मैत्री भाग - 10

Submitted by ..सिद्धी.. on 19 April, 2018 - 12:43

आधीच्या भागांसाठी खाली दिलेल्या लिंकवर जा....

भाग-1
https://www.maayboli.com/node/65783

भाग-2
https://www.maayboli.com/node/65793

भाग-3
https://www.maayboli.com/node/65800

भाग - 4
https://www.maayboli.com/node/65807

भाग - 5
https://www.maayboli.com/node/65818

भाग - 6
https://www.maayboli.com/node/65825

भाग - 7
https://www.maayboli.com/node/65829

भाग - 8
https://www.maayboli.com/node/65844

भाग - 9

https://www.maayboli.com/node/65853
●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●
मागील भागात

बाबाने राजेशकडनं सकाळी घेतलेली माती आणि गवताच्या काड्या मागून घेतल्या.काही मंत्र म्हणून कसली तरी पूजा केली. स्वतःकडची एक पांढरी पूड मातीत मिसळली. नंतर त्याने राजेशला माती परत देऊन एक मंत्र सांगितला आणि जिथे विध्वंस घडवायचाय तिथे जाऊन एक कृती करायला सांगितली.गवताच्या काड्या मात्र स्वतःकडे ठेवल्या. त्याला पैसे देऊन दोघे त्या निर्जन भयप्रद ठिकाणाहून निघाले. जाताना त्यांना त्या झाडाखाली बसलेल्या अघोरी बाबाचं गडगडाटी हास्य ऐकू आलं.....

आता इथून पुढे...

●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●
    ते ऐकून हास्य ऐकून राजेशच्या अंगावर सरसरून काटा आला. त्यांनी चालण्याचा वेग वाढवला आणि पटकन गाडीत येऊन बसले. कोणीच कोणाशी बोलत नव्हतं.
शेवटी राजेशनेच शांततेचा भंग करत सोहमला विचारलं;" हा करेल ना रे सगळं नीट. मला बघूनच भीती वाटतेय याची. तुला कसं कळलं आणि याच्याबद्दल?"

सोहम म्हणाला;"पंचक्रोशीतला प्रसिद्ध अघोरी बाबा आहे हा. अनेक वर्ष साधना करून त्याने मोठमोठ्या शक्तींना आपल्या अधिपत्याखाली आणलय. त्याच्या सामर्थ्यावर तू शंका घेऊच नको. कालभैरवाचा गाढा उपासक आहे तो."

रात्री पावणे तीन वाजता ते घरी आले . "आता उशीर झाला तर तू आज इथेच रहा."  असं राजेशने सोहमला सुचवलं. सोहमनेही ते झटकन मान्य केलं.
गाडी पार्क करताना राजेशने ती पुडी हातात घेतली. तेव्हा त्याला एक विचीत्र अनुभूती झाली. कुठल्या तरी अदृश्य शक्तीचं अस्तित्व जाणवलं. घरी आल्यावर त्याने ती पूडी कपाटात काळजीपूर्वक ठेऊन दिली.

दुसर्या दिवशी सकाळी राजेश लवकर उठला. गावाबाहेरच्या वस्तीतून त्याने रोहनच्या आई आणि बहीणीला शोधून काढलं. त्यांना घेऊन तो निघाला. वाटेत फोन करून त्याने सोहमलाही बोलवून घेतलं आणि मुंबईच्या दिशेने मार्गाक्रमण केलं. खरं तर आधी त्या दोघीही यायला तयार नव्हत्या. शेवटी राजेश त्यांना समिधाच्या घरी घेऊन गेला. तिथे त्याने सगळी कथा त्यांना सांगितली . समिधाच्या घरच्यांनीही त्याला दुजोरा दिला. तेव्हा कुठे दोघी यायला तयार झाल्या.

दहा तासांच्या कंटाळवाण्या प्रवासानंतर ते एकदाचे मुंबईत पोहोचले.  ते येणार याची आधीच कल्पना असल्यामुळे समीर त्यांना घ्यायला आलेला. घरी आल्यावर सगळ्यांनी त्यांच स्वागत केलं. समिधा  आणि संजनाही दिसल्या त्याला. बराच वेळ गप्पा मारल्यावर समीर त्यांना घर दाखवायला घेऊन गेला. नंतर फ्रेश होऊन सगळ्यांच जेवण झाल्यावर प्रत्येक जण आपापल्या खोलीत झोपायला गेला.

रात्री सव्वा दोनच्या सुमारास राजेशच्या मोबाईलवर सोहमचा मेसेज आला. राजेश लगेच उठला. त्याने त्याच्या बॅगेतून एक छोटीशी डबी काढली. मोबाईलच्या प्रकाशात पायर्या चढत तो टेरेसवर आला. हळूच दार उघडून आत आला आणि दार आड करून घेतलं. टेरेसच्या मध्यभागी उभं राहून त्याने एकवीस वेळा मंत्र म्हटला. मग एका कोपर्यात उभं राहून त्याने दुसरा मंत्र म्हणत तीन वेळा थोडी थोडी माती हातात घेऊन फुंकर मारून हवेत उडवली. नंतर शेवटचा एक मंत्र म्हणून तो टेरेसवरनं खाली आला आणि रूममध्ये येऊन झोपला.

सकाळी उठल्यावर सगळ्यांचा निरोप घेऊन सोहम आणि राजेश परतीच्या प्रवासाला लागले. महंत आणि समीरने आधीच ठरवल्याप्रमाणे त्याने रोहनच्या आई आणि बहीणीची जबाबदारी घेतली होती.रोहनच्या बहीणीला तो तिचं राहीलेलं शिक्षण पूर्ण करू देणार होता आणि नंतर त्याच्याच कंपनीत तीला नोकरी द्यायचं त्याने ठरवलेलं.

संध्याकाळी राजेश आणि सोहम घरी पोहोचले.राजेश तसा दुपारपासून अस्वस्थ होता . सोहमच्या ते लक्षात आलं. त्याने त्याला विचारलं
"काय रे ? एवढा कसला विचार करतोयस?"

राजेश चिंतेच्या स्वरात म्हणाला;"अरे  काल रात्रीपासनं आता इतका वेळ झाला तरी काहीच झालं नाहीये. नक्की तो काम करेल ना आपलं. परत जाऊया का त्या बाबाकडे?."

"राजा अरे प्रत्येक गोष्टीला थोडा वेळ लागतो. थोडा वेळ वाट बघ अरे. जर आज काही झालं नाही तर उद्याच आपण त्याच्याकडे जाऊया. चालेल!" सोहम हसत हसत त्याला म्हणाला.

प्रवासाच्या थकव्यामुळे लवकर जेऊन राजेश झोपायला गेला. गाढ झोपेत असताना त्याला मोबाईलच्या रिंगने जाग आली. समिधाचा फोन आलेला.  घाबरलेल्या आवाजात ती म्हणाली;
" राजेश ;अरे समीरचा अपघात झालाय ; एक मिटींग संपवून येताना समोरून येणार्या ट्रकने धडक दिली. ड्रायव्हर जागीच गेला. समीर मात्र गंभीर जखमी आहे. तु इथे येऊन जा ना एकदा."
हे ऐकून राजेशच्या चेहेर्यावर पहिला टप्पा पार केल्यामुळे आनंदाचं खुनशी हास्य पसरलं. सारथ्याचा बंदोबस्त झाला होता.

तिथे वाळलेल्या जंगलात झाडाखाली बसलेल्या अघोरी बाबाला अंतर्ज्ञानाने हे कळलं.. त्याने समाधानाने पुढच्या कामाला सुरूवात केली.
=======================
क्रमशः

--आदिसिद्धी

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त

वा भारीच लिहिलायेस हा भाग. खिळवून ठेवणारा वाटला मला. पुढच्या भागांची उत्सुकता लागलीय. पुलेशु

सगळे भाग एकदमच वाचले आत्ता. कथा छानच. फक्त एकच प्रश्न, राजेश ने कबुलीजबाब दिल्यावर समिधाने कायद्याची किंवा पोलिसांची मदत का घेतली नाही ? खून कबूल केलेल्या माणसाला असेच सोडून दिले ?

रोहननेच त्याला माफ करून फक्त एक जबाबदारी देऊन सोडून दिलं...त्याला त्याच्या गुन्ह्याची जाणीव करून देणं एवढच रोहनला हवं होतं आणि रोहनच्या कुटूंबाची जबाबदारी राजेशने घेणं हेच त्याचं प्रायश्चित रोहनला अपेक्षित होतं..

कथा छान आहे,
पण एक सुचवते ३ भाग मीळुन १ केला तर बर होइल कारण वाचायला घेतली तर लगेच संपते ईतके भाग लहान आहे.

Angelica ; harshraj ; गुगु ; अधांतरी;पलक सर्वांचे धन्यवाद.....