तुम्ही दारू कशी पिता?

Submitted by कटप्पा on 14 June, 2018 - 18:53

उन्हाळा म्हणजे chilled बिअर आणि संध्याकाळी पेग.

प्रकार 1 - नीट . म्हणजे काहीही न मिसळता. याची मजा वेगळीच आहे. पण हळू हळू प्यावी नाहीतर हालत खराब.

प्रकार 2 - ऑन the रॉक्स. बर्फाचे तुकडे आणि स्कॉच.

प्रकार 3 - सोडा किंवा पाणी आणि स्कॉच.

चला तर मग, येताय ना वीकएंड जवळ आलाय !

Group content visibility: 
Use group defaults

पुर्वी फक्त देशी मध्ये मिळणारे मोसंबी नारंगी हे स्वाद देखिल व्होडका मध्ये मिळत आहेत! हे मला माहिती नव्हते. मागेच एका मद्याच्या शोरूम मध्ये बघितले. किती तरी स्वादांमध्ये व्होडका उपलब्ध आहे.
पण अब्सोलुट व्होडकाच चांगली अगदी कुठल्याही स्वादात सहज मिसळून जाणारी तरीही स्वत:चे अस्तित्व जाणवून देणारी!

हो व्होडका मध्ये खूप फ्लेवर असतात..पण व्हिस्की आणि ब्रांडी सारखी पाणचट नाही लागत म्हंजे मी जास्त व्हिस्की आणि ब्रँडी नाही ट्राय केली तरी पण ते प्रकरण नाहीच आवडतं मला..आजकाल ग्रीन ऍपल सध्या पाण्यात पिते...
वाईन पण ऑप्शन छान आहे पण खूप प्यायला लागते गोड आह...आता वरच ऑप्शन ट्राय करीन.

अच्छा तशी प्लेन

स्मिर्नोफ ग्रीन अँपल मलाही आवडते
एक मिरची वाली पण मस्त लागते

अबसोल्युत ची लेमन फ्लेवर पण छान आहे

रोमानव एकदम स्वस्त आणि मस्त Happy

त्या मिरची वाली laa fire on ice म्हणतात असं eaiklay. बाकी खायला तिखट चालेल पण तिखट ड्रिंक नाय जमणार.
ग्रीन ऍपल खूप आवडलेला लागलीय लेमन ग्रास पण भारी आहे. Sprite असेल तर एक नंबर. पण आता नो कोल्ड्रिंक्स...

Cold drink .
मग कोणती ही पेप्सी पासून sprite पर्यंत दारू मध्ये मिक्स केली की ते शरीरास अत्यंत हानिकारक च असते.( Cold drinks मला दारू पेक्षा पण जास्त हानिकारक वाटतात)
एक वर्ष रोज cold ड्रिंक बरोबर दारू प्या 32 सी ,25 विसी पर्यंत येईल .
हवं तर प्रयोग करा

हेमंत बरोबर सांगत आहेत, कोल्ड ड्रिंक अगदी अपवादानेच मिक्स करावे

ज्यूस सोबत घ्या, सगळ्यात बेस्ट
फळे आणावी, त्यांचा रस काढून स्टोर करावा फ्रीजमध्ये

रियल किंवा रेडिमेड वाले ज्यूस मध्येही भरपुर साखर असते

"फायरबॉल व्हिस्की कोणी ट्राय केलीय का?" - तुला स्मोकी व्हिस्की आवडा असेल, तर ही आवडेल. दालचिनीचा फ्लेव्हर आहे. अश्या दारवा एकदम आवडतात किंवा अजिबात आवडत नाहीत, सहसा अध्येमध्ये काही नसतं.

"परवाच्या पार्टीला ही आणली होती. चांगली होती." - मला जॅपनीज व्हिस्कीज आवडल्या आहेत आत्तापर्यंत. जितक्या ट्राय केल्या आहेत, तितक्या चवीला लाइट होत्या (इफेक्टला नाही Happy ).

तुला स्मोकी व्हिस्की आवडा असेल>>> हो मी दिवाना आहे स्मोकिं चा
जेडी, डबल ब्लॅक, लफ्रॉयज सगळ्याच

ही पण स्मोकिं असेल तर लैच खास, बजेट मध्ये आहे

माझ्या मित्रांसाठी आणल्या आहेत US वरून>>>
या लोकल आहेत ना तिथल्या? मी ऐकलंय याच्या बद्दल
तुफानी आहेत म्हणे

“ हो मी दिवाना आहे स्मोकिं चा” - शक्यतो काही मिक्स न करता पिऊन बघ. लोकं फायरबॉलचे शॉट्सपण घेतात, पण मला सिप करायला जास्त आवडते.

“ तुफानी आहेत म्हणे” - बर्बनची टेस्ट आवडत असेल तर राय ची बुलेट आवडू शकते. बहूदा व्हिस्की कॉकटेल्स साठी वापरली जाते.

फायरबॉल केली ट्राय, ती काय क्वार्टर किंवा हाफ मध्ये नाही मिळत. एकदम फुल्ल किंवा मिनिएचर. मग तीच घेतली ६० मीली.

आवडली असे प्रथम दर्शनी म्हणता येईल. ऑन द रॉक्स घेतली, एकदम मधाळ चव आहे. रादर मधाच्या नोट्स जास्त जाणवल्या, आणि दालचिनीचा अर्क. फायरबॉल नावामुळे मला वाटलेलं स्फोटक काहीतरी असेल पण हे एकदम काढा टाईप निघालं.

पण चव रेंगाळत राहीली. एक व्हरायटी म्हणून ट्राय करायाला अगदीच बेस्ट

बायकोला अजिबातच आवडली नाही.

मलाही फायरबॉल अजिबात आवडत नाही.

तसं म्हणायचं तर कुठल्याच फ्लेवर्ड व्हिस्की आवडत नाहीत (पीच / ऍपल / हनी / व्हॅनिला / पीनट बटर).

मला व्हरायटी म्हणून ट्राय करायला आवडतं. नेहमीचेच तेच ते पेक्षा काहीतरी वेगळ. नाही जास्त आवडलं तर फुली, आवडलं तर टिकमार्क.

अमृत टू इंडिज रम याचसाठी घेतली होती. पण तितकीशी
नाही आवडली.

त्यापेक्षा आपली ओल्ड मंक आणि त्याचीच प्रिमियम मस्त आहे.

आणि मी इथे टाकलं होतं का, की ओल्ड मंकच्या बाटलीत दोन चार दालचिनी, ८ -१० लवंगा टाकून बाटली कपाटात २ महिने ठेऊन द्यावी. नंतर जी काही अफलातून टेस्ट येते त्याला तोड नाही. मी तर आता पुढच्या वेळी मध पण टाकावा म्हणतोय एक चमचा.

घरच्या घरी फायरबॉल रम होईल तयार Happy

अजून अमृत ची रम ट्राय नाही केलीये.

बाहेरगांव च्या रम पैकी आता पर्यंत फक्त पूर्वीच्या ब्रिटिश कॅरिबियन टेरिटरी मधल्या (जमेका, गयाना. बार्बाडोस वगैरे) रम ट्राय केल्या आहेत - ज्या मला तरी आवडल्या.

"एक व्हरायटी म्हणून ट्राय करायाला अगदीच बेस्ट" - सहमत. मला नाही वाटत तो कुणाचा फर्स्ट चॉईस / रेग्युलर ब्रँड असावा (असेलही. लोकांचा काही भरवसा नाही. Happy )

मला नाही वाटत तो कुणाचा फर्स्ट चॉईस / रेग्युलर ब्रँड असावा (असेलही. लोकांचा काही भरवसा नाही) >>>>

इथे आलो तेव्हा कॉलेज / युनिव्हर्सिटी मधल्या पार्ट्यामध्ये तो रेगुलर ब्रँड होता.

“इथे आलो तेव्हा कॉलेज / युनिव्हर्सिटी मधल्या पार्ट्यामध्ये तो रेगुलर ब्रँड होता.” - म्हटलं ना, लोकांचा काही भरवसा नाही. Happy

अरे हा चोरटे सर आहेच का इथं?
मला वाटलं ते शाखाचे वेडसर झटके येत असल्याने काही काळ का होईना इथं येणार नाही

सर, ही प्रतिक्रिया चोरून दुसरीकडे टाकणार असल्यास सांगा काय निदान Happy

Pages