मैत्री भाग - 13

Submitted by आदीसिद्धी on 22 April, 2018 - 13:33

आधीच्या भागांसाठी खाली दिलेल्या लिंकवर जा......

भाग-1
https://www.maayboli.com/node/65783

भाग-2
https://www.maayboli.com/node/65793

भाग-3
https://www.maayboli.com/node/65800

भाग - 4
https://www.maayboli.com/node/65807

भाग - 5
https://www.maayboli.com/node/65818

भाग - 6
https://www.maayboli.com/node/65825

भाग - 7
https://www.maayboli.com/node/65829

भाग - 8
https://www.maayboli.com/node/65844

भाग - 9
https://www.maayboli.com/node/65853

भाग - 10
https://www.maayboli.com/node/65859

भाग -11
https://www.maayboli.com/node/65867

भाग -12
  https://www.maayboli.com/node/65871
  ●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●
मागील भागात:-

बर्याच वेळाने एक आत्मा रिंगणात प्रकट झाला. नंतर जवळपास दोन तास अखंड मंत्र म्हणत महंत त्या खोलीबाहेर आले. त्यांनी काही विशिष्ट मंत्रांचा उच्चार करत खोलीचं दार लावून घेतलं .त्याला लाल दोरा घट्ट बांधला. उंबरठ्यावर त्यांनी काही चिन्हं काढली. आणि शेवटी पूजा संपन्न झाली.एक मजबूत कुलूप लावून त्यांनी ती खोली कायमची बंद केली. अघोरीने पाळत ठेवायला पाठवलेला आत्मा त्यानी त्या खोलीत कैद केला होतं.

त्या ओसाड जंगलातल्या अघोरीला याचे संकेत मिळाले होते. तो भयंकर चिडला होता.
आता इथून पुढे....
●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●
दुसर्या दिवशी महंतांनी समिधा आणि संजनाला
ताबडतोब बोलावून घेतलं. हाॅस्पिटलमधनं त्या दोघी लगेच आल्या. आल्या आल्या महंतांनी विचारलं;" काल रात्री समीरची तब्येत कशी होती? काही अपाय झाला नाही ना?"
संजना म्हणाली ;"रात्रभर तसा तो बरा होता. अकरा सव्वा अकराच्या सुमारास अत्यवस्थ  झाला. पण दहा पंधरा मिनीटात स्टेबल झाला."

महंतांच्या चेहेर्यावर गंभीर भाव पसरले. ते म्हणाले;
" संजना यापुढे आपल्याला विशेष दक्षता घ्यावी लागणार आहे. आपल्या तोडीस तोड माणूस आपला प्रतिस्पर्धी आहे. त्यामुळे आता इथे राहून आपण त्याच्याशी लढा देणं शक्य नाही . आपल्याला आता तिथे जाऊनच काय तो सोक्षमोक्ष लावावा लागेल. राजेशने एका अघोरस्वामीच्या मदतीने हे सगळं घडवून आणलं आहे. तूर्तास मला काल रात्रीच्या पूजेनंतर आणि काही वेळाच्या साधनेनंतर त्याच्या शक्तीचा साधारण अंदाज आला आहे. लवकरात लवकर उपाय करणं अत्यावश्यक आहे. संजना आणि समिधा तुम्ही दोघीही माझ्यासोबत येणार आहात. शक्य तितक्या लवकर आपल्याला निघावं लागेल. फक्त आता हाॅस्पिटलमध्ये गेल्यावर तुझ्या वडीलांना माझ्याकडे पाठवून दे. काही सूचना द्यायच्यात. "
एवढं बोलून महंत थांबले. "

समिधा महंतांना म्हणाली;" महंत यावेळी मात्र आपण राजेशला सोडायचं नाही. त्याच्यावर कायदेशीर कारवाई व्हायलाच हवी. आपण काय करायचं याची योजना मात्र तुम्ही आणि माझे बाबा मिळून ठरवा. पण आता मात्र त्याला जन्माची अद्दल घडवायची आहे मला."

महंत म्हणाले;" ते बरोबर आहे तुझं. पण आपल्याकडे काहीच पुरावा नाहीये. राजेशने जरी आपल्यासमोर गुन्हा कबूल केलेला असला तरी पोलीसांसमोर करेल याची काय शाश्वती?"

संजनाच्या चेहेर्यावर स्मितहास्य पसरलं आणि ती म्हणाली;"महंत त्याची चिंता करू नका ; ते मी पाहीन...आता लवकर कामाला सुरूवात करूया.."

महंत म्हणाले ;" दुपारी दोन वाजता तयार रहा..आपण लगेच निघणार आहोत. माझीच गाडी घेऊयात...आणि हो संजना आता मी जे तावीज देतोय ते समीरच्या गळ्यात घाल..काहीही झालं तरी ते काढलं गेलं नाही पाहिजे.."

दोन वाजता महंतांच्या घरी त्या दोघी आल्या.तिथूनच ते निघाले. आधीच्यापेक्षा बरंच सामान घेतलं होतं महंतांनी. आणि ते विचार करत करत स्वतःच ड्राईव्ह करत होते. शेवटी एकदाचे ते समिधाच्या घरी पोहोचले. तिथेही दारात पाऊल ठेवताच महंतांना कसलीतरी विचीत्र जाणीव झाली..कालच्या सारखीच. ते लगेच काही म्हणाले नाहीत. पण जेवताना त्यांनी उद्या सकाळी एक पूजा करणार असल्याचं सांगितलं.इथे येण्याचं सगळं कारण कळल्यावर घरचे सगळे अवाक् झाले. समिधाच्या वडीलानी त्यांना परवानगी दिली.

रात्री महंतानी सर्व घरच्यांना काहीवेळ देवघरात बसवलं. एक मंत्र म्हणून घेतला. बाबांना बरोबर घेऊन त्यांनी संपूर्ण घराभोवती अभिमंत्रीत जल शिंपडलं....

क्रमशः

---आदिसिद्धी

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Me roj aaplya kathechya pudhil bhagachi waat pahate. Khup Masta rangliy Katha. Shiway aadhichya Sarwar links taaklyat tyabaddal dhanyavad. Asech lawkar pudhil bhag yeu det

धन्यवाद प्रीती ताई....तुम्ही आणि इतर सगळ्यांनीच आपला काही वेळ देऊन कथा वाचली असेल...त्यामुळे तुम्हा सर्वांना वेळेत कथेचा पुढचा भाग वाचायला द्यायची जबाबदारी नकळत माझ्यावर येते....म्हणून रोज एक भाग टाकते.......मोबाईलचा प्राॅब्लेम असल्याने भाग छोटे आहेत....आणि हो मी वयाने आणि अनुभवानेही तुमच्या इतकी मोठी नाहीये ...त्यामुळे प्लीज एकेरी हाक मारा....

छान चाललीय कथा .
राजेशने अघोर स्वामीने दिलेला ताविज समिरला बांधला होता त्याचे काय झालं ? महंतांना अजून समजलं नाही का ते ?

Sarv bhag ek se badh kar ek aahet...
Me suddha roj tuzya maitri n beauty parlor chya next part chi vaat pahat asate...
Ek prakarchi nasha aahe tumha doghinchya likhanat je sarvana jodon thevtiye tumchya kathanshi ...
Next part plz....

तारीफ के लिये शुक्रीया रोशनी ताई.....एक सुचवू का???...तिच्या ब्युटी पार्लरच्या लेटेस्ट धाग्यावर पण अशी एखादी छानशी पोस्ट टाकता का....मला बरं वाटेल....आणि ती पण पुढचा भाग लवकर लिहील....

आदिसिद्धी, हा भागही भारीच जमलाय. कथा मस्त सुरू आहे. क्षणाक्षणाला उत्सुकता वाटते वाचताना. पुलेशु.

आदिसिद्धी, तु नुकतीच बारावीची परिक्षा दिली आहेस??? तुझ्या लेखनाकडे बघुन वाटत नाही तसं. खरेच ग्रेट आहेस तू. .....