भारतीय लोकांमुळे इतर जनतेला बसणारे कल्चरल शॉक अर्थात ओरांग इंडिया तमाशा.

Submitted by विक्रमसिंह on 2 July, 2018 - 02:13

प्रवास करताना किंवा परदेशी रहाताना किंवा भारतातच असताना आपल्या मुळे इतर जनतेला किती धक्के आणि त्रास आपण देत असतो याची कल्पनाच न केलेली बरी. इंडोनेशियात असताना आम्ही आपल्या अशा टिपिकल भारतीय पद्धतीला ओरांग इंडिया तमाशा (ओआयटी) म्हणजे भारतीय लोकांचा तमाशा म्हणायचो. ओआयटीची किती तरी उदाहरणे देता येतील

- कुठेही शिस्तीत रांग न लावता एकदम गर्दी करणे, जसा काही जन्माला येतानाच देवाने आपल्याला कायम रांगेत पुढे रहाण्याचा मान दिला आहे. दुकानामधे दुसर्‍या गिर्‍हाइकाशी दुकानदार बोलत असताना आपलेच घोडे पुढे दामटणे हे त्याचे दुसरे रूप.
- परदेशी विमानतळावर भारतात जाणार्‍या विमानाचे प्रवेशद्वार व इतर देशात जाणार्‍या विमानाचे प्रवेशद्वार यात शिस्तीच्या बाबतीत जमीन अस्मानाचा फरक दिसतो.
- सार्वजनिक अस्वछता आणि स्वछतेच्या आपल्या कल्पना.
- आपल्या मसाल्यांचा घमघमाट. कित्येक ठिकाणी म्हणून भारतीय विद्यार्थ्यांना घरे भाड्यानी देताना अटी घातल्या जातात.
- मला ईंडोनेशियात लोक विचारायचे. तुमच्या बायका पोट उघड का टाकतात. (साडी घातलेल्या). बघण्याचा दृष्टीकोन वेगळा पण हाही त्यांच्या साठी शॉकच ना. (हा नुसता शॉक , पण ओआयटी नाही)

बर्‍याच वेळेला आपल्या गावीही नसते की आपल्यामुळे इतर लोकांना त्रास होतोय.
तुम्ही पण असे शॉकलेले लोक पाहिले असतील. ओआयटी (त्रास देणारे शॉक) अनुभवले असतील.

टीप : मला आपल्याबद्दल टिका करायची नाही. आपले (भारतीयांचे) कित्येक गुण आवडल्याचे लोक आवर्जून सांगतात. त्याबद्दल वेगळा एक धागा काढायला हरकत नाही. पण बर्‍याच वेळेला आपल्याकडून अनाहूत पणे चुका होउ नयेत ही इच्छा. Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

नागरिक शास्त्र साधारण ३ री वा चौथीपासून शिकवले जात होते. डेरिव्हेटिव्ह आणि तत्सम गोष्टी मी तरी शाळेत शिकलेलो नाही.
राष्ट्रपतीची कर्तव्ये, त्याचे मानधन, जिल्हाधिकार्‍याचे मानधन, राज्यपालाचे मानधन हे कशासाठी शिकायचे म्हणे? २० वर्षापूर्वी शिकलेले हे आकडे आज तसेच आहेत का?
समाजाची गरज काय आहे हे बघून अभ्यासक्रम ठरवायचा म्हटला तर नागरिक शास्त्रात सरकार कसे चालते, राज्यसभेत कोण आणि किती काळाने निवडून येतात, राज्यपालाची नेमणूक कोण करतो ह्यापेक्षा नागरिकाने काय केले पाहिजे हे जास्त महत्त्वाचे आहे. सरकार कुठल्या सुविधा पुरवते आणि त्या जबाबदारीने कशा वापराव्यात हे जास्त उपयुक्त आहे.
असो. इतके विषयांतर पुरे झाले.

अवांतर: आपण आवशक्य तेवढी स्वच्छता पाळावीच पण जिथे तिथे जंतूशोधक चष्मा चढवून बघितले तर "हे" जग फारच असुरक्षित वाटू लागेल. शेवटी शरिराला थोडा जंतूंचा संपर्क राहिला तरच ते त्यांच्यावरची प्रतिकारशक्ती निर्माण करेल. नाहीतर झाला थोडा जंतूसंसर्ग की धरले अंथरूण, असे व्हायचे.

आयसीयुत करायच्या गोष्टी रोजच्या जीवनात करणे हे अमेरिकन जीवन्ष्टाईल आहे. आता ते स्सिरीमंत आहेत म्हणुन ते करतील ते पुर्व्दिशा...

पर्फ्युमचा/स्प्रेजचा वास हा त्रासदायक , अनारोग्यकारक आहे - ह्याचाही त्रास होतो. पण हा जिथल्या तिथल्या संस्कृतीचा भाग आहे. त्याचं उद्दात्तीकरण/निंदानालस्ती ही टोकं कशाला!>>> १००% सहमत

ह्यात काय चुकीचे आहे? तुमच्यासारखे लाँग अवर्स, अबोव अँड बीयाँड वगैरे काम करूनच तो मॅनेजर किंवा सुपिरिअर पदाला पोचलेला असतो. त्याने तिथेच बसून तुम्हाला मॉरल सपोर्ट द्यायला हवा अशी अपेक्षा होती का? मग ती फारच चाईल्डिश आस्क आहे. >>> १००% असहमत

एकदा एक इजिप्तिय पाहुणा इकडे आला. त्याला घेऊन खायला गेलो. तिखटाबद्दल सांगूनही त्याने ऐकले नाही. Happy तावातावाने "एक्ट्रा स्पायसी" ऑर्डर दिली. व्हायचे तेच झाले. नाक डोळे पुसत पुसत कसेतरी जेवण आटोपले. जरा शांत झाल्यावर म्हणाला - I am shocked, how you all can eat this!

मी जे नागरिक शास्त्र शिकलो त्यात राष्ट्रपतीची निवडणूक, राष्ट्रपती, राज्यपाल ह्यांचे अधिकार, त्यांचे मानधन किती वगैरे अत्यंत निरर्थक गोष्टी भरलेल्या होत्या. एक चांगला नागरिक म्हणून काय करावे हे शिकवले असते तर जास्त उपयोगी पडले असते. बस, रेल्वे, सार्वजनिक बागा, पर्यटनस्थळे इथे जबाबदारीने वागावे कारण तुमच्या आईबापांच्या करातून हे सगळे चालते. ह्याची नासधूस कराल तर सरकारचे म्हणजे आपलेच नुकसान आहे. स्वच्छता, सचोटी हे निव्वळ शोभेकरता नसतात. त्याचे दूरगामी परिणाम होतात असे शिकवले असते तर निदान त्यातले काहीतरी, काही लोकांच्या डोक्यात राहिले असते.>>> +१११११११११११११११११११११११११११११

अगदी नाक शि़करताना/ खोकताना रुमाल ठेवावा हे ही शिकवलेलं. संडासात कार्यभाग उरकल्यावर साखळी ओढावी. यात वर साखळीचं चित्र असलेला फोटो ही आठवतो. कागद/ कचरा पेटीत टाकावा, मल मूत्र विसर्जन उघड्यावर करु नये... सगळं सगळं शिकवलेलं,>>>>
हे नागरिकशास्त्रात नसायचे तर इयत्ता पहिली आणि दुसरीत 'परिसर' असा काहीतरी विषय होता, त्यात आणि तिसरीपासून पुढे सामान्य विज्ञान या विषयात शिकवायचे!

विमु... म्हणजे ते नागरिकशास्त्रमध्ये शिक्वलए तर परिणामकरक ठर्तिल का?

म्हणजे ते नागरिकशास्त्रमध्ये शिक्वलए तर परिणामकरक ठर्तिल का?
Submitted by हेला on 11 July, 2018 - 16:22>>>

असं मला म्हणायचं नाही, फक्त या गोष्टी २-३ वर्ष शिकवण्यापेक्षा नागरिकशास्त्रातील बिनकामाच्या गोष्टी काढून टाका आणि या गोष्टी १ ते १० अशा सतत १० वर्ष शिकवा, म्हणजे त्या नक्कीच परिणामकारक ठरतील.

(तसंही आमदार/खासदार होण्यासाठी काय पात्रता लागते वगैरे शिकून मला तरी फायदा नाही झाला. मी जेव्हा निवडणूक असेल तेव्हा कोणी योग्य उमेदवार असेल तर त्याला मत देतो नाहीतर NOTA चा पर्याय वापरतो!)

मी जे नागरिकशास्त्र.......

********

हे सगळे शिकलेला माझा अमेरिकन मॅनेजर

१. work your "asses off" (गां* घासा)
२. the client is sittin with his d*** in his hand (गिऱ्हाईक त्याचं ** हातात घेऊन बसलाय)
३. screw you (तुला झ**) / screw xyz from testing (त्या टेस्टिंग मधल्या अबकला झ**)

वगैरे विचार डेली का बोलत असेल? कंसातले मराठी मुद्दाम दिले आहे इंग्लिश मधल्या अंगळवणी पडलेल्या वाक्यांचे भयानक अर्थ नीट मातृभाषेत पोचावेत म्हणून!

रांगा तोडू नये, थुंकू नये, मोठ्याने बोलू नये, मायक्रोव्हेव मध्ये तांदूळ शिजवू नये वगैरे शिकलेल्या लोकांना "नागरिकशास्त्रात" इतकं साधं संभाषण सौजन्य शिकवत नाहीत का? असा विचार मनात येतो राहून राहून.

का आपण आपल्या वाईट सवयी सोडून तिकडच्या वाईट सवयी अंगिकराव्या का? अन कश्यासाठी? शेवटी कसंय पळसाला पाने तीनच!

(तसंही आमदार/खासदार होण्यासाठी काय पात्रता लागते वगैरे शिकून मला तरी फायदा नाही झाला. >>>
ते तुम्हला नाही शिकवत, मते कशी फोडायची, कोणाला कसा खाली बसवायचा, इ इ ते डायरेक्ट प्रॅक्टीकल्स अस्त्यात आन ते 'योग्य' लोकांनाच शिक्वत्यात

वर जे काही लिहिलंय तसं एथिकल नागरिकशास्त्रात नाही तर पूर्वी "सामुदायिक जीवन" नावाच्या विषयात शिकवत असत. त्यात झेब्रा क्रॉसिंग वर रस्ता ओलांडावा. बसमध्ये इतरांना फार वेळ उभे रहावे लागत असल्यास आपण उठून त्यांना आपली जागा द्यावी अशा शिकवणी असत.

अवांतर - यावरुन एक जोक आठवला.

पिंटू :- आमच्या पुस्तकात चूकीचं लिहिलंय. त्यात लिहिल्याप्रमाणे बसप्रवासात मी उठून काकूंना बसायला जागा दिली तर त्या माझ्यावर किती रागावल्या.
आई:- पिंटू तू कुठे बसला होतास?
पिंटू:- बाबांच्या मांडीवर...

कदाचित यामुळेच विद्यार्थ्यांना सामुदायिक जीवन विषय शिकविण्याचं बंद झालं असावं.

रांगा तोडू नये, थुंकू नये, मोठ्याने बोलू नये, मायक्रोव्हेव मध्ये तांदूळ शिजवू नये वगैरे शिकलेल्या लोकांना "नागरिकशास्त्रात" इतकं साधं संभाषण सौजन्य शिकवत नाहीत का? असा विचार मनात येतो राहून राहून.
Submitted by जेम्स वांड on 11 July, 2018 - 16:52>>>>

?????
ऑफिसमधल्या जेवणाचा डबा गरम करण्यासाठी असलेल्या मायक्रोव्हेवबद्दल आहे का हे???

वगैरे विचार डेली का बोलत असेल? कंसातले मराठी मुद्दाम दिले आहे इंग्लिश मधल्या अंगळवणी पडलेल्या वाक्यांचे भयानक अर्थ नीट मातृभाषेत पोचावेत म्हणून! >> अर्रर्र असे कधीही करू नये.. दुसर्‍या भाषेतले स्लँग्स आपल्या मातृभाषेत आणून त्यांचे अर्थ लावण्यात काहीही अर्थ नाही.
ऊदाहरणार्थ दोन ऊच्चशिक्षित मित्र आपल्या आजोबांबद्दल बोलत असतांना सहज So your Grandpa was a rich Dog! म्हणून जातील.
भारताच्या कुठल्याही कोपर्‍यात आपल्या आजोबांना कोणी 'कुत्रा' म्हंटले (गंमतीत का असेना) तर प्रकरण हातघाईवर येईल.
पूर्वीच्या काळी आपले आज्जी /आजोबा लोक जे काय म्हणी/ वाक्प्रचार वापरत ते तुम्ही आज तुमच्या कुटुंबातील सदस्यांबरोबर वापरू शकता का?

पुन्हा ट्रेडींग फ्लोर, आयटी डिपार्टमेंट, सर्विस कंअपनी, प्रॉडक्ट कंपनी, स्टार्टअप्स असा वातावरणाचा आणि त्यातल्या कामाच्या ताणाचा फरक असतो.
आमच्या ट्रेडिंग फ्लोर वर या.... पंधरा मिनिटात आपले अपवित्र कान ऊपटून टाकावे वाटतील तुम्हाला.. ह्यात शिक्षणाचा काही सबंध नसतो सगळे लोक मोठ्या बिझनेस स्कूल्स मधून आलेले असले तरी असेच बोलतात...... पण ते तिथे ऐकून तिथेच सोडून द्यायचे असते...पुन्हा हीच ट्रेडिंग फ्लोरवरची भाषा दुसर्‍या सोशल सेटिंग्ज मध्ये बोलायला जाल तर फसाल. आणि मातृभाषेत भाषांतर करून जीवाला लाऊन घ्याल तर जगणे मुष्कील होऊन जाईल तुमचे.

एक निरिक्षण... सार्वजनिक जीवनात भारतीयांच्या (संबोधन) स्वाभिमानाची व्याख्या ईतर पाश्चात्य देशांतल्या व्याख्येपेक्षा खूप टोकदार आणि कॉम्प्लेक्स आहे.. तिला आपण थोडे टेम करणे जरूरी आहे. तिचे राग + स्वार्थ हे कंगोरे थोडे बोथट करून पेशन्स आणि सौजन्याच्या कक्षा वाढवल्या पाहिजेत.

अवांतर - शाळेत असताना सामुदायिक जीवन आणि नागरिक शास्त्र असे दोन वेगळे विषय होते. सार्वजानिक स्वच्छतेशी निगडित गोष्टी सामुदायिक जीवनात असायच्या व नागरिक शास्त्रात सरकार म्हणजे नक्कि काय व ते कसे बनते, राष्ट्रीय व स्थानिक पातळीवरील प्रशासकिय संस्था व त्यांची कार्ये ह्यांची माहिती होती. दोन्ही विषय महत्वाचे आहेतच पण त्याला इतकं कमी महत्व दिलं जायचं कि ते खिजगणतीतही नसायचे. आमचे नागरिक शास्त्राचे शिक्षक क्वचितच कधी तास घ्यायचे आणि आले तरी नुसते पुस्तकातले वाचुन दाखवायचे. आम्ही सुद्धा आयुष्यात कधी राजकारणात कशाला जायचे (अज्ञाना पायी आम्ही प्रशासकिय आणि राजकिय संस्र्थांची एकत्रच मोट बांधली होती) म्हणून कधी फारसे लक्षच दिले नाही आणि परिक्षेपुरता अभ्यास करत राहिलो. आणि सामुदायिक जीवनात शिकवल्या जाणार्‍या गोष्टी इतक्या नेहमीच्या वागण्यातल्या होत्या कि ह्यात काय शिकायचे असे वाटायचे. आज कळतय कि समाजात अनेकांना ते शिकायची गरज होती.
आम्हाला सरकार नुसते कल्याणकारीच शिकवले जाते. नागरिक म्हणून आपली काय कर्तव्ये आहेत, कर भरणे का महत्वाचे आहे, सामाजिक शिस्त का महत्वाची आहे हे विस्तृतपणे शिकवले असते तर बरे झाले असते. ती मानसिकताच कधी तयार झाली नाही तर लोकांना तरी किती दोष द्यायचा? असो, आज हे दोन्ही विषय गणित व विज्ञानासारख्या मुख्य विषयांम्हालानीट शिकवले गेले पाहिजेत असे वाटतय. ज्या गोष्टी आपणच नीट शिकलो नाही त्या पुढच्या पिढीला तरी कसे शिकवणार. ह्यापुढे शिक्षणातुच त्या बिंबवल्या गेल्या पाहिजेत.

थोडक्यात
स्वच्छतेचे धडे शाळेत शिकवले होते - चेक
समुदायात कसे वागायचे शिकवले होते - चेक
बाकी पगार किती तो आकडा शिकवला. मान्य आहे त्या आकड्याला काही फार महत्त्व न्हवते पण शिक्षक बथ्थडपणे तो आकडा एका वाक्यात उत्तरे द्या टाइप प्रश्नामध्ये शिकवायचे. तो आकडा कोण ठरवतो, कसा ठरतो, महागाई दराप्रमाणे बदलतो का, बदलायचा असेल तर काय करतात, तो आकडा शून्य का असू नये आणि किमान १ तरी का असावा, यावर डिस्कशन करुन एक सुजाण नागरिक बनू शकतो. तसंच केळीचं साल रस्तावर फेकू नका धर्तीची इतर कर्तव्ये किंवा महानगरपालिकेची आणि राज्य सरकारची कामे यात मध्ये रेष ओढून फरक स्पष्ट करा पलिकडे जर शिक्षकांनी बघितलंच नाही आणि समाजात तेच दिसत राहिलं तर अशीच पोरं शिकुन पुढे जाणार.
मला शाळेत इतिहासाला, मराठीला नववी दहावीला एक दोन बाई होत्या त्या आणि एखाद सन्माननीय अपवाद वगळले तर पुस्तक वाचा आणि धडा शिकवा ह्या पलिकडे कोणी काहीही शिकवलं नाही. इतर शाळांतही फार वेगळं नसावं.
वर कोणीतरी हे शिकवलेलं हे मान्य करुन 'पण ना.शा. ऐवजी हेच दहावीपर्यंत दरवर्षी शिकवायला हवं होतं' म्हणालं. काय फरक पडला असता? आणि दहा वर्षे तेच शिकवून लोक आचरणात आणू लागले असते याची खात्री आहे का?

अवांतराच्या रच्याकने : ऑन लायटर साईड, मॅक्सवेलची इक्वेशन्स डबल ई मध्ये किमान ५- ६ विषयातं शिकूनही ढिम्म फरक पडला नाहीये माझ्यात. Proud

परफेक्ट बोललात हायझेनबर्ग, मला कोणीतरी इतकेच निरक्षीर बोलणारे हवे होते, का? ते सांगतो.

पहिले म्हणजे मी अजिबात मनाला लावून घेत नाही, एक प्रयोग म्हणून मी हे भाषांतर केलं होतं. दुसरं म्हणजे जसं आपण एकमेकांत तिथलं तिथंच सोडून द्या वगैरे सामंजस्य दाखवू शकतो, तसं अमेरिकन / फिरंगी दाखवतात? नसले तर हे त्यांना आपल्याला सांगता येईल का? की बाबांनो आम्ही करी खातो, जगातील सगळ्यात घाण वास असणाऱ्या घामाचे झरे पाझरत असतात आमच्या अंगातून, आम्ही रांगा मोडतो, पण आम्ही हुशार अभियंते/डॉक्टर्स/मॅनेजर्स/व्यावसायिक लोक आहोत, त्यात काय ते वाईट गेले मरणा लागुनी लेट्स टॉक कोडिंग, ऐकतील असे ते लोक? तिथल्या तिथं सोडा म्हणणे वेगळे आहे (अन प्रॅक्टिकलही) पण दरवेळी सोडता येईलच असे नाही. तरी बरं भारतीय अमेरिकेतील रीचेस्ट इमिग्रंट्स आहेत, बहुसंख्य भारतीय कायदेशीर रित्या नीट व्हीजा घेऊन आलेले आहेत, स्कील्ड आहेत, एव्हरेज अमेरिकन माणसापेक्षा जास्त सुशिक्षित शांतताप्रिय आहेत, जमेल तसे जवळपास सगळे कायदे पाळून राहतात. वार लावून जेवणारी गरीब पोरं म्हणून भारतीय गेलेले नाहीत अमेरिकेत, त्यांना तितका मान आहे. after all they are the tax payers too!

बरं, अरब, इजिप्शियन्स, ज्यूज वगैरे आपापली व्हीम्स नीट कॅरी करतात, त्यांना पण हजार वाईट सवयी आहेत, चिनी पण आहेत कोरियन्स आहेत सगळे कुठे न कुठे लॅग होतात अन ते त्याला कॅरी करतात, why do Indians need to be so apologetic , so much as to discussing the "mistakes" on a exclusive "marathi only" forum, ठिके, आम्ही तुमचं "फक यु" "स्क्रू यु" सहन करतो, तुम्ही आमचं बिस्किटं ओरबाडणं सहन करा, कारण आफ्टर ऑल इट्स जस्ट फॉर गुड बिझनेस , राईट?

(प्रतिसादापूरती स्वाक्षरी) Never forget who you are, the world wont, wear it like an armor and nobody can hurt you anymore

-श्री १२००१ टिरियोन 'डेडफुटया बॉम्ब' लॅनिस्टर

विशेष विनंती - तुमचे आर्टिक्युलेट प्रतिसाद आवडतात, माझंच म्हणणं बरोबर असा माझा आग्रह नाही, पण तुम्हाला म्हणून थोडं एक्सटेंडेड विवेचन दिलं, प्लीज डू करेक्ट मी इफ आय एम रोंग सर

ऑफिसमधल्या जेवणाचा डबा गरम करण्यासाठी असलेल्या मायक्रोव्हेवबद्दल आहे का हे???
<<
संडासात हात वाळवण्यासाठी असतो त्या मायक्रोवेव्हबद्दल आहे बहुतेक.

पण आम्ही हुशार अभियंते/डॉक्टर्स/मॅनेजर्स/व्यावसायिक लोक आहोत, >> हे आणखी एक मिस कन्सेंप्शन. मला अमेरिकन, ब्रझिलिअन, ब्लॅक, कोरिअन, इझ्रायली, व्हिएतनामीज, रशिअन आणि चायनिज सगळे लोकं तितकेच हुषार भेटले आहेत. पैसे कमवायला आपण फक्त वरील व्ययसायात जातो. इथे आल्यावर समजतं हाय टेक पेक्षा प्लंबरचा आवरली रेट जास्त आहे. पुढची पिढी कितपत या व्यवसायात जाते मला शंका आहे. सो हुषारी बद्दल माहित नाही, पण सरासरी शिक्षण जास्त असतं.

आणि जीवनात आपलं काम आपण फक्त ८ तास करतो (तेवढंच अपेक्षित असतं) आणि आयसोलेशन मध्ये जवळ जवळ करतच नाही. सो आम्ही कसेही वागू ... हे असह्य होत नाही तो पर्यंत सगळे टॉलरेट करतातच.
ट्रेडिंग फ्लोरचं माहित नाही, पण आमच्याकडे अशा स्लॅग निघाल्या आणि कुणी एच आर कडे तक्रार केली (यातील तक्रार केली हा भाग महत्त्वाचा आहे, एफ वर्ड कॉमन आहेच) तर त्याला /तिला वॉर्निंग मिळेल आणि ते जराही डिस्क्रिमिनेशनच्या जवळ जाणारं असेल तर ताबडतोब 'लेट गो'.

असं बघा, भैया म्हटलं, बाँग म्हटलं, काश्मिरी म्हटलं, बांग्लादेशी म्हटलं, आंध्रा म्हटलं, नॉर्थ ईस्ट म्हटलं... अगदी सपेचा म्हटलं की काय डोळ्यासमोर येतं तुमच्या? स्टिरिओटाईप. बरोबर? तसे स्टिरिओटाईप भारतीय म्हटले की काय डोळ्यासमोर येतं? तर बेशिस्त मॅनरलेस करी आणि बरेच पैसे कमवुन आमचे जॉब खाणारी व्यक्ती. म्हणजे सगळे तसे आहेत का? उत्तर अर्थातच नाही.
तसेच रँच ९९ दुकान असलं तर तिकडे चायनिज ड्रायव्हर असतील, तो रस्ता नको. कोरिया टाउन मधलं रेस्टॉ. नको वास येतात, मेक्सिकन एरियात घर नको.. कारण लो इनकम क्राईम रेट जास्त शाळा चांगल्या नाहीत. हे स्टिरिओटाईप आहेत. ते का आहेत हे दिसतं, बदलता आले तर बदलावे इतकंच. यात शेमिंग नाही.

जेम्स,
अमितने लिहिले त्यालाच मम म्हणतो.

नसले तर हे त्यांना आपल्याला सांगता येईल का? की बाबांनो आम्ही करी खातो, जगातील सगळ्यात घाण वास असणाऱ्या घामाचे झरे पाझरत असतात आमच्या अंगातून, आम्ही रांगा मोडतो, पण आम्ही हुशार अभियंते/डॉक्टर्स/मॅनेजर्स/व्यावसायिक लोक आहोत, त्यात काय ते वाईट गेले मरणा लागुनी लेट्स टॉक कोडिंग, ऐकतील असे ते लोक? >> बेशिस्त दाखवणे/ वास येणे आणि कामात हुशार असणे/ रिच असणे/ टॅक्स भरणे वगैरे वेगवेगळ्या गोष्टी आहेत... सार्वजनिक ठिकाणी तुम्ही कोण आहात, घरी ऑफिसात काय काम करता ह्याबद्दल कुणाला देणेघेणे नाही.. फक्त तुम्ही सोशल सेटिंग्ज मध्ये कसे वागता ह्याबद्दल आहे. (करीच्या वासाबद्दल कुणाचा आक्षेप नाही पण करीचा वास कपड्यांना आणि घरातल्या सोफा वगैरे सामानाला कायम येतो त्याबद्दल आहे)

पण दरवेळी सोडता येईलच असे नाही. >> सोडू ही नये.... ऊडदामाजी काळेगोरे असतातच... देसींना दुय्यम समजून वागवणारेही गोरे असतातच त्यांचे वागणे आपल्याला खटकले किंवा त्रास झाला तर बोलून दाखवावेच.. प्रॉपर चॅनल थ्रू कंप्लेन लाँच करावी.. कल्चरल ट्रेनिंग भारतीयानांच गरजेचे आहे पाश्चात्यांना नाही असे मुळीच म्हणणे नाही. मला दहा वर्षात तूरळक डिस्क्रिमिनेटिंग लोकही भेटले पण जनरालाईझ करण्याईतपत आजिबात नाहीनाही.
कल्चरल ट्रेनिंग म्हणजेच समजून घेणे आहे ना?
कुणाला आपल्या अंगाचा वास आला तर समजून घ्या असे कसे म्हणता येईल? असे करून आपणच त्यांनी आपल्याला अवॉईड करावे दुय्यम वागणूक द्यावी अशी सोय करत नाहीत ना? मी तर म्हणेन त्यातल्या त्यात अमेरिका ईतर देशांच्या मानाने खूप अ‍ॅडाप्टिव आहे.

why do Indians need to be so apologetic , so much as to discussing the "mistakes" on a exclusive "marathi only" forum, >> Do you care enough to confront ? ऊत्तर हो असेल तर प्रश्नच मिटला नाही असेल तर एकतर आडमुठेपणा किंवा बेपर्वाई... दोन्ही तुम्हाला सोशल अ‍ॅक्सेप्टन्स मिळवून देणार नाहीत.
आपले वेगळेपण टिकवूनच आपल्याला सामाजिक स्थान ऊंचवायचे आहे... आणि त्यासाठीच बेशिस्त असणे/ वास येणे वगैरे अडथळे आधी दूर करावे लागतात. आपले वेगळेपण दाखवण्यासाठी पहिल्यांदा आपल्याबद्दल आदर निर्माण करणे गरजेचे आहे.

Never forget who you are, the world wont, wear it like an armor and nobody can hurt you anymore >> पॉलिटिक्स, युद्ध, वर्चस्व प्रस्थापित करते वेळी वरील वाक्य यथोचित आहे पण हा खेळ वर्चस्वाचा नसून सामंज्यस्य आणि सौजन्याचा आहे. Happy

जेम्स , तुमचा राग मी समजु शकते. पण आहे हे अस आहे. देसी लोकांची मेंटॅलिटी बघून राग येतोच ठरावीक काळाने. आपण , आपला समाज, अशी काही भावनाच आढळत नाही खुप जणांच्यात. Sad
आपन चार चौघांच्यात उठुन दिसायच असेल तर , उद्धट वर्तनाने,वासाने का व्हाव ? आपल्याकडे कितीतरी सुरेख गोष्टी आहेत.

कुतुहल म्हणुन विचारतेय, तुम्ही परदेश वारी केली आहे का ? नॉट फॉर २/३ महिन्यासाठी पण २/३ वर्षापेक्षा जास्त ?

आपल्या कपड्यांना करीचा वास येत असेल किंवा अंगाला घामाचा वास येत असेल आणि तसं कोणी बोलून दाखवलं तर एवढं अपमानास्पद काही नाही. आपले मसाले आणि फोडण्याबिडण्यांचे वास असतात आणि ते आपलं जेवण आहे तेव्हा ते खाणं बंद करु शकत नसलो तरी कपड्यांना वास लागणार नाहीत ह्याची खबरदारी घेऊन टाळता येऊ शकतंच. तसंच कपड्यांना, अंगाला घामाचा वास येऊ नये म्हणून डिओ, परफ्युम्स ह्यावर खर्च करुन वापरायला काय हरकत आहे? आपण भारतीय आहोत म्हणून ऑफिसच्या ठिकाणी कुणाच्या अंगाला कसलाही वास येत असेल तर तो चालेल का किंवा चालवून घ्यावा का? ह्या बेसिक गोष्टी आहेत आणि ज्याच्या त्याला कळायला हव्यात. कुणी सांगायला वेळ येऊच देऊ नये.

आणि प्लीज नोट: करीचा वास व्यक्तीच्या कपड्याला भारतात कधी आलेला आठवत नाहीये. तो इकडेच का येतो त्याची कारणं वर आलेली आहेत. तो न येऊ देणे रॉकेट सायन्स नक्कीच नाहीये. तुम्ही किंवा इतर कोणी घेउन बघितलात तर तो असह्य होतो यावर एकमत होईल इतका भपकारा येतो.
आणि सिगरेट फुंकणारे लोक वास येउ नये म्हणून भारतातही उपाय करतातच ना? तितकेच हे उपाय सोपे आहेत. सिगरेटचा ही वास कपड्याला आलेला तितकाच असह्य होतो.
नॉन देसी/ देसी लोकांच्या जॅकेटलाही न धुतल्याने कळकट वास येतो.
पब्लिक प्लेसेस वरच्या एलिव्हेटर मध्ये अशक्य घाण दर्प भरुन राहिलेला असतो. तो आंघोळ न केलेल्या माणसाच्या अंगाचा/ आणि केलेल्या मूत्र विसर्जनाचा असतो. तो ही तितकाच अशक्य असतो.
आता ह्यामधील बर्‍याच क्रिया आणि वास देसी स्पेसिफिक नाहीत म्हणून इथे आलेले नाहीत कारण हा धागा जनरल नसून देसी स्पेसिफिक आहे म्हणून.
आणि चायनिज, व्हिएतनामीज, ज्यू, मिडलईस्ट, कोरिअन, मिड वेस्टचे, टेक्सन, न्यूयॉर्कर, कॅलीवाले ... सगळे लोक त्यांच्या त्यांच्या स्टिरिओटाईप वरुन बरेच जोक करतात. इथे प्रतिक्रिया देणारे भारतीय ही नक्कीच करत असतील. पण पाहिलेल्या सँपल साईझ मध्ये भारतीय स्वतःवर जास्त जोक करत नाहीत आणि कोणी केले तरी इतरां पेक्षा फार पटकन ऑफेंड होतात.
इथले प्रतिसाद देणारे लोक बहुदा एक भिकार म्हटलं की सात भिकार शहर मेंटॅलिटीचे असतील.

(ता.क. ऑफेंड होणारे एशिअन (चायनिज) ही बघितले आहेत, राश्यनही.
डिस्क्लेमरः मी कुठलाही तौलनिक अभ्यास केलेला नाही. अ‍ॅनेकडोटल आहे सगळं )

बरं, अरब, इजिप्शियन्स, ज्यूज वगैरे आपापली व्हीम्स नीट कॅरी करतात, त्यांना पण हजार वाईट सवयी आहेत, चिनी पण आहेत कोरियन्स आहेत सगळे कुठे न कुठे लॅग होतात अन ते त्याला कॅरी करतात, why do Indians need to be so apologetic , so much as to discussing the "mistakes" on a exclusive "marathi only" forum >>>

भारतीय लोकांच्या सवयींची जशी चर्चा होते, तशी या सर्वांचीही होते. इथे प्रत्येकाचे, विविध अमेरिकन्सचेही, स्टीरीओटाइप्स आहेत. आणि असे करणार्‍यांत भारतीयही आहेत. ('क्रॅश' बघितला असेल तर त्यात अनेक दाखवले आहेत, सर्व बाजूंनी.) पण इथे चर्चा भारतीयांच्या सवयींबद्दल आहे म्हणून त्याबद्दल लिहीले जात आहे. भारतातून परदेशांत जाणार्‍यांना कल्पना नसताना त्यांच्याबद्दल वाईट मत बनू नये म्हणून अशी माहिती उपयोगाची आहे - मी पहिल्यांदा आलो तेव्हा माझ्या कंपनीनेही एक २-३ पानी माहिती दिली होती. पण इथे उल्लेख केलेल्या अनेक गोष्टी त्यात नव्हत्या - त्या सवयीने समजल्या.

आणि दुसरे म्हणजे कोणी कोणाचे सहन करावे, तर हे अ‍ॅसिमिलेशन कोणाला करायचे आहे त्यावर आहे. एखादा अमेरिकन माणूस बंगलोर मधे आला तर तेथील ऑफिस मधल्यांनी त्याच्याकरता काही वेगळे करण्याची गरज नाही. तेथे त्यानेच अ‍ॅडजस्ट करणे अपेक्षित आहे

पण आपल्या कपड्यांना करीचा वास येतोय की नाही हे आमच्या कंडिशन झालेल्या नाकाला कसं समजणार?
कस्तुरीम्रृगाला कुठे समजत असतं की त्याला वास येतो ते?

कळतं जरी नाकं कंडिशन झालेली असली तरी. दुसर्‍याच्या कपड्यांना घामाचा वास येत असेल तर कळतं की नाही? तसंच. ते ही नसेल जाणवत तर कदाचित वास घेण्याच्या क्षमतेत प्रॉब्लेम असू शकेल.

ते तर आधीच मान्य केलंय "कंडिशनिंग" झालं आहे म्हणून. आता माझा प्रॉब्लेम असा आहे-

हा जो करी स्मेल आहे त्याला मी (आणि मोस्ट भारतीय) पूर्णपणे इम्यून आहे. असा काही स्मेल काही भारतीयांच्या अंगाला येत असतो हे मला इंटरनेटमुळे समजलं.

मी परदेशात आत्तापर्यंत हजारो भारतीयांना भेटलो. त्यात घामाची घाण येणारे काही हाताच्या बोटावर मोजण्याइतके देसी सोडले तर हा "कपड्यांना" येणारा करी स्मेल मला कधीही आला नाही. (घरांमध्ये येणारा वास वेगळा) याचाच अर्थ हा वास मला जाणवू शकत नाही. याचा अर्थ असा काही प्रॉब्लेम अस्तित्वातच नाही असं समजण्याइतका मी मूर्ख नाही.

मुद्दा असा की या करी-स्मेलची खरोखरची तीव्रता किती आणि रेसिस्ट लोकांनी पसरवलेला बायस किती? इंटरनेट वर वाचतो म्हणून मी रोज कपड्यांवर परफ्यूमच्या बाटल्या रित्या कराव्यात का? की एक मोटिव्हेटेड बायस म्हणून डिस्काउंट करावं?

यातले बरेच stereotypes हे त्या आपल्या ह्यांच्या पीठ मिसळलेल्या अस्सल बेळगावी लोण्याइतकेच खरे असतात.

ब्रिटिश लोकांचे दात सर्वाधिक स्वच्छ असतात असं परवाच्याच एका सर्व्हेमध्ये वाचलं. ते लोक एकमेकांना 'तू अमेरिकेला जाताना दात स्वच्छ करून जा हो! तुमच्यामुळे देशाचं नाव खराब होतं' असं बजावत नसावेत.

रेडनेक लोक त्यांच्यावर लादलेले सो-कॉल्ड स्टिरीओटाइप अभिमानाने मिरवतात.

ब्लॅक लोक चिकन रेस्टॉरंट मध्ये जायला लाजत नाहीत.

तुम्हाला किती वाईट एशियन ड्रायव्हर भेटले आहेत?

भारतीयांनी त्यांच्यावर लादलेले खरेखोटे स्टिरिओटाईप्स खालमानेने प्रपोगेट करत सेल्फ फ्लॅजेलेशन किती करावं?

काउन्ट युअर अचिएव्हमेंट्स.

अरे गर्वाची गोष्ट आहे इमिग्रण्ट इंडियन असणं!

Pages