फुकटात विनासायास वेटलॉस

Submitted by शाम भागवत on 3 July, 2018 - 03:17

वाढलेला पोटाचा घेर व वाढलेले वजन, सोबतीला कोलेस्टेरॉल सापडल्यामुळे नशिबी आलेल्या गोळ्या आणि आता या आयुष्यभर घ्यावयाच्या आहेत अस डॉ. नि सांगितल्यावर मनाला बसलेला हबका. काही जणांचा वाढलेला रक्तदाब व त्यावरच्या गोळ्या , मधुमेह पूर्व स्थिती लक्षात आल्यावर उडालेली घाबरगुंडी तर मधुमेह झाल्याचे निदान झाल्यावर घरातल्या सर्वांच्या चेहऱ्यावर अवतरलेली काळजी. आणि या सगळ्यातून हे खा व हे खाऊ नका ची भली मोठी यादी. शिवाय गुडगेदुखी, ऍसिडिटी , .. , .., .. असच बरच काही यांच्यासाठी हे लिहितोय.

ह्या सगळ्या त्रासातून कस मुक्त व्हायच?, एक पैसा जास्त खर्च न करता हे कस साधायच? श्रीमंत असो की गरीब दोघांनाही जमू शकेल,तसेच स्त्री पुरूषात अजिबात भेदभाव न करता दोघांनाही एकच पद्धत कशी वापरता येईल, तसेच त्यामागे विज्ञानाचा भक्कम पाठिंबा असला पाहिजे. वगैरे वगैरे .......
थोडक्यात आखूड शिंगी, बहुदुधी, गरीब, दूध काढताना लाथा न मारणाऱ्या बहुगुणी गायीबद्दल हे लिहितोय.

कै. डॉ.श्रीकांत जिचकार एक अवलिया माणूस. एमबीबीएस, एमडी झाल्यावर आयपीएस त्यानंतर चक्क आयएएस. पण चारच महिन्यात नोकरीचा राजीनामा देऊन आमदार, मग मंत्री, राज्यसभेचे खासदार. या माणसाने प्रगती तरी किती वेगाने करावी? पण हे सगळं ४९ वर्षांच्या आयुष्यात साधायच म्हणजे एवढा वेग हवाच की हो!

घरातल्या ग्रंथालयात बावन्न हजार पुस्तक. विद्वत्ता दाखविण्यासाठी जाहिरात म्हणून नक्कीच जमवलेली नसणार. उलट सगळी वाचलेली असण्याची शक्यता जास्त. कारण ४२ विद्यापीठातून मिळवलेल्या २० पदव्या. बहुतेक सगळ्या प्रथम श्रेणीतून मिळालेल्या. २८ सुवर्णपदक मिळवलेला माणूस हा. नक्कीच पुस्तके वाचलेली असणार.

तर असा हा माणूस. भरपूर परदेश वाऱ्या केलेला असूनही त्याची भारताशी जुळलेली नाळ तुटली नव्हती. साधारण अशी माणसे थोडीशी भारतीय संस्कृतीशी फटकून वागतात. पण इथेही आपल्याला आश्चर्याचा धक्का बसतो. भारतीय संस्कृती व प्राचीन इतिहास, तत्त्वज्ञान व संस्कृत यात एमए केलेय. हे मी आपल वानगीदाखल सांगतोय कारण तस पाहिल तर त्यांनी १० विषयात एमए केलेय. इतकच काय मानाची डी. लिट. पदवी मिळालीय त्यांना संस्कृतामध्ये.

तर सांगायच म्हणजे अशा माणसाने १९९७ साली एक नवीन विचार भारताला दिला. त्यावेळी ते राज्यसभेचे सभासद होते. पुणे महानगर पालिकेत मा. शशिकांत सुतार नावाच एक मोठ्ठ प्रस्थ होत. त्यांनी बालगंधर्व रंगमंदिरात जिचकारांना भाषणासाठी बोलावल. त्यासाठी सगळी व्यवस्था जातीने केली. आपोआपच बरेच मान्यवरांनी रंगमंदिर भरून गेल.

त्यांनी सांगितल की, "शरीरात तयार होणारे अतिरिक्त इन्शूलीन बऱ्याच रोगांचे कारण आहे." स्थूलता, त्यातून मधुमेह, वाढलेला रक्तदाब, त्यातून मग अंजोग्राफीची तपासणी, त्यात नक्की काहीतरी सापडतच. मग अंजोप्लास्टी. सगळाच प्रकार खर्चिक. पण मरणाची भीती वाटायला लागली की माणूस करतो खर्च. त्याला वाटतं की झाल सगळ करून. आता काही आपल्याला होणार नाही. पण कसच काय. पाच सहा वर्षात आणखी खर्चिक बायपाससाठी हॉस्पिटलची वारी ठरलेली.

मग यावर सोपा उपाय काय? दिवसातून फक्त दोनदाच जेवा. काहीही खा. भूक भागेपर्यंत कितीही खा. तूप लोणी बिनधास्त खा. मांसाहारही चालेल. फक्त हे जेवण ५५ मिनिटांत संपवले पाहिजे. आणि दिवसातून ४५ मिनिटे भरभर चालण्याचा व्यायाम केला पाहिजे. महागड्या जिम नको की, आहारतज्ञांना पैसे द्यायला नको. दवाखान्याची पायरी चढायची कधी वेळही येणार नाही. किती सोपे आहे ना? पण अवघड बाब पुढे आहे. ते पुढे सांगतात की, "दोन जेवणामध्ये काहीही खाऊ नका." याकाळात तोंड उघडायचे ते फक्त बोलण्यासाठी किंवा पाणी पिण्यासाठी. बस्स. औषधांच्या याद्या विसरून जा. हे खा व हे खाऊ नका याची प्रत्येक डॉक्टर व आहारतज्ञांप्रमाणे बदलणारी यादी व त्यातून उडणारे गोंधळ संपवून टाका.

सगळ वैज्ञानिक नियमावर आधारलेले भाषण. समोर अनेक मान्यवर बसलेले. त्यामुळे बऱ्याच वेळेस अशी भाषणे इंग्रजीत चालतात आणि जिचकार तर इंग्लिश लिटरेचर मध्येपण एमए केलेले. पण तरीही हा विचार सर्वसामान्य माणसाला कळला पाहिजे यासाठी हे भाषण त्यांनी मराठीतून दिले आहे. समोर नुसते मान्यवर नाही तर पुण्याचे मान्यवर बसणार आहेत म्हणून त्यांनी अनेक इंग्रजी संज्ञांना पूरक मराठी संज्ञा शोधून काढल्या होत्या व त्या संज्ञा पाठ करून मगच ते व्याख्यान द्यायला आले होते. (या मराठीतील संज्ञा शोधणे व पाठ करणे हे कामही त्यांना सोपेच गेलेले असणार. कारण ते महाराष्ट्राच्या विश्वकोश निर्मिती मंडळाचे सभासद होते!!!) एखाद्या माणसाला बेंबीच्या देठापासून कळकळ असते म्हणजे काय हे समजून घ्यायचे असेल तर त्यासाठीही हे व्याख्यान ऐकायला हरकत नाही.

आपल्या या कार्याचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी "नागपूर फिटनेस मुव्हमेंट" आणि "पुणे फिटनेस मुव्हमेंट" अशा दोन संस्था सुरू केल्या. पण त्या काळात फेसबुक किंवा व्हॉटऍपस वगैरे काहीच नव्हत. नाहीतर याचा प्रसार फार वेगाने झाला असता. मनोगत, मायबोली किंवा मिसळपाव सारखा एखादा संकेतस्थळ तयार करता अल्लाही असत कदाचित. पण वाचणार कोण? इंटरनेट फार महाग होत त्यावेळेस. टाटा कंपनीच्या व्हीसएनएल ला वर्षाकाठी पाच सहा हजार भरल्यावर कनेक्शन मिळायच. शिवाय घरात फोन असला पाहिजे ही पूर्वअट. आणि नेट वापराला सुरवात झाली की दर मिनिटाला एक टेलीफोनचा कॉल एवढे पैसे टेलिफोनच्या बिलात यायचे तो खर्च वेगळाच. नेट वापरणे हे सामान्यांच्या कुवती बाहेरची गोष्ट होती. अपवाद फक्त आयटी मधल्या लोकांचा!

तरीपण राज्यसभेच्या सदस्याला बऱ्याच सोयी सुविधा असतात. ओळख पाळख असते. त्यामुळे प्रसाराचे काम चालू होते. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते. दोनच वर्षांनी म्हणजे १९९९ साली झालेल्या लोकसभेच्या निवडणूकीसाठी काँग्रेसकडून त्यांना तिकिट मिळाल पण फक्त ३०००+ मतांनी पडले. इतकेच नव्हे तर राज्यातले आणि त्याचबरोबर केंद्रातले काँग्रेसचे सरकार पडले. प्रसारावर फारच मर्यादा आल्या.सर्वात मोठे दुर्दैव म्हणजे २००४ साली जेव्हा कॉग्रेसचे सरकार राज्यात व केंद्रात आले त्यानंतर दोनच आठवड्यात त्यांचा अपघाती मृत्यू झाला. मला वाटते या नवीन विचारांचे फक्त बी लावायचे काम नियतीने त्यांच्यावर सोपवले होते.

त्यांचा या भाषणाचा एक ऑडिओ यूट्यूबवर होता. पण दोन तास तीन मिनिटांचा ऑडिओ म्हटल्यावर बरेच जण तो उघडून सुद्धा बघत नसत. आणि यदाकदाचित कोणी उघडलाच तर बरेच जण पहिले प्रास्ताविक संपेपर्यंतही कळ काढू शकत नसत. त्यामुळे मूळ भाषण सुरू होण्याआधीच तो बंद केला जायचा. एवढा वेळ असल काही ऐकायला तो थोडाच वपू किंवा पुल चा व्हिडिओ होता की व्यायाम/प्रवास करताना ऐकायचा गाण्याचा अल्बम होता? ही राजकारणी लोक ही अशीच. समोर माइक आला की यांना वेळेच भानच राहत नाही. अशी कॉमेंटपण कोणीतरी केली असेल असा मला दाट संशय आहे.

बरीच वर्षे निघून गेली. जिचकारांनी लावलेले बी रूजण्यासाठी अनुकूलतेची वाट पाहत युट्युबवर पडून होत. ही अनुकुलता लाभणे फार अवघड होत. त्याला वेळ लागणार हे त्या बियाणाला माहीत होत. आणि सहा वर्षापूर्वी ते एकाच्या हृदयात रूजल. हा माणूस एमबीबीएस, एमडी होता. पण रोग पाहून औषध देणारा नव्हता. तर रोग होऊच नये यासाठी काय करता येईल यातला तज्ञ होता. प्रामाणिक होता. पैशासाठी काम करणारा नव्हता. समाजाच्या भल्यासाठी काम करण्याची इच्छा असणारा असा होता. मुख्य म्हणजे माहिती वाचून चर्चा करणारा नव्हता तर त्यासाठी स्वतःवर प्रयोग करायला तयार असणारा व त्यासाठी स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करायला तयार असणारा होता. नियतीने अगदी अचूकरीत्या लातूरच्या डॉ. जगन्नाथ दीक्षित यांची निवड केली होती.

डॉ. दीक्षित सध्या ते लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विभाग प्रमुख आहेत व गेली सत्तावीस वर्षे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अध्यापन करत आहेत. "स्थूलत्व निवारण आणि मधुमेह प्रतिबंध" या विषयावर त्यांनी संशोधन केले.यात त्यांनी प्रथम स्वतःवर प्रयोग केले. नातेवाइकांवर प्रयोग केले. जवळच्या मित्रांवर प्रयोग केले. या सगळ्याच्या व्यवस्थित नोंदी ठेवल्या. मग मात्र त्यांनी लातूर व औरंगाबाद येथील हजारो लोकांवर प्रयोग केले. वैज्ञानिक नियतकालिकात प्रबंध लिहिण्यासाठी या प्रयोगाचे योग्य दस्तावेजीकरण केले व अनेक प्रबंध प्रकाशीतही केलेले आहेत.

पण प्रसारासाठी नुसते प्रबंध लिहून भागत नाही यासाठी त्यांनी व्याख्याने द्यायला सुरवात केली. पुण्याच्याच बालगंधर्व रंगमंदिरात कै. डॉ. श्रीकांत जिचकारांच्या स्मृतीला अभिवादन करून सुरवात झालेले त्यांचे व्याख्यान ऐकण्यासाठी खाली लिंक देत आहे. हेही व्याख्यान खूप मोठे आहे. पहिले प्रास्ताविक ३० मिनिटे चालते. त्यामुळे व्याख्यानासाठी आतुर झालेले बरेच जण कंटाळून पहिल्या काही मिनिटांनंतर व्याख्यान बंद करून टाकतात. हे प्रास्ताविक पाहू नये म्हणून मी हे सांगत नाहीये. तर थोडा धीर धरावा असे सुचवत आहे. या प्रास्ताविकातूनही तुम्हाला काही मुद्दे मिळू शकतात.

२०० च्या वर व्हॉटऍपस ग्रुप स्थापन करून व फेसबुकच्या माध्यमातून ही चळवळ अठ्ठावीस हजार माणसांपर्यंत पोहोचली आहे. अनेक देशातील माणसे यात आहेत. पण हे सगळे सांभाळणे आता अवघड होत चाललेय. कार्यकर्त्या डॉक्टरांना यासाठी वेळ देणे अवघड होत चाललेय. यासाठी आता एक वेबसाईटच उघडायचे प्रयत्न चालू आहेत. तस झाल की एकाच ठिकाणी सगळी माहिती एकत्रित होईल. वेळ वाचेल. एक कोटी लोकांपर्यंत लोकांपर्यंत पोहोचायचे उद्दिष्ट समोर ठेवून आता काम सुरू होणार आहे.

खर म्हणजे ह्या व्याख्यानाचा सारांश देण्याचा माझा विचार होता. पण मी मुद्दामहून तस करत नाहीये. कारण तस केले तर लोक मूल व्याख्यान न ऐकताच चर्चा करायला सुरवात करतात. हे व्याख्यान ऐकल्यावर फारशा शंका उरत नाहीत. शिवाय त्यांनी काही फोन नंबरही दिलेले आहेत. त्यावर तुम्ही व्हॉटऍपवर प्रश्न किंवा शंका विचारू शकता.

डॉ. दीक्षित यांच्या व्याख्यानाची लिंक खाली देत आहे. दोन तास सलग वेळ काढता येईल अशी वेळ निवडून निवांतपणे पहा.
https://www.youtube.com/watch?v=edKaI5gxaNQ

ही डॉ. दीक्षित यांची फेसबुक पेजची लिंक आहे. त्यात लाभार्थींची नावे, अनुभव व मोबाईल नंबर दिले आहेत.हे तुम्ही केव्हाही पाहू शकता! https://www.facebook.com/weightlosseffortlessly/

डॉ. जिचकार यांनी याच व्याख्यानात बी पेरण्याचे काम केले. हा ऑडिओ आहे. दोन तास सलग वेळ काढता येईल अशी वेळ निवडून निवांतपणे पहा.
https://www.youtube.com/watch?v=8-kw3hGUwW4

मी स्वतः या विषयातला तज्ञ नाही. पण या संकेतस्थळावर या विषयातले बरेच तज्ञ असल्याने साधक बाधक चर्चा होऊन हा विषय आणखी स्पष्ट होईल याहेतूने हे लेखन केले आहे.

एक महत्त्वाची सूचना :
ज्यांना मधुमेह आहे अशांनी HbA1c आणि fasting insuline या दोन तपासण्या करून त्याचे अहवाल डॉ. दीक्षित यांना पाठवावेत. या दोन तपासण्या म्हणजे रक्तातल्या शर्करेचे प्रमाण दाखवणाऱ्या तपासण्या नव्हेत. त्यानंतर त्यांच्याच सल्ल्यानेच पुढील आहारयोजना सुरू करावी. परस्पर आहारयोजना सुरु करू नये.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

अगदी IF सारखी आहे असं वाटलं नाही. आय एफ मध्ये ६,७ तासांच्या विंडोमध्ये तुम्ही २,३ वेळा खाऊ शकता. इथे फक्त २ मील्स घेणं अपेक्षित आहे.

हुश्श,
कोणीतरी माझ्या जुन्या पोस्टची दखल घ्यायचा विचार करतोय हेही नसे थोडके

@हायझेनबर्ग
माझी 4 July, 2018 - 20:14 ची माझी पोस्ट पहा.आपल्या उत्तराच्या अपेक्षेत

सायो +१
इन्टरमिटन्ट फास्टिंग हे दिवसातले १५-१६ तास किंवा आठवड्यातले दोन दिवस न खाणं अशा दोन प्रकारचं वाचलेलं आहे. पण त्या कालावधीव्यतिरिक्त कधी/किती वेळा खावं याबद्दलचे काही नियम (गाइडलाइन्स म्हणू) माझ्यातरी वाचनात आलेले नाहीत.

दिक्षितांचं डायेट ही त्यापुढची पायरी वाटते मला. इन्सुलिन सिक्रीशनची ५५ मिनिटांची खिडकी माझ्यासाठी नवीन माहिती होती. मी (दिवसात पंधरा तास न खाणं या प्रकारचं) IF करते आहे, मला दिक्षित डायेट अवघड वाटतं, पण दोन नाही तरी तीन विन्डोजमध्ये बहुधा मी आहार बसवू शकेन.

मला हा धागा म्हणजे जाहिरात वाटली नाही. इथे आक्षेप घेणारे का घेताहेत हे कळलं नाही आणि शाम भागवततरी प्रत्येक पोस्टवर न-प्रतिसाद (नुसतीच स्मायली किंवा 'अहो जाऊ दे' वगैरे अजिबात मुद्द्दा नसलेलं काहीतरी) का देत आहेत हेही लक्षात आलेलं नाही.

सायो +१, तसेच हयात कमितकमी वेळा इन्सुलीन सीक्रिट करण्यावर फोकस आहे.
मलातरी लेख जाहिरातबाजी नाही वाटला. एखाद्या सामान्य माणसाने भारावून जाऊन एखादी चांगली गोष्ट शेर करावी असा वाटला.

शाम भागवततरी प्रत्येक पोस्टवर न-प्रतिसाद (नुसतीच स्मायली किंवा 'अहो जाऊ दे' वगैरे अजिबात मुद्द्दा नसलेलं काहीतरी) का देत आहेत हेही लक्षात आलेलं नाही.

@ स्वाती_आंबोळे
जर मला कोणी आपणहून उत्तर देत असेल तर (अगदी निर्लज्ज म्हणत असेल तरीही!!!) मी फक्त स्मायली टाकून पोहोचपावती देतो.

वाद वाढायची शक्यता वाटल्यास, धागा भरकटू नये म्हणून "त्यातला जो समंजस असेल असे मला वाटते, त्याला, अहो जाऊ दे" वगैरे लिहून वाद वाढू नये म्हणून प्रयत्न करतो.
असो.
आपल्याला त्याचा त्रास झाला असेल तर क्षमस्व.
_/\_

नाही हो, त्रास कसला? त्याने काही व्हॅल्यू अ‍ॅडिशन होत नाही इतकंच वाटलं मला. तुम्ही लेखात तुमच्याकडील माहिती शेअर केलीच आहे, बहुधा त्यात अ‍ॅड करण्यासारखं तुमच्याकडेही काही नाही. त्यामुळे आता खवचट प्रतिसादांकडे तुम्ही खुशाल दुर्लक्ष करू शकता असं आपलं मला वाटलं. बाकी तुमची मर्जी.

त्या पोस्ट मध्ये डॉ. जिचकार आणि डॉ. दिक्षित ऊवाच ह्या पलिकडे काहीही नाही.
खाल्यानंतर ईन्शूलिन लेवल वाढ्ते जी चरबी ऐवजी एनर्जीसाठी शरीरातले ग्लूकोज वापरून चरबी कमी होण्याला अटकाव करते. हे जुने पुराने ज्ञान तुम्ही क्रांतिकारी शोध म्हणून सांगत आहात. ब्लड- ग्लूकोज टेस्ट साठी रात्रभर ऊपवास करून या असे जगातले सगळीकडे डॉक्टर्स 'य' वर्षांपासून पेशंट्सना सांगत आले आहेत त्यात क्रांतिकारी काय आहे?

दिक्षितांची आहारपद्धती आय एफ नाही ह्याची सायंटिफिक माहिती द्या म्हंटले तर तुम्ही स्वतःच लिहिलेले डॉ. दिक्षित ऊवाच म्हणून सांगता आहात. Lol
डॉक्टर दिक्षितांनी लिहिलेले वाचण्याची ईच्छा आहे. ते जर सायंटिफिक कम्युनिटीला कीचकट भाषेत ऊद्देशून लिहिलेले असले तरी चालेल. तुम्ही असे काही ऊपलब्धं करून देऊ शकता का? दिक्षितांची पद्धती आय एफ पासून वेगळी कशी हे समजून घेण्याचा प्रयत्न करणार्‍या माझ्यासारख्या ईतरांना फायदाच होईल.

त्यामुळे आता खवचट प्रतिसादांकडे तुम्ही खुशाल दुर्लक्ष करू शकता असं आपलं मला वाटलं. बाकी तुमची मर्जी.

अहो, ते मी करणारच होतोच. पण त्या पूर्वी १०-१५ वर्षे झालेली जुनी जाणती माणसे या धाग्यावर येण्याची वाट बघत होतो. तुम्ही तशा ५ व्या आहात!! त्यामुळे मी आता थांबत आहे. Happy

सर्वांना नमस्कार. सर्वांना शुभेच्छा.
_/\_

स्वाती,
पडलेल्या प्रश्नांचे थेट लेखकाकडून निराकरण करण्याचा मी माझ्या परीने वेळ आणि शक्ती खर्च करून प्रयत्न करतो आहे ह्यात तुम्हाला वारंवार आपत्ती का यावी हे कळत नाहीये.

अहो, ते मी करणारच होतोच. पण त्या पूर्वी १०-१५ वर्षे झालेली जुनी जाणती माणसे या धाग्यावर येण्याची वाट बघत होतो. तुम्ही तशा ५ व्या आहात!! त्यामुळे मी आता थांबत आहे. Happy >> अहो मग थेट, १०-१५ वर्षे झालेल्या जुन्या जाणत्या माणसांच्या विपूतच लेख लिहायचा ना.

>>>
स्वाती,
पडलेल्या प्रश्नांचे थेट लेखकाकडून निराकरण करण्याचा मी माझ्या परीने वेळ आणि शक्ती खर्च करून प्रयत्न करतो आहे ह्यात तुम्हाला वारंवार आपत्ती का यावी हे कळत नाहीये.
<<<

का येऊ नये हे मलाही कळत नाहीये. Lol
मी माझी शक्ती आणि वेळ खर्च करून तुझ्या मुद्द्यावर मत मांडलं आहे. जाहीर चर्चाप्रस्तावावर ते का मांडू नये याचं एकतरी कारण मला दे, नाहीतर तुझी चर्चा तू भागवतांच्या विचारपुशीत हलव.

निराकरण महत्त्वाचं आहे की दुसरंच काही?

ओके, मग माझ्या प्रतिसादातून नेमकी काय आपत्ती वाटते आहे ते सांगितलेत तर मलाही कळेल.

Submitted by स्वाती_आंबोळे on 22 August, 2018 - 14:15 >> ह्या प्रतिसादाबद्दल बोलत नाहीये.. तो नक्कीच तुमचा मुद्दा झाला.
पण 'खवचट' असं लेबल लावणं आणि लेखकाला परस्पर ह्या प्रतिसादांकडे दुर्लक्ष करा ह्याला मत मांडणं कसं म्हणतात?

हाब, तुझ्या एकातरी पोस्टवर भागवतांनी 'न-प्रतिसाद' दिला आहे का अजून? मी हा धागा सुरू झाल्यापासून वारंवार त्यांना तेच ते टोकणारे तेच ते आयडीज आणि त्यावरचे त्यांचे तेच ते 'न-प्रतिसाद' या अनप्रॉडक्टिव्ह आणि कंटाळवाण्या चक्राबद्दल बोलले आहे ते.

इन्टरमिटन्ट फास्टिंगबद्दल तू जो प्रश्न उपस्थित केलास त्याबद्दलची मला असलेली माहिती मी शेअर केली.
बाकी तुझ्या पोस्टमधले आक्षेप मला कळलेलेच नाहीत, तेव्हा त्याबद्दल काय टिप्पणी करणार?
तुला हा आयएफचाच प्रकार वाटतो, ओके - येस, त्याचीच पुढची पायरी वाटते असं मीही म्हटलंय.
तुला 'खवचट' लेबल करण्यातच मला रस असता तर आयएफबद्दल मी जे (माझी शक्ती आणि वेळ खर्च करून) लिहिलं तेही लिहिलं नसतं!

हाब, तुझ्या एकातरी पोस्टवर भागवतांनी 'न-प्रतिसाद' दिला आहे का अजून? >> न सोडा साधे ऊत्तरादाखलही प्रतिसादही नाहीयेत? माझ्या किंवा ईतरांच्या प्रश्नांवर सुद्धा. त्यांची भुमिकाही स्प्ष्टं करत नाहीयेत? कायम अडचणीत आणणार्‍या प्रश्नांना बगल देत आहेत हे तुम्ही बघितलेच नाही का?

मी हा धागा सुरू झाल्यापासून वारंवार त्यांना तेच ते टोकणारे तेच ते आयडीज आणि त्यावरचे त्यांचे तेच ते 'न-प्रतिसाद' या अनप्रॉडक्टिव्ह आणि कंटाळवाण्या चक्राबद्दल बोलले आहे ते. >> सईच्या सेम विषयाच्या धाग्यावर हे 'न-प्रतिसाद' न येता भागवतांच्या धाग्यावरच का येत आहेत? कारण अगदी पहिल्या पानापासून ही जाहिरातबाजी आहे हे माझ्यासह अनेकांना वाटत आहे आणि म्हणून ते भागवतांना प्रश्न विचारत आहेत. माझा तरी दिक्षित व भागवत ह्यांच्याशी पूर्वपरिचय नाही त्यामुळे मी मुद्दाम खुसपट वगैरे काढण्यासाठी काही लिहित नाही, ईथेच नाही आणि कुठेच नाही. भागव्तांचा दिक्षितांच्या आहारपद्धतीशी ओळ्ख करून देण्यापलिकडे काहीच हेतू नाही असे म्हणायचे आहे का?

तुला हा आयएफचाच प्रकार वाटतो, ओके - येस, त्याचीच पुढची पायरी वाटते असं मीही म्हटलंय.>>
आय एफला वैज्ञानिक आधार आहे.. तो आधार घेऊन दिक्षितांची फाईन ट्यून्ड आहारपद्धतीही त्याच आधारावर अवलंबून असेल जे खरंच चांगले आहे. >>> मीही माझ्या आधीच्या प्रतिसादात तेच लिहिले आहे.
मी दिक्षित पद्धतीला अजूनतरी काहीही म्हणालो नाही.

तुमची 'खवचट प्रतिसाद' आणि 'दुर्लक्ष करा' अशी पोस्ट आली तेव्हा फक्त माझेच तुमच्या मते 'न-प्रतिसाद' धाग्यावर येत होते. आधी 'ऊत्तराची अपेक्षा' म्हणणारे भागवत तुमच्या प्रतिसादानंतर नमस्कार शुभेच्छा वगैरे करून आता प्रतिसाद देण्याचे थांबतो म्हणून गेले.

>>>
त्यांची भुमिकाही स्प्ष्टं करत नाहीयेत? कायम अडचणीत आणणार्‍या प्रश्नांना बगल देत आहेत हे तुम्ही बघितलेच नाही का?
...
कारण अगदी पहिल्या पानापासून ही जाहिरातबाजी आहे हे माझ्यासह अनेकांना वाटत आहे आणि म्हणून ते भागवतांना प्रश्न विचारत आहेत
<<<

आणि पुन:पुन्हा तेच ते प्रश्न विचारून किंवा तीच ती मल्लीनाथी करून काय साध्य होतं आहे? त्यांच्याकडे जी उत्तरं नाहीतच ती ते कशी देणार आहेत?

'मला हे पटत नाही, मला ही जाहिरातबाजी वाटते' इतकं लिहून जो विषय संपतो, त्याचं इतकं दळण का सुरू आहे?
तुम्हाला जाहिरात वाटते, मायबोली अ‍ॅडमिनकडे तक्रार करा. (त्यांना ती जाहिरात वाटली तर ते किती तातडीने कारवाई करतात याचा मला प्रत्यक्ष अनुभव आहे.)

>>तुम्हाला जाहिरात वाटते, मायबोली अ‍ॅडमिनकडे तक्रार करा.>> वेमा जनरली स्वतःच येऊन जाहिरातींकरता मायबोलीच्या जाहिरात भागाची सोय वापरा हे सांगतात. जर ते इथे डोकावले असतील तर त्यांना जाहिरात वाटत नसावी हा बीबी.
आणि जाहिरातबाजी आहे असं समजून चाललो तरी बरं मग?
बाकी ज्यांच्या प्रतिसादांवर ते पिवळ्या टिकल्या लावतायत ते का हे लक्षात आलेलं आहे आणि ते योग्यच वाटतंय. (ह्यापलिकडे दुर्लक्ष बेस्ट).

आणि पुन:पुन्हा तेच ते प्रश्न विचारून किंवा तीच ती मल्लीनाथी करून काय साध्य होतं आहे? त्यांच्याकडे जी उत्तरं नाहीतच ती ते कशी देणार आहेत?>> पुन्हा पुन्हा तेच विचारणं आणि त्यांनी ते न सांगणं हे त्यांच्या हेतूवर पुन्हा पुन्हा प्रश्नचिन्हं ऊभं करत नाही का? पुढे वाचणारा ह्या पुन्हा पुन्हा येणार्‍या प्रश्नचिन्हांनी सजग होतो असे मला तरी वाटते.
समजा पुन्हा पुन्हा विचारल्याने भागवतांनी दिक्षितांचे रिसर्च पेपर ऊपलब्धं करून दिले त्याने सगळ्यांचाच फायदा होणार नाही का?

'मला हे पटत नाही, मला ही जाहिरातबाजी वाटते' इतकं लिहून जो विषय संपतो, त्याचं इतकं दळण का सुरू आहे?
तुम्हाला जाहिरात वाटते, मायबोली अ‍ॅडमिनकडे तक्रार करा. (त्यांना ती जाहिरात वाटली तर ते किती तातडीने कारवाई करतात याचा मला प्रत्यक्ष अनुभव आहे.)>> कुठल्या धाग्यावर दळण नसते? जे तुम्हाला ईथे दळण वाटते ते मला प्रत्येक धाग्यावर वाटते आणि मी तिकडे फिरकतही नाही. आणि तिथे जाऊन 'हे दळण पुरे झाले' सुद्धा म्हणत नाही. जे माझ्यासाठी दळण आहे तिथे कोणीतरी पोटतिडकीने लिहित असते आणि त्याच्यासाठी आणि वाचणार्‍यांसाठी काय पुरे आहे हे मी कसा ठरवणार?
राहता राहिला तक्रारीचा प्रश्न तर मला अजूनही वाटतं भागवत विचारलेल्या प्रश्नांना ऊत्तरं देतील आणि चर्चा पुढे सरकेल ते म्हणालेही होते 'ऊत्तराच्या प्रतिक्षेत'

>>> जे तुम्हाला ईथे दळण वाटते ते मला प्रत्येक धाग्यावर वाटते आणि मी तिकडे फिरकतही नाही. आणि तिथे जाऊन 'हे दळण पुरे झाले' सुद्धा म्हणत नाही
म्हणून तसं कोणीच कुठेच म्हणू नये, बरोबर?

>>> आणि त्यांनी ते न सांगणं हे त्यांच्या हेतूवर पुन्हा पुन्हा प्रश्नचिन्हं ऊभं करत नाही का?
नाही, ते त्यांच्या या विषयाबाबतच्या ज्ञानावर प्रश्नचिन्ह उभं करतं. But wait, ते तज्ज्ञ नाहीत असं ते स्वतःच म्हणाले, नव्हे का?

>>> समजा पुन्हा पुन्हा विचारल्याने भागवतांनी दिक्षितांचे रिसर्च पेपर ऊपलब्धं करून दिले
>>> राहता राहिला तक्रारीचा प्रश्न तर मला अजूनही वाटतं भागवत विचारलेल्या प्रश्नांना ऊत्तरं देतील आणि चर्चा पुढे सरकेल ते म्हणालेही होते 'ऊत्तराच्या प्रतिक्षेत'
विचारलेले प्रश्न म्हणजे:
१. ही जाहिरात आहे हे मान्य करा
२. जाहिरात असल्यामुळे हे आयएफ कसं नाहीच (तुमचंच 'प्रॉडक्ट' कसं आहे) हे सप्रमाण सिद्ध करा
३. जाहिरात असल्यामुळे रीसर्च पेपर दाखवा
बरोबर?
मग चालू दे, आनंद आहे!

बरं हाब, आपण तुला जे वाटतंय तेच बरोबर आहे असं समजू. भागवतांचा इथे लिहिण्यामागे काय उद्देश असावा हे सांगतोस का?

म्हणून तसं कोणीच कुठेच म्हणू नये, बरोबर? >> म्हणा किंवा नका म्हणू ते मी कसे सांगणार? माझ्यापुरते मी काय करतो ते सांगितले.
अ‍ॅक्शनला रिअ‍ॅक्शन येते ईनअ‍ॅक्शनला नाही, निदान मायबोलीवर तरी.
तुम्ही खवचट प्रतिसादांकडे दुर्लक्ष करा म्हणालात पण त्याही आधी तुम्हाला खवचट वाटणार्‍या प्रतिसादांकडे दुर्लक्ष करणं शक्य आहे ना. असे दुर्लक्ष करणं काही कारणाने आपल्याला शक्य नसेल तर तसंच प्रश्न न विचारता भागवतांच्या धाग्याकडे दुर्लक्ष करणं काही कारणाने मला शक्य होत नसेल हे लॉजिकल नाही का?

नाही, ते त्यांच्या या विषयाबाबतच्या ज्ञानावर प्रश्नचिन्ह उभं करतं. But wait, ते तज्ज्ञ नाहीत असं ते स्वतःच म्हणाले, नव्हे का? >> तुम्ही धागा पुन्हा बघाच ... 'हे असे आहे पण मी तज्ञ नाही' असे ते अनेक वेळा म्हणाले 'असे कसे? प्रश्न विचारल्यावर 'दिक्षित म्हणाले' असं सांगतात. मग दिक्षितांचेच रिसर्च पेपर द्या म्हणालो की स्मायली टाकतात. मला ईंट्रेस्ट आहे माहिती मिळवण्यात म्हणून मी पाठपुरावा करतो आहे. त्यांनी दिलेल्या माहितीवर विश्वास ठेऊन कोणाला डाएट सुरू करायचा असेल.. करो बुवा. माहिती द्या म्हणणं, क्रॉस क्वेश्चन आणि काऊंटर अर्ग्यूमेंट करणं ह्यात वाव्वगं मला तरी दिसत नाही.

जवळच्या मित्रांवर प्रयोग केले. या सगळ्याच्या व्यवस्थित नोंदी ठेवल्या. मग मात्र त्यांनी लातूर व औरंगाबाद येथील हजारो लोकांवर प्रयोग केले. वैज्ञानिक नियतकालिकात प्रबंध लिहिण्यासाठी या प्रयोगाचे योग्य दस्तावेजीकरण केले व अनेक प्रबंध प्रकाशीतही केलेले आहेत. रिसर्च पेपर ऊपलब्धं करून देता येतील का? हा प्र्शन लेखातल्या त्यांनीच लिहिलेल्या मुद्द्य्याला धरून नाहीये का?

विचारलेले प्रश्न म्हणजे: >> नाही. माझ्या आधीच्या लांब पोष्टीत आहेत प्रश्न.
'जाहिरात आहे, माहिती नाही' असे म्हंटले तर दुर्लक्ष करणं सोपं जाईल.

मग चालू दे, आनंद आहे!>> फिरून पुन्हा तिथेच आलो, जे टाळता आले असते.

भागवतांचा इथे लिहिण्यामागे काय उद्देश असावा हे सांगतोस का? >> हेच मी भागवतांना शंभर पोष्टींआधी विचारले होते.

म्हणजे तुलाही लक्षात आलेला नाहीच त्यांचा इथे लिहिण्यामागचा उद्देश? Uhoh मला वाटलं तुला कळलाय पण त्यांच्याकडून वदवून घ्यायचं आहे.
मायबोलीवर दिक्षीतांचा रिसर्च पेपर वाचण्यात किती जणांना इंटरेस्ट असावा? (मी चुळबुळत ६ मिनिटांचा व्हिडीओ तो ही हिंदी पार्ट पुढे ढकलत बघितला) आणि तुला स्वतःला खरंच असेल तर त्यांनाच डायरेक्ट विचारणं योग्य ना? इकडे विचारुन पाहिलंस. जर काम होणार नाही हे दिसत असेल तर खरंच जाणून घेण्यात इंटरेस्ट असलेली व्यक्ती निष्कारण वेळ वाया न घालवता दुसरे उपाय शोधेल ना?

हायझेनबर्ग, जनरली तुमच्या कमेंट्स आवडतात. मात्र इथल्या अगदीच खटकत आहेत.
हा धागा जाहिरतीचा वाटला तरी काय बिघडते? मी पण करणार आहे जाहिरात दीक्षितांच्या पद्धतीची. त्यांचा युट्युबवरील भाषणाचा (बालगंधर्वला झालेल्या भाषणाचा) व्हिडीओ पाहिल्यानंतर मी त्यांनी लिहीलेले रिसर्च पेपर्स शोधले आहेत. (भाषणातच शेवटी दिले होते नाव) दोन तरी होते असे आठवते आहे. आत्ताही एक सापडला झटकन तो देते: http://www.ijhsr.org/IJHSR_Vol.4_Issue.8_Aug2014/48.pdf अजुनही आहे.
जरी दीक्षित वाटत असलेले ज्ञान जुनेच आहे असे ग्रुहित धरले तरीदेखील डॉ. दिक्षित ज्या खुसखुशीत व हलक्या फुलक्या भाषेत ही माहिती देतात त्याबद्दल त्यांना क्रेडीट द्यायलाच हवे. शिवाय ते फक्त भाषणं देऊन थांबलेले नाहीत. व्हॉट्सॅप ग्रुपतर्फे कित्येक लोकांना विनामूल्य मार्गदर्शन करत आहेत. ह्यात त्यांचा काय आर्थिक किंवा इतर फायदा दिसतोय जेणेकरून त्यांची जाहिरात कुठे करायला नाही पाहिजे असे तुम्हाला वाटतेय? मूळात तुम्ही त्यांचे भाषण ऐकले तरी आहे का अशी मला शंका येत आहे.

एनीवे.. मी साधारण ऑगस्ट पहिल्या आठवड्यापासून दीक्षितांनी सांगितल्या प्रमाणे दोनच वेळेस जेवत आहे. नो स्नॅकिंग.. ६ पाउंड वजन कमी झाले आहे. (ह्याच सुमारास माझा थायरॉईड मेडीसीनचा कोर्सदेखील अ‍ॅडजस्ट करण्यात आला, सो त्याचा थोडा हातभार असू शकतो.)
मात्र माझा आहार मी असा ठरवला आहे. माझ्या दोन वेळच्या जेवणात भरपूर सॅलड (लेट्युस, केल, पालेभाज्या, फळभाज्या, फळं, चीज, अवोकॅडो, लिंबू इत्यादी पासून बनलेले), कडधान्याची उसळ, एक फळभाजी, कोशिंबीर व एक पोळी इतके असते. तेल अजिबात वापरत नाही. तूप थोडे. भाजी/ कोशिंबिरीत साखळ्/गुळ नाही. कोशिंबिरीला फोडणी नाही. तसेच अतिरीक्त गोड पदार्थ नाहीत. पण सकाळी उठल्यावर व दुपारी पाऊण कप कॉफी पिते, व्यवस्थित दुधाची व पूर्वीपेक्षा कमी साखरेची. हे हळूहळू कमी करत जाणार आहे. पण असेच राहिले तरी मला चालेल. मला डायबेटीस नाही. तपासण्यात एवनसी ५ आली. मात्र ४ वर्षं हायपोथायरॉईडीझम आहे. त्यामुळे व विचित्र आहारामुळे वजन खूप वाढले आहे ते कमी करणे हा उद्देश आहे. आणि आहार कसा असावा हे व्यवस्थित माहित असूनही दुर्बल इच्छाशक्तीमुळे त्यावर प्रॅक्टीकल मध्ये काही करता येत नव्हते. दीक्षितांचे व्याख्यान ऐकून ते बदल आहारात करावेत असं खूप वाटले. 'ते वाटण्याचे' व इच्छाशक्ती वाढवण्याचे क्रेडीट मी नक्की डॉक्टरांना देईन.

एवढा गदारोळ का हेच समजत नाही. माझ्या डॉक्टर मित्राने सांगितले की सगळ्या डायबेटीस स्पेशालिस्ट डॉक्टर लोकांचे धाबे दणाणले आहे. दीक्षित ना करोडो रुपयांच्या ऑफर्स येत आहेत लेक्चर बंद करण्या साठी.

खरे खोटे दीक्षित जाणे. पण खर्च बस्के म्हणाले तसे त्यांच्या शैली मुळे लोकं जास्त ओढली गेली.

एखादा माणूस विना मोबदला हे सगळे करत आहे तर मग जाहिरात कसली करणार?

ह्याच्यात लोकांना कुठे जाहिरात दिसली हे कळत नाही.

कुणी काही माहितीपर टाकले की छुपे अजेंडे काय आहे विचारत त्याच्यावर हल्ले चढवायचे, व्यक्तिगत पातळीवर उतरायचे हे काही आयडी नित्यनियमाने करतात. इथे तथाकथित जाहिराती टाकणारे जर छुपे अजेंडे घेऊन येतात तर ही मंडळी कुठले अजेंडे घेऊन फिरत असतात?

कुणी मायबोलीवर आले की त्याला इतके सळो की पळो करून सोडायचे की तो वैतागून निघून जाईल हा यांचा छुपा अजेंडा दिसतो. कारण हे सातत्याने होताना पाहिलंय.

शाम, तुमची चिकाटी खरेच वाखाणण्याजोगी आहे. तुमचा धागा व काही प्रतिसाद वाचल्यावर लक्षात आले होते की इथे चर्चा फार थोडी होणार. तुम्हाला तज्ञ व्यक्तींकडून अजून माहिती हवी असे तुम्ही धाग्यात लिहिले. इथे छुपे अजेंडे शोधण्यात तज्ञ लोक आहेत.

जे तुमच्यावर आरोप करताहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आहात हे बेस्ट करत आहात. डॉ. दिक्षितांना कसल्याही जाहिरातबाजीची गरज नाही, माझी कुठेही consulting रूम नाही, उगीच मला भेटायला येऊ नका, फक्त मी सांगतो ते नीट ऐका व मी सांगितलंय तशी काळजी घेऊन ते फॉलो करा हेच एवढेच ते सांगतात. कुठेही पैसे द्या म्हणून सांगत नाहीत. उलट त्यांच्या प्रयत्नाने ज्या दोन टेस्टस ते सांगतात करायला त्याही काही शहरात स्वस्तात उपलब्ध झाल्या. त्या स्वस्त झाल्या कारण त्याचे कमिशन यांना मिळणार म्हणून नाही तर अचानक त्या टेस्टस करून घेणारे लोक वाढणार, तर थोड्या किंमती कमी केल्या तर लोकांना परवडेल व तुम्हालाही जास्त ग्राहक मिळतील हे काही लॅबसना पटल्यामुळे.

मी स्वतः हे फॉलो करतेय, हा धागा यायच्या बऱ्याच आधीपासून. खुपजनांना सांगितलंय, काहीजण करताहेत, फायदा होतोय.

आय एफ विरुद्ध दिक्षीत असे नाहीये! दिक्षीत पद्धतीत सुद्धा 16 तासाचे फास्टींग आहे. पण बस्के किंवा मोकीमी यांचे 2 वेळेच्या खाण्यातले नियम महत्वाचे आहेत. प्रोटीन आणि फायबर वेटलोस आणि शुगर दोन्हीसाठी महत्वाचे आहेत. तुम्ही ओबीस असाल तर सुरूवातीला फक्त 2 वेळा काहीही खाऊन वजन कमी होते. पण पूर्णपणे आटोक्यात यायला हेल्दीच खावे लागते.

हाब,
मलाही ही कुठल्याही प्रकारची जाहिरात वाटली नाही.
बर्‍याचवेळा असं होतं की एखादी गोष्ट आवडली, स्वतःला पटली तर दुसर्‍यांनापण सांगाविशी वाटते. सोशल मिडीआमुळे अनेक लोकांपर्यंत पोचणं सोपं झालेलं आहे. इथे मायबोलीवरही अनेक पाककृतींपासून चित्रपटांच्या परीक्षणांपर्यंत ते 'चित्रपट कसा वाटला', प्रवासवर्णन लोक शेअर करत असतात. ती चित्रपटाची किंवा त्या ठिकाणाची जाहिरात होते का? झाली तर त्यापासून त्या लिहीणार्‍या व्यक्तीला काही फायदा होतो का? लोकांशी संवाद साधणं ही अनेकांची गरज असू शकते. त्यानुसार लोक अनेक लेख लिहीत असतात.
सईनं (केसकर) इथे अनेक उत्कृष्ट, अभ्यासपूर्ण लेख लिहीले आहेत. ती स्वतः रीसर्च बॅगग्राऊंडची असल्यानं संशोधन करणं, त्यासाठी पुस्तकं वाचणं, टिपणं काढणं, संदर्भ शोधणं, ते पडताळून बघणं करू शकते रादर अभ्यासपूर्ण लेख कसा लिहावा हे तिला माहित आहे. तिच्या लेखांवर यामुळेच आपण काही प्रश्न विचारत नाही. पण सर्वांनाच या गोष्टी शक्य होत नाहीत, अनेकवेळा अभ्यासपूर्ण संदर्भासहीत लेख कसा लिहावा हे माहित नसतं. भागवतांच्याबाबतीत असच काहिसं झालं असावं. सुरवातीला हा लेख वाचला तेव्हा मलाही शंका होती. पण थोडं अधिक वाचन केल्यावर आणि डॉ. दिक्षितांचे विडीओ बघितल्यावर इं फास्टींगचा हा एक प्रकार असावा असं जाणवलं.
उद्या मला किंवा माझ्या कुटुंबियांना जर याचा फायदा झाला तर त्याबद्दल मलाही लिहावेसे वाटेलच की. शब्दांचा किस पाडून कशाला त्यांना आरोपीच्या पिंजर्‍यात उभा करतोस? त्यांनी कुठलीही औषधेही सुचवलेली नाहीत, फक्त खाण्याच्या सवयी बदला म्हणत आहेत. त्यात चुकिचे किंवा कुणाला इजा होण्यासारखे काहीच नाही. आपल्या आजी आजोबांची जीवशैली, खाण्यापिण्याच्या सवयी अशाच होत्या. दोन वेळेस ताजं, सकस जेवणं, दोन वेळेस चहा, एखादवेळेस मधल्यावेळचं खाणं. भरपूर चालणं. खेडेगावात दुसरं काही मिळायचही नाही. मग त्यांची जीवनशैली वाईट होती का?

हायझेनबर्ग रात्री इथे बराच उहापोह झालाय, तरी मी माझे मत नोंदवतो.
मला हा लेख जाहीरात वाटत नाही. वर कुणीतरी म्हटल्या प्रमाणे लेखक भारावून गेले आहेत.
त्यांचे विषयावर ज्ञान मर्यादीत आहे. डॉ. दिक्षितांनी जे सांगितलंय ( प्रत्येकवेळी स्त्रवणारे इन्सुलिनचे ठराविक माप, ते दिवसातून दोन वेळा स्रावणे, ५५ मिनिटांची विंडो, इत्यादी) या व्यतिरीक्त ते अधिक भर घालू शकत नाहीत, आणि हे ते मान्य करतात.
तेव्हा यावर अधिक ताणून काय हशील होईल हे कळत नाही.

माझ्यामते हा IF चा एक फाईन ट्युन्ड प्रकार आहे. प्रश्न रहातो तो थोडे जरी खाल्ले (उदा. अर्धा वाटी पोहे) तरी आणि पोटभर खाल्ले तरी (दोन प्लेट पोहे) किंवा एकाच खाण्यात कार्ब्स कमी आहेत तुलनेत भरपूर आहेत, तरी इन्सुलिनचे तेवढेच माप पडते का? याचे उत्तर लेखक स्वतः देऊ शकतील असे वाटत नाही. मलातरी हाच काय तो एक फरक IF आणि या पद्धतीत दिसतो.

सई यांचा या विषयावरील व्यासंग दांडगा आहे, त्यांची लिहिण्याची शैली मुद्देसूद आहे, त्यांच्या लेखांची आणि या लेखाची तुलना करून तशीच उत्तरे / शंका समाधान याची अपेक्षा करणे उचीत नाही असे मला वाटते.

लेखकाला हा शोध डॉ. जिचकार यांचाच आहे असे वाटते असे त्यांच्या काही विधानावरून दिसतेय. पण डॉ. जिचकार त्यांच्या भाषणात "मी हे अमेरिकेत शिकलो, यावर अमेरिकेत खूप संशोधन झालंय, चाललंय" असे म्हणालेत याची त्यांनी नोंद घ्यावी.

माझ्या डॉक्टर मित्राने सांगितले की सगळ्या डायबेटीस स्पेशालिस्ट डॉक्टर लोकांचे धाबे दणाणले आहे. दीक्षित ना करोडो रुपयांच्या ऑफर्स येत आहेत लेक्चर बंद करण्या साठी.>>>

Happy Happy

काल एका मैत्रिणीशी बोलणे झाले. तिच्या काही त्रासामुळे तिचे वजन अमाप वाढलंय. त्या त्रासाच्या निवारणासाठी गेले काही वर्षे ती एका डॉक्टरांची ट्रीटमेंट घेतेय. तिला मी दिक्षितांबद्दल सांगितले. सगळे ऐकून ती स्वतःच्या डॉक्टरांकडे गेली व हे डाएट सुरू करण्याबद्दल त्यांच्या कानावर घातले. डाएट अवश्य करा, नक्की फायदा होणारच हे त्यांनी सांगितले.

मलाही ही कुठल्याही प्रकारची जाहिरात वाटली नाही.
बर्‍याचवेळा असं होतं की एखादी गोष्ट आवडली, स्वतःला पटली तर दुसर्‍यांनापण सांगाविशी वाटते.>>>>>>> +१.

हा धागा यायच्या आधी ७-८ वर्षांपूर्वी नवर्‍याची शुगर बॉर्डरलाईन हाय झाल्यापासून सकाळी १ कप चहा, नाश्ता+दूध आणि २ वेळचे जेवण एवढा आहार ठेवला आहे.२ जेवणाच्या मधे वाटलेच तर माफकच चकली,/चिवडा .गोड पदार्थ नाही.कधीतरी खीर वगैरे खाल्लीच तर छोटी वाटी.या व्यतिरिक्त त्याचा कपालभाती प्राणायम असतो.वजन बर्‍यापैकी कमी झालेय.
दुसरा मेंबर आमच्या ताई. एप्रिल १८ पासून ,नाश्ता, २ वेळा जेवण एवढा आहार ठेवून मस्त वजन कमी झालंय.

माझा एवढा ताबा नसूनही थोडंसं पाळते.सुमारे ३ महिन्यात २-२.५ किलो वजन कमी झालंय.२ जेवणांमधे काहीही नाही खाल्ले तर मला थरथरायला होते,म्हणून फळ , चहा+२ बिस्किटे खातेच.

गेले काही दिवस हे डाएट फॉलो करत आहे. बर्‍याच दिवसांपासून माहित होते पण इतका वेळ न खाता रहाणे जमणार नाही असे वाटायचे. त्यात मला सिव्हिअर अ‍ॅसिडिटीचा त्रास आहे. २ तासांनी थोडे थोडे खाणे या विचार पद्धतीचा इफेक्ट होताच.
पण वजन बेसुमार वाढले आणि लक्षात आले की आता मनावर घ्यायलाच पाहिजे. त्यात माझ्या भावाला या डाएटचे चांगले रिझल्ट्स मिळाले म्हणून मनावर घेतलेच.
५५ मिनिटांच्या विंडोत व्यवस्थित जेवणे आणि इतर वेळी भरपूर् पाणी पिणे असे चालू आहे.
रच्याकने डॉ. दिक्षितांचे वॉट्सअस्प ग्रुप आहेत. तिथे फक्त डाएट रिलेटेड मेसेज पोस्ट होतात.

Pages