वेबसीरीज.

Submitted by बी.एस. on 9 April, 2018 - 01:55

सध्या अनेक वेबसीरीज येत आहेत. नेहमीच्या रटाळ दैनंदिन मालिके पेक्षा ह्या वेबसीरीज ना जास्त पसंती मिळत आहे. विशेषतः तरुण वर्गाची.. कारण मर्यादित भाग असल्याने बघण्याची उत्सुकता टिकून रहाते.. चला तर मग येथे चर्चा करुया वेबसीरीज.. तुम्हाला आवडलेली किंवा न आवडलेली..त्यासाठीच हा लेखनाचा धागा..

मला आवडलेल्या काही हिंदी वेबसीरीज.
1. लवबाईट्स..भाग 1 आणि 2
2. ब्लॅक काॅफी
3.स्पाॅटलाईट भाग 1
4. ट्विस्टेड भाग 1
5. अनटचेबल्स...
मराठीत अजून काही पाहिल्या नाहीत.

ह्या अजून काही वेबसीरीज
Pitchers (absolute must watch)
Bang Baaja Baarat
TVF Roommates
#movingOut (Marathi)
and absolutely hilarious How to train your dad

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कितीही स्पॉयलर अलर्ट म्हणून लिहिलं तरी वाचलं जातंच आणि जे बघतायत किंवा बघणार आहेत त्यांचा हिरमोड होऊ शकतो.

"द बिग डे" नावाची हाय प्रोफाएल लग्नांची एक सिरीअल नेटफ्लिक्स वर पाहिली.
लोकांकडे किती पैसा असतो लग्नात उडवायला आणि ते किती जास्त खर्चिक लग्न करु शकतात हे बघुन माझ्या मराठी मधमवर्गीय मनाला फारच उदासीनता आली आहे....
कुठल्यातरी भारी हेरीटेज प्रॉपर्टी वर लग्न, सगळ्या वर्‍हाडाला रहायला पंचतारांकीत हॉटेल, खर्‍या खुर्‍या लाखो फुलांचे डेकोरेशन, ५० पदार्थ असणारा बुफे, वधु ला सरसो ची फुलं आवाडतात म्हणुन लग्नात डेकोरेशन करायला वडीलांनी सरसो चं आक्ख्खं शेतच घेतलं म्हणे ई ई ई...
असोच....
तर ईच्छुकांनी सीरीजचा लाभ घ्यावा.

अवांतर :
३ लाख कार्यालयाचं भाडं ( सीमन्तीपुजन १०० पान + १०० नाष्टा पाने + ५०० लग्नाचे जेवण पान )
+ कपडे खरेदी ई ई २-३ लाख
+ सोन ८-१० तोळे त्यातलं पण जमवलेलं असल्यामुळे प्रत्यक्ष खर्च २-३ लाख धरु ....
असा साधारण ८ ते १० लाखात लग्न म्हणजे जंगी लग्न समजणार्‍या लोकात मी वावरत असल्यामुळे अशा सिरीअल पाहिल्या की एकदम डीप्रेशन च येतं Wink

>>कितीही स्पॉयलर अलर्ट म्हणून लिहिलं तरी वाचलं जातंच आणि जे बघतायत किंवा बघणार आहेत त्यांचा हिरमोड होऊ शकतो.<<
"स्पॉयलर अलर्ट" लिहिणं हा सोमि एटिकेट्सचा एक भाग आहे; सगळ्यांनाच तो कळतो असं नाहि, अ‍ॅटलिस्ट इथेतरी तसंच दिसुन येतंय... Wink

शिवाय, स्पॉयलर अलर्ट देणं हा सिगरेटच्या पाकिटावर लिहिलेल्या वैधानिक इशार्‍या सारखाच प्रकार आहे. इशारा देणार्‍यांची झिरो लायॅबिलिटि हि अध्याहृत, आणि वाचणार्‍यांनी स्वतःच्या जबाबदारीवर पुढचं पाउल उचलावं हे अपेक्षा...

हा धागा सगळ्या वेबसिरिज करता आहे तेव्हा लोकं इतर रेकमेंडेशन्स बघायला येतील तेव्हा वाचलं जाण्याची शक्यता आहेच. वेगळा बीबी काढून हेडरमध्ये स्पॉयलर्स आहेत हे लिहिल्यास तो बीबी टाळता येणं शक्य आहे.

मला समहाऊ सिक्वेलबद्दल खात्री वाटत नाही की पहिल्या सीझनइतका भारी असेल. 1992 ची भट्टी एकदम जमून गेली होती. आणि तेलगी प्रकरणात तत्कालीन पॉवर-बाज नेत्याचं नाव घेतील का? अन्यथा काही मजा नाही!

DARK मूळची जर्मन पण इंग्लिश मध्ये रूपांतरित केलेली . सिझन १ खूप आधी पाहिलेली पण २ आणि ३ आले तेव्हा लिंक तुटलेली म्हणून परत बघायला घेतलीये .

विषय टाईम ट्रॅव्हल , वोर्महोल आहे ..इतकी गुंतागुंत आहे कि संगती लावताना दमछाक होते.
इथे वेगळा धागा आहे का त्याच्यावर ?

इथे वेगळा धागा आहे का त्याच्यावर ? >>> बहुधा नाहीये. पण मालिका फार सुंदर आहे. मी चक्क फ्लोचार्ट काढला होता सगळ्या माणसांसाठी तेव्हा. खूप गडबड उडते नाहीतर. विकीवर बहुधा तसा फ्लोचार्ट आहे त्यांनी दिलेला तो पहा.

महाप्रचंड बोअरिंग आहे; बायो ब्रेक्सना पॉज करण्याची गरज नाहि. डबल ट्विस्ट हिच एक जमेची बाजु. आपल्या एम नाइट श्यामलन ने कदाचित कथेला चांगला न्याय दिला असता... Wink

+100
मलाही नाही झेपली. पहिलाच एपिसोड काहीही वाटला म्हणून मग सोडून दिलं आणि नेटवर रहस्य बघून टाकलं. Psychological thriller हे classification चुकलंय.

"द बिग डे" नावाची हाय प्रोफाएल लग्नांची एक सिरीअल नेटफ्लिक्स वर पाहिली>> ही आली का शिरेल? Happy

डार्क मस्त वाटते पहिले काही सिझन छान वाटतात.. डोक्याला प्रचंड खुराक आहे.. time travel फारच मस्त concept नी handle केलंय.. पण शेवटी शेवटी फारच शॉट होतो डोक्याला...

Behind her eyes पाहिली, कैच्याकै बोर आहे. शेवटच्या भागातल्या दोन फालतू ट्विस्ट साठी 5 तास वाया.

Behind her eyes पाहिली, कैच्याकै बोर आहे. शेवटच्या भागातल्या दोन फालतू ट्विस्ट साठी 5 तास वाया.

Submitted by लंपन

Proud मी पहिला भाग पाहून सुज्ञपणे बाय बाय केलं.

Behind her eyes...
bhayankar aawadli. asha genure che kadhi kahi na pahilya mule asel.
ulat mala Dark bor zali.. time travel impossible watate

Behind her eyes..आता संपवली. मस्त आहे. मी तरी पहिल्यांदाच असे काही बघितले. तो rob सुरुवातीपासूनच मेंटल वाटतच होता....
Adam ची काळजी वाटतेय...:-)

Behind her eyes..आता संपवली. मस्त आहे.>>> +1

स्पॉयलर
शेवटी जरा कनफुजन झालंय माझं. रॉब आणि एडल आत्मे बदलतात ते दोघांच्या इच्छेने एकाच वेळी होतं. पण लुईसची कुठं इच्छा असते? ती फक्त आत्मरूपात जाऊन आत काय झालंय ते बघून येणार असते परत.
जसं मागे त्या शेजारणीच्या घरात जाऊन बघून आली काय चाललंय ते.

तसच तिचे आईवडील मरतात आगीत तेव्हाही ती आत्मरूपात भटकायला गेलेली असते, मग तिचं शरीर कस जळत नाही तोपर्यंत. कारण तिला आणताना डेव्हीडचा हात बराच भाजलेला असतो .

Behind her eyes पाहिली, कैच्याकै बोर आहे. शेवटच्या भागातल्या दोन फालतू ट्विस्ट साठी 5 तास वाया.
लंपन+111
मला तर असह्य झाली... दोन एपिसोड मध्ये... बंद केले.

डिस्ने हॉटस्टार वर लाईव्ह टेलेकास्ट ही सिरीज पाहीली. सात भागच आहेत. भुतावर मालिका आहे. भुताला लाईव्ह टीव्हीवर दाखवायच्या नादात लोकं एका टीव्ही चॅनेलचे लोकं एका घरात जातात व त्यांनाच भुत कसे काय त्त्या घरात डांबून ठेवते अशी थीम आहे. मुळात थीम चांगली आहे पण ह्या सिरीज मध्ये त्याचे पुर्ण मातेरे केले आहे. काजल अग्रवाल असल्याने पहायला घेतली. मुळ तामिळ सिरीयल आहे पण हिंदी किंवा मराठी ऑडीओ पण आहे. एकदम सपक सिरीयल वाटली. फक्त शेवटचा भाग बरा वाटला व भुताची स्टोरी (तो भुत नसतानाची) एकदम भावनाप्रधान वाटली.

वर्णिता.. Happy एक्झॅटली...! मलाही हाच प्रश्न पडलेला...की आत्मे स्वॅप करायला दोघांचीही परमिशन लागत असेल ना?
लुईस ची तर अशी काही इच्छा नसते!
अ‍ॅडम ला काहीतरी जाणवलेलं आहे हे नक्की!

वर्णिता.. Happy एक्झॅटली...! मलाही हाच प्रश्न पडलेला...की आत्मे स्वॅप करायला दोघांचीही परमिशन लागत असेल ना?
लुईस ची तर अशी काही इच्छा नसते!
अ‍ॅडम ला काहीतरी जाणवलेलं आहे हे नक्की!

>>>>> स्पॉयलर अलर्ट द्या राव Angry
मी ४ थ्या एपिसोडपर्यंत आलोय

नेटफ्लीक्सवर इस्ट सुशी किंवा अशाच काहीतरी नावाचा ड्रामा आहे. मस्त आहे.
कापलेली फळे विकणार्‍या सामान्य मेक्सिकन मुलीचा सुशी शेफ होण्यापर्यंतचा प्रवास खूप आवडला.
तिला शाळेत जाणारी मुलगी आहे, तिचे शिक्षण, वडीलांचा सांभाळ या तिच्या प्रायोरिटीज असल्याने आणि कापलेली फळे विकण्याच्या व्यवसायात असेलेले धोके लक्षात घेऊन वडीलांचा थोडा विरोध असतानाही ती एका सुशी बारमध्ये आधी किचनमध्ये मदतनीस म्हणून काम सुरु करते व एकेक गोष्टी आत्मसात करुन, अडथळे, विरोध पत्करुन फ्रंट/कस्टमर फेसिंग सुशी शेफची जागा कशी पटकावते ते मस्त दाखवलेय. वडीलही कष्टाळू, तिला फळांच्या व्यवसायात मदत करणारे, तिची काळजी वाटणारे नंतर सुशी स्पर्धेत मदतनीस म्हणून काम करणारे असे सहृदय सद्गृहस्थ दाखवलेत. सर्वांचाच अभिनय छान. वेगळा विषय, अवास्तव इमोशनल ड्रामा नसलेली गोष्ट आहे. तिचे मेक्सिकन कुझीनशी असलेले नाते न तोडता, त्याच्या संयोगाने सुशी वेगळ्या प्रकारे पेश करण्याची इच्छा/प्रयत्न मस्त दाखवलेत. Happy

Pages