मैत्री भाग - 18 {अंतिम भाग}

Submitted by ..सिद्धी.. on 29 April, 2018 - 10:42

आधीच्या भागांसाठी खाली दिलेल्या लिंकवर जा......

भाग-1
https://www.maayboli.com/node/65783

भाग-2
https://www.maayboli.com/node/65793

भाग-3
https://www.maayboli.com/node/65800

भाग - 4
https://www.maayboli.com/node/65807

भाग - 5
https://www.maayboli.com/node/65818

भाग - 6
https://www.maayboli.com/node/65825

भाग - 7
https://www.maayboli.com/node/65829

भाग - 8
https://www.maayboli.com/node/65844

भाग - 9
https://www.maayboli.com/node/65853

भाग - 10
https://www.maayboli.com/node/65859

भाग -11
https://www.maayboli.com/node/65867

भाग -12
https://www.maayboli.com/node/65871

भाग - 13
https://www.maayboli.com/node/65878

भाग - 14
https://www.maayboli.com/node/65890

भाग - 15
https://www.maayboli.com/node/65901

भाग - 16 https://www.maayboli.com/node/65906

भाग - 17
https://www.maayboli.com/node/65931
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
मागील भागात:-
महंतांनी सांगितल्याप्रमाणे मीराने रोहनचा आत्मा कैद असलेली ती गवताची जुडी पटकन आपल्या ताब्यात घेतली. युद्ध संपलं होतं. पुन्हा एकदा चांगल्या शक्तींनी वाईट शक्तींना पराभूत केलं होतं ...पण तरीही एक शेवटचं महत्त्वाचं काम बाकी होतं...
आता इथून पुढे...
●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●|
महंतांनी तिथलं सर्व सामान आवरलं..जांभळ्या रंगाची ती पूड गोळा करून पुन्हा पिशवीत भरली..एक मंत्र म्हणून त्यांनी त्या पूजा केलेल्या ठिकाणी अभिमंत्रीत जल शिंपडलं..मीराकडनं घेतलेल्या गवताच्या जुडीला एक लाल रंगाचा धागा बांधून एका डबीत ती काळजीपूर्वक ठेवली. महंत त्या माळरानावरनं निघाले..इतक्या वर्षांनी त्या माळरानाची अघोरीच्या तावडीतून सुटका झाली होती...पौर्णिमेच्या दिवशी त्या दुष्टाचा विनाश झाला होता..काही वेळा पूर्वी भयानक दिसणारं माळरान चंद्राच्या शीतल प्रकाशाने जिवंत झालं होतं.. वार्याची एक मंद झुळूक महंतांना स्पर्श करून गेली...महंतांनी विध्वंसक शक्तींच्या शापतून त्या भागाची मुक्तता केली... महंतांच्या मंत्रप्रभावामुळे ते माळरान सकारात्मक ऊर्जेने ओतप्रोत भरलं..महंत नेहमीप्रमाणे आत्मविश्वासाने घरी आले. विजयाचं हास्य त्यांच्या चेहेर्यावर झळकत होतं. पहाटे पाच वाजेपर्यंत ते सर्वांना वृत्तांत सांगत होते. ते ऐकणार्यांसाठी हे नक्कीच अमानवीय होतं ..पण महंतांनी स्वतः ते अनुभवलं होतं..न डगमगता ; सर्वांची काळजी घेऊन त्यानी वाटेतले एक मोठा अडसर दूर केला होता. सकाळी संजनाला हाॅस्पिटलमधून फोन आला.समीरची तब्येत झपाट्याने सुधारत होती. काही तासातच बरीच रिकव्हरी झाली होती. त्या अघोरीबरोबर त्याच्या सर्व शक्तींचा विनाश झाला होता..

त्या दिवशी दुपारी दोन वाजता महंत उठले. स्नान आटपून त्यांनी घरातल्या सगळ्यांना एकत्र बोलावून आपण काय कामासाठी जात आहोत हे सांगितलं आणि ते निघाले...

महंत गावाबाहेरच्या स्मशानात आले .. त्यानी तिथे एका छोट्या कुंडात आग पेटवली. काही मंत्र म्हणून त्यांनी ती गवताची जुडी हातात घेतली . त्या दिवशी गुरूंनी सांगितलेले काही मंत्र म्हटले. त्यामुळे काळपट निस्तेज पडलेली ती जुडी सोनेरी रंगाने उजळून निघाली. महंतांनी त्यावर अभिमंत्रीत जलाचा शिडकावा केला. त्यानंतर घड्याळात बघून त्यांनी ठरलेल्या मुहूर्तावर ती जुडी बरोब्बर मधोमध मोडली. आणि त्या अग्निकुंडात टाकली. दोन मिनीटांनी एक छोटासा स्फोट झाला आणि एक पांढरी आकृती त्यांना वेगाने आकाशात जाताना दिसली. हेच महंतांना अभिप्रेत होतं.अखेरीस रोहनच्या आत्म्याला मुक्ती मिळाली..नंतर त्यांनी मीराला दिलेल्या वचनाप्रमाणे तिचे आभार मानून तिलाही या जगातून मुक्त करून अनंताच्या प्रवासाला पाठवून दिलं. रात्री आठ वाजता महंत घरी आले. सगळी महत्वाची कामं मार्गी लागली होती. पण अजूनही राजेशला धडा शिकवायचा राहीलेला.

दुसर्या दिवशी सकाळी राजेशच्या घरची बेल वाजली. त्याच्या आईने दार उघडलं तर इन्सपेक्टर इनामदार दारात दोन हवालदारांसह उभे होते. राजेशच्या अटकेचं वाॅरंट त्यांच्याकडे होतं..त्याच्या पापांचा घडा आता भरला होता. आधीच्या इन्सपेक्टर साहेबांची बदली झाली होती. त्यांच्या जागी आता इनामदार आले होते. लाच देणार्यांना आणि घेणार्यांना त्यांच्या लेखी अजिबात माफी नव्हती.. त्यांच्या याच निष्कलंक प्रतिमेसाठी ते प्रसिद्ध होते.. राजेशची कुठलीच नाटकं आता चालणार नव्हती..त्याचा गुन्हा त्याने मान्य केलेल्याच्या व्हिडीयो क्लीप्स संजनाने त्यांच्याकडे जमा केलेल्या.
त्या दिवशी कड्यावर जवळच्या पिंपळाच्या झाडावर गावातल्या एका तरूणाला बसवून तिने सगळं रेकाॅर्ड करायला सांगितलेलं..त्याला भरपूर पैसे देऊन त्याचं तोंड तिने बंद केलेलं..तिला राजेशवर काडीचाही विश्वास नव्हता..जो माणूस आपल्या स्वार्थासाठी दुसर्याचा जीव घेऊ शकतो तो अजून कुठल्याही नीच पातळीला उतरू शकतो. हे तिला माहिती होतं ..त्यामुळे तिने आणि समीरने मिळून केलेला तो प्लॅन होते..त्यात फक्त रोहन दिसत नव्हता..पण राजेशने गुन्हा कबूल केल्याचं मात्र सरळसरळ दिसत होतं..राजेश आता चांगलाच जाळ्यात अडकला होते. नंतर सोहमलाही अटक झाली..त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला . कारखान्यावरही कारवाई झाली ...

तीन दिवसांनी समिधा ; संजना आणि महंत पुन्हा मुंबईत यायला निघाले. या वेळी त्यांनी सगळं काम बिनचूकपणे पार पाडलं होतं... समिधाने मैत्रीचं नातं निवडलं होतं..केलेली मैत्री तिने पूर्ण निभावली होती ..मैत्रीच्या नात्याचा आज खर्या अर्थाने विजय झाला होता...

समाप्त..

--- आदिसिद्धी

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त जमलाय हा शेवटचा भाग. कायम उत्सुकता होती, पुढे काय होणार याची. एकंदर कथा मस्त जमलीय. पुलेशु.

छान झाला शेवट . तुझ्या लिखाणाचा वेगही खुप छान आहे . पुढील लिखाणासाठी खुप खुप शुभेच्छा .

Chan shewat. Khup Chan continuity maintain thewlit tyamule shewat paryant interest tikun rahila. Sarva lekhakani asech karawtat. Pudhil Katha lawkar wavhayla milel hi apeksha . Dhanyavad..

@आदिसिध्दी
मागील भागात अघोरीशी संघर्ष पोर्णीमेला आणि रोहनला मुक्ती आमावस्येला असा उल्लेख आहे. तसे इथे दिसले नाही. कथालेखनात कंटिन्युटी राखणे आवश्यक ठरते. (कदाचित इथे माझा मागील भागावरील प्रतिसाद उपयोगी ठरेल)
पुढील लेखनासाठी खुप खुप शुभेच्छा.

@ पाफा काका तुमचा प्रतिसाद नक्कीच उपयोगी ठरेल पुढील लेखनात.. रोहनला मुक्ती त्याच पौर्णिमेच्या दुसर्या दिवशी आधीच गुरूंनी सांगितल्याप्रमाणे मिळाली...जर त्या दिवशी ते झालं नसतं तरच सात वर्षांनी येणार्या अमावस्येपर्यंत थांबावं लागलं असतं... धन्यवाद

*** मागच्या भागात सुरूवातीच्या पॅरात बदल केलेत..

वा मस्तच...शेवट गोड झालाय...छान कथा आहे...आता मिस करणार...रोज एक भाग वाचायची सवय झाली होती...

तुला पुढील लेखनासाठी खूप खूप शुभेच्छा...