फुकटात विनासायास वेटलॉस

Submitted by शाम भागवत on 3 July, 2018 - 03:17

वाढलेला पोटाचा घेर व वाढलेले वजन, सोबतीला कोलेस्टेरॉल सापडल्यामुळे नशिबी आलेल्या गोळ्या आणि आता या आयुष्यभर घ्यावयाच्या आहेत अस डॉ. नि सांगितल्यावर मनाला बसलेला हबका. काही जणांचा वाढलेला रक्तदाब व त्यावरच्या गोळ्या , मधुमेह पूर्व स्थिती लक्षात आल्यावर उडालेली घाबरगुंडी तर मधुमेह झाल्याचे निदान झाल्यावर घरातल्या सर्वांच्या चेहऱ्यावर अवतरलेली काळजी. आणि या सगळ्यातून हे खा व हे खाऊ नका ची भली मोठी यादी. शिवाय गुडगेदुखी, ऍसिडिटी , .. , .., .. असच बरच काही यांच्यासाठी हे लिहितोय.

ह्या सगळ्या त्रासातून कस मुक्त व्हायच?, एक पैसा जास्त खर्च न करता हे कस साधायच? श्रीमंत असो की गरीब दोघांनाही जमू शकेल,तसेच स्त्री पुरूषात अजिबात भेदभाव न करता दोघांनाही एकच पद्धत कशी वापरता येईल, तसेच त्यामागे विज्ञानाचा भक्कम पाठिंबा असला पाहिजे. वगैरे वगैरे .......
थोडक्यात आखूड शिंगी, बहुदुधी, गरीब, दूध काढताना लाथा न मारणाऱ्या बहुगुणी गायीबद्दल हे लिहितोय.

कै. डॉ.श्रीकांत जिचकार एक अवलिया माणूस. एमबीबीएस, एमडी झाल्यावर आयपीएस त्यानंतर चक्क आयएएस. पण चारच महिन्यात नोकरीचा राजीनामा देऊन आमदार, मग मंत्री, राज्यसभेचे खासदार. या माणसाने प्रगती तरी किती वेगाने करावी? पण हे सगळं ४९ वर्षांच्या आयुष्यात साधायच म्हणजे एवढा वेग हवाच की हो!

घरातल्या ग्रंथालयात बावन्न हजार पुस्तक. विद्वत्ता दाखविण्यासाठी जाहिरात म्हणून नक्कीच जमवलेली नसणार. उलट सगळी वाचलेली असण्याची शक्यता जास्त. कारण ४२ विद्यापीठातून मिळवलेल्या २० पदव्या. बहुतेक सगळ्या प्रथम श्रेणीतून मिळालेल्या. २८ सुवर्णपदक मिळवलेला माणूस हा. नक्कीच पुस्तके वाचलेली असणार.

तर असा हा माणूस. भरपूर परदेश वाऱ्या केलेला असूनही त्याची भारताशी जुळलेली नाळ तुटली नव्हती. साधारण अशी माणसे थोडीशी भारतीय संस्कृतीशी फटकून वागतात. पण इथेही आपल्याला आश्चर्याचा धक्का बसतो. भारतीय संस्कृती व प्राचीन इतिहास, तत्त्वज्ञान व संस्कृत यात एमए केलेय. हे मी आपल वानगीदाखल सांगतोय कारण तस पाहिल तर त्यांनी १० विषयात एमए केलेय. इतकच काय मानाची डी. लिट. पदवी मिळालीय त्यांना संस्कृतामध्ये.

तर सांगायच म्हणजे अशा माणसाने १९९७ साली एक नवीन विचार भारताला दिला. त्यावेळी ते राज्यसभेचे सभासद होते. पुणे महानगर पालिकेत मा. शशिकांत सुतार नावाच एक मोठ्ठ प्रस्थ होत. त्यांनी बालगंधर्व रंगमंदिरात जिचकारांना भाषणासाठी बोलावल. त्यासाठी सगळी व्यवस्था जातीने केली. आपोआपच बरेच मान्यवरांनी रंगमंदिर भरून गेल.

त्यांनी सांगितल की, "शरीरात तयार होणारे अतिरिक्त इन्शूलीन बऱ्याच रोगांचे कारण आहे." स्थूलता, त्यातून मधुमेह, वाढलेला रक्तदाब, त्यातून मग अंजोग्राफीची तपासणी, त्यात नक्की काहीतरी सापडतच. मग अंजोप्लास्टी. सगळाच प्रकार खर्चिक. पण मरणाची भीती वाटायला लागली की माणूस करतो खर्च. त्याला वाटतं की झाल सगळ करून. आता काही आपल्याला होणार नाही. पण कसच काय. पाच सहा वर्षात आणखी खर्चिक बायपाससाठी हॉस्पिटलची वारी ठरलेली.

मग यावर सोपा उपाय काय? दिवसातून फक्त दोनदाच जेवा. काहीही खा. भूक भागेपर्यंत कितीही खा. तूप लोणी बिनधास्त खा. मांसाहारही चालेल. फक्त हे जेवण ५५ मिनिटांत संपवले पाहिजे. आणि दिवसातून ४५ मिनिटे भरभर चालण्याचा व्यायाम केला पाहिजे. महागड्या जिम नको की, आहारतज्ञांना पैसे द्यायला नको. दवाखान्याची पायरी चढायची कधी वेळही येणार नाही. किती सोपे आहे ना? पण अवघड बाब पुढे आहे. ते पुढे सांगतात की, "दोन जेवणामध्ये काहीही खाऊ नका." याकाळात तोंड उघडायचे ते फक्त बोलण्यासाठी किंवा पाणी पिण्यासाठी. बस्स. औषधांच्या याद्या विसरून जा. हे खा व हे खाऊ नका याची प्रत्येक डॉक्टर व आहारतज्ञांप्रमाणे बदलणारी यादी व त्यातून उडणारे गोंधळ संपवून टाका.

सगळ वैज्ञानिक नियमावर आधारलेले भाषण. समोर अनेक मान्यवर बसलेले. त्यामुळे बऱ्याच वेळेस अशी भाषणे इंग्रजीत चालतात आणि जिचकार तर इंग्लिश लिटरेचर मध्येपण एमए केलेले. पण तरीही हा विचार सर्वसामान्य माणसाला कळला पाहिजे यासाठी हे भाषण त्यांनी मराठीतून दिले आहे. समोर नुसते मान्यवर नाही तर पुण्याचे मान्यवर बसणार आहेत म्हणून त्यांनी अनेक इंग्रजी संज्ञांना पूरक मराठी संज्ञा शोधून काढल्या होत्या व त्या संज्ञा पाठ करून मगच ते व्याख्यान द्यायला आले होते. (या मराठीतील संज्ञा शोधणे व पाठ करणे हे कामही त्यांना सोपेच गेलेले असणार. कारण ते महाराष्ट्राच्या विश्वकोश निर्मिती मंडळाचे सभासद होते!!!) एखाद्या माणसाला बेंबीच्या देठापासून कळकळ असते म्हणजे काय हे समजून घ्यायचे असेल तर त्यासाठीही हे व्याख्यान ऐकायला हरकत नाही.

आपल्या या कार्याचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी "नागपूर फिटनेस मुव्हमेंट" आणि "पुणे फिटनेस मुव्हमेंट" अशा दोन संस्था सुरू केल्या. पण त्या काळात फेसबुक किंवा व्हॉटऍपस वगैरे काहीच नव्हत. नाहीतर याचा प्रसार फार वेगाने झाला असता. मनोगत, मायबोली किंवा मिसळपाव सारखा एखादा संकेतस्थळ तयार करता अल्लाही असत कदाचित. पण वाचणार कोण? इंटरनेट फार महाग होत त्यावेळेस. टाटा कंपनीच्या व्हीसएनएल ला वर्षाकाठी पाच सहा हजार भरल्यावर कनेक्शन मिळायच. शिवाय घरात फोन असला पाहिजे ही पूर्वअट. आणि नेट वापराला सुरवात झाली की दर मिनिटाला एक टेलीफोनचा कॉल एवढे पैसे टेलिफोनच्या बिलात यायचे तो खर्च वेगळाच. नेट वापरणे हे सामान्यांच्या कुवती बाहेरची गोष्ट होती. अपवाद फक्त आयटी मधल्या लोकांचा!

तरीपण राज्यसभेच्या सदस्याला बऱ्याच सोयी सुविधा असतात. ओळख पाळख असते. त्यामुळे प्रसाराचे काम चालू होते. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते. दोनच वर्षांनी म्हणजे १९९९ साली झालेल्या लोकसभेच्या निवडणूकीसाठी काँग्रेसकडून त्यांना तिकिट मिळाल पण फक्त ३०००+ मतांनी पडले. इतकेच नव्हे तर राज्यातले आणि त्याचबरोबर केंद्रातले काँग्रेसचे सरकार पडले. प्रसारावर फारच मर्यादा आल्या.सर्वात मोठे दुर्दैव म्हणजे २००४ साली जेव्हा कॉग्रेसचे सरकार राज्यात व केंद्रात आले त्यानंतर दोनच आठवड्यात त्यांचा अपघाती मृत्यू झाला. मला वाटते या नवीन विचारांचे फक्त बी लावायचे काम नियतीने त्यांच्यावर सोपवले होते.

त्यांचा या भाषणाचा एक ऑडिओ यूट्यूबवर होता. पण दोन तास तीन मिनिटांचा ऑडिओ म्हटल्यावर बरेच जण तो उघडून सुद्धा बघत नसत. आणि यदाकदाचित कोणी उघडलाच तर बरेच जण पहिले प्रास्ताविक संपेपर्यंतही कळ काढू शकत नसत. त्यामुळे मूळ भाषण सुरू होण्याआधीच तो बंद केला जायचा. एवढा वेळ असल काही ऐकायला तो थोडाच वपू किंवा पुल चा व्हिडिओ होता की व्यायाम/प्रवास करताना ऐकायचा गाण्याचा अल्बम होता? ही राजकारणी लोक ही अशीच. समोर माइक आला की यांना वेळेच भानच राहत नाही. अशी कॉमेंटपण कोणीतरी केली असेल असा मला दाट संशय आहे.

बरीच वर्षे निघून गेली. जिचकारांनी लावलेले बी रूजण्यासाठी अनुकूलतेची वाट पाहत युट्युबवर पडून होत. ही अनुकुलता लाभणे फार अवघड होत. त्याला वेळ लागणार हे त्या बियाणाला माहीत होत. आणि सहा वर्षापूर्वी ते एकाच्या हृदयात रूजल. हा माणूस एमबीबीएस, एमडी होता. पण रोग पाहून औषध देणारा नव्हता. तर रोग होऊच नये यासाठी काय करता येईल यातला तज्ञ होता. प्रामाणिक होता. पैशासाठी काम करणारा नव्हता. समाजाच्या भल्यासाठी काम करण्याची इच्छा असणारा असा होता. मुख्य म्हणजे माहिती वाचून चर्चा करणारा नव्हता तर त्यासाठी स्वतःवर प्रयोग करायला तयार असणारा व त्यासाठी स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करायला तयार असणारा होता. नियतीने अगदी अचूकरीत्या लातूरच्या डॉ. जगन्नाथ दीक्षित यांची निवड केली होती.

डॉ. दीक्षित सध्या ते लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विभाग प्रमुख आहेत व गेली सत्तावीस वर्षे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अध्यापन करत आहेत. "स्थूलत्व निवारण आणि मधुमेह प्रतिबंध" या विषयावर त्यांनी संशोधन केले.यात त्यांनी प्रथम स्वतःवर प्रयोग केले. नातेवाइकांवर प्रयोग केले. जवळच्या मित्रांवर प्रयोग केले. या सगळ्याच्या व्यवस्थित नोंदी ठेवल्या. मग मात्र त्यांनी लातूर व औरंगाबाद येथील हजारो लोकांवर प्रयोग केले. वैज्ञानिक नियतकालिकात प्रबंध लिहिण्यासाठी या प्रयोगाचे योग्य दस्तावेजीकरण केले व अनेक प्रबंध प्रकाशीतही केलेले आहेत.

पण प्रसारासाठी नुसते प्रबंध लिहून भागत नाही यासाठी त्यांनी व्याख्याने द्यायला सुरवात केली. पुण्याच्याच बालगंधर्व रंगमंदिरात कै. डॉ. श्रीकांत जिचकारांच्या स्मृतीला अभिवादन करून सुरवात झालेले त्यांचे व्याख्यान ऐकण्यासाठी खाली लिंक देत आहे. हेही व्याख्यान खूप मोठे आहे. पहिले प्रास्ताविक ३० मिनिटे चालते. त्यामुळे व्याख्यानासाठी आतुर झालेले बरेच जण कंटाळून पहिल्या काही मिनिटांनंतर व्याख्यान बंद करून टाकतात. हे प्रास्ताविक पाहू नये म्हणून मी हे सांगत नाहीये. तर थोडा धीर धरावा असे सुचवत आहे. या प्रास्ताविकातूनही तुम्हाला काही मुद्दे मिळू शकतात.

२०० च्या वर व्हॉटऍपस ग्रुप स्थापन करून व फेसबुकच्या माध्यमातून ही चळवळ अठ्ठावीस हजार माणसांपर्यंत पोहोचली आहे. अनेक देशातील माणसे यात आहेत. पण हे सगळे सांभाळणे आता अवघड होत चाललेय. कार्यकर्त्या डॉक्टरांना यासाठी वेळ देणे अवघड होत चाललेय. यासाठी आता एक वेबसाईटच उघडायचे प्रयत्न चालू आहेत. तस झाल की एकाच ठिकाणी सगळी माहिती एकत्रित होईल. वेळ वाचेल. एक कोटी लोकांपर्यंत लोकांपर्यंत पोहोचायचे उद्दिष्ट समोर ठेवून आता काम सुरू होणार आहे.

खर म्हणजे ह्या व्याख्यानाचा सारांश देण्याचा माझा विचार होता. पण मी मुद्दामहून तस करत नाहीये. कारण तस केले तर लोक मूल व्याख्यान न ऐकताच चर्चा करायला सुरवात करतात. हे व्याख्यान ऐकल्यावर फारशा शंका उरत नाहीत. शिवाय त्यांनी काही फोन नंबरही दिलेले आहेत. त्यावर तुम्ही व्हॉटऍपवर प्रश्न किंवा शंका विचारू शकता.

डॉ. दीक्षित यांच्या व्याख्यानाची लिंक खाली देत आहे. दोन तास सलग वेळ काढता येईल अशी वेळ निवडून निवांतपणे पहा.
https://www.youtube.com/watch?v=edKaI5gxaNQ

ही डॉ. दीक्षित यांची फेसबुक पेजची लिंक आहे. त्यात लाभार्थींची नावे, अनुभव व मोबाईल नंबर दिले आहेत.हे तुम्ही केव्हाही पाहू शकता! https://www.facebook.com/weightlosseffortlessly/

डॉ. जिचकार यांनी याच व्याख्यानात बी पेरण्याचे काम केले. हा ऑडिओ आहे. दोन तास सलग वेळ काढता येईल अशी वेळ निवडून निवांतपणे पहा.
https://www.youtube.com/watch?v=8-kw3hGUwW4

मी स्वतः या विषयातला तज्ञ नाही. पण या संकेतस्थळावर या विषयातले बरेच तज्ञ असल्याने साधक बाधक चर्चा होऊन हा विषय आणखी स्पष्ट होईल याहेतूने हे लेखन केले आहे.

एक महत्त्वाची सूचना :
ज्यांना मधुमेह आहे अशांनी HbA1c आणि fasting insuline या दोन तपासण्या करून त्याचे अहवाल डॉ. दीक्षित यांना पाठवावेत. या दोन तपासण्या म्हणजे रक्तातल्या शर्करेचे प्रमाण दाखवणाऱ्या तपासण्या नव्हेत. त्यानंतर त्यांच्याच सल्ल्यानेच पुढील आहारयोजना सुरू करावी. परस्पर आहारयोजना सुरु करू नये.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

दुसरा आक्षेप म्हणजे HbA1c ६.५ असलेल्या व्य्कतींचाच विचार एका रिसर्च पेपर मधे आहे. मला अजून दोन पेपर्स मिळालेले नाहीत. ६.५ म्हणजे सेफ म्हणायला हवे. ८ पेक्षा जास्त असेल तर काय याबद्दल या रिपोर्ट मधे काही नाही.

@ आमचा खड्डा,
विनासायास वेटलाॅस आणि मधुमेह प्रतिबंध (१५वी आवृत्ती)या पुस्तकाच्या ९७ व्या पानावर यासंबंधी अधीक माहिती दिली आहे. ती पुढील प्रमाणे

मधुमेही व्यक्तिंनी एचबीए१सी व फास्टिंग इन्सुलीन या दोन तपासण्यांचे अहवाल व ते घेत असलेल्या औषधांची माहिती मला किंवा आमच्या गटप्रमुखांपैकी कोणालाही पाठवावी. आम्ही परवानगी दिली तर त्यांनी हा सोपा उपाय अमलात आणावा. या उपायाने मधुमेहपूर्व अवस्थेतील व्यक्ती ३ ते ६ महिन्यात मधुमेहमुक्त होऊ शकतात. औषध सुरू न झालेले मधुमेही ६ ते ९ महिन्यात मधुमेहमुक्त होऊ शकतात. औषधे घेऊनही मधुमेह नियंत्रणात नसलेल्या व्यक्तिंचा मधुमेह नियंत्रणात येऊ शकतो व त्यांची औषधेही कमी होऊ शकतात. या संदर्भात प्रसिध्द झालेल्या संशोधनाच्या आधारे व गेल्या दोन वर्षातील रूग्णांच्या अनुभवावरून मी हे विश्वासाने सांगू शकतो.

पान क्रमांक १४० व १४१ वर त्यांनी ४९ जणांचे फोन नंबर नाव व गावासकट दिलेले आहेत. ते टंकून झाल्यावर तुम्हाला विपू करेन. वेमा यांची हरकत नसल्यास इथेही चिकटवेन.

भागवत सर आभार.
पुस्तकाचे डोक्यातूनच गेले होते. आता अॉनलाईन मागवले आहे. चार पाच दिवसात येईल. तोपर्यंत इथून कल्टी.
मायबोलीवर पण आहे का?

माय्बोलीच्या ह्या आणि इतर अनेक धाग्यात, पुल म्हणतात तस " फणस सोलावा तशी कविता (धा गा) सोलाय ची, गरे फे कून द्यायचे आणि साल चावत बसायची" असा प्रकार दि सतो.>> +१

नेमके आक्षेप समजले म्हणजे थोडक्यात आटपेल हे प्रकरण. त्याने इतर अज्ञानी / भक्त टईप लोकही या दुष्ट जाळ्यात ओढले जाण्यापासून वाचतील. >>>
हे प्रामाणिकपणे लिहिले आहे असे गृहीत धरून
माझा आक्षेप ही जाहिरात असूनही तसे मान्य न करण्याला आहे.
'फुकटात विनासायास वेटलॉस - एक जाहिरात' असे शीर्षक केल्यास किंवा धागाच जाहिरात विभागात हलवल्यास लेखातल्या कुठल्याही गोष्टीवर आक्षेप घेण्याचे कारण ऊरणार नाही (मला तरी). आणि तुम्ही म्हणालात तसे अनेक मायबोलीकर या दुष्ट जाळ्यात ओढले जाण्यापासून वाचतील.

अर्र... तुम्ही ईथून कल्टी मारल्याचं वाचलं... ऊगीचच पोस्ट लिहिली असं झालं.. आता माझ्या आक्षेपाचा पाठपुरावा कोण करणार Sad

अ‍ॅडमिन, माझे कालचे मेसेजेस का उडवले गेले आणि त्यातली कुठली भाषा तुम्हाला आक्षेपार्ह वाटली ह्याचे स्पष्टीकरण मिळू शकेल का?
ड्यू आयडी असल्याचा आरोप करणे इथे पहिल्यांदाच झाले आहे का? तसे असल्यास मायबोलीवरचे निम्मे बाफ बंद करावे लागतील, ते जर सगळीकडे राजरोस चालू शकते तर केवळ ड्यू आयडी असल्याचा संशय व्यक्त करणे हे कारण तुम्हाला मेसेजेस उडवण्यासाठी योग्य वाटते का? माझ्या विधानातले कुठले शब्द मर्यादेचा भंग करणारे होते हे कृपया निदर्शनास आणावे.

अनुभवाला जाहिरात म्हणावं असा अट्टाहास का? जाहिरात म्हणजे डॉ. जगन्नाथ दीक्षित यांना माहीत आहे की भागवत असा लेख लिहिणार आणि त्यांनी भागवतांची ह्या कामासाठी पैसे देऊन नेमणूक केली आहे, असा अर्थ होतो. तसा दीक्षित-भागवत ह्यांचा व्यवहार झाल्याचा तुमच्याकडे असलेला पुरावा सादर करा.

अनुभवाला जाहिरात म्हणावं असा अट्टाहास का? >> लेखात अनुभवकथन दाखवा आणि सवा रूपया बक्षीस मिळवा.

जाहिरात म्हणजे डॉ. जगन्नाथ दीक्षित यांना माहीत आहे की भागवत असा लेख लिहिणार आणि त्यांनी भागवतांची ह्या कामासाठी पैसे देऊन नेमणूक केली आहे, असा अर्थ होतो. >> असे कोण म्हणते... कालच एक महागुरू म्हणाले त्यांनी एकही रुपया न घेता त्यांच्या मित्राच्या कामाची जाहिरात म्हणून यूट्यूब विडिओ केला.
अहो पुरावे क्लेम करणार्‍याला मागितले पाहिजे... मी तर भागवत म्हणाले तेच सांगतो आहे... वाचा पाहून पुन्हा लेख.

कसला अनुभव?
आख्यानं ऐकण्याचा?
माझी स्मरणशक्ती मला दगा देत नसेल, तर मला वजन कमी करण्यासाठी कसलेही डाऊट करायची गरज नाही, असं लिहिलंय त्यांनी.

मग आणिक कशासाठी? प्रसिद्ध तर डॉ already आहेत असं दिसतंय! लोकं अनुभवाने samsung, lg फ्रिज, टीव्ही घ्या सांगतात, त्वचेच्या बीबीवर वेगवेगळ्या साबणाच्या नावासकट चर्चा होतात, वेगळ्या हॉटेलच्या नावासकट चांगला अनुभव आला म्हणून recommend केले जातात, GM पासून वेगवेगळ्या diet आणि dieticians ची चर्चा होते, मला नक्की प्रॉब्लेम काय कळत नाही

मग आणिक कशासाठी? >> ते लेखकच सांगू शकतील की विस्ताराने. १ कोटींचे टार्गेट आहे असे काहीतरी ते म्हणाले होते.
असे टार्गेट samsung, lg हॉटेलवाल्यांचे असते असे ऐकून आहे बुवा. तुमच्यासारखेच मलाही अजून माहित करून घ्यायला आवडेल.

मला नक्की प्रॉब्लेम काय कळत नाही >> टीवीवर रामायण्/महाभारत बघतांना मध्येच आमीरखान येऊन 'कोका कोला किती चांगले आहे. १०० देशांच्या लॅब मध्ये टेस्टींग झाले आहे.. वगैरे वगैरे' ते सांगतो की नाही त्याला जाहिरात म्हणतात. (त्यात कोक-खान मध्ये काय देणे घेणे झाले त्याचा काही संबंध नाही.) आपण महाभारत ज्या भक्तीभावाने बघतो त्या भक्तीभावाने जाहिरात बघतो का? अर्जून-जयद्रथ युद्धात अर्जुनच जिंकणार असा विश्वास स्वतःला देतो तसा आमीरखान वर टाकतो का?

मग तो ते पैसे घेऊन सांगत असला, कोक आवडल्याने भारावला म्हणून सांगत असला किंवा जनहितार्थ सांगत असला किंवा त्याचा अनुभव म्हणून सांगत असला?? कोकच्या जागी औषधाची, शुद्ध पाण्याची वा व्यायामाच्या ईक्विपमेंटची किंवा डाएटची काहीही असले तरी ती जाहिरातच असते आणि आमीर खान सेल्समन.

तुम्ही फक्त आमीरखान सांगतो म्हणून कोक प्याल का? लगे हाथो आजारी पडल्यावर तुम्ही औषधं एम आर कडून खरेदी करता की पर्सनल/फॅमिली डॉक्टर ने सांगितले तसे केमिस्टकडून तेही सांगा.

म्हणजे भागवतांनी हे डाएट केलेले नाही तरी इथे लिहिलंय म्हणून जाहिरात. पण बाकीचे बरेच लोकं प्रतिक्रियांमध्ये लिहीत आहेत की त्यांना उपयोग झाला.
माझ्या सासूबाई करतात म्हणून मी पण सुरु केलं होते थोडे दिवस पण मी वजन किंवा inches track नव्हता ठेवला. हलकं वाटायचं, झोपताना पोट रिकामं असल्याने पटकन झोप लागायची आणि तेव्हा लागलेली कमी जेवायची सवय अजुनही कायम आहे. पोट भरलं की एक घास जास्तीचा जात नाही.

म्हणजे भागवतांनी हे डाएट केलेले नाही तरी इथे लिहिलंय म्हणून जाहिरात. >> आमीर खान कोक पितांना दाखवतात की जाहिरातीत, मग आपण त्याला जाहिरात नाही म्हणायचे का?

पण बाकीचे बरेच लोकं प्रतिक्रियांमध्ये लिहीत आहेत की त्यांना उपयोग झाला. >> Uhoh अहो पण आपण लेखाबद्दल बोलतोय ना?
मी कुणाच्या प्रतिक्रियांना जाहिरात म्हणालो का?

माझ्या सासूबाई करतात म्हणून मी पण सुरु केलं होते थोडे दिवस पण मी वजन किंवा inches track नव्हता ठेवला. हलकं वाटायचं, झोपताना पोट रिकामं असल्याने पटकन झोप लागायची आणि तेव्हा लागलेली कमी जेवायची सवय अजुनही कायम आहे. पोट भरलं की एक घास जास्तीचा जात नाही. >> अभिनंदन.

>>तुम्ही फक्त आमीरखान सांगतो म्हणून कोक प्याल का? >> शहाणी माणसं नुसतं आमीर सांगतो म्हणून जसं कोक पिणार नाहीत तसंच ज्यांना हे डाएट करुन बघायची इच्छा आहे ते स्वतःच्या जबाबदारीवर, काही हेल्थ कंडिशन्स असल्यास आपल्या डॉक्टरशी बोलून आपल्याकरता ही आहारपद्धती योग्य आहे की नाही हे ठरवत असतील अशी आशा आहे.
जाता जाता- भागवत इथे डॉ. दिक्षीतांची जाहिरात जरी करत असले तरी मला प्रॉब्लेम वाटत नाही. मागे लिहिल्याप्रमाणे वेमांनी येऊन त्यांना सांगायला हवं.

१ कोटींचे टार्गेट आहे  - म्हणजे एक कोटी लोकांना दिवसभर चरण्यापेक्षा दोनवेळा जेवून lifestyle diseases पासून लांब ठेवता आले किंवा गेला बाजार तोंडावर नियंत्रण ठेवयला प्रवृत्त करता आले तर ... मी तरी असाच अर्थ घेतला.
कोकाकोला वाईट आहे हे सगळ्यांना माहिती आहे. दोनवेळा जेवा असं सांगण्यात वाईट काय! किंवा अमूक एक डॉ असं म्हणालाय आणि त्याच्याकडे तशी उदा आहेत असं कोणी लिहिले म्हणून फरक काय पडला.

शहाणी माणसं नुसतं आमीर सांगतो म्हणून जसं कोक पिणार नाहीत तसंच ज्यांना हे डाएट करुन बघायची इच्छा आहे ते स्वतःच्या जबाबदारीवर, काही हेल्थ कंडिशन्स असल्यास आपल्या डॉक्टरशी बोलून आपल्याकरता ही आहारपद्धती योग्य आहे की नाही हे ठरवत असतील अशी आशा आहे.>>> +१००

भागवत इथे डॉ. दिक्षीतांची जाहिरात जरी करत असले तरी मला प्रॉब्लेम वाटत नाही. मागे लिहिल्याप्रमाणे वेमांनी येऊन त्यांना सांगायला हवं. >> जाहिरात करण्याबद्द्ल मलाही प्रॉब्लेम नाही, फक्त जाहिरातीला जाहिरात म्हणा.

कोकाकोला वाईट आहे हे सगळ्यांना माहिती आहे. >>> मुद्द्याचं बोललात!!
कसे माहित झाले? कोकाकोला कंपनीने सांगितले की आमीरखान ने?

दोनवेळा जेवा असं सांगण्यात वाईट काय! >>> कोणाला सांगायचं आहे हे तुम्हाला कसं माहिती? सगळ्यांची शारिर्रिक गरज तुम्हाला ठाऊक आहे का?

किंवा अमूक एक डॉ असं म्हणालाय आणि त्याच्याकडे तशी उदा आहेत असं कोणी लिहिले म्हणून फरक काय पडला. >> अहो वारंवार तसे लिहिण्यालाच तर जाहिरात म्हणतात ना... तेच तर सांगतो आहे कधीपासून.

हाब _/\_ गेल्या आठवड्यांपासून ह्या एका मुद्द्यावर तू लावून धरलेलं आहेस. त्यापेक्षा वेमांना लिहून त्यांना ठरवू देता आलं असतं. तेव्हा जाहिरात हा मुद्दा खरंच आहे?

शिवाय आपण वेगळ्या क्लासेस ना का जातो (योगा, डान्स वै) सगळे एकत्र करतात त्यामुळे न होणारी गोष्ट होते आपल्याकडून (* म्हणजे माझ्याकडून तरी) समजा, खरंच एवढेलोक नसतील करत तरी आपण एकटे नाही आपल्या बरोबर समाज आहे ही भावना बरीच लोकांना morale booaster असू शकते. माझ्या घरी दोन जण एक वर्ष + करत आहेत. मी बघून चार महिने केलं. आता बाकीची पुरुष मंडळी निदान चर्चा तरी करत आहेत की आईसारखं करुया. लहान मुलं सूर्यास्ताच्या आधी आई-आजीबरोबर रात्रीचं जेवण करून घेत आहेत. चांगल्या सवयी म्हणजे अजून काय?
गेल्या आठवड्यात घरी गेले तेव्हा चार दिवस हे सगळे डोळ्यांनी पाहिल्यावर मला तरी बरेच फायदे दिसले, वजन/ मधुमेह (कोणालाही नाहीये) सोडून.

कोणाला सांगायचं आहे हे तुम्हाला कसं माहिती? सगळ्यांची शारिर्रिक गरज तुम्हाला ठाऊक आहे का? --- एखाद्यानं डॉक्टर ला न विचारता इथले वाचून सुरू केलं तर त्यात लिहिणारीची काय चूक?

प्रॉब्लेम हा असावा कि भागवतांनी ह्या वेटलॉस पद्धती विषयी लेख लिहिताना त्यात शास्त्र कसे आहे हे विशद करुन सांगितलेले नाही. त्यात ते अनेक विडिओज आणि पुस्तकांचा दाखला देऊन इथल्या काही चौफेरज्ञानी (पण विनयशील) प्रतिसादकर्त्यांना स्वतःच्या (अल्प)मतीप्रमाणे उत्तर देत आहेत. त्यात मग जाहिरात, मधुमेह, इं फा असे अनेक थर त्यावर आपले सुजाण मायबोलीकर चढवत गेले.
खरे तर त्यांनी मूळ लेखात डॉ दिक्षीतांचा संपर्क क्र देऊन लोकांना ज्ञानी करुन सोडण्याचे उत्तरदायीत्व डॉ दिक्षीतांवर सोपवायला हवे होते. पण... असो.

तुम्ही माझा ह्या धाग्यावरचा सगळ्यात पहिला प्रतिसाद बघा, कोणालातरी डॉक्टर ला विचारा असं सांगितलंय. मग मी काहीच लिहिले नाही, जास्त काही माहिती नव्हती. आता परत आल्यावर मला जे फायदे वाटले चार दिवस पाहून म्हणून लिहिले, मला पूर्ण किंवा कोणतीच माहिती आहे असं अजिबात म्हणणे नाही.
लोकांना वजन कमी करायचा आणि पर्यायाने तब्बेत चांगली ठेवायचा अजून एक मार्ग कळला इतकंच.

प्रत्येक गोष्टीत रिस्क फॅक्टर असतात म्हणून ती गोष्ट चांगली आहे म्हणणारा वाईट कसा? प्रत्येकजण सज्ञान आहे, आपापल्या निकषांवर घासून परवडत असेल तर करावं.

हाब _/\_ गेल्या आठवड्यांपासून ह्या एका मुद्द्यावर तू लावून धरलेलं आहेस. त्यापेक्षा वेमांना लिहून त्यांना ठरवू देता आलं असतं. तेव्हा जाहिरात हा मुद्दा खरंच आहे? >> बरोबर आहे सायो. पण ३००+ प्रतिसाद झाल्यावर वेमा ह्या धाग्यावर येऊन गेले असतीलच असा मला विश्वास आहे.

पुन्हा वेमांना हा धागा जाहिरात वाटेल न वाटेल.. तो त्यांचा वैयक्तिक दृष्टीकोन असेल. अर्थात त्यांनी 'ही जाहिरात नाही असे ठरवले' आणि 'त्यावर चर्चा करू नये' असे सांगितले तर माझी निर्विवाद माघार असेलच.
माझ्यामते हा प्रश्न कोण्या एकाचा नसून प्रत्येक वाचकाचा आहे. लेख वाचणार्‍या प्रत्येकाला ही जाहिरातही असू शकते हे कळाले पाहिजे, मी काल बेकरीवर ह्याबाबतीत माझा दृष्टीकोन स्पष्ट केला होता.

खाद्यानं डॉक्टर ला न विचारता इथले वाचून सुरू केलं तर त्यात लिहिणारीची काय चूक? >>> राजसी...चांगले वाईट घडून गेल्यानंतर कोण चूक कोण बरोबर हा ब्लेमगेम खेळावा लागू नये म्हणून तर हा अट्टहास आहे हे तुम्हाला अजूनही लक्षात आले नसेल तर... मी ह्यापुढे तुम्हाला काहीही समजाऊ शकत नाही.

चांगले वाईट घडून गेल्यानंतर कोण चूक कोण बरोबर हा ब्लेमगेम खेळावा लागू नये म्हणून तर हा अट्टहास आहे---- ह्या पॉईंट् वर मायबोलीवरचा प्रत्येक बीबी बंद करायला हवा. रेसिपी बीबी वर कोणी allergy info लिहीत नाही. बटाटेवडे बीबी वर कोणी पोट बिघडण्याबद्दल लिहिले नाही. साबुदाणा वडावर कोणी पित्ताबद्दल लिहिलं नाही इ.

Pages