भारतीय लोकांमुळे इतर जनतेला बसणारे कल्चरल शॉक अर्थात ओरांग इंडिया तमाशा.

Submitted by विक्रमसिंह on 2 July, 2018 - 02:13

प्रवास करताना किंवा परदेशी रहाताना किंवा भारतातच असताना आपल्या मुळे इतर जनतेला किती धक्के आणि त्रास आपण देत असतो याची कल्पनाच न केलेली बरी. इंडोनेशियात असताना आम्ही आपल्या अशा टिपिकल भारतीय पद्धतीला ओरांग इंडिया तमाशा (ओआयटी) म्हणजे भारतीय लोकांचा तमाशा म्हणायचो. ओआयटीची किती तरी उदाहरणे देता येतील

- कुठेही शिस्तीत रांग न लावता एकदम गर्दी करणे, जसा काही जन्माला येतानाच देवाने आपल्याला कायम रांगेत पुढे रहाण्याचा मान दिला आहे. दुकानामधे दुसर्‍या गिर्‍हाइकाशी दुकानदार बोलत असताना आपलेच घोडे पुढे दामटणे हे त्याचे दुसरे रूप.
- परदेशी विमानतळावर भारतात जाणार्‍या विमानाचे प्रवेशद्वार व इतर देशात जाणार्‍या विमानाचे प्रवेशद्वार यात शिस्तीच्या बाबतीत जमीन अस्मानाचा फरक दिसतो.
- सार्वजनिक अस्वछता आणि स्वछतेच्या आपल्या कल्पना.
- आपल्या मसाल्यांचा घमघमाट. कित्येक ठिकाणी म्हणून भारतीय विद्यार्थ्यांना घरे भाड्यानी देताना अटी घातल्या जातात.
- मला ईंडोनेशियात लोक विचारायचे. तुमच्या बायका पोट उघड का टाकतात. (साडी घातलेल्या). बघण्याचा दृष्टीकोन वेगळा पण हाही त्यांच्या साठी शॉकच ना. (हा नुसता शॉक , पण ओआयटी नाही)

बर्‍याच वेळेला आपल्या गावीही नसते की आपल्यामुळे इतर लोकांना त्रास होतोय.
तुम्ही पण असे शॉकलेले लोक पाहिले असतील. ओआयटी (त्रास देणारे शॉक) अनुभवले असतील.

टीप : मला आपल्याबद्दल टिका करायची नाही. आपले (भारतीयांचे) कित्येक गुण आवडल्याचे लोक आवर्जून सांगतात. त्याबद्दल वेगळा एक धागा काढायला हरकत नाही. पण बर्‍याच वेळेला आपल्याकडून अनाहूत पणे चुका होउ नयेत ही इच्छा. Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

मध्यपूर्वेतल्या एका क्लायंटकडे गेलो होतो तेंव्हा बेसिनमध्ये हात धुतल्यावर मी सवयीने माझ्या खिश्यातला रुमाल काढून हात कोरडे केले. ते बघून तिथे हात धुवायला आलेल्या एका व्यक्तीने आश्चर्य व्यक्त केले. Do you always use your own handkerchief?
तिथले सगळे लोक बाजूच्या रोलमधून खेचून (भरमसाठ) टिशूपेपर वापरत.

पण त्याला चांगले म्हणून की वाईट म्हणून आश्चर्य वाटले हे काही मला कळले नाही.

Do you always use your own handkerchief? >>
response: 'Yes, I use my own handkerchief. Whose handkerchief do you use?' Lol

हे लोक रुमाल वापरणं हायजिनीक समजत नाहीत बहुतेक. आजकाल हे फॅड आपल्याकडे पण येत चाललंय. म्हणजे कागदाची नासाडी चालते!

अमेरिकेत येऊन १० वर्षे होऊन गेली पण मी अजुनही हातरुमाल वापरतो. कागद वापरणे अजुनही अंगवळणी पडले नाही. वाढदिवसाला केक फासणे प्रकाराचा मला राग आहे. अनेक वेळा मी लोकांना सांगितले आहे कि अन्न खाऊन संपवा असे नासवू नका. पण लोकांना तेच भारी वाटते. युनिव्हस्रिटी मधे असताना सगळी भारतीय मुलं एकाच अपार्टमेंट काँप्लेक्स मधे रहायची. वाढदिवस वगैरे चे जाहीर सेलीब्रेशन कॉमन एरिया मधे असायचे. हा केक फासणे प्रकार पुढे जाऊन डोक्यावर सांबार ओतणे, अंडी फोडणे वगैरे पर्यंत पुढे गेला ( दक्षिण भारतीय मंड्ळींचे विषेश योगदान हे वेगळे सांगायला नको) . रूम मेट चा वाढदिवस येतो आहे म्हटल्यावर लोक सांबार उरवून ठेवत, दुधाचा कॅन बाहेर ठेऊन दुध नासवत आणि रात्री १२ वाजता ह्या सगळ्याचा अभिषेक झालेल्या "उत्सवमुर्ती" ला शेवटी स्वीमींग पुल मधे टाकत. ह्या सगळ्याप्रकारा बद्दल मला असलेला राग, तिटकारा, संताप शब्दात व्यक्त करणे शक्य नाही.
ऑन अ लाईटर नोट - आपल्याकडे खोडरबराला पटकन "रबर" म्हणतात. पण अमेरिकेत रबर म्हणजे कंडोम! एकदा भर परिक्षेत एक भारतीय मुलगा उठुन प्रोफेसर ला म्हणाला, "Sir, I need a rubber." ते ऐकल्यावर प्रोफेसरा ने अत्यंत सहाजिक पणे विचारले "Why, you want it NOW?" (NOW वर जोरदार भर).. भारतीय मुलाला काहीच कल्पना नसल्याने तो म्हणाला "Yes. I want to change my answer." ह्यामुळे प्रोफेसर अजुनच गोंधळला कारण त्याला वाटले ह्याला आधीचे म्हणणे बदलायचे आहे! आणि म्हणाला "So what is your answer?". आता पोरगा गोंधळला आणि म्हणाला "How can I say it aloud?". वर्गातल्या काही इतर भारतीय मुलांना काय चाल ले आहे ह्याचा अंदाज आला आणि त्यांनी "Sir, I think he needs an eraser" असे सांगुन ती चर्चा संपवली. माझ्या रुममेट्च्या वर्गात झालेला हा किस्सा, तो खूप रंगवून सांगत असे.
मी तसा नशीबवान. रुममेट एक वर्ष आधी आल्यामुळे त्यानी आल्या आल्या खूप टीप्स दिल्या होत्या. कुठेही इंटरव्ह्यु (ऑन कँपस जॉब शोधायला सगळेच भटकतात) असेल तर १५-२० मिनिटे आधी जाऊन बसावे. आपण बसने हिडतो, चालत जातो त्यामुळे घामाघुम होतो. वेळे आधी पोचल्याने जरा थंड होता येते आणि वॉशरूम मधे जाऊन स्वच्छ होता येते. हा सल्ला अतिशय उपयोगी पडला.
आमच्या नंतर एक वर्षाने आलेल्या दक्षिण भारतीय लोकांनी जॉब शोधताना कहर केला. हे लोक रेझ्युमी च्या २०-२५ कॉपीज काढत आणि प्रत्येक प्रोफेसरच्या (आपल्या व इतर डीपार्ट्मेंटच्या सुद्धा) दारावर नॉक करुन दाराखालुन तो पेपर आत सरकवायचे. वर बाहेरून विचारायचे "Do you have a job?" ह्या असल्या प्रकारांंमुळे भारतीयांबद्दल अतिशय वाईट मत निर्माण झाले आणि सरसकट सगळ्यांनाच त्याचा फटका बसला.

"I need a rubber." >> Lol

अजून एक...
I passed out in last month. Lol

आणि त्यांनी "Sir, I think he needs an eraser" असे सांगुन ती चर्चा संपवली. माझ्या रुममेट्च्या वर्गात झालेला हा किस्सा, तो खूप रंगवून सांगत असे.>>>>
चौकट राजा, हे ही कॉमन आहे. प्रत्येकाकडे, त्याच्या मित्राकडे हा किस्सा असतोच. माहित नाही खरच किती जणांच्या बाबतीत झाला आहे. पण स्टोरी असते एवढ खरं. Happy

हे लोक रुमाल वापरणं हायजिनीक समजत नाहीत बहुतेक. आजकाल हे फॅड आपल्याकडे पण येत चाललंय. म्हणजे कागदाची नासाडी चालते!>>
रुमाला वापरण कितीही पर्यावरणासाठी चांगल असल तरी , एकच रुमाल दिवसभर वापरण अनहायजेनीक आहेच. निदान सध्याच्या e coli वगैरे च्या दुष्टीने तरी.

मी पण किचन मध्ये कपड्या ऐवजी टिशू वापरते जास्त स्वच्छ वाटते. त्या पुसायच्या फड्क्यावरच जास्त कीटा णू असतात. टरा टरा फरा फरा टिशू वापरणे सोपे.

स्किन कलर्ड लेगिंग्ज हा एक मोठा शॉक आहे माझ्या सा ठी. महिला वर्गा कडे चुकूनही नजर गेली तरी पहिल्या वेळी शॉक बसतोच बसतो. मग लक्षात येते. घरून निघताना आरश्या त बघत नसतील का?

स्किन कलर लेगिंग बद्दल अगदी सहमत.
हा प्रकार फक्त कट नसलेल्या/कट असला तर अगदी लॉंग टॉप खाली घालावा असे वाटते.म्हणजे फ्रॉक खाली स्किन कलर स्टोकिंग वाला लूक जस्टीफाय होईल.

काही बायका अगदी शॉर्ट टॉप वर ते ही स्लीट्स असतात त्या टॉप्स वर टाईट गोल्डन किंवा वर लिहिलंय तसं स्किन कलर चे लेगीन घालतात.... खूप भयानक दिसतात...

एकच रुमाल दिवसभर वापरण अनहायजेनीक आहेच <<< सीमा, यावर थोडं विचार्मंथन केल्यावर असं वाटलं की दिवसातले एवढे तास कपड्यांच्या एकाच सेट मध्ये राहाणेही तसे अनहायजेनीक! Proud

रुमाल ठीक आहे, पण एअर drier वापरू नका. त्यात अनेक लोकांकडून विषाणू येऊन वास्तव्य करतात दमट हवेत, वाढतात आणि हवे बरोबर बाहेर येतात असं डॉक्टरने सांगितलेलं.

"देशी जनता अशीच" "देशींना अक्कलच नसते" वगैरे प्रतिक्रिया माफ करा पण विखारी वाटल्या. >> जेमस वाँड आख्या प्रतिक्रियेला अगदी अगदी झाले. तमाशा हा शब्द तर अगदीच खटकला. आपण स्वतःही देशीच आहे हे माहित नसल्यासारखे.
प्रत्येक माणूस ज्या परिस्थितीतून येतो तसे त्याचे कल्चर प्रमाणे तो असतो.
काही चालीरीती काही ठिकाणी समाजमान्य असतात काही ठिकाणी नाही.
माझ्या पहिल्या कंपनीत एक माणूस ऑनसाईटला बरेच वर्ष राहून आलेले. त्याच्या टीम ची पार्टी होती आणि त्याने नंतर मेल टाकली की केक शिल्लकसंपवा, आहे तर खा. हे आम्हाला अतिशयच विचित्र वाटले. आपण "शिल्लक आहे" म्हणून कुणाला खा म्हणत नाही, ते इनॅप्रोप्रिएट आणि असभ्य समजले जाते. तेच अमेरिकेतल्या ऑफिसेस मधे सर्रास मेल असायची "शिल्लक आहे, खा".

भारतातले सगळेच जण फुकटे नसतात. नर्मदा परिक्रमा केलेल्या लोकां चे अनुभव ऐकलेत तर अर्धपोटी रहाणारी जनताही परिक्रमावासियाला खायला घालते. हा ही त्याच संस्कृतीचा भाग आहे. (परिक्रमा वासी का खातात? तर निष्कांचन होऊन - जसे मिळेल तसे रहायचे अशी त्यामागे एक कल्पना (वन ऑफ द) असते.)
आम्हाला भारतात रहाताना फुकट्या लोकांचा जसा अनुभव येतो, तसाच दिलदार लोकांचाही येतो, आणि सगळ्यात जास्त नॉर्मल - देवाणघेवाण करणार्‍यांचाही येतो. कोकणस्थांच्या कंजुषीवर जोकस असतात - पण तेच अगदी भरभरून खायला घालणारे, समाजसेवे करता आयुष्य वेचणारे, योग्य कामाकरता कितीतरी डोनेशन्स देणारे कोकणस्थही माहित आहेत. (मी कोकणस्थ नाही). जोकस पलिकडे जाऊन हे माहित असावं.

आम्ही गावात वाढलो. पुण्यातल्या एका नातेवाईकांच्या घरी किती पोळ्या खाणार हा रोजचा काऊंट विचारून पो ळ्या करायचे ह्या ची आम्हाला मजा वाटायची. गावात इतकं येणं जाणं असायचे की उरले तरी संपायचेच नंतर (अगदी अचानक पाहुणा ही नॉर्म होती) . स्वतः शहरात रहायला आल्यावर हा फरक लक्षात आला. रोज वाया जाणं ही चुकीची गोष्ट येवढ्या साध्या उपायाने टळू शकते हे कळले (लागलेच तर करता येतेच की)
त्यामुळे थोडा विचार केला तर सरसकट लेबलीकरण टाळता येऊ शकते.

घामाचा वास वगैरे - हा प्रत्येकाला येतो. प्रत्येक वर्णा नुसार बदलतो. काय खाल्लय ह्या नुसारही हा वास बदलतो. तिथे बीफचा वास कुठल्या ही किराणा दुकानातही येतो, पर्फ्युमचा/स्प्रेजचा वास हा त्रासदायक , अनारोग्यकारक आहे - ह्याचाही त्रास होतो. पण हा जिथल्या तिथल्या संस्कृतीचा भाग आहे. त्याचं उद्दात्तीकरण/निंदानालस्ती ही टोकं कशाला!

आम्ही अमेरिकन लोकांच्या वर्क एथिक्स चे आधी जाम कौतुक करायचो, पण नंतर उलटेही अनुभव आले.
"नो बडी इज लीविं ग ऑफिस टूडे टिल धिस धिस हॅपन्स" अशी वाक्ये टाकून त्याच चॅट सेशन मधे अर्ध्याच तासात - मी चाललोय माझ्या मुला चा लिटिल लीग चा सेशन आहे. (प ण बाकी टीम मात्र ऑफिसमधे) - असे टाकणारा गोरा मॅनेजर अनुभवलाय. (आणि टीमने चुकारपणा केला नव्हता मुळातच, सगळी डिलिवरी प्लॅन प्रमाणे चाललेली).
एका देशी सबकॉन ला एक दिवस (मुलीचा बड्डे) रजा न देता (गो लाईव वॉज क्लो ज), दुस र्‍या गोर्‍याला मात्र २ वीक्स ची सुट्टी ( दोघही ईक्वली इम्पॉर्टंट होते) घेऊ देणारा मॅनेजर पाहिलाय.
तसेच ऑफिसचे एथिक्स पाळणारे, माझ्या आजार पणात माझ्यासाठी खायला पाठवणारे, काहीही संबंध नसता ना मी ड्यु असताना माझ्या बाळासाठी मोजे विणणारी बस ड्रायवर असेही अनुभव भरपूर आहेत.
प्रत्येकात चांगली वाईट माणसं असतात.

मला जेमस वांड ह्यांची पोस्ट आवडली!
तमाशा हे नावच मुळात खटकलेले.

स्किन कलर लेगिंग >> हो हो! मी खूप वेळा दचकले आहे Happy
आणि हे पस्तीस-चाळिशीच्या बायकाही घालतात शॉर्ट किंवा कट असलेल्या टॉपखाली!

पण एअर drier वापरू नका. त्यात अनेक लोकांकडून विषाणू येऊन वास्तव्य करतात दमट हवेत, वाढतात आणि हवे बरोबर बाहेर येतात असं डॉक्टरने सांगितलेलं. >> एअर ड्राय र म्हणजे कपड्यांचा का?

भावना समजून घेतल्याबद्दल आभार बरंका नानबा तुमचे. मी काही ते काय पाश्चात्य म्हणून सगळं साधक टाकून द्या म्हणायला पढतमूर्ख नाही. पण ,चांगल्या सवयी घेताना, त्यांच्या संस्कृतीत ऍडजस्ट होताना आपल्या चूका होतात त्याला अगदीच हिणकसपणे मांडणेही तितकेसे पटत नाही मला. तरी, हेमाशेपो.

तमाशा हे नावच मुळात खटकलेले.>> नानबा. (आणि जेम्स)
आपली लोक शहाणी व सूज्ञ असूनही अशी का वागतात याचा जास्त राग येतो.
तमाशा हा शब्द आम्ही अज्ञानामुळे झालेल्या चुकांसाठी नाही तर माहित असून मुद्दाम केलेल्या गोष्टींसाठी वापरतो..
जसे की
रांगेत घुसणे किंवा रांगच न करणे, मधे मधे बोलणे, कारण नसताना हुज्जत घालणे, कचरा करणे, मोठ्मोठ्याने बोलणे, लिफ्टमधे आधी घुसणे, स्त्री दाक्षिण्य न दाखवणे, अशा अनेक गोष्टी. ज्या भारतात करण सुद्धा चूक आहे हे माहिती असत. वर अशी किती तरी उदहरण दिली गेली आहेत.
याबरोबरच ओघाने अज्ञातून किंवा नविन असल्याने झालेल्या चुकांचीही उदाहरणे वर अनेकांनी दिली आहेत.

आपल्याच लोकांची उणीदुणी काढायचा माझा उद्देश नव्हताच कधी आणि नाहीच. मी स्वतः वरील कित्येक चुका केल्या आहेत. पुढच्याच ठेच मागचा शहाणा किंवा निंदकाचे घर असावे शेजारी.

असो यातून काही बोध घेता आला किंवा कुठे काळजी घेतली पाहिजे हे नविन जुन्या सर्वच मंडळींच्या लक्षात आले आणि त्याचा फायदा झाला तर माझा उद्देश सफल झाला आहे असे म्हणता येइल

तुमचा उद्देश सफल झालाय, मला खूप काही शिकायला मिळालं. मुळात मला धागा विषयाला काहीच हरकत नव्हती, पण काही प्रतिसादांचे टोन अँड टेम्प्रेचर व्यस्त जाणवले इतकेच. Happy

>>>>>त्याचबरोबर लग्नात हार घालताना नवर्‍या मुलाला उचलून घेणे, नवरीला हार अक्षरशः फेकायला लावणे, फेक स्नो चे फवारे वगैरे उडवून देणे वगैरे मर्कटलीला करणार्‍यांचा पण प्रचंड संताप येतो. हे प्रकार जनरली नवर्‍या मुलाचे सो-कॉल्ड 'मित्र' म्हणवून घेणारे करत असतात. यांच्यासाठी लग्न काय किंवा बॅचेलोर पार्टी काय, दोन्हीही सारखेच असतात, भंकस करायचं निमित्त आणि फुकटात जेवण. 'लग्न' हा विधी (बहुतेकांसाठी-किमान मुलींसाठी) आयुष्यातलं एक 'solemn occasion' असतं. त्याची सर्कस बनताना पाहून आयत्या वेळी 'हॅहॅ' करण्यापलिकडे काही करता येत नाही.
ज्यांना असले प्रकार आवडतात त्यांनी स्वतःच्या लग्नात अवश्य करावेत, वाटल्यास विदुषकांकडून मंगलाष्टके म्हणून घ्यावीत आणि भटजी म्हणून एखाद्या चिंपांझीला बसवावे, पण दुसर्‍यांच्या कार्याचा फार्स बनवू नये. वडीलधार्‍यांनीही अशावेळी थोडा वाईटपणा घेऊन या माकडांना वेळीच आवरावं.<<<<

आचरट वाटतात हे प्रकार. केक फासणे आणि विपिंग क्रीम फवारे ह्याने बरेच अपघात झालेत.
डोळ्यात केक जावून , एकीची लेन्स चिकटली. ते तेलकट बटर आयसिंग मुळे लेन्स हातातच येईना .. ना तिला दिसेना.. थोडेफार डोळ्याला सुज आलेली दहा तास ती लेन्स घेवून होती. डॉक्टर प्रयत्न करून थकले. वाढदिवस राहिला बाजूला..

तेव्हा स्वतःला हे प्रकार नसतील आवडत तर निक्षून सांगा.

बाप रे झंपी Sad
माझ्याही हापिसात एकदा माझा वादि साजरा केला जबरदस्तीने २-३ मुली आल्या केक फासायला मी ताबडतोब त्यांना ठामपणे 'हे करायचं नाही असं सांगितल्यावर त्या मागे सरकल्या. हापिसात जाम घाबरतात मला. त्यामुळे तो अपघात टळला.
पण केक मध्ये रंगलेली कित्तीतरी माकडं दर शुक्रवारी कँटीनमध्ये पहायला मिळतात आणि तोंडातून अरेरे शिवाय काहिहि बाहेर पडत नाही Sad

भारतातले सगळेच जण फुकटे नसतात. नर्मदा परिक्रमा केलेल्या लोकां चे अनुभव ऐकलेत तर अर्धपोटी रहाणारी जनताही परिक्रमावासियाला खायला घालते. >> लेखाच्या विषयाच्या कंटेक्स्ट मध्ये हे 'कायच्या काय' वाटले. बाहेरच्या देशात जाऊन अतिशय कंफर्टेबल जीवन जगत असतांना हावरटपणाचे, मॅनर्सच्या अभावाचे प्रदर्शन करणार्‍या छोट्या समुहाबद्दल बोलत आहेत ईथे लोक. त्यांना भारतीय म्हंटले म्हणजे त्याचा अर्थ "ऑलिंपिक मध्ये खेळाडू जसे भारताचे प्रतिनिधित्व करतात आणि त्यांनी काही वाईट केल्यास (डोपिंग, भांडणे, नियम तोडणे ई.) भारताची मान खाली जाते" असा अर्थ नाहीये.
भारतीय हे संबोधन अर्थाने आहे... विशेषण नाही....
चीनी, ग्रीक, ईराणी, ब्रिटिश, मेक्सिकन, ऑस्ट्रेलिअन ह्यांच्या वागण्याचीही आणि त्या त्या देशात अमेरिकनांच्या वागण्याची/ सवयींचीही खिल्ली ऊडवली जाते. 'कल्चरल शॉकचा' दुसरा धागाही वाचलाच असेल तुम्ही.

"नो बडी इज लीविं ग ऑफिस टूडे टिल धिस धिस हॅपन्स" अशी वाक्ये टाकून त्याच चॅट सेशन मधे अर्ध्याच तासात - मी चाललोय माझ्या मुला चा लिटिल लीग चा सेशन आहे. (प ण बाकी टीम मात्र ऑफिसमधे) - असे टाकणारा गोरा मॅनेजर अनुभवलाय. (आणि टीमने चुकारपणा केला नव्हता मुळातच, सगळी डिलिवरी प्लॅन प्रमाणे चाललेली). >> ह्यात काय चुकीचे आहे? तुमच्यासारखे लाँग अवर्स, अबोव अँड बीयाँड वगैरे काम करूनच तो मॅनेजर किंवा सुपिरिअर पदाला पोचलेला असतो. त्याने तिथेच बसून तुम्हाला मॉरल सपोर्ट द्यायला हवा अशी अपेक्षा होती का? मग ती फारच चाईल्डिश आस्क आहे.

एका देशी सबकॉन ला एक दिवस (मुलीचा बड्डे) रजा न देता (गो लाईव वॉज क्लो ज), दुस र्‍या गोर्‍याला मात्र २ वीक्स ची सुट्टी ( दोघही ईक्वली इम्पॉर्टंट होते) घेऊ देणारा मॅनेजर पाहिलाय. >> रजा नाकारण्याची पद्धत कॉर्पोरेट कल्चर मध्ये फार कमी ठिकाणी बघितली आहे. मागितल्यावर सहसा नाही म्हणत नाहीत. चुकीच्या वेळी अनप्लॅन्ड वॅकेशन घेऊन कामाचा खोळंबा करून ठेवणार्‍यालाही त्यावेळी नाही म्हणणार नाहीत मात्र रिव्यू मध्ये त्याची मोठी भरपाई करावी लागते. सपोर्ट फंक्शनमध्ये असलेल्या टीम्स मध्ये रजा नाकारणे वगैर होऊ शकते पण त्याला नाईलाज असतो त्यासाठी अनेक दिवस आधीच सांगून ठेवणे वगैरे करावे लागते. पण हा ग्लोबल प्रॉब्लेम आहे त्याचा कल्चरशी काही संबंध नाही.

नको तिथे कनवाळू सूर लावला की ऊगीचच गंभीर व्हायला होते सगळ्यांना.

वाढदिवसाला केक कापणे ही पाश्चात्य पद्धत भारतात चांगलीच रुढ झाली आहे. परंतु त्या केकवरील क्रीम वा आयसिंग हे उत्सवमूर्तीच्या तोंडाला फासणे ही किळसवाणी परंपरा भारतात का सुरू झाली हे एक कोडे आहे.

हि प्रथा मेक्सिको मध्ये सुरु झाली असे १९८७ साली लिहिलेल्या एका पुस्तकात उल्लेख आहे

नायगारा फॉल्स ची कथा:

मे महिना, अशक्य गर्दि, मेड ओफ द मिस्ट ची वाट बघत होतो - २ तास.
एकदाची बोट आली, पण चढायला देईनात. जवळ जवळ ४५ मि. नन्तर २ कप्ल्स बाहेर आले (देसि). फोटो सेशन करत होते म्हणे!

Pages