फुकटात विनासायास वेटलॉस

Submitted by शाम भागवत on 3 July, 2018 - 03:17

वाढलेला पोटाचा घेर व वाढलेले वजन, सोबतीला कोलेस्टेरॉल सापडल्यामुळे नशिबी आलेल्या गोळ्या आणि आता या आयुष्यभर घ्यावयाच्या आहेत अस डॉ. नि सांगितल्यावर मनाला बसलेला हबका. काही जणांचा वाढलेला रक्तदाब व त्यावरच्या गोळ्या , मधुमेह पूर्व स्थिती लक्षात आल्यावर उडालेली घाबरगुंडी तर मधुमेह झाल्याचे निदान झाल्यावर घरातल्या सर्वांच्या चेहऱ्यावर अवतरलेली काळजी. आणि या सगळ्यातून हे खा व हे खाऊ नका ची भली मोठी यादी. शिवाय गुडगेदुखी, ऍसिडिटी , .. , .., .. असच बरच काही यांच्यासाठी हे लिहितोय.

ह्या सगळ्या त्रासातून कस मुक्त व्हायच?, एक पैसा जास्त खर्च न करता हे कस साधायच? श्रीमंत असो की गरीब दोघांनाही जमू शकेल,तसेच स्त्री पुरूषात अजिबात भेदभाव न करता दोघांनाही एकच पद्धत कशी वापरता येईल, तसेच त्यामागे विज्ञानाचा भक्कम पाठिंबा असला पाहिजे. वगैरे वगैरे .......
थोडक्यात आखूड शिंगी, बहुदुधी, गरीब, दूध काढताना लाथा न मारणाऱ्या बहुगुणी गायीबद्दल हे लिहितोय.

कै. डॉ.श्रीकांत जिचकार एक अवलिया माणूस. एमबीबीएस, एमडी झाल्यावर आयपीएस त्यानंतर चक्क आयएएस. पण चारच महिन्यात नोकरीचा राजीनामा देऊन आमदार, मग मंत्री, राज्यसभेचे खासदार. या माणसाने प्रगती तरी किती वेगाने करावी? पण हे सगळं ४९ वर्षांच्या आयुष्यात साधायच म्हणजे एवढा वेग हवाच की हो!

घरातल्या ग्रंथालयात बावन्न हजार पुस्तक. विद्वत्ता दाखविण्यासाठी जाहिरात म्हणून नक्कीच जमवलेली नसणार. उलट सगळी वाचलेली असण्याची शक्यता जास्त. कारण ४२ विद्यापीठातून मिळवलेल्या २० पदव्या. बहुतेक सगळ्या प्रथम श्रेणीतून मिळालेल्या. २८ सुवर्णपदक मिळवलेला माणूस हा. नक्कीच पुस्तके वाचलेली असणार.

तर असा हा माणूस. भरपूर परदेश वाऱ्या केलेला असूनही त्याची भारताशी जुळलेली नाळ तुटली नव्हती. साधारण अशी माणसे थोडीशी भारतीय संस्कृतीशी फटकून वागतात. पण इथेही आपल्याला आश्चर्याचा धक्का बसतो. भारतीय संस्कृती व प्राचीन इतिहास, तत्त्वज्ञान व संस्कृत यात एमए केलेय. हे मी आपल वानगीदाखल सांगतोय कारण तस पाहिल तर त्यांनी १० विषयात एमए केलेय. इतकच काय मानाची डी. लिट. पदवी मिळालीय त्यांना संस्कृतामध्ये.

तर सांगायच म्हणजे अशा माणसाने १९९७ साली एक नवीन विचार भारताला दिला. त्यावेळी ते राज्यसभेचे सभासद होते. पुणे महानगर पालिकेत मा. शशिकांत सुतार नावाच एक मोठ्ठ प्रस्थ होत. त्यांनी बालगंधर्व रंगमंदिरात जिचकारांना भाषणासाठी बोलावल. त्यासाठी सगळी व्यवस्था जातीने केली. आपोआपच बरेच मान्यवरांनी रंगमंदिर भरून गेल.

त्यांनी सांगितल की, "शरीरात तयार होणारे अतिरिक्त इन्शूलीन बऱ्याच रोगांचे कारण आहे." स्थूलता, त्यातून मधुमेह, वाढलेला रक्तदाब, त्यातून मग अंजोग्राफीची तपासणी, त्यात नक्की काहीतरी सापडतच. मग अंजोप्लास्टी. सगळाच प्रकार खर्चिक. पण मरणाची भीती वाटायला लागली की माणूस करतो खर्च. त्याला वाटतं की झाल सगळ करून. आता काही आपल्याला होणार नाही. पण कसच काय. पाच सहा वर्षात आणखी खर्चिक बायपाससाठी हॉस्पिटलची वारी ठरलेली.

मग यावर सोपा उपाय काय? दिवसातून फक्त दोनदाच जेवा. काहीही खा. भूक भागेपर्यंत कितीही खा. तूप लोणी बिनधास्त खा. मांसाहारही चालेल. फक्त हे जेवण ५५ मिनिटांत संपवले पाहिजे. आणि दिवसातून ४५ मिनिटे भरभर चालण्याचा व्यायाम केला पाहिजे. महागड्या जिम नको की, आहारतज्ञांना पैसे द्यायला नको. दवाखान्याची पायरी चढायची कधी वेळही येणार नाही. किती सोपे आहे ना? पण अवघड बाब पुढे आहे. ते पुढे सांगतात की, "दोन जेवणामध्ये काहीही खाऊ नका." याकाळात तोंड उघडायचे ते फक्त बोलण्यासाठी किंवा पाणी पिण्यासाठी. बस्स. औषधांच्या याद्या विसरून जा. हे खा व हे खाऊ नका याची प्रत्येक डॉक्टर व आहारतज्ञांप्रमाणे बदलणारी यादी व त्यातून उडणारे गोंधळ संपवून टाका.

सगळ वैज्ञानिक नियमावर आधारलेले भाषण. समोर अनेक मान्यवर बसलेले. त्यामुळे बऱ्याच वेळेस अशी भाषणे इंग्रजीत चालतात आणि जिचकार तर इंग्लिश लिटरेचर मध्येपण एमए केलेले. पण तरीही हा विचार सर्वसामान्य माणसाला कळला पाहिजे यासाठी हे भाषण त्यांनी मराठीतून दिले आहे. समोर नुसते मान्यवर नाही तर पुण्याचे मान्यवर बसणार आहेत म्हणून त्यांनी अनेक इंग्रजी संज्ञांना पूरक मराठी संज्ञा शोधून काढल्या होत्या व त्या संज्ञा पाठ करून मगच ते व्याख्यान द्यायला आले होते. (या मराठीतील संज्ञा शोधणे व पाठ करणे हे कामही त्यांना सोपेच गेलेले असणार. कारण ते महाराष्ट्राच्या विश्वकोश निर्मिती मंडळाचे सभासद होते!!!) एखाद्या माणसाला बेंबीच्या देठापासून कळकळ असते म्हणजे काय हे समजून घ्यायचे असेल तर त्यासाठीही हे व्याख्यान ऐकायला हरकत नाही.

आपल्या या कार्याचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी "नागपूर फिटनेस मुव्हमेंट" आणि "पुणे फिटनेस मुव्हमेंट" अशा दोन संस्था सुरू केल्या. पण त्या काळात फेसबुक किंवा व्हॉटऍपस वगैरे काहीच नव्हत. नाहीतर याचा प्रसार फार वेगाने झाला असता. मनोगत, मायबोली किंवा मिसळपाव सारखा एखादा संकेतस्थळ तयार करता अल्लाही असत कदाचित. पण वाचणार कोण? इंटरनेट फार महाग होत त्यावेळेस. टाटा कंपनीच्या व्हीसएनएल ला वर्षाकाठी पाच सहा हजार भरल्यावर कनेक्शन मिळायच. शिवाय घरात फोन असला पाहिजे ही पूर्वअट. आणि नेट वापराला सुरवात झाली की दर मिनिटाला एक टेलीफोनचा कॉल एवढे पैसे टेलिफोनच्या बिलात यायचे तो खर्च वेगळाच. नेट वापरणे हे सामान्यांच्या कुवती बाहेरची गोष्ट होती. अपवाद फक्त आयटी मधल्या लोकांचा!

तरीपण राज्यसभेच्या सदस्याला बऱ्याच सोयी सुविधा असतात. ओळख पाळख असते. त्यामुळे प्रसाराचे काम चालू होते. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते. दोनच वर्षांनी म्हणजे १९९९ साली झालेल्या लोकसभेच्या निवडणूकीसाठी काँग्रेसकडून त्यांना तिकिट मिळाल पण फक्त ३०००+ मतांनी पडले. इतकेच नव्हे तर राज्यातले आणि त्याचबरोबर केंद्रातले काँग्रेसचे सरकार पडले. प्रसारावर फारच मर्यादा आल्या.सर्वात मोठे दुर्दैव म्हणजे २००४ साली जेव्हा कॉग्रेसचे सरकार राज्यात व केंद्रात आले त्यानंतर दोनच आठवड्यात त्यांचा अपघाती मृत्यू झाला. मला वाटते या नवीन विचारांचे फक्त बी लावायचे काम नियतीने त्यांच्यावर सोपवले होते.

त्यांचा या भाषणाचा एक ऑडिओ यूट्यूबवर होता. पण दोन तास तीन मिनिटांचा ऑडिओ म्हटल्यावर बरेच जण तो उघडून सुद्धा बघत नसत. आणि यदाकदाचित कोणी उघडलाच तर बरेच जण पहिले प्रास्ताविक संपेपर्यंतही कळ काढू शकत नसत. त्यामुळे मूळ भाषण सुरू होण्याआधीच तो बंद केला जायचा. एवढा वेळ असल काही ऐकायला तो थोडाच वपू किंवा पुल चा व्हिडिओ होता की व्यायाम/प्रवास करताना ऐकायचा गाण्याचा अल्बम होता? ही राजकारणी लोक ही अशीच. समोर माइक आला की यांना वेळेच भानच राहत नाही. अशी कॉमेंटपण कोणीतरी केली असेल असा मला दाट संशय आहे.

बरीच वर्षे निघून गेली. जिचकारांनी लावलेले बी रूजण्यासाठी अनुकूलतेची वाट पाहत युट्युबवर पडून होत. ही अनुकुलता लाभणे फार अवघड होत. त्याला वेळ लागणार हे त्या बियाणाला माहीत होत. आणि सहा वर्षापूर्वी ते एकाच्या हृदयात रूजल. हा माणूस एमबीबीएस, एमडी होता. पण रोग पाहून औषध देणारा नव्हता. तर रोग होऊच नये यासाठी काय करता येईल यातला तज्ञ होता. प्रामाणिक होता. पैशासाठी काम करणारा नव्हता. समाजाच्या भल्यासाठी काम करण्याची इच्छा असणारा असा होता. मुख्य म्हणजे माहिती वाचून चर्चा करणारा नव्हता तर त्यासाठी स्वतःवर प्रयोग करायला तयार असणारा व त्यासाठी स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करायला तयार असणारा होता. नियतीने अगदी अचूकरीत्या लातूरच्या डॉ. जगन्नाथ दीक्षित यांची निवड केली होती.

डॉ. दीक्षित सध्या ते लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विभाग प्रमुख आहेत व गेली सत्तावीस वर्षे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अध्यापन करत आहेत. "स्थूलत्व निवारण आणि मधुमेह प्रतिबंध" या विषयावर त्यांनी संशोधन केले.यात त्यांनी प्रथम स्वतःवर प्रयोग केले. नातेवाइकांवर प्रयोग केले. जवळच्या मित्रांवर प्रयोग केले. या सगळ्याच्या व्यवस्थित नोंदी ठेवल्या. मग मात्र त्यांनी लातूर व औरंगाबाद येथील हजारो लोकांवर प्रयोग केले. वैज्ञानिक नियतकालिकात प्रबंध लिहिण्यासाठी या प्रयोगाचे योग्य दस्तावेजीकरण केले व अनेक प्रबंध प्रकाशीतही केलेले आहेत.

पण प्रसारासाठी नुसते प्रबंध लिहून भागत नाही यासाठी त्यांनी व्याख्याने द्यायला सुरवात केली. पुण्याच्याच बालगंधर्व रंगमंदिरात कै. डॉ. श्रीकांत जिचकारांच्या स्मृतीला अभिवादन करून सुरवात झालेले त्यांचे व्याख्यान ऐकण्यासाठी खाली लिंक देत आहे. हेही व्याख्यान खूप मोठे आहे. पहिले प्रास्ताविक ३० मिनिटे चालते. त्यामुळे व्याख्यानासाठी आतुर झालेले बरेच जण कंटाळून पहिल्या काही मिनिटांनंतर व्याख्यान बंद करून टाकतात. हे प्रास्ताविक पाहू नये म्हणून मी हे सांगत नाहीये. तर थोडा धीर धरावा असे सुचवत आहे. या प्रास्ताविकातूनही तुम्हाला काही मुद्दे मिळू शकतात.

२०० च्या वर व्हॉटऍपस ग्रुप स्थापन करून व फेसबुकच्या माध्यमातून ही चळवळ अठ्ठावीस हजार माणसांपर्यंत पोहोचली आहे. अनेक देशातील माणसे यात आहेत. पण हे सगळे सांभाळणे आता अवघड होत चाललेय. कार्यकर्त्या डॉक्टरांना यासाठी वेळ देणे अवघड होत चाललेय. यासाठी आता एक वेबसाईटच उघडायचे प्रयत्न चालू आहेत. तस झाल की एकाच ठिकाणी सगळी माहिती एकत्रित होईल. वेळ वाचेल. एक कोटी लोकांपर्यंत लोकांपर्यंत पोहोचायचे उद्दिष्ट समोर ठेवून आता काम सुरू होणार आहे.

खर म्हणजे ह्या व्याख्यानाचा सारांश देण्याचा माझा विचार होता. पण मी मुद्दामहून तस करत नाहीये. कारण तस केले तर लोक मूल व्याख्यान न ऐकताच चर्चा करायला सुरवात करतात. हे व्याख्यान ऐकल्यावर फारशा शंका उरत नाहीत. शिवाय त्यांनी काही फोन नंबरही दिलेले आहेत. त्यावर तुम्ही व्हॉटऍपवर प्रश्न किंवा शंका विचारू शकता.

डॉ. दीक्षित यांच्या व्याख्यानाची लिंक खाली देत आहे. दोन तास सलग वेळ काढता येईल अशी वेळ निवडून निवांतपणे पहा.
https://www.youtube.com/watch?v=edKaI5gxaNQ

ही डॉ. दीक्षित यांची फेसबुक पेजची लिंक आहे. त्यात लाभार्थींची नावे, अनुभव व मोबाईल नंबर दिले आहेत.हे तुम्ही केव्हाही पाहू शकता! https://www.facebook.com/weightlosseffortlessly/

डॉ. जिचकार यांनी याच व्याख्यानात बी पेरण्याचे काम केले. हा ऑडिओ आहे. दोन तास सलग वेळ काढता येईल अशी वेळ निवडून निवांतपणे पहा.
https://www.youtube.com/watch?v=8-kw3hGUwW4

मी स्वतः या विषयातला तज्ञ नाही. पण या संकेतस्थळावर या विषयातले बरेच तज्ञ असल्याने साधक बाधक चर्चा होऊन हा विषय आणखी स्पष्ट होईल याहेतूने हे लेखन केले आहे.

एक महत्त्वाची सूचना :
ज्यांना मधुमेह आहे अशांनी HbA1c आणि fasting insuline या दोन तपासण्या करून त्याचे अहवाल डॉ. दीक्षित यांना पाठवावेत. या दोन तपासण्या म्हणजे रक्तातल्या शर्करेचे प्रमाण दाखवणाऱ्या तपासण्या नव्हेत. त्यानंतर त्यांच्याच सल्ल्यानेच पुढील आहारयोजना सुरू करावी. परस्पर आहारयोजना सुरु करू नये.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

>>>टोमॅटो आणि ताक खाल्ल्याने इन्सुलिन तयार होत नाही हहे चाचण्या करून ते सांगत आहेत.

ते बरोबरचआहे. मला असं वाटतं की त्यांचे पहिले वाक्यच फक्त सिम्पलीफिकेशन आहे. आणि लोक तेच उचलून धरतात.
पात्तळ ताक, पात्तळ चहा, टोमॅटो, टूथपेस्ट वगैरे ने इन्सुलिन सिक्रीट होत नाही कारण त्यात इन्सुलिन सिक्रीट करण्याइतके कर्बोदकही नसतात आणि प्रथिनसुद्धा नसतात.
पण हे गृहीत धरले तर पुन्हा त्यांच्या काहीही खा इन्सुलिनचे माप तेवढेच पडते यावर प्रश्नचिन्ह येते.
शेवटी ते चक्क म्हणताहेत की पोळी खाल्ली भात खाल्ला म्हणून तुम्ही लठ्ठ होता.

भागवत छान लेख आहे. मला याचा बराच फायदा झालाय.... तुमचा लेख कुठल्याच प्रकारे जाहिरात वाटत नाही. असेच लिहीत राहा...

सई, परस्परविरोधी वाटते खरे.

पण असेही वाटले की पहिले विधान हे मागील जेवणाच्या मेमरी इफेक्ट नुसार खाणे सुरू केल्यावर होणाऱ्या फस्ट फेज इन्सुलिन रिलीज बद्दल तर नसेल? (ज्याचे प्रमाण आहार बदलाने बदलत जाईल.)

त्यांनी यापूर्वी इन्सुलिन चा वापर, अतिरिक्त इन्सुलिन याबद्दल काही सांगितले आहे असे वाटते. लक्षात नाही. पुस्तकात पाहूनच सांगता यैईल.
मात्रा समान हे मी ऐकले आहे. पण कर्बोदकांमुळे जास्त तयार होते असे दीक्षित म्हणाले की नाही हे सांगता येत नाही.

वाचा पूर्ण नाचणी सत्व.
इन्सुलिन चा कर्बोदके, प्रथिने, मेद यांच्या चयापचयावर होणारा परिणाम वगैरे सर्व लिहिले आहे.

वरील निवडक उतारा मी खास करून "काहीही खा कितीही खा" या संदर्भातून इथे लिहिला.

त्यांचेच पहिले वाक्य लावले तर मध्ये मध्ये जे खाल त्याने सुद्धा इन्सुलिन तयार झाले पहिजे.>>>>>>> हा मलाही प्रश्न पडला होता.

आणि ते त्या मुलाखतीत फास्टिंग पेक्षा एचबीए१ सी अधिक महत्वाचा हे "डॉक्टरच्या" दृष्टिकोनातून सांगत आहेत. कारण डॉक्टरांना एका दिवसाची साखर पाहून तुम्ही डायबेटिक आहेत की नाही हे ठरवता येत नाही.
कित्येक मराठी डायबेटिक लोकांनी त्याचा अर्थ रोज (किंवा अधूनमधून) शुगर तपासली नाही तरी चालते असा घेतला आहे.

एचबीए१ हे तुमचे ३ महिन्याचे ऍव्हरेज असते. पण ही सरासरी तुमच्या ९० दिवसातील प्रत्येक दिवसाच्या साखरेची असते. त्यामुळे ठराविक पदार्थ खाल्ल्याने साखर किती वाढते हे समजून घेण्यासाठी निदान डायग्नोसिस झाल्यावर काही दिवस तरी ती मोजली पाहिजे.
पोहे, उपमा, साबुदाणा खिचडी अशा नेहमीच्या खाण्यातील पदार्थांनी साखर भयानक वाढते. तसेच आंबे, फणस इत्यादी फळांनीपण प्रचंड वाढते.

वजन आठवड्यातून एक दिवस केले पाहिजे आणि साखर, ज्या दिवशी जास्त किंवा गोडाचे खाणे होईल त्यादिवशी पोस्ट मिल बघितली पाहिजे. म्हणजे त्यानुसार तुम्हाला पुढच्या जेवणात काय खायचे ते ठरवता येते.

आजच्या मटा संवाद पुरवणीत "मी काय खाऊ " या शिर्षकाचा योगेश शौचे ( प्रमुख- भारतीय सूक्ष्मजीव संशोधन केंद्र पुणे. ) यांचा रक्तातील साखर निर्मीती बाबत इस्राईल मधे झालेल्या संशोधनावर आधारित लेख आला आहे.
या संशोधनानुसार दोन पूर्ण निरोगी व्यक्तिंनी सारखाच भात खाल्ला तरीही त्यांच्या रक्तातील साखर वेगळी असू शकते. तसेच एका व्यक्तीने तोच भात वेगवेगळ्या प्रकारे खाल्ला तरीही त्यांच्या रक्तातील साखर निर्मीती वेगवेगळी असू शकते. व ही करामत जठर व आतड्यातील सूक्ष्म जीवाणूंमुळे होते. प्रत्येक व्यक्तीच्या शरीरात असलेल्या सुमारे 10,000 जीवाणूंमुळे संच असतो जो स्थलाहारावर अवलंबून असतो. Happy
यावर भारतात संशोधन होणे जरूरीचे आहे असे ते म्हणतात.

Haa haa. Ata finally ithe gut bacteria ale. Magech kunitari te ya charchet sodaycha prastav anla hota.

दीक्षीतांच्या निवेदनाच्या पद्धतीत दोष आहेत. ते सामान्य माणसावर काय परिणाम होतील हे ध्यानात घेत नाहीत. उदा. व्यायाम ही अनैसर्गिक गोष्ट आहे असे ते पुस्तकात म्हणतात. तर पुढे व्यायामाचे महत्व पटवून देतात.
गोंधळ अनैसर्गिक या शब्दाने होतो. तो अनावश्यक या अर्थाने अजिबात नाही हे विचार केल्यावर लक्षात येते. पण पहिल्या वाक्यामुळे व्यायामाची गरज नाही असा कॅज्युअल दृष्टीकोण कुणाचा बनू शकतो.
ते म्हणतात कि प्राणी कधी व्यायाम करतांना पाहीले आहेत का?
पुढच्या सगळ्या विश्लेषणावरून हे लक्षात येते की आपल्या लाईफस्टाईलमधे श्रम असणे म्हणजे नैसर्गिक.
लाईफस्टाईलमधे श्रम नसल्याने मुद्दामून करावा लागणारा व्यायाम हे अनैसर्गिक.

मुळात ही वाक्ये ते कलाटणी देण्याच्या दृष्टीने, सनसनाटी निर्माण करण्याच्या दृष्टीने किंवा निवेदन रंजक होण्यासाठी करतात आणि त्यातून त्यांची एक शैली बनून गेली आहे. कुणीतरी मला समजलेली दीक्षितप्रणाली आणि शंका असा धागा काढला तर त्यावर मुद्देसूद चर्चा होईल.

अ‍ॅमिलिन संप्रेककांबद्दल आपल्याकडे फारसे ज्ञान नाही असे ते म्हणतात. अ‍ॅमिलिन मुळे इन्शुलिनची निर्मिती थांबते. तर मग अ‍ॅमिलिनबद्दल ज्ञान असायला हवे. ज्यांच्या शरीरात इन्शुलीन तयार होत नाही त्यांच्यात अ‍ॅमिलिया जास्त असते का ?

ह्या दिक्षित प्रणाली मुळे हॉरिबललाईफ कंपनीच्या सेल्सवर किती परिणाम झाला आहे त्याची आकडेवारी मिळेल का? उत्सुकता आहे.
मला मनापासून वाटते की ह्या घातक कंपनीचा पूर्ण भारतातला धंदा शून्य व्हावा.

त्यांचे दुकान चालू राहते.
एक्स्ट्रीम केसेस (जिथे इतके जास्त आहे की जीवन
पद्धतीने वजन कमी करण्या इतका वेळ नाही/मेडिकल कंडिशन) अश्या ठिकाणी ते वापरले जातेच.
माझ्या मैत्रिणींनी ते वापरून 1 महिन्यात 5 किलो वगैरे कमी केलेय.पण इतका हाय प्रोटीन प्रकार डायबिटीस, किडनी कंडिशन वाल्यांना अजिबात झेपणारा आणि योग्य नाही.

सई,
पुस्तकात आहे ते वाक्य. मी ते खालीलप्रमाणे समजून घेतले. त्याच चुकीचे काही असल्यास कळवावे.

जेवण ५५ मिनिटांत संपवावे. तुम्ही जो आहार घेताय तो ५५ मिनिटांच्या आत जेव्हढा संपवाल त्यासाठी इन्सुलिनचे जे माप असेल तेच पुढच्या ५५ मिनिटांत जे संपवाल त्यासाठी राहणार आहे. पहिल्या ५५ मिनिटात ८० भाग संपवला आणि दुस-या ५५ मिनिटांत २० भाग संपवला तरी.

याचा अर्थ जेवणात कर्बोदके जास्त असतील तर इन्सुलीन जास्त प्रमाणात तयार होईल. त्याच ताटातले उरलेले जेवण जेव्हां तुम्ही पुढच्या मिनिटांत खाल तेव्हां तेव्हढेच इन्सुलिन तयार होईल.
जर प्रोटीन्सयुक्त आहार घेत असाल तर तुलनेने कमी इन्सुलिन स्त्रवेल, पण ५५ मिनिटांच्या दोन खिडक्यात हे भोजन संपवले तर माप एकच असेल.

सई,
पुस्तकात आहे ते वाक्य. मी ते खालीलप्रमाणे समजून घेतले. त्याच चुकीचे काही असल्यास कळवावे.

जेवण ५५ मिनिटांत संपवावे. तुम्ही जो आहार घेताय तो ५५ मिनिटांच्या आत जेव्हढा संपवाल त्यासाठी इन्सुलिनचे जे माप असेल तेच पुढच्या ५५ मिनिटांत जे संपवाल त्यासाठी राहणार आहे. पहिल्या ५५ मिनिटात ८० भाग संपवला आणि दुस-या ५५ मिनिटांत २० भाग संपवला तरी.

याचा अर्थ जेवणात कर्बोदके जास्त असतील तर इन्सुलीन जास्त प्रमाणात तयार होईल. त्याच ताटातले उरलेले जेवण जेव्हां तुम्ही पुढच्या मिनिटांत खाल तेव्हां तेव्हढेच इन्सुलिन तयार होईल.
जर प्रोटीन्सयुक्त आहार घेत असाल तर तुलनेने कमी इन्सुलिन स्त्रवेल, पण ५५ मिनिटांच्या दोन खिडक्यात हे भोजन संपवले तर माप एकच असेल.

नटसम्राट
दिक्षित Vs दिवेकर

To eat or not to eat between meals that is the question...

दोन वेळाच जेवाव की दर दोन तासाने जेवाव हा एकच सवाल आहे

करीनाची मधाळ झिरो फिगर आठवत चराव
दर दोन तासांंनी लाचार डूकरा सारखे, का
नागपुरच्या जिचकरांच्या पदव्या स्मरुन मारावा
अडवा हात, दिवसांतून दोनदाच
आणि एकदमच पाडावा फडशा सगळ्याचा
बिस्कीटांंचा, प्याटिसचा आणि पोळीभाजीचा
५५ मिनिटे संपण्याआधी भात असा चापावा
की नंतर येणा-या निद्रेला नसावा जागृतीचा किनारा कधीही..
पण मग..

पण मग त्या
निद्रेतही ईंन्शूलीन पाझरु लागले तर?
ग्लूक्यागाँन बाहेर पडलाच नाही तर?
तर…तर…इथेच मेख आहे, इथेच
ईंन्शूलीनसारखी ग्लूक्यागाँनची ईंजेंक्शन मिळत नाहीत
म्हणुन आम्ही सहन करतो ही ऊपासमार
सहन करतो गाळलेले ताक, काळ्या चहाच्याच कपात
बेशरमपणे सारतो प्रसादाचे पेढे पँन्टच्या खिशात
आणि तरीही हा गोपाळकाला जेवताना, गळून पडतो घास
कुणीतरी जेव्हा बाचकवते "अब तक छप्पन्न" म्हणत

आणि अखेर सहापुडी डब्यांंचा कटोरा घेऊन
उभे राहतो खालच्या मानेन पुन्हा
करीनाच्याच दारात
तोडतो लचके दर दोन तासांनी, कोवळ्या सफरचंदाचे
मध्यरात्री दचकून जाग आली की स्वःताच्याच घरात
चोरुन खातो चार बदाम आणि तिन मनूका, अंधारात

अहो डायटिशीयन्स, तुम्ही ईतके कठोर का झालात?
एका बाजुला दिवेकर तूम्ही मेट्याबाँलीझम स्लो
होण्याची रिस्क सांगता आणि दुस-या बाजुला
दिक्षीत तुम्ही ग्लूक्यागाँनची भीती घालता

हे आमच्या पोटाच्या विधात्यांनो
तुम्ही तुमच्यात काही सु्वर्णमध्य सांधू शकाल का?
दर दोन तासांनी ५५ मिनिटे जेवलेले चालेल का?
किंवा दर ५५ मिनिटांंनतर दोन वेळा जेवावे का?
का?..का?...
फेकून देऊ सर्व ताट वाट्या आणि सहा पुडाचे डबे
ऊकिरड्यावर, आणि टोचून घेऊ कायमचे
एक सलाईन
पण नको.. नकोच ते
सलाईन दर दोन तासाने लावावे का दिवसातून दोनदा
हा नवाच सवाल ऊभा राहील

त्या पेक्षा...
हे दिवाकरा, तू दिक्षीतांना दिक्षा दे
हे जग्ग़ननाथा, तू थोडी ऋजुता दाखव
नाही तर...
पोटावरील विस्कटलेल्या वळ्या घेउन
आम्ही ढेरपोट्यांनी कोणाच्या पायावर डोक आदळायच?
कोणाच्या पायावर ? कोणाच्या ?
कोणाच्या???
..... Forwarded

>>>५५ मिनिटे संपण्याआधी भात असा चापावा
की नंतर येणा-या निद्रेला नसावा जागृतीचा किनारा कधीही..---

हा हा, खरे आहे.

.... Forwarded

दीक्षितांची कमाल

काय सांगू सखे दीक्षितांची कमाल
अन् पहिल्यांदाच कमी झाले बायकांचे हाल ||धृ||

दीक्षितांनी सांगितलं दोनच वेळा जेवा
भात अन् पोळ्या जरा कमीच खावा
लाटल्या पोळ्या मी चारच काल || १ ||
अन् पहिल्यांदाच कमी झाले बायकांचे हाल

प्रथिनं वाढवा दीक्षितांचा सल्ला
भाजीपाला उसळी सॅलड्वर हल्ला
कापिते मी फळं आता धरून ताल || २ ||
अन् पहिल्यांदाच कमी झाले बायकांचे हाल

येता-जाता नका भरू हो तोबरा
फसव्या भुकेला पाण्याचा उतारा
पाजिते मी पाणी करून दीक्षितांची ढाल || ३ ||
अन् पहिल्यांदाच कमी झाले बायकांचे हाल

पाऊण तास चाला दीक्षितांचा मंत्र
साडेचार किमी चे पाळा तुम्ही तंत्र
फिरायला लागले मी पांघरून शाल || ४ ||
अन् पहिल्यांदाच कमी झाले बायकांचे हाल

चहा नि कॉफी बाजूला सारा
ताकाचा पेला तुम्ही हळूच पुढे करा
पाहुण्यांना संत्री देते सोलून मी साल || ५ ||
अन् पहिल्यांदाच कमी झाले बायकांचे हाल

दीक्षितांची योजना सार्‍यांना कळवा
लठ्ठपणा, मधुमेह जगातनं पळवा
तुम्हालाही सांगते नाहीतर फसाल || ६ ||
अन् पहिल्यांदाच कमी झाले बायकांचे हाल

प्रज्ञा रामतीर्थकर
९ सप्टेंबर २०१८

य्या य्या मयय्या , य्या य्या मयय्या
धागा वरय्या
य्या य्या मयय्या, शाम भागवतय्या
आउच
वेटम लॉसय्या, विनासायायासय्या
या या मयय्या, या या मयय्या

भागवत सर या ताईंचे अ या अक्षरावरून दुसरे एखादे टोपण नाव आहे काय तीन अक्षरी ?

मा. प्रशासक यांस,

या अभियानाबाबत येणाऱ्या शंका निरसनासाठी काही फोन नंबर मी मिसळपाववर टाकले होते. त्या लोकांना फायदा झाला. तसाच इथल्याही सभासदांना व्हावा म्हणून तो प्रतिसाद इथेही देत आहे. मिसळपाव प्रशासकांना त्यात काहीच वावगे वाटले नाही तीच भूमिका मायबोलीची असेल असे गृहीत धरले आहे.

माझे गृहितक चुकीचे असल्यास प्रतिसाद उडवला तरी चालेल. पण या प्रतिसादाचे महत्व जाणवल्यास प्रशासकांना विनंती की हा प्रतिसाद मूळ धाग्यात शेवटी घालावा.
_/\_


ज्यांना कुणाला या अभियानाच्या व्हॉटसअ‍ॅप ग्रुप मधे सामील व्हायच असेल त्यांनी HbA1c आणि fasting insuline या दोन तपासण्या करून त्याचे अहवाल डॉ. दीक्षित यांना किंवा त्यांनी नेमलेल्या खालील व्यक्तिंना दिलेल्या फोन नंबरवर पाठवावेत.
या दोन रिपोर्ट शिवाय सभासदत्व मिळत नाही.
हे फोन नंबर विनासायास वेटलॉस आणि मधुमेह प्रतिबंध या पुस्तकाच्या १५ व्या आवृत्तीमधे पान क्रमांक १४० वर दिलेले आहेत.

क्र्मांक नाव शहर व्हॉटस अ‍ॅप क्रमांक
1 श्री. अरूण नावगे , मुंबई 8999406017
2 डॉ. वेदा नलावडे , पुणे 9545529255
3 डॉ. संतोष ढुमणे , पुणे 9890886727
4 डॉ. संगिता पंडित , पुणे 9822022416
5 श्री. संदीप सोनवणे , नाशिक 9422256450
6 श्री. अमोल भागवत , मुंबई 9757399529
7 श्री. ए जी चौधरी , ठाणे 9821862424
8 डॉ. अंजली दीक्षित , औरंगाबाद 9423779765
9 श्री. बाळासाहेब कदम , फलटण 9422033382
10 सौ. शर्मिला इनामदार , ठाणे 9769695940
11 डॉ. विमल डोळे , लातूर 9850056648
12 डॉ. नंदनवनकर , नांदेड 9823121986
13 डॉ. हेमंत अडीकणे , नागपूर 9420515123
14 श्री. अतुल कुलकर्णी , सोलापूर 9423067399
15 डॉ. शिल्पा तोतला , औरंगाबाद 9823281391
16 डॉ. सुजाता लाहोटी , औरंगाबाद 9325205455
17 अनिता बाहेकर , औरंगाबाद 9422211854
18 डॉ. आशिष चव्हाण , आंबेगाव, पुणे 9975051000
19 डॉ. सौ. सीमा दहाड , औरंगाबाद 8888849809
20 डॉ. राजेश दाते , दौंड 9422224298
21 डॉ. निकोसे , अमरावती 9422912614
22 श्री. दीपक कुलकर्णी , पुणे 9850217641
23 मुक्ता गाडगीळ , पुणे 9822171517
24 डॉ. गौतम शाह , धुळे 9881278698
25 डॉ. श्रीराम गोसावी , पालघर 9028381578
26 डॉ. गजानन जत्ती , सोलापूर 8237005707
27 डॉ. सुभाष जोशी , बीड 8275387063
28 डॉ. जयश्री कालानी , परभणी 9422925227
29 डॉ. राजकुमार कालानी , परभणी 9422176227
30 श्री. राजू अकोलकर , नागपूर 9096399222
31 डॉ. अर्चना बिर्ला , जळगाव 9226219302
32 सौ. वर्षा मालखरे , औरंगाबाद 9850184084
33 मनोज गोविंदवार , जळगाव 8237513242
34 डॉ. ए एन मस्के , सोलापूर 7030884546
35 डॉ. शैलेश नागपूरे , वर्धा 9503509430
36 सौ. शिल्पा उनकुले , पुणे 8975469006
37 डॉ. सुधीर चौधरी , औरंगाबाद 9822874194
38 डॉ. शालीनी , ओतूर पुणे 9975721202
39 डॉ. शर्मीली सूर्यवंशी , नांदेड 9325565009
40 श्री. शिवशंकर स्वामी , औरंगाबाद 9422210371
41 श्री. साकेत देशपांडे , बंगळूरू 9886843808
42 प्रा. प्रदीप पाटील , औराद शहाजानी 7588876455
43 सौ. रचना मालपाणी , लातूर 9422110282
44 श्री. उल्हास सावजी , औरंगाबाद 9049711106
45 सौ. वैशाली तोष्णीवाल , नगर 9657607268
46 श्री. रवी जगन्नाथन , ठाणे 9819576176
47 सौ. रेखा मुंदडा , धुळे 9422706111
48 डॉ. मनिषा चौरे , शिरूर 9270152610
49 डॉ. संध्या दळे , चेन्नई 9790799599

तसेच लेखात दिलेल्या लिंकमधील व्हीडीओमधे सांगितल्याप्रमाणे

effortlessjag@gmail.com येथे मेल करा.
किवा
डॉ. दिक्षीतांचा फोन नं. ९९२२९९४७७७ आहे. या नंबरवर व्हॉट अ‍ॅपवर तुमचा प्रश्न विचारा.
किंवा
त्यांचा इमेल drjvdixit@gmail.com येथे कळवा.

भागवत सर या ताईंचे अ या अक्षरावरून दुसरे एखादे टोपण नाव आहे काय तीन अक्षरी ? --- मी ओळखते प्रज्ञाला. ही कविता पर्सनल गृपवर आली होती.

सगळं रामायण महाभारत होऊन गेल्यावर रामाची सीता कोण प्रश्न विचारत आहे:

माझं वय ४०च्या आसपास. BMI नेहमीच <२० राहिला. पालक, भावंड कोणालाच डायबेटिस नाही.
नकळतपणे गेली १४+ वर्ष IF करत होते. आतादेखील १६-८ पद्धत आहेच. पण त्या ८ तासांच्या खिडकीत दोनदाच आणि हेल्दी खाईन असे नाही. बिस्कीट, बेकरी प्रोडक्ट, इतर जन्क समजले जाणारे पदार्थ भरपूर खाते. साखर दिवसभरात ३ चमचे होत असेल आणि २-३ चॉकलेट गोळ्या Lol
व्यायाम शून्य.

हे ठीक आहे का?

अय्यो अ‍ॅमी, बी एम आय < २०?
तुम ये धागेपर कायकू है?
व्हॉटेव्हर वर्कड ग्रेट फॉर यु लास्ट मेनी इयर्स, इज द बेस्ट फॉर यु.
अर्थात रुटीन मध्ये अ‍ॅक्टिव्हीटी असेलच.

मानव, अनु
Lol बहुतेक दिवसभराचा कॅलरी इन्टेक प्रमाणातच राहिला असेल जन्क खात असले तरीही.

पण खरंच प्रश्न पडला कि हे धागे, चर्चा, वेगवेगळे डाएट
१. लठ्ठपणा आणि किंवा
२. मधुमेहाचा कौटुंबिक इतिहास
असलेल्यांसाठीच आहे ना?

बाकीचे काहीही खाऊ शकतात ना?

@ॲमी
ठीक?

अहो अतिउत्तमच की हो.
१४+ वर्षे?
नमस्कार घ्या. _/\_

तुम्हाला कसलीही काळजी करायचे कारण नाही. तुम्ही तर या अभियानाचे रोल माॅडेलच आहात.
आम्हालाच तुमच्याकडून सातत्य शिकायची आवश्यकता आहे.

वेल...
या अभियानाबद्दल किंवा IF बद्दल मला माबोवरून, आत्ता इतक्यातच कळलं.
+ अतिशय महत्वाचा मुद्दा: लठ्ठपणा किंवा मधुमेहचा इतिहास मला नाही.
त्यामुळे मला रोल मॉडेल वगैरे नक्कीच म्हणता येणार नाही. सातत्य शिकू शकता पाहिजे तर Lol

===
Breakfast like King, lunch like Queen, dinner like Begger हे ऐकून माहित होतं (सगळ्यांनाच असतं). १४ वर्षांपूर्वी माहित झालं की जैन लोक सूर्यास्तनंतर काही खातपीत नाहीत. आणि मीपण ठरवलं चला आपणपण असं करूयात. मग मी डिनर करणं बंद केल. पुढेपुढे तीच सवय लागून गेली.
कधी विषय निघाल्यास मी सांगायचे की मी फक्त दिवसाच खाते. तर सगळे मित्र-मैत्रिण-सहकर्मचारी मला समजवायचे हे कसे अयोग्य आहे. तुला आता काही नाही वाटणार पण चाळीशीनंतर याचे परिणाम दिसायला लागतील. एकानेतर सांगितलं तू वेळच्यावेळी पोटाला खायला दिल नाहीस तर ते आतून स्वतःलाच खायला चालू करतं आणि अल्सर, कँसर होतो.

आता त्याच जेवणपद्धतीच अभियान चालुय. काय करावं डोळे रोल करण्याशिवाय Uhoh

फॅशन मध्ये जसे ट्रेंड रिपीट होतात तसेच डायट मध्ये पण Happy
एकभुक्त वगैरे वगैरे परत इन थिंग बनेल.

पॅरलल पँट थोडी बदलून पलाझो म्हणून आली.
बेल बॉटम थोडे कमी घेर होऊन बूट लेग जीन्स म्हणून आले.
डिव्हायडर स्कर्ट थोडे बदलून क्युलॉट म्हणून आले.(मी १२वी त असताना आमच्या कॉलेज मधली सर्वात हाय फाय मुलगी डिव्हायडर स्कर्ट घालायची.)
बेल स्लीव्हज परत आल्या.(त्या पूर्वीच्या रॉक कोंपीटीशन वाल्या गाण्यात नीतू सिंग वगैरे घालायच्या तसे फ्रीली बेल स्लीव्ह टॉप परत आले.)
आता पुरुषांच्या अमिताभ कॉलर (म्हणजे मोठा त्रिकोण, छातीपर्यंत पोहचणारा कॉलर) आणि कल्ले परत आले की मी सुखाने मरायला मोकळी Happy

Pages