सिंहगडवर (व इतर गडांवर सुद्धा?) मांसाहारास बंदी कशासाठी?

Submitted by इनामदार on 1 June, 2018 - 13:28

काही दिवसांपूर्वी सिंहगडवर गेलो होतो. यापूर्वी काही वर्षांपूर्वी गेलो होतो तेंव्हा तिथे परिस्थिती वेगळी होती. आता खूप सकारात्मक बदल झाले आहेत. स्वच्छता, डागडुजी, रस्ते वगैरे. बदल नक्कीच स्वागतार्ह आहे. पण त्याचबरोबर एका गोष्टीचे कोडे उलगडले नाही. गडावर पूर्वी मांसाहारी जेवण मिळायचे ते आता बंद केले आहे. मद्यपान बंदी एकवेळ समजू शकतो. आपल्याकडे बरेचसे पब्लिक दारू पिली कि आरडाओरडा, शिवीगाळी, बाटल्या फोडणे तसेच अन्य घृणास्पद कृत्ये करतात ज्याचा इतर पर्यटकांना प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष त्रास होऊ शकतो.

पण मांसाहाराने काय घोडे मारले आहे? त्यावर बंदी कशासाठी? कचरा म्हणावा तर तो अन्य खाण्यापिण्याने पण होतोच आहे गडावर. मांसाहाराने थोडा अधिक होईल इतकेच. तिथे मी विचारणा केली असता "गडाचे पावित्र्य अबाधित राहावे म्हणून" वगैरे उत्तरे मिळाली. अरे म्हणजे इतिहासातील ज्या वीर पुरुष व पराक्रमी योद्धा असलेल्या महान विभूतींमुळे हा गड पवित्र स्थान बनले आहे ते लोक मांसाहार करत नव्हते शाकाहारी होते असे म्हणावयाचे आहे का? नरवीर तानाजी मालुसरे असोत वा खुद्द शिवछत्रपती असोत. पराक्रमी योद्धे होते. मांसाहार तर करतच होते. मग तिथे येणाऱ्यानी मांसाहार केला तर पावित्र्य बिघडण्याचे काय कारण? थोडीतरी तर्कसंगती आहे का ह्या बंदीला? नक्की कोण आहेत या बंदिमागे?

थोडा मागोवा घेतला तेंव्हा लक्षात आले एक "शिवाधिन दुर्ग संवर्धन संस्था" म्हणून आहे (जसे काय गड किल्ले म्हणजे सरकारची नव्हे तर यांचीच मक्तेदारी) त्यांनी हि बंदीची मागणी व नंतर अंमलबजावणी केली आहे. काही बातम्यांमधून लक्षात आले कि सरकारी यंत्रणा नव्हे तर या संघटनेचे लोकच गुंडगिरी करून मांसाहार करू देत नाहीत. अजून थोडे खोलात जाऊन पाहिले असता लक्षात आले कि हि संघटना म्हणजे देशातील कडव्या हिंदुत्ववादी संघटनांचे पिल्ले आहे हे जाणवले (त्यांच्या फेसबुक पेज व इतर माहितीवरून). गड किल्ल्यांची निगा राखण्यासाठी खरे तर सरकारी यंत्रणा आहे. गड किल्ले कोणाची खाजगी मालमत्ता नव्हे. तरीदेखील गडांवर या खाजगी संघटनेचे वर्चस्व आहे!

काही जण मांसाहार बंदीसाठी वनखात्याच्या नियमाचा आधार घेताना दिसतात. म्हणे वनक्षेत्रात मांसाहार वर्ज्य आहे. अरे पण तसे असेल तर मग इतकी वर्षे वनखात्याने हे सुरु ठेवूच कसे दिले असते?

आणि मग सगळी मेख लक्षात आली.

मांसाहाराचे वावडे ना राजाला होते ना मावळ्यांना. मांसाहार न करणारे आहेत ठराविक हिंदुत्ववादी. त्यांना आवडत नाही म्हणून त्यांनी तो "अपवित्र" ठरवून त्यास गडांवर बंदी घातली असे समजायला बक्कळ वाव आहे. म्हणजे सरळ सरळ धार्मिक दहशत. बाकी काही नाही. (शिवाय याचा साईड इफेक्ट म्हणून "राजांना मांसाहार वर्ज्य होता म्हणूनच आजही गडांवर मांसाहारास बंदी आहे" असे अजून पाच पन्नास वर्षांनी कोणतरी एखादा भुक्कड कवी/शाहीर लिहून जाऊ शकतो हा भाग वेगळाच).

कुणाची काय काय मते आहेत यावर?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मधुर माझे नाव आहे.
वीणावादन म्हणजे काय ? मला उद्देशून काही आहे का ?

चंगळवाद वाढतोय
सिंहगड पुण्याच्या जवळ असल्याने अनेक हौशी पर्यटक येथे हिंडायला येतात. ना त्यांना येथील इतिहास ठाऊक असतो ना समजून घ्यायचा असतो. विकेंडला मस्त कुठेतरी हिंडून येण्यासाठीच सिंहगड निवडला जातो. याचे कारण सिंहगडावर जाण्यासाठी केलेल्या सुविधा. थेट रस्ता वरपर्यंत केल्याने विनासायास अनेक पर्यटक वरती येतात. येथील अभ्यासासाठी, इतिहास समजून घेणारे किती असतात ते देव जाणे. बिनकामाचे हिंडायला येणायांमध्ये एक दिवसाची चंगळ, मजा, पिकनिक, हुल्लडबाजी, नाच, अश्लिल गाणी म्हणत गडावर हिंडताना आम्ही पाहिले आहे. असल्या हवश्या-नवश्या लोकांना आवर कोण घालणार? अशीच काही परिस्थिती मावळातील किल्यांची होत आहे.

खरं तर गडावर जाण्यासाठी करण्यात आलेला रस्ता वनखात्याच्या हद्दीतून जातो. वाढल्या पर्यटकांच्या गाड्यांमुळे येथे उपद्रव वाढतो. प्रदूषणात भर पडते. वाटेत पर्यटकांनी टाकून दिलेल्या पाण्याच्या, मद्याच्या बाटल्या आपल्याला दिसतात. खरे तर हे रस्तेच ताबडतोब बंद करायला हवेत. कशाला आणि कोणाला गड पाहायचाच असेल त्याने जाव चालत. त्याशिवाय त्याची किंमत कळणार नाही. महाराष्ट्रातील अनेक किल्यावर जशी वरपर्यंत जाण्याची सोय नाही. तशीच (गैर)सोय येथे करणे गरजेचे ठरेल.

चार चार तास चालून, चढून गेल्यावर वरती घरून आणलेली पोळी-भाजीचे चार घास घशा खाली ताबडतोब उतरतील. मग
कोणी मासांहाराचा विचार करणार नाही. चमचमीत खायचे असेल तर गडावर येऊन कशाला खायचे? ही भूक हॉटेलातही भागवता येईल. त्यासाठी गडावर जायचे काय काम. बरं मासांहराबरोबरच दारू सुद्धा लागेल मग त्याचीही मुभा सरकारने मंजूर करून द्यायची काय? बर या सोयी पूर्ण केल्यानंतर यानंतर होणारे गैरप्रकार, बलात्कारसारखे प्रकार वाढतील त्याचे काय करायचे?

बरं मासांहर करणे म्हणजे काही वाईट नाही. हे ज्याचा त्याचा प्रश्न. पण मासांहर गडावर करण्याचे समर्थन करणे योग्य नाही. आपल्या पूर्वजांचे रक्त सांडलेल्या गडकिल्यांवर केवळ खाण्यासाठीच जायचे का? मासांहार करणाºयांमुळे गडाची कशी दुर्दशा होते हे पाहायचे असेल तर एकदा विशाळगडाला भेट देणे गरजेचे आहे.

राहता राहिला प्रश्न तेथे ताक, पिठलं, भाकरी विकणायांचा. तर पर्यटक वाढल्यानेच हे उद्योग वाढले. बरं ही कामे करणारे स्थानिक लोकच आहेत. कमवून पोट भरणारे हे गरीब लोक आहेत. त्यांना एकदा नको म्हणून सांगितल्यावर तेही गप बसतात. उद्या गडावर मासांहर सुरू केल्यावर त्यातून होणारा व्याप कोण सांभाळणार.

"मासांहराबरोबरच दारू सुद्धा लागेल मग त्याचीही मुभा सरकारने मंजूर करून द्यायची काय? बर या सोयी पूर्ण केल्यानंतर यानंतर होणारे गैरप्रकार, बलात्कारसारखे प्रकार वाढतील"

===> म्हणजे जिथे जिथे मांसाहार केला जातो तिथे या गोष्टी अपरिहार्य आहेत असे म्हणायचे आहे का आपणास?

म्हणजे जिथे जिथे मांसाहार केला जातो तिथे या गोष्टी अपरिहार्य आहेत असे म्हणायचे आहे का आपणास?

मित्रा,
मासांहाराने दारू व त्यानंतर बलात्कार असा काही प्रकार नाही.
मात्र,
गडावर सुनसान प्रदेश असतो. गडाचा विस्तार मोठा असतो, जंगल, झाडीझुडपे जास्त असतात. अशा ठिकाणी असले प्रकार घडू शकतात.

Ferfatka,
तुम्ही मागची पाने वाचली आहेत काय?
तुम्ही मांडलेल्या मुद्द्यावर चर्चा झाली आहे

सिम्बा

तुम्ही फेरफटका यांचा ब्लॉग वाचलाय का?

गड व इतर पर्यटन स्थळांविषयी अतिशय महत्त्वाची माहिती व चित्रे तिथे तुम्हाला सापडतील.

http://ferfatka.blogspot.com/

तेव्हा त्यांनी जे काही मत व्यक्त केले आहे त्यामागे त्यांचा अनुभव व अभ्यास असणार.

<मासांहराबरोबरच दारू सुद्धा लागेल>

पुन्हा तेच? त्या पालथ घडा ताई कुठे गेल्या?

पण जिथे वनखात्याचा अधिकारीच अशी स्पष्टीकरणे देतो, तिथे दाद कुणाकडे मागणार.

मांसाहार न करणार्‍यांच्या मेंदूची सारासार विचारक्षमता कमी असते, असा निष्कर्ष काढावा काय?

फेरफटका तुमच्याशी टोटली सहमत.

इनामदार, फेरफटका यांची दुसरी, आताची पोस्ट एकदम बरोबर आहे. याला कारण माझा प्रत्यक्ष अनूभव. आम्ही नासिकला रहात असलो तरी माझ्या मामाकडे पुण्यात दर उन्हाळ्यात यायचो. एकदा मी व माझी मामेबहीण ( नेहेमी मामेभाऊ आणी इतर मैत्रिणी बरोबर असायच्या) दोघीच जणी पर्वतीवर फिरायला गेलो. पर्वती घराजवळच असल्याने दुपारी ३ वाजता चढायला सुरुवात केली, मग तासाभरात रमत गमत, उठत बसत वर पोहोचल्यावर सर्व फिरुन झाल्यावर परत येणार तोच एक दोघा-तिघांचे टोळके आमच्या मागे येऊ लागले. त्यांच्या लक्षात आले की या दोघीच आहेत, बाकी मोठे कोणी नाही. मी त्यावेळी परीक्षा संपवुन १० वीत गेले होते, तर बहिणीने १० ची परीक्षा दिली होती.

आम्ही जाऊ तिथे हे मागे यायचे., मोठमोठ्याने हसत, कमेंटस करत, गाणी म्हणत होते. शाळांना नुकतीच सुट्टी लागल्याने फारशी वर्दळ पण नव्हती. २ -३ जोडपी आणी एक चार- पाच जणांचे कुटूंब फिरत होते. आणी भितीने ( घरच्यांच्या व अनोळखी लोकांची काय मदत मागणार या विचाराने) कोणाला काही सांगीतले नाही. शेवटी बहिणी ने पर्वतीच्या मागुन ( आडवाटेने डोंगरावरुन ) खाली जायचा निर्णय घेतला. कसेबसे धावत पळत, आम्ही पर्वती मागच्या साईडने उतरलो. आणी घरी पळत सुटलो. आमच्या घरी अजूनही कोणाला ही घटना माहीत नाहीये, नाहीतर माझ्या मामाने मग आम्हा दोघींना घरा बाहेर पाय पण ठेऊ दिला नसता इतका मामा कडक होता.

ही घटना, २५ वर्षापूर्वीची. मग आता काय? त्यावेळी लहान असल्याने आम्हाला काहीच सुचले नव्हते. आणी हिंंमत पण नव्हती.

मी नॉनव्हेजच्या विरुद्ध नाही, कारण घरात मी सोडुन इतर लोक खातातच. पण फेरफटका यांनी आज खरच माझ्या मनातले लिहीलेय.

बरं झालं ब्लॉगचा उल्लेख झाला. त्यांच्य ब्लॉगवर शेवटच्या परिच्छेदात खंत या शीर्षकाखाली त्यांनी बर्‍याच गोष्टींबद्दल लिहिलंय. पण त्यात मांसाहाराचा उल्लेख दिसला नाही.
गडावर जाणार्‍यांकडून १०० रुपये पर्यावरण हानी/उपद्रव शुल्क घेतले जाते, अशी माहिती मात्र दिसली.

"गडावर सुनसान प्रदेश असतो. गडाचा विस्तार मोठा असतो, जंगल, झाडीझुडपे जास्त असतात. अशा ठिकाणी असले प्रकार घडू शकतात."

==> यात मद्यपानाचा वाटा असणे शक्य आहे. म्हणून त्यावर बंदी समजू शकतो असे मी धाग्यात लिहिले आहेच. पण मांसाहार असले कि मद्यपान येते ह्या थियरीशी बिलकुल असहमत. फक्त मद्यपानास सक्त बंदी करता येते. यावर आधीच चर्चा झालेली आहे.

@रश्मी.. : आपला अनुभव कटू आहे पण ह्यात मांसाहाराचा काय संबंध लक्षात आले नाही.

<मी नॉनव्हेजच्या विरुद्ध नाही, कारण घरात मी सोडुन इतर लोक खातातच. पण फेरफटका यांनी आज खरच माझ्या मनातले लिहीलेय.>

फेरफटका यांनी लिहिलंय : "बरं मासांहराबरोबरच दारू सुद्धा लागेल . यानंतर होणारे गैरप्रकार, बलात्कारसारखे प्रकार"

हेच तुमच्या मनात होतं का? तुमच्या घरचे पण असंच करतात का?

मयेकर, तुम्ही म्हणता ते मान्य असले तरी प्रॉब्लेम हा आहे की मांसाहारासोबत माफक प्रमाणात ड्रिंक्स घेऊन मन व तन शाबुत ठेवणे हे मोजक्याच लोकांना जमते. पण या सोबत पैशाची आणी मस्तीची धुंदी चढली तर बड्या बापांची धेंडे असतात ना त्यांना हा तो सावरता येत नाही. म्हणूनच पावसाळ्यात कितीही रमणीय असला तरी फॅमिली घेऊन आजकाल माळशेज घाटात लोक जाईनाशी झालीत. तीच अवस्था अंबोली धबधब्याची, तिथे धबधब्याखाली दाऊ पीत काही जण विवस्त्र होऊन नाचत होते, धिंगाणा करत होते. हे काही वर्षापूर्वीच घडले होते.

प्रश्न दारु वा मांसाहाराचा नाहीये, तर ही नवतरुणाई आहे ना की ज्यांना कुठलेही एटिकेट्स व मॅनर्स सांभाळता येत नाहीत. या लोकांमुळेच ही वेळ आलीये.

बिपिनचंद्र,
मी फेरफटका यांनी लिहिलेल्या मांसाहार-दारू- छेडछाड या लिंक बद्दल सांगितले,
हा मुद्दा मागेच चर्चिला होता, आणि तशी काही लिंक आहे हे कोणी दाखवू शकले नाही. चर्चा त्याच त्याच मुद्द्यांवर फिरत राहायला नको म्हणून मी त्यांना सांगितले.
इतकेच

दारू ला विरोध आहेच, गडावर जाणारे जे चेक पॉईंट्स आहेत तिकडे तपासणी करून दारू (इनफॅक्ट प्लास्टिक च्या कोणत्याही वस्तू) वर घेऊन जायला मनाई करायला हवी.

मी नॉनव्हेजच्या विरुद्ध नाही, कारण घरात मी सोडुन इतर लोक खातातच. पण फेरफटका यांनी आज खरच माझ्या मनातले लिहीलेय.>
फेरफटका यांनी लिहिलंय : "बरं मासांहराबरोबरच दारू सुद्धा लागेल . यानंतर होणारे गैरप्रकार, बलात्कारसारखे प्रकार"
हेच तुमच्या मनात होतं का? तुमच्या घरचे पण असंच करतात का?
नवीन Submitted by कृत्तिका on 6 June, 2018 - 20:55
>>>>>>>>>>> Proud

@ कृत्तिका, तुमच्या मनातली विकृती तुमच्या जवळच ठेवा. हे तुमच्यासारखीला शेवटचे व पहिले उत्तर. तुम्ही बाई आहात की पुरूष आय डी मला माहीत नाही. कारण तुमच्या प्रोफाईल मध्ये ना तुम्ही बाई दिसता न पुरुष कारण बाई असता तर असली खालच्या थराची विधाने केली नसतीत. आणी इथले पुरुष पण असली विधाने करत नाहीत, तुम्ही भलतेच दिसता.

. बाय द वे, कृत्तिका बाई/ दादा , माझ्या घरातले लोक असले नाहीत, तुमच्या असु शकतात.

मा. अ‍ॅडमीन, मी नाईलाजाने या कृत्तिका आय डीला असे जशास तसे उत्तर दिले आहे. ही माझी इथली शेवटची पोस्ट. मायबोलीवर असले वै. हल्ले चढवणरे उथळ लोक पण येतात किंवा येऊ शकतात हे लक्षातच आले नाही.

इनामदार, अहो मद्यपानाला विरोध नाही. किंवा मांसाहाराला पण नाही. मी माझ्या शेवटच्या पोस्ट मध्ये तसे लिहीले आहे. बर्‍याच लोकांना, त्यातल्या त्यात जो तरुण वर्ग १८ ते ३० च्या दरम्यानचा आहे, असे लोक थ्रिल म्हणून गडावर जातांना बरोबर हे घेऊन जातात आणी इतरस्त्र कचरा करुन छेड छाड पण करतात. काही वर्षापूर्वी आमच्या ऑफिसची ट्रिप पन्हाळा येथे गेली होती. आम्ही निघतांना आमच्या नंतर आलेल्या एका दुसर्‍या सहलीतल्या लोकांनी गडावर फिरतांना बिअरचे कॅन, तंदूरी चिकन चा उरलेला भाग, अल्युमिनीअम फॉईल्स, वेफर्स इत्यादी सर्व खाली गवतात फेकले होते. आमच्या ऑफिस मधल्या दोन सिनीअर ऑफिसर्सनी आरडा ओरडा केल्यावर मग खाली उतरुन ते परत गोळा करुन एका पिशवीत टाकुन घेऊन गेले. जातांना सुद्धा आमच्या कडे बघत हसत हसत गेले. जणू काही ते आमची जिरवणारच होते.

रश्मी, मांसाहार करणार्‍यांना दारू लागतेच. आणि दारू प्याले की ते बलात्कारही करतात, अशा अर्थाचं एक विधान फेरफटका यांनी केलंय.
तुम्ही तुमच्या पोस्टमध्ये सुरुवातीलाच लिहिलंय की मी फेरफटका यांच्याशी टोटली सहमत आहे.
आता ते विधान तुमच्या घरच्या मंडळींनाही लागू होतं का ? असं विचारल्यावर तुम्हाला राग आला.
मग जे मांसाहारी आहेत, त्यांना त्या विधानाबद्दल साधं वाईटही वाटू नये का?

पुन्हा एकदा वाचून पहा. मांसाहार-> दारू-> बलात्कार असा सर्वसामान्य कार्यक्रम/ घटनाक्रम असतो का?

हा धागा गडावरच्या मांसाहारबंदीबद्दल आहे. तुम्हाला आलेल्या वाईट अनुट्वातले लोक मांसाहार आणि मग मद्यपान करून आले होते आणि त्यामुळेच ते तसं वागत होते का?

भारताच्या जनगणनेच्या अहवालानुसार ७०% भारतीय मांसाहारी आहेत (किंवा निव्वळ शाकाहारी नाहीत). असं हा लेख म्हणतो. त्यात मांसाहाराचं गुन्ह्याशी असलेलं गुणोत्तर मांडलं आहे.

गणित विषयाप्रमाणे काय थिअरी लावलेय? आऊटिंगला गेलेल्या मंडळींकडून मोस्टली अभक्ष्य भक्षण आणि अपेयपान हा कॉंबो प्राफर केला जातो.
कोबीची भाजी आणि लिंबू सरबत असा कॉंबो ( बॅचलर्स) सहसा पाहण्यात नाही.
यात रूल्स कशाला पाहिजेत उगीचच

प्रश्न दारु वा मांसाहाराचा नाहीये, तर ही नवतरुणाई आहे ना की ज्यांना कुठलेही एटिकेट्स व मॅनर्स सांभाळता येत नाहीत. या लोकांमुळेच ही वेळ आलीये. >> रश्मी.. तुम्ही आधी हे नक्की करा की प्रॉब्लेम काय आहे. एकदा दारू आणि मांसाहारामुळं म्हणता मग नंतर नवतरूणाई म्हणता..

चार चार तास चालून, चढून गेल्यावर वरती घरून आणलेली पोळी-भाजीचे चार घास घशा खाली ताबडतोब उतरतील. मग
कोणी मासांहाराचा विचार करणार नाही. >> Lol काहीही लॉजिक

तेव्हा त्यांनी जे काही मत व्यक्त केले आहे त्यामागे त्यांचा अनुभव व अभ्यास असणार. >> तो अभ्यास वरच्या त्यांच्या वाक्यात दिसून येतोय Happy

पण भजी /काजू/चीज/शेंगदाणे/वेफर्स/मसाला पापड/ काकडी/गाजर चकती/ चिवडा/शेव/फरसाण आणि दारू हे कॉम्बो हिट असते ना?

जर मुदलात दारू बॅन झाली तर बाकीच्या पदार्थांमुळे लोक वाह्यातपणा करतील असे म्हणण्यात काय हशील आहे?

एक clarification: ते वर उल्लेख झालेले ferfatka आणी मी, वेगवेगळ्या व्यक्ती आहोत. Happy

माझं वैय्यक्तिक मत, खाण्या-पिण्याचा, वागण्याशी, धर्माशी वगैरे काहीही संबंध नसतो असं आहे. बाकी सार्वजनिक अस्वच्छता, बेशिस्तपणा आणी बेमुर्वतपणा हे वैय्यक्तिक अवगुण आहेत. गड-किल्ले वगैरे मस्त पर्यटनस्थळं करून, त्यांचं सौंदर्य वर्धापन करून, सर्व सोयी देवून, छान रेव्हेन्यू कमवावा.

आणि एकीकडे दुर्ग संवर्धन करा म्हणायचे, गडांवर जाण्यासाठी रोप वे बांधायचे,
आणि दुसरीकडे वनखात्याच्या क्षेत्रातून गडावर जाणारे रस्ते बंद करा म्हणायचे यातले लॉजिक मला कळले नाहीये

Pages