मोबाईल कुठला घ्यावा ? - २

Submitted by योकु on 23 July, 2018 - 13:53

मोबाईल कुठला घ्यावा ?
याच्या चर्चेकरता हा दुसरा धागा. चलो हो जाओ शुरू... Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कसे करायचे हे?
UI version कुठले आहे तुमच्या फोन वर?

Settings/Wall Paper Service / Select None here.
हे केल्याने lock screen वर चे dynamic content बन्द होतात.

बाकी सगळे notifications सुद्धा बन्द.

धन्यवाद. केले
अनलॉक स्क्रीन ऍड बंद झाल्या.

मी M31s बुक केला आहे. दोन दिवसात येईल. त्याचीही मेमरी,कॅमेरा चांगला आहे. 6gb/8gb ram option आहेत. 128gb inernal memory.

Thanks for your suggestions. I went for buying Samsung F62 but got a newly launched Samsung A22. Mine is a 5G model with 8GB RAM and 128 GB internal memory and costed Rs. 23500 (including all accessories). I didn't know that nowadays, Samsung does not provide earphones with a handset; we have to purchase separately.

इअर फोन बऱ्याच वर्षांपासून देत नाहीत, कोणत्याही मोबाईल बरोबर >>>> अच्छा! मला माहिती नव्हतं. बाकी नवीन फोन बरा आहे, मानवदादानी लिहील्याप्रमाणे ह्यात तरी जाहिराती येत नाहीत.

उद्यापासून flipkart वर बिग billion day start होत आहेत.. मला मोबाईल घ्यायचाय... कोणता mobile घेऊ ?memory आणि camera चांगला पाहिजे... आणि exchange offer बद्दल कोणाला काही माहिती आहे का? म्हणजे माझा handset खूपच खराब झाला आहे... त्याची screen बदलावी लागली.... पण नवीन screen ला पण खूप cracks आहेत... धाकट्या लेकीचे प्रताप :फिदी:... शिवाय battery देखिल फुगली आहे... तर असा phone exchange होऊ शकतो का?

बजेट नो बार असेल तर वनप्लस ९ प्रो बघा.
माझ्यामते स्क्रीन/बॉडीवर क्रॅक्स असतील तर एक्सचेंज होणार नाही. माझा एक एक्सचेंज रिजेक्ट झाला होता पाच वर्षांपूर्वी. लोकल सेलफोन रीपेअर शॉप वाले त्याचे काही पैसे देऊ शकतात चार पाचशे.

मोक्षू तुमचं बजेट सांगितलं, तर चांगला फोन सुचवू शकेन. Happy

तरीही एक बेस्ट डील सांगतो.

Realme GT Master Edition.

२०००० ला मिळेल.
जर icici चं card असेल तर १८५०० ला.
याहून जबरदस्त डील कुठली असूच शकत नाही.

Flipkart वर आज मध्यरात्रीपासून सेल सुरू होतंय.

२५९९९ च बेसिक मॉडेल आहे. ६ Gb १२८ gb च
त्यावर कुठल्याही कार्ड ने पेमेंट केलं तर ६००० रुपये डिस्काउंट
Axis Bank किंवा icici च कार्ड असेल, तर १५०० extra discount.
मीसुद्धा उद्या एका घरातल्या मेंबर साठी घेतोय Happy

दोन प्रश्न!
१. कोणाला मुंबई सेंट्रल लाईनवरती कुठेही एखादे विश्वासार्ह मोबाईल रिपेअरचे दुकान माहिती आहे का? एका बंद फोनमधून काही डेटा मिळवायचा आहे. Power button आणि fingerprint sensor दोन्ही काम करत नसल्याने फोन सुरु करता येत नाहीये. 
२. २५ ते ३५ हजार या रेंजमध्ये कोणता चांगला आणि टिकावू फोन घेता येईल? सध्या Pixel 4a आणि Samsung S20 FE 5G हे दोन फोन बघते आहे. अटी - चिनी कंपनी नको. मोटोरोला चालेल, stock android आवडेल नसली तर मग Samsung. 5G असलेला बरा. या अटींत बसणारे दुसरे कोणते फोन आहेत? 

जिज्ञासा, इथे पॉवर बटन खराब झाले असेल तर फोन कसा सुरू करावा दिले आहे. (फिजिकल होम बटन असले अथवा नसले तरी).
याचा उपयोग होतो का बघा.

१) Power button हा मोठा प्रश्न नसतो. ते दुरुस्त होऊ शकते.
२) फोनसाठी थोडे थांबावे. कारण वाढलेल्या किंमती कमी होत आहेत. बजेट १५ह+/- ? आणि उपयोग काय करायचा आहे? म्हणजे ५जी हवाच असेल आणि साईज किती? सहा इंचापेक्षा कमी / अधिक ?

भ्रमर, होय, तोच प्रयत्न चालू आहे. एक दोन दिवसांत फोन दुरुस्त होईल कदाचित. तसे झाले तर फारच उत्तम!

मापृ, धन्यवाद! फोनचे व्हॉल्युम बटन देखील खराब झाले आहे आणि फोन ऑन होत नाहीये त्यामुळे बाकीचे उपाय वापरू शकत नाहीये.  

srd, जर जुना फोन दुरुस्त झाला तर मग नीट थांबून वाट पाहून फोन घेऊ शकेन. नाही झाला तर मात्र असलेल्या पर्यायांमधूनच निवडावा लागेल. माझा वापर फार हेवी नाही. सध्याचा Oneplus ३ घेतला तेव्हा फ्लॅगशिप होता आणि ६ वर्षे खूपच उत्तम चालला. अजूनही जर बटन्स दुरुस्त झाली तर बाकी फोन छानच चालतो आहे. किंमत ३० ह. पर्यंत चालेल कमी असली तर छानच! मुख्य अपेक्षा टिकावू असावा आणि पुढची किमान ३ ते ५ वर्षे चालावा अशी आहे. आकाराने छोटा (< ६) असेल तर सोपा वाटेल पण मोठ्या फोनची पण सवय होते आणि आजकाल बहुतेक सगळे फोन मोठेच असतात असं लक्षात येतंय. ५जी हवेच आहे असे नाही आणि कमी किंमत असेल तरी चालेल पण खूप bloatware किंवा जाहिराती नको आहेत. कमी किंमत असेल तर बरेच bloatware येते असे वाटते. Oneplus मुळे stock android ची सवय झाली आहे आणि तेच बरे वाटते. पण आता Oneplus किंवा इतर चिनी कंपन्या नको आहेत. त्यामुळे सॅमसंग किंवा पिक्सेल असाच पर्याय आहे. पण एकूण लोकप्रियता आणि ease of repair बघता सॅमसंग पहिल्या क्रमांकावर आहे आणि त्यामुळे सेफ पर्याय वाटतो आहे. सध्या Galaxy A52 आवडला आहे. Samsung has promised 3 major updates and 4 years of security support for this phone. 

सहज वाटलं म्हणून शेअर करतो आहे.

१. फोन रिस्टार्ट, चालू-बंद यासाठी सोडलं तर पावर बटण वापरायचंच नाही. डबल क्लिक स्क्रीन वेकप, वोल्युम की स्क्रीन वेकप, फिंगरप्रिंट स्क्रीन वेकप, वगैरे वगैरे वगैरे.

२. फोन कुठेच आपटू नये... अगदी मऊ गादीवरपण नाही. दोन तीन वर्षांनी टच सेन्सर विक होतात असं निरीक्षण आहे. खखोटेपजा.

1) moto g31
6.4inch full hd plus
amoled display
4g phone
Mediate G85 processor
Rs.13000

2) moto g51 5g
6.8 inch full hd plus
LCD display
Qualcomm 485 5g new processor
5g all 13 bands
Rs.15000

3) moto g71 5g
Amoled 6.4inch
Qualcomm 695 5g processor
128 GB memory ,not expandable
5g all 13 bands
Rs.18000

तीन्ही फोन stock android
Hybrid sim slot

धन्यवाद Srd! तिन्ही फोन बघते. सध्यातरी फोन दुरुस्त होऊन मस्त चालू लागला आहे Happy त्यामुळे बऱ्यापैकी वेळ आहे आता हाताशी पुढचा फोन कोणता घ्यावा हे ठरवण्यासाठी.

मोटो कंपनी लिनोव्हो कडे गेल्यापासून त्यांची क्वालिटी लैच ढासळली आहे असा अनुभव
मी पूर्वी मोटो चा लोयल कस्टमर होतो पण नंतर फार निराशा केली

सगळ्यात बेस्ट MI ची नोट सिरीज आहे. मी नोट 5 चार वर्षे झाले वापरतोय काहीही प्रॉब्लेम नाही आला. मुलीने कितीतरी वेळा आपटला असेल. पहिल्या दिवशी जसा परफॉर्मन्स देत होता तसाच आजही देतोय.

हो मी पण मोटो नंतर mi ला शिफ्ट झालो
नोट6 माझा अजुनही टाकतक चालतोय
कॅमेरा क्वालिटी, बॅटरी उत्तम आणि नो लॅग
खूप लोकं ओव्हरहिट ची तक्रार करतात पण मला एकदाही असा अनुभवनाही
ब्लॉट आहेत पण सॅमसंग इतके नाहीत
आता पुढचा घेतला तर नोट 11 किंवा 12घेईन

Pages