सिंहगडवर (व इतर गडांवर सुद्धा?) मांसाहारास बंदी कशासाठी?

Submitted by इनामदार on 1 June, 2018 - 13:28

काही दिवसांपूर्वी सिंहगडवर गेलो होतो. यापूर्वी काही वर्षांपूर्वी गेलो होतो तेंव्हा तिथे परिस्थिती वेगळी होती. आता खूप सकारात्मक बदल झाले आहेत. स्वच्छता, डागडुजी, रस्ते वगैरे. बदल नक्कीच स्वागतार्ह आहे. पण त्याचबरोबर एका गोष्टीचे कोडे उलगडले नाही. गडावर पूर्वी मांसाहारी जेवण मिळायचे ते आता बंद केले आहे. मद्यपान बंदी एकवेळ समजू शकतो. आपल्याकडे बरेचसे पब्लिक दारू पिली कि आरडाओरडा, शिवीगाळी, बाटल्या फोडणे तसेच अन्य घृणास्पद कृत्ये करतात ज्याचा इतर पर्यटकांना प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष त्रास होऊ शकतो.

पण मांसाहाराने काय घोडे मारले आहे? त्यावर बंदी कशासाठी? कचरा म्हणावा तर तो अन्य खाण्यापिण्याने पण होतोच आहे गडावर. मांसाहाराने थोडा अधिक होईल इतकेच. तिथे मी विचारणा केली असता "गडाचे पावित्र्य अबाधित राहावे म्हणून" वगैरे उत्तरे मिळाली. अरे म्हणजे इतिहासातील ज्या वीर पुरुष व पराक्रमी योद्धा असलेल्या महान विभूतींमुळे हा गड पवित्र स्थान बनले आहे ते लोक मांसाहार करत नव्हते शाकाहारी होते असे म्हणावयाचे आहे का? नरवीर तानाजी मालुसरे असोत वा खुद्द शिवछत्रपती असोत. पराक्रमी योद्धे होते. मांसाहार तर करतच होते. मग तिथे येणाऱ्यानी मांसाहार केला तर पावित्र्य बिघडण्याचे काय कारण? थोडीतरी तर्कसंगती आहे का ह्या बंदीला? नक्की कोण आहेत या बंदिमागे?

थोडा मागोवा घेतला तेंव्हा लक्षात आले एक "शिवाधिन दुर्ग संवर्धन संस्था" म्हणून आहे (जसे काय गड किल्ले म्हणजे सरकारची नव्हे तर यांचीच मक्तेदारी) त्यांनी हि बंदीची मागणी व नंतर अंमलबजावणी केली आहे. काही बातम्यांमधून लक्षात आले कि सरकारी यंत्रणा नव्हे तर या संघटनेचे लोकच गुंडगिरी करून मांसाहार करू देत नाहीत. अजून थोडे खोलात जाऊन पाहिले असता लक्षात आले कि हि संघटना म्हणजे देशातील कडव्या हिंदुत्ववादी संघटनांचे पिल्ले आहे हे जाणवले (त्यांच्या फेसबुक पेज व इतर माहितीवरून). गड किल्ल्यांची निगा राखण्यासाठी खरे तर सरकारी यंत्रणा आहे. गड किल्ले कोणाची खाजगी मालमत्ता नव्हे. तरीदेखील गडांवर या खाजगी संघटनेचे वर्चस्व आहे!

काही जण मांसाहार बंदीसाठी वनखात्याच्या नियमाचा आधार घेताना दिसतात. म्हणे वनक्षेत्रात मांसाहार वर्ज्य आहे. अरे पण तसे असेल तर मग इतकी वर्षे वनखात्याने हे सुरु ठेवूच कसे दिले असते?

आणि मग सगळी मेख लक्षात आली.

मांसाहाराचे वावडे ना राजाला होते ना मावळ्यांना. मांसाहार न करणारे आहेत ठराविक हिंदुत्ववादी. त्यांना आवडत नाही म्हणून त्यांनी तो "अपवित्र" ठरवून त्यास गडांवर बंदी घातली असे समजायला बक्कळ वाव आहे. म्हणजे सरळ सरळ धार्मिक दहशत. बाकी काही नाही. (शिवाय याचा साईड इफेक्ट म्हणून "राजांना मांसाहार वर्ज्य होता म्हणूनच आजही गडांवर मांसाहारास बंदी आहे" असे अजून पाच पन्नास वर्षांनी कोणतरी एखादा भुक्कड कवी/शाहीर लिहून जाऊ शकतो हा भाग वेगळाच).

कुणाची काय काय मते आहेत यावर?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सिंहगड याच दिशेने चालला आहे. खाण्यापिण्याचे नियम तर लागलेच. आता "घेरा सिंहगड" परिसरात महिलांनी/मुलीनी कमीत कमी ठराविक "घेरा"ची साडीच नेसावी असा फतवा निघेल अजून काही वर्षांनी.

<< एक छोट्याशा गटाची मते हिंदुत्वाच्या नावाखाली इतरांवर लादण्याचा आणि खाण्यावरून न्यूनगंड निर्माण करवण्याचा हा प्रकार शक्य तितक्या लवकर थांबावा एव्हढेच. >>
------ पान दोन वर हिरा यान्नी व्यक्त केलेल्या प्रतिक्रियेच्या या भागाशी सहमत... आधीच्या ब्रिगेड भागाशी असहमत. पण प्रत्येक क्रियेला... प्रतिक्रिया आहे हे नव - विचारी लोकान्नी लक्षात घ्यायला हवे.

(अ) नॉन्व्हेज मुळे मद्यपान.... मद्यपानामुळे गुन्हेगारी/ महिलान्वर अत्याचार.... आणि म्हणुन आमचा मान्साहाराला विरोध
(ब) मान्साहारामुळे वास येतो, अस्वच्छता वाढते.... असे तारे तोडणे म्हणजे बेकायदेशीर बन्दीच्या कृत्याला गोन्डस मुलामा देणे झाले.

आहाराबाबत दुसर्‍यान्वर निर्णय लादू नका, आहार प्रकाराचा खुळचट आधार घेत भेदभावाचे वर्तन करु नका. ज्याला जे खायचे आहे ते त्यान्ना खाऊ द्या, ज्यान्ना नको असेल त्यान्ना कुठलाही आग्रह करु नका...

जवळजवळ 300 प्रतिसाद आले म्हटल्यावर सगळेच प्रतिसाद पूर्ण विचार करून लिहिलेले, कुणावरही व्यक्तिगत हल्ला न करणारे, जुनी देणीघेणी नव्या बीबीवर न फेडणारे, बीबीच्या विषयाशी पूर्ण सुसंगत असे असतील ही अपेक्षा करणे गैर. चांगल्या माहितीपूर्ण धाग्यांवर गर्दी जमत नाहीच. जमते ती इथेच, असल्याचं धाग्यांवर....

जाऊदे, कंटाळा आलेला सकाळीच... असले धागे असतात म्हणून थोडा टाईमपास होतो.

गुगल इंडिक मध्ये मराठीच आहे. हिंदी नाही . तरीही घमेले येत नाही. बा द वे घमेले शब्द मराठी शाळेतील गुरुजींनी शिकवला होता

मधुरांबे, दैनिक सनातनमध्ये ह्यावर काही उपाय सांगितले आहेत का?
Submitted by सायो on 6 June, 2018 - 06:12
<<
इथून जी काय करमणुक सुरू झालिये Rofl
*
पुणे सबरेड्डीट आहे हे ठाऊकच नव्हते. केलंय सबस्क्राईब.
*
करमणुकीसाठी का होईना साधनाताईंनी पायधूळ झाडल्याचे पाहून गहिवरलो.

*
जाता जाता.
या धाग्याच्या निमित्ताने एक नावा सडका आंबा माबोला मिळालेला पाहून आनंद झाला. आता सोबतीने सडलेले इतर आंबे ध्यानी येतील अन वेचून बाजूला काढता येतील.

कोणत्याच गड किल्ल्यावर, अगदी शनिवार वाड्यातही एकही बिल्डिंग नीट उभी का नाही? इंग्रजांनी या किल्ल्यांची वाताहत कशी केली याबद्दल एका तरी भाजपाप्याचे संशोधन वाचायचे आहे मला

साला सगळा इतिहास कम्युनिस्टांनी लिहिलाय. आम्ही फक्त पुराणे अन बखरी लिहितो..

अन अफजल खान फक्त देवळे तोडत होता म्हणून बोंब मारतो. ही इतिहासाची देवळे कुणी फोडली याबद्दल अवाक्षर?

<<
खाण्यावर बंदी घालणार्‍या गडकिल्ले संवर्धकांकडून याबद्दल काही आल्याचं आठवत नाही. गडाचं पावित्र्य म्हणून विव्हळणार्‍यांना याबद्दल काहीच बोलायचं नाहिये का?

दारू, मांसाहार, पावित्र्य, पराधीनता या सगळ्याचा संबंध उलगडून दाखवणारा एक रिसर्च पेपर पब्लिश झालाय व्हॉट्सॲपवर. ह्या माहीतीचा आपणासही लाभ व्हावा म्हणून इथे शेअर करतोय.
————

राजपूतों ने जब से मांसाहार और शराब को अपनाया तभी से मुगल शैतानो से पराजित होना शुरू हुआ…

राजपूतों का सिर धड से अलग होने के बाद कुल देवी युद्ध लडा करती थी…

“एक षड्यंत्र और माँस और शराब की घातकता….”

हिंदू धर्म ग्रंथ नहीँ कहते कि देवी को शराब चढ़ाई जाये..,

ग्रंथ नहीँ कहते की शराब पीना ही क्षत्रिय धर्म है..

ये सिर्फ़ एक मुग़लों का षड्यंत्र था हिंदुओं को कमजोर करने का !

जानिये एक सच्ची ऐतिहासिक घटना…

“एक षड्यंत्र और शराब की घातकता….”

कैसे हिंदुओं की सुरक्षा प्राचीर को ध्वस्त किया मुग़लों ने ??

जानिये और फिर सुधार कीजिये !!

मुगल शैतान का दिल्ली में दरबार लगा था और हिंदुस्तान के दूर दूर के राजा महाराजा दरबार में हाजिर थे ।

उसी दौरान मुगल बादशाह ने एक दम्भोक्ति की “है कोई हमसे बहादुर इस दुनिया में ?”

सभा में सन्नाटा सा पसर गया ,एक बार फिर वही दोहराया गया !

तीसरी बार फिर उसने ख़ुशी से चिल्ला कर कहा “है कोई हमसे बहादुर जो हिंदुस्तान पर सल्तनत कायम कर सके ??

सभा की खामोशी तोड़ती एक बुलन्द शेर सी दहाड़ गूंजी तो सबका ध्यान उस शख्स की और गया !

वो जोधपुर के महाराजा राव रिड़मल थे !

रिड़मल जी ने कहा, “मुग़लों में बहादुरी नहीँ कुटिलता है…, सबसे बहादुर तो राजपूत है दुनियाँ में !

मुगलो ने राजपूतो को आपस में लड़वा कर हिंदुस्तान पर राज किया !

कभी सिसोदिया राणा वंश को कछावा जयपुर से

तो कभी राठोड़ो को दूसरे राजपूतो से…।

बादशाह का मुँह देखने लायक था ,

ऐसा लगा जैसे किसी ने चोरी करते रंगे हाथो पकड़ लिया हो।

“बाते मत करो राव…उदाहरण दो वीरता का।”

रिड़मल ने कहा “क्या किसी कौम में देखा है किसी को सिर कटने के बाद भी लड़ते हुए ??”

बादशाह बोला ये तो सुनी हुई बात है देखा तो नही ,

रिड़मल बोले ” इतिहास उठाकर देख लो कितने वीरो की कहानिया है सिर कटने के बाद भी लड़ने की … ”

बादशाह हसा और दरबार में बेठे कवियों की और देखकर बोला

“इतिहास लिखने वाले तो मंगते होते है । मैं भी १०० मुगलो के नाम लिखवा दूँ इसमें क्या ?

मुझे तो जिन्दा ऐसा राजपूत बताओ जो कहे की मेरा सिर काट दो में फिर भी लड़ूंगा।”

राव रिड़मल निरुत्तर हो गए और गहरे सोच में डूब गए।

रात को सोचते सोचते अचानक उनको रोहणी ठिकाने के जागीरदार का ख्याल आया।

रात को ११ बजे रोहणी ठिकाना (जो की जेतारण कस्बे जोधपुर रियासत) में दो घुड़सवार बुजुर्ग जागीरदार के पोल पर पहुंचे और मिलने की इजाजत मांगी।

ठाकुर साहब काफी वृद्ध अवस्था में थे फिर भी उठ कर मेहमान की आवभगत के लिए बाहर पोल पर आये ,,

घुड़सवारों ने प्रणाम किया और वृद्ध ठाकुर की आँखों में चमक सी उभरी और मुस्कराते हुए बोले

” जोधपुर महाराज… आपको मैंने गोद में खिलाया है और अस्त्र शस्त्र की शिक्षा दी है.. इस तरह भेष बदलने पर भी में आपको आवाज से पहचान गया हूँ।

हुकम आप अंदर पधारो…मैं आपकी रियासत का छोटा सा जागीरदार, आपने मुझे ही बुलवा लिया होता।

राव रिड़मल ने उनको झुककर प्रणाम किया और बोले एक समस्या है , और बादशाह के दरबार की पूरी कहानी सुना दी

अब आप ही बताये की जीवित योद्धा का कैसे पता चले की ये लड़ाई में सिर कटने के बाद भी लड़ेगा ?

रोहणी जागीदार बोले ,” बस इतनी सी बात..

मेरे दोनों बच्चे सिर कटने के बाद भी लड़ेंगे

और आप दोनों को ले जाओ दिल्ली दरबार में ये आपकी और राजपूती की लाज जरूर रखेंगे ”

राव रिड़मल को घोर आश्चर्य हुआ कि एक पिता को कितना विश्वास है अपने बच्चो पर.. , मान गए राजपूती धर्म को।

सुबह जल्दी दोनों बच्चे अपने अपने घोड़ो के साथ तैयार थे!

उसी समय ठाकुर साहब ने कहा ,” महाराज थोडा रुकिए !!

मैं एक बार इनकी माँ से भी कुछ चर्चा कर लूँ इस बारे में।”

राव रिड़मल ने सोचा आखिर पिता का ह्रदय है

कैसे मानेगा !

अपने दोनों जवान बच्चो के सिर कटवाने को ,

एक बार रिड़मल जी ने सोचा की मुझे दोनों बच्चो को यही छोड़कर चले जाना चाहिए।

ठाकुर साहब ने ठकुरानी जी को कहा

” आपके दोनों बच्चो को दिल्ली मुगल बादशाह के दरबार में भेज रहा हूँ सिर कटवाने को ,

दोनों में से कौनसा सिर कटने के बाद भी लड़ सकता है ?

आप माँ हो आपको ज्यादा पता होगा !

ठकुरानी जी ने कहा

“बड़ा लड़का तो क़िले और क़िले के बाहर तक भी लड़ लेगा पर

छोटा केवल परकोटे में ही लड़ सकता है क्योंकि पैदा होते ही इसको मेरा दूध नही मिला था। लड़ दोनों ही सकते है, आप निश्चित् होकर भेज दो”

दिल्ली के दरबार में आज कुछ विशेष भीड़ थी और हजारो लोग इस दृश्य को देखने जमा थे।

बड़े लड़के को मैदान में लाया गया और

मुगल बादशाह ने जल्लादो को आदेश दिया की इसकी गर्दन उड़ा दो..

तभी बीकानेर महाराजा बोले “ये क्या तमाशा है ?

राजपूती इतनी भी सस्ती नही हुई है , लड़ाई का मौका दो और फिर देखो कौन बहादुर है ?

बादशाह ने खुद के सबसे मजबूत और कुशल योद्धा बुलाये और कहा ये जो घुड़सवार मैदान में खड़ा है उसका सिर् काट दो…

२० घुड़सवारों को दल रोहणी ठाकुर के बड़े लड़के का सिर उतारने को लपका और देखते ही देखते उन २० घुड़सवारों की लाशें मैदान में बिछ गयी।

दूसरा दस्ता आगे बढ़ा और उसका भी वही हाल हुआ ,

मुगलो में घबराहट और झुरझरि फेल गयी ,

इसी तरह बादशाह के ५०० सबसे ख़ास योद्धाओ की लाशें मैदान में पड़ी थी और उस वीर राजपूत योद्धा के तलवार की खरोंच भी नही आई।

ये देख कर मुगल सेनापति ने कहा

” ५०० मुगल बीबियाँ विधवा कर दी आपकी इस परीक्षा ने अब और मत कीजिये हजुर , इस काफ़िर को गोली मरवाईए हजुर…

तलवार से ये नही मरेगा…

कुटिलता और मक्कारी से भरे मुगलो ने उस वीर के सिर में गोलिया मार दी।

सिर के परखचे उड़ चुके थे पर धड़ ने तलवार की मजबूती कम नही करी

और मुगलो का कत्लेआम खतरनाक रूप से चलते रहा।

बादशाह ने छोटे भाई को अपने पास निहत्थे बैठा रखा था

ये सोच कर की ये बड़ा यदि बहादुर निकला तो इस छोटे को कोई जागीर दे कर अपनी सेना में भर्ती कर लूंगा

लेकिन जब छोटे ने ये अंन्याय देखा तो उसने झपटकर बादशाह की तलवार निकाल ली।

उसी समय बादशाह के अंगरक्षकों ने उनकी गर्दन काट दी फिर भी धड़ तलवार चलाता गया और अंगरक्षकों समेत मुगलो का काल बन गए।

बादशाह भाग कर कमरे में छुप गया और बाहर मैदान में बड़े भाई और अंदर परकोटे में छोटे भाई का पराक्रम देखते ही बनता था।

हजारो की संख्या में मुगल हताहत हो चुके थे और आगे का कुछ पता नही था।

बादशाह ने चिल्ला कर कहा अरे कोई रोको इनको..।

एक मौलवी आगे आया और बोला इन पर शराब छिड़क दो।

राजपूत का इष्ट कमजोर करना हो तो शराब का उपयोग करो।

दोनों भाइयो पर शराब छिड़की गयी ऐसा करते ही दोनों के शरीर ठन्डे पड़ गए।

मौलवी ने बादशाह को कहा ” हजुर ये लड़ने वाला इनका शरीर नही बल्कि इनकी कुल देवी है और ये राजपूत शराब से दूर रहते है और अपने धर्म और इष्ट को मजबूत रखते है।

यदि मुगलो को हिन्दुस्तान पर शासन करना है तो इनका इष्ट और धर्म भ्रष्ट करो और इनमे दारु शराब की लत लगाओ।

यदि मुगलो में ये कमियां हटा दे तो मुगल भी मजबूत बन जाएंगे।

उसके बाद से ही राजपूतो में मुगलो ने शराब का प्रचलन चलाया और धीरे धीरे राजपूत शराब में डूबते गए और अपनी इष्ट देवी को आराधक से खुद को भ्रष्ट करते गए।

और मुगलो ने मुसलमानो को कसम खिलवाई की शराब पीने के बाद नमाज नही पढ़ी जा सकती। इसलिए इससे दूर रहिये।

माँसाहार जैसी राक्षसी प्रवृत्ति पर गर्व करने वाले राजपूतों को यदि ज्ञात हो तो बताएं और आत्म मंथन करें कि महाराणा प्रताप की बेटी की मृत्यु जंगल में भूख से हुई थी क्यों …?

यदि वो मांसाहारी होते तो जंगल में उन्हें जानवरों की कमी थी क्या मार खाने के लिए…?

इसका तात्पर्य यह है कि राजपूत हमेशा शाकाहारी थे केवल कुछ स्वार्थी राजपूतों ने जिन्होंने मुगलों की आधिनता स्वीकार कर ली थी वे मुगलों को खुश करने के लिए उनके साथ मांसाहार करने लगे और अपने आप को मुगलों का विश्वासपात्र साबित करने की होड़ में गिरते चले गये हिन्दू भाइयो ये सच्ची घटना है और हमे हिन्दू समाज को इस कुरीति से दूर करना होगा।

तब ही हम पुनः खोया वैभव पा सकेंगे और हिन्दू धर्म की रक्षा कर सकेंग

नमन ऐसी वीर परंपरा को !!

हर हर महादेव!!
हर हर महादेव!!

तस्मात, मांसाहार करणे आपली संस्कृती कधीच नव्हती, मांसाहार सुरू केल्यानेच यादवांपासून आपल्या साम्राज्याला उतरती कळा लागली.
परत आपला सुवर्णकाळ आणायचा असेल तर मांसाहारापासून दूर राहणेच श्रेयस्कर __/\__

गंमतच आहे.मांसाहारामुळे राजपूत पराभूत झाले तर मौर्य साम्राज्य कसे निर्माण होऊ शकले? शक, कुशाण, चालुक्य, यादव, यांनी कशी काय मोठमोठी राज्ये सांभाळली? कुषाण साम्राज्य तर काहीं इतिहासकारांच्या मते भरतखंडातले पहिले सुवर्णयुग आहे. आणि मराठ्यांनी दिल्ली पादाक्रांत करून बादशहाला आपल्या हातचे बाहुले बनवले त्याचे काय ? आणि इंग्रजांनी भारत जिंकला त्याचे काय? की इतरांनी मांस खाल्ले तर ते हिंदूंविरोधात जिंकतात आणि हिंदूंनी मांस खाल्ले की ते इतरांविरोधात हरतात म्हणजे बकऱ्या कोंबड्या पशुपक्षीसुद्धा सुद्धा हिंदूंना धार्जिणे नाहीत काय? किंवा दोन पार्टींपैकी कुणीही मांस खावो, हिंदूच हरणारच असे आहे? चित मेरी जीत, पट तेरी हार . छान. अगदी गमाडी गंमत.

हीरा ते राज्य स्थापन करायच्या काळात शाकाहारी असतील, राज्य स्थापन झाले कि त्यांचा पाय घसरे आणि ते मांसाहार करू लागत, म्हणून त्यांची राज्ये बुडत, मग नवीन शाकाहारी पार्टी राज्य स्थापन करत असेल Proud

चित्पावन कोकणस्थ पेशवे मांसाहार करत नसल्याने ते बादशाहाला मुठीत ठेऊ शकले, मात्र जसे मांसाहारी १२ भाई सरदारांचे वजन वाढले, तसे मराठी फौजांचे तेज त्यांना सोडून गेले आणि इंग्रजांनी त्यांना हरवले. Proud Lol

रायगडावर आताच दीडलाख लोक आले होते. गडावर हजारो लिटर मलमूत्र पसरवले आणि प्लास्टिक फेकून दिले.
गेली काही वर्षे जयंती, राज्याभिषेक, पुण्यतिथी च्या नावाने गडावर शिमगा चालू असतो. गंगासागर तलावाला, वाराणशीची गंगा बनविण्याचा पुरेपूर विडा उचलला आहे.
आणि हो, हि सगळी उत्सवी मंडळी गडावर मांसाहार करण्याच्या विरोधातली आहेत.

गडकोट मोहिमेच्या नावाने हजारो लोकांना एकत्र घेऊन जंगल परिसरातून गुघाण करीत या मांसाहारबंदीवाल्यांच्या मोहिमा चालू असतात.
हि मोहीम झाली कि महिनाभर त्या परिसरातून गेलात तर ओकून मराल.

अनिरुद्ध दोन तोंडे टीम्बे यांचे मद्यपान, मांसाहार आणि किल्ल्याचे पावित्र्य याबद्दलची सर्व मते बाद समजण्यात यावीत,
>>>>>
एकाद्या निवांत विकांताला चार जिवाभावाच्या सवंगड्यासोबत, होडी काढून सरळ सुवर्ण दुर्ग किल्ला गाठायचा, होडीतून चार-पाच जणाना पुरेल इतका मद्याचा व खाण्याचा साठा सोबत घेऊन किल्ल्याच्या बाहेर जो तासलेला काळाभोर कातळ आहे त्यावर चटया टाकून, समुद्राचा भन्नाट वारा व आवाज ऐकत मद्याचा एकएक पेग तळलेल्या सुरमई व बांगड्या सोबत मारायचा,

जेंव्हा-केंव्हा लक्षात येईल की आता विमान कधीही टेकऑफ करेल त्यावेळी उरलेल्या रिकाम्या बाटल्या, कागदाचे तुकडे होडीत टाकून व माश्यांचे काटे वगैरे कावळ्यांना घालून घरी येऊन, मस्त जेवून ताणून द्यावी.

मज्जानू लाईफ.

Submitted by अनिरुध्द.. on 16 June, 2018 - 13:40
>>>>>>
https://www.maayboli.com/node/66421?page=1

किल्ल्याच्या निर्जन परिसरात दारू प्यायल्याने छेडछाड/बलात्कार सारखे गुन्हे घडतात असे एक ऑब्जेक्शन वर घेण्यात आले आहे,
अनिरुद्ध यांनी त्यांच्या किल्ल्यावर/किल्ल्याबाहेर दारू पिण्याच्या अनुभवा वरून त्या आक्षेपावर काही बोलावे असे मी सुचवतो.

सिंबा, ते लिखाण अनिरुद्ध.. यांच्या वर्जिनल आयडीने केले असावे. पण आयडी बदलायचा राहुन गेल्याने फसगत झाली असावी.

अनिरुद्ध यांनी त्यांच्या किल्ल्यावर/किल्ल्याबाहेर दारू पिण्याच्या अनुभवा वरून त्या आक्षेपावर काही बोलावे असे मी सुचवतो.
Submitted by सिम्बा on 19 June, 2018 - 14:43
<<

@सिंम्बा,

सुवर्ण दुर्ग किल्ल्याच्या परिसरात फक्त आमचे सारखे स्थानिक लोक जाऊनच मद्य/चिकन मटण खाऊ शकतात, इतर सामन्य पर्यटकांना ते शक्य नाही.

शिवाय सुवर्ण दुर्ग हा डोंगरी वा भुईकोट किल्ला नसून तो एक जलदुर्ग आहे, स्थानिक कोळी लोकांकडून होडी मिळाल्याशिवाय त्यावर जाणे शक्यच नाही. आणि जर का होडीवाल्याला दारु पिल्याचा वा बाळगल्याचा जरा जरी संशय आला तर तो होडीत पाऊल देखिल टाकू देणार नाही. तेंव्हा तुमचे वरचे धेडगुजरी लॉजिक दुसर्‍या कोणाला तरी ऐकवा.

हर्णे मध्ये सुवर्णदुर्गा शिवाय चार अन्य जमीनी किल्ले आहेत तिथे दारु सोडाच, गैरवर्तणुक करण्यास काय शिक्षा मिळते ते एकदा येऊन पहा. वर त्यात स्थानिक, पर्यटक असा भेदभाव देखील करत नाहीत.

र का होडीवाल्याला दारु पिल्याचा वा बाळगल्याचा जरा जरी संशय आला तर तो होडीत पाऊल देखिल टाकू देणार नाही. >>>>>
बाबौ,
तुम्ही जाता तसे स्वत:च्या होडीने जाऊन दारू पिणारे लोक , दारू न पिता तिकडे फिरणाऱ्या पर्यटक बाया बापड्या आणि किल्ल्याचा सुनसान परिसर याबद्दल बोलतोय मी,

>>>>>>हर्णे मध्ये सुवर्णदुर्गा शिवाय चार अन्य जमीनी किल्ले आहेत तिथे दारु सोडाच, गैरवर्तणुक करण्यास काय शिक्षा मिळते ते एकदा येऊन पहा. वर त्यात स्थानिक, पर्यटक असा भेदभाव देखील करत नाहीत.>>>>>
याचा काय संबंध? तुम्ही सुवर्णदुर्गावर जाऊन दारू पिता ना? मांसाहार पण करता मग हे सिंहगडावर केले तर तुमचा विरोध का?

याचा काय संबंध? तुम्ही सुवर्णदुर्गावर जाऊन दारू पिता ना?
नवीन Submitted by सिम्बा on 19 June, 2018 - 19:00
<<

तुम्हाला वाचता कमी येते का हो ?
मी कुठे लिहिलेय सुवर्णदुर्ग किल्यात जाऊन आम्ही दारु व मासमच्छी खातो म्हणून? हे म्हणजे मुंबईच्या सिद्धीविनायक मंदिराच्या बाजूच्या इमारतीत कोणी दारु, मासमच्छी खाल्ली तर त्याला तू मंदिरात बसूनच दारु प्यायली असे म्हणण्यासारखे आहे.

मी फक्त इतकेच लिहिलेय कि सुवर्णदुर्ग किल्याच्या आसपास जो विस्तिर्ण तासलेला कातळ पसरला आहे त्यावर बसून आम्ही आमचा कार्यक्रम करतो व कार्यक्रम संपल्यावर तिथे नेलेला सर्व ऐवज समुद्राला अर्पण न करता परत घरी येऊन कचर्‍याच्या डब्यात टाकतो.

बाकी सगळेच लोक आमच्या इतकी सुज्ञ थोडीच असतात म्हणून गडकिल्ल्यांवर सरसकट नॉनव्हेज शिजवून खायला व दारु प्यायला बंदी असावी नाहितर विशाळगडा प्रमाणे इतर सर्व गडांचा उकिरडा होईल.
----

"कार्यक्रम संपल्यावर तिथे नेलेला सर्व ऐवज समुद्राला अर्पण न करता परत घरी येऊन कचर्‍याच्या डब्यात टाकतो. "

==> एक्झ्याक्टली. अब आया ना उंट पहाड के नीचे. याची सक्ती करावी ना मग सर्वाना. खाण्यापिण्याच्या बंदीची काय गरज?

"सगळेच लोक आमच्या इतकी सुज्ञ थोडीच असतात..."

==> असे प्रत्येकालाच वाटते

==> एक्झ्याक्टली. अब आया ना उंट पहाड के नीचे. याची सक्ती करावी ना मग सर्वाना. खाण्यापिण्याच्या बंदीची काय गरज?
<<

मग तुमच्या सारखी लोक त्यावर ही धागा काढतील. मुळात सार्वजनिक स्वच्छतेची काळजी किती लोकांना असते हे दिसतेच आहे. भारत सरकारच्या 'स्वच्छता अभियान'ची जी लोक खिल्ली उडवतात असल्या लोकांना कचरा करु नका, स्वच्छता ठेवा वगैरे सांगणे हे दगडावर डोके आपटून घेण्यासारखे आहे म्हणून ज्या गोष्टींनी कचरा होतो अश्या गोष्टींवर बंदी घालणेच योग्य आहे.

सिंहगडावर जाऊन नॉनव्हेज खाण्याकरता तुमचा इतका जीव चाललाय तर घरी नॉनव्हेज बनवून, ते डब्यात भरुन घेऊन जाऊन, तिथे खा की, कोण अडवणार आहे तुम्हाला ? गडावरच शिजवून खायचा हट्ट कश्याला ?

Pages