भारतीय लोकांमुळे इतर जनतेला बसणारे कल्चरल शॉक अर्थात ओरांग इंडिया तमाशा.

Submitted by विक्रमसिंह on 2 July, 2018 - 02:13

प्रवास करताना किंवा परदेशी रहाताना किंवा भारतातच असताना आपल्या मुळे इतर जनतेला किती धक्के आणि त्रास आपण देत असतो याची कल्पनाच न केलेली बरी. इंडोनेशियात असताना आम्ही आपल्या अशा टिपिकल भारतीय पद्धतीला ओरांग इंडिया तमाशा (ओआयटी) म्हणजे भारतीय लोकांचा तमाशा म्हणायचो. ओआयटीची किती तरी उदाहरणे देता येतील

- कुठेही शिस्तीत रांग न लावता एकदम गर्दी करणे, जसा काही जन्माला येतानाच देवाने आपल्याला कायम रांगेत पुढे रहाण्याचा मान दिला आहे. दुकानामधे दुसर्‍या गिर्‍हाइकाशी दुकानदार बोलत असताना आपलेच घोडे पुढे दामटणे हे त्याचे दुसरे रूप.
- परदेशी विमानतळावर भारतात जाणार्‍या विमानाचे प्रवेशद्वार व इतर देशात जाणार्‍या विमानाचे प्रवेशद्वार यात शिस्तीच्या बाबतीत जमीन अस्मानाचा फरक दिसतो.
- सार्वजनिक अस्वछता आणि स्वछतेच्या आपल्या कल्पना.
- आपल्या मसाल्यांचा घमघमाट. कित्येक ठिकाणी म्हणून भारतीय विद्यार्थ्यांना घरे भाड्यानी देताना अटी घातल्या जातात.
- मला ईंडोनेशियात लोक विचारायचे. तुमच्या बायका पोट उघड का टाकतात. (साडी घातलेल्या). बघण्याचा दृष्टीकोन वेगळा पण हाही त्यांच्या साठी शॉकच ना. (हा नुसता शॉक , पण ओआयटी नाही)

बर्‍याच वेळेला आपल्या गावीही नसते की आपल्यामुळे इतर लोकांना त्रास होतोय.
तुम्ही पण असे शॉकलेले लोक पाहिले असतील. ओआयटी (त्रास देणारे शॉक) अनुभवले असतील.

टीप : मला आपल्याबद्दल टिका करायची नाही. आपले (भारतीयांचे) कित्येक गुण आवडल्याचे लोक आवर्जून सांगतात. त्याबद्दल वेगळा एक धागा काढायला हरकत नाही. पण बर्‍याच वेळेला आपल्याकडून अनाहूत पणे चुका होउ नयेत ही इच्छा. Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

८-१० वर्ष जुनी गोष्ट आहे.... आमचा एक अमेरिकन मॅनेजर पहील्यांदाच भारतात आला होता..... दोनेक आठवडे होता इथे..... आमच्या टीममध्ये दोन ट्रेनी होते.... नुकतेच एकाच कॉलेजातुन पास आउट झालेले.... जिग्गी होते एकमेकांचे.... कायम एकत्र असायचे..... लंचनंतरचा राउंड मारताना गळ्यात हात टाकून फिरायचे
परत जायच्या एक एखाद दिवस आधी त्या मॅनेजरने न रहावुन विचारलेच...... "Are they in relationship?"

ड्रिंक्सचा वास कसा घालवतात परदेशात?
की पब्लीक ट्रान्सपोर्ट / पब्लिक् प्लेसेस टाळतात ड्रिंक्स घेतल्यावर?

वरच्या काही प्रसंगावरून एक गोष्ट लक्षात येते कि केवळ आपण एखाद्या गोष्टीला वा सवयीला "युज्ड टू" आहे याचा अर्थ जगाच्या दृष्टीने ती सवय "नॉर्मल" असेलच असे नाही. केवळ अनेक वर्षे आपण तसे करतो म्हणून आपल्याला ते नेहमीचे वाटते. पण बाहेरचे लोक जेंव्हा पाहतात तेंव्हा त्यांच्या दुष्टीने तो कल्चरल शॉक असतो. मग ते एकमेकांच्या खांद्यावर हात टाकून फिरणे असो, रस्त्यावर थुंकणे/चूळ भरणे असो, मसाल्याचा वास येणारे जेवण जेवणे असो, तोंडाने मचक मचक आवाज करत खाणे असो, अंगाचा घामट वास घेऊन फिरणे अस), बोलताना सहजगत्या शिवराळ भाषा वापरणे असो वा अन्य काहीही. आपण स्वत:ला कळत न कळत अनेक सवयी दुर्लक्षित करत असतो ज्या वाईट आहेत हे आपल्या गावीही नसते.

मसाल्याचा वास येणारे जेवण जेवणे >> जेवणाला मसाल्याचा वास (मराठी शब्द - अरोमा Wink ) येण्याबद्दल काही म्हणणे नाहीये हो... कपड्यांना आणि अंगाला मसाल्यांचा/फोडणीचा वास येण्याबद्दल बोलत आहेत लोक.

ड्रिंक्सचा वास कसा घालवतात परदेशात? >> चांगल्या ब्रँडच्या पेयांचा भपकारा टाईप्स वास येत नाही. बारटेंडर ड्रिंक्स मध्ये एक द्रव (नेमके नाव आठवत नाहीये) मिसळतात त्याने अल्कोहोलचा वास सप्रेस होतो. बाहेर पडण्याआद्धी रेस्टरूममध्ये जाऊन ह्यावर ऊपाय करता येतो. माऊथ स्प्रे/ फ्रेशनर वगैरे वापरता येतात. करायचे म्हंटले तर अनेक ऊपाय आहेत. ईच्छाशक्ती पाहिजे.

माझी एक कुलिग भारतात आली होती तेन्व्हा हॉटेल डीश मधिल मीट पोशन्स पाहुन तिला प्रचन्ड धक्का बसला होता.
तिने एके ठिकाणी चिकन टीक्का मागवले त्यात चिकन ऑल्मोस्ट नव्हतेच असे तिचे म्हणणे होते.

ब्राझिलमधे ड्रायविंग करायला लागल्यावर मे बरेच शॉक दिले असणार इतरांना. सुरुवाती सुरुवातीला मी चालवत असताना बर्‍याच वेळा इतरांचे हॉर्न ऐकू यायचे. (म्हणजे माझी काही तरी चूक, इंडिकेटर न दाखवता वळणे, चुकिच्या बाजूने ओव्हरटेक करणे , मधेच घुसणे वगैरे).
पण नंतर नंतर सरावलो. महिन्यातून एखाद्या वेळेसच अशी चूक व्हायची. Happy

दुसर्‍याचे बोलणे पूर्ण ऐकून न घेता, ते मधेच तोडून आपले म्हणणे मांडणे हे पश्चिमी संस्कृतीत फार उद्धटपणाचे मानतात. पण भारतात तितकेसे मानत नाहीत. विशेषतः आपल्या बरोबरीचा माणूस असेल तर नक्कीच नाही. अनेकदा असे वाटते की कित्येक भारतीय लोक आपण कसे आक्रमक आहोत हे दाखवण्याकरता अन्य व्यक्तीचे बोलणे चालू असताना आपले घोडे दामटतात. हा सांस्कृतिक फरक असावा. पण त्यामुळे अनेकदा अमेरिकन वा अन्य लोकांचे भारतीयांविषयीचे मत वाईट होऊ शकते. त्यामुळे कितीही चूक वाटले, कितीही अवास्तव वाटले तरी दुसर्‍याचे बोलणे पूर्ण होऊ द्या आणि मग आपले म्हणणे सांगावे. विशेषतः तुम्ही सेवादाते आणि अमेरिकन क्लायंट वा कस्टमर असेल तर हे पथ्य आवर्जून पाळावे.

मध्ये बोलणं तोडण्यावरून असाच एक घडलेला किस्सा. एक नवीनच भारतातून आलेला मुलगा मिटिंगमध्ये वाक्य पूर्ण व्हायच्या आधी तोडून आय हॅव डाउटस म्हणाला. त्याला आय हॅव अ क्वेशचन म्हणायचं होतं पण आपण भारतात शंका/ डाउटस म्हणतो तसं म्हणाला. क्षणभर शांतताच पसरली रूम मध्ये Proud

Wow vikram,kamu kembali ke india sekarang. teman, mengapa Anda memilih topik ini, orang-orang di sini pasti akan marah. walaupun saya bisa menulis buku tentang topik ini ...haha

नवीन Submitted by अमितव on 8 July, 2018 - 09:29
Wow vikram,kamu kembli ke india sekarang. teman, mengapa Anda memilih topik ini, orang-orang di sini pasti akan marah. walaupun saya bisa menulis buku tentang topik ini ...haha>>
नवीन अमिताव द्वारा 8 जुलै, 2018 - 09:29 रोजी सबमिट केले
वाह विक्राम, आपण आता भारतात परत आला आहात. मित्रांनो, तुम्ही हा विषय का निवडता, इथे लोक येथे संतप्त होतील. मी या विषयावर एक पुस्तक लिहू शकता जरी ... haha

अगं.. अमा..
धन्येस.. Wink
हाहाहाहा.. your translation app is quite good.. जाब्वा तो मेसेज मी फक्त विक्रमकरता लिहिला होता... Happy Happy
काडेपेटी कुठाय बाय तुझी
Heehee

Wow vikram, you are back to india now. friends, why you choose this topic, the people here will surely be angry. although I can write a book on this topic ... haha

मी जेव्हा उझबेगीस्तानला होतो तेव्हा माझ्या पेरुग्वेईन सहकार्याने दिलेल्या पार्टीत मला झेक रिपब्लिकच्या एका माणसाने इंडोनेशीयातील माणसे "भारतीय बायका पोट उघडं का टाकतात (साडी" नेसलेल्या" ) असा प्रश्न विचारतात हे निदर्शनास आणून दिले ,त्याला याचा मोठ्ठा क्लचरल ब्रेकींग शॉक बसला होता.

वाढदिवसाला केक कापणे ही पाश्चात्य पद्धत भारतात चांगलीच रुढ झाली आहे. परंतु त्या केकवरील क्रीम वा आयसिंग हे उत्सवमूर्तीच्या तोंडाला फासणे ही किळसवाणी परंपरा भारतात का सुरू झाली हे एक कोडे आहे. ६० वा ७० च्या दशकात सिनेमात श्रीमंत नायक वा विशेषतः नायिकेच्या वाढदिवशी केक कापताना दिसत असे. पण तेव्हाही ज्याचा वा जिचा वाढदिवस असेल तिच्या तोंडाला क्रीम फासण्याचा प्रकार पाहिला नव्हता. तेव्हा ही रुढी अलीकडेच निर्माण झाली असावी. माझ्या लेखी हा एक सांस्कृतिक धक्का अर्थात कल्चरल शॉक आहे. अशा प्रकारे उत्तम प्रकारे बनवलेले पक्वान्न कुणाच्या चेहर्यावर फासून काय मिळते? अस्सल महाराष्ट्रीय लग्नाच्या पंगतीत श्रीखंड वा बासुंदी नवर्‍या मुलाच्या वा नवरीच्या तोंडाला फासताना पहाण्याचे भाग्य मला तरी लाभलेले नाही. मग केकसारख्या आयात केलेल्या मिष्टान्नावरच ही वेळ का यावी?
ही पद्धत भारतात कशी निर्माण झाली हे एक गूढ आहे. पण लवकरच ती नष्ट झालेली पहायला मिळो अशी प्रार्थना. मोदींच्या कारकीर्दीत झाले तर त्याला अच्छे दिन म्हणायला माझी हरकत नाही!

माझ्या ऑफिस मध्ये एकदा स्वस्त्यातला केक ( तरी 300 रु चा असेल ) मुद्दाम मागवलेला माझ्या तोंडाला फासायला... आधी कल्पना नव्हती मला...पण नंतर कदाचित माझ्या चेहऱ्यावरचा राग कळला असेल सर्वाना...त्यामुळे नॉर्मल केक कापून सर्व कामाला लागले....
मला लिटरली ऑफिस मध्ये अंघोळ करावी लागलेली कारण अख्खा अर्धा किलो चा केक माझ्या डोक्यावर थपलेला. . त्या वेळी मी चिडचिड करण्यापलीकडे काही करू नाही शकले पण त्यानंतर एक वर्ष मी ज्याचा ही ब डे असेल तेव्हा अजून एक केक स्वखर्चाने आणून आमच्या शिपायांना पण द्यायची सुरुवात केली.... भांडून काही मिळणार नव्हतंच... लोकांना मी हे का करतेय हे लक्षात यायला 7 की 8 लोकांचे ब डे जावे लागले...पण माझ्या उपस्थितीत तरी हे प्रकार मी ऑफिस सोडेपर्यंत झाले नाहीत आणि अगदी सर्व स्टाफ ला लहानात लहान स्टाफ ला ही केक द्यायची प्रथा चालू झाली जी आधी नव्हती

आपल्या मसाल्यांचा घमघमाट. याला खरे तर नाइलाज आहे . भारतीय मसाल्याशिवाय जगू शकत नाहीत !" -
>>> बेडरूम आणि किचन सेम फ्लोर वर नको. बेडरूम वरच्या मजल्यावर आणि किचन खाली.
सेम फ्लोर वर असेल तर बेडरूम बंद असावी जेवण बनवताना म्हणजे कपडे वास शोषून घेणार नाहीत.

आमचा एक मित्र Ph D करत होता. पण त्याला स्वयंपाक करायला आवडायचे. एक दोनदा तो एका चिनी डॉ कडे गेला तेव्हा त्या डॉक्टर ने प्रत्येक वेळी विचारले की की तू शेफ आहेस का... आधी तो डॉ असे का विचारतो आहे हे लक्षात आले नव्हते.

त्या केकवरील क्रीम वा आयसिंग हे उत्सवमूर्तीच्या तोंडाला फासणे ही किळसवाणी परंपरा भारतात का सुरू झाली हे एक कोडे आहे.>>>
त्याचबरोबर लग्नात हार घालताना नवर्‍या मुलाला उचलून घेणे, नवरीला हार अक्षरशः फेकायला लावणे, फेक स्नो चे फवारे वगैरे उडवून देणे वगैरे मर्कटलीला करणार्‍यांचा पण प्रचंड संताप येतो. हे प्रकार जनरली नवर्‍या मुलाचे सो-कॉल्ड 'मित्र' म्हणवून घेणारे करत असतात. यांच्यासाठी लग्न काय किंवा बॅचेलोर पार्टी काय, दोन्हीही सारखेच असतात, भंकस करायचं निमित्त आणि फुकटात जेवण. 'लग्न' हा विधी (बहुतेकांसाठी-किमान मुलींसाठी) आयुष्यातलं एक 'solemn occasion' असतं. त्याची सर्कस बनताना पाहून आयत्या वेळी 'हॅहॅ' करण्यापलिकडे काही करता येत नाही.
ज्यांना असले प्रकार आवडतात त्यांनी स्वतःच्या लग्नात अवश्य करावेत, वाटल्यास विदुषकांकडून मंगलाष्टके म्हणून घ्यावीत आणि भटजी म्हणून एखाद्या चिंपांझीला बसवावे, पण दुसर्‍यांच्या कार्याचा फार्स बनवू नये. वडीलधार्‍यांनीही अशावेळी थोडा वाईटपणा घेऊन या माकडांना वेळीच आवरावं.

"फेक स्नो चे फवारे" हे तर अक्षरशः किळसवाणे असतात. तालुक्याच्या ठिकाणी लग्नाला आलेल्या मुंबईच्या सो कॉल्ड मॉड तरुणांनी हा प्रकार केलेला पाहिला. नवर्‍या मुलीचा केलेला छान मेक अप खराब झाला. शिवाय ते फायर हॅझर्ड असतात ते वेगळेच.

मला केक फासणं हा अती घाण प्रकार वाटतो.
बाकी स्नो स्प्रे किंवा गुडघ्यावर प्रपोज करणे किंवा नवरा नवरीला उचलणे या ज्याच्या त्याच्या फन च्या व्याख्या.पण सेफ्टी मात्र पाळली गेलीच पाहिजे.
आमचं लग्न हा अत्यंत गंभीर प्रकार होता.कोणती खोली कोणी घ्यायची यावरून झालेल्या धुसफूशी, माझ्या नऊवारी वरचे ब्लाउज न मिळून आईचे आलटर करून घालणे(कोणालाही मार्केट ला जायला वेळ नव्हता),लग्नाच्या पिवळ्या साडीवर अत्यंत पांढरा फाउंडेशन वाला मेकअप करून माझं भूत बनवलेलं असणे(स्वस्तातली ओळखीतली ब्युटीशीयन) लग्नाच्या आधी 2 दिवस घरातले लाईट गेलेले असणे वगैरे घटनांनी 'आता होऊन जाऊदे बा एकदाचं लग्न' असं दोन्ही पार्टीना वाटत होतं.
त्या मानाने आताची लग्न बघते तर हे सर्व प्री वेड शूट फोम स्प्रे वगैरे करून लोक खुश तरी दिसतात.
आफ्टर ऑल लग्न हा फक्त प्रोजेक्ट किक ऑफ. नंतर चे रिव्यू महत्वाचे. ☺️☺️☺️

walaupun saya bisa menulis buku tentang topik ini ...haha>> सिलाहकान नोन्या. चपात चपात.
अपा कबर बाईक बाईक. Happy

walaupun saya bisa menulis buku tentang topik ini ...haha>> सिलाहकान नोन्या. चपात चपात.
अपा कबर बाईक बाईक. Happy>> हे पण खूप भारतीय आहे. जिथे सर्वांना समजेल अश्याच भा षेत बोलावे नाहीतर प्राय्वेट मेसेजिंग सुविधा आहे . पण मला काही शॉ क वगैरे बसला नाहीये. Wink

बाहेर (कधी गेलोच तर) काय करू नये, ह्याची एक उत्तम जंत्री सापडली, पण कैक प्रतिक्रियांची भाषाशैली अजिबातच आवडली नाही. "आपले लोक अमुक अमुक चुका" करतात ही टोन खूप आल्हाददायक वाटते, कोणीतरी वरिष्ठ घरगुती सदस्य स्वतः अंगावर काढलेल्या पंधरावीस अमेरिकन/पाश्चात्य/युरोपियन पावसाळ्याचे सार आपल्याला अधिकारवाणीने सांगतोय, हक्काने म्हणतोय की "गड्या रे आम्ही आलो तेव्हा इतकं एक्सपोजर नव्हतं, आम्ही नवागत होतो, पण तुम्हाला सांगायला आम्ही आहोत, ह्या अमुकतमुक चुका करू नका रे "आपले" नाव खराब होईल बरं"

इथे, "देशी जनता अशीच" "देशींना अक्कलच नसते" वगैरे प्रतिक्रिया माफ करा पण विखारी वाटल्या. ज्याची खावी पोळी त्याचीच वाजवावी टाळी हे मान्य केलं तरी अश्या टोन मध्ये असलेल्या कॉमेंट्स are not received (atleast by me) in a good taste. फारच टोकाच्या काही राष्ट्रवादी देशप्रेमी जनतेने जेव्हा मला "India and Indians do lack a national character and sense of belonging to the motherland" असे सांगितले होते तेव्हा मी त्यांच्यावर चिडलो होतो, पण now I think it isnt that wrong, we do take pride on looking down upon our fellow countrymen who have giVen the comments in the very specific distasteful manner as mentioned by me above. बहुत काय बोलणे, सगळेच सुशिक्षित लोक, ज्याला पटेल त्याने घ्यावे न पटेल त्याने (वाटल्यास पाच शिव्या मलाही घालून) सोडून द्यावे, पण मला प्रामाणिकपणे जे जाणवले ते लिहिले, तेव्हा "आपल्या लोकांनी" बाहेर काय करू नये हे अजून सांगा इतकी विनंती करून आवरतो.

मोदींच्या कारकीर्दीत झाले तर त्याला अच्छे दिन म्हणायला माझी हरकत नाही! >>>> मोदींनी केक्फास्बंदी आणावी. केक फासणार्‍याला ५००० रुपये दंड Biggrin

>>मोदींनी केक्फास्बंदी आणावी. केक फासणार्‍याला ५००० रुपये दंड Biggrin
नेहमीप्रमाणे लोकांच्या पळवाटा तयार असतील ..... बंदी केक फासायला आहे पेस्ट्री फासायला नाही म्हणत लोक करायचे तेच करतील!

Pages