भारतीय लोकांमुळे इतर जनतेला बसणारे कल्चरल शॉक अर्थात ओरांग इंडिया तमाशा.

Submitted by विक्रमसिंह on 2 July, 2018 - 02:13

प्रवास करताना किंवा परदेशी रहाताना किंवा भारतातच असताना आपल्या मुळे इतर जनतेला किती धक्के आणि त्रास आपण देत असतो याची कल्पनाच न केलेली बरी. इंडोनेशियात असताना आम्ही आपल्या अशा टिपिकल भारतीय पद्धतीला ओरांग इंडिया तमाशा (ओआयटी) म्हणजे भारतीय लोकांचा तमाशा म्हणायचो. ओआयटीची किती तरी उदाहरणे देता येतील

- कुठेही शिस्तीत रांग न लावता एकदम गर्दी करणे, जसा काही जन्माला येतानाच देवाने आपल्याला कायम रांगेत पुढे रहाण्याचा मान दिला आहे. दुकानामधे दुसर्‍या गिर्‍हाइकाशी दुकानदार बोलत असताना आपलेच घोडे पुढे दामटणे हे त्याचे दुसरे रूप.
- परदेशी विमानतळावर भारतात जाणार्‍या विमानाचे प्रवेशद्वार व इतर देशात जाणार्‍या विमानाचे प्रवेशद्वार यात शिस्तीच्या बाबतीत जमीन अस्मानाचा फरक दिसतो.
- सार्वजनिक अस्वछता आणि स्वछतेच्या आपल्या कल्पना.
- आपल्या मसाल्यांचा घमघमाट. कित्येक ठिकाणी म्हणून भारतीय विद्यार्थ्यांना घरे भाड्यानी देताना अटी घातल्या जातात.
- मला ईंडोनेशियात लोक विचारायचे. तुमच्या बायका पोट उघड का टाकतात. (साडी घातलेल्या). बघण्याचा दृष्टीकोन वेगळा पण हाही त्यांच्या साठी शॉकच ना. (हा नुसता शॉक , पण ओआयटी नाही)

बर्‍याच वेळेला आपल्या गावीही नसते की आपल्यामुळे इतर लोकांना त्रास होतोय.
तुम्ही पण असे शॉकलेले लोक पाहिले असतील. ओआयटी (त्रास देणारे शॉक) अनुभवले असतील.

टीप : मला आपल्याबद्दल टिका करायची नाही. आपले (भारतीयांचे) कित्येक गुण आवडल्याचे लोक आवर्जून सांगतात. त्याबद्दल वेगळा एक धागा काढायला हरकत नाही. पण बर्‍याच वेळेला आपल्याकडून अनाहूत पणे चुका होउ नयेत ही इच्छा. Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

हे आता कल्चरल शॉक्स पेक्षा ज्युसी गॉसिप जास्त होत चाललंय. अवघड आहे!>> कट्ट्पा ना बाफ काढायला अजुन एक विषय मिळाला ना पण !

युएस मधल्या अनेक भारतीय देवळात हा सीन दिसतो:

शू रॅक रिकामा, आणी देवळाच्या मेन दरवाज्या समोर चप्पलांचे ढीग!
देव दर्शन, की चप्पल दर्शन? एकदा चप्पल बाजुला करायला गेले तर भक्त तु. क. टाकत होते
माझ्याकडे! लेक आणी नवरा म्हणाले तुला वेड लागले आहे की काय?

रूममेट चे परेन्ट्स आलेले आहेत. आज संध्याकाळी community मध्ये walk करत असताना समोरून एक अमेरिकन कुटुंब आले. नवरा बायको आणि एक चिमुकली 4 वर्षाची गोड मुलगी. रूममेट च्या बाबांनी बहुधा अशी निळ्या डोळ्यांची छोटी पहिल्यांदाच पहिली असावी.
अमेरिकन कुटुंब ओळखीचे होते, ओळखीचे म्हणजे hi hello टाईप.
समोरा समोर आलो hi hello केले. माझ्या रूम मेट ने त्यांची ओळख करून दिली काकांशी. आम्ही वेदर वगैरे बोलतोय तोपर्यंत काकांनी त्या छोटीला कडेवर उचलली, उचलली ती उचलली गालाची पप्पी घेतली.
अमेरिकन कुटुंबाच्या चेहऱ्याचा रंगच बदलला, माझी टरकली. रूममेट ओरडला काकांना. माफी मागू लागला त्या कुटुंबाची. खूप समजावले तेंव्हा ते शांत झाले. भयानक ओकवॉर्ड मोमेंट होती ती.

तुम्ही अमेरिकेत येत असाल या गोष्टी कधीच करू नका -

१. अनोळखी लोकांच्या मुलांना हग किंवा पप्पी घेणे.
२. कृष्णवर्णीयांना निग्रो किंवा निगर म्हणणे.
३.स्टेर करणे - ही सवय लोकांची जाता जात नाही.
४. उपहारगृहात टीप द्यायला विसरणे.
५.डोनाल्ड ट्रम्प बद्धल पब्लिकली बोलणे.

एक ते चारशी सहमत. पाचशी संपूर्ण असहमत.
फस्ट अमेंडमेंट आहे पाठीशी बिनधास्त बोला. रेड स्टेट मध्ये आजूबाजूला निओ नातझी नाहीत ना हे बघा मात्र.

Pages