मैत्री भाग - 17

Submitted by आदीसिद्धी on 27 April, 2018 - 14:24

 आधीच्या भागांसाठी खाली दिलेल्या लिंकवर जा......

भाग-1
https://www.maayboli.com/node/65783

भाग-2
https://www.maayboli.com/node/65793

भाग-3
https://www.maayboli.com/node/65800

भाग - 4
https://www.maayboli.com/node/65807

भाग - 5
https://www.maayboli.com/node/65818

भाग - 6
https://www.maayboli.com/node/65825

भाग - 7
https://www.maayboli.com/node/65829

भाग - 8
https://www.maayboli.com/node/65844

भाग - 9
https://www.maayboli.com/node/65853

भाग - 10
https://www.maayboli.com/node/65859

भाग -11
https://www.maayboli.com/node/65867

भाग -12
https://www.maayboli.com/node/65871

भाग - 13
https://www.maayboli.com/node/65878

भाग - 14
https://www.maayboli.com/node/65890

भाग - 15
https://www.maayboli.com/node/65901

भाग - 16 https://www.maayboli.com/node/65906
●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●
मागील भागात:-
तीन तास गुरू महंतांना प्रक्रीया समजावत होते. शेवटी ते म्हणाले
" त्याचा मृत्यू तुमच्याकडून होणं ही त्या सर्वशक्तीमान परमेश्वराची योजना आहे. येत्या पौर्णिमेला पहिलं चंद्रकिरण त्या शस्त्रावर पडताच त्यावरचं कवच दूर होईल. मग त्याचा मृत्यू अटळ आहे...यशस्वी हो!"
गुरूजी अंतर्धान पावले. महंतांनी डोळे उघडले. त्याना प्रसन्न वाटू लागलं. तळघरातून बाहेर येऊन ते वस्तूंसह घरी यायला निघाले.

आता इथून पुढे.....

■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
महंत घरी यायला निघाले. आता त्यांनी अघोरीचा सगळा खेळ संपवायचा असा मनाशी पक्का निश्चय केला होता. संपूर्ण प्रक्रीया माहित असल्यामुळे आता ते निश्चिंत होते. गुरूंचीही साथ लाभल्यामुळे बराच आत्मविश्वास आला होता त्यांना..दोन दिवसांनी पौर्णिमेच्या दिवशी हे विधी करून अघोरीला यमसदनी पाठवायचं होतं..पौर्णिमेच्या दिवशी विधात्याने नेमून दिलेल्या समयी त्याला नेस्तनाबूत करणं आवश्यक होतं...आणि सर्वात महत्वाचं म्हणजे रोहनच्या आत्म्याला गवतांच्या जुडीतून मुक्त करून अनंताच्या प्रवासाला पाठवून द्यायचं होतं..त्या दिवशी ती जुडी हस्तगत करणं महत्वाचं होतं..पौर्णिमेच्या दुसर्या दिवशी ठरलेल्या वेळी ते विधी होणं आवश्यक होतं.. .त्या दिवशी जर ते झालं नसतं तर सात वर्षांनी येणार्या अमावस्येसाठी थांबावं लागलं असतं. त्यामुळे महंतांना जरा टेन्शन आलेलं..दुहेरी जबाबदारी होती त्यांच्यावर.... विचार करता करता ते घरी आले...

दुसर्या दिवशी
रात्री जेवण करून झाल्यावर ते गच्चीत आले. त्यानी मीराला बोलावून घेतलं. दोन दिवसांनी पौर्णिमेच्या दिवशी अघोरीला नेस्तनाबूत करायच्या मोहिमेच्या एका टप्प्यात तिचा महत्त्वाचा वाटा होता. रोहनला मुक्त करणं शेवटी तिच्या हातात होतं . आतापर्यंत तीने लावलेला प्रत्येक बाण अचूक निशाण्यावर लागलेला. आता शेवटची वेळ होती. महंतांनी सगळ्यात आधी तिच्याकडच्या सर्व शक्ती काढून घेतल्या. तिचं अस्तित्त्व जाणवू नये यासाठी एक मंत्र म्हणून तिच्यावर एक निळ्या रंगाची पूड फुंकरली. तिला अचानक तिचं शरीर पिसासारखं वाटू लागलं. महंतांनी तिला स्मरण करायचे मंत्र सांगितले आणि कृतीही समजावून सांगितली. महंतांनीही एकदा गुरूंच सांगितलेलं सगळं आठवलं आणि ते झोपायला गेले. उद्या प्रत्यक्ष कार्यवाही पार पाडायची होती.

अखेरीस तो पौर्णिमेचा दिवस उजाडला. महंत सकाळपासून ध्यानस्थ बसले होते. सगळ्या चांगल्या शक्तीना ते आवाहन करून आपलाया ठायी एकवटत होते. अघोरी नक्कीच त्यांच्यापेक्षा काकणभर सरस होता. पण आजवरच्या इतिहासात नेहमी सत्याचाच चांगल्याच गोष्टींचा विजय झाला होता. महंतांनी निसर्गातल्या सर्व सुष्ट शक्तींना आपल्या मदतीसाठी एकत्र केलं. शेवटी एकदा त्यांनी घरातल्या सर्वांना सूचना दिल्या. समिधा आणि संजनावर घरातल्या सर्वांची जबाबदारी होती. त्यांना धोका नको म्हणून ते घेऊन जाणार नव्हते.

रात्री बरोब्बर अकरा वाजता महंत निघाले. त्यांनी मीरालाही बोलावून घेतलं. तिथे पोहोचण्याआधीच अघोरीला या सर्वाची कुणकुण लागली होती. पण माझ्याइतपत ताकदवर कोणच नाही ह्या भ्रमात तो होता. पण लवकरच त्याच्या भ्रमाचा भोपळा फुटणार होता.

महंत त्या भयानक वातावरणात निर्भीडपणे चालत निघाले. आजूबाजूच्या त्या भयावह गोष्टींचा त्यांच्यावर काडीमात्र फरक पडत नव्हता. अर्जुनाला जसा पक्ष्याचा डोळा दिसत होता तसं त्यांचही एकच ध्येय्य होतं 'अघोरीचा विनाश आणि रोहनची सुटका!'.. ते निग्रहाने पावलं टाकत त्या ठिकाणी येऊन थांबले. एकदा त्यांनी गुरूंच स्मरण केलं. त्यांचे संकेत मिळताच त्यांनी सामान मांडून पूजेला सुरूवात केली. प्रत्येक मंत्र ते खणखणीत आवाजात म्हणत होते. अघोरीही आता चिडला होता. त्यानेही आपल्या शक्तींचा वापर करायला सुरूवात केली. महंतांचा आवाज वाढतच चालला होता. अघोरीने आपल्या दैवताला कालभैरवाला स्मरून महंताना संपवायचा विडा उचलला. सुरूवातीला महंतांनी आपल वर्चस्व प्रस्थापित केलं होतं. पण दैवताच्या स्मरणानंतर हळूहळू अघोरीचं पारडं जड होत चाललेलं. त्याच्या वेगवेगळ्या शक्तींनी त्या विस्तीर्ण माळावर थैमान घातलं होतं. निसर्गाला हा संघर्ष नवीन नव्हता. महंतांची मंत्रांची ताकद हळहळू कमी होत चाललेली. एका क्षणाला महंतांना एक शक्ती मारायला धावली. पण ती महंतांच्या केसालाही धक्का लावू शकली नाही. याचं कारण तो गंध...

काल गुरूंनी महंतांना मंदीरातली एक वाटी दाखवली होती. त्यात वर्षानुवर्षे एक गंध तयार करून ठेवला होता. त्याचं वैशिष्टय होतं की शंभर वर्षापर्यंत तो वाळत नसे. ज्या साधकावर एखादी विशिष्ट कामगिरी सोपवली असेल त्याने तो लावायचा होता. त्यानंतर तो पुन्हा तिथपासून पुढची शंभर वर्षे वाळत नसे. महंतांनी मंदीरातून घेऊन तो गंध आज सकाळी लावला होता. विलक्षण सामर्थ्य होतं त्यात...

महंतांनी विशेष संरक्षण म्हणून सगळ्या सुष्ट शक्तींना रणांगणात उतरवलं. आता सगळ्या चांगल्या आणि वाईट शक्तींमध्ये तुंबळ युद्ध सुरू होतं. एकीकडे महंत आणि अघोरी यांच्या मंत्रोच्चाराने माळरान दुमदुमलं होतं. महंतांना आपली सर्व शक्ती पणाला लावली.महंतांनी मध्येच एकदा गुरूंच स्मरण केलं.

शेवटी एकदाची ती वेळ आली . महंतांनी ते शस्त्र जांभळ्या रंगाचं वर्तुळ आखून त्यात ठेवलं . त्यांनी विशिष्ट मंत्रोच्चार सुरू केले. हळूहळू त्या ठरलेल्या समयी आकाशातून चंद्रकिरणांचा वर्षाव त्या शस्त्रावर होऊ लागला. त्यावरची सगळी रत्न चकाकली.जांभळ्या वर्तुळालाही विलक्षण झळाळी आली. हळूहळू ते शस्त्र पूर्ण उघडलं . तो एक खंजीर होता. महंतांनी मीराला बोलावून घेतलं. तीला नजरेनेच ते शस्त्र उचलायची आज्ञा केली. इथे या सगळ्यापासून अनभिज्ञ अघोरी आपला शेवटचा निर्णायक वार करण्यासाठी त्याच्या अधिपत्याखाली असलेल्या सगळ्यात प्रचंड ताकदवान शक्तीला आळवत होता. मीरा बरोब्बर त्या अघोरीच्या समोर येऊन थांबली. निश्चित झालेल्या वेळी एकदाचा चंद्राचा प्रकाश त्याच्या कपाळावर पडला. गुरूंनी सांगितलेली ती खूण लकाकली. मीराने मनात तो महंतांनी सांगितलेले मंत्र म्हणत संपूर्ण ताकदीनिशी त्या खूणेवर प्रहार केला आणि ती बाजूला झाली. शक्तीचा एक लोळ बाहेर आला आणि एक भीतीदायक किंकाळी ऐकू आली. अघोरी संपला होता.एका पुण्यात्म्याच्या हस्ते त्याचा मृत्यू ही विधात्याने ठरवलेली योजना होती.ती मीराच्या माध्यमातून पूर्ण झाली. त्याच्या शक्तींचाही आवेश हळूहळू कमी होत गेला. महंतांनी सांगितल्याप्रमाणे मीराने रोहनचा आत्मा कैद असलेली ती गवताची जुडी पटकन आपल्या ताब्यात घेतली. युद्ध संपलं होतं. पुन्हा एकदा चांगल्या शक्तींनी वाईट शक्तींना पराभूत केलं होतं ...पण तरीही एक शेवटचं महत्त्वाचं काम बाकी होतं...

क्रमशः
--आदिसिद्धी

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

व्वा भारीच मस्त जमलाय हा भाग. महंत आणि अघोरीमधलं युद्ध समर्पक शब्दांत मांडलं आहेस. उत्कृष्ट वर्णन जमलंय.

धन्यवाद जुई , द्वादशांगुला ; आनंददादा
@आनंददादा..त्यात अजून वाढवण्यासारखं काहीचं नव्हतं...अजून पाणी घालून त्याला झी मराठीची सिरीयल करायचं नव्हतं....नाहीतर मारूतीच्या शेपटीसारखी लांबत गेली असती..... Happy Wink

आदिसिध्दी आजच्या लेखनातील बदलाचा मुद्दा पुढीलप्रमाणे (प्रथम पॅरा)

त्या दिवशी जर ते झालं नसतं तर सात वर्षांनी येणार्या अमावस्येसाठी थांबावं लागलं असतं. त्यामुळे महंतांना जरा टेन्शन आलेलं. विचार करता करता ते घरी आले.

शस्त्रावर चंद्रकिरण पडणे आवश्यक असेल तर ७ वर्षांनी येणारी आमावस्या कशी चालेल?

@ पाफा काका :-अहो शस्त्रवर चंद्रकिरणासाठी नाही....हा हा अमावस्येला चंद्र कसा उगवेल Happy ...मग चंद्रकिरणं कुठून येणार...
रोहनच्या आत्म्याला गवताच्या जुडीतून सोडवून मुक्त करण्यासाठी सात वर्ष थांबाव लागेल.....तरीही काही चुकत असेल तर सांगा....आणि धन्यवाद Happy

@आदिसिध्दी
धन्यवाद माझा गैरसमज झाला असावा.
आपण वरील लेखात "मागील भागात" या शीर्षकाखाली पोर्णिमेचा उल्लेख केला आहे. तर पहील्या पॅरात अमावस्येचा.
जरी गवताच्या जुडीतून सोडवून मुक्त करण्यासाठी सात वर्ष थांबावे लागत असेल तरी त्या आधी पोर्णीमेला अघोरीचा मृत्यू आवश्यक आहे ( असे मला वाटते) म्हणून मी सुधारणा सुचवली. Happy
Screenshot_20180428-120942.png

अच्छा आता कळलं तुम्हाला काय म्हणायचय ते....मी ते स्पेसिफाय करायला हवं होतं....बदल करते मी तसा....साॅरी....आणि थॅन्क्स