फुकटात विनासायास वेटलॉस

Submitted by शाम भागवत on 3 July, 2018 - 03:17

वाढलेला पोटाचा घेर व वाढलेले वजन, सोबतीला कोलेस्टेरॉल सापडल्यामुळे नशिबी आलेल्या गोळ्या आणि आता या आयुष्यभर घ्यावयाच्या आहेत अस डॉ. नि सांगितल्यावर मनाला बसलेला हबका. काही जणांचा वाढलेला रक्तदाब व त्यावरच्या गोळ्या , मधुमेह पूर्व स्थिती लक्षात आल्यावर उडालेली घाबरगुंडी तर मधुमेह झाल्याचे निदान झाल्यावर घरातल्या सर्वांच्या चेहऱ्यावर अवतरलेली काळजी. आणि या सगळ्यातून हे खा व हे खाऊ नका ची भली मोठी यादी. शिवाय गुडगेदुखी, ऍसिडिटी , .. , .., .. असच बरच काही यांच्यासाठी हे लिहितोय.

ह्या सगळ्या त्रासातून कस मुक्त व्हायच?, एक पैसा जास्त खर्च न करता हे कस साधायच? श्रीमंत असो की गरीब दोघांनाही जमू शकेल,तसेच स्त्री पुरूषात अजिबात भेदभाव न करता दोघांनाही एकच पद्धत कशी वापरता येईल, तसेच त्यामागे विज्ञानाचा भक्कम पाठिंबा असला पाहिजे. वगैरे वगैरे .......
थोडक्यात आखूड शिंगी, बहुदुधी, गरीब, दूध काढताना लाथा न मारणाऱ्या बहुगुणी गायीबद्दल हे लिहितोय.

कै. डॉ.श्रीकांत जिचकार एक अवलिया माणूस. एमबीबीएस, एमडी झाल्यावर आयपीएस त्यानंतर चक्क आयएएस. पण चारच महिन्यात नोकरीचा राजीनामा देऊन आमदार, मग मंत्री, राज्यसभेचे खासदार. या माणसाने प्रगती तरी किती वेगाने करावी? पण हे सगळं ४९ वर्षांच्या आयुष्यात साधायच म्हणजे एवढा वेग हवाच की हो!

घरातल्या ग्रंथालयात बावन्न हजार पुस्तक. विद्वत्ता दाखविण्यासाठी जाहिरात म्हणून नक्कीच जमवलेली नसणार. उलट सगळी वाचलेली असण्याची शक्यता जास्त. कारण ४२ विद्यापीठातून मिळवलेल्या २० पदव्या. बहुतेक सगळ्या प्रथम श्रेणीतून मिळालेल्या. २८ सुवर्णपदक मिळवलेला माणूस हा. नक्कीच पुस्तके वाचलेली असणार.

तर असा हा माणूस. भरपूर परदेश वाऱ्या केलेला असूनही त्याची भारताशी जुळलेली नाळ तुटली नव्हती. साधारण अशी माणसे थोडीशी भारतीय संस्कृतीशी फटकून वागतात. पण इथेही आपल्याला आश्चर्याचा धक्का बसतो. भारतीय संस्कृती व प्राचीन इतिहास, तत्त्वज्ञान व संस्कृत यात एमए केलेय. हे मी आपल वानगीदाखल सांगतोय कारण तस पाहिल तर त्यांनी १० विषयात एमए केलेय. इतकच काय मानाची डी. लिट. पदवी मिळालीय त्यांना संस्कृतामध्ये.

तर सांगायच म्हणजे अशा माणसाने १९९७ साली एक नवीन विचार भारताला दिला. त्यावेळी ते राज्यसभेचे सभासद होते. पुणे महानगर पालिकेत मा. शशिकांत सुतार नावाच एक मोठ्ठ प्रस्थ होत. त्यांनी बालगंधर्व रंगमंदिरात जिचकारांना भाषणासाठी बोलावल. त्यासाठी सगळी व्यवस्था जातीने केली. आपोआपच बरेच मान्यवरांनी रंगमंदिर भरून गेल.

त्यांनी सांगितल की, "शरीरात तयार होणारे अतिरिक्त इन्शूलीन बऱ्याच रोगांचे कारण आहे." स्थूलता, त्यातून मधुमेह, वाढलेला रक्तदाब, त्यातून मग अंजोग्राफीची तपासणी, त्यात नक्की काहीतरी सापडतच. मग अंजोप्लास्टी. सगळाच प्रकार खर्चिक. पण मरणाची भीती वाटायला लागली की माणूस करतो खर्च. त्याला वाटतं की झाल सगळ करून. आता काही आपल्याला होणार नाही. पण कसच काय. पाच सहा वर्षात आणखी खर्चिक बायपाससाठी हॉस्पिटलची वारी ठरलेली.

मग यावर सोपा उपाय काय? दिवसातून फक्त दोनदाच जेवा. काहीही खा. भूक भागेपर्यंत कितीही खा. तूप लोणी बिनधास्त खा. मांसाहारही चालेल. फक्त हे जेवण ५५ मिनिटांत संपवले पाहिजे. आणि दिवसातून ४५ मिनिटे भरभर चालण्याचा व्यायाम केला पाहिजे. महागड्या जिम नको की, आहारतज्ञांना पैसे द्यायला नको. दवाखान्याची पायरी चढायची कधी वेळही येणार नाही. किती सोपे आहे ना? पण अवघड बाब पुढे आहे. ते पुढे सांगतात की, "दोन जेवणामध्ये काहीही खाऊ नका." याकाळात तोंड उघडायचे ते फक्त बोलण्यासाठी किंवा पाणी पिण्यासाठी. बस्स. औषधांच्या याद्या विसरून जा. हे खा व हे खाऊ नका याची प्रत्येक डॉक्टर व आहारतज्ञांप्रमाणे बदलणारी यादी व त्यातून उडणारे गोंधळ संपवून टाका.

सगळ वैज्ञानिक नियमावर आधारलेले भाषण. समोर अनेक मान्यवर बसलेले. त्यामुळे बऱ्याच वेळेस अशी भाषणे इंग्रजीत चालतात आणि जिचकार तर इंग्लिश लिटरेचर मध्येपण एमए केलेले. पण तरीही हा विचार सर्वसामान्य माणसाला कळला पाहिजे यासाठी हे भाषण त्यांनी मराठीतून दिले आहे. समोर नुसते मान्यवर नाही तर पुण्याचे मान्यवर बसणार आहेत म्हणून त्यांनी अनेक इंग्रजी संज्ञांना पूरक मराठी संज्ञा शोधून काढल्या होत्या व त्या संज्ञा पाठ करून मगच ते व्याख्यान द्यायला आले होते. (या मराठीतील संज्ञा शोधणे व पाठ करणे हे कामही त्यांना सोपेच गेलेले असणार. कारण ते महाराष्ट्राच्या विश्वकोश निर्मिती मंडळाचे सभासद होते!!!) एखाद्या माणसाला बेंबीच्या देठापासून कळकळ असते म्हणजे काय हे समजून घ्यायचे असेल तर त्यासाठीही हे व्याख्यान ऐकायला हरकत नाही.

आपल्या या कार्याचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी "नागपूर फिटनेस मुव्हमेंट" आणि "पुणे फिटनेस मुव्हमेंट" अशा दोन संस्था सुरू केल्या. पण त्या काळात फेसबुक किंवा व्हॉटऍपस वगैरे काहीच नव्हत. नाहीतर याचा प्रसार फार वेगाने झाला असता. मनोगत, मायबोली किंवा मिसळपाव सारखा एखादा संकेतस्थळ तयार करता अल्लाही असत कदाचित. पण वाचणार कोण? इंटरनेट फार महाग होत त्यावेळेस. टाटा कंपनीच्या व्हीसएनएल ला वर्षाकाठी पाच सहा हजार भरल्यावर कनेक्शन मिळायच. शिवाय घरात फोन असला पाहिजे ही पूर्वअट. आणि नेट वापराला सुरवात झाली की दर मिनिटाला एक टेलीफोनचा कॉल एवढे पैसे टेलिफोनच्या बिलात यायचे तो खर्च वेगळाच. नेट वापरणे हे सामान्यांच्या कुवती बाहेरची गोष्ट होती. अपवाद फक्त आयटी मधल्या लोकांचा!

तरीपण राज्यसभेच्या सदस्याला बऱ्याच सोयी सुविधा असतात. ओळख पाळख असते. त्यामुळे प्रसाराचे काम चालू होते. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते. दोनच वर्षांनी म्हणजे १९९९ साली झालेल्या लोकसभेच्या निवडणूकीसाठी काँग्रेसकडून त्यांना तिकिट मिळाल पण फक्त ३०००+ मतांनी पडले. इतकेच नव्हे तर राज्यातले आणि त्याचबरोबर केंद्रातले काँग्रेसचे सरकार पडले. प्रसारावर फारच मर्यादा आल्या.सर्वात मोठे दुर्दैव म्हणजे २००४ साली जेव्हा कॉग्रेसचे सरकार राज्यात व केंद्रात आले त्यानंतर दोनच आठवड्यात त्यांचा अपघाती मृत्यू झाला. मला वाटते या नवीन विचारांचे फक्त बी लावायचे काम नियतीने त्यांच्यावर सोपवले होते.

त्यांचा या भाषणाचा एक ऑडिओ यूट्यूबवर होता. पण दोन तास तीन मिनिटांचा ऑडिओ म्हटल्यावर बरेच जण तो उघडून सुद्धा बघत नसत. आणि यदाकदाचित कोणी उघडलाच तर बरेच जण पहिले प्रास्ताविक संपेपर्यंतही कळ काढू शकत नसत. त्यामुळे मूळ भाषण सुरू होण्याआधीच तो बंद केला जायचा. एवढा वेळ असल काही ऐकायला तो थोडाच वपू किंवा पुल चा व्हिडिओ होता की व्यायाम/प्रवास करताना ऐकायचा गाण्याचा अल्बम होता? ही राजकारणी लोक ही अशीच. समोर माइक आला की यांना वेळेच भानच राहत नाही. अशी कॉमेंटपण कोणीतरी केली असेल असा मला दाट संशय आहे.

बरीच वर्षे निघून गेली. जिचकारांनी लावलेले बी रूजण्यासाठी अनुकूलतेची वाट पाहत युट्युबवर पडून होत. ही अनुकुलता लाभणे फार अवघड होत. त्याला वेळ लागणार हे त्या बियाणाला माहीत होत. आणि सहा वर्षापूर्वी ते एकाच्या हृदयात रूजल. हा माणूस एमबीबीएस, एमडी होता. पण रोग पाहून औषध देणारा नव्हता. तर रोग होऊच नये यासाठी काय करता येईल यातला तज्ञ होता. प्रामाणिक होता. पैशासाठी काम करणारा नव्हता. समाजाच्या भल्यासाठी काम करण्याची इच्छा असणारा असा होता. मुख्य म्हणजे माहिती वाचून चर्चा करणारा नव्हता तर त्यासाठी स्वतःवर प्रयोग करायला तयार असणारा व त्यासाठी स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करायला तयार असणारा होता. नियतीने अगदी अचूकरीत्या लातूरच्या डॉ. जगन्नाथ दीक्षित यांची निवड केली होती.

डॉ. दीक्षित सध्या ते लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विभाग प्रमुख आहेत व गेली सत्तावीस वर्षे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अध्यापन करत आहेत. "स्थूलत्व निवारण आणि मधुमेह प्रतिबंध" या विषयावर त्यांनी संशोधन केले.यात त्यांनी प्रथम स्वतःवर प्रयोग केले. नातेवाइकांवर प्रयोग केले. जवळच्या मित्रांवर प्रयोग केले. या सगळ्याच्या व्यवस्थित नोंदी ठेवल्या. मग मात्र त्यांनी लातूर व औरंगाबाद येथील हजारो लोकांवर प्रयोग केले. वैज्ञानिक नियतकालिकात प्रबंध लिहिण्यासाठी या प्रयोगाचे योग्य दस्तावेजीकरण केले व अनेक प्रबंध प्रकाशीतही केलेले आहेत.

पण प्रसारासाठी नुसते प्रबंध लिहून भागत नाही यासाठी त्यांनी व्याख्याने द्यायला सुरवात केली. पुण्याच्याच बालगंधर्व रंगमंदिरात कै. डॉ. श्रीकांत जिचकारांच्या स्मृतीला अभिवादन करून सुरवात झालेले त्यांचे व्याख्यान ऐकण्यासाठी खाली लिंक देत आहे. हेही व्याख्यान खूप मोठे आहे. पहिले प्रास्ताविक ३० मिनिटे चालते. त्यामुळे व्याख्यानासाठी आतुर झालेले बरेच जण कंटाळून पहिल्या काही मिनिटांनंतर व्याख्यान बंद करून टाकतात. हे प्रास्ताविक पाहू नये म्हणून मी हे सांगत नाहीये. तर थोडा धीर धरावा असे सुचवत आहे. या प्रास्ताविकातूनही तुम्हाला काही मुद्दे मिळू शकतात.

२०० च्या वर व्हॉटऍपस ग्रुप स्थापन करून व फेसबुकच्या माध्यमातून ही चळवळ अठ्ठावीस हजार माणसांपर्यंत पोहोचली आहे. अनेक देशातील माणसे यात आहेत. पण हे सगळे सांभाळणे आता अवघड होत चाललेय. कार्यकर्त्या डॉक्टरांना यासाठी वेळ देणे अवघड होत चाललेय. यासाठी आता एक वेबसाईटच उघडायचे प्रयत्न चालू आहेत. तस झाल की एकाच ठिकाणी सगळी माहिती एकत्रित होईल. वेळ वाचेल. एक कोटी लोकांपर्यंत लोकांपर्यंत पोहोचायचे उद्दिष्ट समोर ठेवून आता काम सुरू होणार आहे.

खर म्हणजे ह्या व्याख्यानाचा सारांश देण्याचा माझा विचार होता. पण मी मुद्दामहून तस करत नाहीये. कारण तस केले तर लोक मूल व्याख्यान न ऐकताच चर्चा करायला सुरवात करतात. हे व्याख्यान ऐकल्यावर फारशा शंका उरत नाहीत. शिवाय त्यांनी काही फोन नंबरही दिलेले आहेत. त्यावर तुम्ही व्हॉटऍपवर प्रश्न किंवा शंका विचारू शकता.

डॉ. दीक्षित यांच्या व्याख्यानाची लिंक खाली देत आहे. दोन तास सलग वेळ काढता येईल अशी वेळ निवडून निवांतपणे पहा.
https://www.youtube.com/watch?v=edKaI5gxaNQ

ही डॉ. दीक्षित यांची फेसबुक पेजची लिंक आहे. त्यात लाभार्थींची नावे, अनुभव व मोबाईल नंबर दिले आहेत.हे तुम्ही केव्हाही पाहू शकता! https://www.facebook.com/weightlosseffortlessly/

डॉ. जिचकार यांनी याच व्याख्यानात बी पेरण्याचे काम केले. हा ऑडिओ आहे. दोन तास सलग वेळ काढता येईल अशी वेळ निवडून निवांतपणे पहा.
https://www.youtube.com/watch?v=8-kw3hGUwW4

मी स्वतः या विषयातला तज्ञ नाही. पण या संकेतस्थळावर या विषयातले बरेच तज्ञ असल्याने साधक बाधक चर्चा होऊन हा विषय आणखी स्पष्ट होईल याहेतूने हे लेखन केले आहे.

एक महत्त्वाची सूचना :
ज्यांना मधुमेह आहे अशांनी HbA1c आणि fasting insuline या दोन तपासण्या करून त्याचे अहवाल डॉ. दीक्षित यांना पाठवावेत. या दोन तपासण्या म्हणजे रक्तातल्या शर्करेचे प्रमाण दाखवणाऱ्या तपासण्या नव्हेत. त्यानंतर त्यांच्याच सल्ल्यानेच पुढील आहारयोजना सुरू करावी. परस्पर आहारयोजना सुरु करू नये.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

चांगले वाईट घडून गेल्यानंतर कोण चूक कोण बरोबर हा ब्लेमगेम खेळावा लागू नये म्हणून तर हा अट्टहास आहे---- ह्या पॉईंट् वर मायबोलीवरचा प्रत्येक बीबी बंद करायला हवा. रेसिपी बीबी वर कोणी allergy info लिहीत नाही. बटाटेवडे बीबी वर कोणी पोट बिघडण्याबद्दल लिहिले नाही. साबुदाणा वडावर कोणी पित्ताबद्दल लिहिलं नाही इ. >> जरूर, का नाही! तुम्हाला असे वाटत असल्यास आणि बदल घडवण्याची ईच्छा असल्यास घेऊनच टाका हे मिशन हाती. मी ह्या धाग्यावर अडकल्याने सध्यातरी मला ते जमण्यासारखे नाहीये.

१. लेखात अशास्त्रीय विधाने नाहीत*, उलट
>>>
मी स्वतः या विषयातला तज्ञ नाही. पण या संकेतस्थळावर या विषयातले बरेच तज्ञ असल्याने साधक बाधक चर्चा होऊन हा विषय आणखी स्पष्ट होईल याहेतूने हे लेखन केले आहे.
एक महत्त्वाची सूचना :
ज्यांना मधुमेह आहे अशांनी HbA1c आणि fasting insuline या दोन तपासण्या करून त्याचे अहवाल डॉ. दीक्षित यांना पाठवावेत. या दोन तपासण्या म्हणजे रक्तातल्या शर्करेचे प्रमाण दाखवणाऱ्या तपासण्या नव्हेत. त्यानंतर त्यांच्याच सल्ल्यानेच पुढील आहारयोजना सुरू करावी. परस्पर आहारयोजना सुरु करू नये.
<<<
अशा तळटिपा आहेत.
*अपवादः शीर्षकात आलेले दोन 'अतिसुलभीकरण' प्रकारात मोडणारे शब्द आणि laymanच्या दृष्टीकोनातून त्यांचा अर्थः
फुकट : उपास करायला पैसे पडत नाहीत, वेट वॉचर्ससारखी डायेट्स करायला किंवा दिवेकरांसारख्या आहारतज्ज्ञांचा सल्ला घ्यायला लागतात
विनासायास : चालण्यासारखा सोपा व्यायाम जो बहुतेकांना जमू शकतो आणि आपल्या वेळापत्रकात बसवता येऊ शकतो, जिम जॉइन करा, घाम गाळा असलं काही रिगरस करायची आवश्यकता नाही

२. प्रतिसादांत उल्लेख आलेला पहिला अशास्त्रीय क्लेम (मिताहाराबाबत) हा मिसळपाव नावाच्या कुठल्यातरी साइटवर केला गेला होता, मायबोलीवर नव्हे. त्या अशास्त्रीय विधानाला मायबोलीवर प्रसिद्धी हेला यांनी दिली.

३. लेखात
>>>
खर म्हणजे ह्या व्याख्यानाचा सारांश देण्याचा माझा विचार होता. पण मी मुद्दामहून तस करत नाहीये. कारण तस केले तर लोक मूल व्याख्यान न ऐकताच चर्चा करायला सुरवात करतात. हे व्याख्यान ऐकल्यावर फारशा शंका उरत नाहीत. शिवाय त्यांनी काही फोन नंबरही दिलेले आहेत. त्यावर तुम्ही व्हॉटऍपवर प्रश्न किंवा शंका विचारू शकता
<<<
असा स्पष्ट उल्लेख आहे.

असं असताना मुळातच तज्ज्ञ नसलेल्या व्यक्तीला 'तुम्ही तुम्हाला काय कळलं ते लिहा, उंटावरून शेळ्या हाकू नका, तरच आम्ही चर्चा करू', 'तुम्ही तज्ज्ञ असलात तरच तुमच्या पोस्ट्सना किंमत देता येईल', 'अरेच्च्या! हीतर जाहिरात वाटते आहे' इ.इ. म्हणायचं, ते त्यांना काय कळलं ते सांगायला गेले की फसतात, मग अशास्त्रीय माहिती धाग्यावर अ‍ॅड होत जाते हे दिसत असून खोदत राहायचं, जी अशास्त्रीय माहिती लोकांना अपायकारक ठरू शकते अशी आपल्याला कळकळ वाटते आहे ती माहिती/तो धागा वाहून जाऊ न देता प्रतिसाद देऊन देऊन सतत पहिल्या पानावर ठेवायचा, 'एकदा जाहिरात म्हणा, मग वाट्टेल तितकी अशास्त्रीय माहिती द्या' असं सांगायचं ही फारफार इन्टरेस्टिंग विचारसरणी आणि पद्धत आहे.

भागवतांना या प्रणालीवर साधकबाधक चर्चा व्हायला हवी होती, ती इथे नाही तरी निदान सईच्या धाग्यावर होते आहे, अभ्यासपूर्ण प्रकारे होते आहे. मग आपण तज्ज्ञ नाही हे लक्षात घेऊन भागवतांनीतरी त्या धाग्यावर श्रवणभक्ती (वाचनभक्ती) करावी की नाही? फारतर शंका विचाराव्यात. तर त्यांचाही 'माहिती' देण्याचा उत्साह कमी होत नाही!

यातून दीक्षित चर्चेत राहात आहेत (आणि खरंच ही जाहिरात असेल, तर) भागवतांचा उद्देश कित्येक पटींनी सुफळ होतो आहे असं मलातरी चित्र दिसतंय. Happy

आज डॉक्टरांशी चर्चा झाली. त्या अमराठी आहेत. दोन दिवसांपूर्वी त्यांना व्हिडीओजच्या लिंक्स दिलेल्या होत्या. त्यांनी पाहीले ते. आज भेटायला गेल्यावर इंटरेस्टींग आहे म्हणाल्या. त्या रिसर्च पेपर्स वाचून सांगतील. तसेच दीक्षितांशी चर्चा देखील करणार आहेत (व्हिडीओमधे त्यांचा नंबर दिलेला आहे) .
मला जे वाटत होते तेच त्यांनीही सांगितले
१. पूर्वीपासून भारतात दोनच वेळा खाणे होई. (आदमी को क्या चाहीये दो वक्त की रोटी अशा म्हणी पडल्या आहेत ). मी अगदी लहान असताना गावाकडे हे पाहीलेले आहे. त्यांचीही लाईफस्टाईल आता बदलली आहे.
२. ब्रिटीशांनी जिथे जिथे राज्य केले तिथे जीवनशैली बदललेली आहे ( सकाळी संध्याकाळी चहा जे अनावश्यक आहे). तसेच सकाळी ब्रेकफास्ट, दुपारी जेवण आणि रात्री भरपेट जेवण ही पद्धत.
आपल्याला आता हे नैसर्गिक वाटते. त्यांच्या मते दीक्षितांनी नवे काहीच सांगितले नाही. फक्त त्यांनी प्रयोग केले हे महत्वाचे आहे.
३. मी त्यांना विचारले की दीक्षितांनी प्रत्येक जेवणानंतर थोडे चालले पाहीजे असे सांगायला हवे होते का ? त्यावर त्या हसल्या आणि म्हणाल्या कि हा कॉमन सेन्स आहे.

माझे मत : फिरणे कॅलरीज कमी करण्यासाठी नसून अन्न पचवण्यासाठी महत्वाचे आहे (हे डॉक्टरांचे मत नाही).

भागवत सर , विपू पहा हो.

भागवत आता १५ व्या आवृत्तीतील जी माहिती देत आहेत ती अत्यंत रोचक आहे. त्या माहितीचा स्त्रोत बंद करण्याच्या कुठल्याही प्रकाराला थारा दिला जाणार नाही. - हुकुमावरुन.

स्वाती आंबोळे, आत्ता पाहिला प्रतिसाद. सहमत.

अ‍ॅडमिन / वेमा - विषयाचे महत्व्व पाहता अनावश्यक प्रतिसाद काढून टाकले तर सुटसुटीत होईल धागा.

ब्रिटिशांनी ३ चमचे साखर आणि भरपूर दूध घालून चहा प्यायला शिकवला ना? आणि प्युअर व्हेज कार्बचा मारा करणारा आहारही ब्रिटिशांनीच दिला असेल ना?

असं असताना मुळातच तज्ज्ञ नसलेल्या व्यक्तीला 'तुम्ही तुम्हाला काय कळलं ते लिहा, उंटावरून शेळ्या हाकू नका, तरच आम्ही चर्चा करू', 'तुम्ही तज्ज्ञ असलात तरच तुमच्या पोस्ट्सना किंमत देता येईल', 'अरेच्च्या! हीतर जाहिरात वाटते आहे' इ.इ. म्हणायचं, >>> असे म्हणण्यात काय चूक आहे ते पण सांगा? थांबा मीच सांगतो तसे न म्हणाल्यास << अशास्त्रीय माहिती धाग्यावर अ‍ॅड होत जाते.
अशास्त्रीय माहिती देण्यास भागवतांना कोणीही फोर्स केलेला नाही ते स्वतःच देत आहेत.

जी अशास्त्रीय माहिती लोकांना अपायकारक ठरू शकते अशी आपल्याला कळकळ वाटते आहे ती माहिती/तो धागा वाहून जाऊ न देता प्रतिसाद देऊन देऊन सतत पहिल्या पानावर ठेवायचा, >>> कळकळ वाटते आहे हे बरोबर! प्रतिसाद दिल्याने कुठलाही धागा पहिल्या पानावर येतो ह्याला काय करणार? त्यावर कोणाचा काय कंट्रोल? तुम्हाला ह्यात काय अयोग्य वाटते.

'एकदा जाहिरात म्हणा, मग वाट्टेल तितकी अशास्त्रीय माहिती द्या' असं सांगायचं >>> अहो कायद्यानेच तसं सांगता येतं. 'जाहिरात' ह्या सदराखाली काहीही सांगता येतं आणि कोणी त्यावर आक्षेप घेऊ शकत नाही. 'एका माणसाने 'एक्स' डिओड्रंट कंपनीवर केस केली की मी एक्स वापरला तरी एकही मुलगी माझ्याजवळ आली नाही. ती केस तो हरला कारण कोर्टाचे म्हणणे होते जी 'ती जाहिरात होती शात्रीय क्लेम नाही'

भागवतांना या प्रणालीवर साधकबाधक चर्चा व्हायला हवी होती, ती इथे नाही तरी निदान सईच्या धाग्यावर होते आहे, अभ्यासपूर्ण प्रकारे होते आहे. मग आपण तज्ज्ञ नाही हे लक्षात घेऊन भागवतांनीतरी त्या धाग्यावर श्रवणभक्ती (वाचनभक्ती) करावी की नाही? फारतर शंका विचाराव्यात. तर त्यांचाही 'माहिती' देण्याचा उत्साह कमी होत नाही! >>बरोबर तसे मी सईच्या धाग्यावर लांबलचक प्रतिसादात हेचलिहिलेच आहे. तुम्ही ज्याला 'माहिती' देणं म्हण्तात त्याला आम्ही जाहिरात म्हणतो.. शब्दाचा काय तो फरक ....भावना एकच.

यातून दीक्षित चर्चेत राहात आहेत (आणि खरंच ही जाहिरात असेल, तर) भागवतांचा उद्देश कित्येक पटींनी सुफळ होतो आहे असं मलातरी चित्र दिसतंय. Happy >> दीक्षितांचं माहित नाही पण लेख जाहिरात आहे हे एका वाचकाला कळाले तरी ऊद्देश सुफळ होतो आहे असे मला तरी दिसते.

whatsapp वर आलेला मेसेज

. दिक्षितसरांचे व्याख्यान सार

दोनच वेळा जेवा अन् डायबिटीसला पळवा ।
अहो,दोनच वेळा जेवा अन् डायबिटीसला पळवा ।।ध्रु।।

चहामध्ये दूध अगदी थोडेसेच टाका।
डायबिटीस असेल तर ग्रीन टी, ब्लॅक टी, नारळ पाणी प्या।
दोनच वेळा जेवा अन् डायबिटीसला पळवा।१।

दोन जेवणामध्ये हवे तेवढे ताक प्या।
दही मात्र त्यासाठी घरचेच वापरा।।
दोनच वेळा जेवा अन् डायबिटीसला पळवा।२।

जेवताना आवडीचे सर्व काही खा।
अहो! पिझ्झा, बर्गर काय वडापाव सुद्धा खा।
हे मात्र सगळे जेवणाच्या ५५ मिनिटातच संपवा।
दोनच वेळा जेवा अन् डायबिटीसला पळवा।३।

दिवसातला पाऊण तास व्यायामाला द्या।
चाला, पळा, पोहा किंवा सायकल तरी चालावा।
दोनच वेळा जेवा अन् डायबिटीसला पळवा।४।

विनाखर्चिक, विनासायास वेटलॉस कसा होतो बघा।
पाच सात किलो वजन बघता बघता कमी करा।
दोनच वेळा जेवा अन् डायबिटीसला पळवा।५।

नियमितपणे 'एच बी ए 1 सी' करा ।
व फास्टिंग शुगर नव्हे 'फास्टिंग इन्शुलिन' टेस्ट करा।
दोनच वेळा जेवा अन् डायबिटीसला पळवा।६।

'दोनच वेळा जेवा' हा मंत्र जगाला द्या आणि
डायबिटीसला भारतातूनच नव्हे तर जगातून हद्दपार करा।
दोनच वेळा जेवा अन् डायबिटीसला पळवा।७।

दिक्षित सरांचे आभार मनापासून माना।
त्यांनी दिलेला हा मंत्र घरोघरी पोचवा।
दोनच वेळा जेवा अन् डायबिटीसला पळवा।।८।।
श्री. अशोक जोशी, पुणे
९८९००६६६८४

आता तुमच्या "जगाच्या कल्याणा संतांच्या विभूति " टाइप पोस्ट्स वाचून काय एकेक .... असतात असे नकारात्मक,depressing विचार माझ्या मनात तुमच्या बद्दल(कधीही न भेटलेल्या व्यक्तीबद्दल येत आहेत) तर मला तुमच्या पोस्ट्स वाचून मनःस्ताप होईल अशी तुम्ही कुठेही पूर्वसूचना दिली नव्हती, असा ब्लेम करावासा वाटतोय Happy

अति-अवांतर : ....मग रडा!!! ( माझ्या चार वर्षणच्या पुतण्याने ह्या भेटीत शिकवलेला शब्द Happy . त्याला त्याची आजी म्हणते. काहीही करुन, ऐकून, पटवून, समजून घ्यायच नसेल तर... तो स्वतः च म्हणतो, आता माझं --- मग रडा!!!झालंय Happy

अ‍ॅडमिन, माझे कालचे मेसेजेस का उडवले गेले आणि त्यातली कुठली भाषा तुम्हाला आक्षेपार्ह वाटली ह्याचे स्पष्टीकरण मिळू शकेल का?
ड्यू आयडी असल्याचा आरोप करणे इथे पहिल्यांदाच झाले आहे का? तसे असल्यास मायबोलीवरचे निम्मे बाफ बंद करावे लागतील, ते जर सगळीकडे राजरोस चालू शकते तर केवळ ड्यू आयडी असल्याचा संशय व्यक्त करणे हे कारण तुम्हाला मेसेजेस उडवण्यासाठी योग्य वाटते का? माझ्या विधानातले कुठले शब्द मर्यादेचा भंग करणारे होते हे कृपया निदर्शनास आणावे.

Submitted by मार्मिक on 30 August, 2018 - 10:32

>>>अ‍ॅडमिन, ह्याबाबतच्या स्पष्टीकरणाची अजून् वाट पाहात आहे. माझ्या पोस्टमध्ये एकही वावगा शब्द असल्यास दाखवून द्यावा. आशा आहे की पुढच्या वेळेस कारवाई होण्यापूर्वी किमान खुलासा मिळेल.

हाब, भरत, हेला आणि इतर,
सर्व प्रथम मी सांगू इच्छितो की हा धागा पहिल्यांदा वाचताना त्यातला प्रचारकी टोन मला सुद्धा खटकला, त्यातली पहिली जितकार प्रशस्ती मला सुद्धा असंबद्ध वाटली.(ती कशासाठी असावी ते पुढे लिहितो)

पण एखाद्या गोष्टीने भारावून जाऊन तिची बेफाट स्तुती करायचा धागाकर्त्याचा गुण आपण नोटबंदी पासून जाणतोच, आणि स्वतःला आवडलेल्या गोष्टीकडे ,मग तो चहाचा ब्रँड असो, दुकान असो, सिनेमा असो किंवा हॉस्पिटल असो लोकांना वळवण्याचा काही लोकांचा स्वभाव असतो,
तेव्हा असतो स्वभाव एकेकाचा म्हणून सोडून देणे सोपे राहील.

एक क्षणभर आपण धरून चालू, हा लेख त्यांनी खरोखरच जाहिरात हा हेतू मनात ठेवून लिहिला आहे,
मायबोलीच्या असा वापर न होऊ देण्याबद्दल वेमा जागरूक आहेतच, त्यांनी वर काही प्रतिसाद उडवले म्हणजे ते या धाग्यावर लक्ष देखील ठेऊन आहेत,
आणि निश्चितच ते हाब vs भागवत युक्तिवादाचा निकाल काय लागतो या प्रमाणे निर्णय घेणार नाहीयेत, जिकडे त्यांना जाहिरात वाटते तिकडे ते स्पष्ट पणे भूमिका घेतात.
थोडक्यात , मालकांना ही जाहिरात वाटत नाहीये तर तुम्ही,मी आक्षेप घेऊन काही फरक पडणार नाहीये.
या आधी देवयानी हॉस्पिटल वरच्या लेखाने वरच्यासारखाच वाद झाला होता, आत्ताची आणि तेव्हाची माबो ची भूमिका सारखीच आहे.

तेव्हा कोणता लेख जाहिरात आहे आणि कोणता नाही याची माबो वरच्या गाईडलाईन्स सैल आहेत असे मी म्हणेन, कोणी या लूप होल्स चा फायदा घेऊन लेखांमधून जाहिरात करत असेल तर त्याला आपण काही करू शकत नाही.

तेव्हा "माझ्या मते ही जाहिरात आहे असे स्पष्ट मत व्यक्तकरून तो मुद्दा आपण सर्वांनी निकालात काढावा,

थिअरी मांडताना काही महत्वाच्या गोष्टींचे ओव्हर्सिम्प्लिफिकेशन झालेले, पण तुम्ही सर्वांनी पिन पॉईंट प्रश्न विचारल्याने धगलेखकाला त्याचे योग्य ते स्पष्टीकरण करायला लागले हा तुमच्या पहाऱ्याने लोकांचा झालेला फायदा आहे .
लेखकाला जास्त काटेकोर माहिती द्यावी लागेल असे प्रोबिंग प्रश्न या पुढेपण तुमच्याकडून आले तर लोकांना जास्त फायदा होईल असे मला वाटते.

* अवांतर- आईशी IF बद्दल बोलताना तिला सई चा लेख वाचायला दिला, ती फारशी convinced नव्हती, बरेच डोके फोड, सई चेच जुने लेख वगैरे सगळे उपाय झाल्यावर जिचकार प्रशस्तीने भरलेले WA fwd वाचायला दिले, तिला अचानक या थिअरी मध्ये दम दिसायला लागला Sad
तेव्हा जिचकार प्रशस्ती का ? हा प्रश्न माझ्यासाठी सुटला

** अति अवांतर- " माझे नोटांबंदी बद्दल काय मत होते ते मला तपासून पहायचे आहे, माझ्या जुन्या धाग्याची लिंक द्या " असा शामरावांचा कुठेतरी प्रतिसाद वाचला,
सर, तो तुमचाच धागा होता, तुमच्या लेखनात मिळेल.

Saying this,
मला वैयक्तिकरित्या सई ची विषय मांडण्याची पद्धत रुचते, त्यामुळे मला काही शंका असतील तर मी त्या धाग्यावर विचारीन.

नोटबंदी काळात मी मायबोलीवर नव्हतो. असतो तरी राजकारणा संदर्भातील चर्चेत भाग घेणे मी कैक वर्षे पूर्वीच सोडले आहे. त्यामुळे भागवतांचा माबो परिचय नव्हता.

अवांतर- आईशी IF बद्दल बोलताना तिला सई चा लेख वाचायला दिला, ती फारशी convinced नव्हती, बरेच डोके फोड, सई चेच जुने लेख वगैरे सगळे उपाय झाल्यावर जिचकार प्रशस्तीने भरलेले WA fwd वाचायला दिले, तिला अचानक या थिअरी मध्ये दम दिसायला लागला Sad >> सिंबा, हीच तर धोक्याची घंटी आहे ना? ज्याबद्दल आपण बोलत आहोत.
जाहिरातींचे कामच असते ईमोशनल अपील करून एखादी वस्तू/सेवा घेण्यास भाग पाडणे. आता डॉ. जिचकार हयात नसतांना त्यांचे नाव का वापरावे हा एक मोठ्ठा नैतिक प्रश्न आहे. कामाचे श्रेय देणे वेगळे आणि नाव वापरून प्रसार करणे वेगळे. पुन्हा हे वैज्ञानिक क्षेत्र आहे ईथे प्रत्येक वर्षी जुने ज्ञान/शोध रद्दबातल ठरते किंवा सुधारल्या जाते (संदर्भ २०१६ चे ऑटोफॅजी चे नोबेल प्राईझ) ... अश्या वेळी दशकांपूर्वीच्या भाषणांचा रेफरंस देणे आणि लोकांनी त्यावर विश्वास ठेवणे हा दॄष्टीकोन कितपत वैज्ञानिक म्हणता येईल ?

हाब vs भागवत युक्तिवादाचा निकाल >> एकतर "vs" आणि युक्तीवाद वगैरे असे मी खरच मानत नाही. फारतर असे म्हणेन भागवतांच्या लेखावर/कृतीवर आक्षेप आहे आणि तो का आहे हे सांगण्याचा प्रयत्न चालू आहे. व्यक्ती म्हणून सोडा माबोचे सदस्य म्हणूनही भागवतांना कुठल्याच प्रकारचा विरोध नाही.

राहिला मुद्दा मायबोली गाईडलाईन्स आणि वेमांनी वाद निकालात काढण्याचा ...तर पहिले मी असे म्हणेन की
मायबोली नियम, वेमांचा निकाल आणि सूचना नेहमीच निर्विवाद मान्य असतात. समजा काही कारणाने त्या पटल्या नाहीत तर तसे नमूद करेन. पण निकाल /सूचनांचा आदरपूर्वक स्वीकार करेन हे नक्की.

आता पुढे...
अनेक चर्चांसारखी ही चर्चा मायबोली गाईडलाईन्स बद्दलची नसून नैतिक जबाबदारीची आहे जशी ती कॉपीराईट बद्दलच्या धाग्यावरही होती.
भागवत जे लोकांचे केवळ पॉझिटिव अनुभवच ऊद्धृत करीत आहेत त्यात कुणाला प्रचंड मोठ्ठा रेड फ्लॅग 'डेटा मायनिंग बायस' दिसत नाही का? म्हणजे आपली थिअरी कन्फर्म करणार्‍या केसेसच फक्त ऊदाहरणादाखल द्यायच्या.
असे होऊ नये पण समजा दुर्दैवाने एखादा मायबोलीकर 'मला ह्या पद्धतीने अमूक तमूक असा भयानक त्रास झाला, चक्कर आली ऊलट्या झाल्या बेशुद्ध पडलो, आधी नसलेली हेल्थ कंडिशन आता तयार झाली वगैरे वगैरे काहीही असू शकते' (सईच्या धाग्यावर त्रासाबद्दल लिहिलेच आहे कोणीतरी) तर त्याची जबाबदारी कोणाची?
भागवत म्हणणार आहेत का की ही पद्धती मी सुचवली होती ही माझी जबाबदारी आहे? मायबोलीकर ईंटरनेट सॅवी आहेत, पण तळेगाव बुद्रूकमधल्या स्मार्टफोन धारकाने वॉट्सअ‍ॅप फॉरवर्डने भारावून जाऊन प्री एग्झ्स्टींग कंडिशन असतांना ही आहारपद्धती चालू केली तर कोणीही म्हणणार (वर राजसी ह्यांनी म्हंटलेच आहे) 'त्याची चुकी आहे त्याने आधी टेस्ट करायला हव्या होत्या माहिती काढायला हवी होती'
म्हणजे तो माणूस वॉट्सअ‍ॅप मॅसेज येण्याआधी जास्त सुखी होता/ हेल्थी होता आणि आता नसलेला हेल्थ प्रॉब्लेम होऊन बसला असेच झाले ना?
कोणी घ्यावी ही जबाबदारी नंतर ब्लेमगेम करून नुकसान भरून निघणार का?

पुन्हा वरती देऊदत्त ह्यांनी दिलेलेया कवितेप्रमाणे कोण कोणाला काय मॅसेज पाठवतो आहे ह्याला काही धरबंद आहे का? हेतू लितीही ऊदात्तं असला तरी सोशल मिडिया मधून प्रसार ही तर हेल्थ क्रायसिसची पर्फेक्ट रेसिपी आहे असे वाटत नाही का? ह्या आहारपद्ध्तीचा प्रसार डॉक्टरांच्या नेटवर्कच्या माध्यमातूनच करणे योग्य नव्हे का? किमान ते hippocratic oath ने नैतिक दृष्ट्या बांधील असतात... त्यातही ऊडदामाजी काळे गोरे असतातच तर सामान्य माणसाची काय कथा?

असे होऊ नये पण समजा दुर्दैवाने एखादा मायबोलीकर 'मला ह्या पद्धतीने अमूक तमूक असा भयानक त्रास झाला, चक्कर आली ऊलट्या झाल्या बेशुद्ध पडलो, आधी नसलेली हेल्थ कंडिशन आता तयार झाली वगैरे वगैरे काहीही असू शकते' (सईच्या धाग्यावर त्रासाबद्दल लिहिलेच आहे कोणीतरी) तर त्याची जबाबदारी कोणाची?

---- ह्याचे उत्तर त्या शामभावनी आधीच देऊन ठेवले आहे.. "त्यांनी डॉक्टरांचा व्हिडिओ नीट बघितला होता का?, टमुक केले होते का, ढमुक केले होते का? मग आता कशाला बोंबलताय...?" इत्यादी इत्यादी.... जगदंभ जगदंभ!!

हायझेनबर्ग, तुमची पोस्ट पूर्ण पटली नाही. दिक्षित यांनी त्यांच्या भाषणात सांगितले आहे की ज्यांना डायबेटिस आहे त्यांनी संपर्क करुनच, तुमच्या स्वतःच्या डॉ च्या सल्ल्याने मगच त्यांचा डाएट प्लॅन करा. दोन वेळा पूर्ण नेहमीचे जेवण, प्रोटीन जास्त खा, ४५ मिनटे हार्ट रेट वाढवणारा व्यायाम असे सांगितले आहे. काही अघोरी उपाय सांगितले नाहीयेत. त्यांनी ज्या अनेक लोकांवर क्लिनिकल ट्रायल्स घेतल्या व त्यांचे रिपोर्ट्स जे आंतरराष्ट्रीय जर्नल्स मध्ये प्रसिध्द झाले आहेत त्याच्या लिंक्स दिल्या आहेत. शिवाय ते स्पष्ट पणे म्हणाले आहेत जर तुम्ही हे करा आणि खरच जर फायदा झाला तरच इतर लोकांना सांगा ज्यामुळे इतरांचा फायदा होईल. दिक्षितांच्या भाषणामध्ये इन्सुलिन लेव्हल बद्दल शास्त्रीय माहितीही दिली आहे. डॉ. मॅटसन च्या संशोधनाबद्दल स्वतः दिक्षितांनी भाषणात सांगितलयं. तसेच भागवतांनी स्वतः हे केले आहे का नाही ते माहित नाही आणि ती माहिती नसल्यामुळे त्यांचा लेख प्रचारी झाला आहे हे मान्य.

सोशल नेटवर्क मधून कितीतरी मेसेजेस फिरत असतात त्याची खातरजमा न करता काही अपाय झाला तर ती व्यक्त्तीच जबाबदार असेल. चुकीची योगासने केल्यानेही तोटा होऊ शकतो म्हणून योगाचे फायदे सांगाणारा लेख लिहणे/पाठवणे अयोग्य नाही. अर्थात स्वतः ला कसा फायदा झाला हे उदाहरण सांगितले तर नक्कीच जास्त परिणामकारक होईल.

काहीही चालू आहे इथे. Uhoh
मी अजुनही अशा पद्धतीने खात आहे. वजन स्टेडीली कमी होत आहे.

त्या अशोक जोशीच्या कवितेवरुन मला मात्र आता एकाच वेळी फार हसू आणि फार टेन्शनही यायला लागले आहे. हसू यासाठी की ही दिक्षित मात्रा आता कानगोष्टीसारखी बदलत बदलत पसरत जाणार आहे. कोणाकडे दोन-दोन तासांचे व्हिडिओ बघायचे आणि दोन दोन वर्षे अभ्यास करायचे पेशंस नसतात. त्यामुळे अशाच छोट्या मेसेजेस मधून भरपूर गैरसमज जोडत जोडत हे लाखो लोकांपर्यंत पोचणार, लोक आपल्या मनानेच त्यात 'काय चालतं, काय नाही चालत' हा उपासफेम उपवर्ग जोडुन ही थेरी आणखी गढूळ करणार. चार सहा वर्षांनी परत आपले पाढे पंचावन्न.

टेन्शन याचे की माझ्या परिचिताला जसा नसलेला प्री-डायबेटीस उत्पन्न झाला तसा तो अनेकांना होणार. पण ते कोणाला चुकून कुठे बोलु शकणार नाहीत, बोलले तर शामभाव सारखे लोक वस्सकन अंगावर येत 'तुम्हीच चूक केली' असा दम भरणार आणि दिक्षित नावाला बट्टा लागू नये म्हणौन तक्रारकर्त्यांनाच संपवणार.

--------------------------------------------

दिक्षितांना करोडो रुपयांच्या ऑफर येऊ लागल्या -छाप प्रसारप्रचार ह्या धाग्यावर होतोय तरी इथले सुविद्य लोक भागवतांना पाठीशी घालत आहेत ह्याचे कारण मला सायो ह्यांनी हाब यांना उद्देशून दीलेल्या ह्या प्रतिसादात व त्या आधीच्या "जहिरात हा मुद्दाच नाही' ह्या विधानात सापडले आहे.
अभिनंदन तुझं करायला आवडेल जेव्हा तुला लक्षात येईल. Happy
Submitted by सायो on 30 August, 2018 - 21:34

काळजी नको. दिक्षितांच्याच काय, इतर कुणाच्याही 'नावा'ने पोकळ भक्तभजन झालेले आपल्याला खपणारे नाहीच. सिंबा पण त्याच दिशेला इशार करत आहेत असे वाटते. Happy

----------------------------

पारु, बस्के
आता कितव्यांदा तरी सांगत आहे डॉ दीक्षित आणि त्यांच्या आहार पद्धती बद्दल आक्षेप नाही
मायबोलीवर दीक्षित नाही भागवत लिहीत आहेत, आक्षेप भागवतांच्या प्रचार कार्याबद्दल थोडक्यात जाहिरात करण्याबाबत आहे त्यामागचा हेतू बद्दल आहे त्या अनुषंगाने येणाऱ्या जबाबदारी बद्दल आहे.

चुकीची योगासने केल्यानेही तोटा होऊ शकतो म्हणून योगाचे फायदे सांगाणारा लेख लिहणे/पाठवणे अयोग्य नाही. >> निश्चित अयोग्य आहे जर तुम्ही facts न मांडता generalized claims केले तर.

उदाहरणार्थ,
भागवतांच्या लेखातल्या पाहिल्या काही ओळी बघा,

वाढलेला पोटाचा घेर व वाढलेले वजन, सोबतीला कोलेस्टेरॉल सापडल्यामुळे नशिबी आलेल्या गोळ्या आणि आता या आयुष्यभर घ्यावयाच्या आहेत अस डॉ. नि सांगितल्यावर मनाला बसलेला हबका. काही जणांचा वाढलेला रक्तदाब व त्यावरच्या गोळ्या , मधुमेह पूर्व स्थिती लक्षात आल्यावर उडालेली घाबरगुंडी तर मधुमेह झाल्याचे निदान झाल्यावर घरातल्या सर्वांच्या चेहऱ्यावर अवतरलेली काळजी. आणि या सगळ्यातून हे खा व हे खाऊ नका ची भली मोठी यादी. शिवाय गुडगेदुखी, ऍसिडिटी , .. , .., .. असच बरच काही यांच्यासाठी हे लिहितोय.

ह्या सगळ्या त्रासातून कस मुक्त व्हायच?, एक पैसा जास्त खर्च न करता हे कस साधायच? श्रीमंत असो की गरीब दोघांनाही जमू शकेल,तसेच स्त्री पुरूषात अजिबात भेदभाव न करता दोघांनाही एकच पद्धत कशी वापरता येईल, तसेच त्यामागे विज्ञानाचा भक्कम पाठिंबा असला पाहिजे. वगैरे वगैरे .......
थोडक्यात आखूड शिंगी, बहुदुधी, गरीब, दूध काढताना लाथा न मारणाऱ्या बहुगुणी गायीबद्दल हे लिहितोय.

काय वाटतय तुम्हाला ह्याबाबत? खासकरून बोल्ड केलेल्या वाक्यं बाबत?

काहीच वाटत नाही. कारण ते बहुतांशी खरे आहे. मीदेखील दोन महिन्यांपूर्वी भारावून लेख लिहिला असता. कोण कसे लिहिते हे शेवटी वेगळेच असते. भागवतांनी मुद्दाम लेख अ‍ॅट्रॅक्टिव्ह करण्यासाठी टेलिशॉपिंगच्या फॉर्मॅटमध्ये लिहिले असे जरी अ‍ॅझ्युम केले तरी मला काहीही वाटत नाही. कारण मी दीक्षितांचे व्हिडिओज ऐकले आहेत. दोन तासाचा व्हिडिओ तीन वेळा पाहिला आहे. दीक्षित स्वतःच विनासायास हा शब्द वापरतात त्यामुळे भागवतांनी वपरला तर काहीही वाटत नाही.
सई खूप सुंदर अभ्यासपूर्ण लिहिते. सर्वच जण सईसारखा अभ्यास करून लेख लिहू शकतील/लिहिले पाहिजे अशी अपेक्षा आहे का तुझी? माझी नाहीये. पण हो.भागवतांनी नमूद केले आहे की नाही हे आता आठवत नाही, परंतू साखर खाउ नका हे दिक्षित म्हणतात. (ड्रग जसे विकत नाही लहान मुलांना तशी साखरही दिली नाही पाहिजे हे त्यांचे शब्द आहेत.) सो दिक्षित हे जरूर सांगतात की तारतम्याने खा. ४५ मिनिटात ५की६ किमि चाला म्हणतात म्हणजे सुरवात हळू करा पण हे एव्हड। हवं. घाम निघाला पाहिजे. दोन जेवणात स्नॅक्स नकोत. दोन टोमॅटोब्या फोडी/ताक्/ग्रीन टी हे पर्याय चालतील. (हे खाल्ल्यानंतरचे इन्सुलिन का शुगर तपासून त्यांनी हे पदार्थ पास केले आहेत.) खूप सायंटिफिक अ‍ॅप्रोच दिसतो मला त्या माणसाचा.
५५मिनिटं खातच बसा/काहीही खा, हे दिक्षित सांगत नाहीत. भागवत सांगत असतील(सांगतात असे नाही म्हणते. जर सांगत असतील) . /किंवा अजुन कोणी तर त्याबद्दल वाद घालण्यात पॉईंट दिसत नाही. कारण मूळ दीक्षित ते तसं बोलत नाहीयेत.
व्हॉट्सॅप फॉर्वर्ड संस्कृतीबद्दल मात्र टोटली सहमत. तो वेडेपणा आहे. तिथे चर्चा होत नाहीत, निदान इथे होतात. मूळ लेख किंवा प्रतिक्रिया भारावून/भावविवश होउन लिहिलाय असे असले तरी चांगले ते घेऊन बाकीचे सोडणे हे मला बरे वाटते.

भिती खरी आहे हेला.

पारू, बस्के
आपल्या ऊत्पन्न, शिक्षण, वैचारिक पातळी आणि प्रगत शहरांपलिकडेही दुनिया आहे हो. त्यांच्याकडे स्मार्टफोन आहे, ईंटरनेट आणि लॅपटॉपही असेल पण HbA1c आणि fasting insulin संज्ञा त्यांना कळत नाहीत. आजारी पडलो आणि अगदीच अंगावर काढणे जमले नाही तर आणि तरच जो मिळेल त्या डॉक्टरकडे जायचे एवढेच माहित असते. प्रत्येक विजिटपूर्वी आपली हेल्थ हिस्ट्री लॅपटॉपवर बघणारा फॅमिली डॉक्टर त्यांना माहित नाही.... छोटी मोठी चक्कर आली तर केमिस्ट म्हणजे डॉक्टर एवढेच त्यांना कळते, तपासण्या नाही की केस पेपर नाही.. अगदीच काही मोठे झाले तर जिथे लवकर नंबर लागेल तो आपला आजचा फॅमिली डॉक्टर अशी परिस्थिती आहे. ह्या लोकांकडे पाहून शिकलेले डॉक्टर त्यांच्याशी दोन शब्द धड बोलत नाहीत बाकी काही समजाऊन सांगणे तर दूरच. ऊत्पन्नाचा सबंध नाही... सधन कुटुंबातही ही अनास्था आणि इग्नोरन्स आहे.
लेखातल्या सारखे क्लेम्स ऐकून ऐकीव माहितीवर गोळ्यांचा डोस बंद करून चार पैसे वाचवण्यासाठी असे ऊपाय करणेही होते. ऊपाय अघोरी नसतातच ते सोपेच असतात म्हणून तर केल्या जातात आणि प्री-एग्झिस्टींग कंडिशन असल्यास वाईट अवस्था होते.
बेजबाबदार जाहिरातींना बळी पडून कुटुंबासाठी पैशांची बचत करण्यासाठी अँजिओप्लास्टी टाळून परस्पर garden थेरपी केल्याने घराने कर्ता पुरूष गमावल्याचे बघितले आहे, लहान गाव किंवा तालुक्याच्या ठिकाणी अगदी शिकून नोकरी/दुकान करणार्‍या मुलांनी म्हातार्‍या आई वडिलांसाठी असे ऊपाय केल्याने कायमचे शल्य मनाला लाऊन घेतल्याचे बघितले आहे.

सोशल नेटवर्क मधून कितीतरी मेसेजेस फिरत असतात त्याची खातरजमा न करता काही अपाय झाला तर ती व्यक्त्तीच जबाबदार असेल. >> हे वाक्य लिहितांना तुम्ही तुमच्याही नकळत फॉर्वर्ड मिळणार्‍या माणसाची एक मिनिमम intellectual level गृहीत धरली ना?

अवांतर वाटेल नव्हे आहेच पण वरच्यासारखे बेजबाबदार फॉर्वर्ड्स काय हॅवॉक आणू शकतात हे आपण एवढ्यातच मॉब लिंचिंग प्रकरणात पाहिले.

हाब, तुझी ही जी कळकळ आहे ती इथे वाद घालून माबोपुरतीच मर्यादित रहातेय असं नाही वाटत? पहिल्या पॅरामध्ये सांगितलेली जी दुनिया आहे म्हणतोस त्यांच्यापर्यंत कसं पोचणार आहेस? आणि जर सगळ्यांना जागं करुन सोडायचं आहेच तर मग नुसतं दिक्षीत डाएटपुरतं नको, बर्‍याच गोष्टी आहेत. गुटखा, पान, सिगरेट, दारु- टू नेम अ फ्यु. तर ह्या सगळ्या समाजजागृती करता तुला आणि हेला यांना भरघोस शुभेच्छा. इकडे वेगळा धागा काढून सांगा. जाहिरात असली तरी हरकत नाही.

मूळ लेख किंवा प्रतिक्रिया भारावून/भावविवश होउन लिहिलाय असे असले तरी चांगले ते घेऊन बाकीचे सोडणे हे मला बरे वाटते. >>>
बस्के, तुला, मला जी जाहिरातबाजीतली खोच कळाली ती जगाच्या प्रत्येक कानाकोपर्‍यातून मायबोलीवर येणार्‍या किंवा वॉट्सॅअप मॅसेज मिळालेल्या सगळ्या वयोगटातल्या सगळ्यांना कळते का? जगाचा कानाकोपरा म्हणजे कॅलिफोर्निया, कॅनबेरा, अ‍ॅमस्टरडॅम नव्हे तर अंबड, ऊंब्रज, मालुंजे, केडगाव राहूरी, शिरूर्,असे सगळे.

काहीच वाटत नाही. कारण ते बहुतांशी खरे आहे. >> शिवाय गुडगेदुखी, ऍसिडिटी , .. , .., .. असच बरच काही यांच्यासाठी हे लिहितोय. ह्या सगळ्या त्रासातून कस मुक्त व्हायच? <<<< त्या टिंब टिंब मध्ये अजून कुठल्या त्रासांची यादी आहे ते पण सांग. बहुतांशी म्हणजे किती टक्के बरे होतात? की यादीतले बहुतांशी रोग बरे होतात? कोणते होत नाहीत? जो रोग बरा होतो तो तुझा वैयक्तिक अनुभव आहे ते पण लिही. आणि तुझा अ‍ॅनेक्डोटल अनुभव ऊरलेल्या लाखो लोकांना लागू का पडावा त्याचीही कारणं लिही.

सई खूप सुंदर अभ्यासपूर्ण लिहिते. सर्वच जण सईसारखा अभ्यास करून लेख लिहू शकतील/लिहिले पाहिजे अशी अपेक्षा आहे का तुझी? माझी नाहीये. >> चुकीचा प्रश्न.. आरोग्याशी निगडीत काहीही माहिती पुरवतांना केवळ आपल्याला कळालेले फॅक्ट्स सांगावेत बेजबाबदार क्लेम्स करून आपल्याला आवडलेल्या आहार पद्धतीची जाहिरात करू नये.... हा कॉमन सेन्स आहे ते समजण्यासाठी अभ्यास लागत नाही.
सईचा लेख तुला अभ्यासपूर्ण वाटणारच कारण ती सांगते ते मोठ्या मेहनतीने जमवलेले फॅक्ट्स सारासार विचार करून आपल्यासमोर असतात..... बेजबाबदार क्लेम्स आणि जाहिरात नाही.
दीक्षित म्हणाले की काय माहित नाही... पण तू लिहिले ते "घाम निघाला पाहिजे." ह्याला काय अर्थ आहे? डायबिटिस नसलेल्या पण ओवरवेट हार्टपेशंट ने किंवा अजून आपण हार्टपेशंट आहोत हे माहित नसलेल्याने 'घाम काढायचा' ठरवले आणि जर त्याच्या शरीराची टेंडन्सी कमी घाम तयार करण्याची असेल (हो सगळ्यांची वेगवेगळी असते) तर ४५ मिनिटात काय परिणाम होतील?
सकाळ दुपार संध्या असे गोळ्यांचे कंपल्सरी डोस असलेल्याने (सोरायसिस पासून brain aneurysm ते एपिलेप्सी पर्यंत काहीही कंडिशन असू शकते) दोन वेळा जेवायचा निर्णय घेतला आणि खाणे टाळून घेतलेल्या हेवी डोस मुळे बीपी लो झाला? काय परिणाम होतील?

हाब, तुझी ही जी कळकळ आहे ती इथे वाद घालून माबोपुरतीच मर्यादित रहातेय असं नाही वाटत? पहिल्या पॅरामध्ये सांगितलेली जी दुनिया आहे म्हणतोस त्यांच्यापर्यंत कसं पोचणार आहेस? >> म्हणजे? तिथली लोक मायबोलीवर नाहीत असे म्हणायचे आहे का? 'य' मित्र आहेत माझे अश्या लहान गावातून मायबोली रोमातून वाचणारे आणि लिहिणारे सुद्धा. मीच किती जणांना मायबोलीची ओळख करून दिली आहे. आणि मोठ्या शहरांमध्ये असे लोक नसतात असे वाटते का?

आणि जर सगळ्यांना जागं करुन सोडायचं आहेच तर मग नुसतं दिक्षीत डाएटपुरतं नको, बर्‍याच गोष्टी आहेत. गुटखा, पान, सिगरेट, दारु- टू नेम अ फ्यु. तर ह्या सगळ्या समाजजागृती करता तुला आणि हेला यांना भरघोस शुभेच्छा.
>>> Happy हे काही कळालं नाही. मला जे जमणार आणि म्हत्वाचं म्हणजे करावसं वाटणार तेवढच करणार ना मी. पण शुभेछाबद्दल धन्यवाद.

हाब, सुरवात कमीपासून करा व गोल तेव्हढे हवे असे आहे ते. अर्थात व्हिडिओ न बघता (मूळ सोर्स न बघता) काहीही फॉलो करणार्‍या लोकांबद्दल तू बरोबर लिहिलेस. पण एकंदर सर्वच बाबतीत आपण आपल्या कलाने घ्यायचे असते. तसे जे करत नसतील ती त्या त्या लोकांची चूक आहे. इथे लेख लिहिणार्‍यांची नाही. तुझी कळकळ पटली पण जागा टोटली चुकली आहे असे अजुनही वाटते.
भागवत चुकीचे लिहितात्/फॅक्ट्स लिहित नाहीत वगैरे सगळे बाजूला ठेव. भागवत हे लिहिताय्त कारण त्यांना आपण तो व्हिडिओ पाहायला हवाय. भाषणात नीट मुद्दे मांडले आहेत. ते तसेच्या तसे इथे लेखात/प्रतिक्रियात आले नाहीत तरी ते सांगतायत ना की भाषण ऐका?
तू पाहिलेस का व्हिडिओज? की ते न पाहताच हे सर्व लिहित आहेस?

तू पाहिलेस का व्हिडिओज? की ते न पाहताच हे सर्व लिहित आहेस? >> तू वाचल्यास का माझ्या पोष्टी की न वाचतास लिहित आहेस?
मी दीक्षित वीडिओत सांगतात त्याबद्दल काही लिहिले आहे का? विषय लेखातल्या क्लेम्सचा आणि जाहिरातबाजीचा आहे ना?

भागवत चुकीचे लिहितात्/फॅक्ट्स लिहित नाहीत वगैरे सगळे बाजूला ठेव. >> का? तोच तर मुद्दा आहे. तुम्ही लेखाला प्रचारकी, भारावलेला, अ‍ॅट्रॅक्टिव, टेलिईशॉपिंग फॉर्मॅट अशी विशेषणं न लावता थेट जाहिरात का म्हण्त नाहीत.

भागवत हे लिहिताय्त कारण त्यांना आपण तो व्हिडिओ पाहायला हवाय. भाषणात नीट मुद्दे मांडले आहेत. ते तसेच्या तसे इथे लेखात/प्रतिक्रियात आले नाहीत तरी ते सांगतायत ना की भाषण ऐका? >> मग लेख आणि प्रतिसादांची गरजच काय? डॉ. दीक्षितांच्या विडिओची लिंक द्या आणि संपर्क माहिती द्या. संपला विषय.

माझ्या प्रश्नाला कुणीच उत्तर दिलेले नाही.
डॉक्टर दीक्षितांचे व्हिडीओज पाहीले आहेत का ? पेपर्स वाचलेले आहेत का ?

भागवतांनी व्हिडीओज पहावेत यासाठी आवाहन केले आहे. मी यातला तज्ञ नाही असे सांगितले आहे. त्यानंतर त्यांच्याकडून उत्तरे मिळवण्याचा अट्टाहास योग्य नाही.
भागवतांनी उत्तरे दिली कारण त्यांना जर लेख लिहीणारा उत्तर द्यायची जबाबदारी घेणार नसेल तर या सगळ्याला अर्थ नाही अशी एक प्रतिक्रिया आली आहे, तिची रो सुरूवातीलाच ओढली गेली. भागवत अशा प्रतिसादांना चटकन बळी पडतात असे दिसून आले आहे.
त्यांनी सुरूवातीला व्हिडीओ पाहिला का हा प्रश्न विचारला होता, योग्य होता, त्यावरही टीका झाली.
टीका करणा-यांचा सुरूवातीचा रोख असा होता कि भागवतांनी समजून घेऊन त्यांच्या प्रश्नाला उत्तरे दिली पाहीजेत. आम्ही व्हिडीओ पाहणार नाही, पेपर्स वाचणार नाहीत, तुम्ही लेख लिहीता म्हणजे तुम्ही तज्ञ असायलाच हवे.
नंतर उत्तरे द्यायला सुरूवात केली तेव्हां दुस-या बाजूने टीका झाली.

भागवतांकडे दुर्लक्ष करून ते ज्याबाबत सांगताहेत त्यावर लक्ष केंद्रीत करायला हवे होते. हे तरी किती जणांनी आणि किती वेळा सांगायचे ?
आता एखादा विशिष्ट मोड मधे गेला असेल आणि त्यातून बाहेर पडायचे नावच घेत नसेल तर इग्नोर करणे योग्य.

Pages