तुम्ही दारू कशी पिता?

Submitted by कटप्पा on 14 June, 2018 - 18:53

उन्हाळा म्हणजे chilled बिअर आणि संध्याकाळी पेग.

प्रकार 1 - नीट . म्हणजे काहीही न मिसळता. याची मजा वेगळीच आहे. पण हळू हळू प्यावी नाहीतर हालत खराब.

प्रकार 2 - ऑन the रॉक्स. बर्फाचे तुकडे आणि स्कॉच.

प्रकार 3 - सोडा किंवा पाणी आणि स्कॉच.

चला तर मग, येताय ना वीकएंड जवळ आलाय !

Group content visibility: 
Use group defaults

घरी सध्या मस्त स्ट्रॉबेरी आणल्या आहेत
त्याचे स्ट्रॉबेरी मिल्कशेक विथ आईस्क्रीम आणि फ़्रेश स्ट्रॉबेरी असे प्रकार करून झालेत

स्ट्रॉबेरी मला कुठल्या कॉकटेल मध्ये वापरता येईल?

मार्गारिटा..
फ्रेश स्ट्रॉबेरी मार्गारिटा फार मस्त लागते. कधीही सिरप किंवा पॅक ज्यूसपेक्षा ताज्या फळांचा गर/ रस हा कॉकटेल्सची मजा वाढवतो.

अजून एक आयड्या.
स्ट्रॉबेरी क्रश करा. ती बुडेल इतके नारळपाणी घाला. हे फ्रिजात ठेवून गार होउद्या.
पुदिन्याची पाने आणि किंचित सैंधव असे छान खरडून घ्या.
स्ट्रॉरळपाणी चांगले थंडगार झाले की त्यात व्होडका घाला. वरून पुदिना पाने + सैंधव असा जो खर्डा केलाय तो थोडासा घाला. म्हणजे ग्लासाला पाव चमचा वगैरे.

आयड्या क्रमांक २ - वाइन्स आवडत असतील तर.
ग्लासात स्ट्रॉबेरी थोडे थोडे काप देऊन आख्खी ठेवा. त्यावर व्हाइट झिन्फंडेल किंवा कुठलीही ब्लश वाइन ओता. प्या.

हा हे सोप्प आहे एकदम
अगदीच जमण्यासारखे

धन्यवाद, लगेच करून बघतो आणि फीडबॅक देतो

तो फ्रुटज्युस चा नई जमलं करायला, पण मग रियल फ्रुट ज्यूस वापरून एक केलाय
त्याची रेसिपी टाकलीय वरती

अजून एक आयड्या.
स्ट्रॉबेरी क्रश करा. ती बुडेल इतके नारळपाणी घाला. हे फ्रिजात ठेवून गार होउद्या.
पुदिन्याची पाने आणि किंचित सैंधव असे छान खरडून घ्या.
स्ट्रॉरळपाणी चांगले थंडगार झाले की त्यात व्होडका घाला. वरून पुदिना पाने + सैंधव असा जो खर्डा केलाय तो थोडासा घाला. म्हणजे ग्लासाला पाव चमचा वगैरे.>>>

नई जमलं फारसा
स्ट्रॉबेरी क्रश करून घातली नारळपाणी घातलं
सैंधव पण पुदिना पण
स्टील नाही मजा आली

एकतर स्ट्रॉबेरी आणि व्होडका च्या मिक्सिंग मध्ये नारळ पाण्याची नोट कुठं जाणवली नाही
म्हणजे ते टोटल मिस झालं

नंतर मग लिंबू पिळला आणि चाट मसाला वाढवला आणि बर्फाचा चुरा ही ऍड केला

तेव्हा जरा गमंत अली

पण या प्रकरणात ब्ररेच प्रयोग करावे लागतील

व्हाईट वाईन घ्या.. त्यात थोडे स्प्राईट टाका.. स्ट्रॉबेरी चे पनीर क्यूब साईझ तुकडे करून त्यात मिसळा.... शांग्रिया

वाईन चा फार क्रेझी नई मी
माझ्याकडे एकच वाईन आहे आता उरली सुला ची शिराज

मी मेनली व्हिस्की आणि रम वाला

व्होडका पण क्वचित आणतो।

>>मी मेनली व्हिस्की आणि रम वाला<<
चांगली (टॉपशेल्फ) व्हिस्कि (स्कॉच, बर्बन) असेल तर त्यात भेसळ करु नका. एंजॉय द टेस्ट, अरोमा. त्यात हेघाल-तेघाल केलं कि ओरिजिनल प्योरिटि मास्क होते. व्हिस्किचं कॉकटेलचं करायचं असेल तर ओल्डफॅशन्ड किंवा मन्हॅटन करा. दोन्हिहि करायला सोप्पी आणि बर्बन बेस्ड आहेत...

वाडका+टॉनिक हे एक मस्त रिफ्रेशिंग ड्रिंक आहे, टु बूस्ट योर एनर्जी ऑन द नाइन्थ फेरवे... Wink

उबो, येस्स!! मस्त आहेत ह्या जॅपनीज व्हिस्कीज.

“चांगली (टॉपशेल्फ) व्हिस्कि (स्कॉच, बर्बन) असेल तर त्यात भेसळ करु नका. ” - सहमत!

यामाझाकी मिळत नाही पटकन. >>>

आमच्या इथल्या कॉस्टकोत पाहिली परवाच.

अर्थात अमेरिकेतले राज्या-राज्या अनुसार बदलणारे अल्कोहोल चे डिस्ट्रिब्युशन आणि विकण्याचे नियम हा एक संशोधनाचा विषय आहे.

चांगली (टॉपशेल्फ) व्हिस्कि (स्कॉच, बर्बन) असेल तर त्यात भेसळ करु नका.>>> हो हो अर्थातच Happy
माझ्याकड एक डबल ब्लॅक, लफ्रॉज आहेत त्या ऑन द रॉक्स च
त्यात सोडा सुद्धा नाही घालत
प्युर एकदम

ही कॉकटेल मी एकदम स्वस्तातील ओकस्मिथ किंवा ब्लेंडर्स सोबत करतो

गिरीश कुबेरांनी ' इंद्री ' आणि ' ग्यानचंद ' या दोन नवीन भारतीय सिंगल माल्ट व्हिस्की विषयी लेख लिहिला होता 26 डिसेंबर ला. कोणी ट्राय केल्यात का?
मागे त्यांनी सांगितलेली अमृत प्यायलो होतो. ती फार आवडलेली.

कोणी ट्राय केल्यात का?>>>>

इच्छा तर आहे, पण बजेटमध्ये येत नाहीत त्या Happy

अमृत मस्तच आहे, आणि म्हणून मी त्यांची
टू इंडिज रम आणलेली, पण ती इतकी पण खास नव्हती

टू इंडिज रम आणलेली, पण ती इतकी पण खास नव्हती ---- मी पण ट्राय केलेली पण रमच फारशी आवडत नाही.
Amrut Maqintosh आवडते का बघा. बजेट मध्ये येते.

Whisky आणि व्होडका हेच पिण्यात असते.

पण सर्व दारू प्रकार अनुभवले आहेत.
बीयर पहिली पायरी.
रम, जीन, स्कॉच ,
अगदी एकदा देशी, हातभट्टी ची पण पिली आहे.
चव हा प्रकार मला तरी आज पण समजत नाही.
फक्त उग्र आणि कमी उग्र.
लवकर नशा चढणारी आणि उशिरा नशा चढणारी.
दुसऱ्या दिवशी त्रास देणारी आणि त्रास न देणारी .
इतकाच फरक दारू मध्ये मला तरी दिसून आला

तुम्ही एकदा बरबोन, सिंगल मॉल्ट चा अनुभव घेऊन बघा

एकच सिप घेऊन तो असा सावकाशपणे घोळवत
टेस्टबडसना स्पर्श करत असा आस्वाद घेत जायचा आहे
इथं चव म्हणजे त्याचा फ्लेवर, स्मुदनेस, कधी वेगळ्या मसाल्याच्या नोट्स हे सगळं जाणवतं

केवळ नशा येण्यासाठी प्यायला तर हे काही नाही होत
त्यावेळी मग ती फक्त दारूच राहते, मद्य/वारूणी होत नाही

कॉकटेल हा प्रकार खूप कमी वेळा वापरला जातो.
इतके कष्ट कोणी घेत नाही.

शेवटी चव ही कोणाचीच आवड नसते.
चवी चे अनंत पदार्थ आहेत
नशा हाच मूळ हेतू असतो आणि हौस म्हणून चव.
पण चव हा हेतू कोणाचाच नसतो

विविध द्रव , घन पदार्थ एकत्र मिळाले की रासायनिक शास्त्र चे नियम लागू होतात .
त्यांच्यात क्रिया अभिक्रिया होवून नव नवीन संयुग बनतात.
कॉकटेल हा प्रकार बार टेंडर चा शोध असतो.
रासायनिक क्रिया ,अभिक्रिया आणि निर्मित होणारे संयुग ह्याचे ज्ञान बार टेंडर ह्या जमातीला असू च शकत नाही.

त्यांचे अनुकरण किती करावे ह्याचे भान शिक्षित.
डॉक्टर, इंजिनिअर, अकाउंट , आणि बाकी लोक ह्यांनी अंध पने का करावे.
फक्त fad आहे म्हणून.
मग अशिक्षित आणि शिक्षित ह्या मध्ये फरक काय?

“ शेवटी चव ही कोणाचीच आवड नसते” “ ह्याचे ज्ञान बार टेंडर ह्या जमातीला असू च शकत नाही.” - और यह लगा सिक्सर। नटराज़ फिर चैंपियन। Happy

रासायनिक क्रिया ,अभिक्रिया आणि निर्मित होणारे संयुग ह्याचे ज्ञान बार टेंडर ह्या जमातीला असू च शकत नाही.>>>
यात कुक, शेफ, मिठाई वाला पण घालावेत माय लॉर्ड Happy

विविध द्रव , घन पदार्थ एकत्र मिळाले की रासायनिक शास्त्र चे नियम लागू होतात. त्यांच्यात क्रिया अभिक्रिया होवून नव नवीन संयुग बनतात
>>>>

जेव्हा आपण उलटसुलट खाद्यपदार्थ खातो तेव्हा आपल्याला मळमळते, अपचन अजीर्ण होते वा उलट्या होतात.
दारू अशीही पिल्याने उलट्या होतातच. मग प्रयोग केल्यानंतरही तेच होत असल्यास कुठले संयुग बनलेय काय फरक पडतो Happy

Pages