तुम्ही कोणते कल्चरल शॉक अनुभवले आहेत???

Submitted by कटप्पा on 26 June, 2018 - 16:58

तुम्हाला कधी कल्चरल शॉक बसला आहे का?

मी पहिल्यांदा अमेरिकेत आलो तेंव्हा एक गोष्ट मला फार वेगळी वाटली ते म्हणजे रेस्ट्रोरंट्स मध्ये कोल्ड्रिंक्स साठी असणारे फ्री रिफिल्स. एका ग्लास चे पैसे भरा आणि हवे तितके कोल्ड्रिंक प्या.

बाहेरगावी फिरताना तुम्ही कधी कल्चरल शॉक अनुभव केले आहेत तर सांगा इथे...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारतात डायबिटीस फोफावण्यास ह्या आहाराचा सिंहाचा वाटा आहे असे बरेच एक्स्पर्ट म्हणतात.
मी दोन पिढ्या तर बघितल्या आहेत .
माझे आई वडील.
माझ्या आई वडिलांचे आई वडील.
आणि बाकी नात्यात पण त्याच पिढी मधील.
पण कोणाला मधुमेह होता असे बघण्यात नाही.
वयाच्या ८० पर्यंत चांगले खणखणीत होते.
माझे आई वडील वयस्कर असून जितकी शारीरिक मेहनत किती तरी वेळ करत असतं ते मला पण जमायचे. नाही तरुण असून पण.
आताचे एक्स्पर्ट म्हणजे रोग निर्माण करून त्या वर उपचार करणारे आहेत.
आताचे एक्स्पर्ट म्हणजे धंदा आहे गिऱ्हाईक निर्माण केले जातात

आताचे एक्स्पर्ट म्हणजे धंदा आहे गिऱ्हाईक निर्माण केले जातात >>+१
मला बसलेले काही सुखद शॉक्स :
नाशिकला मिसळी बरोबर अनलिमिटेड रस्सा आणि कट असतो हे पाहून मस्त वाटलेलं.. मला आपली बेडेकरांची सवय.. एक वाटी रस्स्यालाही जादा पैसे आकारण्याची..
तसेच छान वाटलेले गुजराथमधे ताक अनलिमिटेड पाहून आणि केरळात रस्सम आणि सांबाराचे जग टेबलावर पाहून

मी दोन पिढ्या तर बघितल्या आहेत .
माझे आई वडील.
माझ्या आई वडिलांचे आई वडील.
आणि बाकी नात्यात पण त्याच पिढी मधील.
पण कोणाला मधुमेह होता असे बघण्यात नाही.
>>>>

+७८६
आमच्याही आजी आजोबांच्या बाबतीत देखील ना मधुमेह ना ब्लडप्रेशर ना आणखी काही जे त्यांच्या दिर्घायुष्यात अडथळा ठरेल.
वडिलांच्या पिढीतही असले काही नव्हते पण काही जण व्यसनात गेले.
आताची पिढी स्वतःच ओढवून घेतलेल्या स्ट्रेसमध्ये बरबाद होतेय. दैनंदिन जीवनशैली गंडतेय.
त्यामुळे आपल्या आजीच्या पिढीतला आहार डायबेटीज वा तत्सम आजारांना आमंत्रण होते हे मलाही अनुभव आणि निरीक्षणांच्या आधारे पटत नाही.

Submitted by निलाक्षी on 25 May, 2022 - 16:36
>>>>

माटुंग्याचे मनीज याचसाठी शाळेपासून आवडायचे. अनलिमिटेड सांबर. नुसते ओरपायचो तेव्हा Happy आताचे माहीत नाही. पण येस तेव्हा माहितीतले असे ते एकच हॉटेल होते. तो सुखद धक्काच असायचा. म्हणून नवनवीन मित्रांना पकडून तिथे न्यायचो तो धक्का द्यायला Happy

दिल्लीत पाणिपुरी खातांना, पंजाबी बायका असेच खट्टा मिठा पानी सारखे मागुन खायच्या हा मला धक्का होता. मुळात तो पेपर बाउल सारखा पुढे करायला मला लाज वाटायची. लंगर / जगराता असले की चांगल्या घरचे लोकही तिथे खाली मातीत बसुन परशाद म्हणुन छोले-भटुरे, दलिया, शीरा खायचे. वर घरी असलेल्या लोकांसाठी डबे आणुन मागुन मागुन न्यायचे.

तिकडे दारावर आलेले भाजीवाले, फळवाले असो की बाजारातले. .. त्यांच्या इथे उभे राहुन कितीही फळे खा. फक्त घरात नेतांना पैसे.
बाजारात बायका, बोरे खा... गाजर, काकडी ,भेन्डीचे तुकडे मोड.. तोंडात टाक असे कराय्च्या. भाजीवाले काही बोलाय्चे नाहीत.
इथे भोपळ्याला नख टोच्ले तरी भाजीवाले ओरडतात. Lol
बाजाराची तिच गंमत. फिरता बाजार असायचा. आज सोमबाजार या गल्लीत तर उद्याचा मंगळबाजार पुढच्या गल्लीत किंवा कॉलनीत. रात्री उशीरा केव्हातरी ट्रकने आणुन फटाफट बाकडे टाकले जायचे, फळ्या लावल्या जायच्या. सकाळी सकाळी बाजार सुरु. ते रात्री १०-११ पर्यन्त.
बर, या बाजारात नुसता भाजीपाला नाही तर कपड्यापासुन, रिबिना, पिना, रोज वापरण्याची भांडीकुंडी सगळे मिळनार. मजाच वाटायची.

"मुलाला वाचवावे की आईला हे डॉक्टरांनी त्या वेळी विचारलेले. " - माझ्या माहितीप्रमाणे भारतातल्या कायद्याप्रमाणे आईलाच वाचवतात. असा प्रश्न विचारून गरोदर बाईच्या घरच्यांवर निर्णयाची जबाबदारी फक्त मराठी / हिंदी सिनेमात टाकली जाते.

अच्छा मला माहीत नाही. घरी मला जे सांगितले ते ईथे लिहिले. कदाचित विचारले नसेल, डोक्टरांनी स्वतःच तसे सांगितले असेल.

तसेही वरील चर्चेत मुद्दा हा महत्वाचा होता की पुन्हा जीवाशी खेळ नको म्हणून दुसरा चान्स घेतला गेला नाही. अन्यथा वडिलांकडून आठ भावंडांमध्ये आणि आईकडून पाच भावंडांमध्ये माझ्याच आईवडिलांना एकुलते एक अपत्य आहे. उरलेल्या ११ काका-मामा-आत्या-मावशींना एकापेक्षा जास्त आहेत.

दक्षिण कोकणात काही गावांमध्ये साखरपुड्याला नवऱ्यामुलाचा लहान भाऊ नवरीच्या बोटात अंगठी घालतो. हे बघून नॉन कोकणी लोकांना बसलेला क शॉक बघायला खूप गंमत वाटली आहे. आता ही प्रथा तशी कमी होत चालली आहे. माझ्या आईच्या मते - ह्या काय तुमचा काहीतरी नवीनच. नवरो अंगठी घालता नवरीक. आमच्या येळेक असला काय नव्हता.

दक्षिण कोकणात काही गावांमध्ये साखरपुड्याला नवऱ्यामुलाचा लहान भाऊ नवरीच्या बोटात अंगठी घालतो.
>>>
हो, हे पाहिलेय लहानपणी काही साखरपुड्यात Happy
पण आतासे कुठे बघण्यात आले नाही.

चित्रपटात जसे लग्नाच्याच रात्री सुहागरात दाखवतात ते प्रत्यक्षात नसते. पहिल्या रात्री वेगळेच झोपायचे असते, किंबहुना पुजेच्या आधी काहीच नाही हे जेव्हा लहानपणी पहिल्यांदा एका भावाच्या लग्नात समजले तेव्हा शॉक बसलेला. आणि फारच हिरमोड सुद्धा झालेला Happy

त्यानंतर जेव्हा एका भावाने परप्रांतीय मुलीशी प्रेमविवाह केलेला तेव्हा त्या भावाच्या सासरेबुवांनी त्याच रात्री दोघांसाठी एका हॉटेलमध्ये सुहागरात्रीची सारी सोय केलेली हे बघून पुन्हा एकदा शॉक बसला. त्याला आमच्या घरच्यांनी आक्षेपही नाही घेतला हा त्याहून मोठा शॉक होता. लग्नघरात जमलेलो आम्ही ईतर भावंडे रात्री बुंदीचे लाडू खात राहिलो आणि तो भाई निघून गेला हॉटेलवर Happy

पण तो एकच अपवाद ठरला.

इथे आपल्या सर्वांना इतके शॉक्स बसलेले पाहून सर्वांनी हे ट्रेनिंग घेण्याची गरज आहे
https://www.youtube.com/watch?v=J7XuEwG3-wA&t=20s

"करंटने सामान्य माणसांना शॉक बसतो. मी नरसिंहा आहे. मला करंट लागला तर करंटलाच शॉक बसतो" असे काहीतरी तमिळ की तेलुगू मधून म्हणत आहे बहुधा तो.

हायला, माणसं हैत का डॉमिनोज Biggrin
.. हेल्मेटला दोन पळ्या लाऊन कोणता शॉक दिलाय, चेहरा थरथरवून रिपल्स केलाय... Lol

क्लिप भयंकर आहे Rofl
ते शेवटी चित्त्याचं जोडलंय ते आधी कधीतरी पाहिलं होतं.

आमच्या गावाकडे पूर्वी अशी पद्धत होती (अजून आहे का ते माहिती नाही) की एखादा माणूस खूप वयस्कर होऊन, मुला-नातवंडांच्यात आनंदाने राहून वारला, म्हणजे थोडक्यात आपण ज्याला 'त्याचं सोनं झालं' म्हणतो, तसं झालं तर त्याच्या अंत्ययात्रेच्या वेळी फटाके फोडायचे Happy हे बघून बाहेरगावच्या एका मैत्रिणीला जबरदस्त आश्चर्याचा धक्का बसला होता.

माझ्या लहानपणी खेडेगावात तेंव्हा पंजाबी ड्रेस अजून आले नव्हते. मी पहिल्यांदा शहरात शिकायला गेलो तेव्हा बऱ्याच मुली पंजाबी घालून येत. मला वाटायचं त्या सगळ्या पंजाबी आहेत. कदाचित हा आयुष्यातला पहिला कल्चरल शॉक असावा Lol

>> लग्नाच्याच रात्री सुहागरात,
शशी कपूर कभी कभी Lol

>> हेल्मेटला दोन पळ्या
Lol

>> अंत्ययात्रेच्या वेळी फटाके
हे मलाही माहीत नव्हते.

काही ना जोरात शॉक बसतो.
नेमकी लग्नाच्या दुसऱ्या दिवशी आमावस्या किंवा शनिवार वैगेरे असतो(नक्की माहित नाही पण असा दिवस ज्या दिवशी पूजा ठेवता येत नाय,)आणि पूजा एक दिवस पुढे जाते आणि त्या मुळे सुहाग रात्र पण एक दिवस पुढे जाते .
तेव्हा नवऱ्या मुलाची खूप केविलवाणी अवस्था होते.
नातेवाईक लोकांचा मुक्काम पण वाढतो.
म्हणजे गर्दी घरात.
आणि सर्वात धक्कादायक काही वर्षांपूर्वी घडणाऱ्या घटना.
जेव्हा पाळी पुढे जाण्यासाठी औषध नव्हती तेव्हा.
मस्त तयारी करून महाबळेश्वर किंवा कोणत्या चांगल्या ठिकाणी हनिमून लं जोडपे जाते . दिवसा मस्त रात्री ची स्वप्न बघत फिरते .
आणि रात्री ऐन वेळी घोटाळा होतो.
खुप खुप वाईट अवस्था त्यांची होते.
७ दिवसा साठी गेलेले दुसऱ्या दिवशी घरी आले की लोक काय ओळखायचं ते ओळखतात.
असे घडायचे पाहिले आता च्या पिढी ल ऐकून शॉक बसेल
थोडे अवांतर बद्गल क्षमा.

साधारण २५ वर्षापूर्वी मावशी कोकणातून घाटावर शिफ्ट झाली. मे महिन्याची सुट्टी म्हणून मीही सोबत गेले होते. मावशीला शाळकरी वयातील दोन मुली होत्या. दोन मुली म्हटल्यावर आजूबाजूच्या धडशी तोंडओळख नसलेल्या आया बाया सरळ सुचवायच्या, दोनावरच थांबलात? तिसरा चान्स घ्या की मुलासाठी. मावशीने हसून नकार दिला तरी डॉक्टर, वैद्यांची नावे, जडीबुटी, मंत्र सुचवणे वगैरे प्रकार सर्रास व्हायचे. कोकणात असताना हा प्रकार निदान आमच्या पाहण्यात तरी झाला नसल्याने मोठ्ठा शॉक होता.

घाटावरच एका खेड्यात जन्मभर राहिलेल्या तिच्या सासू-सासर्यांनी मात्र असा काहीही हट्ट धरला नाही हा सुखद धक्का.

तिच्याच कॉलनीत राहणार्या सेम वयोगटातील जोडप्याला तीन मुलींच्या पाठीवर महत्प्रयासाने (त्या काळात मुलींसाठीचा भ्रुणहत्या कायदा लागू नव्हता किंवा तितक्या परीणामकारक स्वरूपात लागू नव्हता) मुलगा झाला. व पुत्रजन्माचे जंगी सेलेब्रेशनही झाले. आमच्या दृष्टीने हा प्रकार आश्चर्यकारक होता.

जिथे हुंडा पद्धत आहे त्या समाजरचनेत मुलांना वरचेच स्थान असणार आणि साहजिकच मुलगाच हवा ही भावनाही बळावत असावी. सगळे एकमेकांना लिंक आहे. आपण ज्या समाजात जन्म घेतो, जे लहानपणापासून बघतो. त्यात आपल्याला काही गैर वाटेनासे होते. पण जग आता छोटे होतेय, जमाना आता बदलतोय. येणारी पिढी दुनिया बघतेय आणि काय चूक, काय बरोबर याचा विचार करू लागलीय. त्यातून योग्य ते वेचू लागलीय.

बाप रे नानबा!!!! खूप कॉम्प्लिकेटेड केस होती तुझी. मला तर वाचवून गरगरायला झालं... हजारात एखादी तुझ्यासारखे कॉम्प्लिकेटेड केस होत असेल. दुसऱ्या वेळी सगळं व्यवस्थित झालं हे वाचून बर वाटल.

अमेरिकेत खरंच फक्त 6 आठवडे रजा मिळते? मग त्यानंतर without pay रजा घेता येत नाही का? इन्शुरन्स चे काय असते ?

ऑस्ट्रेलियात गेल्या 8 वर्षात maternity/parental leave चे खूपच छान reforms आले आहेत. वर्षभर बाळासोबत राहू शकतात स्त्रिया/पुरुष. अर्थात अगदी पगाराएव्हढे पैसे मिळत नसावेत पण काही प्रमाणात employer आणि गव्हर्नमेंट दोघे मिळून आर्थिक भार उचलतात.
अलीकडे Childcare facilities पण चांगल्या आहेत. उत्पन्नाच्या प्रमाणात फी असते.

साधारण वीसेक वर्षांपूर्वी मी प्रत्यक्ष बघितलेली घटना आहे. (येथे बाळंतपण हा विषय आला म्हणून..):-

८ मार्च, तारीख लक्षात आहे, कारण त्या दिवशी महिलादिन होता.

माझा मुलगा लहान होता तेव्हा. तो गोष्टीचं पुस्तक घेऊन गॅलरीत बसला होता. आमच्या गॅलरीसमोरच तेव्हा एक मोठ्ठा मोकळा प्लॉट होता.

आदल्या रात्रीपासून तिथे भटक्या लोकांचा तळ पडला होता. उघड्यावरच त्यांचे रोजचे व्यवहार चालू होते. चूल पेटवून भाकऱ्या थापणं ....... मुलांचं खेळणं.....अधूनमधून भांडण सदृश्य मोठमोठ्यानं बोलणं....

अचानक माझ्या मुलाच्या जोरजोरानं हाका यायला लागल्या.-

'आई...आई लवकर ये.....तिथे काय झालंय बघ. कुणाला तरी साप चावला वाटत .........लवकर ये...'

त्याची आरडा - ओरडी ऐकून मी धावतच गॅलरीत गेले. प्लॉटजवळच्या भिंतीलगत आम्ही कितीदा तरी मोठे - मोठे दोन साप बघितले होते. चावले कि काय कुणाला? आम्ही वाकून - वाकून बघायला लागलो.

समोरच्या कोंडाळ्यात सगळाच कलकलाट चालू होता. नक्की काय झालंय ते कळत नव्हतं. काही वेळ असाच गेला.

मग एक पोरगेलेसा तरुण बाजूला झाला अन एका खुरप्याने त्याने भिंतीजवळ एक खड्डा खणायला सुरवात केली. त्यानं दोन हात खोलीचा खड्डा खणला अन कशीबशी साडी गुंडाळलेली जेमतेम पंधरा - सोळा वर्षांची पोरगी तिथे येऊन उताणी झोपली. खड्डा खणणारा पोरगा जरा दूर जाऊन घाम पुसत एका दगडावर टेकला.

बाकीच्या बायाबापड्या आपापल्या चुली - गठुडयांजवळ जाऊन निवांत कामाला लागल्या. चार - सहा बारकी बारकी पोरं मात्र तिथेच जवळपास खेळत राहिली. ते अधून - मधून त्या पोरीजवळ जाऊन खड्ड्याकडून वाकून पाहत होते. असाच तासभर तरी गेला असेल.

थोड्या वेळाने तो दगडावर बसलेला पोरगा उठला. तो बहुतेक त्या पोरीचा नवरा असावा. त्यानं तिच्या पोटावर लाथा मारायला सुरवात केली. पोरीच्या तोंडून मात्र आवाज उमटला नाही. त्याने दहा - बारा लाथा मारल्या अन मग एक पोक्तशी बाई, जी आत्तापर्यंत निवांतपणे चूल-बिल पेटवत बसली होती, ती पुढे झाली. ती खड्ड्याजवळ जाऊन वाकून उभी राहिली अन पुढच्या पाच - सात मिनिटात तिच्या हातात एक बाळ आलं.

तोवर चुलीवरचं पाणी तापलं होतं. त्या बाईनं लगेच बाळाला आंघोळ घातली. त्याला चिरगुटात गुंडाळलं. उघड्यावरच ती बाळंतीणही सावकाशपणे आंघोळीला बसली. हे होतंय तोवर त्या बाळंतिणीच्या नवऱ्याने चार बांबू उभारून त्यावर एक ठिगळाचं लुगडं टाकलं. त्या सावलीला बाळ - बाळंतीण झोपले.
दुसऱ्या दिवशी सकाळी जरा लवकरच सगळ्या गाठोड्या मडक्यांची बांधाबांध झाली होती. सगळे लोकं रस्त्यालाही लागले होते.

वत्सला, विपू मधे टाकते ग.. इथे आधीच हायजॅक झाल्यासारखा वाटतोय धागा माझ्यामुळे..
मी केवळ आ णि केवळ अनुभवातून आलेली बाजू समोर यावी म्हणून टाकलं.. विश्रांती मिळणं - हे चोचले नाहीत, बायकांचा हक्क आहे. ( नॉर्मल डिलिवरी हो ऊन थर्ड डिग्री टीअर्स आणि त्यामुळे कॉम्प्लिकेशन्स, पीपीडी, दुधाच्या गाठी हो ऊन झालेले कॉम्प्लिकेशन्स, अनेक वर्ष डिलिवरी दरम्यान हाताला इन्ज्युअरी झाल्या मुळं मानेत इन्जेक्शन घेणारी मैत्रिण, असले कॉम्प्लिकेशन्स न होता खरोखरच सत्व गेल्यानं थकलेल्या आया, ब्रेस्टफीडिंग जमत नाहीये (त्यातही अनेक उपप्रकार असतात) म्हणून थकलेल्या आया असले प्रकारही बघितलेत प्रत्यक्ष)

शर्मिला आर चा किस्सा खरच कल्चरल शॉक आहे!

Pages