच्या किंमती कोसळणार असे सर्व सांगत आहेत.
Pages