मैत्री भाग - 11

Submitted by आदीसिद्धी on 20 April, 2018 - 13:43

आधीच्या भागांसाठी खाली दिलेल्या लिंकवर जा....

भाग-1
https://www.maayboli.com/node/65783

भाग-2
https://www.maayboli.com/node/65793

भाग-3
https://www.maayboli.com/node/65800

भाग - 4
https://www.maayboli.com/node/65807

भाग - 5
https://www.maayboli.com/node/65818

भाग - 6
https://www.maayboli.com/node/65825

भाग - 7
https://www.maayboli.com/node/65829

भाग - 8
https://www.maayboli.com/node/65844

भाग - 9
https://www.maayboli.com/node/65853

भाग - 10
https://www.maayboli.com/node/65859
●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●
मागील भागात
गाढ झोपेत असताना त्याला मोबाईलच्या रिंगने जाग आली. समिधाचा फोन आलेला. घाबरलेल्या आवाजात ती म्हणाली;
" राजेश ;अरे समीरचा अपघात झालाय ; एक मिटींग संपवून येताना समोरून येणार्या ट्रकने धडक दिली. ड्रायव्हर जागीच गेला. समीर मात्र गंभीर जखमी आहे. तु इथे येऊन जा ना एकदा."
हे ऐकून राजेशच्या चेहेर्यावर पहिला टप्पा पार केल्यामुळे आनंदाचं खुनशी हास्य पसरलं. सारथ्याचा बंदोबस्त झाला होता.

आता इथून पुढे...

●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●
राजेश सकाळी लवकर उठला. त्याने सोहमला आल्या आल्या येऊन भेटायला सांगितलं .त्याच्या  आवाजात एक आनंद होता. राजेशनेही लवकर आवरलं आणि कारखान्यात गेला. अर्ध्या तासाने केबिनच्या दारावर टक टक झाली. सोहम आत आला. "काय रे काय झालं ? असं अचानक का बोलवून घेतलस मला? काही प्राॅब्लेम आहे का?"

"अरे हो हो !किती प्रश्न विचारशील एका वेळी?  आपली मात्रा बरोब्बर लागू पडलीये!" असं म्हणत राजेशने काल रात्रीचा सगळा प्रसंग सांगितला.

सोहमला आनंदच झाला. तरीही मनाच्या एका कोपर्यात आपण हे चुकीचं वागतोय याची कुठेतरी  त्याला जाणीव होत होती. मनातला तो विचार बाजूला सारत तो म्हणाला;" राजेश , कालच्या दिवशी केलेला उपाय ही सुरूवात होती. आज रात्री महत्त्वाचं काम करायला आपल्याला पुन्हा त्या अघोरी कडे जायचय. रात्री साडेबाराला पूजा सूरू करायचीये. तेव्हा शार्प साडे अकराला तयार रहा. मी घ्यायला येईन. आणि हो पूजा खूप वेळ चालणार आहे."

रात्री लवकर काम आटपून राजेश घरी आला. लगेच जेवण करून जायची तयारी त्याने केली . सोहमही बरोब्बर वेळेत आला आणि ते तिथे जायला निघाले. सव्वा बाराच्या सुमारास ते तिथे पोहोचले. गाडी पार्क करून भाराभर पावलं उचलत ते त्या झाडाखाली येऊन थांबले. तिथे काही त्यांना तो
अघोरी दिसला नाही. दोन मिनीटांनी अचानक एक थंड हवेची झुळूक त्यांच्या मधून गेली. दोघंही घाबरून इकडेतिकडे बघू लागले. तितक्यात झाडामागनं एक तरूणी त्यांच्या पुढ्यात अवतरली.राजेश जागीच खिळून तिचं ते देखणं रूप पाहू लागला. इतकं अफाट सौंदर्य त्याने आतापर्यंत या भूतलावर कधीच पाहीलं नव्हतं. तिने बोलायला सुरूवात केली तेव्हा तर पौर्णीमेचं चांदण पडल्यासारखं वाटलं. तिला अघोरीने पाठवलेलं त्यांना आणायला. सोहमने पायावर पाय देऊन राजेशला भानावर आणलं आणि ते निघाले .राजेश झोपेत चालल्यासारखा तिच्यामागे चालत होता. तिला बघून मेंदूच बंद पडलेला त्याचा. तिच्यापुढे स्वर्गातल्या अप्सराही पाणी भरतील असं त्याला वाटत होतं. चालत चालत ते एका तळघरासारख्या जागेत आले. समोर एकटक बघत चालल्यामुळे राजेश पहिल्याच पायरीवर धडपडला. सोहमनं त्याला धरलं. ती किंचीतशी हसली. शंभरेक पायर्या उतरल्यावर ते तळघरात पोहोचले आणि ती सौंदर्यवती शेवटच्या पायरीवरून कुठेतरी लुप्त झाली. राजेश तिला तिथे वेड्यासारखं शोधू लागला.तेव्हा अघोरीनेच त्याला त्या रूपवतीबद्दल सांगितलं . इतकी सुंदर स्त्री अघोरीच्या आधिपत्याखालचं भूत आहे हे कळल्यावर राजेशच्या आनंदावर विरजण पडलं.
बरोब्बर साडेबारा वाजता पूजा सुरू झाली.  कवट्या ; रक्त ; मांस ; गांजा असं  काय काय सामान समोर होतं .ते बघून राजेशला कसंतरी व्हायला लागलं. आल्यापासून त्याने तळघर पहिल्यांदाच इतकं निरखून पाहिलं होतं. ते बघून त्याच्या अंगावर शहारे आले. समोर ती कालभैरवाची उग्र मूर्ती बघून त्याचं उरलं सुरलं अवसानही गळलं. आता कधी हे संपतय असं त्याला झालं होतं. फक्त काही विधींमध्ये सहभाग असल्यामुळे फक्त त्याचं लक्ष दुसरीकडे वेधलं जात होतं. सोहमही त्याला नजरेने त्याल धीर देत होता. शेवटच्या टप्प्यात अघोरीने राजेशने आधी दिलेल्या गवताच्या काड्यांपैकी तीन काड्याची एक घट्ट जुडी बांधली आणि त्यावर मंत्रप्रयोग सुरू केला. अचानक त्या जुडीत जराशी हालचाल झाली आणि एक मंत्र मोठ्या आवाजात दोघांनी म्हटला. पूजा  संपल्यावर त्याने एक हिरवट रंगाच्या पूडीचा एक तावीज तयार करून त्याच्या दंडावर बांधला. तिथून ते निघाले तेव्हा पहाटेचे चार वाजले होते.

ते दोघे त्या भयाण ओसाड प्रदेशातून चालत बाहेर येत होते. येताना एक टिटवी जोरात आवाज करत त्यांच्या डोक्यावरनं गेली. शांततेचा भंग करणारा तो आवाज ऐकून राजेशच्या काळजात चर्र झालं. शेवटी धावतपळत ते तिथनं निघाले आणि गाडीत येऊन बसले. सोहमने गाडी सुरू केली आणि वेगात ते तिथनं निघाले..

दुसर्या दिवशी दुपारी आपली कारखन्यातली कामं आवरून ते दोघे मुंबईला जायला निघाले. रात्री आठच्या सुमारास ते मुंबईत त्या हाॅस्पीटलमध्ये पोहोचले. समीर अजूनही शुद्धीवर आला नव्हता. त्यांना भेटून ते लगेच तिथनं निघाले. रात्री राजेश ड्रायव्हींग करताना समिधाचा त्याला फोन आला. तीने सांगितलं की समीर च्या तब्येतीत अचानक चढउतार येत आहेत. आता तो अत्यवस्थ झाला आहे. राजेशला कळून चुकलं को तो त्या तावीजाचा परिणाम होता....

क्रमशः
----आदिसिद्धी

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ती लव्हस्टोरी तूच लिही आनंददादा...मला नाही जमायची....तुझ्यात पोटेन्शियल आहे ते....वेल्डिंगवाली लव्हस्टोरी...

हो..आमच्या शाळेत शासनाचा प्री व्होकेशनल कोर्स होता 8वी ते दहावी तीन वर्ष...अजूनही आहे....आर्क वेल्डिंग केलय...गॅस वेल्डिंग नाही केलं कधीच....

आता जरी मला करायला लावले जाॅब तरी करून देईन मी....मजा येते मात्र वर्कशाॅपमध्ये काम करायला....मला इंजिनीयरींगमध्ये काहीच इंटरेस्ट नाहीये...पण हे जाॅब तयार करायला आवडायचं...मैत्रीणींचे पण आवडीने करून द्यायचे मी कितीही दमले तरी....