भारतीय लोकांमुळे इतर जनतेला बसणारे कल्चरल शॉक अर्थात ओरांग इंडिया तमाशा.

Submitted by विक्रमसिंह on 2 July, 2018 - 02:13

प्रवास करताना किंवा परदेशी रहाताना किंवा भारतातच असताना आपल्या मुळे इतर जनतेला किती धक्के आणि त्रास आपण देत असतो याची कल्पनाच न केलेली बरी. इंडोनेशियात असताना आम्ही आपल्या अशा टिपिकल भारतीय पद्धतीला ओरांग इंडिया तमाशा (ओआयटी) म्हणजे भारतीय लोकांचा तमाशा म्हणायचो. ओआयटीची किती तरी उदाहरणे देता येतील

- कुठेही शिस्तीत रांग न लावता एकदम गर्दी करणे, जसा काही जन्माला येतानाच देवाने आपल्याला कायम रांगेत पुढे रहाण्याचा मान दिला आहे. दुकानामधे दुसर्‍या गिर्‍हाइकाशी दुकानदार बोलत असताना आपलेच घोडे पुढे दामटणे हे त्याचे दुसरे रूप.
- परदेशी विमानतळावर भारतात जाणार्‍या विमानाचे प्रवेशद्वार व इतर देशात जाणार्‍या विमानाचे प्रवेशद्वार यात शिस्तीच्या बाबतीत जमीन अस्मानाचा फरक दिसतो.
- सार्वजनिक अस्वछता आणि स्वछतेच्या आपल्या कल्पना.
- आपल्या मसाल्यांचा घमघमाट. कित्येक ठिकाणी म्हणून भारतीय विद्यार्थ्यांना घरे भाड्यानी देताना अटी घातल्या जातात.
- मला ईंडोनेशियात लोक विचारायचे. तुमच्या बायका पोट उघड का टाकतात. (साडी घातलेल्या). बघण्याचा दृष्टीकोन वेगळा पण हाही त्यांच्या साठी शॉकच ना. (हा नुसता शॉक , पण ओआयटी नाही)

बर्‍याच वेळेला आपल्या गावीही नसते की आपल्यामुळे इतर लोकांना त्रास होतोय.
तुम्ही पण असे शॉकलेले लोक पाहिले असतील. ओआयटी (त्रास देणारे शॉक) अनुभवले असतील.

टीप : मला आपल्याबद्दल टिका करायची नाही. आपले (भारतीयांचे) कित्येक गुण आवडल्याचे लोक आवर्जून सांगतात. त्याबद्दल वेगळा एक धागा काढायला हरकत नाही. पण बर्‍याच वेळेला आपल्याकडून अनाहूत पणे चुका होउ नयेत ही इच्छा. Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

"हा जो करी स्मेल आहे त्याला मी (आणि मोस्ट भारतीय) पूर्णपणे इम्यून आहे. असा काही स्मेल काही भारतीयांच्या अंगाला येत असतो हे मला इंटरनेटमुळे समजलं." -आर यू सिरियस? विद्यार्थी म्हणून अमेरिकेत आल्यापासून हा प्रकार (फोडणी चा वास कपड्यांना लागणे) आणी त्यापासून बचावाचे मार्ग माहीत आहेत आणी वापरले ही आहेत. परफ्यूम्स हा उपाय नाहीये. स्वयंपाक करताना, बाहेरच्या कपड्यात न करणं, शक्यतो, दारं / खिडक्या उघड्या टाकणं, जमलं तर, फोडणी /तळणं वगैरे प्रकार घराबाहेर - बॅकयार्ड मधे करणं, बाहेरचे कपडे ज्या क्लॉजेट्स मधे आहेत, त्या क्लॉजेट्स ची आणी बेडरूम्स ची दारं स्वयंपाकाच्या वेळी - थोडा वेळ नंतर सुद्धा बंद ठेवणं, आणी सगळ्यात महत्वाचं म्हणजे, कपडे धुणं, आंघोळ करणं ह्या सहज सोप्या गोष्टी आहेत.

"काउन्ट युअर अचिएव्हमेंट्स. अरे गर्वाची गोष्ट आहे इमिग्रण्ट इंडियन असणं!" - ह्याचा कपड्यांना फोडणी चा वास येण्याशी काही संबंध नाही.

हा कदाचित अमेरिकन्सना कल्चरल शॉक असेल, किंबहुना विचित्र तरी नक्किच वाटत असेल. काहि उत्साहि देसी मंडळी आपल्या बेटरहाफ/फर्स्टबॉर्न च्या नांवाचा टॅग डिएमव्हित रजिस्टर करतात. (उदा: सोनाली१, अपूर्व२, रेवती३ इ.) साधारणपणे स्पेशल टॅग्जमध्ये आपलं/कुटुंबियांचं नांव कोणी घालत नाहि. (अमेरिकन्स लोकांचे स्पेशल टॅग्ज पाहिले तर त्यांच्या क्रिएटिविटीची दाद द्यावीशी वाटते. एखादा युनिक टॅग दिसला कि आमच्याकडे तो डिकोड करण्याची स्पर्धा लागते.) हि प्रेम्/कृतज्ञता दाखवायची तर्‍हा मला मुंबईतल्या रिक्क्षांवर दिसणार्‍या आई बाबा/साई बाबा यांचा आशिर्वाद यापैकि वाटते... Proud

आपण आपल्याला हवी ती पर्सनलिज्ड कार नंबर प्लेट घेऊ शकतो, असे असेल बहुतेक.

इथे लोकस करी स्मेल वरून भलतेच घसरलेत बुवा ...

काय राव तुम्ही चक्क अनिवासी भारतीयाना तिकडचे नीरस सत्त्वहीन मांसाहारी बीफ वगैरे खायचा उपदेश करून राहिलात ? तीव्र निषेध असल्या गुलामी मनोवृत्तीचा ...

मी गेली २० वर्षे अमेरिकेत राहूनसुद्धा आमटी भात भाजी पोळी सोडत नाही कधी . ज्याना वास येतो ते बसले फाट्यावर . इतर देशातले पब्लिक काही स्वर्गातून अवतरलेले नाही . त्यांच्याही अनेक विशिष्ट सवयी लकबी खटकण्या सारख्या असतात . जेजे अमेरिकन तेते सगळे चांगले ही कुठली भिकारडी गुलाम मनोवृत्ती ?

हायाजेनाबार्ग साहेब आपले प्रतिसाद दोन तीन धाग्यावर पाहिले . तारुण्याच्या फसफसणाऱ्या जोशात वयोवृद्ध लोकांचा / मनोवृत्ती चा उपमर्द नको असे मनापासून सांगावेसे वाटले

हेला, वाहनाची नंबरप्लेट. आपल्याला पाहिजे त्या नावाची (उपलब्ध असेल तर - म्हणजे ऑलरेडी दुसर्‍या कोणी त्याच नावाची घेतली नसेल तर) बनवता येते. डीएमव्ही (आरटीओ इथले) त्याकरता जास्त पैसे घेउन त्यांच्या स्टॅण्डर्ड नंबरिंग ऐवजी तशी बनवून देतात.

मागच्याच आठवड्यतला किस्सा.....
एका मराठी मित्राबरोबर त्याच्या नवीन मस्टँग गाडीत ड्राईव करत होतो... समोरच्या सीआरवी गाडीच्या लायसेन्स प्लेटवर लिहिले होते SINGHAM आणि तो अतिशय विचित्र ड्राईव करत होता.. आणि मागे 'बेबी ऑन बॉर्ड' चे स्टिकरही लावलेले बरका
डिलेड ग्रीन लाईटवर त्याला डावीकडे आणि आम्हाला सरळ जायचे असल्याने दोन्ही गाड्या बाजू बाजूला थांबल्या ... तेव्हा दिसले की तो फोन वर कुणाशी तरी सॉलिड भांडत आहे. मित्राने खिडकीतून त्याच्या पॅसेंजर विंडो वर नॉक केले, त्याने त्याच्या हीटेड कॉलमध्ये विघ्न आल्याने वैतागात विंडो रोल डाऊन केली तर आमच्या ईपितर मित्राने फूल बास मध्ये 'मला राग येतोय...आता माझी सटकली' लावले Proud
पण तो नुसता 'वॉट वॉट' करत राहिला... त्याला काही कळालेच नाही काय चालू आहे. Lol

{{{ देसी }}}

हा शब्द इथे शिवी दिल्यासारखा का वापरला गेलाय?

हायाजेनाबार्ग साहेब आपले प्रतिसाद दोन तीन धाग्यावर पाहिले . तारुण्याच्या फसफसणाऱ्या जोशात वयोवृद्ध लोकांचा / मनोवृत्ती चा उपमर्द नको असे मनापासून सांगावेसे वाटले >> दोन तीन धाग्यांवरचेच का वाचले हो भिडे साहेब? सगळ्याच धाग्यांवरचे वाचा ना.. मागच्या दहा वर्षात बर्‍याच धाग्यांवर प्रतिसाद लिहिले आहेत मी.
वयोवृद्ध लोकांचा / मनोवृत्ती चा उपमर्द >> Uhoh कुठल्या धाग्यावरच्या प्रतिसादाबद्दल म्हणत आहात?
मी आयडी ला संबोधून लिहितो.. प्रत्यक्ष भेट होईपर्यंत वय वगैरे गोष्टींचा काही संबंध नाही.

{{{ देसी }}}

हा शब्द इथे शिवी दिल्यासारखा का वापरला गेलाय?

********

हेच खूप जास्त खटकलं होतं, अर्थात मी ते सौम्यपणे समजवण्याचा पक्षातच असेन. शिवी म्हणून जर एकवेळ सेकंड जनरेशन ने वापरला तरी काही वाटणार नाही, पण इथे सर्रास " देसी " ज्या परिपेक्ष्यात वापरला जातोय ते ह्युमिलीयेटिंग आहे, च्यायला उद्या जाऊन करी खाणे अपराध झाला अन त्याकरता लिथल इंजेक्शन , इलेक्ट्रिक चेयरवर बसवायचं म्हणलं तर हीच आपली(?) माणसं पेटीशन वर "aye" म्हणून सह्या मारतील!

तिकडे गेल्यावर पदार्थही तिकडच्याच वातावरणास सूट होतील असे खाल्ले पायजे. >>> हे खरे आहे. पण इमिग्रण्ट पिढीच्या "अ‍ॅसिमिलेशन" मधे खाण्याच्या सवयी सर्वात शेवटी बदलतात असे म्हणतात. किंबहुना पहिल्या पिढीच्या (म्हणजे जे इथे जन्मलेले नाहीत) सहसा पूर्ण कधीच बदलत नाहीत.

स्वतःबद्दल बोलायचे तर माझ्या आता बदलल्या आहेत. इथे आलो तेव्हा भारतातल्या पदार्थांसारखे पदार्थ शोधणे व ते खाणे असा प्रकार होता - मेक्सिकन बुरिटोज, थाई करी आणि राइस वगैरे. हळुहळू ऑफिस मधे तेथील खाणे खाउन आवड लागली. ते फ्री नव्हते पण पहिले काही दिवस घरून डबा नेल्यावर टीम मधले इतर लोक तसा आणत नाहीत, कॅफेटेरिया मधले घेतात असे दिसले, मग मीही तसे करू लागलो. आता अनेक दिवस काहीही भारतीय खाणे नाही खाल्ले तरी काहीच वाटत नाही. पण सर्वांच्या नाही बदलत. त्यातही प्रत्येकाची फ्लेक्झिबिलिटी वेगळी. मला अजूनही इथली कॉफी झेपत नाही. चहाच लागतो. आणि माझीही बदलली म्हणजे फक्त व्हेजिटेरियन्/चिकन वाले इथले पदार्थ. बीफ, पोर्क वगैरे नाहीच. आता एनीवे अमेरिकेतील बहुसंख्य शहरांत बर्‍याच रेस्टॉ मधे व्हेजिटेरियन पर्याय असतातच.

इथे मुळात तुम्ही काय खाताय यात कोणी पडत नाही. ऑफिस मधे खात असलात तर तिथला डेकॉर पाळा इतकेच असते. एका कंपनीत मी पाहिले होते. भारतातून २-३ महिन्यांकरता आलेले ७-८ जण एकमेकांच्या जवळपास क्यूब्ज मधे बसायचे. त्यांच्या येथील मॅनेजरने त्यांना कसलेही ओरिएण्टेशन दिलेले नसावे. ते खास देसी स्टाइल ने इथली लंच टाइम वगैरे पार निघून गेल्यावर दुपारे एक दीड ला क्यूब्ज च्या मधल्या जागेत एका टेबलाभोवती बसायचे आणि डब्यांतून खायचे. त्यावेळेस आजूबाजूच्या लोकांचे लंचनंतरचे काम्, मीटिंग्ज सुरू झालेल्या असत. यांची लंच आरामशीर चालायची. इथपर्यंतही ठीक होते. पण मग त्यानंतर हे लोक पुन्हा आपापल्या डेस्क वर जात आणि त्या टेबलावरचे अर्धवट खालेले डबे, ते सांबार वगैरेचे वास तेथेच राहात पुढे २-३ तास. मग नंतर कधीतरी ते आवरून टाकत. तरी टेबलवर डाग दिसतच. तेथे हे एकदम विचित्र दिसे. बंगलोर च्या एखाद्या ऑफिस मधे एखादा गोरा जर रोज कोठूनतरी बीफ किंवा पोर्क घेउन आला, इतरांचे काम सुरू असताना तेथे खात बसला, आणि जेवल्यावर पुढे २-३ तास तो अर्धा खाल्लेला डबा तसा ठेवून दिला तर ते जसे दिसेल त्यावरून या चित्राची कल्पना येइल Happy

देसी म्हणणे म्हणजे शिवी का वाटली? त्याची व्याख्या सरळ आहे. आपण व आपले इथले नातेवाईक आणि जवळचे मित्र सोडून बाकी सगळे भारतीय हे 'देसी' असतात Happy

देसी शब्द कॉमनली वापरला जातो. त्यात शिवी / ओवी असं काहीही नाहीये. उगाच जुन्या पुणे-मुंबई हायवेवर, भोसरी जवळ नाशिक फाटा फुटतो, तसा चर्चेला फाटा नको.

रमेश भिडे, बाहेरच्या देशातल्याच नाही, आपल्या देशातल्या लोकांना सुद्धा कपड्यांना येणार्या वासाचा त्रास होतो. मुळात असा कुठलाही वास येणारे, न धुतलेले कपडे - जगाच्या पाठीवर कुठेही राहिलं तरी - घालूच नयेत.

कुणी काय खावं-प्यावं हा वैय्यक्तिक प्रश्न आहे. पण आपण खात नाही म्हणून दुसर्याच्या अन्नाला हिणवण्याची गरज नसते. योग्य जागा-वेळ समन्वय साधला तर भाजी-पोळी-भात-आमटी प्रमाणेच मिडीयम कुक्ड हॅमबर्गर, पेप्परोनी - इटालियन सॉसेज टॉपिंग चा पिझ्झा वगैरे खायला सुद्धा मजा येते आणी वैविध्यपूर्ण खाद्यपदार्थांनी रसना तृप्त होते.

ते खास देसी स्टाइल ने इथली लंच टाइम वगैरे पार निघून गेल्यावर दुपारे एक दीड ला क्यूब्ज च्या मधल्या जागेत एका टेबलाभोवती बसायचे आणि डब्यांतून खायचे. >> फा देसी शब्दाला XXXX कर रे बाबा..

देसी शब्द कॉमनली वापरला जातो. त्यात शिवी / ओवी असं काहीही नाहीये. >>> एक्झॅक्टली, फेफ Happy

हाब - फॉलो अप पोस्ट लिहीली आहे Happy

>>देसी शब्द कॉमनली वापरला जातो. त्यात शिवी / ओवी असं काहीही नाहीये.<<
धन्यवाद फेरफटका. देसी म्हणजे इमिग्रंट (फर्स्ट जेन) इंडियन्स. आता त्याचा डिरागटोरी अर्थ कोणी घेतला तर नाईलाज आहे.

विक्रम पंडितसाहेब, पुढेमागे या विषयावर पुस्तक लिहिलंत तर ह्या शब्दाची व्याख्या जरुर लिहा; गैर्समज टळ्तील.... Happy

वाघोबा म्हंटलं तरी खातो वाघ्या म्हंटलं तरी खातो... तसं भारतीय म्हंटलं तरी आवडत नाही देसी म्हंटलं तरीही नाही... म्हणावे तरी काय मग.
'संबोधन' आहे 'विशेषण' नाही सांगूनही पुन्हा ये रे माझ्या मागल्या वळणावर जातो आहे बाफ.

विक्रम पंडितसाहेब, पुढेमागे या विषयावर पुस्तक लिहिलंत तर ह्या शब्दाची व्याख्या जरुर लिहा; गैर्समज टळ्तील.... Happy >> कोण सिटिवाले?
ते आहेत की काय मायबोलीवर Proud

भारतीय, पाकिस्तानी, बांग्लादेशी सगळे स्वतःला देसीच म्हणवून घेतात. मागे एका श्रीलंकन माणसानं 'we desis' असा उल्लेख केला होता, पण तो अगदीच अपवाद आहे. भारतीय-पाकिस्तानी तर नक्कीच 'देसी' कॅटेगरीत येतात.

इतका वेळ करी मसाल्याचे वास येतात सांगतोय तर ते कसे येतच नाहीत आणि समजा आलेच तर कसे अंगावर मिरवले पाहिजेत. आता ते का येताय ते पटलय तर लोकल खाद्य संस्कृती जपा भारतीय वस्तू खाताच का? हवेला चांगलं नाही चा ट्रॅक! धन्य आहेत.
देसी हा स्टीरिओटाईप आहे. जसा माबोवर कोकणस्थ म्हटलं की फक्त कंजूस आठवतं काहीसा तसाच.
हाय टेक, सेविंग करणारा, मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलणारा हे ही ऍड करा त्या स्टी.टा त

आपण अन कल्चरड वागतो आणि बाकी च्या देशातले लोक खूप चांगले वागतात , असे वाटत असेल तर फक्त तिथली लॉ एन्फोर्समेंट काढून टाका ..मग कळेल कसे आहेत ते लोक... अमेरिके मध्ये कुठल्या हि डाउनटाउन च्या जवळ गाडी चालवून बघा ..मग कळल कि कशी गाडी हाकतात हे लोक.. कोणीही स्पीड लिमिट पाळत नाही ना लेन ची शिस्त ... फ्रीवे ला पोलीस दबा धरून बसलेले असतात ते बघून स्पीड कमी करतात ...

तो या धाग्याचा विषय नाही ना पण. त्यांच्या बद्दल वाईट लिहून इगो शांत होणार असेल तर धागा काढा ते ही लिहितो.

>>कोण सिटिवाले?<<

नाहि, ह्या धाग्याचे निर्माते. सुरुवातीला मी हि दचकलो होतो, कारण सीटी सोडुन त्यांना जमाना झाला, म्हणुन मोकळ्या वेळात इथे आले कि काय? पण ते सध्या मन्हॅटन मध्ये तरी आहेत का याची कल्पना नाहि. माझी ती सूचना धागाकर्ते, विक्रमसिंह पंडित यांना होती... Wink

जे जे अमेरिकन ते ते चांगले असे कोणी लिहीले असेल तर त्याला गुलामगिरी पासून असतील नसतील ती विशेषणे लावा.

पण आधी जरा वाचा तरी, असे कोणी लिहीलेले आहे का Happy

बास करा रे आता,
एक दिवस कम्पलसरी ब्रेक घ्या सगळे,
नवे शॉक आठवले की नविन लिहा.

खालील लिन्क पहा आणि उत्तरे वाचा
हातच्या काकणास आरसा कशास ?

As a foreigner, what things do you dislike about America, or American people? What things in your country are drastically different from how things are in America? What myths about America did you not believe until you came here?

https://www.quora.com/As-a-foreigner-what-things-do-you-dislike-about-Am...

मी गेली २० वर्षे अमेरिकेत राहूनसुद्धा आमटी भात भाजी पोळी सोडत नाही कधी . ज्याना वास येतो ते बसले फाट्यावर . इतर देशातले पब्लिक काही स्वर्गातून अवतरलेले नाही . त्यांच्याही अनेक विशिष्ट सवयी लकबी खटकण्या सारख्या असतात . जेजे अमेरिकन तेते सगळे चांगले ही कुठली भिकारडी गुलाम मनोवृत्ती ?>>>
यात अभिमान वाटण्यासारख काय आहे ? देसी/विदेशी वगैरे जाऊद्या पण आपण आयुष्यभर एकच गोष्ट करत आलो आणि नविन काहीही ट्राय केल नाही. ह्यात अभिमान कसला? उलट फ्लेक्झिबिलिटी नसल्याने आपलं आणि आपल्या भोवतालच्या लोकांच आपण नुकसान करत असतो.

हायाजेनाबार्ग साहेब आपले प्रतिसाद दोन तीन धाग्यावर पाहिले . तारुण्याच्या फसफसणाऱ्या जोशात वयोवृद्ध लोकांचा / मनोवृत्ती चा उपमर्द नको असे मनापासून सांगावेसे वाटले>>>
वयाने मोठे म्हणुन आदर, अस का असाव भिडे काका ? माझी इथली व्हिपी आहे. वयानं माझ्यापेक्षा लहान आहे. तिच नॉलेज, तिचे इथिक्स,प्रोफेशनिलझम सगळ्याचा आदर वाटतो मला.
समजा एखादा ९५ वर्षाचा चोर माणुस आहे त्याचा आदर कशाला ? परवा इथल्या एका ९५ वर्षाच्या बाईने मुलाचा खुन केला. आता तिचा आदर कसा करणार ?
इथे काही चुका लोक करतच नाहीत, सगळे आदर्शच वागतात असा कुठे विषय आहे बाफचा ? जेव्हा तो येईल तेव्हा ५० पानं इथल्या लोकांचे अवगुण लिहिता येतील.
विषये आहे आपण कसे इतरांना शॉक देतो,ऑफेंड करतो इत्यादी. Lets first fix us because that is in our hands.
आपल्या देशाचा आपल्याला इतका अभिमान वाटतो ना तर मग चांगल्या गोष्टी पुढे नेवून दाखवुया कि. वास मारत, धक्का बुक्की करत पुढे जाण्यात काय हशील ?

Pages