फुकटात विनासायास वेटलॉस

Submitted by शाम भागवत on 3 July, 2018 - 03:17

वाढलेला पोटाचा घेर व वाढलेले वजन, सोबतीला कोलेस्टेरॉल सापडल्यामुळे नशिबी आलेल्या गोळ्या आणि आता या आयुष्यभर घ्यावयाच्या आहेत अस डॉ. नि सांगितल्यावर मनाला बसलेला हबका. काही जणांचा वाढलेला रक्तदाब व त्यावरच्या गोळ्या , मधुमेह पूर्व स्थिती लक्षात आल्यावर उडालेली घाबरगुंडी तर मधुमेह झाल्याचे निदान झाल्यावर घरातल्या सर्वांच्या चेहऱ्यावर अवतरलेली काळजी. आणि या सगळ्यातून हे खा व हे खाऊ नका ची भली मोठी यादी. शिवाय गुडगेदुखी, ऍसिडिटी , .. , .., .. असच बरच काही यांच्यासाठी हे लिहितोय.

ह्या सगळ्या त्रासातून कस मुक्त व्हायच?, एक पैसा जास्त खर्च न करता हे कस साधायच? श्रीमंत असो की गरीब दोघांनाही जमू शकेल,तसेच स्त्री पुरूषात अजिबात भेदभाव न करता दोघांनाही एकच पद्धत कशी वापरता येईल, तसेच त्यामागे विज्ञानाचा भक्कम पाठिंबा असला पाहिजे. वगैरे वगैरे .......
थोडक्यात आखूड शिंगी, बहुदुधी, गरीब, दूध काढताना लाथा न मारणाऱ्या बहुगुणी गायीबद्दल हे लिहितोय.

कै. डॉ.श्रीकांत जिचकार एक अवलिया माणूस. एमबीबीएस, एमडी झाल्यावर आयपीएस त्यानंतर चक्क आयएएस. पण चारच महिन्यात नोकरीचा राजीनामा देऊन आमदार, मग मंत्री, राज्यसभेचे खासदार. या माणसाने प्रगती तरी किती वेगाने करावी? पण हे सगळं ४९ वर्षांच्या आयुष्यात साधायच म्हणजे एवढा वेग हवाच की हो!

घरातल्या ग्रंथालयात बावन्न हजार पुस्तक. विद्वत्ता दाखविण्यासाठी जाहिरात म्हणून नक्कीच जमवलेली नसणार. उलट सगळी वाचलेली असण्याची शक्यता जास्त. कारण ४२ विद्यापीठातून मिळवलेल्या २० पदव्या. बहुतेक सगळ्या प्रथम श्रेणीतून मिळालेल्या. २८ सुवर्णपदक मिळवलेला माणूस हा. नक्कीच पुस्तके वाचलेली असणार.

तर असा हा माणूस. भरपूर परदेश वाऱ्या केलेला असूनही त्याची भारताशी जुळलेली नाळ तुटली नव्हती. साधारण अशी माणसे थोडीशी भारतीय संस्कृतीशी फटकून वागतात. पण इथेही आपल्याला आश्चर्याचा धक्का बसतो. भारतीय संस्कृती व प्राचीन इतिहास, तत्त्वज्ञान व संस्कृत यात एमए केलेय. हे मी आपल वानगीदाखल सांगतोय कारण तस पाहिल तर त्यांनी १० विषयात एमए केलेय. इतकच काय मानाची डी. लिट. पदवी मिळालीय त्यांना संस्कृतामध्ये.

तर सांगायच म्हणजे अशा माणसाने १९९७ साली एक नवीन विचार भारताला दिला. त्यावेळी ते राज्यसभेचे सभासद होते. पुणे महानगर पालिकेत मा. शशिकांत सुतार नावाच एक मोठ्ठ प्रस्थ होत. त्यांनी बालगंधर्व रंगमंदिरात जिचकारांना भाषणासाठी बोलावल. त्यासाठी सगळी व्यवस्था जातीने केली. आपोआपच बरेच मान्यवरांनी रंगमंदिर भरून गेल.

त्यांनी सांगितल की, "शरीरात तयार होणारे अतिरिक्त इन्शूलीन बऱ्याच रोगांचे कारण आहे." स्थूलता, त्यातून मधुमेह, वाढलेला रक्तदाब, त्यातून मग अंजोग्राफीची तपासणी, त्यात नक्की काहीतरी सापडतच. मग अंजोप्लास्टी. सगळाच प्रकार खर्चिक. पण मरणाची भीती वाटायला लागली की माणूस करतो खर्च. त्याला वाटतं की झाल सगळ करून. आता काही आपल्याला होणार नाही. पण कसच काय. पाच सहा वर्षात आणखी खर्चिक बायपाससाठी हॉस्पिटलची वारी ठरलेली.

मग यावर सोपा उपाय काय? दिवसातून फक्त दोनदाच जेवा. काहीही खा. भूक भागेपर्यंत कितीही खा. तूप लोणी बिनधास्त खा. मांसाहारही चालेल. फक्त हे जेवण ५५ मिनिटांत संपवले पाहिजे. आणि दिवसातून ४५ मिनिटे भरभर चालण्याचा व्यायाम केला पाहिजे. महागड्या जिम नको की, आहारतज्ञांना पैसे द्यायला नको. दवाखान्याची पायरी चढायची कधी वेळही येणार नाही. किती सोपे आहे ना? पण अवघड बाब पुढे आहे. ते पुढे सांगतात की, "दोन जेवणामध्ये काहीही खाऊ नका." याकाळात तोंड उघडायचे ते फक्त बोलण्यासाठी किंवा पाणी पिण्यासाठी. बस्स. औषधांच्या याद्या विसरून जा. हे खा व हे खाऊ नका याची प्रत्येक डॉक्टर व आहारतज्ञांप्रमाणे बदलणारी यादी व त्यातून उडणारे गोंधळ संपवून टाका.

सगळ वैज्ञानिक नियमावर आधारलेले भाषण. समोर अनेक मान्यवर बसलेले. त्यामुळे बऱ्याच वेळेस अशी भाषणे इंग्रजीत चालतात आणि जिचकार तर इंग्लिश लिटरेचर मध्येपण एमए केलेले. पण तरीही हा विचार सर्वसामान्य माणसाला कळला पाहिजे यासाठी हे भाषण त्यांनी मराठीतून दिले आहे. समोर नुसते मान्यवर नाही तर पुण्याचे मान्यवर बसणार आहेत म्हणून त्यांनी अनेक इंग्रजी संज्ञांना पूरक मराठी संज्ञा शोधून काढल्या होत्या व त्या संज्ञा पाठ करून मगच ते व्याख्यान द्यायला आले होते. (या मराठीतील संज्ञा शोधणे व पाठ करणे हे कामही त्यांना सोपेच गेलेले असणार. कारण ते महाराष्ट्राच्या विश्वकोश निर्मिती मंडळाचे सभासद होते!!!) एखाद्या माणसाला बेंबीच्या देठापासून कळकळ असते म्हणजे काय हे समजून घ्यायचे असेल तर त्यासाठीही हे व्याख्यान ऐकायला हरकत नाही.

आपल्या या कार्याचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी "नागपूर फिटनेस मुव्हमेंट" आणि "पुणे फिटनेस मुव्हमेंट" अशा दोन संस्था सुरू केल्या. पण त्या काळात फेसबुक किंवा व्हॉटऍपस वगैरे काहीच नव्हत. नाहीतर याचा प्रसार फार वेगाने झाला असता. मनोगत, मायबोली किंवा मिसळपाव सारखा एखादा संकेतस्थळ तयार करता अल्लाही असत कदाचित. पण वाचणार कोण? इंटरनेट फार महाग होत त्यावेळेस. टाटा कंपनीच्या व्हीसएनएल ला वर्षाकाठी पाच सहा हजार भरल्यावर कनेक्शन मिळायच. शिवाय घरात फोन असला पाहिजे ही पूर्वअट. आणि नेट वापराला सुरवात झाली की दर मिनिटाला एक टेलीफोनचा कॉल एवढे पैसे टेलिफोनच्या बिलात यायचे तो खर्च वेगळाच. नेट वापरणे हे सामान्यांच्या कुवती बाहेरची गोष्ट होती. अपवाद फक्त आयटी मधल्या लोकांचा!

तरीपण राज्यसभेच्या सदस्याला बऱ्याच सोयी सुविधा असतात. ओळख पाळख असते. त्यामुळे प्रसाराचे काम चालू होते. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते. दोनच वर्षांनी म्हणजे १९९९ साली झालेल्या लोकसभेच्या निवडणूकीसाठी काँग्रेसकडून त्यांना तिकिट मिळाल पण फक्त ३०००+ मतांनी पडले. इतकेच नव्हे तर राज्यातले आणि त्याचबरोबर केंद्रातले काँग्रेसचे सरकार पडले. प्रसारावर फारच मर्यादा आल्या.सर्वात मोठे दुर्दैव म्हणजे २००४ साली जेव्हा कॉग्रेसचे सरकार राज्यात व केंद्रात आले त्यानंतर दोनच आठवड्यात त्यांचा अपघाती मृत्यू झाला. मला वाटते या नवीन विचारांचे फक्त बी लावायचे काम नियतीने त्यांच्यावर सोपवले होते.

त्यांचा या भाषणाचा एक ऑडिओ यूट्यूबवर होता. पण दोन तास तीन मिनिटांचा ऑडिओ म्हटल्यावर बरेच जण तो उघडून सुद्धा बघत नसत. आणि यदाकदाचित कोणी उघडलाच तर बरेच जण पहिले प्रास्ताविक संपेपर्यंतही कळ काढू शकत नसत. त्यामुळे मूळ भाषण सुरू होण्याआधीच तो बंद केला जायचा. एवढा वेळ असल काही ऐकायला तो थोडाच वपू किंवा पुल चा व्हिडिओ होता की व्यायाम/प्रवास करताना ऐकायचा गाण्याचा अल्बम होता? ही राजकारणी लोक ही अशीच. समोर माइक आला की यांना वेळेच भानच राहत नाही. अशी कॉमेंटपण कोणीतरी केली असेल असा मला दाट संशय आहे.

बरीच वर्षे निघून गेली. जिचकारांनी लावलेले बी रूजण्यासाठी अनुकूलतेची वाट पाहत युट्युबवर पडून होत. ही अनुकुलता लाभणे फार अवघड होत. त्याला वेळ लागणार हे त्या बियाणाला माहीत होत. आणि सहा वर्षापूर्वी ते एकाच्या हृदयात रूजल. हा माणूस एमबीबीएस, एमडी होता. पण रोग पाहून औषध देणारा नव्हता. तर रोग होऊच नये यासाठी काय करता येईल यातला तज्ञ होता. प्रामाणिक होता. पैशासाठी काम करणारा नव्हता. समाजाच्या भल्यासाठी काम करण्याची इच्छा असणारा असा होता. मुख्य म्हणजे माहिती वाचून चर्चा करणारा नव्हता तर त्यासाठी स्वतःवर प्रयोग करायला तयार असणारा व त्यासाठी स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करायला तयार असणारा होता. नियतीने अगदी अचूकरीत्या लातूरच्या डॉ. जगन्नाथ दीक्षित यांची निवड केली होती.

डॉ. दीक्षित सध्या ते लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विभाग प्रमुख आहेत व गेली सत्तावीस वर्षे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अध्यापन करत आहेत. "स्थूलत्व निवारण आणि मधुमेह प्रतिबंध" या विषयावर त्यांनी संशोधन केले.यात त्यांनी प्रथम स्वतःवर प्रयोग केले. नातेवाइकांवर प्रयोग केले. जवळच्या मित्रांवर प्रयोग केले. या सगळ्याच्या व्यवस्थित नोंदी ठेवल्या. मग मात्र त्यांनी लातूर व औरंगाबाद येथील हजारो लोकांवर प्रयोग केले. वैज्ञानिक नियतकालिकात प्रबंध लिहिण्यासाठी या प्रयोगाचे योग्य दस्तावेजीकरण केले व अनेक प्रबंध प्रकाशीतही केलेले आहेत.

पण प्रसारासाठी नुसते प्रबंध लिहून भागत नाही यासाठी त्यांनी व्याख्याने द्यायला सुरवात केली. पुण्याच्याच बालगंधर्व रंगमंदिरात कै. डॉ. श्रीकांत जिचकारांच्या स्मृतीला अभिवादन करून सुरवात झालेले त्यांचे व्याख्यान ऐकण्यासाठी खाली लिंक देत आहे. हेही व्याख्यान खूप मोठे आहे. पहिले प्रास्ताविक ३० मिनिटे चालते. त्यामुळे व्याख्यानासाठी आतुर झालेले बरेच जण कंटाळून पहिल्या काही मिनिटांनंतर व्याख्यान बंद करून टाकतात. हे प्रास्ताविक पाहू नये म्हणून मी हे सांगत नाहीये. तर थोडा धीर धरावा असे सुचवत आहे. या प्रास्ताविकातूनही तुम्हाला काही मुद्दे मिळू शकतात.

२०० च्या वर व्हॉटऍपस ग्रुप स्थापन करून व फेसबुकच्या माध्यमातून ही चळवळ अठ्ठावीस हजार माणसांपर्यंत पोहोचली आहे. अनेक देशातील माणसे यात आहेत. पण हे सगळे सांभाळणे आता अवघड होत चाललेय. कार्यकर्त्या डॉक्टरांना यासाठी वेळ देणे अवघड होत चाललेय. यासाठी आता एक वेबसाईटच उघडायचे प्रयत्न चालू आहेत. तस झाल की एकाच ठिकाणी सगळी माहिती एकत्रित होईल. वेळ वाचेल. एक कोटी लोकांपर्यंत लोकांपर्यंत पोहोचायचे उद्दिष्ट समोर ठेवून आता काम सुरू होणार आहे.

खर म्हणजे ह्या व्याख्यानाचा सारांश देण्याचा माझा विचार होता. पण मी मुद्दामहून तस करत नाहीये. कारण तस केले तर लोक मूल व्याख्यान न ऐकताच चर्चा करायला सुरवात करतात. हे व्याख्यान ऐकल्यावर फारशा शंका उरत नाहीत. शिवाय त्यांनी काही फोन नंबरही दिलेले आहेत. त्यावर तुम्ही व्हॉटऍपवर प्रश्न किंवा शंका विचारू शकता.

डॉ. दीक्षित यांच्या व्याख्यानाची लिंक खाली देत आहे. दोन तास सलग वेळ काढता येईल अशी वेळ निवडून निवांतपणे पहा.
https://www.youtube.com/watch?v=edKaI5gxaNQ

ही डॉ. दीक्षित यांची फेसबुक पेजची लिंक आहे. त्यात लाभार्थींची नावे, अनुभव व मोबाईल नंबर दिले आहेत.हे तुम्ही केव्हाही पाहू शकता! https://www.facebook.com/weightlosseffortlessly/

डॉ. जिचकार यांनी याच व्याख्यानात बी पेरण्याचे काम केले. हा ऑडिओ आहे. दोन तास सलग वेळ काढता येईल अशी वेळ निवडून निवांतपणे पहा.
https://www.youtube.com/watch?v=8-kw3hGUwW4

मी स्वतः या विषयातला तज्ञ नाही. पण या संकेतस्थळावर या विषयातले बरेच तज्ञ असल्याने साधक बाधक चर्चा होऊन हा विषय आणखी स्पष्ट होईल याहेतूने हे लेखन केले आहे.

एक महत्त्वाची सूचना :
ज्यांना मधुमेह आहे अशांनी HbA1c आणि fasting insuline या दोन तपासण्या करून त्याचे अहवाल डॉ. दीक्षित यांना पाठवावेत. या दोन तपासण्या म्हणजे रक्तातल्या शर्करेचे प्रमाण दाखवणाऱ्या तपासण्या नव्हेत. त्यानंतर त्यांच्याच सल्ल्यानेच पुढील आहारयोजना सुरू करावी. परस्पर आहारयोजना सुरु करू नये.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

ठीक. अधून मधून पोस्ट्स चाळल्या. सई केसकर यांच्या पोस्ट्स मला स्वतः माहिती घेऊन माहिती देणा-या वाटल्या. त्याबद्दल गरज भासल्यास त्यांच्याशी संपर्क साधेन.
दीक्षितांचे महीमामंडम कि काय असे मला वाटले नाही. दीक्षितांचे भाषण ऐकतोय. आता साठ मिनिटे झालेली आहेत. हातातली कामे संपली की पूर्ण करीन. दीक्षितांचे क्लिनिक नाही. त्यामुळे त्यांचे मार्केटींग करून भागवतांना काय फायदा हा प्रश्न मला पडतोय. दीक्षित प्राध्यापक आहेत. मेडीकल कॉलेजमधे शिकवतात म्हणजे त्यांना भोंदू बाबा म्हणता येत नाही. त्यांची तुलना सनातनच्या लोकांशी करता येत नाही. इथे काही मार्केटींग चालू आहे किंवा एमएलएम चालू आहे असा उद्देश कुणाला आढळला आहे का ?
माझ्या मते दीक्षित म्हणतात त्याप्रमाणे कम्युनिटी थेरपी असा हा प्रकार आहे. मधुमेहाशी लढण्यासाठी सोसायट्या आहेत. २००७ साली त्याबद्दल ऐकले होते. वाचलेही होते. पण त्यात रस नसल्याने पुढे जाणून घेतले नाही. पुण्यात सेनापती बापट रस्त्याला अशा एका संस्थेचे कार्य आहे.
ही मंडळी एक चळवळ म्हणून मधूमेहाशी लढा देत आहेत. मधूमेहाबाबत जागृती करणे, होऊच नये म्हणून प्रयत्न करणे असे त्यांच्या कामाचे साधारण स्वरूप आहे. त्यांचा फायदा हाच असेल की त्यांचे पेट्रोलला पैसे जात असतील, संस्थेच्या कार्यालयासाठी भाड्यापोटी वर्गणी काढावी लागत असेल. त्यामुळे हेतू बाबत शंका घेणा-यांचा जाहीर सत्कार समारंभ शनिवारवाड्यावर आयोजित करणे वावगे नाही.
दीक्षित हेच कार्य करत आहेत. त्यांचे संशोधन आहे हा त्यांचा दावा आहे.
ते चुकीचे काही पसरवत असतील तर त्याबाबत जागृती केली जावी. केवळ कल्ट सारखी संभावना केली जाऊ नये. त्यांच्या उपचार पद्धतीत किंवा एकूणच ते सांगू पाहत असलेल्या जीवनपद्धतीत अशास्त्रीय काही असेल तर ते इथे मांडावे. लोकांना त्यात रसेल.
असे झाले तर भागवत सर देखील डॉ. दीक्षितांकडून अधिक खुलासे मागवून घेतील. अथवा त्यांना खुलासा जाहीरपणे करण्याची विनंती करतील.

शाम भागवत यांच्या लेख लिहीण्यामागची भावना प्रामाणिक आहे. त्यांनी प्रांजळपणे कबूल केलेले आहे कि मी या विषयातला तज्ञ नाही. त्यामुळे वाचकांनी आपल्या जबाबदारीवर ही माहिती तपासून घेणे आवश्यक आहे असे मला तरी वाटते.+१११

@मोहन की मीरा,
डॉ. दिक्षीतांच्या "विनासायास वेट लॉस" (१५ वी आवृत्ती) या पुस्तकात शंका समाधान या विषयाखाली १११ व्या पानावर खालील उल्लेख सापडला.

प्रश्न क्र. २४ मला पॉलीसिस्टिक ओव्हॅरीयन डिसीज आहे. मला या उपायाचा वजन कमी करण्यासाठी उपयोग होईल का?
उत्तर : आमच्या अभियानाशी जोडल्या गेलेल्या स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र विशेषज्ञांचा अनुभव असा आहे की, या उपायांमुळे पॉलिसिस्टीक ओव्हरियन डिसीज झालेल्या त्यांच्या अनेक रूग्णांची वजने कमी झाली. या रूग्णांची मासीक पाळी नियमीत येऊ लागली व त्यांच्यापैकी काहींना कोणत्याही औषधांवाचून गर्भधारणाही झाली. त्यामुळे तुम्हालाही नक्कीच फायदा होईल.

त्यामुळे वाचकांनी आपल्या जबाबदारीवर ही माहिती तपासून घेणे आवश्यक आहे असे मला तरी वाटते.+१११
<<
वाचकांनी ही माहिती कशी तपासायची?

"आमच्या अभियानाशी जोडलेल्या अमक्यांच्या अनुभवानुसार", अर्थात भागवतांच्या व्हॉट्सॅपी पोस्ट्स वरून, की "पियर रिव्ह्युड सायंटिफिक लिटरेचर"च्या अभ्यासावरून?

काही ही खाल्ले तरी इन्श्युलिन तितकेच स्रवते.
५५ मिन्टाच्या विण्डोनंतर इन्श्युलिन स्रवतच नाही.
वगैरे भोंगळ विधाने इथे वाचलीत.
दीक्षितांचे व्हिडिओ मी पाहणार नाही, अन पाहिले तरी त्याबद्दल श्री. भागवताशी नव्हे तर डॉ. दीक्षितांशी चर्चा करीन.

आजच्या पोस्ट ट्रुथ इरा मधे, 'बुद्धीवाद्यांना' बदनाम तर केलं गेलंय, पण पब्लिकला हे समजत नाहिये की बुद्धीवादी लोक या क्लिष्ट पियर रिव्ह्युड लिटरेचरचे सार कोणत्याही भगव्या/हिरव्या गाळण्या न लावता सामान्यांच्या भाषेत सामान्यांपर्यंत पोहोचवत असतात.

इथे दीक्षित काय म्हणतात, याबद्दल मी कुठेच काहीही लिहिलेलं नाहिये. ते सई यांनी त्यांच्या धाग्यात लिहिलेलं आहेच.

जे काय लिहिलंय ते भागवत काय म्हणतात, अन का म्हणतात याबद्दल आहे.

भागवत इथे जेजे काही म्हणताहेत, त्यातल्या बहुतेक भागात 'भागवतात' ल्या भाकडकथांपेक्षा काडीचाही अर्थ नाही.

दीक्षित काय म्हणताहेत, ते दीक्षितांशी वैद्यकीय भाषेत बोलेन. भागवत या विषयातले तज्ज्ञ नसल्याने, इथे फक्त अन फक्त त्यांच्या दात विचकटण्याबद्दलच बोलेन.

शास्त्रीय ज्ञान अन जिचकरांचे मराठी प्रेम अन दीक्षितही मराठी याचा एकमेकांशी काय संबंध??
डाएटच्या शास्त्रीय स्ट्रेंग्थबद्दल बोलताना, डॉ. जिचकरांनी किती डिग्र्या घेतल्या, अन दीक्षित कसे मराठी, अन म्हणून मराठी संस्थळावर या "विचाराने" मूळ धरले, या निर्बुद्ध वाक्यांनी हसू कसं येत नाही लोकांना?

"हिंदू हो तो फॉर्वर्ड करो" असल्या स्टायलीतले "मराठी म्हणून मूळ धरले" या बुद्धीमांद्यापेक्षा, डाएटच्या शास्त्रीय व्हॅलिडिटीमुळे लोकांनी अ‍ॅक्सेप्ट केली, व करावी असे आवाहन करणे, हे या तथाकथित "चळवळीचे" मूळ असावे असे वाटत नाही का कुणालाच इथे???

काय दिवस आलेत!

साक्षर अन सुशिक्षित यात फरक आहे हेच उमजेना झालंय..

५५ मिन्टाच्या विण्डोनंतर इन्श्युलिन स्रवतच नाही. >>>

मल्हारी, अरे वेड्या ते ५५ मिनिटांच्या सायकलनंतर दुसरे सायकल सुरू होते असेच म्हणत आहेत. आता तुला व्हिडीओ न पाहताच वाद घालायची ऊबळ आली असेल तर घालत बस. पुन्हा दीक्षितांना फोन करताना तुझा नंबर त्यांच्याकडे जाईल, आवाज ऐकू येईल, शिवाय ते नाव विचारतील या धोक्यांचा तू विचार केलेला आहेस काय ?
सावध केलेलं बरं...

किरण्या,

ते fon bin, मी अन ते पाहून घेऊ.

मला नडायचा प्रयत्न बंद कर. तेवढी तुझी कप्यासिटी नाही Lol

अन हा मल्हारी कोण? तुझा कुणी नातेवाईक आहे का?

वेडा मल्हारी
अरे तू जिचकारांची जाहीरात करतोहेस का ? ज्याच्या नादी लागून दीक्षितांनी लोकांचे नुकसान केले ?
तर या धाग्यावर पक्षाचा संबंध नसावा असे मला वाटते. अ‍ॅडमिनला काय वाटते हे मला ठाऊक नाही. तुझ्या नादाला लागले तर चांगला धागा भरकटेल म्हणून फुल्ल स्टॉप.

Lol
बाळ किरणू,
मी प्रतिसाद लिहिला की त्या त्या धाग्यावर येऊन नाचून पहायचा प्रयत्न बंद कर. मी सांगितलंय ना तुला अड्ड्यावर? तुला अभ्यास करता येतो. तो कर.
अन अभ्यासावरून बोल.
नुसतं अमुक माणूस मला समहाऊ आवडत नाही म्हणून विचित्र बडबड करू नकोस.
दुसरं म्हणजे तब्येतीला जप. खरेच काळजी वाटते. चांगला कार्यकर्ता आहेस. नीट वागलास तर पुढे जाशील. मी करीन रेकमेंड. पण ओन्ली इफ यू प्राँमिस टू टेक टॅब्लेट्स ऑन टाईम.

>>>उत्तर : आमच्या अभियानाशी जोडल्या गेलेल्या स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र विशेषज्ञांचा अनुभव असा आहे की, या उपायांमुळे पॉलिसिस्टीक ओव्हरियन डिसीज झालेल्या त्यांच्या अनेक रूग्णांची वजने कमी झाली. या रूग्णांची मासीक पाळी नियमीत येऊ लागली व त्यांच्यापैकी काहींना कोणत्याही औषधांवाचून गर्भधारणाही झाली. त्यामुळे तुम्हालाही नक्कीच फायदा होईल. >>>
केवळ महान. ही अशी उत्तरे बालाजी तांबे किंवा स्त्री समस्यांना वाहिलेल्या गृहशोभिकात वाचली आहेत. हे असं डॉ. नी १५ आवृत्त्या खपलेल्या पुस्तकात लिहिलंय???

अन हो.

मंद बुद्धीनुसार आपण प्रतिसाद एडीट केला म्हणजे मूळ स्क्रीनशॉट गायब होतो, असे तुला खरेच वाटते काय?

चल. बाय.

अमितव,

आता शक्य असल्यास वरती लिहिलेला तुमचा प्रतिसाद एडिट करा.

अन आम्ही सगळे ट्रॉलिंग करतो आहोत, हे वाक्यही मागे घ्या? (तुमचेच आहे ना ते?)

***

आजपर्यंत तरी विनाकारण माबोवर कुणाशीही तोफांड मांडल्याचे आठवत नाहिये Bw

मल्हारी
सई केसकर ने खूप अभ्यासा अंती इथे चर्चा घडवून आणलेली आहे. अनेकांना संदर्भ म्हणून तिचा उपयोग होत आहे. तू इथे एकही विधान उपयुक्त केलेले नाहीस. फक्त मी बच्चन आणि बाकीचे मूर्ख एव्हढेच तुझे काँट्रीब्यूशन आहे.
केवळ या धाग्याला वाचवण्यासाठी मी अक्षरशः हात जोडून विनंती करतो की हे झाड सोड.
तुला अधिकाराने काही सांगायचे असेल तर कृपया डॉक्तर असल्याची किमान ओळख इथे कुणालाही दे. निनावीच रहायचे असेल तर कृपया या धाग्यावर विधाने करू नयेत.
मला जे शक्य होते ते मी सांगितले आहे. माझ्यामुळे तुला भरकटवण्याची जी संधी मिळाली त्याबद्दल मी मायबोलीकरांची क्षमा मागत आहे.
लहान मुलाला सुद्धा यामागचे लॉजीक समजेल. तू डॉक्टर असशील तर शिकलेला आहेस असे म्हणावे लागते.

न्यूटनचा नियम भावेसरांचा आहे सांगणे हे निरागस टाईप वाटून मी कदाचित सोडून देईन. पण तेच सनातनचे आठवले, आणि कोणी भोंदू विचार कोणी मांडू लागलं तर तावातावाने अंतापर्यन्त भांडायला येईन. थोडक्यात विचार साधारणतः चांगला, पॉझिटिव्ह, बर्‍यापैकी शास्त्रीय असला तर कोणी सांगितला हे एखाददा सांगेन पण परत परत त्यावर वाद घालून माझी एनर्जी दवडणार नाही. चूझ द बॅटल्स यु नो Proud (हा माझा नियम नाही, सो वेळ असेल आणि भलतीकडे वाद घातला तर ही पोस्ट मला गप्प बसवायला वापरु नये. हुकुमावरुन) Proud

इथे भरत, आरारा, हेला यांच्या पोस्ट लेखकाची खिल्ली उडवणार्‍या वाटलेल्या. हाबच्या पोस्ट बाल की खाल टाईप असल्या तरी खिल्ली अ‍ॅटिट्युड न्हवता मला वाटलेला. जाताजाता, मला भागवतांच्या स्मायली जाम आवडलेल्या रिप्लाय म्हणून. त्या वर्क पण करत होत्या. ज्यांच्यावर येत होत्या ते इरिटेट झालेले, भरत यांनी तर आपल्याच पोस्ट नंतर आपणच स्मायली टाकल्यावर माझे माफक मनोरंजन ही झाले. Happy

अकरावीला फिजिक्स शिकवायला एक कन्नड स्टाईलने बोलणारे कुलकर्णी सर होते. त्यांनी पहिले अनेक दिवस किरचॉफ्स लॉ जाम मन लावून शिकवलेला. तेव्हा पासून त्यांना आम्ही किर्‍चॉफ कुलकणी म्हणू लागलो ते वरच्या भावे सरांवरुन सहज आठवलं. Happy
Submitted by अमितव on 23 August, 2018 - 22:58
<<
जस्ट टु रिमाइंड अमितवा

प्लस त्याखालचे इबांचे विकट हास्यही Wink

किरणू बाळ,
अ‍ॅडमिन यांनी कदाचित माझा तोल जाईपर्यंत तुझी बडबड इग्नोर करायचं ठरवलेलं दिसतंय.
पण उंहू.
I don't have to give you even time of the day. And absolutely NOT my identity.
Admin, webmaster, both know it.
So,

the way you edited your earlier response, edit this one too.

and yes, @ admin.

I cant help it but reply here. I have seen it N number of times, that posts from others who make false allegations at me just stay even when their id goes away. I used to respond to them in heat of moment, i have stopped doing that long ago. But I don't think it has escaped your attention how this person is trying very hard to persecute me.

anyway.

good night.

>>> सई केसकर ने खूप अभ्यासा अंती इथे चर्चा घडवून आणलेली आहे.
अहो, बरं का, तो निराळा धागा. गल्ली चुकलीय तुमची. Proud

आरारा, विकटहास्य मयेकरांनी आपल्याच पोस्ट्सवर टाकलेल्या स्मायल्या मजेशीर वाटल्या म्हणून होतं, तुम्हाला आवडलं नाही का? का? (फणकार्‍याच्या भरात लिहिलेला 'झोंबलं' शब्द बदलला. अजूनही तुमच्याशी खत्रुडपणा करू नये असंच वाटतंय म्हणून. Happy )

अर्रर्र , खरेच.
इकडे सौम्य तडाखे दिले असते तर बरे झाले असते असे आता पश्तात्तापदग्ध बोटांनी टंकावे वाटू लागले आहे Lol

तेव्हा जे लिहिलेलं ते प्रामाणिकपणे लिहिलेलं. आत्ता हे वर लिहिलं आहे तसं उत्तर कोणी लिहिलं असेल तर ते उत्तर अंधभक्ती मार्गावर आहे हे ही प्रामाणिकपणे वाटतं.
अंधभक्ती न करता प्रत्येकाने समजून उमजून, विचार करुन, एखादी गोष्ट नक्की कशी आणि का होते ते समजून आपापले निर्णय घ्यावे याला दुमत कधीच न्हवतं. पण लोकांना विचार करायचा नसतो, आणि तयार उत्तर हवं असतं. असं जर कोणी करणारच असेल (जे बघितलेल्या लोकांवरुन अनेक जण करतात) तर किमान पुरणपोळी डाएट आणि अनेकानेक पूर्वज जाज्वल्य अभिमान भक्तीपेक्षा हे लेसर एव्हिल वाटलं.
एकामागोमाग एक लेखातील मांडलेल्या विचारांवर सोडून लेखकाच्या राजकीय इ. दृष्टीकोनांवर बोट ठेवून पोस्टीआल्याने माझं तेव्हा तसं मत बनलं असावं.
बाकी खवचट गोष्टी चटकन दिसतात आणि आवडतात त्यामुळे स्मायलीमध्ये मला मजा आली. Happy

@अमितव,
तस छापून आलय. मी कालच पुस्तक विकत घेऊन आलो.
शिवाय "मोहन की मीरा" यांनी पण फायदा होतो आहे असे सांगितलेले वाचले असेलच. त्या ही आहारशैली गेली ७ महिने आचरत आहेत.

डॉ. दिक्षीतांनी डॉ. जिचकारांच्या ऑडिओवरून प्रेरणा घेतली. डॉ. जिचकार म्हणताहेत ते जेव्हा अमेरिकेत गेले होते तेव्हा अमेरिकेत हे संशोधन झालेले आहे. तेसुद्धा १९९७ च्या अगोदर. अमेरिकेत राहणार्‍या लोकांना कदाचित जास्त माहिती उपलब्ध होऊ शकेल ही.

पण डॉ. दिक्षीत व डॉ. जिचकार यांचे व्हीडीओ पाहणार कोण? असा प्रश्न आहे. आणि जास्त कॉमेंन्टस तर व्हिडीओ न पाहणार्‍यांकडून येत आहेत. त्यामुळे त्यांच्याशी चर्चा करण्यातही अर्थ नाही. असा सगळा घोळ आहे.

मी सामान्य माणूस आहे. मी व्हीडिओ ऐकला. त्याप्रमाणे वागणे शक्य कोटीतले वाटले म्हणून सुरवात केली. फायदा दिसायला लागला. म्हणून नातेवाईकांना सांगितले. त्यांनाही फायदा व्हायला लागला. मग मात्र या विषयावर तज्ञांची चर्चा सुरू व्हावी म्हणून हा धागा काढला.

थोडक्यात विषयाला तोड फोडणे एवढेच करू शकतो. ते मात्र इमाने इतबारे विरोध व शिव्या सोसून करतो आहे. Happy ते सुध्दा माझा त्यात वैयक्तिक फायदा नसताना.

माबो, ऐसी व मिपा ह्या सारख्या संकेतस्थळांमुळे आमच्या सारखी सामान्य माणसे निदान आमचे म्हणणे मांडू तरी शकत आहेत. हेही नसे थोडके.
असो.
_/\_

आता मलाही अंधभक्तीचा वास येऊ लागला आहे. स्युडो सायन्स हे भाकडश्रद्धांपेक्षा महा डेंजर असतं.
थोडं फार शिकलेल्या माणसांची संख्या प्रचंड असते, ती भाकडश्रद्धांना ओलांडतात पण स्युडो सायन्स हे त्यांना खरंच वाटतं Sad

'अश्या' विषयांवर नेहमी बुप्रावादाला अनुसरून स्टँड घेणार्‍या 'मायबोलीकरांचे' ह्या धाग्यावरील वर्तन पाहून खेदकारक आश्चर्य वाटले.
हा धागा बुप्रावादाला अपवाद का ठरला हे समजून घेण्यासाठी दोन-दोनदा सगळे प्रतिसाद वाचून बघितले.
'फुकटात' गेन ची लालूच दाखवणार्‍या चमत्कारापुढे कधीकधी सामुहिक रॅशनॅलिटीचाही 'विनासायास' लॉस होतो असे अनुमान काढावेसे वाटले.. पण मायबोलीवरचा हा एक आऊटलायर ईवेंट म्हणून अपवाद ठरावा असेही वाटते.
ज्यांच्याबद्दल नेहमीच आदर वाटत आला आहे अश्या काही आयडींकडून अचानक निराशा पदरी पडल्याबद्दलही हा धागा चांगलाच लक्षात राहिल.

आज वर आल्याने नीट वाचला लेख. मलाही तो जाहिरातबाजीपेक्षा एखाद्या गोष्टीने जेन्युइनली भारावून जावून लिहील्यासारखा वाटला, आणि त्यामुळे खटकला नाही. त्याचबरोबर पहिल्याच पानावर हेला यांची प्रतिक्रिया आहे याबाबतीत काय काळजी घ्यावी याबद्दल - ती परफेक्ट आहे. नंतरच्या प्रतिक्रिया सगळ्या अजून वाचल्या नाहीत.

पण वाक्ये व्हॉट्सअ‍ॅपी शैलीत जाउ लागली की विश्वासार्हता कमी होते. एक उदाहरणः

"मधुमेहाबद्दल डॉक्टर लोकांना चुकीचे शिकवल गेलयं.
डॉक्टर लोकांना शिकवले गेलेय की मधुमेह हा बरा होणारा आजार नाही तर तो कायम वाढत जाणारा आजार आहे....." >>>

ही अशी वाक्ये व्हॉअ‍ॅ वरून येतात आणि अनेक जण शहानिशा करता ती इण्टर्नलाइज करतात. हे वाचून असे वाटेल की डॉक्टरांना एम्बीबीएस झाल्यावर एक बाड दिले जाते आणि एखाद्या धर्मग्रंथाप्रमाणे "त्यात जे आहे तेच खरे" असे मानायची सक्ती केली जाते. कल्पना करा. दरवर्षी हजारो डॉक्टर्स तयार होता. त्या त्या वर्षातील विद्यार्थ्यांपैकी "क्रीम" मधले, या विषयाची आवड, विचार करण्याची आणि विषय ग्रास्प करण्याची क्षमता असलेले आणि समकालीन इतर अनेक क्षेत्रातील विद्यार्थ्यांपेक्षा जास्त काळ मेहनत घेण्याची तयारी असलेले जे तरूण असतात त्यातीलच सहसा यात येतात (इतर अनेक क्षेत्रातही जातात पण वैद्यक क्षेत्रात साधारण असेच लोक येतात हे इथे महत्त्वाचे).

यांना जर असे काहीतरी ब्रह्मवाक्य सांगितले, तर शिक्षणाच्या ४-६ वर्षांत, रेसिडेन्सीच्या काळात, स्वतःच्या प्रॅक्टिस मधे, इतर मेडिकल रिसर्च मधे असणारे हे लोक "असे का?" विचारून त्याचा शोध घ्यायचा काहीच प्रयत्न करत नसतील? मला खात्री आहे की एखादा रोग असाध्य आहे असे जर कॉमन नॉलेज असेल, तर वैद्यकीय क्षेत्रातील किमान अर्ध्या लोकांचा पहिला इन्स्टिन्क्ट हा असेल की यावर इलाज कसा शोधता येइल. आणि असा इलाज जर सापडला, तर तो डबल ब्लाइण्ड टेस्ट्स पासून इतर अनेक मार्गांनी असंख्य लोकांवर वापरून त्याचे साइड इफेक्ट्स, इतर आजार असलेल्या लोकांवरचे परिणाम या सगळ्याची "पुन्हा पुन्हा सिद्ध करण्याची, आणि कोणीही ते सिद्ध करण्याची" खात्री झाल्याशिवाय मेडिकल कंपन्या व या क्षेत्रातील लोक तसे जाहीर करत नाहीत.

या अशा Established process च्या rigors मधून आलेल्या लोकांपेक्षा कोणालातरी वेगळे ज्ञान आले आहे आणि अशा हजारो लोकांना जे समजले नाही ते त्यांनी या प्रोसेसेस न वापरता सिद्ध केलेले आहे - असे जर कोणी क्लेम करू लागला तर ते किमान इतक्या सहजतेने स्वीकारून स्वतःला ते लागू होते का याचा विचार न करता फॉलो करू नये. त्यामुळेच हेला यांची पहिली पोस्ट मला पटली.

अजूनही तुमच्याशी खत्रुडपणा करू नये असंच वाटतंय म्हणून. Happy
<<
मी मात्र केला, कारण जौद्या ना. सुक्याबरोबर.. वगैरे

स्वारी.

फा
Lol तसल्या वाक्यांनी माझी का सटकत असेल ते लक्षात येतंय ना.

मधुमेहाबद्दल डॉक्टर लोकांना चुकीचे शिकवल गेलयं.
डॉक्टर लोकांना शिकवले गेलेय की मधुमेह हा बरा होणारा आजार नाही तर तो कायम वाढत जाणारा आजार आहे..... >>>> मी पुन्हा वाचला लेख Lol
हे कसे काय सुटले असे वाटले होते Lol

इथे डॉ. दीक्षित चूक का बरोबर, खरं/खोटं हा वाद नाहीये ना? फक्त शाम भागवतांनी त्यांना फायदा झाला म्हणून लेख लिहिला तर इतकं काय गळा काढायचा? लोकं इथे फ्रिज, टीव्ही पासून प्रत्येक गोष्ट discuss करतात. Weight लॉस चे पण वेगवेगळे उपाय चघळले जातात, तसाच हा पण एक!

गोलपोस्ट शिफ्ट करायचा प्रयत्न चांगला आहे राजसी.
**
किरण्या, माझा पहिला प्रतिसाद त्याच वाक्याला आहे. इतकं डोळ्यात तेल घालून माझ्यापाठी लागतोस अन डोक्यात राख घालतोस, तेव्हा हे इतकंच मुद्दाम कसं काय सुटलं? Lol

Pages