सिंहगडवर (व इतर गडांवर सुद्धा?) मांसाहारास बंदी कशासाठी?

Submitted by इनामदार on 1 June, 2018 - 13:28

काही दिवसांपूर्वी सिंहगडवर गेलो होतो. यापूर्वी काही वर्षांपूर्वी गेलो होतो तेंव्हा तिथे परिस्थिती वेगळी होती. आता खूप सकारात्मक बदल झाले आहेत. स्वच्छता, डागडुजी, रस्ते वगैरे. बदल नक्कीच स्वागतार्ह आहे. पण त्याचबरोबर एका गोष्टीचे कोडे उलगडले नाही. गडावर पूर्वी मांसाहारी जेवण मिळायचे ते आता बंद केले आहे. मद्यपान बंदी एकवेळ समजू शकतो. आपल्याकडे बरेचसे पब्लिक दारू पिली कि आरडाओरडा, शिवीगाळी, बाटल्या फोडणे तसेच अन्य घृणास्पद कृत्ये करतात ज्याचा इतर पर्यटकांना प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष त्रास होऊ शकतो.

पण मांसाहाराने काय घोडे मारले आहे? त्यावर बंदी कशासाठी? कचरा म्हणावा तर तो अन्य खाण्यापिण्याने पण होतोच आहे गडावर. मांसाहाराने थोडा अधिक होईल इतकेच. तिथे मी विचारणा केली असता "गडाचे पावित्र्य अबाधित राहावे म्हणून" वगैरे उत्तरे मिळाली. अरे म्हणजे इतिहासातील ज्या वीर पुरुष व पराक्रमी योद्धा असलेल्या महान विभूतींमुळे हा गड पवित्र स्थान बनले आहे ते लोक मांसाहार करत नव्हते शाकाहारी होते असे म्हणावयाचे आहे का? नरवीर तानाजी मालुसरे असोत वा खुद्द शिवछत्रपती असोत. पराक्रमी योद्धे होते. मांसाहार तर करतच होते. मग तिथे येणाऱ्यानी मांसाहार केला तर पावित्र्य बिघडण्याचे काय कारण? थोडीतरी तर्कसंगती आहे का ह्या बंदीला? नक्की कोण आहेत या बंदिमागे?

थोडा मागोवा घेतला तेंव्हा लक्षात आले एक "शिवाधिन दुर्ग संवर्धन संस्था" म्हणून आहे (जसे काय गड किल्ले म्हणजे सरकारची नव्हे तर यांचीच मक्तेदारी) त्यांनी हि बंदीची मागणी व नंतर अंमलबजावणी केली आहे. काही बातम्यांमधून लक्षात आले कि सरकारी यंत्रणा नव्हे तर या संघटनेचे लोकच गुंडगिरी करून मांसाहार करू देत नाहीत. अजून थोडे खोलात जाऊन पाहिले असता लक्षात आले कि हि संघटना म्हणजे देशातील कडव्या हिंदुत्ववादी संघटनांचे पिल्ले आहे हे जाणवले (त्यांच्या फेसबुक पेज व इतर माहितीवरून). गड किल्ल्यांची निगा राखण्यासाठी खरे तर सरकारी यंत्रणा आहे. गड किल्ले कोणाची खाजगी मालमत्ता नव्हे. तरीदेखील गडांवर या खाजगी संघटनेचे वर्चस्व आहे!

काही जण मांसाहार बंदीसाठी वनखात्याच्या नियमाचा आधार घेताना दिसतात. म्हणे वनक्षेत्रात मांसाहार वर्ज्य आहे. अरे पण तसे असेल तर मग इतकी वर्षे वनखात्याने हे सुरु ठेवूच कसे दिले असते?

आणि मग सगळी मेख लक्षात आली.

मांसाहाराचे वावडे ना राजाला होते ना मावळ्यांना. मांसाहार न करणारे आहेत ठराविक हिंदुत्ववादी. त्यांना आवडत नाही म्हणून त्यांनी तो "अपवित्र" ठरवून त्यास गडांवर बंदी घातली असे समजायला बक्कळ वाव आहे. म्हणजे सरळ सरळ धार्मिक दहशत. बाकी काही नाही. (शिवाय याचा साईड इफेक्ट म्हणून "राजांना मांसाहार वर्ज्य होता म्हणूनच आजही गडांवर मांसाहारास बंदी आहे" असे अजून पाच पन्नास वर्षांनी कोणतरी एखादा भुक्कड कवी/शाहीर लिहून जाऊ शकतो हा भाग वेगळाच).

कुणाची काय काय मते आहेत यावर?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

फारएण्ड, उत्तम समतोल प्रतिसाद.
mi- anu , मांसाहारामुळे खरेच अधिक कचरा होतो का आणि तो बायोडीग्रेडेबल नसतो का? कारण वनस्पतींमधली कांद्याची साले, मक्याच्या कणसाची आवरणे या गोष्टी जमिनीत जिरायला खूप वेळ घेतात हे पाहिले आहे. तसेच लिग्निन, पेक्टिन, सेल्युलोज या वनस्पतिज द्रव्यांनाही जमिनीत पूर्ण मिसळण्यास वेळ लागतो हे माहीत आहे. मांसाहारातल्या रेम्नंट्सनाही मातीत मिसळण्यास वेळ लागतो का? आणि कोंबडीसारख्या लहानशा प्राण्यापासून खरेच खूप अविद्राव्य कचरा होतो का? बकऱ्याच्या हाडांची पूड करून कंपोस्ट करता येत नाही काय?
वरील प्रश्न खऱ्याखुऱ्या कुतूहलातून विचारले आहेत.

माहीत नाही हो मला.
आमच्या कंपोस्ट बिन च्या मॅन्युअल मध्ये मांस अवशेष आणि डेअरी अजिबात टाकू नका असे लिहिलेय.म्हणून मांस कचरा कचऱ्याच्या डब्यात टाका लिहिले.
बाकी तो बायो डिग्रेड होत असेल तर तोही कंपोस्ट मध्ये ढकलून द्यायला काही हरकत नाही.आम्ही अंड्याची साले एकदम चुरडून चुरा करून टाकतो.
बाकी मक्याच्या कणसाचा साचा, वाळके शहाळे, कांदे साल, कलिंगड साल यांना कंपोस्ट व्हायला वेळ लागतो.पण या गोष्टी मोठ्या प्रमाणात साध्या कचऱ्यात टाकणेही कचरा पटकन फुल झाल्याने वैतागाचे ठरते.
व्हरलपुल(मला हा शब्द आहे तसा लिहिता येत नाही) ने एक कंपोस्टर काढलाय.त्यात काही टाकले की आपोआप कल्चर मिसळून 24 तासात खत तयार वगैरे.
खरं तर एक हाय पॉवर कंपोस्ट श्रेडर एन्ट्री ला, पुढे आपोआप उलट पालट करणारा मकॅनिझम आणि याचबरोबर भरपूर छिद्रे आणि सूर्यप्रकाश ही फास्ट मल्चिंग ची कृती.पण विजेचा खर्च वाढेल, श्रेडर चा उपयोग लोक डेड बॉडी वगैरे नाहीशी करायला करतील अश्या भित्या आहेत.
अगदी हे श्रेडर वाले प्रकरण थोडा खर्च करून हिंजवडी केपीआयटी बाहेर सोमवारी रवी आठवडा बाजाराचा कचरा असतो त्यावर वापरता आले तरी भरपूर आहे.

आपण ज्या प्राण्यांच्या हत्या करतो त्यांचे शिव्याशाप त्या ठिकाणी वावरत असतात. तसेच रक्तामुळे त्या त्या ठिकाणची अस्तित्त्वं आकर्षित होतात. त्यामुळेच जुने लोक सांगायचे मांस , मच्छी घेऊन रस्त्याने लांब जाऊ नका. कुठल्याही गडावर युद्ध, शिक्षा यामुळे हत्या झालेल्या असतातच. हा कॉमन सेन्स आहे. त्यामुळे तिथे हत्या नकोत किंवा मांस, मच्छी नकोतच. हे असं उलगडून सांगायची वेळ येऊ नये पुन्हा.

जुने लोक सांगायचे मांस , मच्छी घेऊन रस्त्याने लांब जाऊ नका. >>>>>>>

200 मिटर वर एक मीट शॉप असेल तर लोकांवर मांस, मच्छी घेऊन लांब जायची वेळ येणार नाही.

सिम्बा, आत्ताच त्यांनी इतक्या महत्वाचं कारण सांगूनही तुम्ही पुन्हा २०० मीटरवर मीट शॉप हवं म्हणताय? किती वेळा सांगायला लावाल कॉमन सेन्सच्या गोष्टी?

अहो दर 200 मिटर वर दुकान नसेल तर मांस मच्छी घेऊन लांब जायला लागेल,
त्या रस्त्यात काही अस्तीत्व आकर्षित झाली तर Happy

दुकानातून घेऊन जाणे वेगळं. त्यासाठीच ते काळ्या पिशवीतून नेतात. काळ्या रंगामुळे अस्तित्वं आकर्षित होत नाहीत असे म्हणतात. पण अलिकडे वाढलेले आजार, लोकांचे तिरसट आणि राक्षसी स्वभाव पाहता काळी पिशवी अडथळा करत असेल असे वाटत नाही.

सॉरी,
i resign __/\__
तुमचे चालू द्या

जाता जाता,
राष्ट्रपती सदन असलेली रायसीना हिल्स भाग एकेकाळी स्मशान होता म्हणे, म्हणूनच भारताची अशी अवस्था असावी का?

आहे होय अनेकांचा विश्वास? मला असं काही असू शकेल ह्याची कल्पनाही नव्हती. कॉमन सेन्स नाही हो, दुसरं काय?!

अहो पण समजा टपरी काळ्या रंगाची बांधून त्यात शिजवलं तर? काळे बेंच, काळा रंग हा ड्रेसकोड ठेवला तर?

मी कुठल्याही प्राण्याची हत्या करत नाही. स्वच्छ केलेलं तयार मांस विकत घेतो आणि मसाल्याचं कव्हर करून खातो. त्या कवरातून लहरी येत नाहीत सायो हा तरी कॉमन सेन्स आहे की नाही तुला?
ट्राय करतेस का जिफ पाठवू? (धमकी नाही हो! ) पूर्वज त्यात मसाले टाकायचे ते आत्माराम येऊ नये म्हणूनच.
रेअर स्टेक खायला धजावताच नाही हो मन. हा!! सुशी मात्र अपवाद. म्हणुनच तर सुशीला (ला हा प्रत्यय आहे. फाको करून वि.भ.न.) वसबीत बुचकळून खावे. चवीचा धसका, आत्म्याला ठसका! (सौ. फ्लेक्स रायटर अमित)
सांगायचा मुद्दा काय? लागायचं असेल ते पाप खाटकाला लागू दे हा सोपा विचार ठेवून चाललं तर आपल्याला पाप लागत नाही.

अमित Lol
काय हो मधुरांबे, मायबोलीवर जन्माला येऊन १७ च तास झाले आणि अनुल्लेख वगैरे जमतंय की.

व्हेज माणसांचे आत्मे पनीर, कॉर्न वगैरे बघून पण विचलित होतात का. काळ्या पिशव्या वापरणेच बेस्ट असेल मग.

संपूर्ण चर्चा वाचली, मी सिंहगडावर जेव्हा जातो तेव्हा १०,१५ पावलावर असणारे सगळेच विक्रेते डोकं आउट करतात. शाकाहार तेवढा चांगला, शाकाहाराने कचरा होतच नाही, शाकाहारासोबत दारू घेतली तर उलटी होईल, किंवा शाकाहारासोबत दारू पिउच शकत नाहीत असे म्हणणाऱ्यांना खरंच सांगावेसे वाटते, एकतर तुम्ही अतिशयच मठ्ठ आहात, किंवा स्वच्छतेच्या पांघरुणात गुंडाळून ठराविक विचार लोकांच्या गळी उतरवण्याचा प्रयत्न करत आहात.

उपाय:
२ शाकाहारी, २ मांसाहारी हॉटेलं असावीत, ठरावीक अंतरावर अश्या जिथे लोकांना भूक लागण्याची शक्यता जास्त असेल ( पार्किंग पाशी, आणि गड चढून झाल्यावर)
दारूला नक्कीच बंदी असावी. दारू पिण्याचे समर्थन कदापि शक्य नाही. तुम्ही दारू पिऊन गोंधळ घाला की नका घालू. माणसाचं माकड करणारं द्रव्य आहे ते, इतर कोठेही मनसोक्त प्या. बंदी करावी आणि ती पाळण्याची जबाबदारी सरकारची. बाकी कोणत्याही फालतू, भिकार, आणि दहशतवादी संघटनांना ज्यात अगदी मेंदू दोन तास साबणाच्या पाण्यात बुडवून ठेवून नंतर व्यवस्थित धुवून नंतर पुन्हा फिट केलेले कार्यकर्ते असतात, त्यांना टोटल मज्जाव करावा.

आणि मधुरांबे, मी हा प्रतिसाद काळ्या फॉन्ट मध्ये लिहितोय, आत्म्याची बाधा वगैरे नाही ना होणार? मायबोलीवर देखील अनेक अमानवीय अस्तित्वे आहेत, तर इथे एखादा यज्ञ करता येईल का ऑनलाइन? बामणाची दक्षिणा +१११ लिहून दिली तर चालेल का?

पण महाराजांच्या वास्तव्याने ही सगळी महाराष्ट्रभू पवित्र झालेली असताना गडच काय पण महाराष्ट्रात कुठेच मांसाहार करू नये, हे योग्यच आहे.

"काय हो मधुरांबे, मायबोलीवर जन्माला येऊन १७ च तास झाले"

--> त्यांच्या प्रतिक्रिया आणि मायबोलीवरचे वय पाहता ते याच धाग्यावर पूर्वी मुद्दे मांडून गेलेले कोणीतरी असावेत असे वाटते. मूळ मुद्दे संपल्याने दुसरा आयडी घेऊन आता असले काहीतरी थातूरमातूर मांडून धागा भरकटवता येतो का पाहत आहेत Happy असो.

मधुरांबे, तुम्ही सक्षात धडधडीत खोटं बोलता आहात. तुम्ही इथे फक्त ट्रोलिंग साठी आला आहात हे पटकन कळतंय.

सत्य हे आहे की आत्मे काळ्या रंगाकडे आकर्षित होतात
१) आत्मा कावळ्याच्या रुपात पिंडाला शिवतो कारण कावळा काळा असतो
२) आत्मे रात्री जास्त अ‍ॅक्टीव होतात कारण रात्री अंधार असतो आणि अंधार काळाच असतो
३) नवरा मेल्यानंतर त्याचा आत्मा बायकोच्या काळ्या केसात घुटमळु नये म्हणुन केशवपनाची शास्त्रिय प्रथा आपल्या सर्वोच्च संस्कृतीत आहे. म्हणुनच काळे मणी असलेले मंगळसुत्र विधवेने घालु नये
४) युनेस्कोने नोबेल प्राईस दिलेले जर्मन शास्त्रज्ञ Schnemidt यांनी मुळ संस्कृत भुर्जपत्रांचा अभ्यास करुन लिहिलेला ग्रंथ याप्रकरणी चिंतनीय आहे.

तेव्हा प्लिज खोट्या अंधश्रद्धा पसरवणे थांबवा.

आत्मा आणि काळा रंग हा विषय या धाग्यावर अवांतर असल्यामुळे माझ्याकडुन लेखनविराम.

इनामदार,
3 4 पाने चांगली चर्चा झाली,
तसेही माबो वरच्या कोणत्याच चर्चेत एकमत कधीच होत नाही,
आता धाग्यावर थोडी गम्मत केली तर चालेल काय?

"आता धाग्यावर थोडी गम्मत केली तर चालेल काय?"

--> चर्चा नकीच चांगली झाली. धन्यवाद सर्वांचे Happy जसे आधी मी सांगितलेच कि निर्णय प्रश्नांकित करून त्यावर उहापोह होणे हाच उद्देश होता. बाकी सुरु राहू द्या. माझी तरी काहीच हरकत नाही. आत्मे वगैरे मुद्द्यांबाबत बाबत म्हणत असाल तर गांभीर्याने विश्वास ठेवणारे पण काही लोक आहेत. रेडीट वर तर एका महोदयांनी अजून भलतेच मत मांडले आहे. त्यांच्या मते:

चिकनचे तुकडे दरीत टाकल्याने तिथे असणारे पक्षांना फुकट खायची सवय लागली होती. ती बंद व्हावी म्हणून हा निर्णय घेतला. तसेच चिकन खाण्यापूर्वी बियर मागवली जात असे म्हणून हे सगळे बंद केले:

https://www.reddit.com/r/pune/comments/8cun6h/vegonly_menu_at_sinhagad_f...

आता ह्यापेक्षा गमतीशीर इथे अजून कोण मांडू शकेल का Happy

पक्षी फक्त चिकन खात होते का? आणि मग बिअर कोण मागवत होते?

असो, सह्याद्री मध्ये जे अनेक किल्ले आहेत त्यावर काहीही खाण्यापिण्याची सोय नसते पण तरीही तिथे कचऱ्याचे ढीग साचत चालले आहेत. आणि या कचऱ्यात प्रामुख्याने बियरच्या बाटल्या, वेफर्स ची पाकिटे, गुटख्याची पाकिटे आणि प्लॅस्टिक बाटल्या याचा समावेश आहे.
कित्येक किल्ले हे मद्यपीचे अड्डे आहेत आणि या तथाकथित संस्कृती रक्षकांपैकी कोणीही आशा ठिकाणी त्यांना रोखायला फिरकत नाही.
हरिश्चंद्रगड गडावर प्लास्टिक प्लेट आणि बाटल्या याचा इतका कचरा झाला की वनविभागाने तिथली सगळी हॉटेल बंद करून टाकली. शेवटी मग सामोपचाराने ट्रेकर त्यांचे प्लेट्स घेऊन येतील आणि दुकांदारही स्टील प्लेटमध्ये खायला देतील असे ठरले आहे.
प्लिज नोट, त्या गडावर देवस्थान असल्याने फक्त शाकाहारी जेवण मिळते तरीही कचऱ्याची प्रचंड मोठी समस्या आहे आणि तिथल्या पुष्करणी मध्ये दारूच्या बाटल्यांचा प्रचंड खच सापडला आहे.

तात्पुरता अण्णुलेख ब्रेक : टवाळीनने मला फरक पडत नाही. ते जर्मन पुस्तक काळं की गोरं ते मला माहीत नाही. दोन तीन स्युडो पुरोगामी जमले की टिंगल टवाळी शिवाय आणखी काही होत नाही. मी काही सनातन नाही. पण ज्या गोष्टींचे अनुभव आले आहेत ते नाकारून कसे चालेल?

गडावर अनुभव येणे ही आश्चर्याची गोष्ट नाही. खासगीत मान्य आहे पण सोशल मीडियात उगीच पुरोगामी नास्तिक दाखवण्यासाठी मुद्दाम उलटे लिहायचे हा खोटारडेपणा आहे. दुसऱ्यावर खोटे आरोप केले तर देव बघत असतो.

मोबाईल वरून इतकेच.

जुने लोक खोटे बोलतात का? पूर्वी वस्ती कमी असताना अनेक अनुभव यायचे. आमच्या मित्राच्या भावकीत आजोबांच्या चु. भावाला सायकलवरून मटण घेऊन येत्ना चखवा लागला होता.

तरी विश्वास नसेल तर माझे काही जात नाही. खुशाल अभक्ष्य न्या गडावर. जर काही विपरीत अनुभव आला तर कुणी सांगितले नाही म्हणून ओरडू नका. मला तर आताच चेहरा डोळ्यासमोर येऊन चिंता वाटते.

Pages