सिंहगडवर (व इतर गडांवर सुद्धा?) मांसाहारास बंदी कशासाठी?

Submitted by इनामदार on 1 June, 2018 - 13:28

काही दिवसांपूर्वी सिंहगडवर गेलो होतो. यापूर्वी काही वर्षांपूर्वी गेलो होतो तेंव्हा तिथे परिस्थिती वेगळी होती. आता खूप सकारात्मक बदल झाले आहेत. स्वच्छता, डागडुजी, रस्ते वगैरे. बदल नक्कीच स्वागतार्ह आहे. पण त्याचबरोबर एका गोष्टीचे कोडे उलगडले नाही. गडावर पूर्वी मांसाहारी जेवण मिळायचे ते आता बंद केले आहे. मद्यपान बंदी एकवेळ समजू शकतो. आपल्याकडे बरेचसे पब्लिक दारू पिली कि आरडाओरडा, शिवीगाळी, बाटल्या फोडणे तसेच अन्य घृणास्पद कृत्ये करतात ज्याचा इतर पर्यटकांना प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष त्रास होऊ शकतो.

पण मांसाहाराने काय घोडे मारले आहे? त्यावर बंदी कशासाठी? कचरा म्हणावा तर तो अन्य खाण्यापिण्याने पण होतोच आहे गडावर. मांसाहाराने थोडा अधिक होईल इतकेच. तिथे मी विचारणा केली असता "गडाचे पावित्र्य अबाधित राहावे म्हणून" वगैरे उत्तरे मिळाली. अरे म्हणजे इतिहासातील ज्या वीर पुरुष व पराक्रमी योद्धा असलेल्या महान विभूतींमुळे हा गड पवित्र स्थान बनले आहे ते लोक मांसाहार करत नव्हते शाकाहारी होते असे म्हणावयाचे आहे का? नरवीर तानाजी मालुसरे असोत वा खुद्द शिवछत्रपती असोत. पराक्रमी योद्धे होते. मांसाहार तर करतच होते. मग तिथे येणाऱ्यानी मांसाहार केला तर पावित्र्य बिघडण्याचे काय कारण? थोडीतरी तर्कसंगती आहे का ह्या बंदीला? नक्की कोण आहेत या बंदिमागे?

थोडा मागोवा घेतला तेंव्हा लक्षात आले एक "शिवाधिन दुर्ग संवर्धन संस्था" म्हणून आहे (जसे काय गड किल्ले म्हणजे सरकारची नव्हे तर यांचीच मक्तेदारी) त्यांनी हि बंदीची मागणी व नंतर अंमलबजावणी केली आहे. काही बातम्यांमधून लक्षात आले कि सरकारी यंत्रणा नव्हे तर या संघटनेचे लोकच गुंडगिरी करून मांसाहार करू देत नाहीत. अजून थोडे खोलात जाऊन पाहिले असता लक्षात आले कि हि संघटना म्हणजे देशातील कडव्या हिंदुत्ववादी संघटनांचे पिल्ले आहे हे जाणवले (त्यांच्या फेसबुक पेज व इतर माहितीवरून). गड किल्ल्यांची निगा राखण्यासाठी खरे तर सरकारी यंत्रणा आहे. गड किल्ले कोणाची खाजगी मालमत्ता नव्हे. तरीदेखील गडांवर या खाजगी संघटनेचे वर्चस्व आहे!

काही जण मांसाहार बंदीसाठी वनखात्याच्या नियमाचा आधार घेताना दिसतात. म्हणे वनक्षेत्रात मांसाहार वर्ज्य आहे. अरे पण तसे असेल तर मग इतकी वर्षे वनखात्याने हे सुरु ठेवूच कसे दिले असते?

आणि मग सगळी मेख लक्षात आली.

मांसाहाराचे वावडे ना राजाला होते ना मावळ्यांना. मांसाहार न करणारे आहेत ठराविक हिंदुत्ववादी. त्यांना आवडत नाही म्हणून त्यांनी तो "अपवित्र" ठरवून त्यास गडांवर बंदी घातली असे समजायला बक्कळ वाव आहे. म्हणजे सरळ सरळ धार्मिक दहशत. बाकी काही नाही. (शिवाय याचा साईड इफेक्ट म्हणून "राजांना मांसाहार वर्ज्य होता म्हणूनच आजही गडांवर मांसाहारास बंदी आहे" असे अजून पाच पन्नास वर्षांनी कोणतरी एखादा भुक्कड कवी/शाहीर लिहून जाऊ शकतो हा भाग वेगळाच).

कुणाची काय काय मते आहेत यावर?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सर्व पुरोगाम्यांना नम्र विनंती,
आपला वेळ या प्रतिगामी लोकांवर वाया घालवू नका,
त्यांना त्यांच्या मरणाने मरु द्या.
मांसाहाराचा आणि पावित्र्याचा संबंध नाही हे समजणारे बरेच लोक अस्तित्वात आहेत हे पाहून छान वाटले.
एव्हरी थिंग इस नॉट लॉस्ट (yet) Happy

पुण्यामध्ये कितीकितीकितीकितीकितीकिती थोर लोकांनी रक्त सांडले. पुण्यामध्ये मांसाहारास ताबडतोब बंदी करायला पाहिजे.

"अशा आडबाजूच्या ठिकाणी किंवा आउटिंगला निघाल्यावर (मुलं मुलं असतात तेव्हां) शकक्यतो दारू आणि मांसाहार प्रिफर केला जातो....... आणि ब-याचदा अशा मंडळींकडून (नेहमीच नव्हे) बलात्काराच्या घटना घडतात."

==> इतकी दशके सिंहगडावर लाखो लोकांनी आजवर चिकन मटन खाल्ले असेल, त्यातले काहीजण तुम्ही म्हणता तसे खाण्याआधी दारूपण प्यायले असतील. पण अशा किती घटना तिकडे घडल्या आहेत हो? काही संख्याशास्त्रीय माहिती? निदान माझ्या तरी वाचनात/ऐकण्यात एकही नाही. त्याशिवाय, बहुतांश बलात्कार हे जवळच्या वा माहितीतल्या व्यक्तीकडून होतात असे सर्वेक्षण आहे. जरा गुगल करून पहा. अनेक तज्ञांनी सुद्धा ते ग्राह्य धरले आहे. तुम्ही सांगितलेल्या सिनारो (मुले मुले जातात आणि दारू पिवून तिथल्या आजूबाजूच्या मुलींवर बलात्कार करतात) मध्ये किती प्रमाणात शक्य आहे ते? बलात्कारामागे लैंगिक असमाधान हे कारण असते. मांसाहर किंवा दारू नव्हे.

बालात्कारामागे लैंगिक असमाधान हे कारण असते. >> अजिबात नाही! बलत्कार ही विकृती आहे. लैगिक असमाधानाचे शमन करायला इतर बरेच मार्ग आहेत.

काय च्या काय.. पुणे आडबाजूला आहे की किल्ला आहे? पुण्यात तुम्ही बारा हंडी खाल्ली काय आणि हडळीने झपाटले काय.. कुणाला वेळ आहे पहायला?
सिंहगडावर पण गोश्त खा आणि मग तैमूरलंगच्या खवीसाने कुस्ती खेळत हाडे मोडली तर रडू नका मोदीजींच्या नावाने

"अजिबात नाही! बलत्कार ही विकृती आहे."

==> अहो विकृती असमाधानातूनच जन्माला येते ना (पुढची लेवल म्हणा हवे तर). समाधानी व्यक्ती थोडेच विकृत बनेल?

सिंहगड डेरा इथे एक कपल आडबाजूला बसले होते. तेव्हा पाचसहा जणांच्या टोळीने मुलीवर बलात्कार केला होता. मुलगा पळून गेला ही बातमी गाजली होती. 95 - 96 साली. त्यामुनंतर परिसरातल्या मुलांनी गस्त सुरू केली होती.

माहिती नसेल तर विचारावे. नाही विचारायचे तर माझे काही जात नाही..

तुम्हाला घेरा सिंहगड म्हणायचे आहे का, ते डेरा म्हणल्यामुळे मला एकदम डेरा सच्चा सौदा ची आठवण होऊन पंजाबच्या आठवणीने डोळे पाणावले.

रच्याकने, तो कोण बाबा होता ज्याने इतक्या बायकांवर अत्याचार केले तिकडेही मांसाहार, दारुकाम अगदी जोरात चालत असेल ना?

जोपर्यंत कोंबडीच्या किंवा बकरीच्या नशेत तरुणांनी धिंगाणा घातला किंवा महिलांची छेड काढली अशी बातमी वाचत नाही तोवर मांसाहारचा विरोध करणाऱ्या लोकांचा निषेध

>>माहिती नसेल तर विचारावे. नाही विचारायचे तर माझे काही जात नाही>> मधुरांबे, तुम्हांला कित्ती काय काय माहिती आहे हो. पण ह्या लोकांना त्याची काही कदरच नाही मेली. तुम्ही स्वतंत्र बीबी काढून ज्ञानदान का नाही करत? म्हणजे नाही विचारायचे तर माझे काही जात नाही, मी परत सांगणार नाही टाईप वाक्य लिहिण्यात वेळ वाया जायचा नाही.

>>>का हो राव पाटील , या ज्या कुणी विदुषी होत्या त्या गेल्या सहा महीन्यात होत्या का ? तुम्ही सहा महीन्यांचे आहात म्हणून विचारले. की अभिमन्यूप्रमाणे शिकून आलात ?<<<
मायबोलीवर जन्म घेण्याआधी माझा आत्मा साधारण ५ वर्ष इथंच घुटमळत होता. म्हणून बरंच काही माहिती आहे इथलं. अवतार घेण्यास जरा दिरंगाई झाली बाकी काही नाही. रच्याकने, तुमचा कितवा अवतार आहे?

सायोजी, पर्सनल का होताय ? तसे न करताही जमेल की. बघा प्रयत्न करून.

घेरा डेरा - वृक्षाला घेरेदार म्हणतात की डेरेदार ?

>>>माहिती नसेल तर विचारावे. नाही विचारायचे तर माझे काही जात नाही<<< जात काढून धागा भरकटवण्याचा प्रयत्न होतोय!

<अभक्ष्य हा शब्द मांसाहारासाठी वापरलेला मला अगदीच पटत नाही. ज्या लोकांना ऋचा स्फुरल्या, ज्यांनी रामायण महाभारतासारखी काव्ये रचली, शाकुंतलसारखी नाटके रचली, गीतांजलीसारखे जगप्रसिद्ध काव्य रचले आणि नोबेल पुरस्कार मिळवला, याच पुरस्काराचे भारतीय वंशाचे मानकरी अमर्त्यसेन, हरगोबिंद खुराना या सर्वांसाठी जे भक्ष्य, किंबहुना स्वत: श्री छत्रपती शिवाजी महाराजांसाठी जे भक्ष्य, ते इतरांसाठे अभक्ष्य आणि अपवित्र कसे? अग्नीच्या साक्षीने बलीपशूचे मांस सोमरसाबरोबर भक्षण करून जश्न (यज्ञ) करण्याची, आनंद साजरा करण्याची प्रथा अतिरेकी आणि सक्तीच्या पशुहत्येमुळे त्याज्य ठरली. पण अपवित्र नाही ठरू शकत. अतिरेक कुठेही होऊ नये. तेच मांसाहारबंदीलाही लागू आहे.>
हीरा, प्रतिसाद पटला आणि आवडला.

घेरा म्हणजे किल्ल्याची व्याप्ती,
याचा घेर किती मोठा आहे या अर्थाने
घेरा सिंहगड म्हणजे सिंहगड किल्ल्याचा परिसर, त्याची कक्षा

मला घेर हा शब्द स्त्रियांच्या पोषाखासाठी राखीव वाटला. डेरेदार मधला डेरा म्हणजे झाडाचा घेरच ना ? शब्द तर बरोबर आहे ना ?

नाही, डेरा म्हणजे रांजण आणि डेरेदार वृक्ष म्हणजे गोलाकार, रांजण आकारातील झाड. शक्यतो वड, पिंपळ, आंबा
बाभूळ कशी डेरेदार आहे असे म्हणत नाहीत
घेरा हा आकारमान दर्शवतो
उदा. साडीचा घेर किती आहे?
डेरा हा आकार दर्शवतो
डेरेदार, घाटदार, बाकदार हे सर्व आकार आहेत

चांगली बातमी आहे.
शाकाहार हा आरोग्यासाठी अधिक चांगला आहे हा विचार व अनुमान अलिकडे अनेक फोरम्स वरून पुढे येत आहे. भारतातही व भारता बाहेर देखिल.
प्रतीबंध कायदेशीर आहे वा नाही हा वादाचा मुद्दा असू शकतो.

ताजमहल प्रेमाची निशाणी आहे म्हणतात. प्रेमात तहानभूक लागत नाही म्हणतात. काय आहारच नाही तर शाकाहारमांसाहाराचा प्रश्नच नाय..

राव पाटील हे खरे आहे . ते वरचे घमेले इंडिक मध्ये येतच नाही . मात्र माबोच्या मूळ खिडकीत येते

Pages